मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...

सत्यजित... ·

In reply to by सत्यजित...

यशोधरा 02/05/2017 - 09:13
कोबरा असा शब्द आहे का? किंग कोब्रा/ कोब्रा हे इंग्लिश भाषेतील शब्द आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तुम्हांला नागिणीसारखा/ नागसारखा केशकलाप वगैरे म्हणायचे असेल हे समजले पण त्यासाठी 'कोबरा' हा नसलेला शब्द योजणे पटत नाही. चुभू.

In reply to by यशोधरा

पुंबा 03/05/2017 - 10:11
हेच म्हणायचे आहे. त्या एका शब्दामुळे कवितेला उणेपण येते असे वाटते. बाकीच्या ओळींतील सुअंदर सहजता हरवते, अर्थात हे वै. मत. बाकी कविता, प्रतिमा उत्कट, सुरेख.

समाधान राऊत 02/05/2017 - 09:23
वाचुन झाल्यावर अर्धा तास तरी काहीच सुचत नाही. कसल्या उपमा देतोस जबरा, आशिक लोक्स देशोधडीला लागु लागलेत आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती? ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!

In reply to by समाधान राऊत

सत्यजित... 04/05/2017 - 02:45
राऊत सर,वैयक्तीक अनुभवावरुन सांगतो,(राज की बात!)जेंव्हा काहीच सुचत नाही,तेंव्हा सुचते ती कविता!घ्या लेखणी हाती! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

राघव 02/05/2017 - 09:50
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा! - ही ओळ खास आवडली!

ओंजळीने मी जसा झाकून घेतो चेहरा का कसा ठावूक नाही लाल होतो गोबरा! सोडल्या झिंज्यांतूनी हिसकुनी घेतो केवढा अन जटांचा जीवघेणा पीळ तुटतो, तो बरा! मी पुरा घायाळ होतो तो जसा डोकावतो केवढा राकट आहे, (तिचा) भाऊराया साजिरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटतो सारखा खोचतो मोकळ्या शर्टाला होऊन मी घाबरा! काय सांगू केवढा दणकून असतो मार तो ती जरी मामाची पोरगी अन मी त्यांचा सोयरा! — सँडीभीत(भीत आहे!)

In reply to by चांदणे संदीप

काय सॉलिड विडंबन आहे!! काय सांगू केवढा दणकून असतो मार तो ती जरी मामाची पोरगी अन मी त्यांचा सोयरा! अगागागा.... मूळ गझलही छानच.... पुर्वी माबोवर सत्यजीतभाऊंना पोचपावती दिली आहेच....

वेल्लाभट 02/05/2017 - 12:06
सत्यजित भाऊ, लव्हली ! एक नंबर रचना. तुमच्या कवितांचा फ्यान आहे मी. सुरेख लय, एक से एक रुपकं, आणि जबरदस्त भाव असा त्रिवेणी संगम तुमच्या रचनेत बघायला मिळतो. ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा! या ओळीसाठी स्टँडिंग ओवेशन म्हणजे एकदम ! हासिल-ए-ग़ज़ल ! कोबरा बद्दल काहींना आक्षेप असू शकतो. मलाही तितकासा तो शब्द 'या' रचनेत रुचला नाही. त्याचा वापर कल्पक केलायत, पण बाकी कविता इतकी अलंकारिक असताना मधेच हा शब्द रसभंग करतोय. म्हणून फक्त तो आवडला नाही. बाकी एक नंबर.

In reply to by वेल्लाभट

सत्यजित... 04/05/2017 - 03:23
अपूर्वजी, आपला प्रतिसाद वाचून भाराऊन गेलो खरेच! प्रशंसा कुणाला आवडत नाही? आपण जी मनमुराद दाद दिलीत,त्याबद्दल मी आपला ऋणी आहेच,पण प्रतिसादाच्या शेवटी,न आवडलेला भागही नमूद करतानाचा आपला समजावणीचा सूर,कोण अल्हादक आहे!कदाचित त्यानेच अधिक भारावून गेलो! मनापासून खूप-खूप धन्यवाद!

मितान 02/05/2017 - 12:24
सुंदर ! रखरखीचे रान सारे अन उन्हाळा हा खरा पण मिपा च्या वाळवंटी गार वाहे हा झरा ! :प

In reply to by मितान

सत्यजित... 04/05/2017 - 03:30
प्रतिसादांच्या पावसात,आपला हा छंदबद्ध काव्यमय प्रतिसाद,म्हणजे मृद्गंधाची दरवळ वाटून गेला! मनःपूर्वक धन्यवाद!

सत्यजित... 02/05/2017 - 22:08
सर्वप्रथम,आपण सर्वांनी अगदी भरभरुन दाद दिली,त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अनेकानेक धन्यवाद! 'कोबरा' हा प्रतिमावाचक शब्द योजताना,मीही तो एक प्रयोग म्हणूनच वापरुन पाहिला होता!त्यावर सर्वप्रथम यशोधरा यांनी,व नंतर राघव,वेल्लाभट यांनी व्यक्त केल्याप्रमाणे मते अपेक्षित होती!त्यांच्या स्पष्ट मतांबद्दल आभार,तसेच रसभंग जाणवल्याबद्दल मी खेद व्यक्त करतो! कृपया सदर शेर असा वाचून पहावा... 'मोकळ्या केसांतुनी बहरुन येतो केवडा गुंतुनी श्वासांत,भिनतो..गंध अल्लड बावरा!' आपला स्नेहाभिलाषी, —सत्यजित

In reply to by सत्यजित...

रुपी 03/05/2017 - 05:45
हे छान आहे. तुमच्याही मनासारखं असेल तर सा.सं. कडून बदलून घेऊ शकता. कदाचित त्यामुळेच आधी ही कविता वाचली तेव्हा तुमच्या बाकी कवितांइतकी आवडली नव्हती. आज पुन्हा नीट वाचली. खरंच शेवट तर खूपच सुंदर आहे!

चतुरंग 03/05/2017 - 22:19
वा वा! मस्तच गजल! एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले! :) आमचा नजराणा.... ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा... येत नाही लपवता पण गाल मोठा गोबरा! मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा? आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी भिववतो भोळ्या जिवाला चुंबनांचा तोबरा! काय सांगू केवढी असते भयानक भेट ती? ती फुल्यांची मेहुणी अन् मी फुल्यांचा सोयरा! -चतुरंग

In reply to by चतुरंग

सत्यजित... 04/05/2017 - 01:50
>>>एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले!>>>वाव्वा...क्या बात है! अशी कोटी करता यावी,हा मिश्किलपणाही मुळातच असावा लागतो!

सत्यजित... 04/05/2017 - 01:43
प्रथमतः,आपणांस माझी रचना विडंबन करावे इतक्या योग्यतेची वाटल्याबद्दल अनेक धन्यवाद!चतुरंगजी आपण मूळ रचनेस दादही दिलीत,त्याबद्दल आपले आभार! सोबतच विडंबनकार मंडळींना एक विनंती करतो... विडंबन कुठल्याही,कुणाच्याही रचनेचे असले तरी ती एक स्वतंत्र रचना आहे,स्वतंत्र अभिव्यक्ती आहे,कला आहे!तेंव्हा या रचना स्वतंत्र धाग्यांत प्रकाशीत केल्या जाव्या असे वाटते,जेणेकरुन केवळ विडंबने वाचण्याचा छंद असणाऱ्या रसिकांनाही त्या सहजपणे उपलब्ध होतील,तसेच मूळ रचना व विडंबन,या दोन्हीचे वातावरण,त्या त्या धाग्यांवर कायम राहिल! मिपाकरांना अजून एक विनंती आहे...कृपया आपण सर्वांनीच,मला केवळ 'सत्यजित' असे एकेरी संबोधलेत तर,मला ते अधिक आवडेल! —आपला स्नेहाभिलाषी सत्यजित

In reply to by सत्यजित...

मूळ रचना व विडंबन,या दोन्हीचे वातावरण,त्या त्या धाग्यांवर कायम राहिल! संदीप आणि चतुरंगजींनी डायरेक्ट धाग्यावर केलेली विडंबनं रंगाचा बेरंग करुन गेली. सदर प्रतिभा सेपरेट उमटल्या असत्या तर बरं झालं असतं कारण या निमित्तानं ज्यांना कवितेचा मूड वगैरे काही कळत नाही ते सुद्धा विडंबनांची तळी उचलतात. अर्थात, मिपावर ही अनर्थकारी परंपरा पूर्वापार आहे आणि प्रशासनाच्या जोपर्यंत ही किमान गोष्ट लक्षात येत नाही तोपर्यंत चांगल्या रचनांचा विचका होऊन कवी नाऊमेद होत राहाणार. इथे चांगल्या कविता याव्या अशी इच्छा असेल तर प्रशासनाला किमान चांगल्या रचना आणि सुमार रचना यात तारतम्य करता यायला हवं. एक वेळ सुमार रचनांवर तिथल्या तिथे केलेली विडंबनं हास्यरस निर्माण करु शकतात पण चांगल्या रचनांचा रसभंग झाल्याशिवाय राहात नाही. शिवाय कवी हतोत्साह होऊन नवी किंवा अती तरल रचना इथे टाकेल की नाही हा मुद्दा आहेच. अर्थात, प्रशासन जर उदार धोरण ठेवून सगळे सदस्य एकसमान ( :) ) तद्वत सब कवी बाराटक्के ही पॉलिसी राबवणार असेल तर बोलायलाच नको.

In reply to by सत्यजित...

चतुरंग 04/05/2017 - 04:57
शक्यतो मी स्वतंत्रच धागा टाकतो परंतु यावेळी कंटाळा केला त्याबद्दल दिलगीर आहे. साहित्यसंपादकांना विनंती आहे की माझे विडंबन आणि त्यावरील प्रतिसाद येथून काढावेत आणि स्वतंत्र धागा टाकतोय त्यावर हलवावेत. (दिलगीर)रंगा

In reply to by चतुरंग

या कवितेच्या निमीत्तानं तरी मिपावरची, चांगल्या रचनांचा मूड बिघडवण्याची अनर्थकारी प्रथा संपेल अशी आशा करु. तुमच्यासारख्या अपवादात्मक केसेस सोडल्या तर हे तारतम्य प्रशासनालाच करावे लागणार आहे. माझ्या मते (एका कवीच्या दृष्टीनं), अशी डायरेक्ट विडंबनं म्हणजे कवितेचा अपमान आहे.

ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा... का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा! मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा! आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा! काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती? ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा! —सत्यजित

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

drsunilahirrao ·

सत्यजित... 27/04/2017 - 14:57
>>>जरासा जोर लावावास अजुनी पहा माझे निखळणे शक्य आहे>>>क्या बात है! >>>जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या तुझी काया वितळणे शक्य आहे>>>बढीया!

अता ही भेट टळणे शक्य आहे (तुझे मजला वगळणे शक्य आहे) जरासा जोर लावावास अजुनी पहा माझे निखळणे शक्य आहे नको इतकी मुजोरी आरशावर तुझेही रुप ढळणे शक्य आहे असे येऊ नये वेळीअवेळी (कुणी काही बरळणे शक्य आहे) जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या तुझी काया वितळणे शक्य आहे तुला पाहून येथे एकटीला फुलांचे बावचळणे शक्य आहे डॉ. सुनील अहिरराव

ती एकदाच दिसली...

सत्यजित... ·
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला! होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन् एकेक मंद ठोका मग बंद होत गेला! केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला! टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला! ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला! केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला! —सत्यजित

घोर हा घनघोर आहे!

सत्यजित... ·
चोर तर आहेच वर शिरजोर आहे काळजाचा घोर हा घनघोर आहे! जाळतो आहे जिवाला रोज थोडे पावसाचा जोर हा कमजोर आहे! तू नको जावूस माझ्या शांततेवर वेदने,मी वादळाचा पोर आहे! ऐन दुःखाचा पसारा मांडला मी वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे! जिंदगी एकाच दुःखावर उधळली मी हिशोबी,फार काटेकोर आहे! वाचण्याआधीच हे लक्षात घे तू मी कुणी नाही कवी,चितचोर आहे! —सत्यजित

गंधभारल्या रात्री होत्या...

सत्यजित... ·

दशानन 21/04/2017 - 13:53
शॉरी :D उत्तम रचना होती म्हणून जरा आचरटपणा केला आहे ;)

मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! बहोत खूब !

स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा... फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते! विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना... लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते! मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा... पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते! —सत्यजित

वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

सत्यजित... ·
कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे! खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे! मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे! अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे! वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे! —सत्यजित

तडा गेलाच आहे तर...

सत्यजित... ·

मोनाली 18/04/2017 - 13:07
अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या!>>>> खूप छान!

दशानन 18/04/2017 - 18:01
गझल किती नियमात आहे हे न पाहता आशय पाहून म्हणतो... खूप आवडली आहे, सध्या अभ्यास कमी असल्याने नियम इत्यादी चिरफाटे सोडून लिहतो आहे.

नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या! नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या! घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या! अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या! नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या! जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जाऊ द्या! —सत्यजित

नाद मेघांचाच दर्जेदार होता...

सत्यजित... ·
नाद मेघांचाच दर्जेदार होता पावसाचा जोर फुसका बार होता! ओल आहे काळजाच्या खोल रुतली स्पर्श त्याचा केवढा उबदार होता! रात्र होती चंद्र होता गार वारा चांदण्याचा कवडसा अंगार होता! सावल्याही हाय मज सोडून गेल्या की उन्हाचा रंग काळाशार होता?? सापडेना खंजिराची खूण कोठे काळजावर काजळाचा वार होता! ओळखावे तू मला ही आस नव्हती हा तसा माझा नवा अवतार होता! का प्रवासाला निघाला एकटा?तो... सूर्य होता वा कुणी अंधार होता? फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन आज बहुधा वाटते रविवार होता! जिंकलो..नाबाद-शतकी खेळ केला यष्टिच्या मागे कुणी दिलदार होता! —सत्यजित

दाही दिशांस जेंव्हा...

सत्यजित... ·
दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता! पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता! ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली? हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता! अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता! लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन् एका क्षणात अवघा दर्याच आटला होता! मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता! मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता पत्रामधून माझा पत्ताच काटला होता! —सत्यजित

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

सत्यजित... ·

पडली का घशाला कोरड आहे? चखण्याचा तेवढा आधार आहे प्यायली होती विदेशी काल येथे आज देशीही का महाग आहे? एकही बार कसा सापडेना हा कोणता जणू महामार्ग आहे? फूंकतो आहे कधीचा धूर मीही खिशात माझीया गायछाप आहे! सारखा हिंदाळतो हा प्राण माझा त्या सूलाची वाईनही चवदार आहे! ~~~~मद्यजित (पैजारबुवा)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@सारखा हिंदाळतो हा प्राण माझा त्या सूलाची वाईनही चवदार आहे! ~~~~मद्यजित (पैजारबुवा)››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सत्यजित... 09/04/2017 - 18:39
चांगभलं...! पुढच्या वेळी काफिया इ. सांभाळला तर मजा येईल विडंबनाची! तसा 'या' विषयात जरा तोल गेला ते ठिकै!

साचला का एवढा अंधार आहे? काजव्यांचा तेवढा आधार आहे! जागल्या होत्या मशाली काल येथे आज इथला सूर्यही बेजार आहे! एकही ठिणगी कशी येथे पडेना? कोण इथला आंधळा सरदार आहे? फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही श्वास माझाही जरा उबदार आहे! सारखा हिंदोळतो हा प्राण माझा त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे! —सत्यजित