दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग ४

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
29 Oct 2021 - 2:10 pm

आधीचे भाग:

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग ४

दिवस चौथा :-

सकाळी साडेनऊला उठल्यावर ब्रश करून आधी कॉफीशॉप मध्ये जाऊन नाश्ता करून घेतला. दुपारी तीन वाजता डेझर्ट सफारीसाठी निघायचे असल्याने हाताशी असलेला तीन-चार तासांचा फावला वेळ सत्कारणी लावायला अकराच्या सुमारास तयार होऊन आम्ही खाली उतरलो आणि दोन-अडीच कि.मी. अंतरावरचा दुबईतले एक प्रमुख आकर्षण असलेला सराफ बाजार अर्थात 'दुबई गोल्ड सूक' ला जाण्यासाठी टॅक्सी पकडली.

शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या ह्या सराफ बाजारात सोने, चांदी, प्लॅटिनम, हिरे-माणके, मोती आणि अन्य मौल्यवान रत्ने विकणारी ९०० हुन अधिक दुकाने आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठल्याही दिवशी १० ते १५ टन सोने विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या ह्या गोल्ड सूक परिसराच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस व्हॅन तैनात असते, कुठल्याही दुकानाबाहेर एकही बंदूक किंवा दंडुकेधारी सुरक्षा रक्षक दिसणार नाही.

सोन्याच्या किमतीत फार काही फरक नसला तरी त्याच्या शुद्धतेबद्दलची खात्री हे इथे सोने खरेदी करण्या मागचे मुख्य कारण असते. ५७ किलो सोन्याची अजस्त्र अंगठी, सर्वात मोठा सोन्याचा हार आणि साडे बावीस किलो सोन्यापासून बनवलेली 'बुर्ज खलिफा'ची प्रतिकृती अशा अनेक आकर्षणांसहित असंख्य लहान मोठे दाग-दागिने आपल्याला ह्याठिकाणी पाहायला मिळतात.

'गोल्ड सूक' मध्ये भटकंती करून तिथल्या 'मलबार ज्वेलर्स' ह्या भारतीय पेढीतून थोडीफार सोन्याची आणि तिथून जवळच असलेल्या 'स्पाईस मार्केट' मधून काही मसाल्याच्या पदार्थांची खरेदी उरकून आम्ही टॅक्सीने जेवणासाठी लाहोरी पकवान गाठले. जेवण करून रूमवर परतल्यावर फ्रेश होऊन तिनच्या सुमारास रिसेप्शन हॉल मध्ये येऊन गाडीची वाट बघत बसलो. वाळूच्या टेकड्यांवरील 'ड्युन बॅशिंग', सॅंड बोर्डींग करून झाल्यावर वाळवंटातील एका कॅम्प मध्ये कॅमल राईड व अल्पोपहारानंतर तनोरा डान्स, फायर शो आणि 'बेली डान्स' बघण्याचा आनंद घेत आपल्या इच्छेनुसार शाकाहारी/मांसाहारी बार्बेक्यू डिनर झाल्यावर रात्री अकरा-साडे अकरा पर्यंत हॉटेलवर परत असा आजच्या डेझर्ट सफारीचा कार्यक्रम होता.

पाच-सात मिनिटांत 'टोयोटा लँड क्रुझर' हि इथे प्रामुख्याने डेझर्ट सफारीसाठी वापरली जाणारी ऑफ रोड एस.यु.व्ही. घेऊन सलीम नावाचा ड्रायव्हर आला. गाडीत FedEx Express ह्या मालवाहतूक करणाऱ्या अमेरिकन विमान कंपनीची महिला पायलट 'डेब्रा' व तिचा सहकारी पायलट 'जॉन' आणि 'हिरोको' नावाची जपानी महिला व तिची 'युरिको' नावाची वृद्ध आजी अशा चार व्यक्ती आधीपासून बसल्या होत्या.

आधी पुढे बसलेल्या जॉनची जागा डेब्राने घेतली,मधल्या सीटवर अदिती, हिरोको आणि तिची आजी बसल्या तर माझी आणि जॉनची रवानगी शेवटच्या सीट्सवर झाली आणि आमचा शारजा मधील 'अल मदाम' (Al Madam) पर्यंतचा सुमारे ७० कि.मी.चा प्रवास सुरु झाला.

दोन अमेरिकन, दोन जपानी, दोन भारतीय आणि एक पाकिस्तानी अशा जबरदस्त ऐतिहासिक पार्श्वभूमीचे नागरिकत्व असलेली मंडळी एका रोमांचक सफरीवर जाण्यासाठी गाडीत एकत्र, त्यात हिरोकोची ब्यायशी वर्षीय आजी ही अमेरिकेने जपानवर अणुबॉंब टाकल्या नंतर झालेल्या वाताहातीची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हंटल्यावर जो दंगा व्हायचा तो झालाच. विषय गंभीर असला तरी टोमणे, शाब्दिक कोट्या, प्रासंगिक विनोद इत्यादींना नुसते उधाण आले होते. आजीबाईं ह्या वयातही खुटखुटीत असल्या तरी त्यांना फारसे इंग्रजी बोलता येत नसल्याने त्यांना प्रत्येकाने (सर्वात जास्ती डेब्रानी) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात हिरोको दुभाष्याची भूमिका निभावत होती तर कळीच्या नारदाच्या भूमिकेत ड्रायव्हर सलीम होता.
तासाभराचा प्रवास करून आम्ही वाळवंटी परिसरातल्या एका बहुउद्देशीय संकुलात पोचलो. मुख्य वाळवंटात जाऊन वाळूच्या टेकड्यांमध्ये 'ड्युन बॅशिंग' करण्या आधी डेझर्ट सफारीसाठी आलेल्या सर्व गाड्या ह्या ठिकाणी थांबा घेतात आणि अस्थिर वाळूवर चांगली ग्रीप मिळण्यासाठी गाड्यांच्या चाकांतली हवा जवळपास अर्ध्याने कमी केली जाते. फूड कोर्ट, भेटवस्तू आणि कपड्यांची दुकाने, प्रसाधन गृहे आणि डेझर्ट स्पोर्ट्स अशा सुविधा ह्या संकुलात होत्या.

.

.

.

.

.
अर्धा-पाऊण तास ह्या ठिकाणी घालवून ५ वाजताच्या सुमारास सर्व गाड्यांचा ताफा रोलर कोस्टर राईड सारखा अनुभव देणाऱ्या ड्युन बॅशिंग साठी रवाना झाला.
.

.

.

.
वाळूच्या टेकड्यांवरून कधी वर जात तर कधी भसकन वेगाने खाली येत, वळणे घेत, कधी डावी बाजू वर तर कधी उजवी बाजू वर होत असताना आता गाडी उलटते कि काय असा विचार मनात आणणारा तो सुमारे २०-२५ मिनिटे चालणारी राईड झाल्यावर एका वाळूच्या टेकडीवर सॅंड बोर्डींगची मजा घेण्यात आली.
.

.

.
सोसाट्याच्या वाऱ्यात वाळवंटात थोडे फोटो, ग्रुप फोटो काढून मग सूर्य मावळतीला आल्यावर पुढच्या कार्यक्रमासाठी कॅम्पच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला.
.

.

.

जॉन, डेब्रा, हिरोको, युरिको (आजीबाई) , आणि आम्ही दोघं.
.

.

.
पंधरा-वीस मिनिटांत गाड्या कॅम्पवर पोचल्यावर कबाबच्या जोडीला सामोसे आणि कांदा भजी असा अल्पोपहार आणि चहा कॉफी सेवनात सर्व पर्यटक रममाण झाले. मध्यभागी भलामोठा स्टेज आणि चहु बाजूने अनेक खाद्यपदार्थ, मद्य, भेटवस्तू विक्रीची दुकाने, हुक्का पार्लर्स, फोटो स्टुडीओ, स्त्रियांना मेहंदी काढण्यासाठीचे तंबू आणि बार्बेक्यू डिनरसाठी असलेले बुफे काउंटर्स तर एका कोपऱ्यात प्रसाधनगृहे होती.
अल्पोपहारानंतर आमच्या बरोबरचे महिला मंडळ हीना टॅटू (मेंदी) काढून घेण्यात व्यस्त असताना माझा आणि जॉनचा बिअर पिणे आणि हुक्का ओढण्याचा कार्यक्रम पार पडला होता. काही वेळात तनोरा नृत्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर एका निग्रो फायर आर्टिस्टने थरारक असा फायर शो सादर केल्यावर समारोपाचा विशेष कार्यक्रम म्हणजे 'बेली डान्स'ला सुरुवात झाली. संगीताच्या तालावर आपल्या कमनीय देहाच्या मादक हालचाली करत नाचणारी ती नृत्यांगना पुरुष प्रेक्षकांपेक्षा कितीतरी अधिक दाद महिला प्रेक्षकांकडून मिळवते.
.

▲ तनोरा डान्स

.

▲ फायर शो

.

.

▲ बेली डान्स ▼

.
विविध कार्यक्रमांची मजा घेत जेवण झाल्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास आमचा परतीचा प्रवास सुरु झाला आणि बरोबरच्या मंडळींना आधी त्यांच्या हॉटेलवर सोडून आम्हाला आमच्या हॉटेलवर पोचायला अकरा वाजले. एकंदरीत दिवस छान गेला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकराला परतीची फ्लाईट असल्याने सामानाची बांधाबांध करून झाल्यावर सकाळी सहा वाजताचा अलार्म लाऊन झोपी गेलो.
सकाळी सव्वा सात वाजता तयार होऊन चेक आउटची प्रक्रिया पार पडल्यावर नाश्ता उरकून घेतला आणि आठ वाजता एअरपोर्ट ट्रान्स्फर साठी आलेल्या गाडीत बसलो. कुठेही ट्राफिक न लागल्याने पंधरा-वीस मिनिटांत एअरपोर्टवर पोचल्यावर तिथले सर्व सोपस्कार आटोपून हाताशी असलेल्या वेळात ड्युटी फ्री मध्ये थोडीफार खरेदी करून मग बोर्डिंग गेट गाठले.
फ्लाईट वेळेवर होती. मरुभूमीत साकारलेल्या ह्या नंदनवनाला पुन्हा भेट देण्याचा निश्चय करून आम्ही विमानात बसलो आणि वेळेतल्या फरकानुसार चार वाजता मुंबईला पोचलो.

दुबई सफर सुफळ संपूर्ण करून घरी परतल्यावर पहिल्यांदाच फोटो आणि चलचित्रांचा एकत्रित असा छोटासा व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न केला होता. तो व्हिडिओ खाली देत आहे, काही फोटोंचा क्रम चुकला आहे पण व्हिडिओ एडिटिंगचा हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने मिपाकर वाचक गोड मानून घेतील अशी आशा आहे.
https://www.youtube.com/embed/PKuGekxbQfQ

समाप्त

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

29 Oct 2021 - 2:29 pm | कुमार१

उत्कृष्ट वर्णन आणि एकदम कडक प्रकाशचित्रे.
नेहमीप्रमाणेच आवडले हे सांगणे न लगे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

29 Oct 2021 - 3:08 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान झाली सफर.

सोत्रि's picture

29 Oct 2021 - 3:37 pm | सोत्रि

देखणी लेखमाला, खुपच आवडली.

- (भटक्या) सोकाजी

@ कुमार१, ॲबसेंट माइंडेड & सोत्रि
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

चांदणे संदीप's picture

29 Oct 2021 - 4:16 pm | चांदणे संदीप

१०-१५ टन सोने! अबबब्... घ्यावा म्हटलं तोळा... पोटात येतो गोळा ही रेडिओवरची जाहिरात आठवली. =))
व्हिडिओ पण मस्त झाला आहे.

सं - दी - प

सौंदाळा's picture

29 Oct 2021 - 5:47 pm | सौंदाळा

मस्तच.

एक_वात्रट's picture

29 Oct 2021 - 7:18 pm | एक_वात्रट

हाही भाग नेहेमीप्रमाणे सुंदर! सामोश्याचे मूळ मध्यपुर्वेत आहे, त्यामुळे तो ठीक, पण दुबईत कांदाभजीही मिळतात हे वाचून आश्चर्य वाटले. ५७ किलोची अंगठी हातात कशी घातली जात असेल हे पाहण्याची उत्सुकता आहे. बेली डान्स तिथले स्थानिक (पारंपारिक) नृत्य आहे की आयात केलेले?

सफर संपल्यामुळे वाईट वाटले. आता पुढची सफर कुठे (किंवा सफर झाली असल्यास पुढचे प्रवासवर्णन कुठले?)

@ चांदणे संदीप, सौंदाळा & एक_वात्रट
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ चांदणे संदीप,

ही जाहिरात कधी ऐकण्यात आली नाही बुवा!

"व्हिडिओ पण मस्त झाला आहे"

DestynAsia Holidays कडून त्यांच्या फेसबुक पेजसाठी टेस्टीमोनिअलची विचारणा झाली तेव्हा तीच पठडीतली वाक्ये टाकून प्रशंसापत्र लिहिण्यापेक्षा त्यांची सेवा निर्विवादपणे आवडली असल्याने काहीतरी क्रिएटीव्ह करावे म्हणून शब्दांच्या जोडीला हा व्हिडिओ तयार केला होता 🙂

@ एक_वात्रट,
कांदाभजीच नाही तर मुंबईत मिळणारा एकही खाद्यपदार्थ असा नसेल जो दुबईत मिळत नाही (हे सर्वच गोष्टींसाठी लागू आहे, अगदी तिथे कागदोपत्री प्रतिबंधित असलेल्या वस्तू/गोष्टींसाठी सुद्धा 😀)
गिनेस बुक मध्ये दुबईच्या नावावर नोंदलेल्या ४००+ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स पैकी एक रेकॉर्ड ही ५७ किलोची अजस्त्र अंगठी आहे प्रत्यक्ष वापरासाठी तिचा उपयोग शून्य 😀
प्राचीन काळापासून इजिप्तमध्ये प्रचलित असणारा बेली डान्स मध्यपूर्वेतील एक-दोन कट्टरपंथी इस्लामिक देश सोडून सर्व अरब जगतात लोकप्रिय आहे.
गेली 2 वर्षे करोनामुळे कुठली परदेशी सफर करता आली नाही. गेल्या वर्षी एप्रिल मधल्या हाँगकाँग सफरीसाठी बुकिंग केले होते पण ते रद्द झाले. सुदैवाने अगदी किरकोळ चार्जेस कट होऊन विमानप्रवास आणि हॉटेल बुकिंगचे पैसे मात्र परत मिळाले होते.

मस्त!
आजीबाई कमाल वाटत आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Oct 2021 - 8:19 am | ज्ञानोबाचे पैजार

नयनरम्य भाग आवडला,
शेवटची धी एन्ड ची पाटी बघुन जरा वाईट वाटले,
तुम्ही तुमच्या कडच्या सगळा खजिना आमच्या करता खुला केला नाही असे वाटून गेले
पण चारही भाग फार म्हणजे फारच आवडले.
बघा पार्ट २ काढता येतो का ते?
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

30 Oct 2021 - 9:40 am | प्रचेतस

दुबईची सफर एकदम मस्त झाली. डेझर्ट सफारी तर लैच भारी. एकदातरी सॅण्ड ड्युन्स पाहायची इच्छा आहे. इस्लामिक देश असला तरी एकंदरीत वातावरण खूपच लिबरल आहे तिथले.

@ भक्ती, ज्ञानोबाचे पैजार & प्रचेतस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ भक्ती,

"आजीबाई कमाल वाटत आहेत."

कमाल आणि धमाल पण आहेत त्या 😀

@ पैजारबुवा,

"तुम्ही तुमच्या कडच्या सगळा खजिना आमच्या करता खुला केला नाही असे वाटून गेले"

कुठल्या 'खजिन्या' बद्दल बोलताय ते लक्षात आलंय हो माझ्या 😀 😀 😀

@ प्रचेतस

"इस्लामिक देश असला तरी एकंदरीत वातावरण खूपच लिबरल आहे तिथले."

अगदी अगदी...

अनन्त्_यात्री's picture

30 Oct 2021 - 11:51 am | अनन्त्_यात्री

सुंदर

कोणती २ प्रचि फारफार आवडली हे वेगळे सांगत नाही.

पूर्ण लेखमाला वाचली, संजय भाऊ तुम्ही बेस्ट प्रवासवर्णन लिहिताच, त्यात दुमत नाही, कृपया तुम्ही ट्रॅव्हल व्लॉग किंवा छापील पुस्तकात हे सौंदर्य प्रकाशित करण्याचा सिरीयसली विचार करावा.

परत एकदा सांगतो अभिनिवेष विरहित लेखन करताना फिरतोय त्या जागच्या संस्कृतीचा आदर राखत फुल ऑफ लाईफ जगण्याचे तुमचे कसब उत्तम आहे, लाईफ कोच लेक्चर्स वाचल्यासारखे वाटते एकदम.

पुढील शिलांगणांस भरपूर शुभेच्छा आणि पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.

(तुमच्या डोळ्यातून दुबई मनमुराद एन्जॉय केलेला)
- वांडो

अनिंद्य's picture

30 Oct 2021 - 8:15 pm | अनिंद्य

झकास !

@ अनन्त्_यात्री, जेम्स वांड & अनिंद्य
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ अनन्त्_यात्री,
"कोणती २ प्रचि फारफार आवडली हे वेगळे सांगत नाही."
शब्दांवाचून कळले सारे....
भावना पोचल्या 😀 😀 😀

@ जेम्स वांड
वांड भाऊ आपल्या सूचनेचे स्वागत आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद 🙏

चौकस२१२'s picture

1 Nov 2021 - 4:07 am | चौकस२१२

परत त्या भागात किंवा ओमान ला गेलात तर " मुक्कामाची डेझर्ट सफारी " करा .. दिवसाची गर्दी परत गेलेली .. असते आणि रात्री वाळवंटाची शांतता आणि तंबूत राहणे यात मजा येते.. आणि असे ठिकाण निवडा कि तिथून दुबई चे दिवे कमी दिसतील ....
दुसरी परतताना ड्राइवर बाबूंना एखादय पोहणायचंय ठिकाणी घेऊन जाऊ शकेल का ते... त च्या दिशेने जायला लागला कि डोंगराळ भाग आहे पाण्याचे डोह आहेत .. ऐन उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाणी अनुभवले होते ....( बहुतेक कोरफकन असावे )

तुषार काळभोर's picture

31 Oct 2021 - 6:09 pm | तुषार काळभोर

मालेची सांगता अतिशय छान केलीय.

कंजूस's picture

1 Nov 2021 - 4:36 am | कंजूस

विडिओतलं गाणं कोणतं?
--------------
अरब देशांत खरे गाववाले अरब भेटतात का? ( टुअर ओपरेटर आणि गाईड सोडून).

टर्मीनेटर's picture

1 Nov 2021 - 2:43 pm | टर्मीनेटर

@ तुषार काळभोर, चौकस२१२ & कंजूस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ चौकस२१२,
हो, तुम्ही म्हणताय तसा वाळवंटात तंबूत रात्र काढण्याचा अनुभव मस्त असतो! जेसलमेरला असा अनुभव घेतला होता, छान वाटलं होतं तेव्हा.

@ कंजूस काका,
हे हिब्रू भाषेतील एका गाण्याचे remixed व्हर्जन आहे!

अरब देशांत खरे गाववाले अरब भेटतात का?

हो भेटतात मॉल्स, हॉटेल्स सारख्या सार्वजनिक ठिकाणी.

हो दिसतात कि पण ते टूर गाईड म्हणून नाही .. ती बहुतत्क भारतीय / पाकिस्तानी , असली कामे करतील स्थानिक अरब कशाला करतील ( अर्थात हे चित्र कदाचित दुबईत बदलेले असेल )
एकदा माझा असाच पोपट होता , वाळवंटातील सफारीत एक उंटावर चक्कर मारा अशी सोय होती आणि उंटाबरोबर जो माणूस होता तो अरबी वेशात होता .. मला वाटले तो खरंच अरब असावा .. मग मध्येच तो हिंदी बोलू लागला .. विचार केला ... ते हि ठीक अनेक अरबांना हिंदी येत ... पण नातर कळलं कि तो पाकिस्तानी माणूस होता.. उगाच उंट हाकलण्याच काम स्थानिक श्रीमंत अरब कशाला करेल !

अरब कसे व कोणते !
ते जीसीसी ( गलफ को आं परेशन कौन्सिल )
पांढरे वाले = युनाइटेड अरब
तांबडे = सौदी
गुंडाळलेले पांढरे मुंडासे = ओमानी
- डगला + गोल टोपी = इजिप्त

भुजंग पाटील's picture

1 Nov 2021 - 11:16 pm | भुजंग पाटील

युएई मधील काही ठिकाणे खरच एकदा भेट देण्यासारखी आहेत.
त्यातील मला भावलेली काही: अल ऐन ह्या "सिटी ऑफ गार्डन" चा परिसर (अबुधाबी राज्यातील), जबेल हतीफ आणि अल मुरब्बा हे किल्ले, वेगळाच निसर्ग दाखवणार्या वाड्या.

पण माझ्या मते दुबई हे एकंदरीतच वास्तुकलेचे कुरूप विडंबन आहे.
टुरीझमला चालना देण्यासाठी भव्यदिव्य बान्धकामे केली आहेत, पण त्यांचा मेन्टेनन्स, त्यांचे उत्पन्न/खर्च ही मोठी डोकेदुखी आहे.

बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत आहे, पण तिला शहराशी जोडणारी सांडपाण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही.
रोज डझनावारी ट्रक्स अविरत तिथून मलमूत्र घेऊन शहराबाहेर प्रोसेसींग सेंटर वर टाकत असतात.
त्या प्रोसेसींग सेंटर वर २-३ किलोमीटर रांगा, कारण बहुतेक स्काय स्क्रॅपर्सचे हेच रडगाणे आणि बिचारे भारतीय / पाकिस्तानी ड्रायव्हर्स २०-२० तास ताटकळत शी-सू चे ट्रक्स घेऊन उभे असतात. तोच प्रकार त्या पाम आयलंडचा.

सामान्य पर्यटकांना हे सगळे माहित असण्याचे काही कारण नाही, पण एकदा वस्तुस्थीती लक्षात आल्यानंतर माझा त्या शहरा बद्दलचा दृष्टिकोन अगदीच बदलला.

बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत आहे, पण तिला शहराशी जोडणारी सांडपाण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही.
? मला वाटले कि स्थानिक ( म्हणजे इमारतीतच ) प्रोसससिंग प्लांट असला पाहिजे असा नियम असावा! अगदी हिरानन्दानी मुंबई मध्ये पण आहे
असो दुबई हे "ओव्हर द टॉप " आहे हे खरेच ... मूळचे अरब गाव कधीच लुप्त झाले आहे , डिस्नेलँड आहे असे समाजायचे
पण कौतिक हे कि तेलाचा फारसा पैसे नसतांना त्यांनी जे हब म्हणून विकसलंय ते कौतिक करण्यासारखे आहे ( कचरा आणि ट्राफिक जाम हे प्रश्न आहेतच )

टर्मीनेटर's picture

2 Nov 2021 - 2:23 pm | टर्मीनेटर

मूळचे अरब गाव कधीच लुप्त झाले आहे , डिस्नेलँड आहे असे समाजायचे

+१०००

टर्मीनेटर's picture

2 Nov 2021 - 2:21 pm | टर्मीनेटर

सामान्य पर्यटकांना हे सगळे माहित असण्याचे काही कारण नाही,

+१
आणी पर्यटकांनी अशा स्थानिक समस्या जाणून घेण्याच्या भानगडीत पडून आपल्या आनंदावर विरजण पाडून घेउही नये. आल्यासारखे ४ दिवस फिरावे, खावे-प्यावे आणी मजेत राहावे असे माझे वैयक्तिक मत.
असो, प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

रंगीला रतन's picture

2 Nov 2021 - 8:42 am | रंगीला रतन

एक नंबर मालिका झाली. मज्जा आली वाचायला.
पुलेशु.

हा वेगळ धागा असावा. वेनिस' शहराचा एक लेख वाचला होता.

टर्मीनेटर's picture

2 Nov 2021 - 2:04 pm | टर्मीनेटर

+१

Nitin Palkar's picture

2 Nov 2021 - 7:26 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर मालिका. सुंदर वर्णन! त्याहून सुंदर प्रकाश चित्रे!! त्याही पेक्षा सुंदर सादरीकरण!!!

