ताज्या घडामोडी - भाग १९

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
2 Jan 2018 - 10:25 am
गाभा: 

नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.

http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military...

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

2 Jan 2018 - 10:42 am | श्रीगुरुजी

या निमित्ताने ते ट्वित पहून आलो.. तिथे पण मिपासारखेच स्कोर सेटलिंग चालते हे पाहून अंमळ मौज वाटली. :)

मराठी_माणूस's picture

2 Jan 2018 - 1:28 pm | मराठी_माणूस

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/is-bmc-probe-in-f...

शेवट्च्या परिच्छेदात कमिश्नर म्हणतात, काही अधिकार्‍यावर कारवाई न करण्यास राजकीय दबाव येत आहे. असे असेल तर सामान्य माणसांच्या समस्यांचे काय होत असेल याचा अंदाज बांधता येतो.

http://epaper.loksatta.com/1489024/indian-express/02-01-2018#page/7/2

व्यवस्थापकांना अटक केल्याची बातमी . मुळ दोषी मोकाट.

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2018 - 3:01 pm | श्रीगुरुजी

ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून एक पाऊल उचलले असून आता अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी ११५ कोटी डॉलर्सची मदत स्थगित केली आहे.

http://indianexpress.com/article/pakistan/donald-trump-administration-su...

पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव कामगिरी करणारा बहुधा ट्रंप हा पहिलाच अमेरिकन अध्यक्ष असावा. भारताने ट्रंप अध्यक्ष असेपर्यंत अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानविरूद्ध भरीव पावले उचलावीत. सध्या जगात ३ माथेफिरू आहेत - ट्रंप, किम जाँग आणि शि जिनपिंग (भारतातील निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत शेवटची दोन नावे काढून त्याजागी मोदी आणि नेतानयाहूंचे नाव टाकतील). यातील ट्रंप भारताला अनुकूल आहे, शि जिनपिंग भारतविरोधी आहे तर किम जाँग व भारताचा अजिबात संबंध नाही.

अमितदादा's picture

6 Jan 2018 - 9:07 am | अमितदादा

काहीही, हा माथेफिरू तुमच्या दृष्टीने असेल. जगाच्या आणि चिनी लोकांच्या दृष्टीने हा अत्यंत प्रभावशाली नेता, उत्तम राजकारणी, आणि उत्तम प्रशासक आहे. 2013 च्या आसपास जेंव्हा लोक चीन भविष्यात आपली अर्थव्यवस्थेची घोडदौड राखेल का अशी शंका घेत होते, त्यापासून आजपर्यंत सर्वाना यांनी चुकीचं ठरवलं. चीन ची जगात ताकत आणि मान बराच वाढवला. स्वतःच्या देशात स्वतःला tallest leader म्हणून सिद्ध केलं. चीन मध्ये भ्रष्टाचार विरुद्ध सर्वात मोठी आणि परिणामकारक लढाई उभारली. 21 शतकातील महत्वकांक्षी obor प्रकल्प चालू केला. चीन च्या लष्करावर मजबूत पकड बनवली आणि त्याला आधुनिकतेचा आणि आक्रमकतेचा चेहरा दिला. माओ नंतर पार्टी च्या संविधानात स्थान असलेला हा दुसरा राष्ट्राध्यक्ष. अशा अनेक गोष्टी लिहता येतील, तेंव्हा अश्या गोष्टी करणे ते ही छाती न बडवता हे येर्या गबाळ्या च काम न्हवे.

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2018 - 2:11 pm | श्रीगुरुजी

साम्राज्यवादी या दृष्टीकोनातून शि जिनपिंग हा माथेफिरू आहे. माथेफिरूंना देशातून नेहमीच भरपूर पाठिंबा असतो. खोमेनी, हिटलर या माथेफिरूंनाही त्यांच्या स्वतःच्या देशात प्रचंड पाठिंबा होता. शि जिनपिंगची साम्राज्यवाढीची महत्त्वाकांक्षा अतिरेकी स्वरूपाची आहे. भारताच्या तिप्पट भूमी चीनकडे आहे. एवढा मोठा देश असूनही चीनची बकासुरासारखी भूक वाढतच आहे. लष्करी व आर्थिक सामर्थ्य वापरून चीनचे साम्राज्य वाढविणे ही महत्त्वाकांक्षा असणे व त्या दॄष्टीने सातत्याने पावले टाकणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.

अमितदादा's picture

6 Jan 2018 - 2:36 pm | अमितदादा

लष्करी व आर्थिक सामर्थ्य वापरून चीनचे साम्राज्य वाढविणे ही महत्त्वाकांक्षा असणे व त्या दॄष्टीने सातत्याने पावले टाकणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.

असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही, इतिहासात अनेक सत्ता साम्राज्यवादी होत्या म्हणून त्या माथेफिरू न्हवत्या. उदारणार्थ> इंग्रज, पोर्तुगीज, अमेरिका. साम्राज्यवाद हा अनैतिक, अयोग्य असेल परंतु माथेफिरू च लक्षण नाही. शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.

चीन भारताचा शत्रू आहे म्हणून शि जिनपिंग यांच्याविषयी थोडीफार असूया असू शकते परंतु त्यांना direct माथेफिरू ठरवू नये कारण त्यांच्यात आणि अमेरिकेचे ट्रम्प तात्या, उत्तर कोरियाचे किंग कॉंग यांच्यात खूपच फरक आहे.

प्रसाद_१९८२'s picture

6 Jan 2018 - 2:42 pm | प्रसाद_१९८२

शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.

===

डोकलाम मध्ये भारताने थोडा कठोर पावित्रा घेतला म्हणून, नाहितर चीनचे सैन्य थेट आसाम पर्यंत आले असते.

अमितदादा's picture

6 Jan 2018 - 2:48 pm | अमितदादा

डोकलाम मध्ये भारताने थोडा कठोर पावित्रा घेतला म्हणून, नाहितर चीनचे सैन्य थेट आसाम पर्यंत आले असते.

:))) मला वाटले मुंबई पर्यंत आले असते.
काहीही मुळात डोकलाम हा भाग भारताला contain करण्यासाठी चीन साठी महत्वाचा असला तरी तो भूतानचा भाग आहे भारताचा न्हवे, त्यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या. भारतासारख्या तुल्यबळ राष्ट्राशी चीन छोट्या मोठ्या कुरघोड्या करत राहील परंतु अशी drastic स्टेप काहीही मोठा वाद नसतना अजिबात घेणार नाही.

प्रसाद_१९८२'s picture

6 Jan 2018 - 4:25 pm | प्रसाद_१९८२

लष्करी व आर्थिक सामर्थ्य
6 Jan 2018 - 2:36 pm | अमितदादा
शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.

=====
या प्रतिसादात तुम्ही कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही असे म्हणता
आणि पुढील प्रतिसादात म्हणता "यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या"
=====

6 Jan 2018 - 2:48 pm | अमितदादा
काहीही मुळात डोकलाम हा भाग भारताला contain करण्यासाठी चीन साठी महत्वाचा असला तरी तो भूतानचा भाग आहे भारताचा न्हवे, त्यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या.

======
तुम्ही शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही या प्रश्नाला मी उत्तर दिले, अर्थात भारताने डोकलाम मध्ये मध्यस्थी केली नसती तर तो भाग त्यांनी केंव्हाच बळकावला असता.

निदान तुम्ही स्वत: दिलेले प्रतिसाद तरी नीट वाचत जा.

शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही

हे सत्यच आहे. ते अध्यक्ष व्हायचा चीन ने अगोदर तिबेट, आणि अनेक देशाचे भाग गीळेत माझा वरील प्रतिसाद वाचा. वरील वाक्यात मी शि जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर च बोलतोय.

अर्थात भारताने डोकलाम मध्ये मध्यस्थी केली नसती तर तो भाग त्यांनी केंव्हाच बळकावला असता.

आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची माहिती करून घ्या, हा भाग चीन च्या de-facto ताब्यात आहे पूर्वीपासून शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून. चीन च तिथ नेहमी पेट्रोलिंग चालायचं आता वाद झाला तो रस्ते बांधणीमुळे. यामुळे status-qao बदलतो हा भारताचा आक्षेप होता. त्यामुळे शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून हा भाग त्यांच्याच ताब्यात आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2018 - 6:27 pm | श्रीगुरुजी

आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची माहिती करून घ्या, हा भाग चीन च्या de-facto ताब्यात आहे पूर्वीपासून शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून. चीन च तिथ नेहमी पेट्रोलिंग चालायचं आता वाद झाला तो रस्ते बांधणीमुळे. यामुळे status-qao बदलतो हा भारताचा आक्षेप होता. त्यामुळे शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून हा भाग त्यांच्याच ताब्यात आहे.

डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर चीन म्हणाला होता की रस्तेबांधणी बद्दल भूतानला पूर्वसूचना दिलेली होती. हा जर चीनचाच भाग होता तर इतरांना सांगायची गरजच काय?

अमितदादा's picture

6 Jan 2018 - 6:31 pm | अमितदादा

डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर चीन म्हणाला होता की रस्तेबांधणी बद्दल भूतानला पूर्वसूचना दिलेली होती. हा जर चीनचाच भाग होता तर इतरांना सांगायची गरजच काय?

हा भाग चीन च्या ताब्यात आहे परंतु अधिकृत रित्या चीन चा नाही भूतान हि त्यवर दावा सांगतो , तिथे सीमा रेषा तयार नाही, त्यामुळे चीन ने तशी पूर्व सूचना दिली असावी.

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2018 - 3:01 pm | श्रीगुरुजी

असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही, इतिहासात अनेक सत्ता साम्राज्यवादी होत्या म्हणून त्या माथेफिरू न्हवत्या. उदारणार्थ> इंग्रज, पोर्तुगीज, अमेरिका. साम्राज्यवाद हा अनैतिक, अयोग्य असेल परंतु माथेफिरू च लक्षण नाही. शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.

साम्राज्यवाद हे माथेफिरूचेच लक्षण आहे. उदा. हिटलर.

चीन अनेक आघाड्यांवर प्रयत्न करीत असतो. शक्य असेल तिथे आर्थिक सामर्थ्यावर, नाहीतर निव्वळ दमदाटी करून दबाब आणून किंवा मग लष्करी सामर्थ्य वापरून. आपल्याकडे मुळातच प्रचंड भूमी असताना शेजारील राष्ट्रांची भूमी बळकावण्याचा सातत्याने प्रयत्न करणे व त्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. तिबेट गिळंकृत करून ढेकर दिल्यानंतर चीनची नजर आता इतर प्रदेशांकडे वळली आहे. चीनने भारताप्रमाणे व्हिएटनामचाही काही भाग गिळला आहे. चीनने याआधी भूतानला भूमी अदलाबदलीची लालूच दाखवून डोकलामची भूमी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर चीनने लष्करी सामर्थ्ये वापरण्याचा प्रयत्न केला. भारताने डोकलाममध्ये विरोध केल्यामुळे तो प्रयत्न फसला. मागील आठवड्यातच चीनने अरूणाचलप्रदेश मध्ये घुसखोरी करून आपला माथेफिरूपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रकार वापरून साम्राज्यविस्तार करायचा हेच चीनचे धोरण आहे.

अमितदादा's picture

6 Jan 2018 - 3:08 pm | अमितदादा

चीन ने तिबेट गिळला, भूतान, भारताप्रमाणे व्हिएटनामचाही काही भाग गिळला आहे. परंतु हे सर्व शी हे अध्यक्ष व्हायच्या आधी झालेलं आहे त्यांच्या काळात नाही (माझं मूळ statement पहा). भारतीय सीमेवरची घुसखोरी हि नियमित गोष्ट आहे, याच कारण त्यांचा खोडसाळपणा आणि न ठरलेलीसीमा रेषा हे आहे, अध्यक्ष माथेफिरू आहेत हे नाही.
चीन साम्राज्यवादी आहे हे मान्यच आहे. मान्य हे नाही कि साम्राज्यवाद हे माथेफिरूचेच लक्षण आहे. तुम्ही हिटलर च उदाहरण दिल मग मी दिलेल्या उदाहरणातील किंवा इतिहासातील अनेक साम्राज्यवादी सत्ता माथेफिरू होत्या का?
तेंव्हा तुमच्या analysis शी सहमत नाही हे नोदावतो.

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2018 - 3:19 pm | श्रीगुरुजी

शि जिनपिंग यायच्या आधी चीनचे जे साम्राज्यवादी धोरण होतं तेच धोरण जिनपिंगने पुढे सुरू ठेवलं आहे. साम्राज्यवाद व येनेकेनप्रकारेण दुसर्‍या देशांची भूमी बळकावणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. ते एखाद्या व्यक्तीचे असले किंवा देशाचे असले तरी तो माथेफिरूपणाच आहे. जगातील प्रसिद्ध माथेफिरू हे हुकुमशहा होते किंवा साम्राज्यवादी तरी होते (हिटलर, खोमेनी, चेंगीजखान इ.). परंतु प्रत्येकाने साम्राज्य वाढीसाठी एकसमान पद्धतच वापरली असे नाही. हिटलरने शस्त्रांच्या जोरावर साम्राज्यवाढीचा प्रयत्न केला. ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त असल्याने आधी आर्थिक सामर्थ्य वापरून आणि नंतर लष्करी सामर्थ्य वापरून त्यांनी साम्राज्यवाढ केलेली आहे.

ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त असल्याने आधी आर्थिक सामर्थ्य वापरून आणि नंतर लष्करी सामर्थ्य वापरून त्यांनी साम्राज्यवाढ केलेली आहे.

आता तुम्ही अत्यंत योग्य वाक्य वापरले आहे. तर end conclusion काय तर सर्व साम्राज्यवादी माथेफिरू नसतात, काही धूर्त आणि चानाक्ष्य असतात. ढोबळमानाने दोन विभाग
१. माथेफिरू साम्राज्यवादी> हिटलर, खोमेनी, चेंगीजखान इ.
२. धूर्त, बुद्धीमान आणि चाणाक्ष साम्राज्यवादी> चीन, अमेरिका, बहुतांश युरोपिअन राष्ट्रे इ
शि जिनपिंग आणि त्याचं सध्याचा चीन दुसर्या प्रकारात मोडतो.

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2018 - 3:39 pm | श्रीगुरुजी

मी आधी लिहिलेली वाक्ये खालीलप्रमाणे आहेत.

साम्राज्यवाद व येनेकेनप्रकारेण दुसर्‍या देशांची भूमी बळकावणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. ते एखाद्या व्यक्तीचे असले किंवा देशाचे असले तरी तो माथेफिरूपणाच आहे.

मार्ग कोणताही वापरला तरी सातत्याने साम्राज्यवाद हेच धोरण ठेवून त्याप्रमाणे कृती करणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.

अमितदादा's picture

6 Jan 2018 - 3:50 pm | अमितदादा

अवघड आहे...बर गुरुजी शि जिनपिंग हे माथेफिरू आहेत, चीन चे पूर्वीचे सर्व अध्यक्ष माथेफिरूच होते. एव्हडच काय माथेफिरू हाच मेन criteria आहे चीन च्या अध्यक्ष निवडीचा. आणि सर्व साम्राज्यवादी हे माथेफिरूच असतात.

