Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कंदील

आ
आंबोळी यांनी
Wed, 04/09/2008 - 13:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53918 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Wed, 04/09/2008 - 13:24 नवीन
हे तर लई डेजरस प्रकरण हाय म्हणजे इथे कंदील पेटला की तिकडे दुसर्‍याची बत्ती गुल..... (घराच्या बाहेर लिंबु-मिरची बांधणारा)
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 04/09/2008 - 14:09 नवीन
किती भयंकर..मी तर म्हणते तो फेकूनच द्या कुणालाही वापरता येणार नाही असा....खरंच खरं असेल असं नाही पण कशाला उगाच विषाची परीक्षा घ्या....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 14:14 नवीन
ही एक सत्य घटना आहे. तुमची तशी खात्री / श्रद्धा असेल तर सरळ कन्दील जाळुन टाका. आजूनही तो कंदील आमच्या माळ्यावर आहे लोकांचे मुडदे पडावे म्हणुन तुम्ही तो कन्दील माळ्यावर अजुन जपुन ठेवला आहे का? तुमची तशी खात्री / श्रद्धा नसेल तर उगाच पोरासोराना घाबरवणार्‍या असल्या रामसे ष्टाईल गोष्टी लोकाना सांगुन अन्धश्रद्धा पसरवु नका. ...जाम घाबहरलेला विजुभाऊ
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Wed, 04/09/2008 - 14:24 नवीन
असम्भवसारख्या मालिका फार पाहू नका हो. त्यातून असलं काही तरी दिसू लागतं, जाणवू लागतं...
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 04/09/2008 - 14:49 नवीन
असम्भव सारख्य मालिकातुन हे सुचलेले नाही. हि घटना ४ वर्षा पुरवीची आहे. लोकाना हि गोष्ट रामसे ष्टाईल वाटते याला मी काहिच करु शकत नाही. पण घडलेल्य घटना सत्य आहेत. यात पदरचे एकालाही मारलेले नाही. उलट अतिशयोक्ती वाटू नये म्हणुन २-३ किस्से कमी केलेत. लोकांचे मुडदे पडावे म्हणुन तुम्ही तो कन्दील माळ्यावर अजुन जपुन ठेवला आहे का? नाही. उलट तो चुकीच्या लोकान्च्या हाती जाउ नये म्हणून सुरक्शीत ठेवलाय. (असल्या कन्दिलाचा मालक)आम्बोळी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 14:58 नवीन
उलट तो चुकीच्या लोकान्च्या हाती जाउ नये म्हणून सुरक्शीत ठेवलाय हत्यार कधी तरी कामास यावे म्हणुन?जाळुन टाका ना त्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
म
मनस्वी Wed, 04/09/2008 - 15:01 नवीन
तो कंदील अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांकडे द्या. किंवा जाळून टाका.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 04/09/2008 - 16:22 नवीन
या कंदीलाबाबत वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण अशी एक कथा एका 'ममी' बद्दल पण वाचली आहे. आणि ती सत्य असल्याचा त्या प्रथितयश लेखकाचा दावा आहे. ती 'ममी' अनेक अनेक संग्रहालयात धुमाकूळ ( चित्रविचित्र भितीदायक घटना घडवून)घालून तिच्या मुक्कामी परत जाण्यासाठी 'टायटॅनिक' वर बसली. आणि काहीही झाले तरी आमचे जहाज बुडणार नाही अशी मिजास करणार्‍या जहाजाला घेऊन तिने सागरतळ गाठला. जालावर याबद्दल कुठे माहीती मिळाली तर नक्की देईन. :) -(जाम टरकलेला....) डॅनी.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Sat, 09/04/2010 - 16:07 नवीन
म्हणे ती 'आमेन रा' कि 'आमुन रा' ची ममी होती ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
