भाषेरी कुंपण

अर्थहीन's picture
अर्थहीन in जनातलं, मनातलं
10 Aug 2015 - 3:10 pm

लेख दुसरा...
हा एक प्रयोग आहे... माहित नाही किती जणांना कनेक्ट होऊ शकेन...
प्रतिक्रियांची वाट पाहत आहे...

........भाषेरी कुंपण.........

आता मी हळू हळू लिहायला घेतोय. माझ्या नेहमीच्या टेबलवर -नाही- खुर्चीवर बसून. -बसलोय.
पेन वही समोर ठेऊन. -ठेवलीय. आता हळू हळू हे आर्टीकल लिहिता लिहिता मी स्वत:च्या सबकॉन्शियस मधे अलगद$$ प्रवेश करेन. -केलाय.
मी आज भाषेशी खुप भारदस्त प्रयोग करणार आहे. -करतोय.
माझ्या -'इथल्या!' सबकॉन्शियस मधे वडलांना आणणार आहे. -आनलंयही.
अन
वडलांच्या 'गावच्या' सबकॉन्शियस मधे मी जाणार आहे. -गेलोयही.
(मला भाषा हवी तशी वळवता येईल काय?? 'हा' तो प्रयोग.
मी यशस्वी होईल?? तुम्हाला काय वाटतं??
--वाटलं?? --ते महत्वाचं नाही.)

वडील आता घरी आले असतील. हळूच खांद्याची पिशवी काढून हैंगरला अडकवुन ठेवतील. ठेवलीय. ठेवताना विचार करतील की भैया (-म्हणजे मी) आता ऑफिस वरुन आलो असेन. हातपाय धुत असेन.
मी इथं घरी हातपाय धुता धुता वडलांना आठवतोय. आज दुपारी आईला फ़ोन केला होता. -सहजच. ती परवा दुपारच्या फ़ोनवर म्हटलेली की काल घरासमोरच्या बागेत नवीन फूलझाडं लावणार आहे.

वडील आता किचन मधे पाणी पित पित आईला विचारतील, भैयाचा फ़ोन आलता का गं दुपारी??.
ते विचार करतील की हा या आठवड्यात येतो म्हनलाय. पण याचं काही खरं नसतं हेही खरंय.
हे आठवून मी स्वत:ला सांगतोय की आपण खरंतर कॅन्सल केलंय या आठवड्यात घरी जायचं. आईही त्यांना हेच सांगतेय. ते ऐकतायत.

मी आता माझ्या मनाशी बोलतोय की
बाकीचे घरातले सगळे जेवायला बसले असताना, वडील मात्र नेहमीसारखं नेमकं चोळून मोळून हात पाय धुण्यात मग्न असतील. पण त्यांच्या डोक्यात चक्र मात्र फिरतच असेन ('विचारांचं' हे तुम्हाला एक्सप्लीसिटली सांगावं लागेल का?) की हा तिथं पुण्यात घरात एकटाच राहतो? ह्याला रोज करमत तरी असेल का?? असेल तर कसं?
मला आता इथं एकटं करमत नाही. हल्ली बोर होतं. हे खरंय.
बरं झालं ह्यांना हे न सांगता समजलं.
(उद्याच्या फोनवरचा तेवढाच समजवा-समजवीचा वेळ वाचला.)

उशीर झालाय. -तिकडे अन इकडेही. त्यांच्या मनात एरव्हीही आलंच असेल की ह्याचं आता सगळं आवरलं असेन अन झोपायच्या तयारीत असेन. आता हळू हळू हा पुस्तक हातात घेऊन ते वाचता वाचता कॉन्शियस मधे येईल अन मला विसरुन सावकाश झोपी जाईल.

इकडं झोपताना मला वाटतं की वडीलही आता जेवत -बातम्या ऐकत त्या बातम्यातल्या घटनांसोबत त्यांच्या शांत सबकॉन्शियस मधून बाहेर पडून कॉन्शियस जगात येतील अन शेवटी मला विसरून, हात धुवून झोपायला जातील.....................

मांडणीकथामुक्तकलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

10 Aug 2015 - 5:42 pm | मास्टरमाईन्ड

खर्रच!
लैच डोक्यावरुन गेलं.

मस्त कट्टा करा....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Aug 2015 - 5:53 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अ‍ॅबस्ट्रॅक्ट आहे...
लिहीत रहा...

मी आता कोणाच्या सबकाँशस मध्ये जाऊ असा विचार करतोय.

मुक्त विहारि's picture

10 Aug 2015 - 6:17 pm | मुक्त विहारि

लगेच सबकाँशस मध्ये जाल.

"पुरुषांना सबकाँशसमध्ये ढकलण्याची कला, स्त्रियांना उपजतच असते." असे आमच्या बाबांचे म्हणणे.

प्रश्न नीट वाचा बरं? नाही समजला तर मग अभ्यास वाढवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2015 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वतःचे म्हणणे बाबांवर ढकलून केलेली स्वसंरक्षण योजना आवडली =))

मुक्त विहारि's picture

10 Aug 2015 - 7:08 pm | मुक्त विहारि

बाबांची बायको, बाबांच्या डोक्यात लाटणे मारते.

आणि बाबा सबकाँशस मोड मध्ये जातात.

जडभरत's picture

10 Aug 2015 - 6:27 pm | जडभरत

;)

वेल्लाभट's picture

10 Aug 2015 - 6:40 pm | वेल्लाभट

मला आवडला.

अशी सुध्दा खपून जाईल !!

( मी लेखकाच्या सबकाँन्श्समधे डोकवायचा प्रयत्न केला.... तिथं यमेफ हुसेनच्या चित्रांसारखं काहीतरी गूढ दिसतंय)

कृ ह घ्या.......

अरुण मनोहर's picture

11 Aug 2015 - 5:45 am | अरुण मनोहर

अंदरसे सब काँशस ही होते है!

सबकाँशस सिर्फ कहने की बात!

तुडतुडी's picture

12 Aug 2015 - 2:07 pm | तुडतुडी

आवरा . मी पा वर पूर्वी अर्थपूर्ण , चर्चात्मक , मनोरंजनीय असे वाचनीय धागे असायचे. आता ते मी पा नाही राहिलंय