सूहासचा जाहिर निषेध !!

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
12 Nov 2009 - 6:50 pm
गाभा: 

आमचे परममित्र सूहास यांनी नुकताच एक प्रतिसाद दिला.

तो प्रतिसाद इथे वाचता येईल.

हा प्रतिसाद वाचुन अनेक तथाकथित विचारवंत तोंडघशी पडल्याचे समजते.

केवळ अर्धवट किंवा चुकीच्या माहितीवर आधारित एखाद्या बद्दल मत बनवण्याच्या विचारवंती वांझोट्या पद्धतीला ही बसलेली चपराक आहे असे आम्ही समजतो.

अशा प्रकारे चर्चेत भाग घेवुन चुकीच्या लोकांना बदनाम करण्याचे विचारवंतांचे कट कारस्थान उघड झाल्याने त्यांची अंमळ चिडचिड होवुन त्यांनी स्वतःच्या थोबाडीत दोन मारुन घेतले आणि आपल्या अहिंसा व्रताचा त्याग केला असे ही आमचा वार्ताहर कळवतो.

गुळ मुळीत विचारवंतांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आता गुंडापुंडाच्या ताब्यात असल्याने आम्हाला फार वाईट वाटत आहे.

वांझोटी चर्चात्मक आव्हाने आणि कृतीहीन विचार यांचा आदर्श ठेवुन पुढे चालायचे ह्या आदर्शाला एक खिंडार पडले आहे.

आणि याला जबाबदार आहे तो सूहास.

सूहासचा जाहिर निषेध ! जाहिर निषेध !! जाहिर निषेध !!!

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

12 Nov 2009 - 6:55 pm | धमाल मुलगा

नाना आता पुन्हा लेख लिहिलात...
आता पुढच्या होणार्‍या हल्ल्यांना तयार रहा बरं का! :D

(स्वगतः चार सडेतोड प्रतिसादांचं काय, ज्याला खरोखर चाड आहे तो असा सरळ लेख लिहुनही व्यक्त होतो :) )

अवलिया's picture

12 Nov 2009 - 7:02 pm | अवलिया

आता पुढच्या होणार्‍या हल्ल्यांना तयार रहा बरं का!

अरे काय करतील ? वैयक्तिक चिखल फेक आणि गरळच ओकतील ना ? मुळ आयडीतुन आणि डुप्लिकेट आयडीतुन ! ओकु दे.

आणि बाकी मित्रमंडळी रागावतील .. रागावु दे.. !

आज नाही तर दोन पाच दहा वर्षांनी कळेलच त्यांना कोण बरोबर ? कोण चूक ! काही फरक पडत नाही.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2009 - 10:38 am | विशाल कुलकर्णी

यंव रे यंव ! णान्याच्या या उदगारांना सुवर्णाक्षरांनी टंकित करुन ठेवण्यात यावे अशी तात्यांना णम्र विणंती !
नानागुरू...
आमालाबी गंडा बांधा ना राव तुमचा. (गंडा घालु नका मात्र) ;-)

=)) =)) =))

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

यशोधरा's picture

12 Nov 2009 - 7:02 pm | यशोधरा

सुहासचा प्रतिसाद खरच उपयोगी होता. निदान वस्तुस्थितीची योग्य माहिती असेल, तर वावड्या तरी पसरत नाहीत, आणि घरापासून लांब राहणार्‍या आमच्यासारख्यांना काळजी तरी लागून राहत नाही.

सुहास, धन्यवाद. :)

आणि सर्वसामान्यांना कोणत्याच राजकीय पक्षाकडून कोणताच त्रास होऊ नये हेही माझे मत आहे.

सहज's picture

12 Nov 2009 - 7:03 pm | सहज

सहमत आहे.

सूहासचा प्रतिसाद चर्चेत प्रभावी वाटला.

निखिल देशपांडे's picture

12 Nov 2009 - 7:00 pm | निखिल देशपांडे

नाना लेख लिहुन मोकळा
आम्ही तर आप्ले प्रतिसादच टंकत बसलो होतो...
असो हा एका विशिष्ट कंपु ने विशिष्ठ लोकांसाठी लिहिलेला धागा...
चालुच द्या रे कंपुतील सर्वांनो

(कर न भरणारा = राडेबाज)निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

गणपा's picture

12 Nov 2009 - 7:07 pm | गणपा

बर केलस नान्या नवा धागा काढलास ते ५० प्रतिसाद झाले की दुसर्‍या पानावरचे नवीन प्रतिसाद नवीन असे दिसत नाही आणि मग सगळेच नवीन समजुन वाचलेलेच परत वाचुन वाचुन माझ्या सारख्या आडाणी अविचार्‍याचा अंमळ अजुनच गोंधळ उडतो.
अरे अरे त्या सुहासचा निषेध करायचं राहुनच गेलं.
निषेध निषेध निषेध त्रिवार निषेध!!!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार

सूहास वाह वाह वाह शाब्बास !

महाराष्ट्राचा महाप्रतिसादकर्ता सूहास !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2009 - 7:50 pm | llपुण्याचे पेशवेll

+१ सहमत.
महाराष्ट्र नवप्रतिसाद सेना जिंदाबाद.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

छोटा डॉन's picture

12 Nov 2009 - 7:09 pm | छोटा डॉन

नशिब नान्याना धागाच काढला, एखादा असता तर त्याने शेप्रेट ब्लॉग काढुन त्यावर गरळ ओकली असती.

वास्तविक पहाता ह्यात आमचा परममित्र सूहास ह्याचा निषेध झाला हे वाचुन वाईट वाटले, त्याच सनकेत माझ्या हातुन लॅपटॉप पडता पडता वाचला व आंतरजाल एका राड्यापासुन सुरक्षित वाचले हो !
लॅपटॉप पडला, काचा फुटल्या, वायरी तुटल्या म्हणजे सर्वनाशच की हो, ते ही मी कर चुकवुन वाचवलेल्या पैशाचा ...

असो, विचारवंतांचे अभिनंदन ....

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

प्रसन्न केसकर's picture

12 Nov 2009 - 7:10 pm | प्रसन्न केसकर

हम तुम्हारे साथ है!

एव्हढच बोलतो.

पक्का कंपुबाज, राडेबाज अन अजिबात विचारवंत नसलेला
पुनेरी

टुकुल's picture

12 Nov 2009 - 8:29 pm | टुकुल

हम भी साथ है.
बघा हिंदी भाषेचा मला राग नाही :-)

मराठमोळा,
टुकुल.

मदनबाण's picture

12 Nov 2009 - 7:12 pm | मदनबाण

काय नाना सेठ,बटाट्यांची पोतीच स्टॉक मधे ठेवलीत की काय ? ;)

(पोटॅटो वडा खाणारा...) ;)

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

पर्नल नेने मराठे's picture

12 Nov 2009 - 7:25 pm | पर्नल नेने मराठे

सुहास अरे तु आपली बाजु उचलुन धरायची सोडुन बसचे आकडे काय देतोस.... X( वाआआआआआआ
चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 7:33 pm | परिकथेतील राजकुमार

लहानपणापासुन आकडा खेळायची सवयच आहे त्याला.

©º°¨¨°º© दूर्वास ©º°¨¨°º©
आमचे राज्य

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Nov 2009 - 7:33 pm | ब्रिटिश टिंग्या

चावुन चावुन चावुन चावुन चावुन चोथा झालेला विषय!

आता उगी आगीत तेल टाकता टाकता -

पुण्यातील सर्वसामान्य मराठी लोकांच्या सोईसाठी असलेल्या पीएमटी बसेसच का फोडल्या हो?

पुणे-दरभंगा किंवा गेला बाजार पुणे गोरखपुर एक्स्प्रेसवर दगडफेक का नाही केली?

म्हणजे उत्तर भारतीयांच्या निषेधार्थ मराठी लोकांची पीएमटी फोडा.....पण उत्तरभारतीय ज्या ट्रेनने येतात तीला हात लावु नका......व्हेरी फनी! :)

- (पीएमटीने प्रवास करणारा सर्वसामान्य मराठी माणुस) टिंग्या

प्रसन्न केसकर's picture

12 Nov 2009 - 7:50 pm | प्रसन्न केसकर

तु गोल्डमॅनच्या मतदारसंघातला ना? बस जाऊ दे, गेलाबाजार किती काजुंची टरफल फोडलीयेस रे आजपत्तोर?

अरे लोकांनी उत्स्फुर्तपणे केलेल्या आंदोलनांमधे अशी ठरवुन तोडफोड होत नसते रे. अश्या आंदोलनात तोडफोड हा हेतु नसतो. ती प्रक्षिप्त प्रतिक्रिया असते.