गोरगावलेकर's picture

2 Nov 2021 - 10:26 pm | गोरगावलेकर

फोटो, व्हिडीओ व सादरीकरण सर्वच उत्कृष्ठ . संपूर्ण मालिकाच अतिशय आवडली .

टर्मीनेटर's picture

3 Nov 2021 - 11:41 am | टर्मीनेटर

@ रंगीला रतन, Nitin Palkar & गोरगावलेकर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

इजिप्त प्रमाणेच ही दुबईची मालिका पण फार सुरेख झाली! फोटो, व्हिडीओ, सादरीकरण सर्वच सुंदर!! पुढील प्रवास आणि प्रवास वर्णना साठी खूप खूप शुभेच्छा!!!
1

टर्मीनेटर's picture

1 Dec 2021 - 5:29 pm | टर्मीनेटर

@ अथांग आकाश
सुंदर सचित्र प्रतिसादासाठी धन्यवाद 🙏

मुक्त विहारि's picture

4 Jan 2022 - 2:51 pm | मुक्त विहारि

वाखूसा

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 3:30 pm | टर्मीनेटर

धन्यवाद मुविकाका 🙏
नोकरी निमित्त दुबईत काही वर्षे वास्तव्य केलेल्या तुम्हाला हे आवडले म्हणजे लिहायला जमले असे मानण्यास हरकत नाही 😀

आणि पर्यटकांची दुबई वेगळी ...

दुबईच्या दोन्ही आठवणी आहेत

दोन केळी आणि एक ग्लास ताक, ह्यावर काढलेले दिवस आणि अपुरा पगार आणि फसवणूक...रोजच्या 5 दिरहॅम मध्येच दिवस काढायला लागायचा

आणि त्याच देशांत नंतर तिन्ही त्रिकाळ, भरपेट जेवण, मनसोक्त पगार आणि डान्स बार मध्ये 200 डिरहॅम फक्त प्रवेश फी म्हणून दिले होते ..

माझा पहिला मिपाकट्टा पण, दुबई मध्येच झाला

कुंदन शेख ठाकुर, ह्याच्या बरोबर...(ती सुट्टी तशी 500 डिरहॅमला पडली, पण कुंदन बरोबर घालवलेले ते क्षण, परत कधीच उपभोगता आले नाहीत... दुबई म्हणजे, ताक ते शिवास रीगल पर्यंत झालेली आर्थिक उन्नती)

दुबईने एक गोष्ट परत एकदा शिकवली, कोशीश करनेवालों की हार नहीं होती ...

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 4:53 pm | टर्मीनेटर

कुंदन शेख ठाकुर, ह्याच्या बरोबर...(ती सुट्टी तशी 500 डिरहॅमला पडली, पण कुंदन बरोबर घालवलेले ते क्षण, परत कधीच उपभोगता आले नाहीत... दुबई म्हणजे, ताक ते शिवास रीगल पर्यंत झालेली आर्थिक उन्नती)

क्या बात! क्या बात!
येही हैं जिंदगी 👍

दुबईने एक गोष्ट परत एकदा शिकवली, कोशीश करनेवालों की हार नहीं होती

अरेबियन नाईट्स मधल्या अल्लादिन आणि जिनच्या गोष्टीचा, "अल्लादिन भी हम ही हैं, और जिन भी हम ही हैं " (मनात इच्छा करणारे अल्लादिन पण आपणच आणि आपल्या शरीररुपी चिरागातल्या बुद्धिरूपी जिन द्वारे त्या पूर्ण करणारे पण आपणच) हा खरा अर्थ दुबईत समजतो! (त्या बद्दल सविस्तर पुन्हा कधीतरी 😀)
धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

4 Jan 2022 - 6:23 pm | मुक्त विहारि

घर सोडले की जगच शिकवते

दुबईचा अजून एक फायदा असा झाला की, माझा उदारमतवाद विरघळून जायला लागला

सौदीत तर तो पुर्ण विरघळून गेला

हिंदू तितका मेळवावा ...

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 7:48 pm | टर्मीनेटर

घर सोडले की जगच शिकवते

+१०००
पुढच्या प्रतिसादावर भाष्य करणे विषयांतर होण्यास कारणीभूत ठरेल म्हणुन माझा पास 😀 😀 😀