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2018 - 5:43 pm | श्रीगुरुजी

दुस-या देशांची भूमी घशात घालण्यासाठी सातत्याने कृती करीत राहणे हे माथेफिरूपणाचेच चिन्ह आहे.

असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही,

असं काय म्हणता? असलेल्या देशाचे छिन्न विछ्छिन्न तुकडे पडल्यावर राग येणे हे आणि केवळ हेच एक माथेफिरूचे लक्षण आहे.

आनंदयात्री's picture

6 Jan 2018 - 9:49 pm | आनंदयात्री

काल गुरुजींना असेच 'शी जिनपिंग माथेफिरू कसे?' विचारायचे राहून गेले. आज हि चर्चा पहिली, गुरुजी तुमच्या शी जिनपिंग यांना माथेफिरू कॅटेगरीत टाकण्याशी सहमत नाही. बाकी दोघे माथेफिरू आहेत हे सगळ्या जगाला मान्य असायला हरकत नसावी.

लिस्टमधलं कोणीच माथेफिरू इ नाही. किम जोंग चं शक्यता आहे पण आपल्यापुढे त्याची केवळ त्याच्या शत्रूंनी निर्माण केलेली प्रतिमा आहे.
=================
१. आज दोन कोरिया चर्चा करत आहेत.
२. दोन्ही देशाच्या बिछडलेल्या लोकांना भेटू द्यायचा एक कार्यक्रम मागे झालेला.
३. उ कोरीया नेहमी ट्रुससाठी तयार असतो. त्यांच्या भारतातील राजदूताची भूमिका तर अत्यंत रास्त होती.
================
(गुरुजी, बघा, आपल्या दोघांचा अलायन्स तुटला.) गुरुजींची अख्खी लिस्टच चूक आहे.

आनंदयात्री's picture

17 Jan 2018 - 12:45 am | आनंदयात्री

>>किम जोंग चं शक्यता आहे पण आपल्यापुढे त्याची केवळ त्याच्या शत्रूंनी निर्माण केलेली प्रतिमा आहे.

असे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे थरूरांनी कुठेतरी म्ह्टल्याप्रमाणे, किम जोंग जे करतोय ते करत राहणे हि त्याची राजकीय अपरिहार्यता आहे. तुम्ही सद्दामचे जे करू शकलात तसे काही माझ्याबरोबर करण्याचा विचारही करू नका, असा संदेश त्याने यशस्वीरीत्या पोचवला आहे.

अभिजीत अवलिया's picture

6 Jan 2018 - 9:44 am | अभिजीत अवलिया

पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव कामगिरी करणारा बहुधा ट्रंप हा पहिलाच अमेरिकन अध्यक्ष असावा. भारताने ट्रंप अध्यक्ष असेपर्यंत अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानविरूद्ध भरीव पावले उचलावीत.

हे वाचा.

https://www.loksatta.com/agralekh-news/trump-threatens-to-cut-pakistan-a...

प्रसाद_१९८२'s picture

6 Jan 2018 - 10:58 am | प्रसाद_१९८२

अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी मदत थांबवल्याने,
बहुतेक लोकसत्ताच्या संपादकांच्या पोटावर पाय आलेला दिसतोय म्हणूच इतक्या पोटतिडीकेने ते काहिही बरळत आहेत.

===

कैच्या कै अग्रलेख आहे तो.

तेजस आठवले's picture

6 Jan 2018 - 2:43 pm | तेजस आठवले

मला त्या अग्रलेखात फारसे नवल वाटले नाही.चुकीने वागणाऱ्याने चुकीचे वागू नये म्हणून त्याला सतत बाबापुता करून चुचकारत गोंजारत राहावे ह्या मानसिकतेतून तो लेख आलेला आहे.मध्यपूर्वेतील देशांचा इतिहास आणि माहिती आपल्याशिवाय इतर कोणाला नाही हा गंड कुबेरांना आहे.ते हळूहळू स्वमग्नतेतल्या कोशात पोहोचत चाललेले आहेत.

चिनार's picture

6 Jan 2018 - 3:03 pm | चिनार

तो अग्रलेख जाऊ द्या..
पण मला एक प्रामाणिक प्रश्न आहे,
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने कोणाहीबद्दल काहीही बोलायला ट्विटरसारखं साधन का वापरावे?
ट्विटर हा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे का?
ट्विटरवरचं ट्विट कधीही उडवत येतं. रंगबदलू राजकारण्यांच्या या दुनियेत ट्रम्प तात्यांनी "मी असं बोललोच नव्हतो." असं म्हटलं तर काय..
मुळात मोठ्या पदावरची ही माणसं ट्विटर वापरतातच कशासाठी?

तेजस आठवले's picture

6 Jan 2018 - 3:28 pm | तेजस आठवले

अहो नुसतं ट्विट उडवण्याबद्दल काय सांगता, इकडे अक्खा छापील स्वरूपातला अग्रलेख परत मागे घेता येतो.
ह. घ्या.

सर टोबी's picture

6 Jan 2018 - 1:50 pm | सर टोबी

अमितदादा यांनी जे लिहिले आहे ते महत्वाचे आहे. पक्ष, व्यक्ती याबद्दल नाहक आपुलकीतून ते लिहिलेले नाही.

गामा पैलवान's picture

5 Jan 2018 - 7:20 pm | गामा पैलवान

वसंत डावखरे वारले. अधिक माहिती : http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-ncp-leader-vasant-davkhare...

या निमित्ताने डावखऱ्यांनी मुंबऱ्याची इशरतजहा नामे दहशतवादी तरुणी गचकल्यावर तिच्या घरी जाऊन एक लाख रुपयांची मदत केल्याची आठवण झाली.

-गा.पै.

तेजस आठवले's picture

5 Jan 2018 - 8:34 pm | तेजस आठवले

हो, मलापण तीच गोष्ट आठवली. आता ह्यापुढे दहशतवाद्यांच्या नावे रुग्णवाहिका कोण चालू करणार ?(एकजण आहे म्हणा.)

डँबिस००७'s picture

5 Jan 2018 - 9:49 pm | डँबिस००७

देशात आधार कार्ड ची सक्ती झाल्यावर
८०,००० शिक्षक ऐकापेक्षा जास्त (प्रसं गी तिनसुद्धा) शाळा काॅलेज मध्ये पुर्ण वेळ नौकरी करतात अस आढळुन आले आहे !!
m.timesofindia.com/india/aadhaar-helped-identify-80000-ghost-teachers-in-higher-education-institutions/articleshow/62383881.cms

अमितदादा's picture

6 Jan 2018 - 8:39 am | अमितदादा

अर्थव्यवस्था
Govt lowers forecast: GDP growth to hit four-year-low at 6.5%
Sunil Kumar Sinha, Principal Economist, India Ratings & Research, said, “Instead of accelerating from 7.1 per cent (GDP growth witnessed in FY17), the GDP growth is likely to slip by 60 basis points in the current fiscal. The predominant narrative would be to attribute this slowdown to the adverse impact of demonetisation and implementation of GST. No doubt both these measures have had adverse impact on the GDP growth and were more pronounced in case of manufacturing sector.
आजकाल अर्थव्यवस्थेवरील कोणतीही बातमी gst च्या चुकीच्या अमलबजावणी मुळे आणि नोटबंदी च्या मुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ सांगितल्याशिवाय पूर्ण होत नाही, मग ते अर्थतज्ञ असो व पत्रकार. यावरून या दोन घटकांची सर्वमान्यता लक्ष्यात यावी.

मार्मिक गोडसे's picture

6 Jan 2018 - 11:12 am | मार्मिक गोडसे

ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.

दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणणार होते त्याचे काय झाले?

प्रसाद_१९८२'s picture

6 Jan 2018 - 4:40 pm | प्रसाद_१९८२

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंना या प्रकरणी जामीन मिळणार नाही. दंड भरला नाही, तर लालूंना सहा महिने अधिक तुरुंगात राहावं लागेल.

http://abpmajha.abplive.in/india/lalu-prasad-yadav-sentenced-to-3-years-...

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2018 - 5:50 pm | श्रीगुरुजी

अरेरे, अजून एक निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत भाजपच्या कारस्थानाचा बळी ठरला.

सुबोध खरे's picture

6 Jan 2018 - 8:10 pm | सुबोध खरे

९०० कोटींचा घोटाळा केलेल्या व्यक्तीला ५ लाख रुपये दंड फक्त? त्यांनी काय कुणाची कोंबडी चोरली आहे काय?
गेला बाजार ९०० कोटींचा १ टक्का जरी यांच्या खिशात गेला असेल तरी ते ९ कोटी होतात.

विचारपूर्वक गुंतवणूक केली असती तर ९ कोटींचे २७ वर्षांत ९०० कोटी झाले असते!

आनन्दा's picture

8 Jan 2018 - 3:26 pm | आनन्दा

ही एक गमतीशीर बातमी -
http://www.opindia.com/2018/01/rahul-gandhis-aide-spotted-during-jignesh...

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2018 - 3:31 pm | श्रीगुरुजी

हे सार्वजनिक गुपित आहे. मेवानीला पुढे आणून गुजरातमध्ये भाजपला शह देणे हाच काँग्रेसचा हेतू आहे. यापूर्वी काँग्रेसने उ. प्र. मध्ये हाच खेळ खेळला होता काशीरामला पुढे आणले होते. अर्थात काशीरामने उ. प्र. मध्ये काँग्रेस संपविली. गुजरातमध्ये काँग्रेसने मेवाणीला जास्त ढील दिली तर तिथूनही काँग्रेस संपेल.

नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये खलिस्तान चळवळी बद्दल आस्था वाढत चालीय का याबाबत माझ्या मनात नेहमी शंका येत असते, याबाबत इथे मी पूर्वी एक प्रतिसाद लिहला होता. पंजाब पेक्षा परदेशातील शीख तरुण जास्त कट्टर आणि भारत विरोधी होत चालले आहेत असे दिसते.
1. काही दिवसांपूर्वी कॅनडा मधील गुरुद्वारा नि भारतीय दुतावसातील अधिकाऱ्यावर गुरुद्वारात येण्यात बंदी घातली आहे. कॅनडा मधील अनेक गुरुद्वारा हे खलिस्तानी कट्टरवादी संघटनांचे अड्डे आहेत.
2. कॅनडा मधील हे लोन अमेरिकेत पसरले आहे, अमेरिकेतील 96 गुरुद्वारा नि भारतीय अधिकारी, संघाचे आणि शिवसेने चे कार्यकर्ते यांना बंदी घातलीय.
16 more gurdwaras in Canada, 96 in US ban entry of Indian officials
3. ब्रिटन मध्ये सुद्धा अनेक गुरुद्वारानी हीच भूमिका घेतलीय. तसेच एका सरकारी सर्वेमध्ये जवळपास 20% शीख लोकांनी आपलं मूळ भारतीय आहे हे सांगण्यास नकार दिला.
4. अनेक शीख लोकांना पूर्वी त्यांचे खलिस्तान चळवळीशी संबंध होते म्हणून भारतात यायला बंदी आहे. ही बंदी उठवावी असे त्यांचे मागणे आहे आणि मोदी नि तसे आश्वासन दिलेलं पण जे अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे अनेक जुन्या लोकात नाराजी आहे.
5. पंजाब मधील शीख तरुणांच्या मध्ये RSS आणि शिवसेना ह्या संघटनाबद्दल तिरस्कार आहे. अनेक rss नेत्यांच्या हत्या होतात आणि आरोपी सापडले जात नाहीत किंवा त्यांना शिक्षा होत नाही. मध्यनतरी rss च्या पंजाब प्रमुखांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेंव्हासुद्धा ना rss कडून तीव्र प्रतिक्रिया आली ना bjp कडून.
6. पंजाब मधील तरुणांच्या मध्ये सुद्धा असंतोष वाढत चाललाय असे मला वाटते, देशात आणि देशाबाहेर शीख तरुणांमध्ये विष पेरण्यात पाकिस्तान चा मोठा हातभार आहे. सरकार ने योग्य ती पावले उचलली पाहिजेत आणि ते ती उचलली असावीत अशी आशा आहे.

अमितदादा,

भारतीयांना विशेषत: शिवसेनेस गर्भागारात प्रतिबंध करणारे तथाकथित शीख फाट्यावर मारायच्या लायकीचे आहेत. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींचा हवाला देऊन ते बंदी घालू इच्छितात. पण याच दंगलीत बाळासाहेबांनी मुंबईतल्या शिखांचा केसही वाकडा होऊ दिला नाही. सगळे शीख याप्रती आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतात. मग शिवसेनेस बंदी कशासाठी? खाल्ल्या ताटात हा#णे म्हणतात ते हेच. जणू वाहेगुरूंना फार संतोष होणारे अशाने.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2018 - 3:17 pm | श्रीगुरुजी

परदेशातील विशेषतः कॅनडातील शिखांचा पूर्वीपासूनच खलिस्तानला सक्रीय पाठिंबा होता. खलिस्तानी अतिरेक्यांना आर्थिक पुरवठा मुख्यत्वेकरून कॅनडा व इंग्लंडमधील शिखांकडून होत होता. १९८५ मध्ये एअर इंडिया कॅनडाहून भारतात येणार्‍या कनिष्क विमानात बाँब ठेवून पाडणारे कॅनडातील शीख होते. खलिस्तान चळवळ १९९५ मध्ये मृत झाली तरीसुद्धा कॅनडा व अमेरिकेतील गुरूद्वारातून ती चळ्वळ जिवंत ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते. अमेरिकेत स्थायिक झालेला गुरमीत सिंग औलख नावाचा शीख अमेरिकेत सातत्याने भारतविरोधी व खलिस्तानच्या बाजूने प्रचार करीत होता. तो स्वतःला कौन्सिल ऑफ खलिस्तानचा स्वयंघोषित अध्यक्ष मानायचा. अमेरिकेतील खासदारांना सातत्याने पत्रे लिहून भारतविरोधी गरळ ओकणे, अमेरिका व कॅनडातील गुरूद्वारांना भेटी देऊन खलिस्तानचा प्रचार करून आर्थिक सहाय्य मिळवायचे, तेथील वर्तमानपत्रातून लेख लिहून भारतात शिखांवर अत्याचार सुरू आहेत याचा प्रगोगंडा करायचा हे त्याचे उद्योग १९९५ नंतरही सुरू होते.

इंग्लंडमधील शीख सुद्धा यात मागे नव्हते. खलिस्तानचा स्वयंघोषित अध्यक्ष जगजितसिंग चौहान याला इंग्लंडने आश्रय दिला होता व भारताने अनेकवेळा मागणी करूनसुद्धा इंग्लंडने त्याचे भारतात प्रत्यार्पण केले नव्हते. त्यामुळे अमेरिका, कॅनडा, इंग्लंड इ. देशातील खलिस्तानवाद्यांचा प्रचार नव्याने सुरू झाला नसून तो ८० च्या दशकापासून सुरू आहे. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग कॅनडाला एका कार्यक्रमात गेले असताना व्यासपीठाच्या मागे टांगलेल्या बॅनरवर खलिस्तानबद्दल लिहिले होते. त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर "मी तो बॅनर पाहिलाच नव्हता" अशी सारवासारव अमरिंदर सिंगांनी केली होती. १९९० च्या दशकात मी सिंगापुरमध्ये असताना कॅबची वाट पहात होतो. माझ्यानंतर एक म्हातारा शीख एका चिनी व्यक्तीबरोबर आला. ते दोघेही कॅबची वाट पाहू लागले. लांबून कॅब येताना दिसल्यावर मी पुढे आल्याचे पाहून तो म्हातारा चवताळला. कॅबमध्ये मीच आधी चढणार असे त्याने सांगायला सुरूवात केली. मी आधी आलो आहे हे त्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तो भडकून भारताला शिव्या द्यायला लागला. भारतीय सैनिकांनी पंजाबमध्ये शिखांना मारून टाकले, आमच्या महिलांवर बलात्कार केले, आम्ही खलिस्तान मिळविणारच असे तो जोरजोरात बडबडायला लागला. त्यांच्या बरोबरचा चिनी त्याच्या संतापामुळे स्वतःची करमणूक करून घेत होता. ९० च्याच दशकात अमेरिकेतील डेट्रॉईटमध्ये माझ्या बरोबर एक शीख तरूण काम करीत होता. तो दर रविवारी कॅनडातील गुरूद्वारात जाऊन खलिस्तान चळवळीची पत्रके घेऊन यायचा. त्याने ती पत्रके स्वतःच्या क्युबिकलमध्ये सुद्धा ठेवली होती. आपल्या गाडीवर मागच्या बाजूला त्याने "इंडीया आउट ऑफ खलिस्तान" असे रंगवून घेतले होते. त्याच्या म्हणण्यानुसार कॅनडात खलिस्तानवाद्यांची स्वतःची रेडीओवर काही एफएम वाहिन्या आहेत व त्यावर नियमितपणे खलिस्तानचा प्रचार केला जातो. माझ्या कंपनीतील इतर भारतीयांनी त्याच्यावर बहिष्कार टाकून त्याला एकटे पाडल्यावर त्याने आमच्यात येऊन प्रचार करणे थांबविले होते.

एकंदरीत खलिस्तानला परदेशातील शिखांचा पूर्वीपासूनच पाठिंबा होता व खलिस्तान सत्यात येणार यावर ते अजूनही आशावादी आहेत. सुदैवाने पंजाबमधील स्थानिक शिखांनी वस्तुस्थितीचा स्वीकार करून खलिस्तानची मागणी सोडून देऊन शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु परदेशातील शिखांना अजूनही आशा आहे.

राघव's picture

11 Jan 2018 - 7:06 pm | राघव

एन.पी.ए चे ऑगस्ट १७ पर्यंतच्या डेटाचे एक अ‍ॅनॅलिसिस वाचनात आले: -

- ३८ बँकांचे बॅड लोन [ग्रॉस एन.पी.ए]- ८ लाख कोटींहून जास्त. एकूण बँकांकडून दिल्या जाणार्‍या लोन्स च्या ११% पर्यंत ही रक्कम आता जाते. ९०% बँका सरकारी.
- मार्च १४ मधे हा आकडा २.५ लाख कोटीं पर्यंत होता. सप्टें १५ मधे हा आकडा ३.५ लाख कोटींपर्यंत होता.
- तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी २०१६ मधे Asset Quality Review (AQR) सुरू केला. यामुळे बँकांना बॅड लोन्स चा खरा आकडा जाहीर करणे भाग पडले, जे बॅलन्स शीट मधे दाखवल्या जात नव्हते. त्यानंतर ७ क्वार्टर्स मधे हा आकडा दुप्पटीहून जास्त झालेला आहे.

नेट एन.पी.ए कमी असणार. कारण त्यात बँकांनी बॅलन्सशीट मधे केलेली सोय धरून ते कमी करण्यात येते. अर्थात् त्यासाठीचा फॉर्म्युला बराच मोठा आहे.
पण याचा अर्थ एवढा की जेवढी प्रोव्हीजन बँकेला यासाठी करावी लागणार तेवढा त्यांच्यावर येणारा ताण वाढत जाणार. सद्यस्थिती, त्यावरील काही उपाय आणि त्याचबरोबर या स्थितीचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यांची माहिती शोधावी म्हणतो.

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2018 - 8:08 pm | श्रीगुरुजी

हा हन्त हन्त . . .

आयआयटीच्या (कानपूर) पोर्टलवर हिंदू धर्मग्रंथ!

http://www.esakal.com/desh/iit-kanpurhindu-sacred-texts-srimad-bhagwadgi...

गॅरी ट्रुमन's picture

16 Jan 2018 - 12:01 pm | गॅरी ट्रुमन

विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडिया काल बेपत्ता होते. राजस्थान पोलिसांना एका जुन्या केससंदर्भात ते हवे होते. त्यांच्या घरी राजस्थान पोलिस पोहोचले असताना तोगाडिया घरी नाहीत असे समजले आणि बराच काळ ते बेपत्ता होते. रात्री ते बेशुध्द अवस्थेत सापडले. शुध्दीवर आल्यानंतर पोलिस आपला एनकाऊंटर करणार होते असे ते म्हणाले. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/plan-was-being-made-t...

तोगाडिया आणि मोदींचे अजिबात पटत नाही ही अगदी जगजाहिर गोष्ट आहे. तोगाडिया आता मोदींविरोधात काही बोलले तर समस्त बुबुडाविपुमाधवि ब्रिगेड तोगाडियांच्या बाजूने बोलायला लागेल आणि आयरनी परत एकदा शंभर नाही तर हजारदा मरेल.

गॅरी ट्रुमन's picture

16 Jan 2018 - 3:11 pm | गॅरी ट्रुमन

तोगाडिया आता मोदींविरोधात काही बोलले तर समस्त बुबुडाविपुमाधवि ब्रिगेड तोगाडियांच्या बाजूने बोलायला लागेल आणि आयरनी परत एकदा शंभर नाही तर हजारदा मरेल.

सुरवात झालेलीच दिसते. आज हार्दिक पटेल आणि काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया यांनी तोगाडियांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे.

एकूणच मोदी या एका माणसाला विरोध करायचा म्हणून सगळे (दोन्ही बाजूंचे) विरोधक हातमिळवणी करताना दिसत आहेत. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा विरूध्द इतर सगळे अशी लढत झाली होती त्याप्रकारेच २०१९ मध्ये मोदी विरूध्द इतर सगळे अशी लढत होईल असे दिसते. विरोधकांशी भाजपमधील अडवाणी, यशवंत सिन्हा, शांताकुमार इत्यादी म्हातार्‍यांनी हातमिळवणी केली तरी आश्चर्य वाटू नये.

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2018 - 4:51 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

17 Jan 2018 - 1:10 pm | श्रीगुरुजी

आमदार बच्चू कडूला अचलपूर न्यायालयाने १ वर्षे तुरूंगवासाची शिक्शा ठोठावली आहे.

कपिलमुनी's picture

18 Jan 2018 - 1:54 pm | कपिलमुनी
माहितगार's picture

18 Jan 2018 - 2:03 pm | माहितगार

आश्चर्य नाही

प्रदीप's picture

18 Jan 2018 - 7:46 pm | प्रदीप

तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? डोकलाममधे असे काही झालेच नाही? किंवा काहीतरी झाले, पण चीनने माघार वगैरे काही घेतली नाही, तरीही आपण उगाच तसे म्हणत आहोत ?

माहितगार's picture

18 Jan 2018 - 7:57 pm | माहितगार

तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? डोकलाममधे असे काही झालेच नाही? किंवा काहीतरी झाले, पण चीनने माघार वगैरे काही घेतली नाही, तरीही आपण उगाच तसे म्हणत आहोत ?

तसे नाहीए, चीनने तात्पुरती माघार घेऊन वापस येऊन अपेक्षेपेक्षा त्यांनी आधीपेक्षा जास्तच तयारी केली आहे.

प्रदीप's picture

18 Jan 2018 - 8:11 pm | प्रदीप

काय नक्की अभिप्रेत आहे ते. कारण त्यांनी 'फेक' शब्द वापरलाय, म्हणून विचारतोय.

वास्तवात चीनने, आपण ह्या प्रकरणात इतके नेट लावू, असे जमेस धरलेच नव्हते. तेव्हा ह्या प्रकरणात खरे तर त्यांचा 'लॉस ऑफ फेस' झाला. आता ते पुढे काहीतरी कुरापत काढणार, ह्याविषयी कुणाच्याही मनांत संदेह नसावा. तेव्हा आपणही तशी तयारी ठेवली असेलच, अथवा तशी ती सुरू असेल. इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की झाल्या प्रकरणी आपल्या सरकारने कुठेच कसलाही गाजावाजा केला नाही. अतिशय संयत प्रकारे आपण (म्हणजे आपल्या सरकारने) हे सर्व प्रकरण हाताळले. आणि हे 'आप'ण समजत नसलो, तरी जगास ते समजले आहे.

आता कधीतरी पुन्हा गेल्या वेळेसारखीच परिस्थिती उदभवेल, तेव्हा आपल्याकडील अनेकजण 'पाहिलंत, कसली माघार, कसले काय' असे काहीतरी म्हणणार! जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jan 2018 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार?

बैलाचा डोळा !

खरं तर हे सगळे माहिती असले तरीही, भारतात हीच मानसिकता (देशाचे हित गेले खड्ड्यात असे मनातल्या मनात म्हणत) गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाखवली जात आहे (दुर्दैवाने) ! (कपाळावर हात मारणारी स्मायली) :(

सुबोध खरे's picture

18 Jan 2018 - 7:59 pm | सुबोध खरे

ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत. मोदी विरुद्ध लिहिण्यासाठी काहीतरी शोधात असतात.
फेक ऑर्गझम सारखे शब्दप्रयोग करून सनसनाटी निर्माण करण्याचा हा भंपक प्रयत्न आहे.
चीन काही डॉकलामवरून कायमचा परत जाईल अशी अंधश्रद्धा सरकारची किंवा लष्कराची अजिबात नाही. याला कडेलोटाचे राजकारण(BRINKMANSHIP) म्हणतात. तेंव्हा तो परत तेथे येईल हि शक्यता १०० % होतीच म्हणून भारताने आपले "टेहळणी उपग्रह" तेथे केंद्रित केलेले आहेत.
त्यातूनच आलेल्या बातम्या आहेत या. भारत सरकार काय करते ते पाहू असा त्यांचा विचार आहे.
उगाच काहीतरी सनसनाटी करून जीव रमवायचा झालं.
दुर्लक्ष करा

प्रदीप's picture

18 Jan 2018 - 8:22 pm | प्रदीप

केले असते, पण पोरकटपणाला काही सीमा असावी?

मी चीनच्या उंबरठ्यावर रहातो, आणि ते तीन-चार महिने त्यांची चाललेली उलाघाल अतिशय जवळून पहात होतो. 'धरताही येत नाही, सोडताही येत नाही' अशी त्यांची परिस्थिती झाली होती. नेहमीप्रमाणे दात-ओठ खाऊन चिनी ऑपेरातील पात्रांचे बरेच ठणठणाटी प्रयोग झाले. त्या सर्वात, आपले सरकार अतिशय शांत होते. अर्थात पडद्याआड त्यांचे संपर्क झाले असणार, काही मार्ग काढण्याचे प्रयत्न झाले असणार. अशा प्रसंगी समोरच्याला 'सुटकेचा मार्ग' (एस्केप रूट) ठेवणे जरूर आहे, कारण त्यांना त्यांच्या जनतेस तोड दाखवायचे आहे. ते सर्व आपण अतिशय मुत्सद्दीपणे निभावून नेले. ह्याचे नीट समजून, कौतुक करायचे का नुसतेच तिरस्करणीय उद्गार काढत बसायचे?

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2018 - 8:33 pm | श्रीगुरुजी

+ १

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2018 - 8:31 pm | श्रीगुरुजी

मोदींना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करता यावी यासाठी त्यांच्या काळात भारतावर काहीतरी संकट येऊन भारताचे नुकसान व्हावे यासाठी अनेकजण कासावीस झाले आहेत. यासाठी ते चीन, पाकिस्तानशी हातमिळवणीही करीत आहेत. 'नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी व्हायला पाहिजे' ही देशद्रोही मानसिकता यामागे आहे.

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2018 - 8:02 pm | श्रीगुरुजी

>>> डोकलामचे फेक ऑर्गझम

+ १

फक्त १९६२ मध्येच ख-या ऑर्ग्याझमचा आनंद मिळाला होता.

केजरीवालच्या उदयानंतर बऱ्याच जणांना सच्ची लोकशाही अवतरल्याचा अॉर्ग्याझम झाला होता.काळाच्या कसोटीवर तो अॉर्ग्याझम भंपक आणि दिखावू होता हे सिद्ध झाल्याने त्यांना नैराश्याचा जो प्रचंड असा झटका बसलाय त्यातून हे नवेनवे शोध लावले जाताहेत.
माझं "अॉर्ग्याझम" वांझोटं ठरलं,मग काय झालं ? त्याच कसोटीवर बाकीच्याची मापे काढण्याचा निसर्गदत्त अधिकार मला आहे.

कपिलमुनी's picture

18 Jan 2018 - 3:15 pm | कपिलमुनी

त्रिपुरात 18 फेब्रुवारी, मेघालय-नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान!

पुन्हा ते कामधन्दे सोडून प्रचार करत बसणार

मग काय पैसे वाटत फिरायचं म्हणता हे करतात तसं?

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2018 - 8:09 pm | श्रीगुरुजी

>>> पुन्हा ते कामधन्दे सोडून प्रचार करत बसणार

त्यांना कामधंदे होते कधी? म्हणून तर दोनदोन महिने Bangkok ला मुक्काम ठोकतात किंवा चुकुन भारताच्या दौ-यावर असले तर सद-यावरून जानवे परीधान करून दिसेल त्या देवळात घुसतात.

कपिलमुनी's picture

18 Jan 2018 - 5:36 pm | कपिलमुनी

iCreate मधील आय (i) हे अक्षर लहान का ठेवण्यात आले आहे, यासंदर्भात माहितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आय (i) चे मोठे होणे क्रिएटिव्हिटीमध्ये अडथळा आणणारे होते. त्यामुळे iCreate मधील i हा लहान करण्यात आला आहे. तसचे, यामध्ये जर आय (i) मोठा असता तर यामध्ये महत्वाचा असा अहंकार आडवा आला असता. यामुळे सुरुवातीपासूनच लहान आय करुन मोठी स्वप्ने पाहिली आहेत.

सुबोध खरे's picture

18 Jan 2018 - 8:50 pm | सुबोध खरे

लहान आय घालण्याची कारणे
द्वेषाची पातळी किती खाली आणावी?

सुबोध खरे's picture

18 Jan 2018 - 6:13 pm | सुबोध खरे

अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची पाचवी आणि शेवटची (संपूर्ण अणूशस्त्रसकटची) चाचणी आज यशस्वी झाली.
हे आता ट्रकवर बसवलेल्या नळकांड्यातून डागले गेले आणि आता फक्त लष्करातर्फे होणाऱ्या (user trial) केल्या की ते लष्करात समाविष्ट केले जाईल.
याचा टप्पा चीनच्या सर्वात दूर भागात पोहोचण्याइतका आहे त्यामुळे आता भारत अख्ख्याचीनभर कोठेही क्षेपणास्त्र पाठवू शकतो.
https://timesofindia.indiatimes.com/india/india-test-fires-nuclear-capab...

https://www.nytimes.com/2018/01/18/world/asia/india-ballistic-missile-ic...

China has criticized India’s development of the Agni 5 in the past. After an early test of the missile, Du Wenlong, a researcher at the Chinese Academy of Military Science, told the Global Times that the Agni 5 had a strike range of about 5,000 miles, rather than 3,000 miles. He said the Indian government had deliberately played down its range “to avoid causing concern to other countries.

कांगावा सुरु झाला आहे, पण हे खरे असेल तर बसू दे बोंबलत.

सुबोध खरे's picture

18 Jan 2018 - 8:34 pm | सुबोध खरे

Though Agni 5 is said to have a range of 5,000 kms, its range has been a contentious issue. Even India initially did not divulge the exact range of the missile, but later DRDO hinted that it has the capability to reach 5,000 kms.

Chinese experts say that the missile actually has the potential to reach targets 8,000 kilometres away and that the Indian government had deliberately downplayed the missile's capability in order to avoid causing concern to other countries.

India is striving hard to gain into NSG and it may not go down well with the superpowers if it comes out in the open that India has a missile capable of carrying nuclear warheads to a distance of around 8,000 kms. It may hamper India's chance of gaining entry in the elite NSG group.

Read more at: https://www.oneindia.com/india/the-mystery-surrounding-agni-5-s-range-26...

गामा पैलवान's picture

18 Jan 2018 - 8:09 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

संबंधितांचे अभिनंदन. हा टप्पा बराच रखडला होता असं ऐकून आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

18 Jan 2018 - 8:47 pm | सुबोध खरे

https://www.rbth.com/articles/2012/04/26/missile_impossible_why_the_agni...
२०१२ मध्ये रशियाच्या मासिकात आलेला हा एक लेख मुद्दाम वाचावा असा आहे.
आणि
आंतरखंडीय क्षेपणास्त्र सूर्य सद्यस्थिती
https://defenceupdate.in/surya-indias-most-lethal-missile-update/

गॅरी ट्रुमन's picture

19 Jan 2018 - 2:56 pm | गॅरी ट्रुमन

लाभाचे पद प्रकरणी आम आदमी पक्षाच्या दिल्ली विधानसभेतील २० आमदारांना अपात्र ठरवावे अशी शिफारस निवडणुक आयोगाने राष्ट्रपतींकडे केली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/ec-recommends-disqualific...

पंजाब, गोवा, राजौरी गार्डन आणि दिल्ली महापालिका निवडणुका असे एकामागोमाग दुसरे दणके बसल्यानंतर केजरीवाल गेले काही महिने गप्प होते. बहुदा परत थयथयाट, विदुषकी चाळे इत्यादी गोष्टी करायला त्यांना संधी मिळेल.

महेश हतोळकर's picture

19 Jan 2018 - 3:20 pm | महेश हतोळकर

जर हे आमदार अपात्र ठरले तर राज्यसभा निवडणुकीवर याचा काय परीणाम होईल?

गॅरी ट्रुमन's picture

19 Jan 2018 - 3:37 pm | गॅरी ट्रुमन

जर हे आमदार अपात्र ठरले तर राज्यसभा निवडणुकीवर याचा काय परीणाम होईल?

याचा राज्यसभा निवडणुकीवर मतदारांची संख्या कमी होणे इतकाच परिणाम होईल. दिल्ली विधानसभेतील ७० ऐवजी ५० आमदारच मतदान करायला पात्र ठरतील. त्या आकड्यांवरून निवडणुक होईल. समजा काही कारणाने ७० पैकी ५० आमदारांनीच मत दिले असते आणि बाकी आमदारांनी मत दिले नसते तर जो परिणाम झाला असता तोच परिणाम यामुळे होईल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

19 Jan 2018 - 4:05 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला वाटते आआपचे तीन खासदार आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत त्यामुळे निवडणुकीवर फरक पडणार नाही. शिवाय दिल्ली राज्यसभेच्या जागा बहुतेक समभाग पद्धतीने ना होता बहुमत पद्धतीने होत असल्याने (सगळे आमदार प्रत्येक उमेदवाराला मतदान करतील - थोडक्यात तीन जागांच्या तीन वेगळ्या निवडणुका) आआपचे तिन्ही उमेदवार निवडूनच येणार होते.

गॅरी ट्रुमन's picture

19 Jan 2018 - 4:21 pm | गॅरी ट्रुमन

शिवाय दिल्ली राज्यसभेच्या जागा बहुतेक समभाग पद्धतीने ना होता बहुमत पद्धतीने होत असल्याने (सगळे आमदार प्रत्येक उमेदवाराला मतदान करतील - थोडक्यात तीन जागांच्या तीन वेगळ्या निवडणुका)

ही माहिती नवीनच आहे. आंतरजालावरील याचा संदर्भ मिळू शकेल का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

19 Jan 2018 - 5:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhis-win....सिम्स

मला माहित होते त्यापेक्षा थोडे वेगळे गणित आहे पण शेवटी बहुमत वाल्यांच्या ३ जागा निवडून येतात हे बरोबर आहे. आआपचे तगडे बहुमत बघता यावेळेला कोणीच उमेदवार दिला नाही आणि त्यांचे तिन्ही उमेदवार बिनविरोध झाले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2018 - 5:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

राज्यसभेसाठीच्या निवडणूकीला खालील समीकरण वापरतात :

विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान आवश्यक मते =
(वैध मतदान केलेले एकूण आमदार / मतदानास ठेवलेल्या राज्यसभेच्या एकूण जागा) + 1

उदा:
समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर...

विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६.

मत मोजणी प्रक्रिया : प्रत्येक मतदार प्रत्येक उमेदवाराला १, २, ३, (एकूण उभ्या उमेदवारांइतका) यापैकी एक प्राधान्यक्रम देतो. सर्वात प्रथम १ प्राधान्यक्रमांची मोजणी होते व त्यात विजयी मत मिळालेले उमेदवार विजयी होता. जर त्यांची संख्या निवडीस ठेवलेल्या एकूण जागांपेक्षा कमी असल्यास २ प्राधान्यक्रमांची मोजणी जमेस धरली जाते... असे निवडीस ठेवलेल्या एकूण जागा भरेपर्यंत केले जाते.

या प्रक्रियेत बराच घोळ घालण्यास बरीच जागा असते :

१. आठवणीत असेलच... गुजरात विधानसभेच्या वेळेस झालेली गडबड आणि ३ आमदारांची मते बाद झाल्यामुळे बदलेले समीकरण व त्यामुळे झालेला अहमद पटेल यांचा विजय. ती मते बाद झाली नसती तर पटेलांचा पराभव नक्की होता.

२. राज्यसभेच्या निवडणूकीत बर्‍याचदा घोडेबाजार होतो आणि... तो केवळ राजकीय पक्षा-पक्षांमधेच होतो असे नाही तर त्याचा फायदा घेऊन (आपली पत वाढविण्यासाठी व त्याचा वैयक्तिक हितसंबंधांसाठी उपयोग करून घेण्यासाठी) विजय मल्ल्यासारखे पैसेवाले लोक राज्यसभेची जागा खरेदी करतात, हे उघड गुपित आहे ! :(

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2018 - 11:08 pm | श्रीगुरुजी

समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर...

विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६.

दुरूस्ती -

विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/५) + १ = २९.

यासाठी असलेले सूत्र -

विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = { (एकूण आमदार / (निवडणुकीच्या जागा + १) } + १

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jan 2018 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरोबर आहे तुमचे. धन्यवाद.

गडबडीत लिहिताना, गलती से मिष्टेक हुवा ! :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2018 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

या आमदारांना निलंबित करण्यास राष्ट्रपतींनी संमती दिल्यास त्यांच्या मतदारसंघांत परत मध्यावधी निवडणूका होतील आणि त्या जागा परत मिळवता आल्या नाही तर "आआप"चे (आणि पर्यायाने केजरीवालांचे) राजकीय भांडवल कमी होईल. त्या जागा आआपने परत मिळवल्या तर केजरीवालांचा बसलेला आवाज परत जरा जास्तच जोमदार होईल ! :)

अर्थातच, हे आमदार बाद झाल्यावरही सद्याच्या विधानसभेत आआपकडेच बहुमत असेल, त्यामुळे सद्य सरकारला धोका नाही.

गॅरी ट्रुमन's picture

19 Jan 2018 - 4:03 pm | गॅरी ट्रुमन

सगळ्या २० जागांवर जिंकणे आआपला नक्कीच शक्य होणार नाही. जितक्या जागा गमावाव्या लागतील तितक्या प्रमाणात तो आआपला आणि केजरीवालांना धक्का असेल. त्यातून पोटनिवडणुकांच्या वेळी आआपमधील गटबाजी परत डोके वर काढू शकेल.

निवडणुक आयोगाच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येते का नाही याची कल्पना नाही. तसे आव्हान देता आल्यास आआप आणखी दोन वर्षे टोलवाटोलवी करून दिल्ली विधानसभेचा ५ वर्षाचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत पोटनिवडणुक होऊ देणार नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

19 Jan 2018 - 4:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

बहुतेक कोर्टात आव्हान देता येते आणि आआप सुप्रीम कोर्टात जाईलच असे वाटते.

गॅरी ट्रुमन's picture

19 Jan 2018 - 4:14 pm | गॅरी ट्रुमन

हो. https://timesofindia.indiatimes.com/india/ec-recommends-disqualification... वर पण म्हटले आहे की या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येईल.

गॅरी ट्रुमन's picture

19 Jan 2018 - 4:13 pm | गॅरी ट्रुमन

आआपच्या माकडचाळ्यांना सुरवात झालेली दिसते. हा निर्णय देऊन निवडणुक आयोगाने सर्वात खालची पातळी गाठली आहे आणि पी.एम.ओ च्या इशार्‍यांवर निवडणुक आयोग काम करते असे आआपने म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/mlas-disqualification-row-aap-...

म्हणजे मजा बघा. कायद्यातील तरतुदी काय आहेत हे माहित करून न घेता हे बिनडोकासारखे पार्लामेन्टरी सेक्रेटरी नेमणार. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी 'असे करू नका अन्यथा लाभाच्या पदाचा मुद्दा उभा राहिल' असे दिल्ली सरकारला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करणार. त्याविरूध्द प्रशांत पटेल हा एक सामान्य नागरीक तक्रार दाखल करणार. आणि कायद्यातील तरतुदींप्रमाणे निर्णय निवडणुक आयोगाने घेतला तर त्याचा दोषारोप कोणावर? तर पी.एम.ओ वर. या सगळ्या भानगडीत पी.एम.ओ कुठे आले?

महेश हतोळकर's picture

19 Jan 2018 - 4:57 pm | महेश हतोळकर

त्याविरूध्द प्रशांत पटेल हा एक सामान्य नागरीक तक्रार दाखल करणार.

पी.एम.ओ येथून आलं

अनुप ढेरे's picture

19 Jan 2018 - 6:34 pm | अनुप ढेरे

सोनिया गांधींना पण २००५साली राजीनामा द्यायला लागला होता याच कारणामुळे. NAC चे अध्यक्षपद हे लाभाचं पद होतं आणि त्या खासदारपण होत्या. त्यांनी रितसर राजीनामा दिला. कायद्यात दुरुस्ती केली की NAC चे अध्यक्षपद लाभाचं नाही. मग आल्या निवडुन परत रायबरेलीतून.
आपने ही जी कायदेदुरुस्ती केली ती पूर्वलक्ष्यीप्रभावाने केली पण ती दुरुस्ती अमान्य झाली. आणि आता आपची तशी ताकद नाही की आरामात २० लोक परत निवडुन येतील. काँग्रेस आता पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल आणि २०१५ मध्ये काँग्रेसची मत आपला जाऊन लँड स्लाईड विजय मिळाला तसा आता मिळणार नाही.

गॅरी ट्रुमन's picture

19 Jan 2018 - 7:08 pm | गॅरी ट्रुमन

हो.

कायदा गाढव असतो म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. अमुक एक पद लाभाचे पद नाही असा कायदा राज्य विधानसभांनी/संसदेने पास केला तर संबंधित व्यक्ती विधानसभा/लोकसभेचे सदस्य असतानाही त्या पदावर राहू शकते. तसा कायदा दिल्ली विधानसभेने करून त्यावर राष्ट्रपतींची मंजुरी मिळवून मग या आमदारांची पार्लामेंटरी सेक्रेटरी पदावर नियुक्ती केली असती तर काहीच प्रश्न आला नसता. पण इतक्या गोष्टी समजतील तर आपले युगपुरूष कुठचे. माझ्या माहितीप्रमाणे दिल्ली विधानसभेने केवळ मुख्यमंत्र्यांसाठी पार्लामेंटरी सेक्रेटरी ठेवण्याविषयीचा कायदा केला होता. साहिबसिंग वर्मा आणि शीला दिक्षित यांनीही एकेका आमदाराला (शीला दिक्षित यांनी अजय माकन यांना) असे पार्लामेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमले होते. पण इतर मंत्र्यांना असे पार्लामेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमले तर ते लाभाचे पद होणार नाही असा कायदा दिल्ली विधानसभेने पास केला नव्हता. त्यामुळे या आमदारांचे पद धोक्यात आलेच होते.

दुसरे म्हणजे स्वतः केजरीवालांनी आणि त्यांच्या विविध ठिकाणच्या समर्थकांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही असे पार्लामेंटरी सेक्रेटरी नेमले होते मग त्यांची पदे धोक्यात का आली नाहीत असा प्रश्न विचारलाच. असे प्रश्न विचारणार्‍यांना असल्या गोष्टींचे आकलन होणे शक्य नाही आणि केवळ आआपचे समर्थकच असा प्रश्न विचारू शकतील हे नक्की. फरक हा की गुजरात, राजस्थान इत्यादी विधानसभांनी हे पद लाभाचे नाही असे ठरविणारा कायदा पास केला होता तो दिल्ली विधानसभेने केला नव्हता. पण हे आम आदमी पार्टीसारख्या पक्षाच्या नेत्यांना आणि समर्थकांना समजेल ही अपेक्षाच नाही.

आपला हा खेळ गोत्यात आणेल हे लक्षात येताच केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत पूर्वलक्षी प्रभावाने कायदा करायचा प्रयत्न केला. त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मंजुरी दिली नाही.त्यावेळी समजा कोविंद राष्ट्रपती असते आणि त्यांनी अशी मंजुरी नाकारली असती तर केजरीवालांनी किती थयथयाट केला असता याची कल्पनाही करवत नाही.

आता आपची तशी ताकद नाही की आरामात २० लोक परत निवडुन येतील. काँग्रेस आता पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल आणि २०१५ मध्ये काँग्रेसची मत आपला जाऊन लँड स्लाईड विजय मिळाला तसा आता मिळणार नाही.

आणि स्वतः आआपच्या मतांमध्येही बरीच घट झाली आहे त्याचा परिणाम होईल तो वेगळाच. २०१५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मत देणार्‍या दर १० मतदारांपैकी जवळपास ४ मतदार आपने २०१७ मधील दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये गमावले होते.

अनुप ढेरे's picture

20 Jan 2018 - 10:12 am | अनुप ढेरे

असे प्रश्न विचारणार्‍यांना असल्या गोष्टींचे आकलन होणे शक्य नाही आणि केवळ आआपचे समर्थकच असा प्रश्न विचारू शकतील हे नक्की.

Never attribute to stupidity that which can adequately be explained by malice.

आआपच्या २० आमदारांना अपात्र ठरवून निवडणुक आयोगाने पंतप्रधान मोदींना भेट दिली आहे असे सडेतोड विधान आआपचे नेते गोपाल राय यांनी केले आहे. https://www.ndtv.com/delhi-news/aap-mlas-disqualification-election-commi...

मला गोपाल रायांचे हे सडेतोड विधान अजिबात पटलेले नाही. पंतप्रधान मोदी आणि भारताच्या जनतेसाठी खरी भेट कोणती असेल? आम आदमी पार्टीच नव्हे तर भारतीय राजकारणात, विविध विद्यापीठांमध्ये, मिडियामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी असलेले यच्चयावत सगळे बुबुडाविपुमाधवि, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत स्वस्थ बसणे मान्य नसलेल्या आणि असले बरळलायला मोठे व्यक्तिस्वातंत्र्याचे लेबल लावणारे विचारवंत ही जमात राजकारणातून कायमची हद्दपार होणे ही खरी भेट असेल. सध्या डायनॉसॉर जसे केवळ पुरातन काळाशी संबंधित पुस्तकांमध्येच बघायला मिळतात त्याप्रमाणे समस्त तथाकथित विचारवंतांच्या बाबतीत व्हायला हवे . अशी भेट आपल्या या जन्मात मिळावी ही फार मोठी इच्छा आहे.

manguu@mail.com's picture

20 Jan 2018 - 8:06 pm | manguu@mail.com

तोगडियांचे काय झाले पुढे ?

गॅरी ट्रुमन's picture

20 Jan 2018 - 8:25 pm | गॅरी ट्रुमन

तोगडियांचे काय झाले पुढे ?

जर का काही झालेच असेल तर ते पुरोगाम्यांच्या गळ्यातले ताईत बनले एवढेच झाले. कधीकाळी तोगडियांच्या बाजूने पुरोगामी बोलतील अशी कल्पना जरी केली असती तरी आपण जागे आहोत ना, स्वप्न तर बघत नाही ना याची खात्री करायला चिमटे काढून बघितले असते :)

सुबोध खरे's picture

21 Jan 2018 - 7:45 pm | सुबोध खरे

मोगा खान नवी आय डी घेऊन आले काय?

दुवा

केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह ने दावा किया है कि मानव के क्रमिक विकास का चार्ल्स डार्विन का सिद्धांत ‘वैज्ञानिक रूप से गलत है.’ उन्होंने स्कूल और कॉलेज के पाठ्यक्रम में इसमें बदलाव की भी हिमायत की. मानव संसाधन विकास राज्य मंत्री सिंह ने कहा कि हमारे पूर्वजों ने कभी किसी कपि के इंसान बनने का उल्लेख नहीं किया है.

उन्होंने शुक्रवार (19 जनवरी) को संवाददाताओं से बातचीत में यहां कहा, ‘‘(इंसानों के विकास संबंधी) चार्ल्स डार्विन का सिद्धांत वैज्ञानिक रूप से गलत है. स्कूल और कॉलेज पाठ्यक्रम में इसे बदलने की जरूरत है. इंसान जब से पृथ्वी पर देखा गया है, हमेशा इंसान ही रहा है

कपिलमुनी's picture

21 Jan 2018 - 2:11 pm | कपिलमुनी

सर्व अभ्यासक्रमात विमाने उडवायला आणि हत्ती , माणसाची सर्जरी करायला शिकवणार बहुधा

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 7:56 pm | श्रीगुरुजी

या तद्दन पोरकट प्रतिसादावरून सपाटून मार खाल्ल्यानंतर मुनीवर्यांनी पलायन केले होते. आता वातावरण थंड झाले आहे या समजूतीत परत येऊन पुन्हा एकदा तेच कार्य सुरू केले आहे.

कपिलमुनी's picture

22 Jan 2018 - 11:41 am | कपिलमुनी

इथे काथ्या कुटत बसणे एवढेच काम नाही. पलायन करायला हे काही माझा करो या मरो युद्ध नाही .
आणि शेवटचा प्रतिसाद माझा हा बालिशपणा ही नाहीये.

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2018 - 12:00 pm | श्रीगुरुजी

इथे काथ्या कुटत बसणे एवढेच तुमचे काम नाही. वेगवेगळ्या धाग्यांवर जाऊन पो टाकून पलायन करणे हे काम सुद्धा तुमच्या महत्त्वाच्या कामात अंतर्भूत आहे.

अमितदादा's picture

21 Jan 2018 - 2:08 pm | अमितदादा

HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत, त्यांची काही विधाने
१. “Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,”
२. “No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,”
३. “Darwin’s theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. Since the man is seen on Earth he has always been a man,”

असा माणूस जर HRD राज्यमंत्री असेल तर देशाला शिक्षणामध्ये नवीन दिशा देण्याऐवजी त्याची दुर्दशाच करू शकतो. एका माजी IPS अधिकार्याकडून असे statement यावे हे तर दुर्दैवी आहे. मोदी नि अश्या यडछांप लोकांना मंत्रिमंडळातून कडून टाकल पाहिजे किंवा त्यांना दुसर खात ज्यामध्ये त्याचं expertize आहे असे खाते दिले पाहिजे.
Stop Teaching Darwin’s Theory as It Is Scientifically Wrong: Union Minister Satyapal Singh

बबन ताम्बे's picture

21 Jan 2018 - 2:50 pm | बबन ताम्बे

हे तेच ना ? स्त्रिया प्रदूषणापासून संरक्षण म्हणून चेहरा ओढणी किंवा रुमालाने झाकतात पण प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही म्हणणारे आणि त्यावर बंदी आणणारे ?

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 8:09 pm | श्रीगुरुजी

ते असे म्हणाले होते का याची मला कल्पना नाही. परंतु ओढणी किंवा रूमालाने चेहरा झाकल्याने प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही हे वाक्य बरोबर आहे. फारतर धुळीपासून थोडेसे संरक्षण मिळत असू शकेल, परंतु रूमाल किंवा ओढणीने चेहरा झाकल्याने प्रदूषणापासून संरक्षण होत नाही.

अमितदादा's picture

21 Jan 2018 - 9:03 pm | अमितदादा

असे काही ते म्हणाले याची मला हि कल्पना नाही. धूळ हा वायू प्रदूषणाचा एक भाग आहे त्यापासून संरक्षण मिळाले तरी खूप झाले असे मला वाटते.

बबन ताम्बे's picture

21 Jan 2018 - 2:50 pm | बबन ताम्बे

हे तेच ना ? स्त्रिया प्रदूषणापासून संरक्षण म्हणून चेहरा ओढणी किंवा रुमालाने झाकतात पण प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही म्हणणारे आणि त्यावर बंदी आणणारे ?

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 8:06 pm | श्रीगुरुजी

१. “Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,”

यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का?

२. “No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,”

यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का?

३. “Darwin’s theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. Since the man is seen on Earth he has always been a man,”

डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे. हा सिद्धांत वादग्रस्त असून जगन्मान्य नाही. त्यामुळे वरील वाक्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. (बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?)

असो.

असा माणूस जर HRD राज्यमंत्री असेल तर देशाला शिक्षणामध्ये नवीन दिशा देण्याऐवजी त्याची दुर्दशाच करू शकतो. एका माजी IPS अधिकार्याकडून असे statement यावे हे तर दुर्दैवी आहे. मोदी नि अश्या यडछांप लोकांना मंत्रिमंडळातून कडून टाकल पाहिजे किंवा त्यांना दुसर खात ज्यामध्ये त्याचं expertize आहे असे खाते दिले पाहिजे.

जे सत्य आहे तेच सत्यपाल सिंह यांनी बोलून दाखविले आहे. त्यांच्या बोलण्यामुळे शिक्षणाची दुर्दशा कशी होईल? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले नव्हते आणि तेच त्यांनी सांगितले आहे. डार्विन सिद्धांत वादग्रस्त आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत. त्यावर बोलणे हेसुद्धा चुकीचे नाही. ते केवळ मोदी मंत्रीमंडळात आहेत व आपल्याला न आवडणारे ते बोलले आहेत म्हणून लगेच त्यांना काढून टाकण्याची मागणी करणे हे असहिष्णुतेचेच लक्षण आहे.

अनुप ढेरे's picture

21 Jan 2018 - 8:39 pm | अनुप ढेरे

(बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?)

सिरियसली हा प्रश्न विचारला आहे का?

अमितदादा's picture

21 Jan 2018 - 8:57 pm | अमितदादा

अरेरे काय हे...मोदी सरकारची अनेक चांगली कामे आहेत त्याचे समर्थन आपण करू शकता ना. चुकीच्या विधानांची कशासाठी समर्थन करायचे. त्यांची सर्व वाक्ये एकत्र घेवून वाचा प्रत्येक वाक्य आणि शब्द वेगळे घेवून न्हवे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता कि आपल्या पूर्वजांनी वेदामध्ये उत्क्रांती बद्दल काही सांगितले नाही म्हनुन डार्विन चुकीचा, आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे. ते असे म्हणतात माणूस हा कधी उत्क्रांत झाला नसून पूर्वीपासून माणूसच आहे
Since the man is seen on Earth he has always been a man

(बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?)

ना त्या मंत्र्याला डार्विन काय बोला माहित आहे ना तुम्हाला. इथे वाचा डार्विन नक्की काय म्हणतो ते मग डार्विन विषयी लिहा
What Darwin actually said about man and apes
In his book ‘The Descent of Man’ published in 1871, English naturalist Charles Darwin presented the idea that human beings and apes have a common ancestor. Contrary to common perception, which is reflected in Mr. Singh's statement, Darwin did not say that humans directly evolved from apes. He merely pointed out the similarities between birds, fishes, mammals and reptiles and suggested that all life is related. This, in turn, means that all complex life forms evolved from simpler ones through various genetic mutations.
डार्विन काय म्हणतोय हे या मंत्री महोदयांनी आयुष्यात वाचले नसेल.

डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे.

नक्कीच, परंतु आजून हि बहुतांश शास्त्रज्ञ हा सिद्धांत मानतात जरी त्यात loopholes असले तरी, आणि सत्यपालसिंह यांनी वैज्ञानिक आक्षेप घेतले नसून त्यांचा रोख स्वदेश ज्ञान आणि परदेशी ज्ञान या अनुषंगाने आहे.
However, as zoologist Jules Howard argued in an article in The Guardian, as of now, “Darwin’s ideas still seem capable of explaining much, if not all, of what we see in nature.” Additionally, he says, “if a more scientifically accurate way of explaining the diversity of life on Earth comes along, Darwin would be ousted.”

त्यामुळे शब्दांचे खेळ करून त्यांना समर्थन देण्याचे काही अर्थ नाही असे वाटते.

बिटाकाका's picture

21 Jan 2018 - 9:08 pm | बिटाकाका

सत्यापालसिंह जे काही बोलले किंवा ज्या पद्धतीने बोलले ते मला वैयक्तिकरित्या पटले नाही.
**************
पण त्यांच्या वक्तव्यावर एवढी असहिष्णुता का? असे आक्षेप अनेक नामांकित संशोधकांनीही घेतले आहेत. यावरून ते त्यांचे खाते सांभाळू शकतील का हा निष्कर्ष काढणे योग्य आहे का?
**************
कपिल सिब्बल मनुष्यबळ विकासमंत्री असताना कारभार कसा झाला यावर आपले मत काय?

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 9:23 pm | श्रीगुरुजी

अरेरे काय हे...मोदी सरकारची अनेक चांगली कामे आहेत त्याचे समर्थन आपण करू शकता ना. चुकीच्या विधानांची कशासाठी समर्थन करायचे.

त्यांची विधाने चुकीची आहेत हे कधी सिद्ध झाले किंवा हे कोणी ठरविले? डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धात हा वादग्रस्त असून त्यावर मतभेद आहेत व त्याला जगन्मान्यता नाही. ज्या विषयाला एकापेक्षा जास्त बाजू आहेत त्यावर कोणत्यातरी एका बाजूने बोलणे हे चुकीचे विधान कसे?

त्यांची सर्व वाक्ये एकत्र घेवून वाचा प्रत्येक वाक्य आणि शब्द वेगळे घेवून न्हवे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता कि आपल्या पूर्वजांनी वेदामध्ये उत्क्रांती बद्दल काही सांगितले नाही म्हनुन डार्विन चुकीचा, आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे. ते असे म्हणतात माणूस हा कधी उत्क्रांत झाला नसून पूर्वीपासून माणूसच आहे

आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे असे ते म्हणालेले नाहीत. त्यांनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी याबद्दल सांगितलेले किंवा लिहिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे व तीच त्यांनी सांगितली आहे.

Since the man is seen on Earth he has always been a man

यात काय चुकीचे आहे?

डार्विन काय म्हणतोय हे या मंत्री महोदयांनी आयुष्यात वाचले नसेल.

डार्विन काय म्हणतोय यापेक्षा तो जे म्हणतोय ते १०० टक्के बरोबर आहे का हा मुख्य मुद्दा आहे. समजा मंत्रीमहोदयांनी डार्विन काय म्हणतोय हे वाचलेही नसेल, परंतु जगातील ज्या अनेक शास्त्रज्ञांनी डार्विनचा सिद्धांत मान्य न करता त्यावर आक्षेप घेतले आहेत त्यांनी तरी आपले मत व्यक्त करण्यापूर्वी डार्विनचा सिद्धांत नक्कीच नीट वाचला असेल.

त्यामुळे शब्दांचे खेळ करून त्यांना समर्थन देण्याचे काही अर्थ नाही असे वाटते.

डार्विनविरूद्ध बोलले म्हणजे लगेच त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाका अशा मागणीतही काही अर्थ नाही. एकतर त्यांना स्वतःचे विचार सार्वजनिक करण्याचे विचारस्वातंत्र्य आहे, दुसरं म्हणजे त्यांचे हे विचार प्रक्षोभक, बेकायदेशीर इ. नाहीत आणि तिसरं ज्याला एकापेक्षा जास्त बाजू आहेत अशा विषयावर त्यांनी एका बाजूने मत मांडले आहे. त्यांनी स्वतःचे मत मांडले आहे व स्वतःच्या मतामागील कारणमीमांसाही सांगितली आहे. त्यांचे मत वैज्ञानिकदृष्ट्या खोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यावर आभाळ कोसळल्यासारखे लगेच आकांडतांडव करण्याची गरज नाही आणि ते योग्यही नाही.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/satyapal...

वरील बातमीत लिहिलंय की "उत्क्रांतीच्या सिद्धांतप्रकरणी सत्यपाल यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, यासाठी वैज्ञानिकांनी त्यांच्याविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केलीय. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुले पत्र लिहिण्यात आले असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी व्हावे असे आवाहन वैज्ञानिकांनी केले आहे. "

ही तर शुद्ध गुंडगिरी आणि झुंडशाही झाली. एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आता मत मांडायचीही चोरी आहे कारण शास्त्रज्ञांना न आवडणारे मत कोणी व्यक्त केले तर लगेच ते अशी मोहीम सुरू करणार. भारतीय वैज्ञानिक इतके बंदिस्त व कोत्या मनोवृत्तीचे असतील असे वाटले नव्हते. सत्यपाल सिंह यांच्यासारख्या सॉफ्ट टारगेट विरूद्ध अशी सवंग मोहीम सुरू करता येईल, परंतु जगातील ज्या शास्त्रज्ञांनी डार्विनच्या सिद्धांताविरूद्ध मत व्यक्त केले आहे त्यांच्याविरूद्ध भारतातील वैज्ञानिक काय करणार? त्यांच्याविरूद्ध अशी मोहीम सुरू करण्याची यांच्यात हिंमत आहे का?

अमितदादा's picture

21 Jan 2018 - 9:47 pm | अमितदादा

यात काय चुकीचे आहे?

सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं वाक्य आहे.

डार्विन काय म्हणतोय यापेक्षा तो जे म्हणतोय ते १०० टक्के बरोबर आहे का हा मुख्य मुद्दा आहे.

डार्विन काय म्हणतो हे समजावून न घेता त्याचा सिद्धांत पुस्तकातून काडून टाकणे का तर आपल्या पूर्वजांनी हे सांगितलं नाही आपल्या वेदात हे नाही म्हणून. हा भंपकपणा आहे, वैज्ञानिक मतभेद न्हवेत. आणि अश्या शिक्षण मंत्र्याला पदावर राहणे शोभून दिसत नाही. जर त्यांना मंत्रिपद वरून हटवणे अतिशोयक्ती वाटत असेल तर त्याचे खाते बदला, हा उपाय मी सुचवलेला आहे.

त्यांचे मत वैज्ञानिकदृष्ट्या खोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यावर आभाळ कोसळल्यासारखे लगेच आकांडतांडव करण्याची गरज नाही आणि ते योग्यही नाही.

मी वैज्ञानिक रित्या त्यांचं वाक्य खोडलेल आहे आणि सनदशीर मार्गाने मागणी केली आहे त्यांना हटविण्याची. माझ्या सारख्या इतर लोकांनी केलेल्या मागणीला गुंडगिरी म्हणणे चुकीचे आहे. सरळ सरळ सनदशीर आणि योग्य पद्धतीने केलेली मागणी आहे.

@बिटकाका आणि @ गामा पैलवान
सत्यपाल सिंह हे एक वेदाच्या परिषदेत बोलत होते त्यांचं वैज्ञानिक विरोध दिसून येत नाही ते असे म्हणतात ती गोष्ट वेदात नाही आपल्या पूर्वजांनी सांगितली नाही म्हणून चुकीची. हा मुद्दा समजावून घेतला तर आपल्याला कळेल की त्यांना होणारा विरोध बरोबर आहे ते.
आणि जर कपिल सिब्बल असे म्हणाले असते तर मी असाच विरोध केला असता. त्यामुळं कोण म्हणाले हे महत्वपूर्ण नाही कोणत्या अनुषंगाने काय म्हणाले ते महत्वाचं आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 10:03 pm | श्रीगुरुजी

सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं वाक्य आहे.

ते कसं काय?

डार्विन काय म्हणतो हे समजावून न घेता त्याचा सिद्धांत पुस्तकातून काडून टाकणे का तर आपल्या पूर्वजांनी हे सांगितलं नाही आपल्या वेदात हे नाही म्हणून. हा भंपकपणा आहे, वैज्ञानिक मतभेद न्हवेत. आणि अश्या शिक्षण मंत्र्याला पदावर राहणे शोभून दिसत नाही. जर त्यांना मंत्रिपद वरून हटवणे अतिशोयक्ती वाटत असेल तर त्याचे खाते बदला, हा उपाय मी सुचवलेला आहे.

जो सिद्धांत सर्वमान्य नाही व ज्याच्या सत्यतेविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत तो पुस्तकात असावा का? हा सिद्धांत आपल्या पूर्वजांनी सांगितलेला नाही हे बरोबरच आहे. अशा वादग्रस्त सिद्धांताविषयी आपले मत व्यक्त केले म्हणून लगेच त्यांना काढून टाकायचे किंवा खाते बदलायचे?

मी वैज्ञानिक रित्या त्यांचं वाक्य खोडलेल आहे आणि सनदशीर मार्गाने मागणी केली आहे त्यांना हटविण्याची. माझ्या सारख्या इतर लोकांनी केलेल्या मागणीला गुंडगिरी म्हणणे चुकीचे आहे. सरळ सरळ सनदशीर आणि योग्य पद्धतीने केलेली मागणी आहे.

हटविण्याची मागणी सनदशीर आहे तसेच त्यांचे मतसुद्धा सनदशीर आहे. आपले मत व्यक्त केल्यानंतर लगेच "तुमची विधाने मागे घ्या" म्हणून ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे व दबास आणणे हे माझ्या दृष्टीने गुंडगिरी व झुंडशाहीचे लक्षण आहे. इतर देशातील अनेक वैज्ञानिकांनी हा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्याविषयी भारतातील वैज्ञानिकांची काय भूमिका आहे? वैज्ञानिकांनी बंदिस्त विचार न करता प्रत्येक शक्यतेचा विचार खुल्या मनाने केला पाहिजे. मुळातच जो सिद्धांत वादग्रस्त आहे त्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त केल्यानंतर लगेच ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे याला माझा आक्षेप आहे. असे करण्याऐवजी वैज्ञानिकांनी त्यांचे म्हणणे वैज्ञानिक आधारावर खोडून काढावे.

ज्याप्रमाणे इतर क्षेत्रात असहिष्णुतेचा नसलेला बागुलबुवा उभा करून भाजप सरकारविरूद्ध कांगावा केला जात आहे त्यात आता हे वैज्ञानिकही सामील होत आहेत असे चित्र दिसते आहे.

बिटाकाका's picture

21 Jan 2018 - 10:10 pm | बिटाकाका

अमितदादा,

पुस्तकातून काढून टाकणे? हे कधी झालं? त्यांनी आपल्याला माहित असलेल्या गोष्टी शिकवाव्यात असं म्हटलं आहे. तुमच्याकडे काही दुवा असेल तर द्याल का?
********************
तुम्ही सत्यपालसिंहांच्या एका मतावर त्यांच्या खात्याच्या कारभाराबद्दल बोलत आहात. इतकेच नाही तर त्याबद्दल निराशावाद व्यक्त करत आहात. अशी अनेक वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांच्या काळातील कारभाराबद्दल आपले मत काय असे मला म्हणायचे होते. मला असे वाटते अगदीच निर्विवाद अशा कुठल्या गोष्टीवर ते बोलले नाहीयेत तर ज्याबाबतीत बरीच त्या विषयाशी संबंधित मंडळीही साशंक आहेत अशा विषयाबद्दल ते बोलले आहेत. त्यांनी त्यासाठी त्या संबंधित मंडळींच्या ऐवजी पूर्वजांचा संदर्भ देणे मला पटत नसले तरी अयोग्य अजिबात नाही. एवढी असहिष्णुता दाखववून त्यांच्या खात्याच्या कारभारावर (या वक्तव्यामुळे) टीका करणे पूर्वग्रहदूषित असल्याचे जाणवते.
********************
पृथ्वी गोल नसून सपाट आहे असा देखील काही लोकांचा दावा आहे.

अमितदादा's picture

21 Jan 2018 - 11:07 pm | अमितदादा

@श्रीगुरुजी
मी किंवा अनेक लोकांनी त्यांच्या मताला केलेला विरोध हा सनदशीर, कायदेशीर आणि न्याय आहे. त्यांना कोणतीही धमकी दिली नसून त्यांचं विधान कसे चुकीचे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. (तुम्हला अजून ते दिसत नसेल तर
माझा नाईलाज आहे) त्यामुळे ही गुंडगिरी आणि झुडशासी अजिबात नाही, मुळात जर त्या मंत्र्यांचा विधान तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र वाटत मात्र अनेक वैज्ञानिकच विधान व्यक्तिस्वातंत्र न वाटता झुंडशाही आणि गुंडगिरी वाटते हेच मुळात हास्यास्पद आहे.
@बिटकाका
मुळात ते मंत्री फक्त विधान करून न थांबता हे पाठपुस्तकातून काढावे असे म्हणतात असे करणारा जगात फक्त एक देश आहे तो म्हणजे तुर्कस्तान आपल्याला त्या कॅटगारी मधे बसायचं आहे का? तेंव्हा यात कोणताही राजकीय angle न पाहता आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे. अनेक मंत्रांनी विज्ञान विरोधी विधाने केली आहेत यांची विज्ञान विरोधी असहिकष्णूता पाहता मी ही यांच्याबद्दल असहिष्ण झालो आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

अमितदादा's picture

21 Jan 2018 - 11:09 pm | अमितदादा

पाठ्यपुस्तकातून काढायला हवे असे ते म्हणालेत मूळ प्रतिसादातील लिंक आणि वाक्ये पाहा

बिटाकाका's picture

22 Jan 2018 - 7:38 am | बिटाकाका

हो तेच म्हणतोय, अजून काढले नाही. त्यांनी काढायला हवे असे त्यांचे मत व्यक्त केले आहे. तसे ते पुस्तकातून काढणे हे भारताततरी फक्त मंत्र्यांच्या मतावर अवलंबून नसावे. त्यांनी फक्त मत केले म्हणून एवढ्या टोकाची टीका करणे हीच खरी असहिष्णुता आहे. खरंतर तुम्हीच या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून पहात आहात असे मला वाटते.

राहता राहिला प्रश्न विरोध करण्याचा, कशाला करायला हवा तो विरोध आत्ता? नेमके काय घडले आहे? ते मत मलाही पटले नाही असे वर म्हटले आहेच. याच्यापुढचा विरोध आता या क्षणालातरी माझ्या दृष्टिकोनातून राजकीयच आहे.

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2018 - 8:20 am | श्रीगुरुजी

>>> त्यांनी फक्त मत केले म्हणून एवढ्या टोकाची टीका करणे हीच खरी असहिष्णुता आहे. खरंतर तुम्हीच या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून पहात आहात असे मला वाटते.

+ १

विरोधा मागील मुख्य कारण राजकीयच आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 11:32 pm | श्रीगुरुजी

एका सर्वमान्य नसलेल्या, वादग्रस्त मुद्द्यावर व्यक्त केल्यानंतर त्याला शास्त्रीय मार्गाने उत्तर देण्याऐवजी लगेच हे विधान मागे घेण्यासाठी ऑनलाईन पिटिशन करून इतरांचे समर्थन मागणे ही झुंडशाही व गुंडगिरीच आहे. जरा थांबा. काही काळातच भगवा अजेंडा, हिंदू अजेंडा अससे शब्द वापरून यात पुरस्कार-परती टोळी उतरेल हे नक्की.

सिंग म्हणाले म्हणून कोणी पुस्तक बदलणार नाहीये. पण ते म्हणाले आणि कोणीच काही आक्षेप घेतला नाही हे पण व्हायला नको. उलट थेअरी बहुमान्य आहे हेच सोशल मीडिया मधून दिसते.
हे फक्त वैयक्तिक मत असेल तर त्रास फार नाही, पण HRD मध्ये असताना सार्वजनिक भाषणांत असे मत "व्यक्त" करणे हे चुकीचे आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. जर वाटलेच तर एखादा शोधनिबंध लिहून माणूस कसा होमिनाईड नाही हे सिद्ध करावे अथवा उत्क्रांतीशास्त्राला पर्याय असणारी दुसरी थेरी मांडावी
सत्तापक्षातील लोकांना उगाच वाद निर्माण करायला आवडतात असं वाटायला लागलाय (अंजिराची झाड, गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती - अजून काय काय काढतील कोण जाणे!?)

बाकी हुच्च्चभ्रू सीरिअल वाल्या लोकांसाठी :P
https://scroll.in/video/865884/satyapal-singh-can-take-comfort-from-f-r-... .

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2018 - 3:04 pm | श्रीगुरुजी

सिंग यांच्या विधानाविरूद्ध आक्षेप घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे यासाठी ऑनलाईन पिटीशन वगैरे करून त्यासाठी इतरांचे समर्थन मागणे किंवा लगेच त्यांना मंत्रीपदावरून काढा अशी मागणी करणे हे अयोग्य आहे, एवढाच मुद्दा आहे. सत्यपाल सिंग म्हणजे लालू, मुलायम सारखे रस्टिक नाहीत. ते M.Sc. (Chemistry), M.Phil. (Chemistry), MBA आणि P.H.D. आहेत. त्यांनी जर एखाद्या वैज्ञानिक सिद्धांतावर आक्षेप घेतला असेल तर विज्ञानाच्या मार्गाने त्यांच्या आक्षेपाचे खंडन करणे हाच योग्य मार्ग आहे व वैज्ञानिकांनी राजकारणी मार्गाने न जाता वैज्ञानिक मार्गाने विरोध करायला हवा होता. HRD मध्ये असताना सार्वजनिक भाषणांत असे मत "व्यक्त" करणे अजिबात चूक नाही. मुळात जो सिद्धांत अजून निर्विवाद सिद्ध झालेला नाही व एकमताने निर्विवाद मान्य झालेला नाही त्याविरूद्ध बोलणे अजिबात चूक नाही.

सत्तापक्षातील लोकांना उगाच वाद निर्माण करायला आवडतात असं वाटायला लागलाय (अंजिराची झाड, गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती - अजून काय काय काढतील कोण जाणे!?)

सत्तापक्षातील माणसे वाद निर्माण करतात यापेक्षा सत्ताधार्‍यांच्या विधानामधून विनाकारण नसलेला वाद निर्माण करून राजकीय अजेंडा राबविला जातो असे दिसते.

गामा पैलवान's picture

21 Jan 2018 - 9:13 pm | गामा पैलवान

अमितदादा,

मूळ मुद्दा असा आहे की माकडापासून माणूस उत्पन्न झाला याला कुठलाही पुरावा नाही. सत्यपाल सिंगांची भाषा अपरिचित वा आक्षेपार्ह असू शकते.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 9:44 pm | श्रीगुरुजी

HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत, त्यांची काही विधाने

आधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल सिंह यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक, समाजात दुफळी पाडणारे, घटनाद्रोही, दंगली माजविणारे, एखाद्या जातीधर्माचा अपमान वगैरे करणारे इ. नाही. मुळात जो दावा अजून वैश्विक सत्य झालेला नाही व ज्याविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत, अशा दाव्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त करण्याचे विचारस्वातंत्र्य त्यांना आहे. एखाद्याला त्यांचे मत आवडले नसले तरी लगेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी योग्य वाटत नाही.

अमितदादा's picture

21 Jan 2018 - 11:19 pm | अमितदादा

आधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल सिंह यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक, समाजात दुफळी पाडणारे, घटनाद्रोही, दंगली माजविणारे, एखाद्या जातीधर्माचा अपमान वगैरे करणारे इ. नाही. मुळात जो दावा अजून वैश्विक सत्य झालेला नाही व ज्याविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत, अशा दाव्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त करण्याचे विचारस्वातंत्र्य त्यांना आहे. एखाद्याला त्यांचे मत आवडले नसले तरी लगेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी योग्य वाटत नाही.

मग वैज्ञानिक किंवा मी सुधा कोणतीही दंगल देशद्रोह घटनाद्रोह करत नाही. तसेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी मला तरी योग्य वाटते कोणतही सभ्येतेच उल्लंघन वाटत नाही.
तुम्ही शिवसेनेला शिटसेना, कॉंग्रेस ला खान्ग्रेस, राहुल ला पप्पू, हत्येला वध म्हणन्याच सोडून देवून सभ्यतेचा आदर्श घालून द्यावा मी त्याच पालन करेन.

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 11:38 pm | श्रीगुरुजी

वरील प्रतिसाद वाचून "दीवार" मधील संवाद स्मरला. या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा संबंध नाही. एकीकडे समाजविघातक गोष्टी आहेत तर दुसरीकडे एका सर्वमान्य नसलेल्या निरूपद्रवी सिद्धांतावरील व्यक्तिगत मत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आआपच्या २० आमदारांना अपात्र ठरवायच्या निवडणुक आयोगाच्या शिफारसीला मान्यता दिली आहे. https://www.thenewsminute.com/article/setback-arvind-kejriwal-president-...

त्यावर यशवंत सिन्हांनी ही तुघलकशाही आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तर हा दिवस येणार हे माहित होते म्हणून देवाने आम्हाला ७० पैकी ६७ जागा दिल्या असे स्वतः केजरीवालांनी म्हटले.

यशवंत सिन्हांना पक्षातील किंवा सरकारमधील कोणीही गांभीर्याने घेत नाही यामुळे त्यांची तडफड खूपच वाढलेली दिसते. अडवाणीही सुरवातीला अशी तडफड होऊन असे काहीसे बडबडत होते पण त्याचा काही उपयोग होत नाही हे बघून ते सध्या गप्प बसले आहेत. यशवंत सिन्हांना मात्र ही गोष्ट अजून समजलेली दिसत नाही.

दुसरे म्हणजे सगळ्या पुरोगाम्यांचा केजरीवालांना पाठिंबा असतो. आणि यातीलच बरेच 'देव' किंवा 'श्रध्दा' असे काही शब्द ऐकले की अंगावर पाल पडल्यासारखे करतात. अशा लोकांची केजरीवालांच्या 'देवाने आम्हाला ६७ जागा दिल्या' या विधानावर काय प्रतिक्रिया असेल बरे?

असो. आता आआप या 'असंवैधानिक' निर्णयाविरूध्द उच्च न्यायालयात आणि गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे असे केजरीवालांनी जाहिर केले आहे. हा निर्णय पुढील दोन वर्षात यायची शक्यता जवळपास शून्य. त्यामुळे दिल्लीत २० जागांवर पोटनिवडणुक होणार नाही. वाटले होते त्याप्रमाणे आआपवाले टोलवाटोलवी करून विधानसभेचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पोटनिवडणुक होऊ देणार नाही असेच दिसते.

कपिलमुनी's picture

22 Jan 2018 - 11:28 am | कपिलमुनी


अभिराम दीक्षित यांच्या चेपु भिंतीवरून साभार

.वैदिक संमेलनात जाऊन सत्यपाल नावाचा मंत्री जे काही माकडी बोलला ते ऐकून - सावरकरांचा एक जुना लेख आठवला . हिंदुत्व वाद्यानी तो लेख मुळातूनच वाचावा . तात्यारावाचा लेख १०० वर्ष जुना असला तरी सध्याच्या टनातनी लोक्स ना परफेक्ट लागू आहे .

२००१ साली प्रकाशित झालेल्या समग्र सावरकर वाड्:मयाच्या पाचव्या खंडातल्या १९८ व्या पानावर सावरकरांचा एक विनोदी लेख आहे . त्याचे नाव काशितली दोन सम्मेलने : माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन . काशी नगरीस ज्ञानवापी असेही म्हणण्याचा प्रघात आहे . तर काशीला ब्राह्मणांचे एक संम्मेलन भरले होते . श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आज लागू आहे काय ? या विषयाचा निवाडा लावण्यासाठी हे आयोजन होते . त्याचवेळी सावरकरांनी हा लेख लिहिला आहे . तात्याराव सावरकरांनी आपले एक "" मनकवडे "" नावाचे काल्पनिक वार्ताहार काशीच्या ज्ञानवापिस पाठवले.……

तर श्री मनकवडेना दोन संमेलने दिसली --- पहिले संमेलन माकडांचे होते . काशीस पूर्वी माकडे मुक्त संचार करत . अद्वातद्वा उड्या मारीत शेपटीने झाडास लोंबकाळित -- भू:भु:क्कार करीत माकडांचे दिवस सुखात चालले होते . मग एके दिवशी काशीच्या ज्ञानवापीत वीज आली. विजेच्या ताराही आल्या . विजेच्या ताराना शेपटी लागल्यावर विजेचे झटके आणि चटके बसू लागले. मग माकड महासंमेलनात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला . कि विजेच्या ताराना शेपटीने लटकावे का ? काही माकडे म्हणाली " छट्ट हा प्रश्नच गैरलागू आहे . विजेच्या तारा नावाचा काही पदार्थ असता तर आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांनी माकड-स्मृतीत तसे लिहिले नसते काय ? ज्या अर्थी माकडस्मृतीत वीज नाही तर ती आताही अस्तित्वात असू शकत नाही. शेवटी बराच गिचगीचाट झाला. माकडी भाषेतल्या दुरगम्य चर्चेतून असे निष्पन्न झाले कि -

परिस्थिती बदलली आहे तेव्हा माकड स्मृतीत बदल केला पाहिजे………………………

त्याच वेळी अज्ञान वापिस ब्राह्मणाचे दुसरे संमेलन भरले होते त्याचा निष्कर्ष आला कि परिस्थिती हा शब्दच धर्म बाह्य आहे . अधम धर्म विरोधी आहे . शुद्ध संस्कृत भाषेत ओरडत… गिल्ला करत … असा ठराव पास झाला कि परिस्थितीचा पालट विचारात घेणे हा धर्मद्रोह आहे . पाखंड आहे …………… लेखाचा समारोप करताना सावरकर लिहितात " या ब्राह्मण संमेलनातील ठरावामुळे डार्विनच्या उत्क्रांतीवादास मोठाच धक्का बसला . प्राप्त परिस्थितीत माकडाचा विकास होऊन माणुस झाला…. यापेक्षा माणसाचा विकास होऊन माकडे निर्माण झाली हेच मान्य करणे क्रमप्राप्त आहे. अज्ञान वापितले पंडित धर्म संमेलन हेच दर्शवते !"

- विनायक दामोदर सावरकर

कपिलमुनी,

सावरकरांबद्दल प्रगाढ आदर असूनही एक सांगावंसं वाटतं. ते म्हणजे जरी ते विज्ञानवादी असले, तरी विज्ञानाचे अभ्यासक नव्हते. त्यांची विज्ञानविषयक मते सर्वसामान्य माणसाची ( = layman view) धरायला हवीत.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

22 Jan 2018 - 3:47 pm | कपिलमुनी

टनाटनी विधाने करायची जुनीच परंपरा आहे.
पूर्वीसुद्धा मा. पंप्र यांनी कर्णाचे ( Karna was not born from his mother’s womb )आणि गणपतीचे ( There must have been some plastic surgeon at that time who got an elephant’s head on the body of a human being and began the practice of plastic surgery.) उदाहरण दिले आहे.

एकेकाच्या अंधश्रद्धा !!

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2018 - 6:58 pm | श्रीगुरुजी

https://m.maharashtratimes.com/india-news/vhp-and-bajrang-dal-volunteers...

तोगडियांच्या प्रेमात पडलेले फुरोगामी आता काय करतील?

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2018 - 11:07 pm | श्रीगुरुजी
अमितदादा's picture

23 Jan 2018 - 2:39 am | अमितदादा

Scientists respond to MoS HRD Satyapal Singh’s remarks on human evolution.
1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights.
2.Statements such as “humans did/did not evolve from monkeys” is an overly simplistic and misleading representation of evolution.
3.When a minister working for human resource development in the country makes such claims, it harms the scientific community’s efforts to propagate scientific thoughts and rationality through critical education and modern scientific research. It also diminishes the image of the country at the global level and reduces faith of the international historical research community in the genuine research by the Indian researchers.

पुढे जायचे की मागे ते ठरवा, डार्विनच्या सिद्धांत नाकारण्यावरून काकोडकरांचा टोला

गामा पैलवान's picture

23 Jan 2018 - 3:51 am | गामा पैलवान

अमितदादा,

डार्विन म्हणाला तो उत्क्रांतीचा वगैरे सिद्धांत नाहीच्चे मुळी. ते केवळ एक मत ( = ओपिनियन) आहे. काहीही कारण व/वा पुरावा नसतांना त्या मतास सिद्धांत म्हणून चढवले जात आहे.

'मानव व माकडाचा पूर्वज एक असू शकतो' हे विधान वैज्ञानिक सिद्धांत मानण्याच्या लायकीचं नाही.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2018 - 3:05 pm | श्रीगुरुजी

1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights.

जगातील अनेक वैज्ञानिकांनी डार्विनचा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्यामुळे सत्यपाल सिंहांनी केलेलं विधान factually correct आहे. विज्ञानात अनेक नवीन सिद्धांत शोधले जातात, काही जुन्या सिद्धांतांना आव्हान देऊन ते अंशतः किंवा पूर्ण चुकीचे ठरविले जाऊ शकतात, काही जुन्या सिद्धांतात सुधारणा केली जाऊ शकते. त्यामुळे जो सिद्धांत वैज्ञानिकांनी अजून निर्विवाद मान्य केलेला नाही त्या सिद्धांतावर कोणी आक्षेप घेतला असेल तर त्यामुळे deeply pained होण्याची गरज नाही. इतका मेलोड्रामा करण्यापेक्षा, डार्विनचा सिद्धांत पूर्ण सत्य असून सत्यपाल सिंहांचे विधान चुकीचे आहे हे विज्ञानाच्या भाषेत सांगितले असते तर ते जास्त योग्य झाले असते.

2.Statements such as “humans did/did not evolve from monkeys” is an overly simplistic and misleading representation of evolution.

असू शकेल. परंतु शालेय पुस्तकात डार्विनच्या सिद्धांताची माहिती देताना जे चित्र दाखविले जाते त्यात आधी एका माकडाचे चित्र दाखवून ते हळूहळू उत्क्रांत होऊन त्याचे माणसात रूपांतर झाले असे दाखविले जाते. त्यामुळे माकडापासून माणूस झाला असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबले गेल्यास आश्चर्य नाही. सत्यपाल सिंहांना दोष देण्यापेक्षा पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिद्धांत कशा प्रकारे शिकविला जातो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

3.When a minister working for human resource development in the country makes such claims, it harms the scientific community’s efforts to propagate scientific thoughts and rationality through critical education and modern scientific research. It also diminishes the image of the country at the global level and reduces faith of the international historical research community in the genuine research by the Indian researchers.

आक्षेप घेणारा एखादा मंत्री असला तरी, एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आक्षेप घेतल्याने वैज्ञानिक संशोधनाची व विज्ञानाची हानी कशी होईल? आक्षेप घेणारा मंत्री उच्चविद्याविभूषित आहे. ते रसायनशास्त्रात एम.एस.सी व एम.फिल. असून वेगळ्या विषयात एमबीए व पीएचडी आहेत. त्यांना विज्ञानाची थोडीतरी पार्श्वभूमी आहे. जेव्हा जगातील इतर वैज्ञानिक सुद्धा हा सिद्धांत अजून जसाच्या तसा मान्य करीत नाहीत, तेव्हा एखाद्याने (तो मंत्री असला तरी) तसाच आक्षेप घेणे यामुळे विज्ञानाची हानी कशी होणार? इतर वैज्ञानिकांनी आक्षेप घेतले होते तेव्हा विज्ञानाची हानी झाली नव्हती का?

या आक्षेपामुळे जगात भारताची प्रतिमा खालावेल हा दावा तर अत्यंत हास्यास्पद आहे. भारतीय वैज्ञानिकांकडून ही अपेक्षा नव्हती. ज्याप्रमाणे एका ठराविक वर्गाने पुरस्कार-परतीच्या मार्गाने आपले राजकीय हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न काही वैज्ञानिक करीत आहेत असा संशय येऊ लागला आहे. मागील वर्षी काही वैज्ञानिकांनी सरकारविरूद्ध मोर्चा वगैरे काढला होताच. आता ही पुढची पायरी दिसते.

पुढे जायचे की मागे ते ठरवा, डार्विनच्या सिद्धांत नाकारण्यावरून काकोडकरांचा टोला

एखाद्या वादग्रस्त, सर्वमान्य सिद्धांतावर आक्षेप घेण्यामुळे आपण मागे कसे जाणार? न्यूटनच्या काही प्रमेयांवर आइनस्टाईनने आक्षेप घेतले होते तेव्हा जग पुढे गेले होते का मागे? नंतर आईनस्टाईनच्या सिद्धांतावरही आक्षेप घेतले गेले तेव्हाही जग पुढे गेले का मागे? विज्ञान हे कायम प्रवाही असते. ते कायमच पुढे जात असते. पुढे जात असताना नवीन शोध लागणे व मागील शोधात सुधारणा करणे हे स्वाभाविक आहे.

न्यूटन च्या सिद्धांताच्या त्रुटी आधीच माहित होत्या. त्या न सांगताच शालेय अभ्यासक्रमात तो शिकवला जातो (आजही, तेव्हाही शिकवला जात असणारच आहे)
आईन्स्टाईन च्या सिद्धांताने या त्रुटींना सुद्धा सोडवून दाखवले. पण तो सिद्धांत कॉलेज ला शिकवतात.

सिद्धांताचे सर्व डिटेल शालेय विद्यार्थी समजू शकतील असे नसतेच, तात्पर्य सोपा आणि बऱ्याचशा केसेस सोडवणारा सिद्धांत शिकवला जातो. कॉलेज मध्ये पूर्ण डिटेल सांगता येऊ शकतात.
======
सिंगांच्या बाबतीत त्यांनी आधीच माहित असणाऱ्या आक्षेपांचा आधारे डार्विन चा सिद्धांत चूक आहे सांगितलं आणि आईन्स्टाईन ने दिला तसा नवा सिद्धांत/थेरी देखील दिली नाहीये.
त्यामुळे हे सर्व विज्ञानासाठी काय मदतीचं आहे असे वाटत नाही.
======
सिंगांनी डार्विनच्या सिद्धांतात त्रुटी आढळतात एवढे म्हणून सोडून दिले असते तरी चालले असते. आणि वैज्ञानिकांनी या स्टेटमेन्टला आक्षेप नोंदवून फाट्यावर मारले असते तरी चालले असते, उगाच पिळून काय साध्य होणार नाहीये.

अमितदादा's picture

23 Jan 2018 - 8:12 pm | अमितदादा

प्रकाश जावडेकर याचं अभिनंदन आणि आभार...
Darwin theory row: Union Minister Prakash Javadekar asks Satyapal Singh to refrain from ‘such comments’

“I have discussed the matter with my MoS and I have asked him to refrain from making such comments. We should not dilute science. This is the advice I have given him,” Javadekar was quoted as saying by PTI. “We are not going to fund any event or don’t have any plan for a national seminar to prove Darwin wrong. It is the domain of scientists and we should let them free to continue their efforts for progress of the country,” he added.

गामा पैलवान's picture

23 Jan 2018 - 8:23 pm | गामा पैलवान

प्रकाश जावडेकरांचा आक्षेप नक्की कशाला आहे? विज्ञान पातळ केल्याबद्दल की सत्यपाल सिंगांचे उद्गार उचित नाहीत म्हणून? सिंगांच्या उद्गारांनी विज्ञान निश्चितंच पातळ झालेलं नाहीये.

-गा.पै.

शिवसेना २०१९ च्या निवडणुका स्वतंत्रपणे भाजपशी युती न करता लढवणार अशी घोषणा आज पक्षातर्फे करण्यात आली. हे होणार हे माहितच होते. आज अधिकृत घोषणा करण्यात आली इतकेच.

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2018 - 2:39 pm | श्रीगुरुजी

उद्धटरावांचा मूर्खपणा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. ते आज बरेच काही बरळले आहेत.

म्हणे भाजपचे यश ही बाळासाहेबांची पुण्याई. म्हणजे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या पक्षाला अपयश आले आणि दुसर्‍याच पक्षाला यश आले. फेब्रुवारीत म्हणत होते की आम्ही राजीनामे खिशात ठेवले आहेत. ते राजीनामे केव्हाच भिजून सर्द झाले. नंतर म्हणाले की एप्रिलमध्ये भूकंप होईल. यांच्या भूकंपामुळे कणभरही थरथर झाली नाही. नंतर दसरा मेळाव्यात म्हणाले की आम्ही निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत. त्यानंतरही आता जवळपास पावणेचार महिने उलटले. अजून हे निर्णयाच्या जवळ पोहोचले नाहीत. आज म्हणतात की "सध्या चुकीची लोकं सत्तेत आली असून हे भेकड राज्यकर्ते आम्हाला मान्य नाहीत. ". मान्य नाहीत तर पडा ना सत्तेबाहेर. वाट कोणाची बघता. अत्यंत निर्लज्जासारखे सत्तेत बसून सत्तेचे सर्व फायदे उपभोगून जेवलेल्या ताटातच अजून किती दिवस विष्ठा करत राहणार? प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना नेते भाजपपुढे अत्यंत लाचार असून सत्तेसाठी अतिशय कासावीस झाले आहेत. त्यामुळे सर्व तर्‍हेच अपमान गिळून लाळघोटेपणा करीत सत्तेला चिकटून आहेत. २०१९ मध्ये भाजप आपल्याशी युती करणार नाही. भाजपने युती केली तरी भाजप त्यांना वाटेल तेवढ्याच जागा शिवसेनेला सोडेल. हे उद्धटरावांना माहित असल्याने आता स्वतःच बेटकुळी फुगवून स्वबळाचा नारा दिला आहे.

राघव's picture

23 Jan 2018 - 7:45 pm | राघव

अंशतः सहमत.

इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेचा विरोध आणि विरोधी पक्षीयांचा विरोध यात बराच फरक आहे. काही मुख्य मुद्दे -
- शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे युती तोडून त्यांना नुकसान झालंय, जे त्यांना पचनी पडत नाही. सोबत असतेत तर कितीतरी जास्त जागा त्यांना घेता आल्या असत्या.. हे ते नुकसान.
- सत्तेत राहूनही हवं ते खाते ना लोकसभेत मिळाले.. ना विधानसभेत. त्यामुळं राग असण्याचा भाग वेगळा, पण झालेली नाचक्की शिवसेनेच्या नेत्यांनाही झोंबणारी आहे. त्यामुळे सत्तेसाठीची लाचारी विशेष जाणवते. तिची झळ कमी व्हावी आणि लोकांत थोडी साख राखावी यासाठी हे विरोध करण्याचे नाटक.
- राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी म्हणून शिवसेना सत्तेत राहिली हे पूर्ण सत्य नसले तरी त्यात थोडा तथ्यांश आहे. आता खरंच जर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत तर भाजपचा पारंपारिक मतदार नाराज होईल. हे भाजपलाही माहित आहे आणि शिवसेनेलाही. पण तरीही सत्तेत राहण्याचे, सत्तेच्या हव्यासाव्यतिरिक्त, आणखी दुसरं संयुक्तीक कारण काय असणार?
- पुढील गणितं खेळतांना शेवटी स्वपक्षाची वाढ हा मुख्य मुद्दा प्रत्येकच राजकीय पक्षाचा मुख्य कार्यभाग असतो, पण अशा अर्धवट सत्तेमुळे फायदा विशेष नाही हे कळूनही ४ वर्षे घालवलीच ना.. शिवसेनेच्या कट्टर समर्थकालाही बचाव करतांना लाज वाटत असेल. कोणत्या तोंडानं मतं मागायला जायचं लोकांपुढे?

जाता जाता: मुख्यमंत्रीसाहेबांनी "काही" बाबतीत गोंधळ ठेवून / माजवून ४ वर्षे सत्तेत काढली हे मात्र खरे. पुढचेही विशेष वेगळे असण्याचे काही कारण वाटत नाही.

कदाचित २०१९ नंतर सत्तेत येणार नाही हे माहित असल्याने विद्यमान खासदार/ आमदार यांची सत्ता सोडण्याची तयारी नव्हती हि वस्तुस्थिती. त्यातून हटवादी पणा केला आणि सत्ता सोडली आणि फेर निवडणूक झाल्या तर हे लोक शिवसेना सोडून भाजप मध्ये जातील आणि तेथे निवडून येतील अशी (सार्थ) भीती वाटत असल्याने श्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका चालू ठेवली असावी. बाकी शरद पवारांशी हात मिळवणी केली तर जुन्या प्रकरणाचे चौकशीचे लचांड मागे लागेल या भेटीने शरद पवार आणि श्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांबरोबर जाणे टाळले असावे.

राष्ट्रवादीवर राळ उठवूनच दोन्ही पक्षांनी फायदा उठवला होता. कोणत्या तोंडानं जाऊन सरळ हातमिळवणी करतील? हां आतून जे काही चालतं त्यात काही फरक पडणार नाही कधी. पण पब्लिकली असं करणं दोघांनाही शक्य नाही. यात सगळ्यात जास्त गोची राष्ट्रवादीची होते. त्यांना रालोआ मधे येण्यासाठी कधीचं बाशिंग बांधून बसलेत.. पण भाजपाच त्यांना घेऊ शकत नाही [संघाचा विरोध हे आणिक एक कारण].

एक प्रादेशिक पक्ष म्हणून तरी बळकट व्हायला हवं ना.. उत्तरप्रदेशात वगैरे काय चाललंय ते दिसूनही दूधखुळं राहणं कोणताच राजकीय पक्ष करणार नाही.

४ वर्षात शिवसेनेनं सत्तेत राहून विरोध करण्याव्यतिरिक्त काय केलं हा एक जनरल प्रश्न जनतेत फिरू लागलाय लगेच. सरकार जे काही थोडं-बहुत काम करतंय, त्याचं सगळं क्रेडीट स्वतःकडे राहील अशीच पद्धतशीर आखणी भाजपानं केलेली होती. ती कळूनही साथ वेळेत न सोडण्याचा परिणाम कमी व्हावा म्हणूनच एक वर्ष आधी अशी घोषणा करण्यात आलेली आहे, असं माझं मत.

अर्धवटराव's picture

24 Jan 2018 - 2:15 pm | अर्धवटराव

पवार काकांनी भाजपा राज्यसरकारला न मागता पाठिंबा देऊन जो बाण मारला त्याचे असली परिणाम आता दिसायला लागले आहेत. रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली. केंद्रात काँग्रेस जर १०० खासदार आणु शकला तर तिसर्‍या आघाडीचे पं.प्र. उमेदवार पवारसाहेब असतील. त्याला बाहेरुन शिवसेनेची रसद मिळेल. महाराष्ट्रात चौरंगी लढत होण्याची शक्यता फार कमि आहे.
शिवसेना बर्‍याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 2:52 pm | श्रीगुरुजी

रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली.

कधीपासून झालं हे?

उद्धटरावांनी काल जाहीर केलं की आम्ही २०१९ ची निवडणुक स्वतंत्र लढणार. पण हेच त्यांनी बरोबर एक वर्षापूर्वी जानेवारी २०१७ मध्येही सांगितलं होतं. आम्ही २५ वर्षे युतीत सडलो असे सांगून मी भविष्यात कोणाशीही युती करणार नाही असे त्यांनी उच्चरवाने सांगितले होते. शिवसेना स्वतंत्र लढणार म्हणजे रालोआ ऑफिशिअली फुटायला सुरूवात झाली असं म्हणायचं असेल तर हे एक वर्षापूर्वीच झालं आहे.

अर्थात भाजप असल्या फुसक्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाही. आम्ही पाठिंबा काढणार या शिवसेनेच्या धमकीचे आता शतक व्हायला आले. अजूनही पाठिंबा सुरूच आहे. आम्ही भविष्यात कोणाशीही युती करणार नाही (जानेवारी २०१७), आमचे राजीनामे खिशात आहेत (फेब्रु २०१७), शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही तर एप्रिलमधील अधिवेशन चालू देणार नाही (मार्च २०१७), एप्रिलमध्ये भूकंप होणार (मार्च २०१७), आम्ही आता निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत (सप्टेंबर २०१७) . . . अशा अनेक फुसक्या धमक्या आल्या आणि विरून गेल्या. कालची नवीन धमकीसुद्धा तशीच विरून जाणार आहे.

मुळात भाजप-सेना युती सप्टेंबर २०१४ मध्येच तुटली आहे. विधानसभा व नंतर झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. २०१९ मध्ये सुद्धा त्यांच्यात युती होण्याची शक्यता नाही कारण भाजपचा जनाधार सेनेच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाल्याने भाजप सेनेला फारश्या जागा देणार नाही व आपणच मोठा भाऊ या भ्रमात सेना अजूनही असल्याने सेना तसे जागावाटप मान्य करणार नाही. भविष्यात युती होणार नाही हे भाजपला पक्के माहित असल्याने ते सेनेच्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाहीत.

शिवसेना बर्‍याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि.

काहीही. सेनेचा मूर्खपणा अजिबात कमी झालेला नाही. आपला जनाधार भाजपच्या तुलनेत खूप कमी आहे ही वस्तुस्थिती मान्य करून युती केली तरच सेनेला फायदा होऊ शकेल. ताकद नसताना स्वबळावर लढण्याचा प्रयत्न सेनेने केला, तर सेनेचा अंत अटळ आहे. विधानसभेत स्वबळावर सेना जेमतेम ६३ जागांपर्यंत पोहोचली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे व काही प्रमाणात मुंबईचा अपवाद वगळला तर स्वबळावर लढणार्‍या सेनेची बहुतेक ठिकाणी वाट लागली. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात सेनेचा जनाधार विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही कमी होणार हे नक्की.

अर्धवटराव's picture

25 Jan 2018 - 7:26 am | अर्धवटराव

कधीपासून झालं हे?

शेट्टी आणि सेना बाहेर पडलेत. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातली हि खीडारे क्षुल्लक म्हणावी काय ?

भाजपा किती सामर्थ्यवान आहे आणि सेना कशी बुळी आहे याचं चर्वीतचर्वण करण्यात काय हाशील? भाजप, काँग्रेस+राष्ट्रवादी, शिवसेना अशी तिरंगी लढत झाली भाजपाकरता फार काहि शुभ परिणाम होतील असं मला तरी वाटत नाहि. सेना अजीबात भूईसपाट होईल असं जरी गृहीत धरलं (तसं अजीबात होणार नाहि हे नक्की) तरी भाजपावर व्हायचा तो परिणाम कसा टळेल ?
जाऊ द्या.

तेजस आठवले's picture

24 Jan 2018 - 3:06 pm | तेजस आठवले

तुमचा प्रतिसाद कळला नाही अर्धवटराव, कृपया समजावून सांगता का ?

अर्धवटराव's picture

25 Jan 2018 - 7:40 am | अर्धवटराव

:ड

सुबोध खरे's picture

24 Jan 2018 - 7:30 pm | सुबोध खरे

केंद्रात काँग्रेस जर १०० खासदार आणु शकला तर तिसर्‍या आघाडीचे पं.प्र. उमेदवार पवारसाहेब असतील.
अख्ख्या लोकसभेत सहा आणि राज्यसभेत ५ खासदार असलेल्या राष्ट्रवादीचे (६/५) श्री. शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हि अतिशयोक्तीचीही परिसीमा झाली. काँग्रेसचे १०० खासदार झाले तरी विळ्याभोपळ्याची मोट बांधून २७२ पर्यंत पोहोचणारे फार कठीण आहे. त्यातून ममता बॅनर्जी किंवा नवीन पटनाईक किंवा अमरिंदर सिंह सारखे ज्यांच्या कडे भरपूर खासदार आहेत ते सोडून शरद पवार पंतप्रधान होतील हे म्हणणे हास्यास्पद आहे. अण्णाद्रमुक ३७/१३ तृणमूल (२३/१२) बिजू जनता दल (२०/८) राष्ट्रवादीचे (६/५)
अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत.
शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 8:18 pm | श्रीगुरुजी

अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत.
शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते.

+ २० लाख

पवारांची इनिंग केव्हाच संपली आहे. दुर्दैवाने ते अजूनही पॅड बांधून, ग्लोव्हज घालून, बॅट हातात घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही वाटतंय की ते पुन्हा एकदा खेळपट्टीवर येऊन चौकार-षटकारांची आतषबाजी करतील. ते खेळपट्टीवर असतानाही कुथत खेळत होते. आता तर ते बाद होऊन तंबूत परतले आहेत.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 10:47 pm | श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन's picture

24 Jan 2018 - 10:48 pm | गॅरी ट्रुमन

ओरिसातील केंद्रपाडाचे लोकसभा खासदार आणि बिजदचे ज्येष्ठ नेते जय पांडा यांची पक्षाध्यक्ष नवीन पटनायक यांनी पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून हकालपट्टी केली आहे. विविध चॅनेलवर पक्षाची भूमिका मांडताना त्यांना अनेकदा बघितले आहे.इतर नेतेमंडळी आक्रस्ताळेपणा करत असले तरी आपला मुद्दा शांतपणे आणि तितक्याच ठामपणे मांडायची त्यांची हातोटी आहे. ते भाजपच्या मार्गावर आहेत अशी वदंता आहे. आसामात सरबानंद सोनोवाल यांच्या रूपात एक चांगला चेहरा पक्षाला मिळाला.तसा जय पांडांच्या रूपात ओरिसात मिळू शकेल.