(खातोय आता मार टिंग्याचा)

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Nov 2009 - 7:52 pm | ब्रिटिश टिंग्या

बस एकही नाही.....
काजु शक्यतो सोललेलेच खातो! :)

धमाल मुलगा's picture

12 Nov 2009 - 8:30 pm | धमाल मुलगा

आपली काही चुक नाही! थोर विचारवंत ना तुम्ही!

अरेऽऽऽ....कुणीतरी "ह्यांना आपलं म्हणा" रेऽऽ =))

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2009 - 7:52 pm | llपुण्याचे पेशवेll

उच्चभ्रू टिंग्या कधीपासून पीएमपीएमएल्च्या बसनं जाऊ लागला?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

छोटा डॉन's picture

12 Nov 2009 - 9:34 pm | छोटा डॉन

>>उच्चभ्रू टिंग्या कधीपासून पीएमपीएमएल्च्या बसनं जाऊ लागला?
:)
सगळं कसं गरजेनुसार असतं बघा शेठ.

आता तसे बघायला गेलं तर रोज न्ह्यायला सोडायला हापीसची गाडी येते पण "मनसे" म्हणले की जे पीएमपीएमएलच्या बसने जाणार आणि ह्यांना त्रास होणार.
रोज कसे हे रात्री जाऊन मारे टिव्हीवरच्या वगैरे डेली सोप्स पहात ऐश आरामाचे आयुष्य जगणार, मात्र "मनसे" म्हणले की ह्यांना ट्राफिक ज्यॅममध्ये उशीर होऊन किंवा अन्य काही कारणाने ह्यांची सिरीयल बुडणार व ह्यांना त्रास होणार.
रोज कसे हे महाराष्ट्रातल्या हजारो उपाशी शेतकर्‍यांचे कुटुंब गेले चुलीत म्हणुन डोळ्यावर कातडे ओढुन नि:संकोच अन्नप्राशन करणार, मात्र "मनसे" म्हणले की ह्यांना त्राग्यानेच उपास घडणार न त्यांचा ह्यांना त्रास होणार.
रोज कसे की हजारो करोड रुपयांच्या कराच्या पैशाच्या भ्रष्टाचाराच्या आणि गैरव्यवहाराच्या बातम्या हे तेलगी आणि रामलिंगम राजुच्या भाग्याचा हेवा करत चवीने चर्चा करत वाचणार व "अवघड आहे बाबा ह्या देशाचे" असे म्हणुन ४ आपल्यासारख्याच मित्र-मैत्रिणीत उच्चभ्रुपणा दाखवणार, मात्र "मनसे" म्हणले की ह्यांचे टाळके सटकणार व न झालेल्या लहान मुलांच्या बसवरच्या दगडफेकीचे दाखले व १० ठिकाणी देणार व फिदीफिदी हसणार ...

ह्यांचं असं का होतं ते कळत नाही.
बहुतेक ह्यांना कळतयं पण वळत नाही ;)

------
छोटा डॉन पाडगावकर
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

धमाल मुलगा's picture

12 Nov 2009 - 9:58 pm | धमाल मुलगा

डानराव, अगदी यथार्थ वर्णन :)

बाकी, भरलेल्या कराबद्दल काही बोलला नाहीत तुम्ही?
आदिवासी पाड्यांसाठी सुधारणा, रस्तेबांधणी व्यवस्थित आहे का, खराब रस्त्यांची अवस्था सुधारणं, ४-४ मैलांवरुन पाण्यासाठी पायपीट करावी लागणार्‍या गावकर्‍यांसाठी पाण्याची व्यवस्था, इ.इ. आपल्याच करातुन होतं का हो?
फाईव्हस्टार अधिवेशनं कोणत्या पैशातुन होतात बरं?
च्छ्या:! कर भरायलाच हवेत आता..त्याशिवाय कसं कळणार, आणि 'आय अ‍ॅम अ टॅक्स पेअर, व्हाय द हेल शुड आय सफर?' असं कसं म्हणता येणार? :?

-(पक्का राडेबाज) ध.

आनंदयात्री's picture

12 Nov 2009 - 10:03 pm | आनंदयात्री

प्रचंड सहमत ...
(११ खास सेमीउच्चभ्रु डॉनरावांच्या गणपतीबाप्पासाठी)

टुकुल's picture

12 Nov 2009 - 10:42 pm | टुकुल

हाण तिच्यायला...

