नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.
http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-militar…
वाचने
40284
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
राष्ट्रवादीवर राळ उठवूनच
In reply to कदाचित २०१९ नंतर सत्तेत येणार by सुबोध खरे
फार छान झालं.
In reply to २०१९ च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार by गॅरी ट्रुमन
रालोआ ऑफीशिअली फुटायला
In reply to फार छान झालं. by अर्धवटराव
रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली.कधीपासून झालं हे? उद्धटरावांनी काल जाहीर केलं की आम्ही २०१९ ची निवडणुक स्वतंत्र लढणार. पण हेच त्यांनी बरोबर एक वर्षापूर्वी जानेवारी २०१७ मध्येही सांगितलं होतं. आम्ही २५ वर्षे युतीत सडलो असे सांगून मी भविष्यात कोणाशीही युती करणार नाही असे त्यांनी उच्चरवाने सांगितले होते. शिवसेना स्वतंत्र लढणार म्हणजे रालोआ ऑफिशिअली फुटायला सुरूवात झाली असं म्हणायचं असेल तर हे एक वर्षापूर्वीच झालं आहे. अर्थात भाजप असल्या फुसक्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाही. आम्ही पाठिंबा काढणार या शिवसेनेच्या धमकीचे आता शतक व्हायला आले. अजूनही पाठिंबा सुरूच आहे. आम्ही भविष्यात कोणाशीही युती करणार नाही (जानेवारी २०१७), आमचे राजीनामे खिशात आहेत (फेब्रु २०१७), शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही तर एप्रिलमधील अधिवेशन चालू देणार नाही (मार्च २०१७), एप्रिलमध्ये भूकंप होणार (मार्च २०१७), आम्ही आता निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत (सप्टेंबर २०१७) . . . अशा अनेक फुसक्या धमक्या आल्या आणि विरून गेल्या. कालची नवीन धमकीसुद्धा तशीच विरून जाणार आहे. मुळात भाजप-सेना युती सप्टेंबर २०१४ मध्येच तुटली आहे. विधानसभा व नंतर झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. २०१९ मध्ये सुद्धा त्यांच्यात युती होण्याची शक्यता नाही कारण भाजपचा जनाधार सेनेच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाल्याने भाजप सेनेला फारश्या जागा देणार नाही व आपणच मोठा भाऊ या भ्रमात सेना अजूनही असल्याने सेना तसे जागावाटप मान्य करणार नाही. भविष्यात युती होणार नाही हे भाजपला पक्के माहित असल्याने ते सेनेच्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाहीत.शिवसेना बर्याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि.काहीही. सेनेचा मूर्खपणा अजिबात कमी झालेला नाही. आपला जनाधार भाजपच्या तुलनेत खूप कमी आहे ही वस्तुस्थिती मान्य करून युती केली तरच सेनेला फायदा होऊ शकेल. ताकद नसताना स्वबळावर लढण्याचा प्रयत्न सेनेने केला, तर सेनेचा अंत अटळ आहे. विधानसभेत स्वबळावर सेना जेमतेम ६३ जागांपर्यंत पोहोचली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे व काही प्रमाणात मुंबईचा अपवाद वगळला तर स्वबळावर लढणार्या सेनेची बहुतेक ठिकाणी वाट लागली. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात सेनेचा जनाधार विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही कमी होणार हे नक्की.कथाकथन.
In reply to रालोआ ऑफीशिअली फुटायला by श्रीगुरुजी
तुमचा प्रतिसाद कळला नाही
In reply to फार छान झालं. by अर्धवटराव
असाच एक अंदाज बांधला.
In reply to तुमचा प्रतिसाद कळला नाही by तेजस आठवले
केंद्रात काँग्रेस जर १००
अगदी ताणण्याचे ठरवले तरी
In reply to केंद्रात काँग्रेस जर १०० by सुबोध खरे
अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत. शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते.+ २० लाख पवारांची इनिंग केव्हाच संपली आहे. दुर्दैवाने ते अजूनही पॅड बांधून, ग्लोव्हज घालून, बॅट हातात घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही वाटतंय की ते पुन्हा एकदा खेळपट्टीवर येऊन चौकार-षटकारांची आतषबाजी करतील. ते खेळपट्टीवर असतानाही कुथत खेळत होते. आता तर ते बाद होऊन तंबूत परतले आहेत.(No subject)
बिजद नेते जय पांडा पक्षाबाहेर
जर तर...