कोवळे काही ऋतू अंगावरुन गेले...
मोहराने रान सारे बावरुन गेले!
लालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या?
गीत माझे कोणत्या ओठावरुन गेले!
राहिले आहेत काटे सोबतीस,बाकी
पाकळ्यांचे झुंड या देठावरुन गेले!
हे कसे आले अचानक या नदीस भरते?
दोन तृष्णे'चे बळी काठावरुन गेले!
वेदनेवर वासना जेथे उभार घेते
शब्द माझे आज त्या कोठ्यावरुन गेले!
—सत्यजित
वाचने
3660
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
सुंदर लिहिली आहे.
काहीही
श्रीमंत मार्कस ऑरेलियसराव पेशवे साहेब ...
पण सत्यजितरावांसारख्या
In reply to श्रीमंत मार्कस ऑरेलियसराव पेशवे साहेब ... by खिलजि
नक्की नाव काय आहे आपलं ?
उगी उगी !
In reply to नक्की नाव काय आहे आपलं ? by खिलजि