प्रमोद देव Wed, 04/09/2008 - 16:38 नवीन
आम्बोळी ताई/दादा जे काही घडले ते निव्वळ योगायोग होते. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ...म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. मी देखिल असे चमत्कार केले आहेत. विशेषकरून जे वाईट बोलतो ते बर्‍याच वेळा खरे होते. पण माझ्या दृष्टीने ह्यात घाबरण्यासारखे अथवा घाबरवण्यासारखे काहीच नाही. जो तो आपल्या मरणाने मरतो. तुमच्या कंदीलामुळे (पेटवण्यामुळे)जर कुणी मरतो असे तुम्हाला वाटत असेल तर तो चक्क भाबडेपणा आहे. मनातली सगळी जळमटं काढून टाका. रोज तो कंदील लावा आणि पाहा किती जण मरतात ते. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 16:54 नवीन
3-4 वर्षे झाली या घटनेला पण आजूनही तो कंदील डोक्यातून जात नाही. म्हणजे गेल्या ३-४ वर्षांत तुमच्या ओळखित कोणी मेलं नाही का? सामाजिक ओळखितले मोठमोठे लेखक, कवी, नेते, अभिनेते, राजकारणी वरील 'ओळखिच्या व्यक्ती मरण्याच्या' वर्गवारीत बसत नाहीत वाटते. तो कंदील मधे मधे पेटवत राहा नाहीतर जगाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढून काहीतरी अनर्थ घडेल.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 04/09/2008 - 16:59 नवीन
प्रमोदकाका, तुमचे चिमित्कार आवडले. पण कन्दीलाच चमत्कार मी करतोय असा कुठलाहि दावा मी केलेला नाही. इथे मी घाबरण्याचा अथवा कुणाला घाबरवण्याचा प्रयत्नही नाही. मि फक्त मला आलेला अनुभव किन्वा ५-७ वेळा घडलेला योगायोग तुमच्या बरोबर वाटला. तुमच्या कंदीलामुळे (पेटवण्यामुळे)जर कुणी मरतो असे तुम्हाला वाटत असेल तर तो चक्क भाबडेपणा आहे. मनातली सगळी जळमटं काढून टाका. रोज तो कंदील लावा आणि पाहा किती जण मरतात ते. तुमचे काय जातय हो सान्गायला कि रोज कन्दिल लावा म्हणुन... इथे माझ्या ओळखीची माणसे मरतायत! वि.सु. ताई/दादा चे शेपुट नका लावू... तुमच्यपेक्शा वयाने आणि अनुभवाने अजुन खुपच लहान आहे मी. (प्रमोद्काकान्चे चमत्कार आवडलेला)आम्बोळी
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 04/09/2008 - 18:27 नवीन
तुमचे काय जातय हो सान्गायला कि रोज कन्दिल लावा म्हणुन... इथे माझ्या ओळखीची माणसे मरतायत! चल बाळ आम्बोळी(आता बरोबर?) तो कंदील मला देऊन टाक. तू मुंबईत असशील तर मला व्यनिने तुझा पत्ता कळव. प्रत्येकाला कधी ना कधी मरायचे असते. "राम भजन कर लेना की एक दिन जाना है भाई" असे संत कबीराने म्हटलेले आहे. तेव्हा मरणाची भिती कशाला? आणि तुझ्या त्या कंदीलाने मी तरी नक्की मरणार नाही. तो कंदील मला दिलास की तुझी आजवरच्या सर्व पापांमधून सुटका होईल.... ही देववाणी आहे. तेव्हा घाबरू नकोस. मी तो टेबल लॅंप म्हणून तरी वापरू शकेन. कशी आहे आयडियाची कल्पना? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 08:48 नवीन
प्रमोद काका कंदिल पेटवाचे ... अन तु त्यांच्या ओळखीचा म्हणुन तुच टपकायचास .... :))))))))) ह.घ्या. हे सां. न लगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 09:06 नवीन
जबरान् ! आंद्या आला फॉर्मात :-) जोक्स अपार्ट! पण जगामध्ये अशाही कित्येक अतर्क्य गोष्टी/घटना आहेत ज्यांचं आकलन अजुनही मानवी बुध्दीला झालेलं नाही, म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं म्हणण्याचं मी धाडस करु शकत नाही. कदाचित निव्वळ योगायोगही असतील. पण आपण देव मानतो (हा देव ढगातला, आपण प्रमोद देवांना मानतो ही गोष्ट वायली!), आता देव म्हणजे काय? तर माझ्या मते जगातल्या चांगल्या शक्तिंची एकवटलेली मुर्त / अमुर्त प्रतिमा! मग ज्याप्रमाणे चांगल्या शक्ती आहेत, त्याचप्रमाणे नाण्याच्या दुसर्‍या बाजूला वाईट शक्ती असणारच की! त्याच ह्या भुतं-खेतं म्हणूनमानल्या जातात. काही गोष्टी पुराव्यानिशी सिध्द करता येत नाहीत, पण त्यांचा व्यक्तिश: अनुभव आल्यावर माणूस आपले विचार बदलतो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. बालबुध्दीनुसार ते चुकीचेही असु शकेल, पण 'लॉजिकली' मला हे पटतं. - (पडक्या वाड्यातल्या भुतानं घोसाळलेला) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 09:12 नवीन
(पडक्या वाड्यातल्या भुतानं घोसाळलेला) ध मा ल. एक शन्का ! भूतं कधी पासुन आपल्याच लोकाना घोसाळायला लागली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 09:14 नवीन
म्हणतो. काही लोक देव गणाचे असतात, त्यांना काही म्हातारपणापर्यंत भुते दिसत नाहित, मग ते उगाचच "भुते नाहीत ..भुते नाहीत .." अशा अफवा उडवतात. -(कधी कधी अजुनही रात्री शु ला एकटा जायला घाबरणारा) आंद्या भुतकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 10:57 नवीन
माझा राक्षसगण आहे ना...
एक शन्का ! भूतं कधी पासुन आपल्याच लोकाना घोसाळायला लागली?
आता हे त्यांनाच विचारायला हवं. येत्या विकांताला एका मुंजाला भेटायला चाललोय, येता का? मस्त अबीर-गुलाल शिंपडलेला दहीभात, बिब्बे मारलेलं लिंबू असा बेत आहे जेवायला...तेही पिंपळाच्या पानावर! :-)))))
(कधी कधी अजुनही रात्री शु ला एकटा जायला घाबरणारा)
हा हा हा!!! मग रे काय करतोस? तसाच झोपुन जातोस की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
छ
छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 17:02 नवीन
खरं सांगायच तर माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. पण तुम्ही एवढ्या सत्यतेने सांगताय तर त्यात तथ्य आहे असे मानायला हरकत नाही. मला तर फक्त आणि फक्त योगायोग वाटतो... असो. तुमचा जर असल्या गोष्टींवर विश्वास असेल तर तो "कंदील" जाळून टाकणे योग्य ... आमचा विश्वास नाही पण म्हणतात ना " कशाला विषाची परिक्षा ?" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मनोजकामत Wed, 04/09/2008 - 17:56 नवीन
भाकड कथा आहे !!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मनोजकामत Wed, 04/09/2008 - 17:58 नवीन
अशा कथा असलेले पुस्तक असेल तर सान्गा
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 04/09/2008 - 18:32 नवीन
या पुस्तकात अशा पुष्कळ कथा वाचायला मिळतील. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनोजकामत
झ
झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 04:04 नवीन
ए आंबोळ्या, एकतर ही सगळी थापेबाजी आहे कबूल तरी कर नाहीतर तो कंदील जाळून तरी टाक/ किंवा प्रमोदकाकांना भेट तरी देऊन टाक.आणि रामसे चित्रपट बघणं एकदम बंद कर. हे सगळं खरं असेल तर तू तो कंदील अजुन जपून ठेवायचे काय कारण? ह्या विजुभाऊच्या प्रश्नाला आपण सहमत आहोत. चला तोवर मी आता शुचिर्भुत होऊन कर्ज फेडायचा मंत्र म्हणायला जातो!:))
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 04:30 नवीन
मला तो कंदिल बघायची उत्सुकता आहे! ;) बाकी, तू म्हणतोस त्याप्रमाणे दरवेळी कंदिल लावला की तुझ्या ओळखीतलं कुणी ना कुणी तरी मेलंही असेल, परंतु या सगळ्या निव्वळ योगायोगाच्या गोष्टी आहेत! त्या बिचार्‍या कंदिलाचा त्यात काहीच दोष नाही. ;) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 04/10/2008 - 04:42 नवीन
असंच काही नाव आहे एका चित्रपटाचं. मुखवट्याऐवजी कन्दील.असे अनुभव सांगत न बसता ते संपवून टाकावे हे बरे.मनाला कमकुवत करणारे अनुभव विसरून जाणे जास्त चान्गले.शन्केने मनात घर केले की मग नवीन वस्तू घ्यायची भिती वाढत जाईल. ता.क. गरजूंना भाड्यानी द्यायला हरकत नाही. सासू आणी कुत्र्याची गोष्ट आठ्वते ना?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/10/2008 - 05:03 नवीन
कंदिलाची सत्य स्टोरी आवडली, वाचतांना पुढे काय ? पुढे काय ? अशा उत्सुकतेने वाचले आणि एका रहस्यमय कंदिलाची ओळख झाली. अशा भाकडकथांवर आमचा काही विश्वास नाही. पण काही म्हणा स्टोरी जरा हटकेच आहे. :) अवांतर :) स्टोरी खरी का खोटी ते जाऊ द्या !!!पण दररोज कुठे ना कुठे लोक मरताहेत आणि तो या कंदिलाचा प्रताप आहे असे माझे मत आहे ;)
  • Log in or register to post comments
आ
आर्य गुरुवार, 04/10/2008 - 06:02 नवीन
अंबोळ्या..........टाईम पास भारी झाला खरा........छान लिखाण झालंय. तो कंदील अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांकडे द्या, हा ऐक ऊपाय बरा आहे. पण "कंदील" जाळून टाकू नको............. ऐक गिर्‍हाईक नक्की तयार आहे, अर्थात मीच. अंधश्रद्धा द्वेष्टा / भूत कथाप्रेमी (आर्य)
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 04/10/2008 - 08:25 नवीन
काही म्हणा, सॉलीड रहस्य कथा होऊ शकेल. जेव्हा कथानायकाच्या [सध्या त्याला 'आंबापोळी' म्हणुया] जवळच कोणीतरी गचकतं. तेव्हा तो ह्या रहस्याचा शोध घ्यायला सावंतवाडीला जायला निघतो, साधा सोपा प्रवास करत असताना दोन तीन वेळा जीवावर बेतणारे प्रसंग. सावंतवाडीत पोहोचल्यावर कोणी तरी सांगत, इथे खुप जण रहायची पण ४ वर्षापुर्वी दुरच्या खेड्यातुन एक आदीवासी कंदील येउन विकु लागला मग लोक पटापट टपकली. शेवटी एक दिवस लोकांनी त्याला बदडून गावाबाहेर काढला. मग आंबापोळी खाउन दुसर्‍या दिवशी त्या आदीवासी चे गाव शोधत जातो. अमावास्येच्या काळोख्या रात्री त्या खेड्यात... तिथे मग फणसपोळीची एन्ट्री.... पाहता क्षणीच एकमेकांचे जमते... तिचा बाप गावचा वैदु... मग प्रेमकथा.. शेवटी असे कळते की त्या खेड्याला वीजपुरवठा किती ही विनवणी करुन सावंतवाडी व मुंबईच्या अधिकार्‍यांनी दिला नाही म्हणुन मग त्या आदीवासींनी मंतरलेले कंदील त्या दोन्ही ठीकाणी पाठवले सुड उगवायला. आंबापोळी मोठ्या प्रयत्नाने त्या खेड्याला स्वदेश पिक्चर मोबाईल वर दाखवतो. [अर्थात वीज नाही पण त्या गावात मोबाईल व असंख्य मोबाईल बॅटरी पोहोचल्या असतात] मग सगळे स्व:ताच वीजनिर्माण करतात. गाववाले खुश..शेवटी आंबा पोळी - फणसपोळी शुभमंगल... लग्नाच्या पहील्या रात्री फणसपोळीला आंबापोळी तो कंदील सप्रेम भेट देतो. सांगतो उद्या सकाळी तु लाव आणी तुझ्या गावातल्या त्या आपल्या प्रेमाला विरोध करणार्‍या सगळ्या खडुस लोकांची यादी संपल्या शिवाय कंदील काढायचा नायं!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 09:31 नवीन
पाहिजे तोच माणुस मरावा यासाठी काय करत असतील ? त्या माणसाचे नाव चिठ्ठीवर लिहुन ती कंदिलाखाली ठेवत असतील का ? -(बारकावे टिपणारा दिग्दर्शक) आंद्या रामसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 09:37 नवीन
वि.सू. : चीठ्ठी टाईप करुन ठेवावी . हस्ताक्षर कळाले नाही तर कै च्या कै च व्हायचे ( अर्थात डॉक्टर लोकाना अशा कन्दीलाची गरज भासणार नाही)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 05/16/2008 - 18:54 नवीन
अर्थात डॉक्टर लोकाना अशा कन्दीलाची गरज भासणार नाही फारच मर्मभेदी होता.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 09:47 नवीन
पाहिजे तोच माणुस मरावा यासाठी काय करत असतील ? त्या माणसाचे नाव चिठ्ठीवर लिहुन ती कंदिलाखाली ठेवत असतील का ? वि.सू. : चीठ्ठी टाईप करुन ठेवावी. काय राव आम्बोळी ला क्लु देताय की काय ? (नकोती चिठ्ठी पटकन उचलणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments
ब
बकुळफुले Wed, 10/28/2015 - 06:39 नवीन
गुड आयडीया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
आ
आर्य गुरुवार, 04/10/2008 - 10:10 नवीन
रात्रि थेट त्याच्याच अंगणात नेऊन लावायचा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 10:28 नवीन
रात्रि थेट त्याच्याच अंगणात नेऊन लावायचा. कस्सली खत्रा आयडिया!!!! लढ बाप्पू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य
अ
अभिज्ञ गुरुवार, 04/10/2008 - 11:21 नवीन
कंदिल हा कोकणातला असल्याने हा काहि भानामतिचा प्रकार आहे का? भानामति वगैरे प्रकारात असल्या गोष्टि असतात असे कुठे तरि वाचल्याचे आठवते. माझा तरि असल्या गोष्टिंवर विश्वास नाहि.परन्तु एक माहिति म्हणुन विचारत आहे. इथे बरेच जण कोकणातले आहेत्.आम्हि देशावर,कोकणातल्या असल्या फार कथा ऐकल्या आहेत. अजुनहि कोकणात असे प्रकार चालु आहेत का? बाकि कंदिल स्टोरि जरा हटकेच वाटलि.असो ,ज्याचे त्याचे अनुभव. हा जर वापरायचा असेल तर तुम्हि किति भाडे आकरता? काहि ग्रुप स्किम वगैरे आहे का? कंदिलाचि रेन्ज किति आहे.म्हणजे किति अंतरापर्यन्त ह्याचे कव्हरेज आहे? असले बरेच प्रश्न आमच्या डोक्यात आले हो.))))) अबब.
  • Log in or register to post comments
व
वैभव Wed, 05/28/2008 - 15:52 नवीन
च्यायला ....काय सुपिक डोके आहे हो तुमचे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
श
शितल Sat, 04/12/2008 - 17:33 नवीन
क॑दिल पेटवाच्या अगोदर आजु बाजुच्या॑चा विमा उतरावा.
  • Log in or register to post comments
र
रोहित Sat, 04/12/2008 - 18:06 नवीन
अहो कआय हे...? एक कन्दिल के लिये इतना धिन्गना..? रोहित खुश हुअअ..?
  • Log in or register to post comments
व
विदेश Sat, 04/12/2008 - 18:11 नवीन
टेबललॅम्प म्हणून वापरणार? अरे देवा! असली आयडियाची कल्पना सुचण्याची दुर्बुध्दी देवांना देऊ नको रे देवा!!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 04/12/2008 - 20:34 नवीन
खरी खोटी माहित नाय.. पण गोष्ट जबरा आहे....
  • Log in or register to post comments
प
पिस्तुल्या Wed, 04/16/2008 - 13:58 नवीन
अस॑भव सारख्या मालिका जास्त पाहू नकोस . नाहितर असे अनेक भास होणारच!!
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Wed, 04/16/2008 - 14:32 नवीन
he jar dahshatvadyana samjle tar tuza kandil palvun netil ani ..... ..... kinva Bushla samjle tar laden sathi to kandil palvayla sangel. bagh baba kalji ghe ugach kahitari hoil ha......ha.... ha...
  • Log in or register to post comments
आ
आण्याबा Tue, 05/06/2008 - 09:58 नवीन
च्यायची....१६ वर्षात बोलला नाही कधी कंदीला बद्दल्...बस का राव्..हीच का दोस्ती..मला शोले चा आपला फेवरीट डायलॉग आठवला..."मैने तुझे क्या समझा था जय..और तू...तू क्या निकला.."...तुझी खरडवही बघ.. (वाचकांसाठी टीपः १६ हे आंबोळया चं किंवा माझं वय नाही...तेव्हढी वर्षं आमची दोस्ती आहे)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 05/06/2008 - 10:19 नवीन
तो कंदील आहे न तो ज्याला हवा त्याला दे आणि बघ माणस मरतात का? तशीही लोकसंख्या खुप वाढत आहे..त्या निमित्ताने कमी होइल L)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 05/06/2008 - 10:34 नवीन
ममीवरून आठवले.. 'तो' लेख बहुधा एका रविवार नवाकाळ मध्ये कॅ.वासुदेव बेलवलकर या॑नी लिहिला होता. त्याच लेखका॑नी राघोबादादा पेशव्या॑च्या पुजेत असलेल्या अघोरी गणपतीचीही गोष्ट लिहिली होती..तीही मूर्ती जिथे जिथे गेली तिथे तिने प्रलय माजविला असे म्हणतात. नुकतीच सकाळ मध्ये भानामतीबद्दलची बातमी अनेक पुणेकरा॑ना आठवत असेल.. पुण्याजवळील एका गावा॑त (गु॑डवस्ती) भरदिवसा सगळ्या॑च्या देखत आपोआप आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. अ॑.नि.स ने सुद्धा सत्य शोधण्याचे खूप प्रयत्न केले तर त्या॑च्या कार्यकर्त्या॑च्या डोळ्यादेखत तीन ठिकाणी आगी लागल्या..कडक पोलीस पहार्‍यातही आगी लगल्यामुळे त्या कुटु॑बाने अखेर वस्ती बदलण्याचा निर्णय घेतला..आता बोला
  • Log in or register to post comments
क
केशवराव Tue, 05/06/2008 - 15:26 नवीन
काय प्रतिक्रिया देणार ? कप्पाळ ?
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/16/2008 - 23:44 नवीन
पुर्वी अंधारात जायाचं भ्याव वाटायचं म्हुन लोक कंदील घिवुन जायाचे. आता म्हंजी जर ग्येला कुनी हा कंदील घिवुन तर तिच्या मारी, काळा गुडुप अंधार परवडला, पर ह्या कंदिलाचा असला "प्रकाश" आपल्यावर पडु नये ह्याचीच कुनाला बी भीती वाटल की राव.... आता घाबरावं अंधाराला की , कंदिलाला? :-) :-)) आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Sat, 05/17/2008 - 03:27 नवीन
च्यामारी इथं कधीही आलं तरी आंबोळ्याच्या भन्नाट बुद्धीमत्तेवर आधारित हा लेखन कायम मुखपृष्ठावर झळकत असतो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 15:28 नवीन
आंबोळी राव तुमच्या मयताचा लेख (म्हणजे तुम्ही लिहलेल्या मयता विषयी म्हणतोय मी.....)वाचला.सध्या माझ्या प्रमाणेच माझे वडील ही मिपा चे वाचक आहेत.....त्यांनीही हा तुझा लेख वाचला आणि ते मला म्हणाले आंबोळी चा कंदील शोधुन दे !!!!! (म्हणजे तुमचा हा लेख हो.....) आता ते म्हणत आहेत अरे प्रतिक्रिया नंतर दे आधी मला वाचू दे !!!!! (लगे रहो आंबोळी)असे म्हणणारा;;;;; मदनबाण.....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा