स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते...
गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते!
केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा...
फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते!
विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना...
लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते!
मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर?
तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते!
निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा...
पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते!
—सत्यजित
सुरेख!
वा!
ती फुलांची पाहुणी अन् मी
In reply to ती फुलांची पाहुणी अन् मी by यशोधरा
मी इंग्रजी Cobra समजले.:)
मस्तच.
ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
कोबराचा अर्थ सांगा की.
In reply to कोबराचा अर्थ सांगा की. by यशोधरा
तोच तो...
In reply to तोच तो... by सत्यजित...
ते खटकले मग.
In reply to ते खटकले मग. by यशोधरा
आपल्या मताचा आदर आहे,पण कारण
In reply to आपल्या मताचा आदर आहे,पण कारण by सत्यजित...
कोबरा असा शब्द आहे का? किंग
In reply to कोबरा असा शब्द आहे का? किंग by यशोधरा
+१
In reply to कोबरा असा शब्द आहे का? किंग by यशोधरा
हेच म्हणायचे आहे. त्या एका
बास भावा , वाचायची ताकत संपली
In reply to बास भावा , वाचायची ताकत संपली by समाधान राऊत
धन्यवाद!
छान!
ओंजळीने मी जसा झाकून घेतो
In reply to ओंजळीने मी जसा झाकून घेतो by चांदणे संदीप
सँडीभाऊ जोरदार हो!!
In reply to सँडीभाऊ जोरदार हो!! by शार्दुल_हातोळकर
भारी !!!
In reply to ओंजळीने मी जसा झाकून घेतो by चांदणे संदीप
सँडीभाऊ जोरदार हो!!
In reply to सँडीभाऊ जोरदार हो!! by शार्दुल_हातोळकर
धन्यवाद!
सत्यजित भाऊ,
In reply to सत्यजित भाऊ, by वेल्लाभट
धन्यवाद!
सुंदर रचना !
In reply to सुंदर रचना ! by मितान
धन्यवाद!
खूप-खूप धन्यवाद!
In reply to खूप-खूप धन्यवाद! by सत्यजित...
हे छान आहे.
In reply to खूप-खूप धन्यवाद! by सत्यजित...
वा!
सुन्दर कविता !!
व्वा !
कोब्रा ?
(ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...)
In reply to (ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...) by चतुरंग
अरारारा....
In reply to (ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...) by चतुरंग
तेरडा ?????
In reply to (ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...) by चतुरंग
अभिनंदन!
धन्यवाद!
विडंबनकारांना विनंती...
In reply to विडंबनकारांना विनंती... by सत्यजित...
प्रचंड सहमती !
मूळ रचना व विडंबन,या दोन्हीचे वातावरण,त्या त्या धाग्यांवर कायम राहिल!संदीप आणि चतुरंगजींनी डायरेक्ट धाग्यावर केलेली विडंबनं रंगाचा बेरंग करुन गेली. सदर प्रतिभा सेपरेट उमटल्या असत्या तर बरं झालं असतं कारण या निमित्तानं ज्यांना कवितेचा मूड वगैरे काही कळत नाही ते सुद्धा विडंबनांची तळी उचलतात. अर्थात, मिपावर ही अनर्थकारी परंपरा पूर्वापार आहे आणि प्रशासनाच्या जोपर्यंत ही किमान गोष्ट लक्षात येत नाही तोपर्यंत चांगल्या रचनांचा विचका होऊन कवी नाऊमेद होत राहाणार. इथे चांगल्या कविता याव्या अशी इच्छा असेल तर प्रशासनाला किमान चांगल्या रचना आणि सुमार रचना यात तारतम्य करता यायला हवं. एक वेळ सुमार रचनांवर तिथल्या तिथे केलेली विडंबनं हास्यरस निर्माण करु शकतात पण चांगल्या रचनांचा रसभंग झाल्याशिवाय राहात नाही. शिवाय कवी हतोत्साह होऊन नवी किंवा अती तरल रचना इथे टाकेल की नाही हा मुद्दा आहेच. अर्थात, प्रशासन जर उदार धोरण ठेवून सगळे सदस्य एकसमान ( :) ) तद्वत सब कवी बाराटक्के ही पॉलिसी राबवणार असेल तर बोलायलाच नको.In reply to विडंबनकारांना विनंती... by सत्यजित...
स्वतंत्र धागा कढण्याची सूचना रास्त आहे.
In reply to स्वतंत्र धागा कढण्याची सूचना रास्त आहे. by चतुरंग
चतुरंगजी, मनःपूर्वक धन्यवाद !
कवितेतलं काही कळत नाही .. पण
In reply to कवितेतलं काही कळत नाही .. पण by अद्द्या
धन्यवाद!