Skip to main content

मी माझे तारांगण सादर करतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 25/09/2017 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कुठे कोणाचा आदर करतो पाठीवरती वार बिरादर करतो प्याद्याला आदेश रणाचा देतो नि तिथुनी घुमजाव बहादर करतो गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर देवाचे रक्षण जमगादर करतो तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी मी अवघ्या देहाची चादर करतो आळ नको घेऊ, झाडाझडती घे (मी माझे तारांगण सादर करतो) देव दयाळू आहे कळल्यापासुन रोज नवे कन्फेशन फादर करतो डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

वाचने 1930
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आवडली. घेउन अर्ज दयेचा या मशिदीत जरी मी आलो, तुझी शपथ, प्रार्थना करण्यास नाही आलो चोरून प्रार्थनेची मी नेली इथली सतरंजी, झिजली माझ्या पापांनी, बदलावी म्हणुनी आलो. - ओमर खय्याम