प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं. त्यांनी करदात्यांचे वैफल्य, सामान्य माणसाचे जिवन, राडेबाजी ह्या मुद्द्यांचा आधारे आपल्या राखीव कुरणात बेसलेस विधाने आणि आगापिछा नसलेले आरोप घेऊन बराच उतमात घालता.
शेवटी आमच्या पराला "शोध विचारवंताचा" नामक मोहीम राबवावी लागली.
सूहासने एक दणदणीत अणि मुद्देसुद प्रतिसाद देऊन ह्या विचारवंतांच्या धोतरालाच हात घातला व अवलियाशेठनी त्यांच्या निषेधाद्वारे ह्यांच्य वर्मावरच घाव घातला.
त्याच पार्शभुमीवर आम्ही ४ ओळी खरडल्या आहेत, मुळ प्रेरणा हे "मंगेश पाडगावकरांची एक कविता" ...
जे आहे ते गोड मानुन घ्या ... ;)
*****************************
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?नव्या रक्ताचे सुशिक्षीत युवक
'नवनिर्माणासाठी' जमणार,
चर्चा, निदर्शन, आंदोलन, निषेध
करीत प्रवाहात उरतणार !यांच सुख नसतच मुळी
कधी ह्यांच्यासाठी,
एकच गोष्ट यांची असते
कपाळावर आठी !कधीसुद्धा यांचा संयम ढासळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?यांचा धोशा सुरु असतो
'रस्त्यावर उतरणं वाईट,
त्यानं ट्राफिक ज्याम होतं !
आंदोलनं मुळीच करु नका,
त्याने सामान्यांचं जीणं हराम होतं !
क्रांत्या-बिंत्या सगळं झुट,
त्याने करदात्यांना वैफल्य येतं! 'संयमाचे पुतळेच हे
यांच रक्त चुकुनही सळसळत नाही !
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?सगळेच कसे ऑफिसातुन
लंबेचौडे तात्विक लेख लिहणार ?
किंवा हातामध्ये गीता घेऊन
'चिंता विश्वाची' करीत बसणार?पांढरपेशी सुखवस्तु कोष झुगारुन कोणी
अन्यायाविरुद्ध उभारतचं ना ?
हातात फलक घेऊन जयघोषात
रस्त्यावर उतरतंच ना?असं काही दिसलं की
यांच माथं भनकलचं,
यांच्या वैचारिकतेचं गळु
अवघड जागी ठणकलचं !वांझोट्या शाब्दिक चर्चांचं यांच्या
वेगवाग घोडं असतं !
पण यांना समविचारी भेटतात कसे
हे एक कोडं असतं ?या कठिण कोड्याचं उत्तम मात्र मिळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?कसल्याही राड्याला
हे सतत भीत असतात
एरंडेल प्यावं तसं
आयुष्य पीत असतातएरंडेल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार ?
एकच क्षेत्र ठरलेलं
दुसरीकडे कुठे जाणार ?कारण आणि परिणाम
यांच नातं टळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?
- (राडेबाज) छोटा डॉन
प्रतिक्रिया
13 Nov 2009 - 9:04 am | लवंगीमिरची
सगळेच कसे ऑफिसातुन
लंबेचौडे तात्विक लेख लिहणार ?
किंवा हातामध्ये गीता घेऊन
'चिंता विश्वाची' करीत बसणार? =))
झकास!
आवडली कविता :)
13 Nov 2009 - 9:35 am | विशाल कुलकर्णी
झकास रे डान्या !
{आता या मुजोरीबद्दल मिपावरून तुझ्या निलंबनाची मागणी करावी का? या विचारात असलेला एक विचारवंत..... } ;-)
=)) =)) =)) >:) >:)
=D> =D> =D> =D> =D>
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 9:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्राव, सहमतीचे प्रतिसाद लिहायचे म्हटले की माझ्यासारखे फक्त विचारच करू शकणारे पण विचारवंत नसलेले घाबरतात. उगाच कोण, कुठून, कसले आरोप करेल कसं सांगता येईल नाही का?
पण जाऊ दे, या एरंडेलांना काय घाबरायचं?
कविता आवडली.
अदिती
13 Nov 2009 - 9:41 am | निखिल देशपांडे
डॉणराव सही आहे कविता
कसल्याही राड्याला
हे सतत भीत असतात
एरंडेल प्यावं तसं
आयुष्य पीत असतात
एरंडेल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार ?
