Skip to main content

gajhal

नजरोंको चुराकर वो...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 21/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नजरोंको चुराकर वो,इस तौर से चलते हैं कुछ हमभी मचलते हैं,कुछ वो भी मचलते हैं मुमकिन है महोब्बतभी,गर चांद वो ला दो तो ये चांदके 'टुकडे' तो,बगियामें टहलते हैं जुगनूंकी तरह यादें..हमको यूं जलाती है शम्मोंको बुझाकर हम,पुरजोर पिघलते हैं
काव्यरस

और भी आसार बाकी है

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 20/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
आखरी हथियार बाकी है (और मेरी हार बाकी है ) खत्म हो जाता नही सबकुछ और भी आसार बाकी है अब जरा इनसे निपटलूं मै मुश्किले दो चार बाकी है दुष्मनोंसे हो चुका मिलना अब तिरा दीदार बाकी है लूट भी लोगे तो क्या लोगे यह पुरा संसार बाकी है डॉ. सुनील अहिरराव (हिंदीतील पहिला प्रयत्न)
काव्यरस

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 19/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

ती पहा पडली गझल...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 15/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू... जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी! काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी! —सत्यजित
काव्यरस

सर एक श्रावणाची बरसून काय गेली!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 15/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
सर एक श्रावणाची बरसून काय गेली गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली! आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते आई मला म्हणाली,करपून साय गेली!
काव्यरस

कसे या मनाला कसे जोजवावे?

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 12/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
कसे या मनाला कसे जोजवावे? जरा दुःखही शांत व्हावे,निजावे! कुठे भागते आपलेही खरेतर? सुखांनी सुखांना कितीदा गुणावे! किनारा कधी सांगतो का कुणाला? किती सागराने दिले हेलकावे!
काव्यरस

जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 11/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का? बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का? शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का? फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का? आजही तो त्या विटेवर थांबला आहे त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का? —सत्यजित
काव्यरस

जगायास कारण ईतकेच आहे...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 09/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नवे रोज धागे नवा पेच आहे जगायास कारण ईतकेच आहे! कुणी एकटा जात नाही प्रवासा कुणी चालताना कुणा ठेच आहे! कुणी आरसा काल देवून गेले मला भेटतो मी नव्यानेच आहे! कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे उभे विश्व सारे फुकाचेच आहे! नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे! —सत्यजित
काव्यरस

या गुलाबाच्या फुलाला...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 08/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा... या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा! सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची... तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा! तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना... एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा! चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते? तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा! मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी... वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा! प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा... कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा! —सत्यजित
काव्यरस

कधी किनारा लिहितो,किंवा...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 05/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो! कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो! तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो! कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो! अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो! तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो! तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो! —सत्यजित
काव्यरस