Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १९

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 02/01/2018 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे. http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-militar…

वाचने 40284
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by उपाशी बोका

Though Agni 5 is said to have a range of 5,000 kms, its range has been a contentious issue. Even India initially did not divulge the exact range of the missile, but later DRDO hinted that it has the capability to reach 5,000 kms. Chinese experts say that the missile actually has the potential to reach targets 8,000 kilometres away and that the Indian government had deliberately downplayed the missile's capability in order to avoid causing concern to other countries. India is striving hard to gain into NSG and it may not go down well with the superpowers if it comes out in the open that India has a missile capable of carrying nuclear warheads to a distance of around 8,000 kms. It may hamper India's chance of gaining entry in the elite NSG group. Read more at: https://www.oneindia.com/india/the-mystery-surrounding-agni-5-s-range-2…

https://www.rbth.com/articles/2012/04/26/missile_impossible_why_the_agn… २०१२ मध्ये रशियाच्या मासिकात आलेला हा एक लेख मुद्दाम वाचावा असा आहे. आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र सूर्य सद्यस्थिती https://defenceupdate.in/surya-indias-most-lethal-missile-update/

लाभाचे पद प्रकरणी आम आदमी पक्षाच्या दिल्ली विधानसभेतील २० आमदारांना अपात्र ठरवावे अशी शिफारस निवडणुक आयोगाने राष्ट्रपतींकडे केली आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/ec-recommends-disqualifi… पंजाब, गोवा, राजौरी गार्डन आणि दिल्ली महापालिका निवडणुका असे एकामागोमाग दुसरे दणके बसल्यानंतर केजरीवाल गेले काही महिने गप्प होते. बहुदा परत थयथयाट, विदुषकी चाळे इत्यादी गोष्टी करायला त्यांना संधी मिळेल.

In reply to by महेश हतोळकर

जर हे आमदार अपात्र ठरले तर राज्यसभा निवडणुकीवर याचा काय परीणाम होईल?
याचा राज्यसभा निवडणुकीवर मतदारांची संख्या कमी होणे इतकाच परिणाम होईल. दिल्ली विधानसभेतील ७० ऐवजी ५० आमदारच मतदान करायला पात्र ठरतील. त्या आकड्यांवरून निवडणुक होईल. समजा काही कारणाने ७० पैकी ५० आमदारांनीच मत दिले असते आणि बाकी आमदारांनी मत दिले नसते तर जो परिणाम झाला असता तोच परिणाम यामुळे होईल.

In reply to by गॅरी ट्रुमन

मला वाटते आआपचे तीन खासदार आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत त्यामुळे निवडणुकीवर फरक पडणार नाही. शिवाय दिल्ली राज्यसभेच्या जागा बहुतेक समभाग पद्धतीने ना होता बहुमत पद्धतीने होत असल्याने (सगळे आमदार प्रत्येक उमेदवाराला मतदान करतील - थोडक्यात तीन जागांच्या तीन वेगळ्या निवडणुका) आआपचे तिन्ही उमेदवार निवडूनच येणार होते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

शिवाय दिल्ली राज्यसभेच्या जागा बहुतेक समभाग पद्धतीने ना होता बहुमत पद्धतीने होत असल्याने (सगळे आमदार प्रत्येक उमेदवाराला मतदान करतील - थोडक्यात तीन जागांच्या तीन वेगळ्या निवडणुका)
ही माहिती नवीनच आहे. आंतरजालावरील याचा संदर्भ मिळू शकेल का?

In reply to by गॅरी ट्रुमन

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhis-wi… मला माहित होते त्यापेक्षा थोडे वेगळे गणित आहे पण शेवटी बहुमत वाल्यांच्या ३ जागा निवडून येतात हे बरोबर आहे. आआपचे तगडे बहुमत बघता यावेळेला कोणीच उमेदवार दिला नाही आणि त्यांचे तिन्ही उमेदवार बिनविरोध झाले.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

राज्यसभेसाठीच्या निवडणूकीला खालील समीकरण वापरतात : विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान आवश्यक मते = (वैध मतदान केलेले एकूण आमदार / मतदानास ठेवलेल्या राज्यसभेच्या एकूण जागा) + 1 उदा: समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर... विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६. मत मोजणी प्रक्रिया : प्रत्येक मतदार प्रत्येक उमेदवाराला १, २, ३, (एकूण उभ्या उमेदवारांइतका) यापैकी एक प्राधान्यक्रम देतो. सर्वात प्रथम १ प्राधान्यक्रमांची मोजणी होते व त्यात विजयी मत मिळालेले उमेदवार विजयी होता. जर त्यांची संख्या निवडीस ठेवलेल्या एकूण जागांपेक्षा कमी असल्यास २ प्राधान्यक्रमांची मोजणी जमेस धरली जाते... असे निवडीस ठेवलेल्या एकूण जागा भरेपर्यंत केले जाते. या प्रक्रियेत बराच घोळ घालण्यास बरीच जागा असते : १. आठवणीत असेलच... गुजरात विधानसभेच्या वेळेस झालेली गडबड आणि ३ आमदारांची मते बाद झाल्यामुळे बदलेले समीकरण व त्यामुळे झालेला अहमद पटेल यांचा विजय. ती मते बाद झाली नसती तर पटेलांचा पराभव नक्की होता. २. राज्यसभेच्या निवडणूकीत बर्‍याचदा घोडेबाजार होतो आणि... तो केवळ राजकीय पक्षा-पक्षांमधेच होतो असे नाही तर त्याचा फायदा घेऊन (आपली पत वाढविण्यासाठी व त्याचा वैयक्तिक हितसंबंधांसाठी उपयोग करून घेण्यासाठी) विजय मल्ल्यासारखे पैसेवाले लोक राज्यसभेची जागा खरेदी करतात, हे उघड गुपित आहे ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर... विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६. दुरूस्ती - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/५) + १ = २९. यासाठी असलेले सूत्र - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = { (एकूण आमदार / (निवडणुकीच्या जागा + १) } + १

In reply to by महेश हतोळकर

या आमदारांना निलंबित करण्यास राष्ट्रपतींनी संमती दिल्यास त्यांच्या मतदारसंघांत परत मध्यावधी निवडणूका होतील आणि त्या जागा परत मिळवता आल्या नाही तर "आआप"चे (आणि पर्यायाने केजरीवालांचे) राजकीय भांडवल कमी होईल. त्या जागा आआपने परत मिळवल्या तर केजरीवालांचा बसलेला आवाज परत जरा जास्तच जोमदार होईल ! :) अर्थातच, हे आमदार बाद झाल्यावरही सद्याच्या विधानसभेत आआपकडेच बहुमत असेल, त्यामुळे सद्य सरकारला धोका नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सगळ्या २० जागांवर जिंकणे आआपला नक्कीच शक्य होणार नाही. जितक्या जागा गमावाव्या लागतील तितक्या प्रमाणात तो आआपला आणि केजरीवालांना धक्का असेल. त्यातून पोटनिवडणुकांच्या वेळी आआपमधील गटबाजी परत डोके वर काढू शकेल. निवडणुक आयोगाच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येते का नाही याची कल्पना नाही. तसे आव्हान देता आल्यास आआप आणखी दोन वर्षे टोलवाटोलवी करून दिल्ली विधानसभेचा ५ वर्षाचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत पोटनिवडणुक होऊ देणार नाही.

आआपच्या माकडचाळ्यांना सुरवात झालेली दिसते. हा निर्णय देऊन निवडणुक आयोगाने सर्वात खालची पातळी गाठली आहे आणि पी.एम.ओ च्या इशार्‍यांवर निवडणुक आयोग काम करते असे आआपने म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/mlas-disqualification-row-aap… म्हणजे मजा बघा. कायद्यातील तरतुदी काय आहेत हे माहित करून न घेता हे बिनडोकासारखे पार्लामेन्टरी सेक्रेटरी नेमणार. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी 'असे करू नका अन्यथा लाभाच्या पदाचा मुद्दा उभा राहिल' असे दिल्ली सरकारला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करणार. त्याविरूध्द प्रशांत पटेल हा एक सामान्य नागरीक तक्रार दाखल करणार. आणि कायद्यातील तरतुदींप्रमाणे निर्णय निवडणुक आयोगाने घेतला तर त्याचा दोषारोप कोणावर? तर पी.एम.ओ वर. या सगळ्या भानगडीत पी.एम.ओ कुठे आले?

In reply to by गॅरी ट्रुमन

सोनिया गांधींना पण २००५साली राजीनामा द्यायला लागला होता याच कारणामुळे. NAC चे अध्यक्षपद हे लाभाचं पद होतं आणि त्या खासदारपण होत्या. त्यांनी रितसर राजीनामा दिला. कायद्यात दुरुस्ती केली की NAC चे अध्यक्षपद लाभाचं नाही. मग आल्या निवडुन परत रायबरेलीतून. आपने ही जी कायदेदुरुस्ती केली ती पूर्वलक्ष्यीप्रभावाने केली पण ती दुरुस्ती अमान्य झाली. आणि आता आपची तशी ताकद नाही की आरामात २० लोक परत निवडुन येतील. काँग्रेस आता पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल आणि २०१५ मध्ये काँग्रेसची मत आपला जाऊन लँड स्लाईड विजय मिळाला तसा आता मिळणार नाही.

In reply to by अनुप ढेरे

हो. कायदा गाढव असतो म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. अमुक एक पद लाभाचे पद नाही असा कायदा राज्य विधानसभांनी/संसदेने पास केला तर संबंधित व्यक्ती विधानसभा/लोकसभेचे सदस्य असतानाही त्या पदावर राहू शकते. तसा कायदा दिल्ली विधानसभेने करून त्यावर राष्ट्रपतींची मंजुरी मिळवून मग या आमदारांची पार्लामेंटरी सेक्रेटरी पदावर नियुक्ती केली असती तर काहीच प्रश्न आला नसता. पण इतक्या गोष्टी समजतील तर आपले युगपुरूष कुठचे. माझ्या माहितीप्रमाणे दिल्ली विधानसभेने केवळ मुख्यमंत्र्यांसाठी पार्लामेंटरी सेक्रेटरी ठेवण्याविषयीचा कायदा केला होता. साहिबसिंग वर्मा आणि शीला दिक्षित यांनीही एकेका आमदाराला (शीला दिक्षित यांनी अजय माकन यांना) असे पार्लामेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमले होते. पण इतर मंत्र्यांना असे पार्लामेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमले तर ते लाभाचे पद होणार नाही असा कायदा दिल्ली विधानसभेने पास केला नव्हता. त्यामुळे या आमदारांचे पद धोक्यात आलेच होते. दुसरे म्हणजे स्वतः केजरीवालांनी आणि त्यांच्या विविध ठिकाणच्या समर्थकांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही असे पार्लामेंटरी सेक्रेटरी नेमले होते मग त्यांची पदे धोक्यात का आली नाहीत असा प्रश्न विचारलाच. असे प्रश्न विचारणार्‍यांना असल्या गोष्टींचे आकलन होणे शक्य नाही आणि केवळ आआपचे समर्थकच असा प्रश्न विचारू शकतील हे नक्की. फरक हा की गुजरात, राजस्थान इत्यादी विधानसभांनी हे पद लाभाचे नाही असे ठरविणारा कायदा पास केला होता तो दिल्ली विधानसभेने केला नव्हता. पण हे आम आदमी पार्टीसारख्या पक्षाच्या नेत्यांना आणि समर्थकांना समजेल ही अपेक्षाच नाही. आपला हा खेळ गोत्यात आणेल हे लक्षात येताच केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत पूर्वलक्षी प्रभावाने कायदा करायचा प्रयत्न केला. त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मंजुरी दिली नाही.त्यावेळी समजा कोविंद राष्ट्रपती असते आणि त्यांनी अशी मंजुरी नाकारली असती तर केजरीवालांनी किती थयथयाट केला असता याची कल्पनाही करवत नाही.
आता आपची तशी ताकद नाही की आरामात २० लोक परत निवडुन येतील. काँग्रेस आता पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल आणि २०१५ मध्ये काँग्रेसची मत आपला जाऊन लँड स्लाईड विजय मिळाला तसा आता मिळणार नाही.
आणि स्वतः आआपच्या मतांमध्येही बरीच घट झाली आहे त्याचा परिणाम होईल तो वेगळाच. २०१५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मत देणार्‍या दर १० मतदारांपैकी जवळपास ४ मतदार आपने २०१७ मधील दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये गमावले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

असे प्रश्न विचारणार्‍यांना असल्या गोष्टींचे आकलन होणे शक्य नाही आणि केवळ आआपचे समर्थकच असा प्रश्न विचारू शकतील हे नक्की.
Never attribute to stupidity that which can adequately be explained by malice.

आआपच्या २० आमदारांना अपात्र ठरवून निवडणुक आयोगाने पंतप्रधान मोदींना भेट दिली आहे असे सडेतोड विधान आआपचे नेते गोपाल राय यांनी केले आहे. https://www.ndtv.com/delhi-news/aap-mlas-disqualification-election-comm… मला गोपाल रायांचे हे सडेतोड विधान अजिबात पटलेले नाही. पंतप्रधान मोदी आणि भारताच्या जनतेसाठी खरी भेट कोणती असेल? आम आदमी पार्टीच नव्हे तर भारतीय राजकारणात, विविध विद्यापीठांमध्ये, मिडियामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी असलेले यच्चयावत सगळे बुबुडाविपुमाधवि, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत स्वस्थ बसणे मान्य नसलेल्या आणि असले बरळलायला मोठे व्यक्तिस्वातंत्र्याचे लेबल लावणारे विचारवंत ही जमात राजकारणातून कायमची हद्दपार होणे ही खरी भेट असेल. सध्या डायनॉसॉर जसे केवळ पुरातन काळाशी संबंधित पुस्तकांमध्येच बघायला मिळतात त्याप्रमाणे समस्त तथाकथित विचारवंतांच्या बाबतीत व्हायला हवे . अशी भेट आपल्या या जन्मात मिळावी ही फार मोठी इच्छा आहे.

तोगडियांचे काय झाले पुढे ?

In reply to by manguu@mail.com

तोगडियांचे काय झाले पुढे ?
जर का काही झालेच असेल तर ते पुरोगाम्यांच्या गळ्यातले ताईत बनले एवढेच झाले. कधीकाळी तोगडियांच्या बाजूने पुरोगामी बोलतील अशी कल्पना जरी केली असती तरी आपण जागे आहोत ना, स्वप्न तर बघत नाही ना याची खात्री करायला चिमटे काढून बघितले असते :)

दुवा केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह ने दावा किया है कि मानव के क्रमिक विकास का चार्ल्स डार्विन का सिद्धांत ‘वैज्ञानिक रूप से गलत है.’ उन्होंने स्कूल और कॉलेज के पाठ्यक्रम में इसमें बदलाव की भी हिमायत की. मानव संसाधन विकास राज्य मंत्री सिंह ने कहा कि हमारे पूर्वजों ने कभी किसी कपि के इंसान बनने का उल्लेख नहीं किया है. उन्होंने शुक्रवार (19 जनवरी) को संवाददाताओं से बातचीत में यहां कहा, ‘‘(इंसानों के विकास संबंधी) चार्ल्स डार्विन का सिद्धांत वैज्ञानिक रूप से गलत है. स्कूल और कॉलेज पाठ्यक्रम में इसे बदलने की जरूरत है. इंसान जब से पृथ्वी पर देखा गया है, हमेशा इंसान ही रहा है

In reply to by कपिलमुनी

सर्व अभ्यासक्रमात विमाने उडवायला आणि हत्ती , माणसाची सर्जरी करायला शिकवणार बहुधा

In reply to by कपिलमुनी

या तद्दन पोरकट प्रतिसादावरून सपाटून मार खाल्ल्यानंतर मुनीवर्यांनी पलायन केले होते. आता वातावरण थंड झाले आहे या समजूतीत परत येऊन पुन्हा एकदा तेच कार्य सुरू केले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

इथे काथ्या कुटत बसणे एवढेच काम नाही. पलायन करायला हे काही माझा करो या मरो युद्ध नाही . आणि शेवटचा प्रतिसाद माझा हा बालिशपणा ही नाहीये.

In reply to by कपिलमुनी

इथे काथ्या कुटत बसणे एवढेच तुमचे काम नाही. वेगवेगळ्या धाग्यांवर जाऊन पो टाकून पलायन करणे हे काम सुद्धा तुमच्या महत्त्वाच्या कामात अंतर्भूत आहे.

HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत, त्यांची काही विधाने १. “Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,” २. “No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,” ३. “Darwin’s theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. Since the man is seen on Earth he has always been a man,” असा माणूस जर HRD राज्यमंत्री असेल तर देशाला शिक्षणामध्ये नवीन दिशा देण्याऐवजी त्याची दुर्दशाच करू शकतो. एका माजी IPS अधिकार्याकडून असे statement यावे हे तर दुर्दैवी आहे. मोदी नि अश्या यडछांप लोकांना मंत्रिमंडळातून कडून टाकल पाहिजे किंवा त्यांना दुसर खात ज्यामध्ये त्याचं expertize आहे असे खाते दिले पाहिजे. Stop Teaching Darwin’s Theory as It Is Scientifically Wrong: Union Minister Satyapal Singh

In reply to by अमितदादा

हे तेच ना ? स्त्रिया प्रदूषणापासून संरक्षण म्हणून चेहरा ओढणी किंवा रुमालाने झाकतात पण प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही म्हणणारे आणि त्यावर बंदी आणणारे ?

In reply to by बबन ताम्बे

ते असे म्हणाले होते का याची मला कल्पना नाही. परंतु ओढणी किंवा रूमालाने चेहरा झाकल्याने प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही हे वाक्य बरोबर आहे. फारतर धुळीपासून थोडेसे संरक्षण मिळत असू शकेल, परंतु रूमाल किंवा ओढणीने चेहरा झाकल्याने प्रदूषणापासून संरक्षण होत नाही.

In reply to by बबन ताम्बे

असे काही ते म्हणाले याची मला हि कल्पना नाही. धूळ हा वायू प्रदूषणाचा एक भाग आहे त्यापासून संरक्षण मिळाले तरी खूप झाले असे मला वाटते.

In reply to by अमितदादा

हे तेच ना ? स्त्रिया प्रदूषणापासून संरक्षण म्हणून चेहरा ओढणी किंवा रुमालाने झाकतात पण प्रदूषणापासून संरक्षण होते याला शास्त्रीय आधार नाही म्हणणारे आणि त्यावर बंदी आणणारे ?

In reply to by अमितदादा

१. “Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,” यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का? २. “No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,” यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का? ३. “Darwin’s theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. Since the man is seen on Earth he has always been a man,” डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे. हा सिद्धांत वादग्रस्त असून जगन्मान्य नाही. त्यामुळे वरील वाक्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. (बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?) असो. असा माणूस जर HRD राज्यमंत्री असेल तर देशाला शिक्षणामध्ये नवीन दिशा देण्याऐवजी त्याची दुर्दशाच करू शकतो. एका माजी IPS अधिकार्याकडून असे statement यावे हे तर दुर्दैवी आहे. मोदी नि अश्या यडछांप लोकांना मंत्रिमंडळातून कडून टाकल पाहिजे किंवा त्यांना दुसर खात ज्यामध्ये त्याचं expertize आहे असे खाते दिले पाहिजे. जे सत्य आहे तेच सत्यपाल सिंह यांनी बोलून दाखविले आहे. त्यांच्या बोलण्यामुळे शिक्षणाची दुर्दशा कशी होईल? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले नव्हते आणि तेच त्यांनी सांगितले आहे. डार्विन सिद्धांत वादग्रस्त आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत. त्यावर बोलणे हेसुद्धा चुकीचे नाही. ते केवळ मोदी मंत्रीमंडळात आहेत व आपल्याला न आवडणारे ते बोलले आहेत म्हणून लगेच त्यांना काढून टाकण्याची मागणी करणे हे असहिष्णुतेचेच लक्षण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

(बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?)
सिरियसली हा प्रश्न विचारला आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

अरेरे काय हे...मोदी सरकारची अनेक चांगली कामे आहेत त्याचे समर्थन आपण करू शकता ना. चुकीच्या विधानांची कशासाठी समर्थन करायचे. त्यांची सर्व वाक्ये एकत्र घेवून वाचा प्रत्येक वाक्य आणि शब्द वेगळे घेवून न्हवे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता कि आपल्या पूर्वजांनी वेदामध्ये उत्क्रांती बद्दल काही सांगितले नाही म्हनुन डार्विन चुकीचा, आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे. ते असे म्हणतात माणूस हा कधी उत्क्रांत झाला नसून पूर्वीपासून माणूसच आहे Since the man is seen on Earth he has always been a man
(बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?)
ना त्या मंत्र्याला डार्विन काय बोला माहित आहे ना तुम्हाला. इथे वाचा डार्विन नक्की काय म्हणतो ते मग डार्विन विषयी लिहा What Darwin actually said about man and apes In his book ‘The Descent of Man’ published in 1871, English naturalist Charles Darwin presented the idea that human beings and apes have a common ancestor. Contrary to common perception, which is reflected in Mr. Singh's statement, Darwin did not say that humans directly evolved from apes. He merely pointed out the similarities between birds, fishes, mammals and reptiles and suggested that all life is related. This, in turn, means that all complex life forms evolved from simpler ones through various genetic mutations. डार्विन काय म्हणतोय हे या मंत्री महोदयांनी आयुष्यात वाचले नसेल.
डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे.
नक्कीच, परंतु आजून हि बहुतांश शास्त्रज्ञ हा सिद्धांत मानतात जरी त्यात loopholes असले तरी, आणि सत्यपालसिंह यांनी वैज्ञानिक आक्षेप घेतले नसून त्यांचा रोख स्वदेश ज्ञान आणि परदेशी ज्ञान या अनुषंगाने आहे. However, as zoologist Jules Howard argued in an article in The Guardian, as of now, “Darwin’s ideas still seem capable of explaining much, if not all, of what we see in nature.” Additionally, he says, “if a more scientifically accurate way of explaining the diversity of life on Earth comes along, Darwin would be ousted.” त्यामुळे शब्दांचे खेळ करून त्यांना समर्थन देण्याचे काही अर्थ नाही असे वाटते.

In reply to by अमितदादा

सत्यापालसिंह जे काही बोलले किंवा ज्या पद्धतीने बोलले ते मला वैयक्तिकरित्या पटले नाही. ************** पण त्यांच्या वक्तव्यावर एवढी असहिष्णुता का? असे आक्षेप अनेक नामांकित संशोधकांनीही घेतले आहेत. यावरून ते त्यांचे खाते सांभाळू शकतील का हा निष्कर्ष काढणे योग्य आहे का? ************** कपिल सिब्बल मनुष्यबळ विकासमंत्री असताना कारभार कसा झाला यावर आपले मत काय?

In reply to by अमितदादा

अरेरे काय हे...मोदी सरकारची अनेक चांगली कामे आहेत त्याचे समर्थन आपण करू शकता ना. चुकीच्या विधानांची कशासाठी समर्थन करायचे. त्यांची विधाने चुकीची आहेत हे कधी सिद्ध झाले किंवा हे कोणी ठरविले? डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धात हा वादग्रस्त असून त्यावर मतभेद आहेत व त्याला जगन्मान्यता नाही. ज्या विषयाला एकापेक्षा जास्त बाजू आहेत त्यावर कोणत्यातरी एका बाजूने बोलणे हे चुकीचे विधान कसे? त्यांची सर्व वाक्ये एकत्र घेवून वाचा प्रत्येक वाक्य आणि शब्द वेगळे घेवून न्हवे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता कि आपल्या पूर्वजांनी वेदामध्ये उत्क्रांती बद्दल काही सांगितले नाही म्हनुन डार्विन चुकीचा, आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे. ते असे म्हणतात माणूस हा कधी उत्क्रांत झाला नसून पूर्वीपासून माणूसच आहे आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे असे ते म्हणालेले नाहीत. त्यांनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी याबद्दल सांगितलेले किंवा लिहिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे व तीच त्यांनी सांगितली आहे. Since the man is seen on Earth he has always been a man यात काय चुकीचे आहे? डार्विन काय म्हणतोय हे या मंत्री महोदयांनी आयुष्यात वाचले नसेल. डार्विन काय म्हणतोय यापेक्षा तो जे म्हणतोय ते १०० टक्के बरोबर आहे का हा मुख्य मुद्दा आहे. समजा मंत्रीमहोदयांनी डार्विन काय म्हणतोय हे वाचलेही नसेल, परंतु जगातील ज्या अनेक शास्त्रज्ञांनी डार्विनचा सिद्धांत मान्य न करता त्यावर आक्षेप घेतले आहेत त्यांनी तरी आपले मत व्यक्त करण्यापूर्वी डार्विनचा सिद्धांत नक्कीच नीट वाचला असेल. त्यामुळे शब्दांचे खेळ करून त्यांना समर्थन देण्याचे काही अर्थ नाही असे वाटते. डार्विनविरूद्ध बोलले म्हणजे लगेच त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाका अशा मागणीतही काही अर्थ नाही. एकतर त्यांना स्वतःचे विचार सार्वजनिक करण्याचे विचारस्वातंत्र्य आहे, दुसरं म्हणजे त्यांचे हे विचार प्रक्षोभक, बेकायदेशीर इ. नाहीत आणि तिसरं ज्याला एकापेक्षा जास्त बाजू आहेत अशा विषयावर त्यांनी एका बाजूने मत मांडले आहे. त्यांनी स्वतःचे मत मांडले आहे व स्वतःच्या मतामागील कारणमीमांसाही सांगितली आहे. त्यांचे मत वैज्ञानिकदृष्ट्या खोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यावर आभाळ कोसळल्यासारखे लगेच आकांडतांडव करण्याची गरज नाही आणि ते योग्यही नाही. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/satyapa… वरील बातमीत लिहिलंय की "उत्क्रांतीच्या सिद्धांतप्रकरणी सत्यपाल यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, यासाठी वैज्ञानिकांनी त्यांच्याविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केलीय. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुले पत्र लिहिण्यात आले असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी व्हावे असे आवाहन वैज्ञानिकांनी केले आहे. " ही तर शुद्ध गुंडगिरी आणि झुंडशाही झाली. एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आता मत मांडायचीही चोरी आहे कारण शास्त्रज्ञांना न आवडणारे मत कोणी व्यक्त केले तर लगेच ते अशी मोहीम सुरू करणार. भारतीय वैज्ञानिक इतके बंदिस्त व कोत्या मनोवृत्तीचे असतील असे वाटले नव्हते. सत्यपाल सिंह यांच्यासारख्या सॉफ्ट टारगेट विरूद्ध अशी सवंग मोहीम सुरू करता येईल, परंतु जगातील ज्या शास्त्रज्ञांनी डार्विनच्या सिद्धांताविरूद्ध मत व्यक्त केले आहे त्यांच्याविरूद्ध भारतातील वैज्ञानिक काय करणार? त्यांच्याविरूद्ध अशी मोहीम सुरू करण्याची यांच्यात हिंमत आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

यात काय चुकीचे आहे?
सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं वाक्य आहे.
डार्विन काय म्हणतोय यापेक्षा तो जे म्हणतोय ते १०० टक्के बरोबर आहे का हा मुख्य मुद्दा आहे.
डार्विन काय म्हणतो हे समजावून न घेता त्याचा सिद्धांत पुस्तकातून काडून टाकणे का तर आपल्या पूर्वजांनी हे सांगितलं नाही आपल्या वेदात हे नाही म्हणून. हा भंपकपणा आहे, वैज्ञानिक मतभेद न्हवेत. आणि अश्या शिक्षण मंत्र्याला पदावर राहणे शोभून दिसत नाही. जर त्यांना मंत्रिपद वरून हटवणे अतिशोयक्ती वाटत असेल तर त्याचे खाते बदला, हा उपाय मी सुचवलेला आहे.
त्यांचे मत वैज्ञानिकदृष्ट्या खोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यावर आभाळ कोसळल्यासारखे लगेच आकांडतांडव करण्याची गरज नाही आणि ते योग्यही नाही.
मी वैज्ञानिक रित्या त्यांचं वाक्य खोडलेल आहे आणि सनदशीर मार्गाने मागणी केली आहे त्यांना हटविण्याची. माझ्या सारख्या इतर लोकांनी केलेल्या मागणीला गुंडगिरी म्हणणे चुकीचे आहे. सरळ सरळ सनदशीर आणि योग्य पद्धतीने केलेली मागणी आहे. @बिटकाका आणि @ गामा पैलवान सत्यपाल सिंह हे एक वेदाच्या परिषदेत बोलत होते त्यांचं वैज्ञानिक विरोध दिसून येत नाही ते असे म्हणतात ती गोष्ट वेदात नाही आपल्या पूर्वजांनी सांगितली नाही म्हणून चुकीची. हा मुद्दा समजावून घेतला तर आपल्याला कळेल की त्यांना होणारा विरोध बरोबर आहे ते. आणि जर कपिल सिब्बल असे म्हणाले असते तर मी असाच विरोध केला असता. त्यामुळं कोण म्हणाले हे महत्वपूर्ण नाही कोणत्या अनुषंगाने काय म्हणाले ते महत्वाचं आहे.

In reply to by अमितदादा

सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं वाक्य आहे. ते कसं काय? डार्विन काय म्हणतो हे समजावून न घेता त्याचा सिद्धांत पुस्तकातून काडून टाकणे का तर आपल्या पूर्वजांनी हे सांगितलं नाही आपल्या वेदात हे नाही म्हणून. हा भंपकपणा आहे, वैज्ञानिक मतभेद न्हवेत. आणि अश्या शिक्षण मंत्र्याला पदावर राहणे शोभून दिसत नाही. जर त्यांना मंत्रिपद वरून हटवणे अतिशोयक्ती वाटत असेल तर त्याचे खाते बदला, हा उपाय मी सुचवलेला आहे. जो सिद्धांत सर्वमान्य नाही व ज्याच्या सत्यतेविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत तो पुस्तकात असावा का? हा सिद्धांत आपल्या पूर्वजांनी सांगितलेला नाही हे बरोबरच आहे. अशा वादग्रस्त सिद्धांताविषयी आपले मत व्यक्त केले म्हणून लगेच त्यांना काढून टाकायचे किंवा खाते बदलायचे? मी वैज्ञानिक रित्या त्यांचं वाक्य खोडलेल आहे आणि सनदशीर मार्गाने मागणी केली आहे त्यांना हटविण्याची. माझ्या सारख्या इतर लोकांनी केलेल्या मागणीला गुंडगिरी म्हणणे चुकीचे आहे. सरळ सरळ सनदशीर आणि योग्य पद्धतीने केलेली मागणी आहे. हटविण्याची मागणी सनदशीर आहे तसेच त्यांचे मतसुद्धा सनदशीर आहे. आपले मत व्यक्त केल्यानंतर लगेच "तुमची विधाने मागे घ्या" म्हणून ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे व दबास आणणे हे माझ्या दृष्टीने गुंडगिरी व झुंडशाहीचे लक्षण आहे. इतर देशातील अनेक वैज्ञानिकांनी हा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्याविषयी भारतातील वैज्ञानिकांची काय भूमिका आहे? वैज्ञानिकांनी बंदिस्त विचार न करता प्रत्येक शक्यतेचा विचार खुल्या मनाने केला पाहिजे. मुळातच जो सिद्धांत वादग्रस्त आहे त्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त केल्यानंतर लगेच ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे याला माझा आक्षेप आहे. असे करण्याऐवजी वैज्ञानिकांनी त्यांचे म्हणणे वैज्ञानिक आधारावर खोडून काढावे. ज्याप्रमाणे इतर क्षेत्रात असहिष्णुतेचा नसलेला बागुलबुवा उभा करून भाजप सरकारविरूद्ध कांगावा केला जात आहे त्यात आता हे वैज्ञानिकही सामील होत आहेत असे चित्र दिसते आहे.

In reply to by अमितदादा

अमितदादा, पुस्तकातून काढून टाकणे? हे कधी झालं? त्यांनी आपल्याला माहित असलेल्या गोष्टी शिकवाव्यात असं म्हटलं आहे. तुमच्याकडे काही दुवा असेल तर द्याल का? ******************** तुम्ही सत्यपालसिंहांच्या एका मतावर त्यांच्या खात्याच्या कारभाराबद्दल बोलत आहात. इतकेच नाही तर त्याबद्दल निराशावाद व्यक्त करत आहात. अशी अनेक वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांच्या काळातील कारभाराबद्दल आपले मत काय असे मला म्हणायचे होते. मला असे वाटते अगदीच निर्विवाद अशा कुठल्या गोष्टीवर ते बोलले नाहीयेत तर ज्याबाबतीत बरीच त्या विषयाशी संबंधित मंडळीही साशंक आहेत अशा विषयाबद्दल ते बोलले आहेत. त्यांनी त्यासाठी त्या संबंधित मंडळींच्या ऐवजी पूर्वजांचा संदर्भ देणे मला पटत नसले तरी अयोग्य अजिबात नाही. एवढी असहिष्णुता दाखववून त्यांच्या खात्याच्या कारभारावर (या वक्तव्यामुळे) टीका करणे पूर्वग्रहदूषित असल्याचे जाणवते. ******************** पृथ्वी गोल नसून सपाट आहे असा देखील काही लोकांचा दावा आहे.

In reply to by अमितदादा

@श्रीगुरुजी मी किंवा अनेक लोकांनी त्यांच्या मताला केलेला विरोध हा सनदशीर, कायदेशीर आणि न्याय आहे. त्यांना कोणतीही धमकी दिली नसून त्यांचं विधान कसे चुकीचे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. (तुम्हला अजून ते दिसत नसेल तर माझा नाईलाज आहे) त्यामुळे ही गुंडगिरी आणि झुडशासी अजिबात नाही, मुळात जर त्या मंत्र्यांचा विधान तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र वाटत मात्र अनेक वैज्ञानिकच विधान व्यक्तिस्वातंत्र न वाटता झुंडशाही आणि गुंडगिरी वाटते हेच मुळात हास्यास्पद आहे. @बिटकाका मुळात ते मंत्री फक्त विधान करून न थांबता हे पाठपुस्तकातून काढावे असे म्हणतात असे करणारा जगात फक्त एक देश आहे तो म्हणजे तुर्कस्तान आपल्याला त्या कॅटगारी मधे बसायचं आहे का? तेंव्हा यात कोणताही राजकीय angle न पाहता आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे. अनेक मंत्रांनी विज्ञान विरोधी विधाने केली आहेत यांची विज्ञान विरोधी असहिकष्णूता पाहता मी ही यांच्याबद्दल असहिष्ण झालो आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

In reply to by अमितदादा

हो तेच म्हणतोय, अजून काढले नाही. त्यांनी काढायला हवे असे त्यांचे मत व्यक्त केले आहे. तसे ते पुस्तकातून काढणे हे भारताततरी फक्त मंत्र्यांच्या मतावर अवलंबून नसावे. त्यांनी फक्त मत केले म्हणून एवढ्या टोकाची टीका करणे हीच खरी असहिष्णुता आहे. खरंतर तुम्हीच या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून पहात आहात असे मला वाटते. राहता राहिला प्रश्न विरोध करण्याचा, कशाला करायला हवा तो विरोध आत्ता? नेमके काय घडले आहे? ते मत मलाही पटले नाही असे वर म्हटले आहेच. याच्यापुढचा विरोध आता या क्षणालातरी माझ्या दृष्टिकोनातून राजकीयच आहे.

In reply to by बिटाकाका

>>> त्यांनी फक्त मत केले म्हणून एवढ्या टोकाची टीका करणे हीच खरी असहिष्णुता आहे. खरंतर तुम्हीच या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून पहात आहात असे मला वाटते. + १ विरोधा मागील मुख्य कारण राजकीयच आहे.

In reply to by अमितदादा

एका सर्वमान्य नसलेल्या, वादग्रस्त मुद्द्यावर व्यक्त केल्यानंतर त्याला शास्त्रीय मार्गाने उत्तर देण्याऐवजी लगेच हे विधान मागे घेण्यासाठी ऑनलाईन पिटिशन करून इतरांचे समर्थन मागणे ही झुंडशाही व गुंडगिरीच आहे. जरा थांबा. काही काळातच भगवा अजेंडा, हिंदू अजेंडा अससे शब्द वापरून यात पुरस्कार-परती टोळी उतरेल हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

सिंग म्हणाले म्हणून कोणी पुस्तक बदलणार नाहीये. पण ते म्हणाले आणि कोणीच काही आक्षेप घेतला नाही हे पण व्हायला नको. उलट थेअरी बहुमान्य आहे हेच सोशल मीडिया मधून दिसते. हे फक्त वैयक्तिक मत असेल तर त्रास फार नाही, पण HRD मध्ये असताना सार्वजनिक भाषणांत असे मत "व्यक्त" करणे हे चुकीचे आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. जर वाटलेच तर एखादा शोधनिबंध लिहून माणूस कसा होमिनाईड नाही हे सिद्ध करावे अथवा उत्क्रांतीशास्त्राला पर्याय असणारी दुसरी थेरी मांडावी सत्तापक्षातील लोकांना उगाच वाद निर्माण करायला आवडतात असं वाटायला लागलाय (अंजिराची झाड, गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती - अजून काय काय काढतील कोण जाणे!?) बाकी हुच्च्चभ्रू सीरिअल वाल्या लोकांसाठी :P https://scroll.in/video/865884/satyapal-singh-can-take-comfort-from-f-r… .

In reply to by sagarpdy

सिंग यांच्या विधानाविरूद्ध आक्षेप घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे यासाठी ऑनलाईन पिटीशन वगैरे करून त्यासाठी इतरांचे समर्थन मागणे किंवा लगेच त्यांना मंत्रीपदावरून काढा अशी मागणी करणे हे अयोग्य आहे, एवढाच मुद्दा आहे. सत्यपाल सिंग म्हणजे लालू, मुलायम सारखे रस्टिक नाहीत. ते M.Sc. (Chemistry), M.Phil. (Chemistry), MBA आणि P.H.D. आहेत. त्यांनी जर एखाद्या वैज्ञानिक सिद्धांतावर आक्षेप घेतला असेल तर विज्ञानाच्या मार्गाने त्यांच्या आक्षेपाचे खंडन करणे हाच योग्य मार्ग आहे व वैज्ञानिकांनी राजकारणी मार्गाने न जाता वैज्ञानिक मार्गाने विरोध करायला हवा होता. HRD मध्ये असताना सार्वजनिक भाषणांत असे मत "व्यक्त" करणे अजिबात चूक नाही. मुळात जो सिद्धांत अजून निर्विवाद सिद्ध झालेला नाही व एकमताने निर्विवाद मान्य झालेला नाही त्याविरूद्ध बोलणे अजिबात चूक नाही. सत्तापक्षातील लोकांना उगाच वाद निर्माण करायला आवडतात असं वाटायला लागलाय (अंजिराची झाड, गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती - अजून काय काय काढतील कोण जाणे!?) सत्तापक्षातील माणसे वाद निर्माण करतात यापेक्षा सत्ताधार्‍यांच्या विधानामधून विनाकारण नसलेला वाद निर्माण करून राजकीय अजेंडा राबविला जातो असे दिसते.

In reply to by अमितदादा

अमितदादा, मूळ मुद्दा असा आहे की माकडापासून माणूस उत्पन्न झाला याला कुठलाही पुरावा नाही. सत्यपाल सिंगांची भाषा अपरिचित वा आक्षेपार्ह असू शकते. आ.न., -गा.पै.

In reply to by अमितदादा

HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत, त्यांची काही विधाने आधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल सिंह यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक, समाजात दुफळी पाडणारे, घटनाद्रोही, दंगली माजविणारे, एखाद्या जातीधर्माचा अपमान वगैरे करणारे इ. नाही. मुळात जो दावा अजून वैश्विक सत्य झालेला नाही व ज्याविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत, अशा दाव्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त करण्याचे विचारस्वातंत्र्य त्यांना आहे. एखाद्याला त्यांचे मत आवडले नसले तरी लगेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी योग्य वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल सिंह यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक, समाजात दुफळी पाडणारे, घटनाद्रोही, दंगली माजविणारे, एखाद्या जातीधर्माचा अपमान वगैरे करणारे इ. नाही. मुळात जो दावा अजून वैश्विक सत्य झालेला नाही व ज्याविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत, अशा दाव्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त करण्याचे विचारस्वातंत्र्य त्यांना आहे. एखाद्याला त्यांचे मत आवडले नसले तरी लगेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी योग्य वाटत नाही.
मग वैज्ञानिक किंवा मी सुधा कोणतीही दंगल देशद्रोह घटनाद्रोह करत नाही. तसेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी मला तरी योग्य वाटते कोणतही सभ्येतेच उल्लंघन वाटत नाही. तुम्ही शिवसेनेला शिटसेना, कॉंग्रेस ला खान्ग्रेस, राहुल ला पप्पू, हत्येला वध म्हणन्याच सोडून देवून सभ्यतेचा आदर्श घालून द्यावा मी त्याच पालन करेन.

In reply to by अमितदादा

वरील प्रतिसाद वाचून "दीवार" मधील संवाद स्मरला. या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा संबंध नाही. एकीकडे समाजविघातक गोष्टी आहेत तर दुसरीकडे एका सर्वमान्य नसलेल्या निरूपद्रवी सिद्धांतावरील व्यक्तिगत मत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आआपच्या २० आमदारांना अपात्र ठरवायच्या निवडणुक आयोगाच्या शिफारसीला मान्यता दिली आहे. https://www.thenewsminute.com/article/setback-arvind-kejriwal-president… त्यावर यशवंत सिन्हांनी ही तुघलकशाही आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तर हा दिवस येणार हे माहित होते म्हणून देवाने आम्हाला ७० पैकी ६७ जागा दिल्या असे स्वतः केजरीवालांनी म्हटले. यशवंत सिन्हांना पक्षातील किंवा सरकारमधील कोणीही गांभीर्याने घेत नाही यामुळे त्यांची तडफड खूपच वाढलेली दिसते. अडवाणीही सुरवातीला अशी तडफड होऊन असे काहीसे बडबडत होते पण त्याचा काही उपयोग होत नाही हे बघून ते सध्या गप्प बसले आहेत. यशवंत सिन्हांना मात्र ही गोष्ट अजून समजलेली दिसत नाही. दुसरे म्हणजे सगळ्या पुरोगाम्यांचा केजरीवालांना पाठिंबा असतो. आणि यातीलच बरेच 'देव' किंवा 'श्रध्दा' असे काही शब्द ऐकले की अंगावर पाल पडल्यासारखे करतात. अशा लोकांची केजरीवालांच्या 'देवाने आम्हाला ६७ जागा दिल्या' या विधानावर काय प्रतिक्रिया असेल बरे? असो. आता आआप या 'असंवैधानिक' निर्णयाविरूध्द उच्च न्यायालयात आणि गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे असे केजरीवालांनी जाहिर केले आहे. हा निर्णय पुढील दोन वर्षात यायची शक्यता जवळपास शून्य. त्यामुळे दिल्लीत २० जागांवर पोटनिवडणुक होणार नाही. वाटले होते त्याप्रमाणे आआपवाले टोलवाटोलवी करून विधानसभेचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पोटनिवडणुक होऊ देणार नाही असेच दिसते.

अभिराम दीक्षित यांच्या चेपु भिंतीवरून साभार .वैदिक संमेलनात जाऊन सत्यपाल नावाचा मंत्री जे काही माकडी बोलला ते ऐकून - सावरकरांचा एक जुना लेख आठवला . हिंदुत्व वाद्यानी तो लेख मुळातूनच वाचावा . तात्यारावाचा लेख १०० वर्ष जुना असला तरी सध्याच्या टनातनी लोक्स ना परफेक्ट लागू आहे . २००१ साली प्रकाशित झालेल्या समग्र सावरकर वाड्:मयाच्या पाचव्या खंडातल्या १९८ व्या पानावर सावरकरांचा एक विनोदी लेख आहे . त्याचे नाव काशितली दोन सम्मेलने : माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन . काशी नगरीस ज्ञानवापी असेही म्हणण्याचा प्रघात आहे . तर काशीला ब्राह्मणांचे एक संम्मेलन भरले होते . श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आज लागू आहे काय ? या विषयाचा निवाडा लावण्यासाठी हे आयोजन होते . त्याचवेळी सावरकरांनी हा लेख लिहिला आहे . तात्याराव सावरकरांनी आपले एक "" मनकवडे "" नावाचे काल्पनिक वार्ताहार काशीच्या ज्ञानवापिस पाठवले.…… तर श्री मनकवडेना दोन संमेलने दिसली --- पहिले संमेलन माकडांचे होते . काशीस पूर्वी माकडे मुक्त संचार करत . अद्वातद्वा उड्या मारीत शेपटीने झाडास लोंबकाळित -- भू:भु:क्कार करीत माकडांचे दिवस सुखात चालले होते . मग एके दिवशी काशीच्या ज्ञानवापीत वीज आली. विजेच्या ताराही आल्या . विजेच्या ताराना शेपटी लागल्यावर विजेचे झटके आणि चटके बसू लागले. मग माकड महासंमेलनात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला . कि विजेच्या ताराना शेपटीने लटकावे का ? काही माकडे म्हणाली " छट्ट हा प्रश्नच गैरलागू आहे . विजेच्या तारा नावाचा काही पदार्थ असता तर आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांनी माकड-स्मृतीत तसे लिहिले नसते काय ? ज्या अर्थी माकडस्मृतीत वीज नाही तर ती आताही अस्तित्वात असू शकत नाही. शेवटी बराच गिचगीचाट झाला. माकडी भाषेतल्या दुरगम्य चर्चेतून असे निष्पन्न झाले कि - परिस्थिती बदलली आहे तेव्हा माकड स्मृतीत बदल केला पाहिजे……………………… त्याच वेळी अज्ञान वापिस ब्राह्मणाचे दुसरे संमेलन भरले होते त्याचा निष्कर्ष आला कि परिस्थिती हा शब्दच धर्म बाह्य आहे . अधम धर्म विरोधी आहे . शुद्ध संस्कृत भाषेत ओरडत… गिल्ला करत … असा ठराव पास झाला कि परिस्थितीचा पालट विचारात घेणे हा धर्मद्रोह आहे . पाखंड आहे …………… लेखाचा समारोप करताना सावरकर लिहितात " या ब्राह्मण संमेलनातील ठरावामुळे डार्विनच्या उत्क्रांतीवादास मोठाच धक्का बसला . प्राप्त परिस्थितीत माकडाचा विकास होऊन माणुस झाला…. यापेक्षा माणसाचा विकास होऊन माकडे निर्माण झाली हेच मान्य करणे क्रमप्राप्त आहे. अज्ञान वापितले पंडित धर्म संमेलन हेच दर्शवते !" - विनायक दामोदर सावरकर

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी, सावरकरांबद्दल प्रगाढ आदर असूनही एक सांगावंसं वाटतं. ते म्हणजे जरी ते विज्ञानवादी असले, तरी विज्ञानाचे अभ्यासक नव्हते. त्यांची विज्ञानविषयक मते सर्वसामान्य माणसाची ( = layman view) धरायला हवीत. आ.न., -गा.पै.

टनाटनी विधाने करायची जुनीच परंपरा आहे. पूर्वीसुद्धा मा. पंप्र यांनी कर्णाचे ( Karna was not born from his mother’s womb )आणि गणपतीचे ( There must have been some plastic surgeon at that time who got an elephant’s head on the body of a human being and began the practice of plastic surgery.) उदाहरण दिले आहे. एकेकाच्या अंधश्रद्धा !!

Scientists respond to MoS HRD Satyapal Singh’s remarks on human evolution. 1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights. 2.Statements such as “humans did/did not evolve from monkeys” is an overly simplistic and misleading representation of evolution. 3.When a minister working for human resource development in the country makes such claims, it harms the scientific community’s efforts to propagate scientific thoughts and rationality through critical education and modern scientific research. It also diminishes the image of the country at the global level and reduces faith of the international historical research community in the genuine research by the Indian researchers. पुढे जायचे की मागे ते ठरवा, डार्विनच्या सिद्धांत नाकारण्यावरून काकोडकरांचा टोला

In reply to by अमितदादा

अमितदादा, डार्विन म्हणाला तो उत्क्रांतीचा वगैरे सिद्धांत नाहीच्चे मुळी. ते केवळ एक मत ( = ओपिनियन) आहे. काहीही कारण व/वा पुरावा नसतांना त्या मतास सिद्धांत म्हणून चढवले जात आहे. 'मानव व माकडाचा पूर्वज एक असू शकतो' हे विधान वैज्ञानिक सिद्धांत मानण्याच्या लायकीचं नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by अमितदादा

1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights. जगातील अनेक वैज्ञानिकांनी डार्विनचा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्यामुळे सत्यपाल सिंहांनी केलेलं विधान factually correct आहे. विज्ञानात अनेक नवीन सिद्धांत शोधले जातात, काही जुन्या सिद्धांतांना आव्हान देऊन ते अंशतः किंवा पूर्ण चुकीचे ठरविले जाऊ शकतात, काही जुन्या सिद्धांतात सुधारणा केली जाऊ शकते. त्यामुळे जो सिद्धांत वैज्ञानिकांनी अजून निर्विवाद मान्य केलेला नाही त्या सिद्धांतावर कोणी आक्षेप घेतला असेल तर त्यामुळे deeply pained होण्याची गरज नाही. इतका मेलोड्रामा करण्यापेक्षा, डार्विनचा सिद्धांत पूर्ण सत्य असून सत्यपाल सिंहांचे विधान चुकीचे आहे हे विज्ञानाच्या भाषेत सांगितले असते तर ते जास्त योग्य झाले असते. 2.Statements such as “humans did/did not evolve from monkeys” is an overly simplistic and misleading representation of evolution. असू शकेल. परंतु शालेय पुस्तकात डार्विनच्या सिद्धांताची माहिती देताना जे चित्र दाखविले जाते त्यात आधी एका माकडाचे चित्र दाखवून ते हळूहळू उत्क्रांत होऊन त्याचे माणसात रूपांतर झाले असे दाखविले जाते. त्यामुळे माकडापासून माणूस झाला असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबले गेल्यास आश्चर्य नाही. सत्यपाल सिंहांना दोष देण्यापेक्षा पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिद्धांत कशा प्रकारे शिकविला जातो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 3.When a minister working for human resource development in the country makes such claims, it harms the scientific community’s efforts to propagate scientific thoughts and rationality through critical education and modern scientific research. It also diminishes the image of the country at the global level and reduces faith of the international historical research community in the genuine research by the Indian researchers. आक्षेप घेणारा एखादा मंत्री असला तरी, एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आक्षेप घेतल्याने वैज्ञानिक संशोधनाची व विज्ञानाची हानी कशी होईल? आक्षेप घेणारा मंत्री उच्चविद्याविभूषित आहे. ते रसायनशास्त्रात एम.एस.सी व एम.फिल. असून वेगळ्या विषयात एमबीए व पीएचडी आहेत. त्यांना विज्ञानाची थोडीतरी पार्श्वभूमी आहे. जेव्हा जगातील इतर वैज्ञानिक सुद्धा हा सिद्धांत अजून जसाच्या तसा मान्य करीत नाहीत, तेव्हा एखाद्याने (तो मंत्री असला तरी) तसाच आक्षेप घेणे यामुळे विज्ञानाची हानी कशी होणार? इतर वैज्ञानिकांनी आक्षेप घेतले होते तेव्हा विज्ञानाची हानी झाली नव्हती का? या आक्षेपामुळे जगात भारताची प्रतिमा खालावेल हा दावा तर अत्यंत हास्यास्पद आहे. भारतीय वैज्ञानिकांकडून ही अपेक्षा नव्हती. ज्याप्रमाणे एका ठराविक वर्गाने पुरस्कार-परतीच्या मार्गाने आपले राजकीय हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न काही वैज्ञानिक करीत आहेत असा संशय येऊ लागला आहे. मागील वर्षी काही वैज्ञानिकांनी सरकारविरूद्ध मोर्चा वगैरे काढला होताच. आता ही पुढची पायरी दिसते. पुढे जायचे की मागे ते ठरवा, डार्विनच्या सिद्धांत नाकारण्यावरून काकोडकरांचा टोला एखाद्या वादग्रस्त, सर्वमान्य सिद्धांतावर आक्षेप घेण्यामुळे आपण मागे कसे जाणार? न्यूटनच्या काही प्रमेयांवर आइनस्टाईनने आक्षेप घेतले होते तेव्हा जग पुढे गेले होते का मागे? नंतर आईनस्टाईनच्या सिद्धांतावरही आक्षेप घेतले गेले तेव्हाही जग पुढे गेले का मागे? विज्ञान हे कायम प्रवाही असते. ते कायमच पुढे जात असते. पुढे जात असताना नवीन शोध लागणे व मागील शोधात सुधारणा करणे हे स्वाभाविक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

न्यूटन च्या सिद्धांताच्या त्रुटी आधीच माहित होत्या. त्या न सांगताच शालेय अभ्यासक्रमात तो शिकवला जातो (आजही, तेव्हाही शिकवला जात असणारच आहे) आईन्स्टाईन च्या सिद्धांताने या त्रुटींना सुद्धा सोडवून दाखवले. पण तो सिद्धांत कॉलेज ला शिकवतात. सिद्धांताचे सर्व डिटेल शालेय विद्यार्थी समजू शकतील असे नसतेच, तात्पर्य सोपा आणि बऱ्याचशा केसेस सोडवणारा सिद्धांत शिकवला जातो. कॉलेज मध्ये पूर्ण डिटेल सांगता येऊ शकतात. ====== सिंगांच्या बाबतीत त्यांनी आधीच माहित असणाऱ्या आक्षेपांचा आधारे डार्विन चा सिद्धांत चूक आहे सांगितलं आणि आईन्स्टाईन ने दिला तसा नवा सिद्धांत/थेरी देखील दिली नाहीये. त्यामुळे हे सर्व विज्ञानासाठी काय मदतीचं आहे असे वाटत नाही. ====== सिंगांनी डार्विनच्या सिद्धांतात त्रुटी आढळतात एवढे म्हणून सोडून दिले असते तरी चालले असते. आणि वैज्ञानिकांनी या स्टेटमेन्टला आक्षेप नोंदवून फाट्यावर मारले असते तरी चालले असते, उगाच पिळून काय साध्य होणार नाहीये.

In reply to by अमितदादा

प्रकाश जावडेकर याचं अभिनंदन आणि आभार... Darwin theory row: Union Minister Prakash Javadekar asks Satyapal Singh to refrain from ‘such comments’ “I have discussed the matter with my MoS and I have asked him to refrain from making such comments. We should not dilute science. This is the advice I have given him,” Javadekar was quoted as saying by PTI. “We are not going to fund any event or don’t have any plan for a national seminar to prove Darwin wrong. It is the domain of scientists and we should let them free to continue their efforts for progress of the country,” he added.

In reply to by अमितदादा

प्रकाश जावडेकरांचा आक्षेप नक्की कशाला आहे? विज्ञान पातळ केल्याबद्दल की सत्यपाल सिंगांचे उद्गार उचित नाहीत म्हणून? सिंगांच्या उद्गारांनी विज्ञान निश्चितंच पातळ झालेलं नाहीये. -गा.पै.

शिवसेना २०१९ च्या निवडणुका स्वतंत्रपणे भाजपशी युती न करता लढवणार अशी घोषणा आज पक्षातर्फे करण्यात आली. हे होणार हे माहितच होते. आज अधिकृत घोषणा करण्यात आली इतकेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

उद्धटरावांचा मूर्खपणा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. ते आज बरेच काही बरळले आहेत. म्हणे भाजपचे यश ही बाळासाहेबांची पुण्याई. म्हणजे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या पक्षाला अपयश आले आणि दुसर्‍याच पक्षाला यश आले. फेब्रुवारीत म्हणत होते की आम्ही राजीनामे खिशात ठेवले आहेत. ते राजीनामे केव्हाच भिजून सर्द झाले. नंतर म्हणाले की एप्रिलमध्ये भूकंप होईल. यांच्या भूकंपामुळे कणभरही थरथर झाली नाही. नंतर दसरा मेळाव्यात म्हणाले की आम्ही निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत. त्यानंतरही आता जवळपास पावणेचार महिने उलटले. अजून हे निर्णयाच्या जवळ पोहोचले नाहीत. आज म्हणतात की "सध्या चुकीची लोकं सत्तेत आली असून हे भेकड राज्यकर्ते आम्हाला मान्य नाहीत. ". मान्य नाहीत तर पडा ना सत्तेबाहेर. वाट कोणाची बघता. अत्यंत निर्लज्जासारखे सत्तेत बसून सत्तेचे सर्व फायदे उपभोगून जेवलेल्या ताटातच अजून किती दिवस विष्ठा करत राहणार? प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना नेते भाजपपुढे अत्यंत लाचार असून सत्तेसाठी अतिशय कासावीस झाले आहेत. त्यामुळे सर्व तर्‍हेच अपमान गिळून लाळघोटेपणा करीत सत्तेला चिकटून आहेत. २०१९ मध्ये भाजप आपल्याशी युती करणार नाही. भाजपने युती केली तरी भाजप त्यांना वाटेल तेवढ्याच जागा शिवसेनेला सोडेल. हे उद्धटरावांना माहित असल्याने आता स्वतःच बेटकुळी फुगवून स्वबळाचा नारा दिला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अंशतः सहमत. इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेचा विरोध आणि विरोधी पक्षीयांचा विरोध यात बराच फरक आहे. काही मुख्य मुद्दे - - शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे युती तोडून त्यांना नुकसान झालंय, जे त्यांना पचनी पडत नाही. सोबत असतेत तर कितीतरी जास्त जागा त्यांना घेता आल्या असत्या.. हे ते नुकसान. - सत्तेत राहूनही हवं ते खाते ना लोकसभेत मिळाले.. ना विधानसभेत. त्यामुळं राग असण्याचा भाग वेगळा, पण झालेली नाचक्की शिवसेनेच्या नेत्यांनाही झोंबणारी आहे. त्यामुळे सत्तेसाठीची लाचारी विशेष जाणवते. तिची झळ कमी व्हावी आणि लोकांत थोडी साख राखावी यासाठी हे विरोध करण्याचे नाटक. - राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी म्हणून शिवसेना सत्तेत राहिली हे पूर्ण सत्य नसले तरी त्यात थोडा तथ्यांश आहे. आता खरंच जर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत तर भाजपचा पारंपारिक मतदार नाराज होईल. हे भाजपलाही माहित आहे आणि शिवसेनेलाही. पण तरीही सत्तेत राहण्याचे, सत्तेच्या हव्यासाव्यतिरिक्त, आणखी दुसरं संयुक्तीक कारण काय असणार? - पुढील गणितं खेळतांना शेवटी स्वपक्षाची वाढ हा मुख्य मुद्दा प्रत्येकच राजकीय पक्षाचा मुख्य कार्यभाग असतो, पण अशा अर्धवट सत्तेमुळे फायदा विशेष नाही हे कळूनही ४ वर्षे घालवलीच ना.. शिवसेनेच्या कट्टर समर्थकालाही बचाव करतांना लाज वाटत असेल. कोणत्या तोंडानं मतं मागायला जायचं लोकांपुढे? जाता जाता: मुख्यमंत्रीसाहेबांनी "काही" बाबतीत गोंधळ ठेवून / माजवून ४ वर्षे सत्तेत काढली हे मात्र खरे. पुढचेही विशेष वेगळे असण्याचे काही कारण वाटत नाही.

In reply to by राघव

कदाचित २०१९ नंतर सत्तेत येणार नाही हे माहित असल्याने विद्यमान खासदार/ आमदार यांची सत्ता सोडण्याची तयारी नव्हती हि वस्तुस्थिती. त्यातून हटवादी पणा केला आणि सत्ता सोडली आणि फेर निवडणूक झाल्या तर हे लोक शिवसेना सोडून भाजप मध्ये जातील आणि तेथे निवडून येतील अशी (सार्थ) भीती वाटत असल्याने श्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका चालू ठेवली असावी. बाकी शरद पवारांशी हात मिळवणी केली तर जुन्या प्रकरणाचे चौकशीचे लचांड मागे लागेल या भेटीने शरद पवार आणि श्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांबरोबर जाणे टाळले असावे.