--टुकुल

अनिल हटेला's picture

13 Nov 2009 - 1:04 am | अनिल हटेला

काय बोलू...?

=))

सुहास चा निषेध बरं का!!;-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

स्वप्निल..'s picture

14 Nov 2009 - 12:52 am | स्वप्निल..

सहमत!!!

:)

शेखर's picture

13 Nov 2009 - 4:27 am | शेखर

च्छ्या:! कर भरायलाच हवेत आता..त्याशिवाय कसं कळणार, आणि 'आय अ‍ॅम अ टॅक्स पेअर, व्हाय द हेल शुड आय सफर?' असं कसं म्हणता येणार?

टॅक्स भरल्या मुळे खालील गोष्टी पण तुम्हाला सहन कराव्या लागतील..
१. टॅक्स भरल्यामुळे व गाडी,गाडी साठी पेट्रोल मोबाईल ई. गोष्टीसाठी खर्च केल्या मुळे तुमच्या थंडीत स्वेटर/जर्कीन नसणार व त्यामुळे तुम्ही थंडीत कुडकुडणार..
२. परत टॅक्स भरल्यामुळे तुमच्या घरात खाण्यासाठी काहीच नसणार त्या मुळे तुम्हाला अनाशा पोटी झोपावे लागेल...
३. टॅक्स भरत असल्याने तुम्हाला जमावाची भिती वाटेल..कारण त्यांनी तोडफोड केली तर तुमचा कष्टाचा टॅक्स चा पैसा वाया जाईल ह्याची भीती वाटेल.
४. अजुन एक गोष्ट म्हणजे मराविम च्या कारभारामुळे/पाउस, वादळा मुळे जरी रात्री लाईट गेली तरी ती मनसे च्या गोंधळा मुळे गेली असे ठासुन सांगावे लागेल
५. आणीबाणीच्या (इमर्जन्सीच्या) काळात मोबाईलच्या उजेडात डायरी लिहायची सवय करावी लागेल.
६. सर्वात महत्वाचे म्हणजे सगळे कायदे पाळावे लागतील आणी ऑफिस मधे कर भरुन सुद्धा राबुन दमावे लागेल.

धमालराव , बघा टॅक्स भरण्यामुळे काय काय करावे लागते/होते.

मनाची तयारी करा....;)

शेखर

प्रभो's picture

13 Nov 2009 - 4:46 am | प्रभो

अरे हे तर तू टॅक्स भरण्याचे फायदे सांगितलेस...आता तोटे ही सांगून टाक ना....

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

शेखर's picture

13 Nov 2009 - 5:56 am | शेखर

आता तोटे ही सांगून टाक ना....

टॅक्स भरायचे तोटे असतात का? :?

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Nov 2009 - 10:16 am | ब्रिटिश टिंग्या

वैयक्तिक चिखलफेक केलेला प्रतिसाद वाचुन अंमळ मौज वाटली! :)
आपल्याशी सहमत आहे डानराव! :)

अवांतर : मिपावर कोणी समुपदेशक आहे का हो? मला त्यांची अत्यंत गरज आहे.
त्याचं काय झालं की माझा एक हरी नावाचा अत्यंत सरळ अन् सालस मित्र होता. एकदा त्याचं शेजारी रहाणार्‍या बाबु या मुलाशी भांडण झालं. त्याचा राग म्हणुन हरीने स्वत:च्याच घरातील आरसा, टीव्ही फोडुन निषेध व्यक्त केला.
आता मला समजत नाहीये की त्याने केलेली कृती योग्य की अयोग्य? :)

अवलिया's picture

13 Nov 2009 - 10:18 am | अवलिया

आता मला समजत नाहीये की त्याने केलेली कृती योग्य की अयोग्य?

हा हा हा
गंभीर प्रश्न !!!!

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

विजुभाऊ's picture

13 Nov 2009 - 11:10 am | विजुभाऊ

मला समजत नाही त्याने केलेली कृती योग्य की अयोग्य
प्रतिसाद वाचून अम्मळ मौज वाटली.

कृती केली हरीने ,टीव्ही फुटला हरीचा नफा नुकसान झाले हरीचे ...बाबूला थोडिशी जरब वाटली असेल कदाचित.
ते दोघेही तुमचे शेजारी नाहीयेत . यात तुम्हाला स्वतःला काही समजून्घ्यायचा प्रश्न येतो कोठे?

निखिल देशपांडे's picture

13 Nov 2009 - 12:47 pm | निखिल देशपांडे

हरी आणी बाबु दोन शेजारी राहाणारे मित्र असतात???? हरी आणी बाबु मधे भांडण होते... त्यात बाबुचाच हलकट पणा जास्त असतो.दोघेही एकमेकांची छेड काढतात. मुळात बाबु अत्यंत हलकट इसम ह्यावर सर्व सोसायटीच्या सदस्यांचे एकमत आहे पण हरीची वाढती लोकप्रियता व त्याचे समजातले स्थानही सर्वांना खटकत असते.बाबु हा वारंवार वाद ओढवुन घेण्यातही पटाईत असतो. एकदा त्याचे शेजारच्या संज्याशी पण असेच वाजले असते.पण आता ह्या प्रकरणात हरी सापडतो आहे म्हणल्यावर सोसायटीतले सर्वजण मतभेद विसरुन एकत्र येतात व हरीला शिक्षा करतात ...ह्यावर चिडुन हरी सोसायटीच्या सामानाची तोड्फोड करतो.... सोसायटी त्याचीच असुनही आपलेच नुकसान होत आहे कळत असताना सुद्धा तो त्याची प्रतिक्रिया आणी निषेध व्यक्त करण्यासाठी सोसायटीचे नुकसान करतो. आता सोसायटीचे नुकसान चुकिचेच आहे. पण हरी ने बाबु चे घरी जाउन तोडफोड करावी असे म्हणने योग्य आहे का???

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

छोटा डॉन's picture

13 Nov 2009 - 2:00 pm | छोटा डॉन

निखिलशेठ, लै भारी प्रश्न विचारलात !
पण झाले काय की ह्या प्रश्नामुळे तुम्ही तथाकथित विचारवंतांच्या डायरेक्ट धोतरालाच हात घातलात.

आता त्यांच्यासमोर एक मोठ्ठे धर्मसंकटच उभे राहिले आहे, अगदी अजुर्नसारखेच.
जाऊ द्या, प्रश्न विचारणे आपले काम , ह्यांना उत्तर देणे देवाच्या भरवश्यावर सोडा ( अर्थातच ह्यांचा देवावर विश्वास असेल तर ) ;)

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Nov 2009 - 2:10 pm | ब्रिटिश टिंग्या

>>पण हरी ने बाबु चे घरी जाउन तोडफोड करावी असे म्हणने योग्य आहे का???

होय!

एकदम मस्तच छप्परतोड प्रतिसाद,
बाकी मी विचारवंत नाही हे माझे नशीब समजतो.

(राडेबाज)वेताळ

आशिष सुर्वे's picture

12 Nov 2009 - 8:11 pm | आशिष सुर्वे

छप्परतोड माहिती पुरवल्याबद्दल..
असेच लिहीत रहा!!

अवलिया भाऊ..
छान विषय!!
-
कोकणी फणस

प्रभो's picture

12 Nov 2009 - 9:21 pm | प्रभो

निषेध निषेध निषेध....
विचारवंताना विचार न करता प्रतिसाद लिहायला वाव न ठेवल्याबद्दल....निषेध निषेध निषेध...

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

खतरा .........खतरा.......खतरा
आपला टरकलेला जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विजुभाऊ's picture

13 Nov 2009 - 11:09 am | विजुभाऊ

मिपाकर वेदश्री ह्यांच्या सारख्या मराठी लोकांना दिवसभराच्या कष्टांनंतर अंधारात उपाशी झोपण्याची वेळ आली.>>>>
निमीत्त-मात्र , महाराष्टात गेली १५ वर्षे ३०% (शेतकरी आणी कष्टकरी) जनता दररोज रात्री उपाशी झोपते..त्याबद्दल आपण काहीही लिहिलेले आठवत नाही...त्याकरिता बर्‍याच वेळा शांततेच्या मार्गाने आंदोलने झालेली आहेत. आणी तरीही हिच परिस्थिती आहे...

ती कष्टकरी जनता टॅक्स भरत नाही. हे विसरताय सुहास भौ.
( जॉर्ज ऑरवेल चे ऑल आर ईक्वल बट सम आर मोअर इक्वल हे तत्व विसरताय)