Skip to main content

--------अन----लग्न----------

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 08/09/2015 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
भावाचं लग्न झालेलं आहे. -त्याला एक मुलगी आहे. माझं लग्न झालेलं नाही. गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही. (मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?) म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये. बाकी मी तिकडे भारतीय असूनही US मधे जाऊन तिथला प्रेजिडेंट जरी झालो तरी माझ्या या काकुच्या दृष्टीने 'लग्न होत नाही तोवर' माझ्या आयुष्याला अर्थ नाही. खेड्यात हे असंच असतं. तिच्या नवरयापेक्षा जास्त विश्वास असलेल्या बामनाच्या (व्हिच आल्सो हॅपंन्स टू बी द मोस्ट ट्रस्टवर्ती ब्राह्मण ऑफ़ अवर तालुका) म्हणण्यानुसार 'मला शांती आहे' म्हणून मुलगी पसंत पडत नाही. काकुला कैक वेळा सांगून झालंय की असल्या फ़ालतू बामनांवर (शहरात राहतात ते ब्राम्हण, खेड्यात राहतात ते बामन) विश्वास नकोस ठेवत जाऊ. पैशे उकळायाचे धंदे करता हे साले फ़क्त. मुलगी पसंत पडणे न पडणे हे माझ्या हातात आहे. त्यात बामनाचा काय संबंध? काकाच्याच् वळणावर गेल्यामुळे काकू आमचं काहीही ऐकत नाही. तिने माझी अर्ग्युमेंट तिथंच फुकुन टाकली. मग प्रात्यक्षिक दाखवावं असं छाटूर-मुटुर ठरवून शेजारच्या गावातल्या त्या प्रसिद्ध बामणाकडे तिला नेलं. फ़क्त सोबत अन शांत रहा म्हटलं. पोचल्यावर बामनाला म्हणलं ही छोटी, माझी मुलगी आहे. सारखं आजारी पड़तेय. थोड़े दिवस दवाखान्यानं बरं वाटल्यासारखं होतं अन परत आजारी पड़ते. तर काही सांगा. अंगाने मी भावापेक्षा बरा धडधाकट असल्याने डाऊट येऊनही बामण फसला. माझ्याकडे नीट बघुन स्वत्: काहीतरी खुडबुड करून म्हणला. तुम्ही तिची शांती केलेली नाही. ते पोरीवर आलंय. सांगतो ते विधी करा. लगेच बरं वाटेल. सारखी आजारी नाही पडणार. मी म्हटलं. ठिकाय. काका फी किती लागेल? 2000 दिले त्याला. बामण पैशे ठेवत होता. तोवर काकुचं आवाक झालेलं उघडं तोंड बंद करून घेतलं. (म्हणजे हा बामण अजुन लग्न-लेकरं न झालेल्या पोराला सुद्धा त्याच्या पोरीचा दोष काढून देणार होता.) परत बामनाला म्हटलं. काका. हा माझ्यापेक्षा वर्षाने लहान भाऊ आहे. 29 वयाचा. माझं लग्न होऊन मुलगीही झाली पण याचं अजुन लग्न जमत नाहिये. काकुनं तुम्हाला सांगितलं होतं ना पोरगीच पसंत करत नाही म्हणून, तोच हा. नौकरी-पैशे-घर-गाड़ी सगळं चांगलं आहे. पण लग्न जमत नाही. बामणाने माझ्या हाड़कुळया भावाकडे निरखुन बघितलं अन परत काहीतरी स्वतः खुडबुड करून म्हणला तुम्ही अजुन पितरांची शांती केलेली नाही. ती लवकर करावी लागेल. स्वभाव पण चिडचिडा झाला असेल. गुरु पण करून घ्या. नोवेंबरच्या आत लग्न जमेल. पुढच्या वर्षी लेकराचं पेढ़े घेऊन या. परत मी काकुचं अवाक तोंड बंद केलं. ऑलरेडी लग्न झालेल्या भावाने 'मुलगी-पसंत-करावी' म्हणून 1000 अन माझ्या म्हणजे अजुन लग्न-न-झालेल्या पोराच्या मुलीचा दोष निघावा म्हणून 2000. दिले. काकु कडं कुत्सीत बघत हसत माघारी फिरलो. नंतर काकू ते 3000 परत घेऊन-ते-घेऊन वरुन अर्धा तास त्या बामनाबरोबर खमंग भांडत होती. ----------------------------------------------------- तर आता खरा प्रश्न हा आहे की, गळ्यात एखाद्या कंपनीचं आय-कार्ड बघुन किंवा हेल्थ इन्सुरेंस आहे का? -याची खात्री करून घेऊन मग अ-गरजेच्या भरमसाठ टेस्टस करायला लावून, दोन दिवसांचा डिस्चार्ज विनाकारण 4 दिवस लांबवून, अंगात निव्वळ पाणी भरणारे पोकळ सलाईन्स लावून-- मुबलक पैशे उकळणाऱ्या शहरातल्या मोठ-मोठ्या हॉस्पिटल-डॉक्टरांत,, किंवा अत्यंत दुर्गम आदिवासी खेड़ेगावातल्या- लिंबू उतरवून, अन चप्पल हुंगायला देऊन दोन शेर ज्वारीच्या बदल्यात- लागलेलं भुत काढून देणाऱ्या भोंदूबाबात, किंवा राखेतुन अंगठी काढणाऱ्या अन तेंडुलकर चिदंबरम सारखे भक्त असलेल्या सत्य साईबाबा, किंवा राधे माँ, किंवा तो समोश्या बरोबर हिरवी चटनी खा म्हणणाऱ्या निर्मल बाबात, बलात्कारी महापुरुष आसाराम बाबात, रेपिस्ट स्वामी नित्यानंदात, किंवा असं धड खेडं-ना-शहर असलेल्या निम्न आधुनिक गावात --शांत्या सांगून गिरहईकाच्या दिसण्यानुसार पैशे उकळणाऱ्या बामनात --- एकूण या सगळ्यांत ,एक शरीराचा फरक सोडला तर बाकी अजुन कोणता फरक आहे?????? लग्न जमत नाही, नौकरी लागत नाही, अन अशीच बरीच कारणे म्हणून अन आई-वडलांच्या दबावाखाली किंवा फ़क्त त्यांच्या खुशीसाठी म्हणून असल्या बामनांकड़े शांती करायला जाणाऱ्या मॉडर्न श्रावणबालांची, मला आमच्या ऑफिस बाहेरच्या खपाटलेल्या कुत्र्यापेक्षा जास्त दया येते. ---अर्थहीन...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12433
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

त्या शब्दावरून जर एवढा वाद होत असेल तर , तो शब्द बदलून तेथे "ज्योतिषी" असा बदल करता येत असेल तर चांगलेच आहे . अंधश्रद्धा , ज्योतिष या गोष्टींचा विळखा तर केवळ गाव , खेडेगाव यांपुरता मर्यादित नसून शहरांमध्येही बरेचजण यांच्या आधिन आहेत .

१. मी ब्राह्मण नाही. २. यातील जातीवाचक तिरस्कार स्पष्ट दिसला. ३. कुणाला काही वाटो, तुम्हाला एखादा धार्मिक विधी करावयाचा असेल तर, ब्राह्मण पुरोहितालाच बोलवावे लागते. ४. जर तुम्हाला ब्राह्मण पुरोहित बोलवणे पसंत नाही तर तुम्ही स्वतः हे कर्मकांड शिकून घ्या, उत्तम प्रकारे करा, लोक तुमचा आदर करतीलच. ५. स्वतः प्रश्नाच्या मुळाशी न जाता फक्त जातीवाचक उद्गार काढणे म्हणजे हम भी नै करेंगे, दूसरो को भी नै करने देंगे! हा प्रकार आहे. ६. इथे काही ब्राह्मणांनीच या जातीवाचक लेखाला उत्तेजन दिलेले पाहून मी तर बुचकळ्यात पडलो. ७. आपणास अपेक्षित विधीकरीता ब्राह्मण बोलवणे ही एक सामान्य मानसिकता आहे. त्यात एवढी आदळआपट का? ८. तुम्ही शिकून घ्या वेद, उपनिषद, पुराणे, दुर्गा सप्तशती, तंत्र-मंत्र-यंत्र, आम्ही तुम्हाला बोलवू! येवढी चिरचिर का?

In reply to by मांत्रिक

कमीत कमी या जातीने आपले वेद, उपनिषद, पुराणे मुखोद्गत करून आपणापर्यंत पोचवली याचे तरी आभार माना? का उगाच पाश्चात्य हळदीने पिवळे होऊन चिखलफेक करायची? अहो स्वार्थात प्रत्येकजण बरबटलेला आहे. आज स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली! सो काॅल्ड पुरोगाम्यांनी काय उजेड पाडला? अरे देवा! चिखलफेक नुसती!

काकुला कैक वेळा सांगून झालंय की असल्या फ़ालतू बामनांवर (शहरात राहतात ते ब्राम्हण, खेड्यात राहतात ते बामन) विश्वास नकोस ठेवत जाऊ. पैशे उकळायाचे धंदे करता हे साले. अर्थहीन. धाग्यातून हा भाग काढून टाका.