✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुझ्या नाजूक ओठांनी...

स — सत्यजित..., Tue, 01/09/2018 - 21:55
अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी! फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी! कपाळी चंद्र कोरावा,चुड्याने चांदणे ल्यावे तुझा शृंगार होताना,गुलाबी रात्र जागावी! जरासा तोल ढळला की मला बाहूंत घ्यावे तू तुझ्या आरक्त डोळ्यांची शराबी धुंद मी प्यावी! सुगंधी स्पंदने अपुली उराशी खोल लपवू,ये... फुलांचे देह शिणले की, धुक्याची शाल ओढावी! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
5466 वाचन

💬 प्रतिसाद (11)

अप्रतिम

चांदणे संदीप
Wed, 01/10/2018 - 05:54 नवीन
सुरेख रचना! जियो! Sandy
  • Log in or register to post comments

मस्त....

जयंत कुलकर्णी
Wed, 01/10/2018 - 10:01 नवीन
मस्त.... खर्‍या जाती दोनच. आणि त्या एकमेकांवर प्रेम करतात.... :-) रेफः सध्याचा गदारोळ
  • Log in or register to post comments

सुंदर!

प्राची अश्विनी
Wed, 01/10/2018 - 11:09 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

मस्तच !

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/11/2018 - 16:52 नवीन
मस्तच ! फक्त ते आलिंगणेच्या ऐवजी आलिंगने करा.
  • Log in or register to post comments

हो,ते नंतर लक्षात आले!

सत्यजित...
Fri, 01/12/2018 - 13:48 नवीन
हो,ते नंतर लक्षात आले! 'आमंत्रणा'चे 'आलिंगन' होता होता राहून गेलेले ते! प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

छान....!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/11/2018 - 21:01 नवीन
आवडली कविता. लिहीत राहा. GN ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

झुळूक दिली त्याबद्दल

नाखु
गुरुवार, 01/11/2018 - 21:12 नवीन
अभिनंदन सद्गय गदारोळात( मंडई, स्वारगेट, तुळशीबाग, गावठी अड्डा यांची समुच्चय अनुभुती) पिडीतांना दिलेली झुळूक
  • Log in or register to post comments

गुलाबी झुळूक. सुंदर.

शिव कन्या
गुरुवार, 01/11/2018 - 22:00 नवीन
गुलाबी झुळूक. सुंदर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Fri, 01/12/2018 - 13:50 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद,आभार!
  • Log in or register to post comments

क्या बात है....! अप्रतिम

प्रचेतस
Fri, 01/12/2018 - 14:58 नवीन
क्या बात है....! अप्रतिम
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
गुरुवार, 01/25/2018 - 19:55 नवीन
प्रतिसादाबद्दल प्रचेतस व टंकणातील चूक दुरुस्त केल्याबद्दल सा.सं.चे मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा