भावाचं लग्न झालेलं आहे.
-त्याला एक मुलगी आहे.
माझं लग्न झालेलं नाही.
गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही.
(मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?)
म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये. बाकी मी तिकडे भारतीय असूनही US मधे जाऊन तिथला प्रेजिडेंट जरी झालो तरी माझ्या या काकुच्या दृष्टीने 'लग्न होत नाही तोवर' माझ्या आयुष्याला अर्थ नाही. खेड्यात हे असंच असतं. तिच्या नवरयापेक्षा जास्त विश्वास असलेल्या बामनाच्या (व्हिच आल्सो हॅपंन्स टू बी द मोस्ट ट्रस्टवर्ती ब्राह्मण ऑफ़ अवर तालुका) म्हणण्यानुसार 'मला शांती आहे' म्हणून मुलगी पसंत पडत नाही.
काकुला कैक वेळा सांगून झालंय की असल्या फ़ालतू बामनांवर (शहरात राहतात ते ब्राम्हण, खेड्यात राहतात ते बामन) विश्वास नकोस ठेवत जाऊ. पैशे उकळायाचे धंदे करता हे साले फ़क्त. मुलगी पसंत पडणे न पडणे हे माझ्या हातात आहे. त्यात बामनाचा काय संबंध?
काकाच्याच् वळणावर गेल्यामुळे काकू आमचं काहीही ऐकत नाही. तिने माझी अर्ग्युमेंट तिथंच फुकुन टाकली.
मग प्रात्यक्षिक दाखवावं असं छाटूर-मुटुर ठरवून शेजारच्या गावातल्या त्या प्रसिद्ध बामणाकडे तिला नेलं. फ़क्त सोबत अन शांत रहा म्हटलं. पोचल्यावर बामनाला म्हणलं ही छोटी, माझी मुलगी आहे. सारखं आजारी पड़तेय. थोड़े दिवस दवाखान्यानं बरं वाटल्यासारखं होतं अन परत आजारी पड़ते. तर काही सांगा. अंगाने मी भावापेक्षा बरा धडधाकट असल्याने डाऊट येऊनही बामण फसला. माझ्याकडे नीट बघुन स्वत्: काहीतरी खुडबुड करून म्हणला. तुम्ही तिची शांती केलेली नाही. ते पोरीवर आलंय. सांगतो ते विधी करा. लगेच बरं वाटेल. सारखी आजारी नाही पडणार. मी म्हटलं. ठिकाय.
काका फी किती लागेल?
2000 दिले त्याला. बामण पैशे ठेवत होता. तोवर काकुचं आवाक झालेलं उघडं तोंड बंद करून घेतलं.
(म्हणजे हा बामण अजुन लग्न-लेकरं न झालेल्या पोराला सुद्धा त्याच्या पोरीचा दोष काढून देणार होता.)
परत बामनाला म्हटलं. काका. हा माझ्यापेक्षा वर्षाने लहान भाऊ आहे. 29 वयाचा. माझं लग्न होऊन मुलगीही झाली पण याचं अजुन लग्न जमत नाहिये. काकुनं तुम्हाला सांगितलं होतं ना पोरगीच पसंत करत नाही म्हणून, तोच हा. नौकरी-पैशे-घर-गाड़ी सगळं चांगलं आहे. पण लग्न जमत नाही. बामणाने माझ्या हाड़कुळया भावाकडे निरखुन बघितलं अन परत काहीतरी स्वतः खुडबुड करून म्हणला तुम्ही अजुन पितरांची शांती केलेली नाही. ती लवकर करावी लागेल. स्वभाव पण चिडचिडा झाला असेल. गुरु पण करून घ्या. नोवेंबरच्या आत लग्न जमेल. पुढच्या वर्षी लेकराचं पेढ़े घेऊन या.
परत मी काकुचं अवाक तोंड बंद केलं.
ऑलरेडी लग्न झालेल्या भावाने 'मुलगी-पसंत-करावी' म्हणून 1000 अन
माझ्या म्हणजे अजुन लग्न-न-झालेल्या पोराच्या मुलीचा दोष निघावा म्हणून 2000. दिले.
काकु कडं कुत्सीत बघत हसत माघारी फिरलो.
नंतर काकू ते 3000 परत घेऊन-ते-घेऊन वरुन अर्धा तास त्या बामनाबरोबर खमंग भांडत होती.
-----------------------------------------------------
तर आता खरा प्रश्न हा आहे की,
गळ्यात एखाद्या कंपनीचं आय-कार्ड बघुन किंवा हेल्थ इन्सुरेंस आहे का? -याची खात्री करून घेऊन मग अ-गरजेच्या भरमसाठ टेस्टस करायला लावून, दोन दिवसांचा डिस्चार्ज विनाकारण 4 दिवस लांबवून, अंगात निव्वळ पाणी भरणारे पोकळ सलाईन्स लावून-- मुबलक पैशे उकळणाऱ्या शहरातल्या मोठ-मोठ्या हॉस्पिटल-डॉक्टरांत,,
किंवा
अत्यंत दुर्गम आदिवासी खेड़ेगावातल्या- लिंबू उतरवून, अन चप्पल हुंगायला देऊन दोन शेर ज्वारीच्या बदल्यात- लागलेलं भुत काढून देणाऱ्या भोंदूबाबात,
किंवा
राखेतुन अंगठी काढणाऱ्या अन तेंडुलकर चिदंबरम सारखे भक्त असलेल्या सत्य साईबाबा, किंवा राधे माँ,
किंवा तो समोश्या बरोबर हिरवी चटनी खा म्हणणाऱ्या निर्मल बाबात, बलात्कारी महापुरुष आसाराम बाबात, रेपिस्ट स्वामी नित्यानंदात,
किंवा
असं धड खेडं-ना-शहर असलेल्या निम्न आधुनिक गावात --शांत्या सांगून गिरहईकाच्या दिसण्यानुसार पैशे उकळणाऱ्या बामनात ---
एकूण या सगळ्यांत ,एक शरीराचा फरक सोडला तर बाकी अजुन कोणता फरक आहे??????
लग्न जमत नाही, नौकरी लागत नाही, अन अशीच बरीच कारणे म्हणून अन आई-वडलांच्या दबावाखाली किंवा फ़क्त त्यांच्या खुशीसाठी म्हणून असल्या बामनांकड़े शांती करायला जाणाऱ्या मॉडर्न श्रावणबालांची, मला आमच्या ऑफिस बाहेरच्या खपाटलेल्या कुत्र्यापेक्षा जास्त दया येते.
---अर्थहीन...
प्रतिक्रिया
8 Sep 2015 - 3:01 pm | एस
अर्थपूर्ण लेख आहे! :-)
8 Sep 2015 - 4:34 pm | बॅटमॅन
मस्त श्लेष!
8 Sep 2015 - 3:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
लयीच खंग्री लिवलाय...
8 Sep 2015 - 4:17 pm | द-बाहुबली
सणसणीत चपराक दिली आहे.
8 Sep 2015 - 4:28 pm | अविनाश पांढरकर
चपराक __/\__
8 Sep 2015 - 4:31 pm | हेमंत लाटकर
ब्राम्हणांचा पोरोहित्य (काही) हा व्यवसाय आहे. ते हेच सांगणार शांती करा, नारायण नागबळी करा. एखाद्या डाॅक्टरकडे गेल्यास डाॅक्टर सुद्धा अनावश्यक तपासण्या करण्यास सांगतात. मग पोरोहित्यांनी करायला सांगितले की पैसे उकळतात म्हणून कोकलायच. मग बाकीच्या व्यवसायिकांनी पैसे उकळले की तोंड बंद. एवढे इंजिनियर होऊन ब्राम्हण न म्हणता बामण म्हणता.
8 Sep 2015 - 5:02 pm | अर्थहीन
लेख पूर्ण वाचलात का?
वाचला असाल तर -
मी काही डॉक्टर चांगले असतात असं लिहिला आहे का?
अन कुठल्याही खेड्यात जा--
कुठे चालला तर बाम्नाकडेच म्हणतात...
कोणाला दुखवायचा हेतू नाही माझा.. लेख अस्सल वाटावा म्हणून अस्सल शब्द वापरले फक्त...
तरीही तुमचा आदर आहे ... माफी मागतो...
9 Sep 2015 - 9:42 am | अनिरुद्ध.वैद्य
कसा रे इंजिनिअर तू ... बग लॉक व्हायच्या आधीच रूट कॉज देऊन मोकळा ;)
8 Sep 2015 - 4:50 pm | भुमन्यु
तुमचं नाव आणि लेखाचं शिर्षक समानार्थी शब्द आहेत काय?
8 Sep 2015 - 5:04 pm | अर्थहीन
थोडं स्पष्ट सांगता का..?? अडाणी आहे मी... असा shortcut समजत नाही दादा...
9 Sep 2015 - 12:27 pm | भुमन्यु
विनोद केला हो
लग्न = अर्थहीन
8 Sep 2015 - 5:00 pm | नाखु
"शांती" केली!
लेख भन्नाट !
8 Sep 2015 - 5:17 pm | राजाभाउ
आता बामणाला फसवलं म्हणून पितरं आणि खवलणार आता शांती करायलाच लागणार
9 Sep 2015 - 9:44 am | अनिरुद्ध.वैद्य
चांगला कालसर्प सोडाय सांगतो कुंडलीवाल्याले ...
8 Sep 2015 - 5:33 pm | मम्बाजी सर्वज्ञ
चला. रवंथ करायला नवीन भारा मिळाला.
8 Sep 2015 - 5:44 pm | सिरुसेरि
"म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीय" --- म्हणजे मुलगीला तुम्ही पसंत आहात ना .
8 Sep 2015 - 5:46 pm | अर्थहीन
ते महिति नाहि... :-)
9 Sep 2015 - 9:44 am | अनिरुद्ध.वैद्य
तुमी पुण्यात राहता का हो?
8 Sep 2015 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
समोश्या बरोबर हिरवी चटनी खा म्हणणाऱ्या निर्मल बाबात
असं पण सांगतात बाबालोक ?! मज्जाय =))
बस, उल्लू बनानेवाला चाहीये, उल्लू बननेके लिए बहोत बैठे है लाईन लगाके ।
8 Sep 2015 - 7:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आधी बामन, बामण, ब्राम्हण का ब्राह्मण त्याविषयी वाचन वाढवा/ अभ्यास वाढवा. त्यानंतर जातीचा उल्लेख करायचा विचार करा. साधं लिहिता येतं नाही आणि बोलता येतं नाही आणि लोकांनी ** बनवलं म्हणुन बोंबलायचं.
8 Sep 2015 - 7:07 pm | प्यारे१
प्यारे ला प्यार्या, प्यारेलाल किंवा प्यारे काका म्हटल्यानं प्यारेची ओळख बदलते? त्याचं काम बदलतं?
8 Sep 2015 - 7:11 pm | सूड
तसं नसतं तर प्यारे काकाचा प्यारे१>>प्रशांत आवले>>प्यारे१ असा प्रवास घडला नसता..
8 Sep 2015 - 7:12 pm | प्यारे१
हे आणखी नाव जोडा. हरकत नाही.
मुद्दा महत्त्वाचा.
8 Sep 2015 - 7:14 pm | सूड
आणि आठवत नसेल तर सांगतो...आडनावात ल चा ळ झाला तेव्हा तुम्हीच थांबवून ळ नाही ल असं म्हणाला होतात.
8 Sep 2015 - 7:21 pm | प्यारे१
अजूनही म्हणतो.
पण त्याचा अर्थ तुला साधं लिहीता येत नाही आणि मला अक्कल शिकवतो का असा नाही होत.
8 Sep 2015 - 7:25 pm | सूड
मान्य, पण स्वत:च्या गोष्टींबाबतीत इतक्या जागरुक असणार्या आयडीने हे असं म्हणणं हास्यास्पद वाटलं इतकंच!! बाकी चालू देत.
8 Sep 2015 - 7:28 pm | प्यारे१
मुद्दा प्यारे की प्यार्या हा नव्हता रे. त्यानंतरचा होता. असो!
8 Sep 2015 - 7:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्या आपल्यामधे वाद नकोत. त्या ऐवजी असलं गरळ ओकणार्या आयडीला सरळ करणं जास्तं महत्त्वाचं आहे.
8 Sep 2015 - 7:45 pm | प्यारे१
रॉजर दॅट!
8 Sep 2015 - 7:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पण ह्याचा अर्थ असा नाही ना की कोणीही यावं आणि टपली मारुन जावं?
8 Sep 2015 - 7:18 pm | प्यारे१
समोरच्या व्यक्तीच्या अपरिहार्यतेचा, नाडलेपणाचा, श्रद्धेचा, मस्तीचा किंवा अगदी किड्याचा वापर केला जातोय आणि त्याला तोडगा दिला जातो आहे किंवा लुटलं जात आहे हे मान्य करायला काय प्रत्यवाय?
अजिबात अनुकूलता नसताना परदेशी जाशील किंवा ऐकायला येत नसताना ऐकायला येईल म्हणून एका ब्राह्मणानं सांगितल्या गोष्टी चे अनुभव आहेत. बाकी इतर बाबतीत सुद्धा मान्य आहे पण म्हणून सरसकट सगळे चांगले असतात असं नाही नि सगळे वाईट असतात असंही नाही. असो!
8 Sep 2015 - 7:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
विरोध सरसकटीकरणाला आहे. त्या माणसाचं नावं घेउन लिहायचं होतं म्हणजे त्यांचे गाववाले शहाणे झाले असते की मग असल्या फसव्या माणसापासुन. ते केलं का? नाही. थेट वाकडं नावं कोणाला दिलयं? असो. वाद नाही घालणार. असं थेट बोललं की डो़क्यात जातं.
9 Sep 2015 - 9:36 am | प्रमोद देर्देकर
बरोबर आहे चिमण तुझं. शिवाय महोदय तो ब्राम्हण काही तुमच्या दारात नव्हता आला कि शांती करुन घ्घ्या असं सांगत. त्यामुळे असं सरसकटीकरण नको.
8 Sep 2015 - 7:14 pm | अनुप ढेरे
लेख आवडला.
बामण ब्राह्मण शब्दाशी खेळणार्यांना फाट्यावर मारा ही विनंती.
8 Sep 2015 - 10:01 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. योग्य ठिकाणी अवश्य भिडावे, जिथेतिथे नको.
(ब्राह्मण) बॅटमॅन.
8 Sep 2015 - 8:17 pm | सुबोध खरे
आय फोन ६ चा १६ GB चा फोन ३८ हजारात मिळतो.
तोच आय फोन ६ -- १२८ GB चा ५५ हजारात मिळतो.
आता बाकी सर्व अगदी तंतोतंत असताना ११२ GB साठी १७ हजार मोजतात
हेच १२८ GB चे कार्ड ४ हजारात मिळते. १३ हजार रुपये ११२ GB मेमरीसाठी सफरचंद वाल्याला लोक १२ तास रांगेत उभे राहून देतात.
याचा अर्थ काय
मी च्यु**** आहे. मला च्यु *** बनवा हे रांगेत उभे राहून सांगणारे लोक अमेरिकेतही आहेतच. म्हणजे काय?
दुनिया झुकती है
झुकानेवाला चाहिये.
त्याचा जाती धर्म किंवा व्यवसायाशी संबंध नाही.
8 Sep 2015 - 11:27 pm | अमित मुंबईचा
अहो आय फोन ची मेमरी वाढवता येत नाही.
9 Sep 2015 - 9:01 am | सुबोध खरे
ते मला माहित आहे.
हाच आय फोनचा हलकट पणा आहे. मेमरी कार्ड घालता न येणे म्हणजे झक मारत तुम्ही आय फोन १२८ GB घ्या ( आणी स्वतःला च्यु *** बनवून घ्या).दोन रुपयांची कोंबडी आणी ९८ रुपये मसाल्याचे.
9 Sep 2015 - 12:32 pm | वगिश
नाही हो, बाहेरच्या मेमरी कार्ड मुळे डाटा ट्रान्सफर वेळखाऊ होते, शिवाय ते कोणत्या प्रकारचे आहे यावर ही अनेक गोष्टी अवलंबून असतात. अंतर्गत मेमरी साठी खर्च थोडा जास्त आहे पण कामगिरी उत्तम असते.
9 Sep 2015 - 3:14 pm | मास्टरमाईन्ड
तांत्रिकदृष्ट्या
8 Sep 2015 - 11:30 pm | लिओ
३८ हजारात आय फोन ६ चा १६ GB चा फोन घेवुन त्याला ४ हजाराचे १२८ GB चे कार्ड बसवु शकत नाहि. एकतर मला माझ्या गरजा १६ GB मध्ये भागवाव्या लागतील अथवा चुपचाप आय फोन ६, १२८ GB चा ५५ हजार रुपये मोजुन घ्यावा लागेल.
टीप१):- आय फोन ६ ला मेम्री कार्डसाठी यु एस बी स्लॉट नाहि.
टीप२):- आय फोन ६ OTG cable ला सपोर्ट करत नाही.
9 Sep 2015 - 6:10 am | पिलीयन रायडर
एकंदरीतच शांती, पत्रिका टाईप गोष्टी मलाही पटत नाहीत. पण त्यासाठी ब्राह्मण हा जातीवाचक शब्द वापरुन लिहायची गरज नव्हती. टाळी दोन हाताने वाजते. तुमच्या काकुचा विश्वास होता म्हणुन त्या ब्राह्मणाकडे गेल्या. ब्राह्मणाला पण संसार असतो म्हणुन तो त्याचा पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणुन काहीबाही सांगत रहातो.
पोट प्रत्येकालाच असतं, म्हणुन आपापल्या धंद्यात काहीतरी जुगाड सगळेच करत असतात. आपणही आपल्या रेझ्युममध्ये फेकतो तेवढे दिव्य नसतो, पण नोकरी के लिये उतना करना पडता..
बामणाचं बी तसंच असतय.. लगेच त्यांना बायकांना फसवणारे (नादाला लावणारे), काळी जादु न भानामती करणारे मांत्रिक इ च्या लाईनत बसवल्यासारखं का बोलायचं? (तुम्ही तसं म्हणलत असं नाही.. पण सुर तसाच लाग्तो नंतर..)
हे आजकालचे ब्राहमण पुर्वीचे ब्राह्मण नाहीत जे अगदी अस्पृश्यता वगैरे मानत आणि इतरांची सावलीही अंगावर पडु देत नसत.. किंवा पिक्चर मध्ये दाखव्तात तसं डायरेक्ट लाथा वगैरे घालत असत..
लुटारू वगैरे काही नाही काका.. पापी पेट का सवाल है सिर्फ...
9 Sep 2015 - 9:05 am | नाखु
तो बामण च यांचे मागे मागे लागला होता की शांती करून घ्या म्हणून (विमा एजंटासारखा) सारखा घरीदारी अगदी धागलेखकाच्या अमेरिकावारीतही एअर्पोट्वर आला होता म्हणे.
काही लोक एका डॉ कडून गुण नाही आला तर दुसरा डॉ कडे जातात आणि समस्त डॉ जातीला श्या न घालता फक्त त्याच डॉचा उद्धार करतात जात पात न बघता ( यात डॉ च्या जागी प्लंबर्/बिल्डर्/शिंपी/इलेक्ट्रीशियन) काहीही टाकून पहा.
जाता जाता लोकसत्तामधले गुंतव्णूक सल्ला सदरातले एक वाक्य आहे विमा एजंट कधीही मुदतीचा विमा योजना विकत नाहीत (कारण फुटकळ कमीशन) पण मामुली विमा संरक्षण असलेली "मनी बॅक पोलिसी" मात्र गळ्यात मारतोच मारतो. (तोही मित्राचा मित्र्/नातेवाईक्/जवळचा स्नेही वगैरे असतो आणि तो होऊन तुम्हाला शोधत येतो.आणि आपण फसविलो गेलो याची आपल्याला कल्पना नसते/ करून घ्यायचीही नसते.
गंदा है पर धंदा है वाला अजिबात भटजी नसलेला नाखुस "बाम"ण
9 Sep 2015 - 8:47 am | कोमल
मस्त लेख आहे. आवडला.
मुख्य मुद्द्याला सोडून नको त्या गोष्टींवर वाद घालणार्यांना फाट्यावर मारा.
लोकांना उल्लू बनवायला कोणीही चालू शकतं बामन, मर्हाटा, शिंपी, पारधी. यात जातीचा संबंध येतोच कुठे? उल्लू बनवण्याची ट्रीक जमली पाहिजे झालं.
आता लेखात बामन उल्लेख आला म्हणुन धागाकर्त्यावर तुटुन पडायचं हे काय पटलं नाही.
हे म्हणजे माधुरीच्या "आजा नचले" गाण्यात, "मुझे देता उधारी हलवाई रे" या वाक्यामुळे वादंग निर्माण व्हावा आणि गाण्यातून "हलवाई" उल्लेख काढायला लागावा असं झालेलं दिसतंय.
असो.
पुलेशु
9 Sep 2015 - 9:57 am | अनिरुद्ध.वैद्य
कोमल,
फॉर यौअर इन्फोर्मेशन:
तेलीका तेल चा विवाद :
http://archive.indianexpress.com/news/dhan-te-nan-offensive-to-caste-so-...
बिल्लू बार्बरचा विवाद
http://in.reuters.com/article/2009/02/09/idINIndia-37919520090209
9 Sep 2015 - 12:14 pm | कोमल
मी काही त्यांनी केलेल्या विवादांना सपोर्ट करत आहे असं नाही.
माझा मुद्दा एवढाच आहे की कला आणि जातीचं राजकारण सेपरेट असायला हवं. दुर्दैवाने तसं भारतात नाहीये आणि मिपावर पण.
आणि त्यांनी तसं केलं म्हणून आम्हीही करणार असंच सूत्र असेल तर करा बापडे.
पण मला तरी या लेखात कोणत्याही जातीला मुद्दाम घालून पाडून बोलले आहे, शाब्दीक मुक्ताफळे वापरली आहेत असं वाटत नाही.
अवांतर : एकूणच काय, भारतातून कास्टीझम काढ्णे अशक्य आहे.
9 Sep 2015 - 12:40 pm | प्यारे१
कास्टीझम असं नुस्तं म्हणायचं नाही, झैरात करायची आपल्या लेखाची लिंक देऊन. मायबोलीवर टॅक्सी फिरवतात म्हणे.
9 Sep 2015 - 1:54 pm | कोमल
करणार होते ओ.. पण उगी जाउदे म्हटलं.. झैरात आपल फिल्ड नाय ना :)
9 Sep 2015 - 1:23 pm | अनिरुद्ध.वैद्य
जो सरसकटीकरण है उसकू विरोध! जोतिषी, भविष्यवालं म्हणा की … बामन काय? सगळे ब्राह्मण / बामन / बामण कुंडल्या मांडत लोकांची शांती करत फिरत असतात होय?
9 Sep 2015 - 3:19 pm | कोमल
मला अगदी हेच म्हणायचे होते.
http://www.misalpav.com/comment/740180#comment-740180
अनुप टंकायचे श्रम वाचवल्याबद्दल धन्स ओ..
9 Sep 2015 - 10:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
दुसरी जात आली असती तर अॅट्रोसिटी लागली असती की एव्हाना. असो. अर्थहिन साहेब असेचं नावाला शोभेलं असलिहाखाण करत र्हावा. धन्यवाद. तुमच्या एकुणचं लेखनावरचा शेवटचा प्रतिसाद.
9 Sep 2015 - 9:20 am | सुबोध खरे
आज काल ते वास्तू, फेंग शुई ई पण असेच आहे. आमच्या नात्यातील एक असाच महा सल्लागार लोकांना लाखांचा चुना लावून घर असे बदल तसे बदला असे सल्ले देतो पण त्याची स्वतःची मुलगी (एकुलती एक) एका टिनपाट पोराच्या मागे लागली आहे ( जो बारावी मध्ये नापास झाल्यावर गेली तीन वर्षे काहीच करीत नाही). त्याला विचारावेसे वाटले कि बाबा रे तुझ्या घरात पण असा वस्तू दोष आहे का कि शेंग फुई चे काही लफडे आहे एक आणी तसे असेल तर ते तू सुधारत का नाहीस?
अर्थात असे सल्ले देणे हा धंद्याचा भाग असावा.
पण लोकांच्या वर्मावर डाग देण्याची माझी वृत्ती नसल्यामुळे ते टाळले.
9 Sep 2015 - 3:18 pm | gogglya
नसेल ना या गोष्टीला ? [ ह. घ्या. ]
9 Sep 2015 - 11:20 am | वेल्लाभट
लेखाचे पहिले दोन परिच्छेद - पुटपुट
पुढचा काही भाग - कचकच
त्यापुढे काही भाग - फडाफड हान्लं
शेवटी ढिष्ष.... असं करून खाली पाडलं.
असं काय्तरी इमॅजिंग केलं मी.
बाकी सुसाट लिहीलंय... शब्दाशब्दाशी सहमत!
9 Sep 2015 - 11:34 am | हेमंत लाटकर
बाह्मण द्वेष लेख
9 Sep 2015 - 12:05 pm | वेल्लाभट
मला नाही बुवा वाटला...
9 Sep 2015 - 1:25 pm | अनिरुद्ध.वैद्य
शब्द चुकला …
9 Sep 2015 - 1:25 pm | मम्बाजी सर्वज्ञ
उद्देश ब्राम्हण द्वेष हा नसला तरी हा लेख 'ग्रे एरिया' मध्ये येतोच. कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणतात तसे दुसरी जात असती तर अॅट्रोसिटी लागली असती. दुसर्यांना काय वाटते म्हणून नाही पण स्वतःला त्रास होऊ नये म्हणून तर लेखणीवर (आणि पर्यायानी विचारांवर) थोडे नियंत्रण ठेवायला हरकत नाही.
9 Sep 2015 - 1:29 pm | प्यारे१
आता हे सगळं सुरु आहे म्हणून आमच्याकडं म्हटली जाणारी एक म्हण.....
सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा!
सोनार सोन्याच्या शुद्धतेत मारतो, शिंपी उरलेलं कापड मारतो आणि कुलकर्णी पूजा झाल्यावरचं खारीक खोबरं मारतो.
यात पुन्हा जातीपेक्षा शेंडया लावण्या ची वृत्ती च जास्त आहे.
शिंपी ला आम्ही टाकेमोडे/टाकाड पण म्हणतो.
- टाकाड प्यारे
9 Sep 2015 - 1:38 pm | अनिरुद्ध.वैद्य
आम्हास त गावाची कारकुनी करायचे सांगण्यात आले होते !!
9 Sep 2015 - 1:41 pm | प्यारे१
तसंही असेल. कदाचित मी चुकलो असेन.
कुलकर्णी म्हणजे गावातला मोठा असल्यानं त्याची संगत नको असंही असू शकतं.
9 Sep 2015 - 1:30 pm | अनुप ढेरे
लोक जेव्हा म्हणतात शिंप्याकडे कपडे शिवायला टाकलेत तेव्हा तो जातीवाचक उल्लेख असतो का व्यवसायवाचक? तो व्यवसायवाचक असतो.
या लेखात त्याच धर्तीवरचा उल्लेख आहे 'ब्राह्मण' या शब्दाचा. पुजा करणारा तो ब्राह्मण एवढाच अर्थ इथे येतो. आणि बामण हा शब्द म्हणायला सोपा म्हणून खूप लोक वापरतात. त्याच ऑफेंड होण्यासारखं काही वाटत नाही.
9 Sep 2015 - 2:31 pm | अर्थहीन
अनुप तुझ्या या प्रतिक्रियेनंतर मी कोणालाही कसलाही स्पष्टीकरण द्यायचे आवशक्यता राहिली नाही...
जे शब्द गावात सर्रस वापरले जातात ते सत्यता यावी म्हणून ओघाने लेखात आले तर त्यावर एवढा गवगावा व्हावा हे पाहून दुख झालं..
अजून एक
आपल्यात जात किती मुरलीय बघा.. या लेखातली माझी चीड डॉक्टर अन भोंदू बाबांवर्ही आहे.. पण त्यावर कोणी एक शब्द काढला नाही... जातीत मात्र दुर्दैवाने खूप इंटरेस्ट आहे...
वर्षानुवर्ष महार मांग म्हणून हीनवला गेला तिथं कोनिच्च नाही आला...
इथ तर वाईत intention ने शब्द वापरला नसून सुद्धा एवढी चर्चा??
म्हणजे लेखाचा मुल उदेश्च गायब...
Anyways ज्याला जे आरोप काराच्य्हे ते करोत... मला आता यात काही एक इंटरेस्ट नाही...
9 Sep 2015 - 3:58 pm | वेल्लाभट
इथे बंधन बँकेच्या नावावर जरा विनोद केला तर लोकांच्या ज्ञानाभिमानाचे बांध फुटतात.
हे असले अर्थ काढणारे असतातच. लक्ष नाही द्यायचं.
9 Sep 2015 - 2:48 pm | चैतन्यमय
लेख आवडला.
वाद घालणार्या बामनांना फाट्यावर मारा. ;) उगाच नको त्या गोष्टीचा वाद करण्यात काय अर्थ आहे.
9 Sep 2015 - 3:38 pm | नाखु
धाग्याचा अपेक्षीत (सुप्त+छुपा) उद्देश सफल आणि सुफल झाला असे सांगून मी माझे चार शब्द संपवीतो.
जाहीर आणि थेट बामण.
9 Sep 2015 - 3:58 pm | नन्दादीप
ब्राम्हण जातीचा उल्लेख केला म्हणून नव्हे तर त्याना शिविगाळ केली म्हणून....
बाकी तो पत्रिकेचा किस्सा.... ते काय तोंडावरून भविष्य सांगत नव्हते की तुमच तोंड बघून तुम्हाला तुमच नाव सांगत नव्हते.
तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारेच गणित मांडून त्यानी उपाय सांगितले असतील... ते उपाय योग्य की अयोग्य ते बाजूला ठेवू.
जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि सांगितलत माझ नाव **** आहे, आणी मला अमूक अमूक आजार आहे...तर डॉक्टरपण पेशंट म्हणून तुम्ही जे सांगाल तेच नाव लिहिणार..आणि सांगितलेल्या आजारावर उपचार करणार...
.
तसच आहे हे... उपाय खरेच होता की पोटभरूपणा हे तुम्हीच शोधा आता....
.
.
तरीपण जाता जाता एकच... लग्न करा हो.... म्हणजे हे असे जाहीररित्या जातीवरून तरी शिव्या घालायला वेळ मिळणार नाही तुम्हाला....
9 Sep 2015 - 5:18 pm | अर्थहीन
ओके
9 Sep 2015 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि सांगितलत माझ नाव **** आहे, आणी मला अमूक अमूक आजार आहे...तर डॉक्टरपण पेशंट म्हणून तुम्ही जे सांगाल तेच नाव लिहिणार..आणि सांगितलेल्या आजारावर उपचार करणार...
(वरच्या अक्षरांचा ठळकपणा माझा... माझी खालची टिप्पणी कशावर आहे ते कळण्यासाठी.)
असं नसतं ओ ! उदाहरण पार घसरले आहे... "रुग्णाने निदान सांगायचे आणि डॉक्टरने त्यानुसार उपचार करायचे" अशी पद्धत वापरणारा डॉक्टर आरोग्यास घोकादायक होईल... तो बदलणेच योग्य होईल ;)
त्याऐवजी, रुग्णाचे सर्व ऐकेल आणि रुग्णाची शारिरीक व आवश्यक असल्यास लॅब तपासणी करून स्वतः निदान करून उपचार करेल असा डॉक्टर निवडा.
बाकी चालू द्या.
9 Sep 2015 - 5:34 pm | मी-सौरभ
@अर्थहीन@: मी तुमचा राग समजू शकतो. आपली बाजू सिद्ध करण्यासाठी तुम्हि जे केलेत ती फसवणुक होती असं वाटत नाही का तुम्हाला?
तुम्हाला जो ऊपाय सांगितला गेला तो करायचा की नाही हे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच की त्यासाठी त्या व्यक्तीचा अपमान करायची काहीच गरज नाही.
तसेच तुम्ही जी ईतर उदाहरणे दिली आहेत; त्यात पण आपण शहाणे असलो की लोक आपल्याला काही बनवू शकत नाही हेही तेवढेच खरे आहे.
9 Sep 2015 - 5:57 pm | सिरुसेरि
त्या शब्दावरून जर एवढा वाद होत असेल तर , तो शब्द बदलून तेथे "ज्योतिषी" असा बदल करता येत असेल तर चांगलेच आहे . अंधश्रद्धा , ज्योतिष या गोष्टींचा विळखा तर केवळ गाव , खेडेगाव यांपुरता मर्यादित नसून शहरांमध्येही बरेचजण यांच्या आधिन आहेत .
9 Sep 2015 - 6:40 pm | हेमंत लाटकर
बाकी उदाहरणे दिली आहेत पण खरा रोख बाह्मणावरच आहे. कोणी काही सांगितले तरी करणे न करणे आपल्या हातात असते.
9 Sep 2015 - 9:55 pm | मांत्रिक
१. मी ब्राह्मण नाही.
२. यातील जातीवाचक तिरस्कार स्पष्ट दिसला.
३. कुणाला काही वाटो, तुम्हाला एखादा धार्मिक विधी करावयाचा असेल तर, ब्राह्मण पुरोहितालाच बोलवावे लागते.
४. जर तुम्हाला ब्राह्मण पुरोहित बोलवणे पसंत नाही तर तुम्ही स्वतः हे कर्मकांड शिकून घ्या, उत्तम प्रकारे करा, लोक तुमचा आदर करतीलच.
५. स्वतः प्रश्नाच्या मुळाशी न जाता फक्त जातीवाचक उद्गार काढणे म्हणजे हम भी नै करेंगे, दूसरो को भी नै करने देंगे! हा प्रकार आहे.
६. इथे काही ब्राह्मणांनीच या जातीवाचक लेखाला उत्तेजन दिलेले पाहून मी तर बुचकळ्यात पडलो.
७. आपणास अपेक्षित विधीकरीता ब्राह्मण बोलवणे ही एक सामान्य मानसिकता आहे. त्यात एवढी आदळआपट का?
८. तुम्ही शिकून घ्या वेद, उपनिषद, पुराणे, दुर्गा सप्तशती, तंत्र-मंत्र-यंत्र, आम्ही तुम्हाला बोलवू! येवढी चिरचिर का?
9 Sep 2015 - 10:10 pm | मांत्रिक
कमीत कमी या जातीने आपले वेद, उपनिषद, पुराणे मुखोद्गत करून आपणापर्यंत पोचवली याचे तरी आभार माना? का उगाच पाश्चात्य हळदीने पिवळे होऊन चिखलफेक करायची? अहो स्वार्थात प्रत्येकजण बरबटलेला आहे. आज स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली! सो काॅल्ड पुरोगाम्यांनी काय उजेड पाडला? अरे देवा! चिखलफेक नुसती!
10 Sep 2015 - 7:27 am | हेमंत लाटकर
काकुला कैक वेळा सांगून झालंय की असल्या फ़ालतू बामनांवर (शहरात राहतात ते ब्राम्हण, खेड्यात राहतात ते बामन) विश्वास नकोस ठेवत जाऊ. पैशे उकळायाचे धंदे करता हे साले.
अर्थहीन. धाग्यातून हा भाग काढून टाका.
10 Sep 2015 - 3:17 pm | नन्दादीप
+१