मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दु:ख अवघा धृवतारा मागते

drsunilahirrao ·
काव्यरस
मागचा सारा चुकारा मागते दु: ख अवघा धृवतारा मागते थेंबही नाही उभ्या रानात अन जिंदगानी शेतसारा मागते केवढे जहरुन हे गेले शहर वीषही आता उतारा मागते वेदना ओथंबुनी येतात अन सूख मोराचा पिसारा मागते जो कधी उधळून ती जाते स्वत: प्रीत तो सारा पसारा मागते डॉ. सुनील अहिरराव

कळले नाही

सोहम कामत ·
काव्यरस
कळले नाही कोठे चाललो मी.. तुझ्याच दारी जणु भुललो मी.. प्रेमात तुझ्या जरी पडलो परि.. अंतरी तुझ्या पार हरलो मी.. संपले दुवे सारे संपली आशा.. आभाळी कोठे धुंद विरलो मी.. आकांक्षा सार्या गेल्या उडूनी माझ्या.. स्वप्नात फक्त आता उरलो मी.. होतीस तेंव्हा तूच मनाची आस.. अजूनी का तुझ्यात अडलो मी?...

चांदण्याला चांदणे समजू नये

drsunilahirrao ·

चांदणे संदीप गुरुवार, 10/27/2016 - 19:29
:) मस्त गजल डॉ.साहेब. बऱ्याच दिवसांनी.... तुमचे नाव पाहिले आणि काहीतरी छानस वाचायला मिळणार अशा कल्पनेनेच दिल खुश हो गया था! बहोत खूब लिखा है सर...! माशाअल्लाह... एकेक शेर तबितयतसे रचलाय हो! कातिल! चाबूक! Sandy

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे गुरुवार, 10/27/2016 - 22:45
अगदी. सैल बांधणी असणार्‍या कविता वेगळ्या असतात. तिथे सगळे घाईत असल्याने सैल बांधणी उपयोगी पडते.

बोका-ए-आझम Fri, 10/28/2016 - 00:31
हे
हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये
अाणि हे
पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये
फारच सुंदर!

drsunilahirrao Sun, 10/30/2016 - 19:31
आत्मबंध, सतिश गावडे,शार्दुल हातोळकर,सूड,चाणक्य,पैसा,बोका ए आझम,अनुप ढेरे सर्व मित्रांचे मनापासून आभार! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

नाखु Mon, 10/31/2016 - 12:20
वाटले कविराज संदीपाबाबत काही कवीता आहे का, पण हे वेगळेच चांदणे निघाले. उन्हाचांदण्यातला नाखु

सत्यजित... Fri, 05/12/2017 - 15:22
वाह् गझल इतकी सुटसुटीत लिहिता यावी हेच मुळी कौतुकास्पद वाटते! गझल सुरेखच! त्यातही,तारांगणे व पाहणे,हे शेर लाजवाब!

एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव

कोणते माझे वतन होते

drsunilahirrao ·
काव्यरस
रोज थोडे उत्खनन होते ऱोज नात्याचे पतन होते आळ हा गंभीरही नाही पण चरित्राचे हनन होते दोष वणव्याला कसा द्यावा जर इथे गाफील वन होते कोणत्या दुनियेत मी आलो कोणते माझे वतन होते कोठल्या मातीतुनी येते जिंदगी कोठे दफन होते डॉ.सुनील अहिरराव

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे

एक उर्दू गझल - जो ठिकाना हैं हमारा

पथिक ·

वेल्लाभट Mon, 05/16/2016 - 12:14
अनुवाद नाही; पण तसंच काहीसं सुचलं. जिथे जात असू तेच गंतव्य आहे मातीत मातीस भवितव्य आहे हवेच्या सवे वाहणे हीच नीती इथे हेलकाव्यात कर्तव्य आहे न प्यारा परार्थ न स्वार्थाशी सख्य भटकणेच याच्याहुनी भव्य आहे न जातील अश्रू असे व्यर्थ माझे बहर आणणारेच ते द्रव्य आहे शहाणे कधी जाणले ना बिचारे वेडात जे दिव्य माधव्य आहे - अपूर्व ओक

जो ठिकाना हैं हमारा हम वही जा रहेंगे मिटटी से आये हैं मिटटी से जा मिलेंगे ये हवा जो चली हैं इसके संग संग बहेंगे कभी फूलों को चूमेंगे कभी धुल से खेलेंगे न काफ़िलों से दोस्ती न मंज़िलों से यारी कहीं भी रुकेंगे, किधरको भी चलेंगे बेकार न जायेगा रोना यहाँ हमारा एक आंसूं में से कल हज़ार फुल खिलेंगे होशवालों को मुबारक बाग़े होश की सैर हम दश्ते जुनूं में अपने यार से मिलेंगे (कुणी अनुवाद केला तर उत्तम)

सावल्यांची सरमिसळ होते ..

drsunilahirrao ·

आवडली रचना. कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते क्लास. -दिलीप बिरुटे

माहितगार Mon, 04/04/2016 - 22:28
कविता छान आहेच. खालील ओळी छानच आहेत
कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते
इन अ‍ॅडीशन अवांतर: या एवढ्या ओळी मायनस करुन कविता वाचली तर मिपावरील डुआयडींच्या आपापसातील संघर्षावरचे चपखल भाष्य वाटावे ;)

नाखु Tue, 04/05/2016 - 10:29
चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते
हे अगदी उच्च ! कवीतेतला गोळा नाखु

सटक Tue, 04/05/2016 - 22:18
सुंदर गझल! पण अजून एक शेर हवा असे वाटते.. शेवटचा शेर तर अप्रतिम! हासण्या या सर्व भुलले पण, वेदना माझी अटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते कसे वाटते?

एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव

जसजसे जगणे सुखासिन होत आहे..

drsunilahirrao ·
लेखनविषय:
काव्यरस
जसजसे जगणे सुखासिन होत आहे दु:ख अधिकाधीक नमकिन होत आहे सोसले मी जे,मला ना खंत त्याची पण पहा दुनिया उदासिन होत आहे केवढी शहरात आता शिस्त आहे बोलणे अपराध संगिन होत आहे घेतला आश्रय जिथे कोठे मिळाला देवही आता पराधिन होत आहे तू किती सांभाळ आता तावदाने ते पहा वादळ दिशाहिन होत आहे पांढरे काळे प्रतीदिन होत आहे अन तुझे भवितव्य रंगिन होत आहे डॉ.सुनील अहिरराव

मी सुखाची भेट घेणे टाळतो ..

drsunilahirrao ·

कानडाऊ योगेशु Sat, 02/27/2016 - 20:07
मतल्यातच षटकार लगावला आहे डॉ. साहेब. ही फुलांची वाट आहे पण इथे ऱोज एखादातरी ठेचाळतो केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो वरील दोन शेरही कातिल. मजा आ गया..

निशदे Sat, 02/27/2016 - 22:23
मस्त.... ""फारसे घडले नसावे कालही मी उगाचच रात सारी चाळतो"" ""केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो"" सुंदर.....

वेळ दु:खाला दिलेली पाळतो मी सुखाची भेट घेणे टाळतो फारसे घडले नसावे कालही मी उगाचच रात सारी चाळतो ही फुलांची वाट आहे पण इथे ऱोज एखादातरी ठेचाळतो कोणते असते हवेमध्ये जहर रंग प्रेमाचा कसा डागाळतो केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो चालला असता तुझा साधेपणा मी कुठे रंगारुपावर भाळतो डॉ. सुनील अहिरराव