✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

--------अन----लग्न----------

अ
अर्थहीन यांनी
Tue, 09/08/2015 - 14:55  ·  लेख
लेख
भावाचं लग्न झालेलं आहे. -त्याला एक मुलगी आहे. माझं लग्न झालेलं नाही. गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही. (मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?) म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये. बाकी मी तिकडे भारतीय असूनही US मधे जाऊन तिथला प्रेजिडेंट जरी झालो तरी माझ्या या काकुच्या दृष्टीने 'लग्न होत नाही तोवर' माझ्या आयुष्याला अर्थ नाही. खेड्यात हे असंच असतं. तिच्या नवरयापेक्षा जास्त विश्वास असलेल्या बामनाच्या (व्हिच आल्सो हॅपंन्स टू बी द मोस्ट ट्रस्टवर्ती ब्राह्मण ऑफ़ अवर तालुका) म्हणण्यानुसार 'मला शांती आहे' म्हणून मुलगी पसंत पडत नाही. काकुला कैक वेळा सांगून झालंय की असल्या फ़ालतू बामनांवर (शहरात राहतात ते ब्राम्हण, खेड्यात राहतात ते बामन) विश्वास नकोस ठेवत जाऊ. पैशे उकळायाचे धंदे करता हे साले फ़क्त. मुलगी पसंत पडणे न पडणे हे माझ्या हातात आहे. त्यात बामनाचा काय संबंध? काकाच्याच् वळणावर गेल्यामुळे काकू आमचं काहीही ऐकत नाही. तिने माझी अर्ग्युमेंट तिथंच फुकुन टाकली. मग प्रात्यक्षिक दाखवावं असं छाटूर-मुटुर ठरवून शेजारच्या गावातल्या त्या प्रसिद्ध बामणाकडे तिला नेलं. फ़क्त सोबत अन शांत रहा म्हटलं. पोचल्यावर बामनाला म्हणलं ही छोटी, माझी मुलगी आहे. सारखं आजारी पड़तेय. थोड़े दिवस दवाखान्यानं बरं वाटल्यासारखं होतं अन परत आजारी पड़ते. तर काही सांगा. अंगाने मी भावापेक्षा बरा धडधाकट असल्याने डाऊट येऊनही बामण फसला. माझ्याकडे नीट बघुन स्वत्: काहीतरी खुडबुड करून म्हणला. तुम्ही तिची शांती केलेली नाही. ते पोरीवर आलंय. सांगतो ते विधी करा. लगेच बरं वाटेल. सारखी आजारी नाही पडणार. मी म्हटलं. ठिकाय. काका फी किती लागेल? 2000 दिले त्याला. बामण पैशे ठेवत होता. तोवर काकुचं आवाक झालेलं उघडं तोंड बंद करून घेतलं. (म्हणजे हा बामण अजुन लग्न-लेकरं न झालेल्या पोराला सुद्धा त्याच्या पोरीचा दोष काढून देणार होता.) परत बामनाला म्हटलं. काका. हा माझ्यापेक्षा वर्षाने लहान भाऊ आहे. 29 वयाचा. माझं लग्न होऊन मुलगीही झाली पण याचं अजुन लग्न जमत नाहिये. काकुनं तुम्हाला सांगितलं होतं ना पोरगीच पसंत करत नाही म्हणून, तोच हा. नौकरी-पैशे-घर-गाड़ी सगळं चांगलं आहे. पण लग्न जमत नाही. बामणाने माझ्या हाड़कुळया भावाकडे निरखुन बघितलं अन परत काहीतरी स्वतः खुडबुड करून म्हणला तुम्ही अजुन पितरांची शांती केलेली नाही. ती लवकर करावी लागेल. स्वभाव पण चिडचिडा झाला असेल. गुरु पण करून घ्या. नोवेंबरच्या आत लग्न जमेल. पुढच्या वर्षी लेकराचं पेढ़े घेऊन या. परत मी काकुचं अवाक तोंड बंद केलं. ऑलरेडी लग्न झालेल्या भावाने 'मुलगी-पसंत-करावी' म्हणून 1000 अन माझ्या म्हणजे अजुन लग्न-न-झालेल्या पोराच्या मुलीचा दोष निघावा म्हणून 2000. दिले. काकु कडं कुत्सीत बघत हसत माघारी फिरलो. नंतर काकू ते 3000 परत घेऊन-ते-घेऊन वरुन अर्धा तास त्या बामनाबरोबर खमंग भांडत होती. ----------------------------------------------------- तर आता खरा प्रश्न हा आहे की, गळ्यात एखाद्या कंपनीचं आय-कार्ड बघुन किंवा हेल्थ इन्सुरेंस आहे का? -याची खात्री करून घेऊन मग अ-गरजेच्या भरमसाठ टेस्टस करायला लावून, दोन दिवसांचा डिस्चार्ज विनाकारण 4 दिवस लांबवून, अंगात निव्वळ पाणी भरणारे पोकळ सलाईन्स लावून-- मुबलक पैशे उकळणाऱ्या शहरातल्या मोठ-मोठ्या हॉस्पिटल-डॉक्टरांत,, किंवा अत्यंत दुर्गम आदिवासी खेड़ेगावातल्या- लिंबू उतरवून, अन चप्पल हुंगायला देऊन दोन शेर ज्वारीच्या बदल्यात- लागलेलं भुत काढून देणाऱ्या भोंदूबाबात, किंवा राखेतुन अंगठी काढणाऱ्या अन तेंडुलकर चिदंबरम सारखे भक्त असलेल्या सत्य साईबाबा, किंवा राधे माँ, किंवा तो समोश्या बरोबर हिरवी चटनी खा म्हणणाऱ्या निर्मल बाबात, बलात्कारी महापुरुष आसाराम बाबात, रेपिस्ट स्वामी नित्यानंदात, किंवा असं धड खेडं-ना-शहर असलेल्या निम्न आधुनिक गावात --शांत्या सांगून गिरहईकाच्या दिसण्यानुसार पैशे उकळणाऱ्या बामनात --- एकूण या सगळ्यांत ,एक शरीराचा फरक सोडला तर बाकी अजुन कोणता फरक आहे?????? लग्न जमत नाही, नौकरी लागत नाही, अन अशीच बरीच कारणे म्हणून अन आई-वडलांच्या दबावाखाली किंवा फ़क्त त्यांच्या खुशीसाठी म्हणून असल्या बामनांकड़े शांती करायला जाणाऱ्या मॉडर्न श्रावणबालांची, मला आमच्या ऑफिस बाहेरच्या खपाटलेल्या कुत्र्यापेक्षा जास्त दया येते. ---अर्थहीन...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
12390 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

दुसरी जात आली असती तर अ

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/09/2015 - 10:11 नवीन
दुसरी जात आली असती तर अ‍ॅट्रोसिटी लागली असती की एव्हाना. असो. अर्थहिन साहेब असेचं नावाला शोभेलं असलिहाखाण करत र्‍हावा. धन्यवाद. तुमच्या एकुणचं लेखनावरचा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

आज काल ते वास्तू, फेंग शुई ई

सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 09:20 नवीन
आज काल ते वास्तू, फेंग शुई ई पण असेच आहे. आमच्या नात्यातील एक असाच महा सल्लागार लोकांना लाखांचा चुना लावून घर असे बदल तसे बदला असे सल्ले देतो पण त्याची स्वतःची मुलगी (एकुलती एक) एका टिनपाट पोराच्या मागे लागली आहे ( जो बारावी मध्ये नापास झाल्यावर गेली तीन वर्षे काहीच करीत नाही). त्याला विचारावेसे वाटले कि बाबा रे तुझ्या घरात पण असा वस्तू दोष आहे का कि शेंग फुई चे काही लफडे आहे एक आणी तसे असेल तर ते तू सुधारत का नाहीस? अर्थात असे सल्ले देणे हा धंद्याचा भाग असावा. पण लोकांच्या वर्मावर डाग देण्याची माझी वृत्ती नसल्यामुळे ते टाळले.
  • Log in or register to post comments

अनुवंशीकता तर कारणीभूत

gogglya
Wed, 09/09/2015 - 15:18 नवीन
नसेल ना या गोष्टीला ? [ ह. घ्या. ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लेखाचे पहिले दोन परिच्छेद -

वेल्लाभट
Wed, 09/09/2015 - 11:20 नवीन
लेखाचे पहिले दोन परिच्छेद - पुटपुट पुढचा काही भाग - कचकच त्यापुढे काही भाग - फडाफड हान्लं शेवटी ढिष्ष.... असं करून खाली पाडलं. असं काय्तरी इमॅजिंग केलं मी. बाकी सुसाट लिहीलंय... शब्दाशब्दाशी सहमत!
  • Log in or register to post comments

बाह्मण द्वेष लेख

हेमंत लाटकर
Wed, 09/09/2015 - 11:34 नवीन
बाह्मण द्वेष लेख
  • Log in or register to post comments

मला नाही बुवा वाटला...

वेल्लाभट
Wed, 09/09/2015 - 12:05 नवीन
मला नाही बुवा वाटला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

द्वेष नै!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 13:25 नवीन
शब्द चुकला …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

उद्देश...

मम्बाजी सर्वज्ञ
Wed, 09/09/2015 - 13:25 नवीन
उद्देश ब्राम्हण द्वेष हा नसला तरी हा लेख 'ग्रे एरिया' मध्ये येतोच. कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणतात तसे दुसरी जात असती तर अ‍ॅट्रोसिटी लागली असती. दुसर्यांना काय वाटते म्हणून नाही पण स्वतःला त्रास होऊ नये म्हणून तर लेखणीवर (आणि पर्यायानी विचारांवर) थोडे नियंत्रण ठेवायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

आता हे सगळं सुरु आहे म्हणून

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 13:29 नवीन
आता हे सगळं सुरु आहे म्हणून आमच्याकडं म्हटली जाणारी एक म्हण..... सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा! सोनार सोन्याच्या शुद्धतेत मारतो, शिंपी उरलेलं कापड मारतो आणि कुलकर्णी पूजा झाल्यावरचं खारीक खोबरं मारतो. यात पुन्हा जातीपेक्षा शेंडया लावण्या ची वृत्ती च जास्त आहे. शिंपी ला आम्ही टाकेमोडे/टाकाड पण म्हणतो. - टाकाड प्यारे
  • Log in or register to post comments

कुलकर्णी पूजा सांगायला लागलेत …

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 13:38 नवीन
आम्हास त गावाची कारकुनी करायचे सांगण्यात आले होते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तसंही असेल. कदाचित मी चुकलो

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 13:41 नवीन
तसंही असेल. कदाचित मी चुकलो असेन. कुलकर्णी म्हणजे गावातला मोठा असल्यानं त्याची संगत नको असंही असू शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

लोक जेव्हा म्हणतात शिंप्याकडे

अनुप ढेरे
Wed, 09/09/2015 - 13:30 नवीन
लोक जेव्हा म्हणतात शिंप्याकडे कपडे शिवायला टाकलेत तेव्हा तो जातीवाचक उल्लेख असतो का व्यवसायवाचक? तो व्यवसायवाचक असतो. या लेखात त्याच धर्तीवरचा उल्लेख आहे 'ब्राह्मण' या शब्दाचा. पुजा करणारा तो ब्राह्मण एवढाच अर्थ इथे येतो. आणि बामण हा शब्द म्हणायला सोपा म्हणून खूप लोक वापरतात. त्याच ऑफेंड होण्यासारखं काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments

अनुप

अर्थहीन
Wed, 09/09/2015 - 14:31 नवीन
अनुप तुझ्या या प्रतिक्रियेनंतर मी कोणालाही कसलाही स्पष्टीकरण द्यायचे आवशक्यता राहिली नाही... जे शब्द गावात सर्रस वापरले जातात ते सत्यता यावी म्हणून ओघाने लेखात आले तर त्यावर एवढा गवगावा व्हावा हे पाहून दुख झालं.. अजून एक आपल्यात जात किती मुरलीय बघा.. या लेखातली माझी चीड डॉक्टर अन भोंदू बाबांवर्ही आहे.. पण त्यावर कोणी एक शब्द काढला नाही... जातीत मात्र दुर्दैवाने खूप इंटरेस्ट आहे... वर्षानुवर्ष महार मांग म्हणून हीनवला गेला तिथं कोनिच्च नाही आला... इथ तर वाईत intention ने शब्द वापरला नसून सुद्धा एवढी चर्चा?? म्हणजे लेखाचा मुल उदेश्च गायब... Anyways ज्याला जे आरोप काराच्य्हे ते करोत... मला आता यात काही एक इंटरेस्ट नाही...
  • Log in or register to post comments

तू कशाला मनाला लावून घेतोस बाबा

वेल्लाभट
Wed, 09/09/2015 - 15:58 नवीन
इथे बंधन बँकेच्या नावावर जरा विनोद केला तर लोकांच्या ज्ञानाभिमानाचे बांध फुटतात. हे असले अर्थ काढणारे असतातच. लक्ष नाही द्यायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन

लेख आवडला.

चैतन्यमय
Wed, 09/09/2015 - 14:48 नवीन
लेख आवडला. वाद घालणार्या बामनांना फाट्यावर मारा. ;) उगाच नको त्या गोष्टीचा वाद करण्यात काय अर्थ आहे.
  • Log in or register to post comments

या प्रतीक्रियेतून

नाखु
Wed, 09/09/2015 - 15:38 नवीन
धाग्याचा अपेक्षीत (सुप्त+छुपा) उद्देश सफल आणि सुफल झाला असे सांगून मी माझे चार शब्द संपवीतो. जाहीर आणि थेट बामण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्यमय

जाहीर निषेध....

नन्दादीप
Wed, 09/09/2015 - 15:58 नवीन
ब्राम्हण जातीचा उल्लेख केला म्हणून नव्हे तर त्याना शिविगाळ केली म्हणून.... बाकी तो पत्रिकेचा किस्सा.... ते काय तोंडावरून भविष्य सांगत नव्हते की तुमच तोंड बघून तुम्हाला तुमच नाव सांगत नव्हते. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारेच गणित मांडून त्यानी उपाय सांगितले असतील... ते उपाय योग्य की अयोग्य ते बाजूला ठेवू. जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि सांगितलत माझ नाव **** आहे, आणी मला अमूक अमूक आजार आहे...तर डॉक्टरपण पेशंट म्हणून तुम्ही जे सांगाल तेच नाव लिहिणार..आणि सांगितलेल्या आजारावर उपचार करणार... . तसच आहे हे... उपाय खरेच होता की पोटभरूपणा हे तुम्हीच शोधा आता.... . . तरीपण जाता जाता एकच... लग्न करा हो.... म्हणजे हे असे जाहीररित्या जातीवरून तरी शिव्या घालायला वेळ मिळणार नाही तुम्हाला....
  • Log in or register to post comments

ओके

अर्थहीन
Wed, 09/09/2015 - 17:18 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/09/2015 - 22:56 नवीन
जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि सांगितलत माझ नाव **** आहे, आणी मला अमूक अमूक आजार आहे...तर डॉक्टरपण पेशंट म्हणून तुम्ही जे सांगाल तेच नाव लिहिणार..आणि सांगितलेल्या आजारावर उपचार करणार... (वरच्या अक्षरांचा ठळकपणा माझा... माझी खालची टिप्पणी कशावर आहे ते कळण्यासाठी.) असं नसतं ओ ! उदाहरण पार घसरले आहे... "रुग्णाने निदान सांगायचे आणि डॉक्टरने त्यानुसार उपचार करायचे" अशी पद्धत वापरणारा डॉक्टर आरोग्यास घोकादायक होईल... तो बदलणेच योग्य होईल ;) त्याऐवजी, रुग्णाचे सर्व ऐकेल आणि रुग्णाची शारिरीक व आवश्यक असल्यास लॅब तपासणी करून स्वतः निदान करून उपचार करेल असा डॉक्टर निवडा. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

फुकटचा बाजार

मी-सौरभ
Wed, 09/09/2015 - 17:34 नवीन
@अर्थहीन@: मी तुमचा राग समजू शकतो. आपली बाजू सिद्ध करण्यासाठी तुम्हि जे केलेत ती फसवणुक होती असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला जो ऊपाय सांगितला गेला तो करायचा की नाही हे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच की त्यासाठी त्या व्यक्तीचा अपमान करायची काहीच गरज नाही. तसेच तुम्ही जी ईतर उदाहरणे दिली आहेत; त्यात पण आपण शहाणे असलो की लोक आपल्याला काही बनवू शकत नाही हेही तेवढेच खरे आहे.
  • Log in or register to post comments

त्या शब्दावरून

सिरुसेरि
Wed, 09/09/2015 - 17:57 नवीन
त्या शब्दावरून जर एवढा वाद होत असेल तर , तो शब्द बदलून तेथे "ज्योतिषी" असा बदल करता येत असेल तर चांगलेच आहे . अंधश्रद्धा , ज्योतिष या गोष्टींचा विळखा तर केवळ गाव , खेडेगाव यांपुरता मर्यादित नसून शहरांमध्येही बरेचजण यांच्या आधिन आहेत .
  • Log in or register to post comments

बाकी उदाहरणे दिली आहेत पण खरा

हेमंत लाटकर
Wed, 09/09/2015 - 18:40 नवीन
बाकी उदाहरणे दिली आहेत पण खरा रोख बाह्मणावरच आहे. कोणी काही सांगितले तरी करणे न करणे आपल्या हातात असते.
  • Log in or register to post comments

१. मी ब्राह्मण नाही.

मांत्रिक
Wed, 09/09/2015 - 21:55 नवीन
१. मी ब्राह्मण नाही. २. यातील जातीवाचक तिरस्कार स्पष्ट दिसला. ३. कुणाला काही वाटो, तुम्हाला एखादा धार्मिक विधी करावयाचा असेल तर, ब्राह्मण पुरोहितालाच बोलवावे लागते. ४. जर तुम्हाला ब्राह्मण पुरोहित बोलवणे पसंत नाही तर तुम्ही स्वतः हे कर्मकांड शिकून घ्या, उत्तम प्रकारे करा, लोक तुमचा आदर करतीलच. ५. स्वतः प्रश्नाच्या मुळाशी न जाता फक्त जातीवाचक उद्गार काढणे म्हणजे हम भी नै करेंगे, दूसरो को भी नै करने देंगे! हा प्रकार आहे. ६. इथे काही ब्राह्मणांनीच या जातीवाचक लेखाला उत्तेजन दिलेले पाहून मी तर बुचकळ्यात पडलो. ७. आपणास अपेक्षित विधीकरीता ब्राह्मण बोलवणे ही एक सामान्य मानसिकता आहे. त्यात एवढी आदळआपट का? ८. तुम्ही शिकून घ्या वेद, उपनिषद, पुराणे, दुर्गा सप्तशती, तंत्र-मंत्र-यंत्र, आम्ही तुम्हाला बोलवू! येवढी चिरचिर का?
  • Log in or register to post comments

कमीत कमी या जातीने आपले वेद,

मांत्रिक
Wed, 09/09/2015 - 22:10 नवीन
कमीत कमी या जातीने आपले वेद, उपनिषद, पुराणे मुखोद्गत करून आपणापर्यंत पोचवली याचे तरी आभार माना? का उगाच पाश्चात्य हळदीने पिवळे होऊन चिखलफेक करायची? अहो स्वार्थात प्रत्येकजण बरबटलेला आहे. आज स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली! सो काॅल्ड पुरोगाम्यांनी काय उजेड पाडला? अरे देवा! चिखलफेक नुसती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

काकुला कैक वेळा सांगून झालंय

हेमंत लाटकर
गुरुवार, 09/10/2015 - 07:27 नवीन
काकुला कैक वेळा सांगून झालंय की असल्या फ़ालतू बामनांवर (शहरात राहतात ते ब्राम्हण, खेड्यात राहतात ते बामन) विश्वास नकोस ठेवत जाऊ. पैशे उकळायाचे धंदे करता हे साले. अर्थहीन. धाग्यातून हा भाग काढून टाका.
  • Log in or register to post comments

+१

नन्दादीप
गुरुवार, 09/10/2015 - 15:17 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा