हेही बरेच आहे,
तेही बरेच होते,
आपापल्या परीने,
सारे खरेच होते
मोजून पाप माझे
जपमाळ ओवलेली,
मोक्षास गाठण्याला,
तितके पुरेचं होते,
आयुष्य तारकांचे
मोजीत रात्र होती
मोहक असे मनाला
भूलवीत बरेच होते
खाणीत नांदण्याचा
कोळश्यास शाप आहे
नसते ठिसूळ तुकडे
तर तेही हिरेच होते
सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखीचे
हसरे सारेच होते
-शैलेंद्र
काव्यरस
वाचने
7965
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशक्य सुंदर का काय ते...
प्रचंड आवडली!!
वाखूसा!
Sandy
+१
In reply to अशक्य सुंदर का काय ते... by चांदणे संदीप
कविता आवडली.
धन्यवाद
In reply to अशक्य सुंदर का काय ते... by चांदणे संदीप
धन्यवाद
@प्रचंड आवडली!!
In reply to अशक्य सुंदर का काय ते... by चांदणे संदीप
@प्रचंड आवडली!!
वाखूसा! >>> +++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११
आणी जोरदार टाळ्या!
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद
In reply to अप्रतिम by प्रचेतस
धन्यवाद
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख.
आणि शेवटचा परिच्छेद __/\__
धन्यवाद पद्मावती
In reply to अतिशय सुरेख. by पद्मावति
धन्यवाद पद्मावती
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
नितळ, भावविभोर करणारी कविता.
साल्या असल्या कवितांसाठी काव्यविभाग रहावासा वाटतो. नाय तर रोजचा रतिब आहेच.
मनापासून आभार
In reply to खुपच सुंदर. by पुंबा
मनापासून आभार
सुरेख!
सुरेख!
_/\_ पैसाताई
In reply to सुरेख! by पैसा
_/\_ पैसाताई
अगदी
अगदी
_/\_
In reply to अगदी by नाखु
_/\_
हेही असेच होते, तेही तसेच
हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!?
पहिल्यांदा मला विडंबन आहे असे वाटले पण स्वतंत्र गझल आहे... सुरेश भटांच्या "उशीर" मधून प्रेरणा घेऊन लिहिली आहे का?
प्रेरणा असं नाहही, कारण पूर्ण
In reply to हेही असेच होते, तेही तसेच by शब्दबम्बाळ
प्रेरणा असं नाहही, कारण पूर्ण वेगळा कंटेंट आहे, पण पहिलं कडवं मनात घोळत होतं त्यावर त्याचा प्रभाव असावा
छान.
छान.
धन्यवाद
In reply to छान. by जागु
धन्यवाद
मस्त कविता,
मस्त कविता,
एक प्रयोग म्हणुन प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावुन वाचली, वेगळाच अर्थ लागतो आहे.
हो, मस्त आयडिया,
In reply to मस्त कविता, by ५० फक्त
हो, मस्त आयडिया,
वेगळाच अर्थ निघतो
क्या बात रे
क्या बात रे
मस्त गझल
सगळे शेर सुंदर,शेवटचा सर्वात खास
थँक्स साहेब
In reply to क्या बात रे by स्पा
थँक्स साहेब
छान, आवडली कविता
छान, आवडली कविता
धन्यवाद
In reply to छान, आवडली कविता by पद्मश्री चित्रे
धन्यवाद
सुरेख!
सुरेख!
धन्यवाद
In reply to सुरेख! by प्राची अश्विनी
धन्यवाद
जबरदस्त आवडली
जबरदस्त आवडली
आणि
खाणीत नांदण्याचा
कोळश्या
आणि
सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखी
हे शेर तर लाजवाब.
येवूदे अजुन.
भारी ओ... अजून लिहा..!!
भारी ओ... अजून लिहा..!!
सगळ्यांचे आभार
सगळ्यांचे आभार
कविता आवडली
मस्त कविता
छान ..!! खूप आवडली ..
छान ..!!
खूप आवडली ..