✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

--------अन----लग्न----------

अ
अर्थहीन यांनी
Tue, 09/08/2015 - 14:55  ·  लेख
लेख
भावाचं लग्न झालेलं आहे. -त्याला एक मुलगी आहे. माझं लग्न झालेलं नाही. गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही. (मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?) म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये. बाकी मी तिकडे भारतीय असूनही US मधे जाऊन तिथला प्रेजिडेंट जरी झालो तरी माझ्या या काकुच्या दृष्टीने 'लग्न होत नाही तोवर' माझ्या आयुष्याला अर्थ नाही. खेड्यात हे असंच असतं. तिच्या नवरयापेक्षा जास्त विश्वास असलेल्या बामनाच्या (व्हिच आल्सो हॅपंन्स टू बी द मोस्ट ट्रस्टवर्ती ब्राह्मण ऑफ़ अवर तालुका) म्हणण्यानुसार 'मला शांती आहे' म्हणून मुलगी पसंत पडत नाही. काकुला कैक वेळा सांगून झालंय की असल्या फ़ालतू बामनांवर (शहरात राहतात ते ब्राम्हण, खेड्यात राहतात ते बामन) विश्वास नकोस ठेवत जाऊ. पैशे उकळायाचे धंदे करता हे साले फ़क्त. मुलगी पसंत पडणे न पडणे हे माझ्या हातात आहे. त्यात बामनाचा काय संबंध? काकाच्याच् वळणावर गेल्यामुळे काकू आमचं काहीही ऐकत नाही. तिने माझी अर्ग्युमेंट तिथंच फुकुन टाकली. मग प्रात्यक्षिक दाखवावं असं छाटूर-मुटुर ठरवून शेजारच्या गावातल्या त्या प्रसिद्ध बामणाकडे तिला नेलं. फ़क्त सोबत अन शांत रहा म्हटलं. पोचल्यावर बामनाला म्हणलं ही छोटी, माझी मुलगी आहे. सारखं आजारी पड़तेय. थोड़े दिवस दवाखान्यानं बरं वाटल्यासारखं होतं अन परत आजारी पड़ते. तर काही सांगा. अंगाने मी भावापेक्षा बरा धडधाकट असल्याने डाऊट येऊनही बामण फसला. माझ्याकडे नीट बघुन स्वत्: काहीतरी खुडबुड करून म्हणला. तुम्ही तिची शांती केलेली नाही. ते पोरीवर आलंय. सांगतो ते विधी करा. लगेच बरं वाटेल. सारखी आजारी नाही पडणार. मी म्हटलं. ठिकाय. काका फी किती लागेल? 2000 दिले त्याला. बामण पैशे ठेवत होता. तोवर काकुचं आवाक झालेलं उघडं तोंड बंद करून घेतलं. (म्हणजे हा बामण अजुन लग्न-लेकरं न झालेल्या पोराला सुद्धा त्याच्या पोरीचा दोष काढून देणार होता.) परत बामनाला म्हटलं. काका. हा माझ्यापेक्षा वर्षाने लहान भाऊ आहे. 29 वयाचा. माझं लग्न होऊन मुलगीही झाली पण याचं अजुन लग्न जमत नाहिये. काकुनं तुम्हाला सांगितलं होतं ना पोरगीच पसंत करत नाही म्हणून, तोच हा. नौकरी-पैशे-घर-गाड़ी सगळं चांगलं आहे. पण लग्न जमत नाही. बामणाने माझ्या हाड़कुळया भावाकडे निरखुन बघितलं अन परत काहीतरी स्वतः खुडबुड करून म्हणला तुम्ही अजुन पितरांची शांती केलेली नाही. ती लवकर करावी लागेल. स्वभाव पण चिडचिडा झाला असेल. गुरु पण करून घ्या. नोवेंबरच्या आत लग्न जमेल. पुढच्या वर्षी लेकराचं पेढ़े घेऊन या. परत मी काकुचं अवाक तोंड बंद केलं. ऑलरेडी लग्न झालेल्या भावाने 'मुलगी-पसंत-करावी' म्हणून 1000 अन माझ्या म्हणजे अजुन लग्न-न-झालेल्या पोराच्या मुलीचा दोष निघावा म्हणून 2000. दिले. काकु कडं कुत्सीत बघत हसत माघारी फिरलो. नंतर काकू ते 3000 परत घेऊन-ते-घेऊन वरुन अर्धा तास त्या बामनाबरोबर खमंग भांडत होती. ----------------------------------------------------- तर आता खरा प्रश्न हा आहे की, गळ्यात एखाद्या कंपनीचं आय-कार्ड बघुन किंवा हेल्थ इन्सुरेंस आहे का? -याची खात्री करून घेऊन मग अ-गरजेच्या भरमसाठ टेस्टस करायला लावून, दोन दिवसांचा डिस्चार्ज विनाकारण 4 दिवस लांबवून, अंगात निव्वळ पाणी भरणारे पोकळ सलाईन्स लावून-- मुबलक पैशे उकळणाऱ्या शहरातल्या मोठ-मोठ्या हॉस्पिटल-डॉक्टरांत,, किंवा अत्यंत दुर्गम आदिवासी खेड़ेगावातल्या- लिंबू उतरवून, अन चप्पल हुंगायला देऊन दोन शेर ज्वारीच्या बदल्यात- लागलेलं भुत काढून देणाऱ्या भोंदूबाबात, किंवा राखेतुन अंगठी काढणाऱ्या अन तेंडुलकर चिदंबरम सारखे भक्त असलेल्या सत्य साईबाबा, किंवा राधे माँ, किंवा तो समोश्या बरोबर हिरवी चटनी खा म्हणणाऱ्या निर्मल बाबात, बलात्कारी महापुरुष आसाराम बाबात, रेपिस्ट स्वामी नित्यानंदात, किंवा असं धड खेडं-ना-शहर असलेल्या निम्न आधुनिक गावात --शांत्या सांगून गिरहईकाच्या दिसण्यानुसार पैशे उकळणाऱ्या बामनात --- एकूण या सगळ्यांत ,एक शरीराचा फरक सोडला तर बाकी अजुन कोणता फरक आहे?????? लग्न जमत नाही, नौकरी लागत नाही, अन अशीच बरीच कारणे म्हणून अन आई-वडलांच्या दबावाखाली किंवा फ़क्त त्यांच्या खुशीसाठी म्हणून असल्या बामनांकड़े शांती करायला जाणाऱ्या मॉडर्न श्रावणबालांची, मला आमच्या ऑफिस बाहेरच्या खपाटलेल्या कुत्र्यापेक्षा जास्त दया येते. ---अर्थहीन...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
12390 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

अर्थपूर्ण लेख आहे! :-)

एस
Tue, 09/08/2015 - 15:01 नवीन
अर्थपूर्ण लेख आहे! :-)
  • Log in or register to post comments

मस्त श्लेष!

बॅटमॅन
Tue, 09/08/2015 - 16:34 नवीन
मस्त श्लेष!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हम्म

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 09/08/2015 - 15:33 नवीन
लयीच खंग्री लिवलाय...
  • Log in or register to post comments

सणसणीत चपराक दिली आहे.

द-बाहुबली
Tue, 09/08/2015 - 16:17 नवीन
सणसणीत चपराक दिली आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!!

अविनाश पांढरकर
Tue, 09/08/2015 - 16:28 नवीन
चपराक __/\__
  • Log in or register to post comments

ब्राम्हणांचा पोरोहित्य (काही)

हेमंत लाटकर
Tue, 09/08/2015 - 16:31 नवीन
ब्राम्हणांचा पोरोहित्य (काही) हा व्यवसाय आहे. ते हेच सांगणार शांती करा, नारायण नागबळी करा. एखाद्या डाॅक्टरकडे गेल्यास डाॅक्टर सुद्धा अनावश्यक तपासण्या करण्यास सांगतात. मग पोरोहित्यांनी करायला सांगितले की पैसे उकळतात म्हणून कोकलायच. मग बाकीच्या व्यवसायिकांनी पैसे उकळले की तोंड बंद. एवढे इंजिनियर होऊन ब्राम्हण न म्हणता बामण म्हणता.
  • Log in or register to post comments

हेमंतजी

अर्थहीन
Tue, 09/08/2015 - 17:02 नवीन
लेख पूर्ण वाचलात का? वाचला असाल तर - मी काही डॉक्टर चांगले असतात असं लिहिला आहे का? अन कुठल्याही खेड्यात जा-- कुठे चालला तर बाम्नाकडेच म्हणतात... कोणाला दुखवायचा हेतू नाही माझा.. लेख अस्सल वाटावा म्हणून अस्सल शब्द वापरले फक्त... तरीही तुमचा आदर आहे ... माफी मागतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

असा

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 09:42 नवीन
कसा रे इंजिनिअर तू ... बग लॉक व्हायच्या आधीच रूट कॉज देऊन मोकळा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन

तुमचं नाव

भुमन्यु
Tue, 09/08/2015 - 16:50 नवीन
तुमचं नाव आणि लेखाचं शिर्षक समानार्थी शब्द आहेत काय?
  • Log in or register to post comments

थोडं

अर्थहीन
Tue, 09/08/2015 - 17:04 नवीन
थोडं स्पष्ट सांगता का..?? अडाणी आहे मी... असा shortcut समजत नाही दादा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु

विनोद केला हो

भुमन्यु
Wed, 09/09/2015 - 12:27 नवीन
विनोद केला हो लग्न = अर्थहीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन

शांतीचीच

नाखु
Tue, 09/08/2015 - 17:00 नवीन
"शांती" केली! लेख भन्नाट !
  • Log in or register to post comments

आता बामणाला फसवलं म्हणून

राजाभाउ
Tue, 09/08/2015 - 17:17 नवीन
आता बामणाला फसवलं म्हणून पितरं आणि खवलणार आता शांती करायलाच लागणार
  • Log in or register to post comments

बराबर!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 09:44 नवीन
चांगला कालसर्प सोडाय सांगतो कुंडलीवाल्याले ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

चर्वित चर्वण

मम्बाजी सर्वज्ञ
Tue, 09/08/2015 - 17:33 नवीन
चला. रवंथ करायला नवीन भारा मिळाला.
  • Log in or register to post comments

पसंत

सिरुसेरि
Tue, 09/08/2015 - 17:44 नवीन
"म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीय" --- म्हणजे मुलगीला तुम्ही पसंत आहात ना .
  • Log in or register to post comments

ते

अर्थहीन
Tue, 09/08/2015 - 17:46 नवीन
ते महिति नाहि... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

घ्या!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 09:44 नवीन
तुमी पुण्यात राहता का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन

समोश्या बरोबर हिरवी चटनी खा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/08/2015 - 17:55 नवीन
समोश्या बरोबर हिरवी चटनी खा म्हणणाऱ्या निर्मल बाबात असं पण सांगतात बाबालोक ?! मज्जाय =)) बस, उल्लू बनानेवाला चाहीये, उल्लू बननेके लिए बहोत बैठे है लाईन लगाके ।
  • Log in or register to post comments

आधी बामन, बामण, ब्राम्हण का

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/08/2015 - 19:00 नवीन
आधी बामन, बामण, ब्राम्हण का ब्राह्मण त्याविषयी वाचन वाढवा/ अभ्यास वाढवा. त्यानंतर जातीचा उल्लेख करायचा विचार करा. साधं लिहिता येतं नाही आणि बोलता येतं नाही आणि लोकांनी ** बनवलं म्हणुन बोंबलायचं.
  • Log in or register to post comments

प्यारे ला प्यार्‍या,

प्यारे१
Tue, 09/08/2015 - 19:07 नवीन
प्यारे ला प्यार्‍या, प्यारेलाल किंवा प्यारे काका म्हटल्यानं प्यारेची ओळख बदलते? त्याचं काम बदलतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तसं नसतं तर प्यारे काकाचा

सूड
Tue, 09/08/2015 - 19:11 नवीन
तसं नसतं तर प्यारे काकाचा प्यारे१>>प्रशांत आवले>>प्यारे१ असा प्रवास घडला नसता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हे आणखी नाव जोडा. हरकत नाही.

प्यारे१
Tue, 09/08/2015 - 19:12 नवीन
हे आणखी नाव जोडा. हरकत नाही. मुद्दा महत्त्वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आणि आठवत नसेल तर सांगतो..

सूड
Tue, 09/08/2015 - 19:14 नवीन
आणि आठवत नसेल तर सांगतो...आडनावात ल चा ळ झाला तेव्हा तुम्हीच थांबवून ळ नाही ल असं म्हणाला होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अजूनही म्हणतो.

प्यारे१
Tue, 09/08/2015 - 19:21 नवीन
अजूनही म्हणतो. पण त्याचा अर्थ तुला साधं लिहीता येत नाही आणि मला अक्कल शिकवतो का असा नाही होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पण त्याचा अर्थ तुला साधं

सूड
Tue, 09/08/2015 - 19:25 नवीन
पण त्याचा अर्थ तुला साधं लिहीता येत नाही आणि मला अक्कल शिकवतो का असा नाही होत.
मान्य, पण स्वत:च्या गोष्टींबाबतीत इतक्या जागरुक असणार्‍या आयडीने हे असं म्हणणं हास्यास्पद वाटलं इतकंच!! बाकी चालू देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मुद्दा प्यारे की प्यार्‍या हा

प्यारे१
Tue, 09/08/2015 - 19:28 नवीन
मुद्दा प्यारे की प्यार्‍या हा नव्हता रे. त्यानंतरचा होता. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आपल्या आपल्यामधे वाद नकोत.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/08/2015 - 19:29 नवीन
आपल्या आपल्यामधे वाद नकोत. त्या ऐवजी असलं गरळ ओकणार्‍या आयडीला सरळ करणं जास्तं महत्त्वाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रॉजर दॅट!

प्यारे१
Tue, 09/08/2015 - 19:45 नवीन
रॉजर दॅट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पण ह्याचा अर्थ असा नाही ना की

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/08/2015 - 19:11 नवीन
पण ह्याचा अर्थ असा नाही ना की कोणीही यावं आणि टपली मारुन जावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

समोरच्या व्यक्तीच्या

प्यारे१
Tue, 09/08/2015 - 19:18 नवीन
समोरच्या व्यक्तीच्या अपरिहार्यतेचा, नाडलेपणाचा, श्रद्धेचा, मस्तीचा किंवा अगदी किड्याचा वापर केला जातोय आणि त्याला तोडगा दिला जातो आहे किंवा लुटलं जात आहे हे मान्य करायला काय प्रत्यवाय? अजिबात अनुकूलता नसताना परदेशी जाशील किंवा ऐकायला येत नसताना ऐकायला येईल म्हणून एका ब्राह्मणानं सांगितल्या गोष्टी चे अनुभव आहेत. बाकी इतर बाबतीत सुद्धा मान्य आहे पण म्हणून सरसकट सगळे चांगले असतात असं नाही नि सगळे वाईट असतात असंही नाही. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

विरोध सरसकटीकरणाला आहे. त्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/08/2015 - 19:23 नवीन
विरोध सरसकटीकरणाला आहे. त्या माणसाचं नावं घेउन लिहायचं होतं म्हणजे त्यांचे गाववाले शहाणे झाले असते की मग असल्या फसव्या माणसापासुन. ते केलं का? नाही. थेट वाकडं नावं कोणाला दिलयं? असो. वाद नाही घालणार. असं थेट बोललं की डो़क्यात जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बरोबर आहे चिमण तुझं. शिवाय

प्रमोद देर्देकर
Wed, 09/09/2015 - 09:36 नवीन
बरोबर आहे चिमण तुझं. शिवाय महोदय तो ब्राम्हण काही तुमच्या दारात नव्हता आला कि शांती करुन घ्घ्या असं सांगत. त्यामुळे असं सरसकटीकरण नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख आवडला.

अनुप ढेरे
Tue, 09/08/2015 - 19:14 नवीन
लेख आवडला. बामण ब्राह्मण शब्दाशी खेळणार्‍यांना फाट्यावर मारा ही विनंती.
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
Tue, 09/08/2015 - 22:01 नवीन
असेच म्हणतो. योग्य ठिकाणी अवश्य भिडावे, जिथेतिथे नको. (ब्राह्मण) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

आय फोन ६ चा १६ GB चा फोन ३८

सुबोध खरे
Tue, 09/08/2015 - 20:17 नवीन
आय फोन ६ चा १६ GB चा फोन ३८ हजारात मिळतो. तोच आय फोन ६ -- १२८ GB चा ५५ हजारात मिळतो. आता बाकी सर्व अगदी तंतोतंत असताना ११२ GB साठी १७ हजार मोजतात हेच १२८ GB चे कार्ड ४ हजारात मिळते. १३ हजार रुपये ११२ GB मेमरीसाठी सफरचंद वाल्याला लोक १२ तास रांगेत उभे राहून देतात. याचा अर्थ काय मी च्यु**** आहे. मला च्यु *** बनवा हे रांगेत उभे राहून सांगणारे लोक अमेरिकेतही आहेतच. म्हणजे काय? दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये. त्याचा जाती धर्म किंवा व्यवसायाशी संबंध नाही.
  • Log in or register to post comments

चुकीची माहिती

अमित मुंबईचा
Tue, 09/08/2015 - 23:27 नवीन
अहो आय फोन ची मेमरी वाढवता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते मला माहित आहे.

सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 09:01 नवीन
ते मला माहित आहे. हाच आय फोनचा हलकट पणा आहे. मेमरी कार्ड घालता न येणे म्हणजे झक मारत तुम्ही आय फोन १२८ GB घ्या ( आणी स्वतःला च्यु *** बनवून घ्या).दोन रुपयांची कोंबडी आणी ९८ रुपये मसाल्याचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित मुंबईचा

नाही हो, बाहेरच्या मेमरी

वगिश
Wed, 09/09/2015 - 12:32 नवीन
नाही हो, बाहेरच्या मेमरी कार्ड मुळे डाटा ट्रान्सफर वेळखाऊ होते, शिवाय ते कोणत्या प्रकारचे आहे यावर ही अनेक गोष्टी अवलंबून असतात. अंतर्गत मेमरी साठी खर्च थोडा जास्त आहे पण कामगिरी उत्तम असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे बरोबरंय

मास्टरमाईन्ड
Wed, 09/09/2015 - 15:14 नवीन
तांत्रिकदृष्ट्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश

३८ हजारात आय फोन ६ चा १६ GB

लिओ
Tue, 09/08/2015 - 23:30 नवीन
३८ हजारात आय फोन ६ चा १६ GB चा फोन घेवुन त्याला ४ हजाराचे १२८ GB चे कार्ड बसवु शकत नाहि. एकतर मला माझ्या गरजा १६ GB मध्ये भागवाव्या लागतील अथवा चुपचाप आय फोन ६, १२८ GB चा ५५ हजार रुपये मोजुन घ्यावा लागेल. टीप१):- आय फोन ६ ला मेम्री कार्डसाठी यु एस बी स्लॉट नाहि. टीप२):- आय फोन ६ OTG cable ला सपोर्ट करत नाही.
  • Log in or register to post comments

एकंदरीतच शांती, पत्रिका टाईप

पिलीयन रायडर
Wed, 09/09/2015 - 06:10 नवीन
एकंदरीतच शांती, पत्रिका टाईप गोष्टी मलाही पटत नाहीत. पण त्यासाठी ब्राह्मण हा जातीवाचक शब्द वापरुन लिहायची गरज नव्हती. टाळी दोन हाताने वाजते. तुमच्या काकुचा विश्वास होता म्हणुन त्या ब्राह्मणाकडे गेल्या. ब्राह्मणाला पण संसार असतो म्हणुन तो त्याचा पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणुन काहीबाही सांगत रहातो. पोट प्रत्येकालाच असतं, म्हणुन आपापल्या धंद्यात काहीतरी जुगाड सगळेच करत असतात. आपणही आपल्या रेझ्युममध्ये फेकतो तेवढे दिव्य नसतो, पण नोकरी के लिये उतना करना पडता.. बामणाचं बी तसंच असतय.. लगेच त्यांना बायकांना फसवणारे (नादाला लावणारे), काळी जादु न भानामती करणारे मांत्रिक इ च्या लाईनत बसवल्यासारखं का बोलायचं? (तुम्ही तसं म्हणलत असं नाही.. पण सुर तसाच लाग्तो नंतर..) हे आजकालचे ब्राहमण पुर्वीचे ब्राह्मण नाहीत जे अगदी अस्पृश्यता वगैरे मानत आणि इतरांची सावलीही अंगावर पडु देत नसत.. किंवा पिक्चर मध्ये दाखव्तात तसं डायरेक्ट लाथा वगैरे घालत असत.. लुटारू वगैरे काही नाही काका.. पापी पेट का सवाल है सिर्फ...
  • Log in or register to post comments

नाही हो

नाखु
Wed, 09/09/2015 - 09:05 नवीन
तो बामण च यांचे मागे मागे लागला होता की शांती करून घ्या म्हणून (विमा एजंटासारखा) सारखा घरीदारी अगदी धागलेखकाच्या अमेरिकावारीतही एअर्पोट्वर आला होता म्हणे. काही लोक एका डॉ कडून गुण नाही आला तर दुसरा डॉ कडे जातात आणि समस्त डॉ जातीला श्या न घालता फक्त त्याच डॉचा उद्धार करतात जात पात न बघता ( यात डॉ च्या जागी प्लंबर्/बिल्डर्/शिंपी/इलेक्ट्रीशियन) काहीही टाकून पहा. जाता जाता लोकसत्तामधले गुंतव्णूक सल्ला सदरातले एक वाक्य आहे विमा एजंट कधीही मुदतीचा विमा योजना विकत नाहीत (कारण फुटकळ कमीशन) पण मामुली विमा संरक्षण असलेली "मनी बॅक पोलिसी" मात्र गळ्यात मारतोच मारतो. (तोही मित्राचा मित्र्/नातेवाईक्/जवळचा स्नेही वगैरे असतो आणि तो होऊन तुम्हाला शोधत येतो.आणि आपण फसविलो गेलो याची आपल्याला कल्पना नसते/ करून घ्यायचीही नसते.

तो ही धंदा आहे आणि "बामणाचाही " धंदा आहे

गंदा है पर धंदा है वाला अजिबात भटजी नसलेला नाखुस "बाम"ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मस्त लेख आहे. आवडला.

कोमल
Wed, 09/09/2015 - 08:47 नवीन
मस्त लेख आहे. आवडला. मुख्य मुद्द्याला सोडून नको त्या गोष्टींवर वाद घालणार्‍यांना फाट्यावर मारा. लोकांना उल्लू बनवायला कोणीही चालू शकतं बामन, मर्‍हाटा, शिंपी, पारधी. यात जातीचा संबंध येतोच कुठे? उल्लू बनवण्याची ट्रीक जमली पाहिजे झालं. आता लेखात बामन उल्लेख आला म्हणुन धागाकर्त्यावर तुटुन पडायचं हे काय पटलं नाही. हे म्हणजे माधुरीच्या "आजा नचले" गाण्यात, "मुझे देता उधारी हलवाई रे" या वाक्यामुळे वादंग निर्माण व्हावा आणि गाण्यातून "हलवाई" उल्लेख काढायला लागावा असं झालेलं दिसतंय. असो. पुलेशु
  • Log in or register to post comments

आयला हो?

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 09:57 नवीन
कोमल, फॉर यौअर इन्फोर्मेशन: तेलीका तेल चा विवाद : http://archive.indianexpress.com/news/dhan-te-nan-offensive-to-caste-so-lyrics-of-kaminey-hit-changed/518139/ बिल्लू बार्बरचा विवाद http://in.reuters.com/article/2009/02/09/idINIndia-37919520090209
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

तुम्ही चुकीचा पॉईंट पकडलाय

कोमल
Wed, 09/09/2015 - 12:14 नवीन
मी काही त्यांनी केलेल्या विवादांना सपोर्ट करत आहे असं नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की कला आणि जातीचं राजकारण सेपरेट असायला हवं. दुर्दैवाने तसं भारतात नाहीये आणि मिपावर पण. आणि त्यांनी तसं केलं म्हणून आम्हीही करणार असंच सूत्र असेल तर करा बापडे. पण मला तरी या लेखात कोणत्याही जातीला मुद्दाम घालून पाडून बोलले आहे, शाब्दीक मुक्ताफळे वापरली आहेत असं वाटत नाही. अवांतर : एकूणच काय, भारतातून कास्टीझम काढ्णे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

कास्टीझम असं नुस्तं म्हणायचं

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 12:40 नवीन
कास्टीझम असं नुस्तं म्हणायचं नाही, झैरात करायची आपल्या लेखाची लिंक देऊन. मायबोलीवर टॅक्सी फिरवतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

करणार होते ओ.. पण उगी जाउदे

कोमल
Wed, 09/09/2015 - 13:54 नवीन
करणार होते ओ.. पण उगी जाउदे म्हटलं.. झैरात आपल फिल्ड नाय ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जातीच राजकारण नैये हो …

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 13:23 नवीन
जो सरसकटीकरण है उसकू विरोध! जोतिषी, भविष्यवालं म्हणा की … बामन काय? सगळे ब्राह्मण / बामन / बामण कुंडल्या मांडत लोकांची शांती करत फिरत असतात होय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

मला अगदी हेच म्हणायचे होते

कोमल
Wed, 09/09/2015 - 15:19 नवीन
मला अगदी हेच म्हणायचे होते. http://www.misalpav.com/comment/740180#comment-740180 अनुप टंकायचे श्रम वाचवल्याबद्दल धन्स ओ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा