कंदील

आंबोळी's picture
आंबोळी in जनातलं, मनातलं
9 Apr 2008 - 4:46 pm

साधारण 4 वर्षापूर्वीची कथा आहे. माझे आई-वडील कोकण दर्शनला गेले होते. तीकडून येताना सावंतवाडीवरुन एक लाकडाचा नक्षीदार कंदील घेऊन आले. त्या कन्दीलात बल्ब लावायची सोय आहे. मी लगेच त्यात बल्ब लावून बघितला. सगळ्या घरातल्यानी त्या कंदिलाचे कौतुक केले. मग तो कंदील शोकेसमधे ठेऊन सगळेजण आपापल्या उद्योगाला लागले. पण दुसर्या दिवशी सकाळी आमच्या बाबांचे एक मित्र वारल्याची खबर आली.

नंतर साधारण 2-3 महिने तो कंदील शोकेस मधे होता.
दिवाळीच्या आगोदर 15 दिवस घरात अशी कल्पना मांडली गेली की नवीन आकाश-कंदील आणायच्या ऐवजी हाच कंदील आत लाइट लावून वापरावा. त्यानुसार मी त्या कंडीलात दिवा बसवून कसा लागतोय , कसा दिसतोय याचे प्रात्यक्षीक बघितले आणि…..
दुसर्या दिवशी आमचे एक जवळचे ओळखीचे गृहस्थ वारल्याची खबर आली.

7-8 दिवस त्यांच्या कार्यात आणि इतर गडबडीत गेले. आणि मी नुसताच टीवी बघत लोळत पडलेला बघून आईने फर्मान सोडले की दिवाळी 8 दिवसावर आली जरा घरी कामात मदत कर. आकाश कंदील तयार आहे का? कधी आणि कुठे लावायचा? नीट लागातोयका ते बघ. मी परत तो कंदील लावून आईला दाखवला. आणि परत….
दुसर्या दिवशी सकाळी आमच्या एका ओळखीच्या बाई गेल्याचा सांगावा आला. हा योगायोग पाहून आईची गंमत करायला म्हणून मी म्हणालो “बघ आई, आपण कंदील लावला की कोणी तरी गचकतय”. पण आईला काही ते पटले नाही. तिने ते म्हणणे उडवून लावले.

वसुबारसचा दिवस. सकाळी आंघोळी करून तयार होत आलेल्या फराळावर ताव मारुन मी आकाश कंदील म्हणून तो कंदील लावला. आणि मित्रानो काय सांगू… संध्याकाळी आमच्या घरा समोर राहाणारे एकजण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले.

मग मात्र आईचा या गोष्टीवर विश्वास बसून तो कंदील तिने मला काढायला लावला.
आजुन 1-2 महिने झाल्यावर आई नको म्हणत आसतानाही माझ्या 4 वर्षाच्या पुतण्याच्या आग्रहावरून (त्याला मीच पेटवले होते)पुन्हा एकदा कंदील लावला. मित्रहो काय सांगू तुम्हाला… अहो त्याच दिवशी परत एक ओळखीची व्यक्ती इहालोक सोडून गेली…..

इतके झाल्यावर तो कंदील फक्त शोकेस मधे ठेवण्यात आला.

पण मी ही स्टोरी माझ्या मित्राना खूप रंगवून रंगवून सांगायचो. त्यातील एक पुण्याचा मित्र ती स्टोरी ऐकून फारच प्रभावित झाला. मे महिन्यात सुट्टीला तो माझ्या गावी त्याच्या काकान्कडे आलेला आसताना त्याने माझ्याकडे तो कंदील पहाण्याचा हट्ट धरला. मी पण मानभावी पणे त्याला म्हणालो “कंदील दाखवतो… आपण तो सुरू करून सुध्दा पाहू… पण त्यानंतर जर काही घडले तर माझी जबाबदारी नाही…”.
त्यानंतर त्याला कंदील सुरू करून दाखवला. नंतर बराच वेळ गपा मारुन , बाहेर जाउन चहा+सिगरेट मारुन त्याला त्याच्या काकाच्या घरी सोडले. उद्या भेटू असे ठरवून एकमेकाचा निरोप घेतला.

दुसरया दिवशी भेटायच्या वेळेच्या आगोदर त्याचा एसएमएस आला. “गोइंग बॅक तो पुणे, XXX ‘स(आमचा दोघांचा मित्र) मदर एक्सपाइर्ड ”.

मित्रा हो त्यानंतर इतके दिवस त्या कन्दीलाकडे गमतीने पाहणारा मी जाम टरकलो. आणि त्याच दिवशी तो कंदील उचलून माळ्यावर टाकून दिला. आजतागायत तो तिथेच धूळ खात पडलाय.

3-4 वर्षे झाली या घटनेला पण आजूनही तो कंदील डोक्यातून जात नाही. आणि इतकी वर्षे माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घोळतोय ,
’याचा नेम कसा धरायचा?’

(ही एक सत्य घटना आहे. आजूनही तो कंदील आमच्या माळ्यावर आहे. ज्याना खात्री करून घ्यायची आहे त्यानी स्व जबाबदारीवर आमच्या घरी येऊन कंदील लावून खात्री करून घ्यावी)
(आमची किन्वा गेलेल्या व्यक्तिन्ची नावे येथे मुद्दामच दिलेली नाहित. उगाच कोणाच्या भावना दुखावण्यात अर्थ नाही)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

9 Apr 2008 - 4:54 pm | मदनबाण

हे तर लई डेजरस प्रकरण हाय
म्हणजे इथे कंदील पेटला की तिकडे दुसर्‍याची बत्ती गुल.....

