[शतशब्दकथा स्पर्धा] गोची
त्या दिवशी मी, बापलेकर, पालेकर थोडं लवकरंच शाळेत पोचलो. सकाळची शाळा सुटायला अजून अवकाश होता, म्हणून गेटवरच टिवल्या बावल्या करायला सुरूवात केली.
नेहमीप्रमाणे चावताना च्युईंगम दोन बोटांनी बाहेर खेचणे, समोरच्या थियेटरवरचे 'तसल्या' सिनेमाचे पोस्टर न्याहाळणे इत्यादी टुकार उद्योग बापलेकरने सुरू केले होते.
तेवढ्यात गेटमधून ज्युनिअर काॅलेजच्या गणवेषातली एक सुंदर मुलगी येताना दिसली. गोरीपान,काळेभोर डोळे!!
"आयला! काय कडक माल आहे राव!." बापलेकर चवताळला.
"बैला, तुझ्यापेक्षा मोठी दिसतेय ती." मी.