एकच क्षेत्र ठरलेलं
दुसरीकडे कुठे जाणार ?
काही कडवे खासच जमले आहेत हा...
(राडेबाज)निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
13 Nov 2009 - 9:48 am | अवलिया
जबरदस्त डान्राव ! जियो !!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
13 Nov 2009 - 10:06 am | बिपिन कार्यकर्ते
डान्या मेल्या काय अप्रतिम कविता रे... झबर्डस्ट.
बिपिन कार्यकर्ते
13 Nov 2009 - 10:07 am | शेखर
झणझणीत अंजन घालणारी कविता....
13 Nov 2009 - 10:22 am | फ्रॅक्चर बंड्या
मस्त आहे बर का कविता .. डॉनराव
13 Nov 2009 - 10:25 am | सहज
सगळेच कसे ऑफिसातुन
लंबेचौडे तात्विक लेख लिहणार ?
बाकी लंबेचौडे लेखनात डानरावांना टक्कर देउ शकेल असे कोणी दिसत नाही ;-)
13 Nov 2009 - 10:48 am | छोटा डॉन
च्यायला आम्हालाच टोला का ?
बरं बरं, असु द्यात ...
मात्र सुतावरुन स्वर्ग गाठुन आम्हाला 'विचारवंत' ठरवुन एत्तदेशीय समाजातुन हद्दपार करु नका म्ह्नजे झाले.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
13 Nov 2009 - 11:25 am | Nile
ह्यावरुन उगाच एक ओळ आठवली, मनी वसे ते स्वप्नी दिसे! ;)
बाकी काही ही म्हणा हा, ह्या आमदार लोकांमुळे (जरी जर्मनीत साहीत्य जाळलं गेलं असलं) तरी इथे मात्र साहीत्याला चांगलेच दिवस आलेले आहेत असं दिसतंय! ;)
ह. घ्या हो डॉन्राव!
स्वतःच्या घरची बँडवीड्थ पैसे देउन वापरणारा. ;)
13 Nov 2009 - 10:58 am | विनायक प्रभू
रे डॉन्या.
माजिवडा नाक्यावर रात्री 'मिनि' पाकिस्तानातुन हल्ला होइल म्हणुन उभारलेल्या संरक्षक फळीत मला एकही विचारवंत दिसला नाही.
अविचारवंत विप्र
13 Nov 2009 - 11:31 am | llपुण्याचे पेशवेll
डानरावांची प्रतिभा बहरली की काही औरच रंग दिसतो. डान्राव आमच्याही मनातले विचार कवितेद्वारे बाहेर काढल्याबद्दल आपले आभार मानावे तितके कमीच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
13 Nov 2009 - 11:46 am | मुक्तसुनीत
कविता रोचक आहे. मुख्य म्हणजे ज्यावर विचार करावा , सहमती द्यावी किंवा प्रतिवाद करावा अशा लायकीची आहे. या जातीचे बाकीचे साहित्य जे इथे सध्या दिसते त्यावर मी पामर काय टिप्पणी करणार.
"चैतन्यपूर्ण" , "तरुण रक्ताच्या" "क्रांतीकारक" घटकांना अर्घ्य वाहताना, ज्यांना विरोध करायचा आहे त्यांच्या बाबतीत सरसकटीकरण करण्याची गंमत याही कवितेमधे आहेच. असो.
कवितेमधून काही रोचक निष्कर्ष निघताना दिसतात :
- जे दगडफेक करत नाहीत ते कृतीशीलच नसतात.
- शांततापूर्ण रीतीने मार्ग आक्रमणार्याना - मग ते सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा इतर कुणी - मराठी अस्मिता , अभिमान वगैरेशी काही देणेघेणे नसते. अस्मितेसारख्या गोष्टींवर आक्रमक , दगडफेक करणार्यांची मोनॉपली आहे. भाषेची चळवळ विधायक मार्गाने चालवणारे - त्यांना कसली आली आहे अस्मिता नि अभिमान ?
- एकंदरीत ज्यांना वादातून काही तत्वबोध करून घ्यायचा आहे त्यांचे शब्द "वांझोटे" असतात. याउलट या कवितेमधल्या विचारसरणीला अनुलक्षून असणारे धागे - त्यांना बहुप्रसव म्हणायला हवे.
कवितेमधले "चैतन्याला" , "कृतीशीलतेला" केलेले आवाहन दिलासा देणारे आहे. मात्र चैतन्याची नि कृतीशीलतेची व्याख्या अंमळ कोती वाटली खरी. असो.
13 Nov 2009 - 12:09 pm | छोटा डॉन
मुसुराव,
तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी आहे ...
नुसती कविता लिहुन भागत नाही, तर त्या कवितेतुन मला नक्की काय म्हणायचे आहे हे एका प्रतिसादातुन लिहणे आवश्य्क होते. आपण त्याच अनुषंगाने बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत.
आता मला ह्याचे सविस्तर विवेचन करणे सोपे जाईल.
थोडा निवांत वेळ मिळताताच एक ( बहुतेक दिर्घ ) प्रतिसाद लिहुन आपल्या मुद्द्यांना उत्तरे व लगेहात माझी कवितेमागची भुमिका व काही अंशी कवितेत व्यवस्थित व्यक्त न झालेल्या भावना इथे देण्याचा प्रयत्न करेन.
मुख्य विषयाला तोंड फोडल्याचे पाहुन बरे वाटले व कवितेचे सार्थक झाले असे म्हणेन.
धन्यवाद ....
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
13 Nov 2009 - 2:19 pm | टारझन
डॉनराव आणि मुक्तसुनित ह्यांच्याशी सहमत !! :)
-- डॉनित्त मात्र
13 Nov 2009 - 2:53 pm | विशाल कुलकर्णी
टार्याशी सहमत ;-)
मत्त (उन्मत्त) 'मात्र'
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 1:09 pm | ब्रिटिश टिंग्या
सुंदर प्रतिसाद!
14 Nov 2009 - 12:04 am | जृंभणश्वान
भारी आहे, आवडली.
>>- शांततापूर्ण रीतीने मार्ग आक्रमणार्याना - मग ते सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा इतर कुणी - मराठी अस्मिता , अभिमान वगैरेशी काही देणेघेणे नसते. अस्मितेसारख्या गोष्टींवर आक्रमक , दगडफेक करणार्यांची मोनॉपली आहे. भाषेची चळवळ विधायक मार्गाने चालवणारे - त्यांना कसली आली आहे अस्मिता नि अभिमान ?
हा मुद्दा येथे गैरलागू ठरावा कारण कवीने आपला रोख कुणावर आहे ते प्रेरणा लिहून स्पष्ट केले आहे. अचानक मोडतोड, कर याविषयी जाणीव झालेला वर्ग यांना उद्देशून आहे ही कविता.
कवीने स्वतःच कवितेच्या मर्यादा सांगितल्यावरही त्यांच्यापलिकडे कवितेचा विचार करण्यासारखे झाले हे.
13 Nov 2009 - 11:59 am | मनीषा
'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?
अचूक मर्मभेद ...
----- किंवा हातामध्ये गीता घेऊन
'चिंता विश्वाची' करीत बसणार?
इथे गीता ऐवजी (उ)दासबोध कसा वाटेल?
13 Nov 2009 - 12:53 pm | गणपा
तरी सांगत होतो या तथाकथित विचरवंताना की या डॉन्रांवाच्या शेपटावर पाय ठेवुनका ;)
कविता एकदम चाबुक.
जियो डॉन्या.
(वरिल जियो शब्द मालकांकदुन भाडेतत्वावर घ्येतल्याला हाये)
13 Nov 2009 - 1:01 pm | यशोधरा
=))
13 Nov 2009 - 1:02 pm | अमोल केळकर
जबरदस्त झटका
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
13 Nov 2009 - 1:02 pm | प्रसन्न केसकर
डानराव तुमच्या-आमच्या सारख्या लोकांचा असा पाठिंबा मिळाला की हत्तीचं बळ येतं कार्यकर्त्यांना. असाच पाठीवर हात ठेऊन लढ बाप्पु म्हणा या ओळिंची आठवण व्हावी असे आघात सहन करत असतात कार्यकर्ते रोज. चुकतात कधी ते, पण चुका काहीतरी काम केलं तरच होतात ना? फक्त विचार करणार्या निष्क्रिय विचारवंतांच्या कशा होतील चुका?
अवांतरः राज ठाकरे आणि त्या चार आमदारांवर झारखंडच्या न्यायालयात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. आता प्रतिक्षा आहे तो असा काहीतरी गुन्हा इथं महाराष्ट्राच्या न्यायालयात दाखल व्हायची. मग यथावकाश होतीलच अर्ज आणि हट्ट की न्यायालयांच कामसुद्धा हिंदीतच चालावं मराठीत नको म्हणुन.
पक्का राडेबाज अन कृतिशिल अविचारवंत
पुनेरी.
13 Nov 2009 - 1:15 pm | अवलिया
चुकतात कधी ते, पण चुका काहीतरी काम केलं तरच होतात ना?
अहो पण ते चुकत आहेत असा निष्कर्ष कसा काढला ? आणि कुणी काढला ? कशावरुन काढला ?
ते चुक की बरोबर हे ठरवण्याचे कार्य (!) पूढच्या पिढीचे. आपले नाही. आपण आज एसीरुममधे बसुन कसे काय ठरवणार की पाच, दहा, पन्नास वर्षांनी राजकीय, सामाजिक स्थिती काय असेल ? (आर्थिक बाबींबद्दल बोलत नाही, अनेकांच्या कंबरा ढिल्या पडायच्या ! )
आणि हे जे काही चालले आहे ते चूकच आहे म्हणुन डांगोरा पिटायचा ? असो.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
13 Nov 2009 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार
साला डान्रावने ने एक मारा , लेकिन सॉलीड मारा कि नही ?
डान्राव ज ह ब र्या काव्य हो !!!
©º°¨¨°º© पराज ठाकरे ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Nov 2009 - 3:06 pm | सूहास (not verified)
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_
_/\_
_/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_
सू हा स...
13 Nov 2009 - 3:23 pm | आनंदयात्री
सह्ही रे डॉन्या ..
तुझ्या या आधारित काव्यातुन (मी विडंबन म्हणनार नाही) तु तुझे मत छान मांडले आहे. वाचले आवडले आणी पटले !!
तु पण चालुकर आता शुक्रवारची विडंबने !!
13 Nov 2009 - 4:45 pm | समंजस
कविता डॉनराव...
कुठल्याही निमीत्ताने का होईना, तुमच्या कडून एक जबरदस्त कविता वाचायला मिळाली.
(अवांतर: असं का? भावना उफाळून आल्या की उत्तम काव्य/साहित्य निर्मीतीला एकदम उधाण येते :? )
13 Nov 2009 - 9:22 pm | sujay
डान्राव लई भारी .
'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?
ह्या ओळी विशेष भिडल्या.
असाच हाणत रहा.
_/\_
सुजय
13 Nov 2009 - 9:50 pm | ऋषिकेश
लै भारी कविता
खणखणीत आहे एकेक कडवं
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
13 Nov 2009 - 11:49 pm | टुकुल
झणझणीत डानराव..
_/\_ _/\_ _/\_
--टुकुल
14 Nov 2009 - 12:51 pm | छोटा डॉन
तसं पाहिलं तर काव्य, चारोळ्या वगैरे काव्यप्रकार हा आमचा प्रांत नव्हेच. पण कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त प्रभावीपणे आपले मत मांडण्यास काव्याहुन उत्तम मार्ग नाही ह्याची आम्हाला पुर्वीपासुनच जाणीव होती म्हणुन आम्ही हा प्रयत्न केला.
नेमका हेतु काय होता ते प्रसन्नदाने करेक्ट ओळखले.
जनरली आपण रस्त्यावर उतरणारे, राडा करणारे, आंदोलने करणारे लोक हे गुंडपुंड प्रवॄत्तीचे असतात ह्या एकाच दृष्टीने त्यांचे साचेबद्द सामान्यिकरण करतो. पण बर्याच वेळा परिस्थिती वेगळी असते. आजकाल चांगल्या घरचे, शिकले सरवरलेले, रोजच्या आयुष्यात आपले नोकरी-धंदा व्यवस्थित संभाळणारे तरुण ह्या समाजासाठी मला काहितरी करायचे आहे ह्या भावनेतुन 'प्रत्यक्ष कॄती'ला महत्व देत ह्या प्रवाहात सामिल होतात, आंदोलने करतात. पण आपले दुर्दैव असे की नेहमी ह्या आंदोलनाची 'वाईट बाजुच' चघळण्यात व त्यावर टिकेची झोड उठवण्यात मिडायावाल्यांना व आंतरजालावर लेखन करण्यार्या तुमच्या आमच्यासारख्या सुशिक्षितांना धन्यता वाटत आली आहे. आंदोलकांच्या चुका घडतात हे जरी मान्य असले तरी केवळ त्यावर टिका करणे योग्य आहे नव्हे का ? का त्यासाठे त्यांच्या आंदोलनातुन बाहेर आलेले चांगले रिझल्ट्सही आपण केवळ सरसकटीकरण करायचे म्हणुन असेच दुर्लक्षित करणार ?
हे असेच चालत राहिले तर त्या तरुणांना वैफल्य येणार नाही का ? दररोज उठुन "गुंड, राडेबाज, दंगेखोर" म्हणुन शिव्या खाण्यासाठीच का केला होता हा अट्टाहास ? कोणतीच गोष्ट ह्या जगात १००% चुक अथवा बरोबर नाही, मग आम्ही त्यांच्या काही चांगल्या गो़ष्टींचे कौतुक केले तर कुठे बिघडले ?
हेच आम्ही कवितेत खालील कडव्यांमर्फत सांगत आहोत.
आपले घरदार सोडुन, कुटुंबियांचा आणि समाजाचा रोष पत्करुन, आपल्या नोकरी-धंद्यामधल्या इमेजेस पणाला लाऊन हे लोक मुळ प्रवासातुन रस्त्यावर उतरत असतातच ना ?
मग वर पुणेरी जसे म्हणतात तसे "असा पाठिंबा मिळाला की हत्तीचं बळ येतं कार्यकर्त्यांना. असाच पाठीवर हात ठेऊन लढ बाप्पु म्हणा या ओळिंची आठवण व्हावी असे आघात सहन करत असतात कार्यकर्ते रोज" ह्याचा विचार करुन केवळ त्यांना आम्ही तुमच्यासोबतच आहोत. तुम्ही बिनधास्त लढा हा विश्वास देण्यासाठी व पाठीवर हात ठेऊन "लढ बाप्पु" म्हणण्यासाठी आम्ही ह्या कवितेचा वापर केला.
आता प्रमुख मुद्दा असा की मी जे सो कॉल्ड "विचारवंताना" टार्गेट करुन विचारवंत हा शब्द शिवीसारखा वापरल्याचा किंवा विचारवंतांचे सरसकटीकरण केल्याचा.
एक स्पष्ट करतो की इथे माझ्या दृष्टीने विचारवंत म्हणजे 'केवळ स्वतः काहीही न करता प्रत्येक गोष्टीत विविक्षित पक्षांना टार्गेट करणारे, कसल्याच अस्मितेच्या उत्सवात कधीच सुख न मानणारे, विरोधासाठी विरोध करावा म्हणुन अजिबात पुरावा नसलेले आणि बेसलेस आरोप करुन आगपाखड करणारे, केवळ मी कर भरतो आहे म्हणुन मी कसल्याच सामाजिक गोष्टीला बांधिल लागत नाही हा अॅटिट्युड असणारे. शिवाजी जरुर निर्माण व्हावा पण दुसर्याच्या घरात आणि त्याने जरुर स्वराज्य निर्माण करावे पण त्याचा त्रास मला नको अशी कनिष्ठ मनोवॄत्ती असणारे. आपण केलेले निराधार आरोपात आपण चक्क तोंडघाशी पडलो आहे ह्याची जाण असुनचसुद्धा आपण केलेल्या अनाठायी आदळाआपटीबद्दल २ शब्द दिलगिरीचे न लिहणारे" वगैरे वगैरे सर्व माझ्या दृष्टीने ह्या कवितेत "विचारवंत" ह्या गटात मोडतात. इतकीच माझी कक्षा आणि मर्यादा आहे, ह्या मर्यादेबाहेर मी कुणाला टोमणे मारले नाहीत किंवा कुणाचे अवमुल्यन केले नाही, तसा आरोप मी स्पष्टपणे नाकारतो आहे.
त्यामुळे मी माझा "प्रत्यक्ष कॄतीवर विश्वास ठेऊन काम करण्यासाठी रस्तावर उतरणार्या नव्या सुशिक्षित वर्गाला पाठिंबा देऊन लढ म्हणण्याचे व त्याबरोबर ह्या पाखंडी आणि ढोंही तसेच अत्यंत स्वार्थी अॅटिट्युड असणार्या विचारवंत वर्गाला ४ बोल सुनावण्याचा" उद्देश ह्या कवितेतुन काही अंशी पुर्ण झाला असे मानतो.
आता काही मुसुशेठ यांच्या प्रश्नांबाबत :
नाही, असे सरसकटीकरण केलेले नाही. ज्यांना मी विरोध केला आहे त्यांची "कक्षा" स्प्ष्ट आहे. मुळ कवितेत मी "ऑफिसातुन लंबेचौडे लेख लिहणारे किंवा चिंता विश्वाची करत बसणारे" हे शब्द वापरुन तसेच "ट्राफिक ज्यॅम, करदात्यांना वैफल्य, सामान्यंच सो कॉल्ड जीणं हराम होणं वगैरे" शब्दांचा वापर करुन मला ज्यांना विरोध करायचा आहे त्या वर्गाची कक्षा स्पष्ट केली आहे असे वाटते, त्यामुळे मला इथे सरसकटीकरण वाटत नाही. तसे वाटत असल्यास मी माझ्या कवितेच अपयश काही अंशी मान्य करतो.
असे मी कुठेच म्हणलो नाही, मी जेव्हा वर माझ्या कवितेची उद्दिष्टे स्पष्ट केली तेव्हा त्यात मला ज्या वर्गाचे कतुक करायचे आहे अशांविषयी ४ शब्द चांगले लिहले आहेत..
बाकी ते न करता इतरही मार्गाने कृती करता येत येते हे मला १००% मान्य आहे पण तो इथे माझा विषय नाही व त्यावर मी इथे टिप्पणी केली नाही त्यामुळे ते कॄतीशील नसतात असा आरोप मी करण्याचा प्रश्नच नाही.
वर उत्तर दिलेच आहे. अस्मिताची ही सर्वांचीच असते. मात्र इथे केवळ उपरोक्त व्य्याख्या अपेक्षित असणार्या वर्गाने ती जागवण्यासाठी जी कॄतीशील भुमिका घेतली त्याचे कौतुक मी ह्या कवितेत करतो. त्यांच्या पाठीवर पाठिंब्याचा हात ठेवतो.
बाकी इतर शांततापुर्ण मार्गाने कृती करणार्या वर्गाबद्दल मी इथे चर्चा करत नाही कारण ती माझ्या कवितेची कक्षा नाही.
ज्यांना केवळ विरोधासाठी विरोध करायचा आहे आनि केवळ आगपाखडच करायचे आहे पण त्याबरोबर स्वतः कधीही मुळ प्रवाहात सामिल होण्याची तयारी नसणार्या व केवळ उंटावर बसुन शेळ्या हाकणे अपेक्षित असणार्या वर्गाने केलेल्या चर्चांची व्याख्या मी इथे "वांझोट्या" अशी करतो.
बाकी विधायक आणि आवश्यक चर्चांबद्दल मला इथे टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही व तसे दु:साहस मी केलेलेही नाही.
:)
धन्यवाद शेठ.
बाकी मी मला इथे ह्या कवितेत अपेक्षित असणारा "कृतिशील वर्ग" आणि त्याची व्याख्या मी वर सुस्पष्ट केली आहे. इतर अनेक मार्गांनेही कृती करता येते ह्यावरही माझा विश्वास आहे पण तो मुद्दा आणि तो वर्ग इथे मला चर्चेत अपेक्षित नसल्याने मी त्यावर टिप्पणी केलेले नाही.
मी उपरोक्त व्याख्यित केलेला रस्त्यावर उतरुन काम करणारा वर्गच मला इथे अपेक्षित आहे व मी इथे त्यांना "कॄतीशील" संबोधतो.
आज ह्या कॄतीशील वर्गावर जे आगपाखड होते त्यातुन त्यांना दिलासा मिळावा व ४ कौतुकाचे बोल ऐकवावेत असा मी कवितेत प्रयत्न केला.
बाकी कविता आवडल्याचे कळवुन आवर्जुन प्रतिसाद देणार्या व न देणार्या सर्वांचेच आभार ....
मी कवितीत व्याख्या केलेल्या कृतीशील वर्गाला आज पाठिंब्याची व पाठीवर हात ठेऊन लढ म्हणण्याची आवश्य्कता आहे असे मला मनस्वी वाटले व आपणही त्या कॄतीला पाठिंबा दिलात ह्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार.
धन्यवाद !!!
------
(सुस्पष्ट व आभारी )छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
14 Nov 2009 - 12:53 pm | विसोबा खेचर
'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?
जबरा!
आपला,
(मराठी) तात्या.
4 Feb 2011 - 6:42 pm | अवलिया
सर येउद्या अजुन असेच सुंदर लेखन !!