(घराच्या बाहेर लिंबु-मिरची बांधणारा)

वरदा's picture

9 Apr 2008 - 5:39 pm | वरदा

किती भयंकर..मी तर म्हणते तो फेकूनच द्या कुणालाही वापरता येणार नाही असा....खरंच खरं असेल असं नाही पण कशाला उगाच विषाची परीक्षा घ्या....

विजुभाऊ's picture

9 Apr 2008 - 5:44 pm | विजुभाऊ

ही एक सत्य घटना आहे.
तुमची तशी खात्री / श्रद्धा असेल तर सरळ कन्दील जाळुन टाका.
आजूनही तो कंदील आमच्या माळ्यावर आहे
लोकांचे मुडदे पडावे म्हणुन तुम्ही तो कन्दील माळ्यावर अजुन जपुन ठेवला आहे का?
तुमची तशी खात्री / श्रद्धा नसेल तर उगाच पोरासोराना घाबरवणार्‍या असल्या रामसे ष्टाईल गोष्टी लोकाना सांगुन अन्धश्रद्धा पसरवु नका.
...जाम घाबहरलेला विजुभाऊ

नारदाचार्य's picture

9 Apr 2008 - 5:54 pm | नारदाचार्य

असम्भवसारख्या मालिका फार पाहू नका हो. त्यातून असलं काही तरी दिसू लागतं, जाणवू लागतं...

आंबोळी's picture

9 Apr 2008 - 6:19 pm | आंबोळी

असम्भव सारख्य मालिकातुन हे सुचलेले नाही. हि घटना ४ वर्षा पुरवीची आहे.
लोकाना हि गोष्ट रामसे ष्टाईल वाटते याला मी काहिच करु शकत नाही. पण घडलेल्य घटना सत्य आहेत. यात पदरचे एकालाही मारलेले नाही. उलट अतिशयोक्ती वाटू नये म्हणुन २-३ किस्से कमी केलेत.

लोकांचे मुडदे पडावे म्हणुन तुम्ही तो कन्दील माळ्यावर अजुन जपुन ठेवला आहे का?
नाही. उलट तो चुकीच्या लोकान्च्या हाती जाउ नये म्हणून सुरक्शीत ठेवलाय.

(असल्या कन्दिलाचा मालक)आम्बोळी

विजुभाऊ's picture

9 Apr 2008 - 6:28 pm | विजुभाऊ

उलट तो चुकीच्या लोकान्च्या हाती जाउ नये म्हणून सुरक्शीत ठेवलाय
हत्यार कधी तरी कामास यावे म्हणुन?जाळुन टाका ना त्याला

मनस्वी's picture

9 Apr 2008 - 6:31 pm | मनस्वी

तो कंदील अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांकडे द्या.
किंवा जाळून टाका.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Apr 2008 - 7:52 pm | llपुण्याचे पेशवेll

या कंदीलाबाबत वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण अशी एक कथा एका 'ममी' बद्दल पण वाचली आहे. आणि ती सत्य असल्याचा त्या प्रथितयश लेखकाचा दावा आहे.
ती 'ममी' अनेक अनेक संग्रहालयात धुमाकूळ ( चित्रविचित्र भितीदायक घटना घडवून)घालून तिच्या मुक्कामी परत जाण्यासाठी 'टायटॅनिक' वर बसली. आणि काहीही झाले तरी आमचे जहाज बुडणार नाही अशी मिजास करणार्‍या जहाजाला घेऊन तिने सागरतळ गाठला. जालावर याबद्दल कुठे माहीती मिळाली तर नक्की देईन. :)

-(जाम टरकलेला....)
डॅनी..
पुण्याचे पेशवे

म्हणे ती 'आमेन रा' कि 'आमुन रा' ची ममी होती ...

प्रमोद देव's picture

9 Apr 2008 - 8:08 pm | प्रमोद देव

आम्बोळी ताई/दादा जे काही घडले ते निव्वळ योगायोग होते. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ...म्हणतात त्यातला हा प्रकार आहे.
मी देखिल असे चमत्कार केले आहेत. विशेषकरून जे वाईट बोलतो ते बर्‍याच वेळा खरे होते. पण माझ्या दृष्टीने ह्यात घाबरण्यासारखे अथवा घाबरवण्यासारखे काहीच नाही. जो तो आपल्या मरणाने मरतो.
तुमच्या कंदीलामुळे (पेटवण्यामुळे)जर कुणी मरतो असे तुम्हाला वाटत असेल तर तो चक्क भाबडेपणा आहे. मनातली सगळी जळमटं काढून टाका. रोज तो कंदील लावा आणि पाहा किती जण मरतात ते.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2008 - 8:24 pm | प्रभाकर पेठकर

3-4 वर्षे झाली या घटनेला पण आजूनही तो कंदील डोक्यातून जात नाही.

म्हणजे गेल्या ३-४ वर्षांत तुमच्या ओळखित कोणी मेलं नाही का? सामाजिक ओळखितले मोठमोठे लेखक, कवी, नेते, अभिनेते, राजकारणी वरील 'ओळखिच्या व्यक्ती मरण्याच्या' वर्गवारीत बसत नाहीत वाटते. तो कंदील मधे मधे पेटवत राहा नाहीतर जगाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढून काहीतरी अनर्थ घडेल.

आंबोळी's picture

9 Apr 2008 - 8:29 pm | आंबोळी

प्रमोदकाका,
तुमचे चिमित्कार आवडले.
पण कन्दीलाच चमत्कार मी करतोय असा कुठलाहि दावा मी केलेला नाही.
इथे मी घाबरण्याचा अथवा कुणाला घाबरवण्याचा प्रयत्नही नाही.
मि फक्त मला आलेला अनुभव किन्वा ५-७ वेळा घडलेला योगायोग तुमच्या बरोबर वाटला.

तुमच्या कंदीलामुळे (पेटवण्यामुळे)जर कुणी मरतो असे तुम्हाला वाटत असेल तर तो चक्क भाबडेपणा आहे. मनातली सगळी जळमटं काढून टाका. रोज तो कंदील लावा आणि पाहा किती जण मरतात ते.

तुमचे काय जातय हो सान्गायला कि रोज कन्दिल लावा म्हणुन... इथे माझ्या ओळखीची माणसे मरतायत!

वि.सु. ताई/दादा चे शेपुट नका लावू... तुमच्यपेक्शा वयाने आणि अनुभवाने अजुन खुपच लहान आहे मी.

(प्रमोद्काकान्चे चमत्कार आवडलेला)आम्बोळी

प्रमोद देव's picture

9 Apr 2008 - 9:57 pm | प्रमोद देव

तुमचे काय जातय हो सान्गायला कि रोज कन्दिल लावा म्हणुन... इथे माझ्या ओळखीची माणसे मरतायत!

चल बाळ आम्बोळी(आता बरोबर?) तो कंदील मला देऊन टाक. तू मुंबईत असशील तर मला व्यनिने तुझा पत्ता कळव.
प्रत्येकाला कधी ना कधी मरायचे असते. "राम भजन कर लेना की एक दिन जाना है भाई" असे संत कबीराने म्हटलेले आहे.
तेव्हा मरणाची भिती कशाला? आणि तुझ्या त्या कंदीलाने मी तरी नक्की मरणार नाही. तो कंदील मला दिलास की तुझी आजवरच्या सर्व पापांमधून सुटका होईल.... ही देववाणी आहे. तेव्हा घाबरू नकोस.
मी तो टेबल लॅंप म्हणून तरी वापरू शकेन. कशी आहे आयडियाची कल्पना?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आनंदयात्री's picture

10 Apr 2008 - 12:18 pm | आनंदयात्री

प्रमोद काका कंदिल पेटवाचे ... अन तु त्यांच्या ओळखीचा म्हणुन तुच टपकायचास .... :)))))))))
ह.घ्या. हे सां. न लगे.

धमाल मुलगा's picture

10 Apr 2008 - 12:36 pm | धमाल मुलगा

जबरान् !
आंद्या आला फॉर्मात :-)

जोक्स अपार्ट! पण जगामध्ये अशाही कित्येक अतर्क्य गोष्टी/घटना आहेत ज्यांचं आकलन अजुनही मानवी बुध्दीला झालेलं नाही, म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं म्हणण्याचं मी धाडस करु शकत नाही.

कदाचित निव्वळ योगायोगही असतील. पण आपण देव मानतो (हा देव ढगातला, आपण प्रमोद देवांना मानतो ही गोष्ट वायली!), आता देव म्हणजे काय? तर माझ्या मते जगातल्या चांगल्या शक्तिंची एकवटलेली मुर्त / अमुर्त प्रतिमा! मग ज्याप्रमाणे चांगल्या शक्ती आहेत, त्याचप्रमाणे नाण्याच्या दुसर्‍या बाजूला वाईट शक्ती असणारच की! त्याच ह्या भुतं-खेतं म्हणूनमानल्या जातात. काही गोष्टी पुराव्यानिशी सिध्द करता येत नाहीत, पण त्यांचा व्यक्तिश: अनुभव आल्यावर माणूस आपले विचार बदलतो.
अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. बालबुध्दीनुसार ते चुकीचेही असु शकेल, पण 'लॉजिकली' मला हे पटतं.

- (पडक्या वाड्यातल्या भुतानं घोसाळलेला) ध मा ल.

विजुभाऊ's picture

10 Apr 2008 - 12:42 pm | विजुभाऊ

(पडक्या वाड्यातल्या भुतानं घोसाळलेला) ध मा ल.
एक शन्का ! भूतं कधी पासुन आपल्याच लोकाना घोसाळायला लागली?

आनंदयात्री's picture

10 Apr 2008 - 12:44 pm | आनंदयात्री

म्हणतो. काही लोक देव गणाचे असतात, त्यांना काही म्हातारपणापर्यंत भुते दिसत नाहित, मग ते उगाचच "भुते नाहीत ..भुते नाहीत .." अशा अफवा उडवतात.

-(कधी कधी अजुनही रात्री शु ला एकटा जायला घाबरणारा) आंद्या भुतकर.

धमाल मुलगा's picture

10 Apr 2008 - 2:27 pm | धमाल मुलगा

माझा राक्षसगण आहे ना...

एक शन्का ! भूतं कधी पासुन आपल्याच लोकाना घोसाळायला लागली?

आता हे त्यांनाच विचारायला हवं. येत्या विकांताला एका मुंजाला भेटायला चाललोय, येता का? मस्त अबीर-गुलाल शिंपडलेला दहीभात, बिब्बे मारलेलं लिंबू असा बेत आहे जेवायला...तेही पिंपळाच्या पानावर! :-)))))

(कधी कधी अजुनही रात्री शु ला एकटा जायला घाबरणारा)

हा हा हा!!! मग रे काय करतोस? तसाच झोपुन जातोस की काय?

छोटा डॉन's picture

9 Apr 2008 - 8:32 pm | छोटा डॉन

खरं सांगायच तर माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. पण तुम्ही एवढ्या सत्यतेने सांगताय तर त्यात तथ्य आहे असे मानायला हरकत नाही.
मला तर फक्त आणि फक्त योगायोग वाटतो...

असो. तुमचा जर असल्या गोष्टींवर विश्वास असेल तर तो "कंदील" जाळून टाकणे योग्य ...
आमचा विश्वास नाही पण म्हणतात ना " कशाला विषाची परिक्षा ?"

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनोजकामत's picture

9 Apr 2008 - 9:26 pm | मनोजकामत

भाकड कथा आहे !!!!!!!!!!!!!!!!!!

मनोजकामत's picture

9 Apr 2008 - 9:28 pm | मनोजकामत

अशा कथा असलेले पुस्तक असेल तर सान्गा

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Apr 2008 - 10:02 pm | llपुण्याचे पेशवेll

या पुस्तकात अशा पुष्कळ कथा वाचायला मिळतील.
पुण्याचे पेशवे

झंप्या's picture

10 Apr 2008 - 7:34 am | झंप्या

ए आंबोळ्या,
एकतर ही सगळी थापेबाजी आहे कबूल तरी कर नाहीतर तो कंदील जाळून तरी टाक/ किंवा प्रमोदकाकांना भेट तरी देऊन टाक.आणि रामसे चित्रपट बघणं एकदम बंद कर.

हे सगळं खरं असेल तर तू तो कंदील अजुन जपून ठेवायचे काय कारण? ह्या विजुभाऊच्या प्रश्नाला आपण सहमत आहोत.

चला तोवर मी आता शुचिर्भुत होऊन कर्ज फेडायचा मंत्र म्हणायला जातो!:))

विसोबा खेचर's picture

10 Apr 2008 - 8:00 am | विसोबा खेचर

मला तो कंदिल बघायची उत्सुकता आहे! ;)

बाकी, तू म्हणतोस त्याप्रमाणे दरवेळी कंदिल लावला की तुझ्या ओळखीतलं कुणी ना कुणी तरी मेलंही असेल, परंतु या सगळ्या निव्वळ योगायोगाच्या गोष्टी आहेत! त्या बिचार्‍या कंदिलाचा त्यात काहीच दोष नाही. ;)

तात्या.

रामदास's picture

10 Apr 2008 - 8:12 am | रामदास

असंच काही नाव आहे एका चित्रपटाचं. मुखवट्याऐवजी कन्दील.असे अनुभव सांगत न बसता ते संपवून टाकावे हे बरे.मनाला कमकुवत करणारे अनुभव विसरून जाणे जास्त चान्गले.शन्केने मनात घर केले की मग नवीन वस्तू घ्यायची भिती वाढत जाईल.
ता.क. गरजूंना भाड्यानी द्यायला हरकत नाही. सासू आणी कुत्र्याची गोष्ट आठ्वते ना?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2008 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंदिलाची सत्य स्टोरी आवडली, वाचतांना पुढे काय ? पुढे काय ? अशा उत्सुकतेने वाचले आणि एका रहस्यमय कंदिलाची ओळख झाली.
अशा भाकडकथांवर आमचा काही विश्वास नाही. पण काही म्हणा स्टोरी जरा हटकेच आहे. :)

अवांतर :) स्टोरी खरी का खोटी ते जाऊ द्या !!!पण दररोज कुठे ना कुठे लोक मरताहेत आणि तो या कंदिलाचा प्रताप आहे असे माझे मत आहे ;)

आर्य's picture

10 Apr 2008 - 9:32 am | आर्य

अंबोळ्या..........टाईम पास भारी झाला खरा........छान लिखाण झालंय.
तो कंदील अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांकडे द्या, हा ऐक ऊपाय बरा आहे. पण "कंदील" जाळून टाकू नको............. ऐक गिर्‍हाईक नक्की तयार आहे, अर्थात मीच.
अंधश्रद्धा द्वेष्टा / भूत कथाप्रेमी (आर्य)

सहज's picture

10 Apr 2008 - 11:55 am | सहज

काही म्हणा, सॉलीड रहस्य कथा होऊ शकेल.

जेव्हा कथानायकाच्या [सध्या त्याला 'आंबापोळी' म्हणुया] जवळच कोणीतरी गचकतं. तेव्हा तो ह्या रहस्याचा शोध घ्यायला सावंतवाडीला जायला निघतो, साधा सोपा प्रवास करत असताना दोन तीन वेळा जीवावर बेतणारे प्रसंग. सावंतवाडीत पोहोचल्यावर कोणी तरी सांगत, इथे खुप जण रहायची पण ४ वर्षापुर्वी दुरच्या खेड्यातुन एक आदीवासी कंदील येउन विकु लागला मग लोक पटापट टपकली. शेवटी एक दिवस लोकांनी त्याला बदडून गावाबाहेर काढला.

मग आंबापोळी खाउन दुसर्‍या दिवशी त्या आदीवासी चे गाव शोधत जातो. अमावास्येच्या काळोख्या रात्री त्या खेड्यात... तिथे मग फणसपोळीची एन्ट्री.... पाहता क्षणीच एकमेकांचे जमते... तिचा बाप गावचा वैदु... मग प्रेमकथा..

शेवटी असे कळते की त्या खेड्याला वीजपुरवठा किती ही विनवणी करुन सावंतवाडी व मुंबईच्या अधिकार्‍यांनी दिला नाही म्हणुन मग त्या आदीवासींनी मंतरलेले कंदील त्या दोन्ही ठीकाणी पाठवले सुड उगवायला.

आंबापोळी मोठ्या प्रयत्नाने त्या खेड्याला स्वदेश पिक्चर मोबाईल वर दाखवतो. [अर्थात वीज नाही पण त्या गावात मोबाईल व असंख्य मोबाईल बॅटरी पोहोचल्या असतात] मग सगळे स्व:ताच वीजनिर्माण करतात. गाववाले खुश..शेवटी आंबा पोळी - फणसपोळी शुभमंगल...

लग्नाच्या पहील्या रात्री फणसपोळीला आंबापोळी तो कंदील सप्रेम भेट देतो. सांगतो उद्या सकाळी तु लाव आणी तुझ्या गावातल्या त्या आपल्या प्रेमाला विरोध करणार्‍या सगळ्या खडुस लोकांची यादी संपल्या शिवाय कंदील काढायचा नायं!!

आनंदयात्री's picture

10 Apr 2008 - 1:01 pm | आनंदयात्री

पाहिजे तोच माणुस मरावा यासाठी काय करत असतील ? त्या माणसाचे नाव चिठ्ठीवर लिहुन ती कंदिलाखाली ठेवत असतील का ?

-(बारकावे टिपणारा दिग्दर्शक) आंद्या रामसे.

विजुभाऊ's picture

10 Apr 2008 - 1:07 pm | विजुभाऊ

वि.सू. : चीठ्ठी टाईप करुन ठेवावी . हस्ताक्षर कळाले नाही तर कै च्या कै च व्हायचे ( अर्थात डॉक्टर लोकाना अशा कन्दीलाची गरज भासणार नाही)

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 May 2008 - 10:24 pm | डॉ.प्रसाद दाढे

अर्थात डॉक्टर लोकाना अशा कन्दीलाची गरज भासणार नाही
फारच मर्मभेदी होता.. :)

मदनबाण's picture

10 Apr 2008 - 1:17 pm | मदनबाण

पाहिजे तोच माणुस मरावा यासाठी काय करत असतील ? त्या माणसाचे नाव चिठ्ठीवर लिहुन ती कंदिलाखाली ठेवत असतील का ?
वि.सू. : चीठ्ठी टाईप करुन ठेवावी.
काय राव आम्बोळी ला क्लु देताय की काय ?

(नकोती चिठ्ठी पटकन उचलणारा)
मदनबाण

बकुळफुले's picture

28 Oct 2015 - 11:09 am | बकुळफुले

गुड आयडीया

रात्रि थेट त्याच्याच अंगणात नेऊन लावायचा.

धमाल मुलगा's picture

10 Apr 2008 - 1:58 pm | धमाल मुलगा

रात्रि थेट त्याच्याच अंगणात नेऊन लावायचा.

कस्सली खत्रा आयडिया!!!!
लढ बाप्पू !

अभिज्ञ's picture

10 Apr 2008 - 2:51 pm | अभिज्ञ

कंदिल हा कोकणातला असल्याने हा काहि भानामतिचा प्रकार आहे का?
भानामति वगैरे प्रकारात असल्या गोष्टि असतात असे कुठे तरि वाचल्याचे आठवते.
माझा तरि असल्या गोष्टिंवर विश्वास नाहि.परन्तु एक माहिति म्हणुन विचारत आहे.
इथे बरेच जण कोकणातले आहेत्.आम्हि देशावर,कोकणातल्या असल्या फार कथा ऐकल्या आहेत.
अजुनहि कोकणात असे प्रकार चालु आहेत का?

बाकि कंदिल स्टोरि जरा हटकेच वाटलि.असो ,ज्याचे त्याचे अनुभव.

हा जर वापरायचा असेल तर तुम्हि किति भाडे आकरता?
काहि ग्रुप स्किम वगैरे आहे का?
कंदिलाचि रेन्ज किति आहे.म्हणजे किति अंतरापर्यन्त ह्याचे कव्हरेज आहे?
असले बरेच प्रश्न आमच्या डोक्यात आले हो.)))))

अबब.

वैभव's picture

28 May 2008 - 7:22 pm | वैभव

च्यायला ....काय सुपिक डोके आहे हो तुमचे...

शितल's picture

12 Apr 2008 - 9:03 pm | शितल

क॑दिल पेटवाच्या अगोदर आजु बाजुच्या॑चा विमा उतरावा.

रोहित's picture

12 Apr 2008 - 9:36 pm | रोहित

अहो कआय हे...? एक कन्दिल के लिये इतना धिन्गना..? रोहित खुश हुअअ..?

विदेश's picture

12 Apr 2008 - 9:41 pm | विदेश

टेबललॅम्प म्हणून वापरणार? अरे देवा! असली आयडियाची कल्पना सुचण्याची दुर्बुध्दी देवांना देऊ नको रे देवा!!

भडकमकर मास्तर's picture

13 Apr 2008 - 12:04 am | भडकमकर मास्तर

खरी खोटी माहित नाय.. पण गोष्ट जबरा आहे....

पिस्तुल्या's picture

16 Apr 2008 - 5:28 pm | पिस्तुल्या

अस॑भव सारख्या मालिका जास्त पाहू नकोस . नाहितर असे अनेक भास होणारच!!

अन्जलि's picture

16 Apr 2008 - 6:02 pm | अन्जलि

he jar dahshatvadyana samjle tar tuza kandil palvun netil ani ..... ..... kinva Bushla samjle tar laden sathi to kandil palvayla sangel. bagh baba kalji ghe ugach kahitari hoil ha......ha.... ha...

आण्याबा's picture

6 May 2008 - 1:28 pm | आण्याबा

च्यायची....१६ वर्षात बोलला नाही कधी कंदीला बद्दल्...बस का राव्..हीच का दोस्ती..मला शोले चा आपला फेवरीट डायलॉग आठवला..."मैने तुझे क्या समझा था जय..और तू...तू क्या निकला.."...तुझी खरडवही बघ..

(वाचकांसाठी टीपः १६ हे आंबोळया चं किंवा माझं वय नाही...तेव्हढी वर्षं आमची दोस्ती आहे)

ऋचा's picture

6 May 2008 - 1:49 pm | ऋचा

तो कंदील आहे न तो ज्याला हवा त्याला दे

आणि बघ माणस मरतात का?

तशीही लोकसंख्या खुप वाढत आहे..त्या निमित्ताने कमी होइल L)

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 May 2008 - 2:04 pm | डॉ.प्रसाद दाढे

ममीवरून आठवले.. 'तो' लेख बहुधा एका रविवार नवाकाळ मध्ये कॅ.वासुदेव बेलवलकर या॑नी लिहिला होता. त्याच लेखका॑नी राघोबादादा पेशव्या॑च्या पुजेत असलेल्या अघोरी गणपतीचीही गोष्ट लिहिली होती..तीही मूर्ती जिथे जिथे गेली तिथे तिने प्रलय माजविला असे म्हणतात.
नुकतीच सकाळ मध्ये भानामतीबद्दलची बातमी अनेक पुणेकरा॑ना आठवत असेल.. पुण्याजवळील एका गावा॑त (गु॑डवस्ती) भरदिवसा सगळ्या॑च्या देखत आपोआप आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. अ॑.नि.स ने सुद्धा सत्य शोधण्याचे खूप प्रयत्न केले तर त्या॑च्या कार्यकर्त्या॑च्या डोळ्यादेखत तीन ठिकाणी आगी लागल्या..कडक पोलीस पहार्‍यातही आगी लगल्यामुळे त्या कुटु॑बाने अखेर वस्ती बदलण्याचा निर्णय घेतला..आता बोला

केशवराव's picture

6 May 2008 - 6:56 pm | केशवराव

काय प्रतिक्रिया देणार ? कप्पाळ ?

मन's picture

17 May 2008 - 3:14 am | मन

पुर्वी अंधारात जायाचं भ्याव वाटायचं म्हुन लोक कंदील घिवुन जायाचे.
आता म्हंजी जर ग्येला कुनी हा कंदील घिवुन तर तिच्या मारी, काळा गुडुप अंधार परवडला,
पर ह्या कंदिलाचा असला "प्रकाश" आपल्यावर पडु नये ह्याचीच कुनाला बी भीती वाटल की राव....

आता घाबरावं अंधाराला की , कंदिलाला?
:-) :-))

आपलाच,
मनोबा

झंप्या's picture

17 May 2008 - 6:57 am | झंप्या

च्यामारी इथं कधीही आलं तरी आंबोळ्याच्या भन्नाट बुद्धीमत्तेवर आधारित हा लेखन कायम मुखपृष्ठावर झळकत असतो.

मदनबाण's picture

22 May 2008 - 6:58 pm | मदनबाण

आंबोळी राव तुमच्या मयताचा लेख (म्हणजे तुम्ही लिहलेल्या मयता विषयी म्हणतोय मी.....)वाचला.सध्या माझ्या प्रमाणेच माझे वडील ही मिपा चे वाचक आहेत.....त्यांनीही हा तुझा लेख वाचला आणि ते मला म्हणाले आंबोळी चा कंदील शोधुन दे !!!!! (म्हणजे तुमचा हा लेख हो.....)
आता ते म्हणत आहेत अरे प्रतिक्रिया नंतर दे आधी मला वाचू दे !!!!!

(लगे रहो आंबोळी)असे म्हणणारा;;;;;
मदनबाण.....

अनिल हटेला's picture

27 May 2008 - 12:44 pm | अनिल हटेला

क्या बात है!!

बाकी खर खोट परमेश्वराला माहीत ..

पण कथा वाचुन मजा आली..

( माफ करा पण मी कथा म्हनूणच वचली)

अनिल हटेला's picture

27 May 2008 - 12:44 pm | अनिल हटेला

क्या बात है!!

बाकी खर खोट परमेश्वराला माहीत ..

पण कथा वाचुन मजा आली..

वैभव's picture

28 May 2008 - 7:26 pm | वैभव

सब लोग कंदील कंदील कर रहे है....

ये कंदील कंदील क्या है?? ये कंदील कंदील.....

अनिकेत's picture

28 May 2008 - 11:40 pm | अनिकेत

ह्म्म्म्म.... वा.

जेम्स रँडी ला द्या तुमचा कंदील.
तो एक पूर्वाश्रमीचा जादूगार आहे, आणि सध्या अंनिस टाइप काम करतो.. संस्था आहे त्याची.
http://www.randi.org/

७०-८० च्या दशकात चमचे वाकवणार्‍या युरी गेलर चा पर्दाफाश केला होता त्याने.

१ मिलीयन डॉलर चे चॅलेंज आहे.... मिळतील तुम्हाला.
http://www.randi.org/joom/challenge-info.html

अनिकेत

विजुभाऊ's picture

1 Jul 2008 - 4:07 pm | विजुभाऊ

काही नव्या सदस्यांच्या माहिती साठी हे लोकप्रिय लिखाण पुन्हा वर आणलेय.
अवांतरः निदान हे वाचुन तरी अम्बोळ्याला आपण लिहित होतो हे आठवुन तो नवे
काहि(ही)तरी लिहायला घेईल
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नील_गंधार's picture

13 May 2010 - 2:43 pm | नील_गंधार

आयला अवघड आहे हा प्रकार.

नील.

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 11:29 pm | शिल्पा ब

मला देउन टाका तो कन्दिल....प्रयोग म्हणून हो...सासरचे लोक हल्ली बरेच contact मधे आलेत...

सासरग्रस्त शिल्पा

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

इरसाल's picture

14 May 2010 - 3:53 pm | इरसाल

The Mummy on the Titanic

With the increased interest in the story of the sinking of the Titanic, an old tale of a mummy's curse has resurfaced. According to one version,

A sarcophagus of an ancient Egyptian king was being smuggled to America by an unscrupulous art dealer. The art dealer was going to sell it to a noted museum in New York for $500,000.00. He would then split the booty with the thieves that ransacked the cave of this Egyptian king.
It seems that the god, Anubis, was not pleased with this whatsoever. It seems that Egyptian Gods don't like having their earthly remains sold to the highest bidder. In retaliation for this ghastly of dirty deeds Anubis sunk the Titanic, and the mummy went to the bottom of the sea to finally have it's resting place.

In some of the stories, the mummy is not that of a king, but of a priestess, or princess, of Amen-Ra. In other stories, the mummy was rescued in a lifeboat and once it arrived in New York, anyone who came near it fell under its curse. In one version, the mummy made an attempted return to Egypt on the ship The Empress of Ireland -- which sank -- and then made a second attempt . . . aboard the Lusitania!

Philipp Vandenberg wrote of the curse in his dubious tome The Curse Of The Pharaohs (1973; p. 186):

On board the Titanic were 2,200 passengers, 40 tons of potatoes, 12,000 bottles of mineral water, 7,000 sacks of coffee, 35,000 eggs -- and an Egyptian mummy that Lord Canterville wanted to take from England to New York.

The mummy was the carefully prepared body of a prophetess who had enjoyed a great vogue during the reign of Amenhotep IV, the heretic pharaoh who took the name Ikhnaton. Her grave had been found in Tel el-Amarna. A small temple had been built for this prophetess, the "Temple of the Eyes."

The female mummy had been equipped with the usual amulets and artifacts. An amulet with the inscription Awake from the swoon in which you sleep and a glance of your eyes will triumph over everything that is done against you had been placed beneath her head. Was this the hint that the remains of the prophetess enjoyed special protection?

The mummy was encased in a wooden crate and, because of its value, had not been placed in the hold of the Titanic but behind the command bridge. Many scientists who handled mummies showed clear signs of mental derangement. Did Captain Smith, too, look into those fatal radiant eyes? Could he, too, have been the curse's victim?

Charles Pellegrino added more details to the event in Unearthing Atlantis (1991; pp. 298-299), his book that he desperately wanted to be taken seriously:

In 1910, the British Egyptologist Douglass Murray is said to have been among the next to feel the curse [of Queen Hatshepsut]. An American treasure hunter approached him in Cairo, offering for sale one of several portions of Hatshepsut's multilayered mummy case. The American died before he could cash Murray's check. Three days later, Murray's gun exploded, blowing off most of his right hand. What remained turned gangrenous, requiring amputation of the entire arm at the elbow. En route to England with the sarcophagus, he received word via wireless telegraph that two of his closest friends and two of his servants had died suddenly. Upon arrival in England, he began to feel superstitious, and left Hatshepsut's case in the house of a girlfriend who had taken a fancy to it. The girlfriend soon came down with a mysterious wasting disease. Then her mother died suddenly. Her lawyer delivered the sarcophagus back to Murray, who promptly unloaded it on the British Museum. The British Museum already had more sarcophagi than it needed. Not so, the American Museum of Natural History in New York; so a trade was arranged for Montana dinosaur bones. Before the deal was complete, the British Museum's director of Egyptology and his photographer were dead. Queen Hatshepsut was beginning to lose her charm. The curators loaded the sarcophagus into a crate and saw it lowered into the hold of a ship. And on April 10, 1912, the ship sailed -- Southampton to New York. Hatshepsut departed for America on the Titanic.

Some sources say that this legend originated in the press just days following the disaster -- indeed, it appeared in the newspapers of the time. But it may have been concocted on the decks of the ship itself. One of the ship's passengers, William Thomas Stead (pictured right), was not only a journalist but also a believer in mysticism and spiritualism, and a frequenter of mediums. Before the trip, Stead had been warned by a spiritualist friend, one Mr. Penny, not to make the ocean journey as the ship was destined for disaster. He relayed this information to several people over dinner on the third night of the Titanic's voyage, and he embellished the story with an earlier tale of a mummy's curse associated with a "mummy's case" on exhibit at the British Museum (and currently held by that museum, #22542, pictured below [Photo © copyright The British Museum]).

After the ship sank (Stead perished with the ship), some of the surviving listeners who had been present at Stead's table repeated the tale, which by then had likely been exaggerated and distorted to better fit the situation. Whether by faulty memory, emotional melodramatization, or outright deception, a mummy, rather than a coffin-lid, had soon been placed aboard the Titanic, rather than in the halls of a faraway museum, and a legend was born, a legend that was to be built upon as time progressed. A cursory check of the details of the story will yield no verifying facts -- there was no mummy aboard the Titanic.

The so-called cursed "mummy case," actually a wooden "mummy-board" or inner lid of a coffin (EA 22542), can currently be found in Room 62 of the British Museum. The lid is from Thebes and, judging by its shape and the style of its decoration, dates to the end of the 21st or the beginning of the 22nd Dynasty. Some of the earlier British Museum publications described the lid as belonging to a "priestess of Amen-Ra" based on the presumption that a woman of rank would have necessarily been employed by the temple dedicated to this god. Donated by Mrs. Warwick Hunt of Holland Park, London (on behalf of Mr. Arthur F. Wheeler) in July 1889, it went on display at the museum the following year. The mummy-board was packed away for safety's sake during World Wars I and II, but, with the exception of a brief journey to Australia in 1990, has never left the museum. Tales of a curse associated with the mummy-board still persist, despite the fact that any evidence is wholly lacking.

नितिन थत्ते's picture

5 Sep 2010 - 9:17 am | नितिन थत्ते

हा कंदील अधूनमधून बाहेर निघत असतो ब्बॉ.

सतिश गावडे's picture

3 Jul 2015 - 9:25 pm | सतिश गावडे

प्रगोने चर्चेत या कथेचा उल्लेख केला आणि कथा पुन्हा वाचली.

नव-मिपाकरांना या "क्लासिकची" माहिती व्हावी म्हणून प्रतिसाद देऊन वर आणत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2015 - 10:02 pm | प्रसाद गोडबोले

माझा पूर्वी असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता पण नुकताच मिपावर असा एक अनुभव आल्याने विश्वास बसला ।

कथा आवडली :)

dadadarekar's picture

3 Jul 2015 - 10:36 pm | dadadarekar

आमच्या आईचे भजनी मंडळ आहे. जुन्या बायका त्यातून रिटायर व्हायला लागल्या की त्याना शाल द्यायची प्रथा त्यानी सुरु केली होती.

पण शाल दिली की ती बाई लगेच गचकायची.

तीन चार बायका अशा गेल्यावर एकीच्या हे लक्षात आले व तिने रिटायर होताना शाल नाकारली. ती ठणठणीत राहिली.

शाल प्रथा गुंडाळली गेली.

दमामि's picture

4 Jul 2015 - 6:27 pm | दमामि

सॅालिड!

नाखु's picture

6 Jul 2015 - 4:31 pm | नाखु

खास "शॉल" जोडीतला !!

एके काळी कंदीलाचे प्रकाशास अभ्यास केलेला

नाखु's picture

6 Jul 2015 - 4:31 pm | नाखु

खास "शॉल" जोडीतला !!

एके काळी कंदीलाचे प्रकाशात अभ्यास केलेला

क्लासिक गोष्टी अधूनमधून बाहेर काढत राहिलं पाहिजे. कसं काय सुटलं नजरेतून काय की हे.

जडभरत's picture

6 Jul 2015 - 4:48 pm | जडभरत

भाऊ आपण जुने आहात. अशा क्लासिक चिजा आपणंच पोचवायला पाहिजेत आमच्यापर्यंत.

सूड's picture

6 Jul 2015 - 4:47 pm | सूड

ऑ अच्च जालं तल!!

शाल आणि रुमाल कोणाला भेट देवू नये म्हणतात .
तो कंदील माळ्यावर कशाला ठेवलाय? तुमच्या पुढच्या पिढीने तो वापरला तर ? त्यापेक्षा जाळून टाका कि

अच्चा. म्हणूनच ते समारंभांत भेट देताना शालीला 'महावस्त्र' म्हणतात की क्कॉय?

स्वीत स्वाति's picture

10 Jul 2015 - 11:33 am | स्वीत स्वाति

जगबुडी होईल …हा हा हा
एकदाच काय तो बदला घेईल तो कंदील .
कृपया ह.घे.

वगिश's picture

13 Jul 2015 - 7:43 pm | वगिश

तो कंदील जाळू नका. लोकसंख्येचा विस्फोट होईल

टवाळ कार्टा's picture

20 Sep 2017 - 12:36 am | टवाळ कार्टा

तो कंदील पाकिस्तानला सप्रेम सदिच्छा भेट म्हणून पाठवा