दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग ३

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
21 Oct 2021 - 4:37 pm

आधीचे भाग:

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग ३
दिवस तिसरा :-
सकाळी उठून सर्व तयारी झाल्यावर ब्रेकफास्ट उरकून नऊच्या काही मिनिटे आधीच आम्ही रिसेप्शन हॉलमध्ये गाडीची वाट बघत बसलो होतो. आज आम्ही वेळेपूर्वी तयार होतो तर गाडी थोड्या उशिराने आली. आजची आमची 'पाम जुमेरा आयलंड्स' आणि उद्याची 'डेझर्ट सफारी' अशा दोन्ही टूर्स सीट इन कोच तत्वावर असल्याने आमच्या बरोबर गाडीत अन्य चार पर्यटकही असणार होते.
आधीच्या दोन हॉटेल्स मधून कॅनडाहुन हनिमूनसाठी आलेले एक नवविवाहित शीख जोडपे आणि लंडनहून आपल्या ८-९ वर्षाच्या मुलीबरोबर आलेली एक महिला अशा चार व्यक्तींना पिकअप करून सव्वानऊच्या सुमारास मर्सिडीज-बेंझ स्प्रिंटर टूरर हि ९ आसनी व्हॅन घेऊन रमीझ नावाचा ड्रायव्हर आला. आम्ही गाडीत बसल्यावर पाम जुमेरा आयलंड्स वरच्या 'अटलांटीस - द पाम' हॉटेलपर्यंतचा आमचा सुमारे ३६ कि.मी. अंतराचा प्रवास सुरु झाला.

गाडीत शेवटच्या तिसऱ्या रांगेतील सीट्सवर बसलेल्या 'सिंग' आणि 'कौर' यांना चांगली प्रायव्हसी मिळाल्याने ते 'लव्ही-डव्ही' लीलांमध्ये दंग झाले होते. मधल्या सीट्सवर बसलेली अदिती आणि फातिमा यांच्या गप्पा रंगल्या होत्या तर फातिमाची मुलगी लैला हि खिडकीतून दिसणारी दृश्ये बघणे, तिच्या आईला भेटलेल्या नव्या मैत्रिणी बरोबर चाललेल्या तिच्या गप्पा ऐकणे व अधून मधून तिला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे अशा तिहेरी कामात व्यस्त होती. माझ्या वाट्याला ड्रायव्हरच्या शेजारची सीट आपसूक आल्याने अवघ्या २५-२६ वर्षांच्या पण अनुभवसमृद्ध रमीझ बरोबर वार्तालाप करत त्याचे रोचक अनुभवकथन ऐकायला मिळाल्याने मीही खुश होतो. एकंदरीत गाडीतले वातावरण जो जे वांच्छिल तो ते लाहो टाईप असल्याने आनंदी स्वरूपाचे होते.
पाकिस्तानातील इस्लामाबादच्या रमीझने वयाच्या बाविसाव्या वर्षी अफगाणिस्तान मध्ये सुट्टीवर मायदेशी परतणाऱ्या अमेरिकन सैनिकांना काबुल एअरपोर्ट वर सोडण्याचे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेल्या ताज्या दमाच्या सैनिकांना त्यांच्या पोस्टिंग असलेल्या ठिकाणी नेऊन सोडण्याचे अतिशय जोखमीचे पण भरपूर आर्थिक मोबदला देणारे बस ड्रायव्हरचे काम स्वीकारले होते. दोन वर्षांत त्याने तिथे पैसे भरपूर कमवले परंतु ज्या युवतीशी त्याला लग्न करायचे होते तिचे वडील रमीझ अप्रत्यक्षपणे का असेना पण अमेरिकेसाठी काम करतो म्हणून त्यांच्या लग्नास परवानगी देत नव्हते. अखेरीस त्यांच्या हट्टापायी म्हणूया की त्या मुलीवर असलेल्या प्रेमापोटी त्याने ती नोकरी सोडली आणि लग्न झाल्यावर दुसरे कोणतेच कौशल्य अंगी नसल्याने दुबईत ही ड्रायव्हरची नोकरी पत्करली होती.
नर्सिंगचा कोर्स पूर्ण झाल्यावर बायकोलाही इथे आणून दुबईतच स्थायिक होण्याचा त्याचा विचार असल्याचे त्याने सांगितले. अमेरिकेवर केवळ मध्यपुर्वेचाच नाही तर एकूण मुस्लिम जगताचा किती राग आहे हे सर्वश्रुत असले तरी अमेरिकेनी फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्या पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांची विचारसरणी देखील इतकी टोकाची असेल हि गोष्ट माझ्यासाठी नवीन होती. त्याच्याकडे अफगाणिस्तानातील सांगण्यासारखे थरारक अनुभव आणि रोचक किस्से भरपूर होते, पण जाता-येतानाच्या प्रवासात त्याला बोलायला मिळालेला उणापुरा दोन-अडीच तासांचा वेळ कमी पडला असेच म्हणू शकतो.
असो, बराचसा प्रवास काल दुबई मरिना साठी जाताना लागलेल्या रस्त्यावरूनच सुरु होता त्यामुळे आजूबाजूला दिसणारी दृश्ये तशी परिचयाची झाली असल्याने त्यावेळी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली 'द दुबई फ्रेम' (The Dubai Frame), 'एतिहाद म्युझियम' (Etihad Museum), जुमेरा बीच जवळचे (वास्तविक पंचतारांकित पेक्षा वरचा कुठलाही अधिकृत दर्जा हॉटेल्स साठी अस्तित्वात नसला तरी सुद्धा तिथे उपलब्ध असलेल्या असामान्य सेवा/सुविधांमुळे) सप्ततारांकित असा लौकिक मिरवणारे 'बुर्ज अल अरब' (Burj Al Arab) हे प्रचंड महागडे पंचतारांकित हॉटेल, शेख साहेबांचा राजवाडा आणि अपूर्ण अवस्थेतील 'दुबई आय' (Ain Dubai/ऐन दुबई) वगैरे बद्दलच्या लैलाच्या प्रश्नांना अदितीच परस्पर उत्तरे देत होती त्यामुळे रमीझच्या सुरु असलेल्या अनुभव कथनातही पाम जुमेरा आयलंड्सला जाण्यासाठी गाडी मुख्य रस्त्यावरून उजवीकडे वळेपर्यंत व्यत्यय आला नव्हता.

.

रस्त्यावरून जाणारी 'दुबई ट्राम'
दुबईतील 'पाम जुमेरा' (Palm Jumeirah) ह्या मानवनिर्मित कृत्रिम बेटांच्या समूहाला जगातले (स्वयंघोषित) आठवे आश्चर्य म्हंटले जात असले तरी त्यात काही अतिशोक्ती वाटत नाही. पर्शियन आखातात (इराणचे आखात) समुद्रात भराव टाकून पाम वृक्षाच्या आकाराचे तीन ('पाम जेबेल अली', 'पाम जुमेरा' व 'पाम डेरा') आणि जगाच्या नकाशासारख्या आकाराचे 'वर्ल्ड आयलंड्स' असे कृत्रिम द्वीपसमूह निर्माण करून दुबईतील जमीन आणि किनारपट्टीची उपलब्धता आणि पर्यटन वाढवण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतील पूर्णत्वास गेलेला हा एक प्रकल्प!
केवळ सहा वर्षांच्या विक्रमी वेळेत निर्माण करून वापरात आणलेल्या, सुमारे ५ कि.मी. व्यासाच्या ह्या एकूण चार बेटांपैकी मधल्या पाम वृक्षाच्या खोडाचा (Trunk & Spine) आकार दिलेल्या जागेवर मध्यभागी मुख्य रस्ता व मोनोरेल आणि त्यांच्या दुतर्फा ६००० + घरे असलेल्या उंच रहिवासी इमारती आहेत तर १७ झावळ्यांचा (Fronds) आकार दिलेल्या जागेवर प्रायव्हेट बीच असलेल्या १५०० अलिशान व्हिलाज आहेत. ह्या निवासी भागाच्या सुरक्षेसाठी तीन बेटांच्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या सुमारे ११ कि.मी. लांबीच्या वर्तुळाकार क्रिसेंट (ब्रेकवॉटर) वर अनेक हॉटेल्स, रिसोर्ट्स आणि अन्य मनोरंजन, पर्यटन विषयक आकर्षणे आहेत.

पाम जुमेरा द्वीपसमूह (उपग्रह चित्र)

Drone View of Palm Jumeirah
▼ पाम जुमेरा द्वीपसमूह (ड्रोन इमेजेस)


मोनोरेल स्टेशन


मोनोरेल


अटलांटीस हॉटेल

×

▲ क्लिक केल्यास फोटो एनलार्ज/मिनिमाइज़ होतील

"स्थापत्य आणि अभियांत्रिकीचे भव्य-दिव्य मानवनिर्मित चमत्कार बघायची आवड असल्यास खालील बटणावर क्लिक करून पाम जुमेरा बाबतचे दोन व्हिडीओज बघता येतील"
पाम जुमेरा

पाम जुमेरा ड्रोन व्हिडिओ.

पाम जुमेरा निर्मिती

मुख्य भूमीपासून बेटाला जोडणाऱ्या रस्त्यावरून चार-साडेचार कि.मी. प्रवास करत आम्ही मधल्या बेटाच्या शेवटच्या टोकाला पोचलो जिथून क्रिसेंट वर जाण्यासाठी समुद्राखाली बांधलेल्या सुमारे १ किलोमीटर लांबीच्या बोगद्याला सुरुवात होते.

.

मधल्या बेटावरचा मुख्य रस्ता आणि वरून जाणारी मोनोरेल.

▲ समुद्राखालून जाणारा बोगदा ▼

.

बोगद्यातून बाहेर पडून क्रिसेंटवर पोचल्यावर गाडी उजवीकडे वळली आणि सव्वा दहाच्या सुमारास आम्ही 'अटलांटिस द पाम' हॉटेलला पोचलो.


हा फोटो जालावरून साभार

▲ 'अटलांटिस द पाम'

प्राचीन ग्रीक साहित्यिक व तत्त्वज्ञ 'प्लेटो' ह्याने त्याच्या ग्रंथात उल्लेख केलेल्या 'अटलांटिस' ह्या महाप्रलयात बुडून जलसमाधी मिळालेल्या अतिप्राचीन बेटावरील वैभवशाली राज्याच्या दंतकथेच्या थीमवर आधारित रचना/सजावट असलेल्या 'अटलांटिस द पाम' ह्या अतिभव्य पंचतारांकित हॉटेलमध्ये १५०० पेक्षा जास्ती रूम्स आहेत. इथले एका रात्रीसाठी जवळपास सहा लाख रुपये भाडे असणारे 'Poseidon' आणि 'Neptune' हे दोन भव्य अंडरवॉटर सूट्स गर्भश्रीमंतांमध्ये लोकप्रिय आहेत.
त्या जोडीला जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या दोन गोष्टी इथे आहेत त्या म्हणजे,

  • 'द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरीयम' (The Lost Chambers Aquarium)
  • 'अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क' (Aquaventure Waterpark)

अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क मध्ये भिजल्यानंतर ॲक्वेरीयम बघायला कंटाळा येईल अशा विचाराने आम्ही सुरुवात द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरीयम बघण्यापासून केली. फातिमा आणि लैलाही आमच्या सोबतच आल्या, शीख जोडप्याने बहुतेक आधी वॉटर पार्कमध्ये जाणे पसंत केले असावे.

ग्रीक दंतकथेनुसार दहा-अकरा हजार वर्षांपूर्वी महाप्रलयात बुडालेल्या अटलांटिस ह्या प्रगत महानगराच्या सागर तळातल्या अवशेषांचे देखावे साकारून निर्माण केलेले व ६५००० हून अधिक समुद्री जलचर ठेवलेले हे भव्य ॲक्वेरीयम आवर्जून पाहण्यासारखे आहे. शार्क्स, स्टींग रे सहित असंख्य जातींचे, लहान मोठ्या आकाराचे रंगीबेरंगी मासे आणि समुद्री जलचर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या ॲक्वेरीयम मध्ये मध्यम व मोठ्या आकाराचे जलचर असून त्यात स्कुबा डायव्हिंग करण्याचीही सोय उपलब्ध आहे. भिंतींमध्ये बनवलेल्या मत्सालयांमध्ये ठेवलेल्या लहान-मोठ्या माशांचे रंग अविश्वसनीयरित्या सुंदर आहेत.जाडजुड काचे मागच्या, चपळतेने पोहणाऱ्या माशांचे फोटो काढणे हे एक अत्यंत अवघड काम आहे. त्यातल्यात्यात बरे आलेले काही फोटोज खाली स्लाइड शो मध्ये देत आहे.

द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरीयम - स्लाइड शो


1 of 30


2 of 30


3 of 30


4 of 30


5 of 30


6 of 30


7 of 30


8 of 30


9 of 30


10 of 30


11 of 30


12 of 30


13 of 30


14 of 30


15 of 30


16 of 30


17 of 30


18 of 30


19 of 30


20 of 30


21 of 30


22 of 30


23 of 30


24 of 30


25 of 30


26 of 30


27 of 30


28 of 30


29 of 30


30 of 30


साडे अकरा वाजता द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरीयम बघून आम्ही अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क कडे आमचा मोर्चा वळवला. लॉकर घेऊन त्यात बरोबर आणलेले कपडे, किरकोळ सामान आणि फोन्स वगैरे ठेऊन मग एक से बढकर एक रोमांचक स्लाईड्सचा आनंद लुटायला सुरुवात केली.

Aquaventure Waterpark
▼ अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क

▲'लीप ऑफ फेथ' (Leap Of Faith)

(अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्कचे सर्व फोटोज त्यांच्या वेबसाईट वरून साभार)

×

'पोसायडन्स रिव्हेंज' (Poseidon's Revenge), 'लीप ऑफ फेथ' (Leap Of Faith), 'स्लीथरीन' (Slitherine), 'झूमरँगो' (Zoomerango), 'अ‍ॅक्वाकोंडा' (Aquaconda) अशा एकट्या व्यक्तीने, जोडीदार बरोबर आणि चार ते सहा जणांच्या समूहाने करण्यासारख्या अनेक लोकप्रिय स्लाईड्स असल्या तरी, सहा-सात मजली उंच इमारतीवरून एखाद्याने उडी मारली तर त्याला कसे वाटत असेल हा अनुभव देणाऱ्या 'लीप ऑफ फेथ' आणि 'पोसायडन्स रिव्हेंज' ह्या एकट्याने अनुभवायच्या स्लाईड्स सर्वात जास्त थरारक आहेत.
सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी असलेल्या सत्तर-पंचाहत्तर राईड्स / स्लाईड्सच्या जोडीला ह्या अवाढव्य वॉटर पार्कमध्ये 'द अटलांटियन फ्लायर' (The Atlantean Flyer) ही थरारक झिप लाईन (Zip Line), टोरेंट, लेझी रिव्हर, रॅपिड अशा कृत्रिम नद्या आणि (अतिरिक्त शुल्क भरून अनुभवण्याची) 'डॉल्फिन बे' (Dolphin Bay) व 'सी लायन पॉइंट' (Sea Lion Point) अशी अनेक अन्य आकर्षणेही आहेत.

*अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्कचा विस्तार करून मार्च २०२१ पासून त्यात अनेक नवीन स्लाईड्सचा समावेश करण्यात आल्याने तेथील राईड्स / स्लाईड्सची संख्या १०५ झाली असून आता हे जगातले सर्वात मोठे वॉटर पार्क ठरले आहे.

साडे चार वाजेपर्यंत अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्कमध्ये मनोसोक्त धमाल केल्यावर शॉवर वगैरे घेऊन आम्ही चौघंजण पार्किंगलॉट मधल्या आमच्या गाडी जवळ आलो. सरदारजीच्या बायकोला काहीतरी तब्येतीचा त्रास जाणवू लागल्याने ते दोघे तीन वाजताच मोनोरेलने निघून गेल्याची माहिती रमीझने दिली आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. सव्वा सहाला आम्हाला आमच्या हॉटेलवर सोडून रमीझ पुढे फातिमा आणि लैलाला त्यांच्या हॉटेलवर सोडायला निघून गेला.
दोन सव्वादोन तास रुममध्ये टीव्ही बघत लोळत पडून आराम केल्यावर साडेआठ वाजता फ्रेश होऊन आम्ही पुन्हा बाहेर पडलो. दुपारी वॉटर पार्कमध्ये खाल्लेले पिझ्झा, बर्गर वगैरे आता जिरले असल्याने भूकही लागली होती म्हणून जेवायला लाहोरी पकवान मध्ये आलो. जेवण आले तेव्हा आम्ही दिलेल्या ऑर्डर मध्ये नसलेली खीर बघून वेटरकडे त्याबद्दल विचारणा केली असता त्याने हसून काउंटरवरच्या रशीद भाईंकडे बोट दाखवल्यावर आम्ही काय समजायचे ते समजून गेलो.
आधीच्या दोन दिवसात झालेल्या आमच्या बोलण्यातून आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचे रशीद भाईंना समजले होते आणि त्यांनी ते लक्षात ठेऊन त्यांच्यातर्फे ही खीर पाठवली असल्याचा आलेला अंदाज काहीवेळात काउंटरवरच्या कामातून उसंत मिळाल्यावर त्यांनी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या तेव्हा बरोबर ठरला. आपल्या भारतात नेहमीच्या रेस्टॉरंट्स मध्ये जेवायला गेल्यावर अधून मधून एखादी डिश किंवा स्वीट डिश व्यवस्थापनातर्फे कॉम्प्लीमेंटरी दिली जात असल्याचा अनुभव कित्येकदा येत असतो, परंतु जेमतेम २-३ दिवसांची ओळख असलेल्या रशीद भाईंनी असा मनाला सुखावणारा अनुभव दुबईत मिळवून दिल्याने आमचा दिवस फारच खास ठरला होता!
मस्तपैकी जेवण झाल्यावर मग तिथून चालत जाण्याच्या अंतरावर पर्यटक आणि स्थानिकांची बरयापैकी वर्दळ असलेल्या खाडी किनाऱ्यावरच्या चौपाटी टाईप भागात थोडावेळ भटकून टाईमपास केल्यावर किनाऱ्यावरच्या बेंचवर साडे अकरा पर्यंत निवांत बसून मग रमत-गमत आम्ही हॉटेलवर पोचलो.
उद्याचा पूर्वनियोजित डेझर्ट सफारीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजताचा असल्याने सकाळी लवकर उठण्याची अजिबात घाई नसल्याने मग परवा रात्री धावती भेट दिलेल्या आमच्या हॉटेल मधल्याच 'जंगल क्लब' ह्या आफ्रिकन डिस्को मध्ये एकदम फुरसतमध्ये प्रवेशकर्ते झालो.

JUNGLE CLUB
▼ 'जंगल क्लब' आफ्रिकन डिस्को

(जंगल क्लबचे सर्व फोटोज हॉटेल फॉर्च्युन पर्लच्या वेबसाईट वरून साभार.)

×

क्लब मध्ये आज आमच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय होती. अदितीच्या आवडीचे 'ब्लू लगून' (Blue Lagoon) मॉकटेल आणि माझे आवडीचे एल.आय.आय.टी. (Long Island Iced Tea) ह्या कॉकटेलचा आस्वाद घेत लाइव्ह ऑर्केस्ट्रावर गायक/गायिका सादर करत असलेली गाणी ऐकत, डान्स फ्लोरवर नाचणाऱ्या हौशी मंडळींचे नृत्य बघण्यात वेळ फार मजेत चालला होता. दुबईतली दुकाने रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यामुळे मध्यरात्री एक वाजून गेल्यावर दुकाने बंद केल्यावर स्थानिक दुकानदार मंडळींचे ग्रुप्स श्रम परीहारासाठी नाईट क्लब्स मध्ये यायला सुरुवात होते.
माझे कॉकटेलचे तीन राउंड झाल्यावर मात्र L.I.I.T. चा अंमल जाणवायला लागल्या मुळे असेल कि दिवसभरात झालेल्या दगदगीमुळे असेल पण पावणे दोनच्या सुमारास आम्हा दोघांनाही झोप येऊ लागल्याने आम्ही क्लब मधून काढता पाय घेतला आणि वरती आमच्या रूममध्ये आलो. सकाळी उठायची घाई नव्हती पण ब्रेकफास्टची वेळ दहा पर्यंत असल्याने साडे नऊचा अलार्म लावला आणि आम्ही झोपी गेलो.
क्रमशः

पुढचा भाग :
दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग ४

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

21 Oct 2021 - 5:15 pm | कुमार१

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट वर्णन आणि प्रकाशचित्रे.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2021 - 9:10 pm | चांदणे संदीप

फोटो आणि लेख दोन्ही लाजवाब!
मस्त सफर घडवलीत.

सं - दी - प

अनिंद्य's picture

21 Oct 2021 - 9:24 pm | अनिंद्य

छानच !
पु भा प्र

टर्मीनेटर's picture

23 Oct 2021 - 11:19 am | टर्मीनेटर

@ कुमार१, चांदणे संदीप  &  अनिंद्य
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

तुषार काळभोर's picture

23 Oct 2021 - 4:11 pm | तुषार काळभोर

तब्बल दहा महिन्यांनी दिवाळी आधी तिसऱ्या दिवसाचे वर्णन टाकल्याबद्दल श्री टर्मिनेटर यांचे अभिनंदन!! :D

'अवांतर' : लेख चांगला आहे, फोटो भारी आहेत, लेखाची रचना जबरी आहे.. डोळ्याला सुखावणारा लेख!

अति अवांतर : पुढील भाग ...

Rajesh188's picture

22 Oct 2021 - 8:20 am | Rajesh188

अती उच्च दर्जा चे सरकार आणि सर्वोच्च दर्जा ची नोकरशाही असेल तर वाळवंट मध्ये सुद्धा नंदनवन फुलू शकत हे दुबई नी दाखवून दिले आहे.
निकृष्ट दर्जा चे सरकार आणि तितकीच निकृष्ट नोकरशाही असेल तर नंदनवन चे सुद्धा वाळवंट होवू शकते ह्याची अनेक उदाहरणे आहेत.

लोकांना त्यांच्या लायकी प्रमाणे सरकार मिळते (People get the government they deserve). या अर्थाचे एक इंग्रजी वचन आहे आणि ते अतिशय सार्थ आहे हे जाणवले.
एवढ्या सुंदर लेखावरील अभिप्रायात हिणकस दर्जाचा शेरा मारून तुम्ही तुमच्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे.

चौकस२१२'s picture

22 Oct 2021 - 8:49 am | चौकस२१२

दरवर्षी लग्नाचा वाढदिवस शक्यतो परदेशी पर्यटनाला जाऊन साजरा करण्याच्या आमच्या परंपरेचे पालन
इतर देशातील भटकंती पण लिहा नक्की
आत्तापर्यंत कोणती विमानसेवा कधी ना ऐकलेली ?
=माझी होती बुरक ( बुराख _ असे काहीतरी नाव होते इंडोनेशियातील, याशिवाय रॉयल ब्रुनेई !

टर्मीनेटर's picture

23 Oct 2021 - 11:46 am | टर्मीनेटर

@ तुषार काळभोर, Rajesh188 & चौकस२१२
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ तुषार काळभोर - हा भाग लिहिण्यास अमानुष उशीर झाला हा गुन्हा कबुल आहे 😀
शेवटचा चौथा भाग मात्र लवकरच टाकतो!

@ चौकस२१२ - इतर देशांतल्या भटकंती पैकी अनेक ठिकाणांबद्दल मिपावर छान छान लेखन आधीच आलेले असल्याने पुन्हा लिहिणे टाळले आहे. तरी वेळ मिळाल्यास अवश्य प्रयत्न करीन. धन्यवाद.

सौंदाळा's picture

22 Oct 2021 - 9:06 am | सौंदाळा

खूप दिवसांनी हा भाग आला पण वाट बघितल्याचे सार्थक झाले.

प्रचेतस's picture

22 Oct 2021 - 9:25 am | प्रचेतस

खूप दिवसांनी हा भाग आला पण सार्थक झाले. उत्कृष्ट वर्णन. दुबईने अविश्वनीय अशी प्रगती साधलेली आहे.
देखंण्या दुबईप्रमाणेच हा धागाही अगदी व्हिज्युअल ट्रीट आहे.

Bhakti's picture

22 Oct 2021 - 9:59 am | Bhakti

मस्त!

टर्मीनेटर's picture

23 Oct 2021 - 11:54 am | टर्मीनेटर

@ सौंदाळा, प्रचेतस & Bhakti
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 आणि हा भाग लिहिण्यास झालेल्या 'सुपर लेट' साठी क्षमस्व.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

22 Oct 2021 - 11:51 am | ॲबसेंट माइंडेड ...

सुंदर वर्णन. आधीचे दोन भागही वाचले.

गोरगावलेकर's picture

22 Oct 2021 - 12:05 pm | गोरगावलेकर

लेख आणि रचना खूपच सुंदर . फोटो तर अप्रतिम!

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2021 - 12:13 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम प्रचि, सुंदर व्हिडीओज आणि चपखल वर्णन !
💖
दुबई नंदनवनाचे सौंदर्य पाहून डोळे निवले !
धाग्याचा पेज ले-आऊट पाहून हॄदय उद्यान-उद्यान जाहले !

@ ॲबसेंट माइंडेड, गोरगावलेकर & चौथा कोनाडा
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

श्वेता व्यास's picture

22 Oct 2021 - 12:21 pm | श्वेता व्यास

छान भटकंती, सुंदर लेख आणि फोटो.

नचिकेत जवखेडकर's picture

22 Oct 2021 - 12:37 pm | नचिकेत जवखेडकर

सुंदर वर्णन आणि छायाचित्रे!

आम्ही दुबईला २०१५ च्या वर्षाअखेरीस गेलो होतो बुर्ज खलिफाची रोषणाई बघायला. ३१ डिसेम्बरला बऱ्याच आधी म्हणजे साधारण ८ एक तास अगोदर जाऊन अगदी मोक्याची जागा मिळवली होती. पण साधारण रात्री ९:३० च्या सुमारास बुर्ज खलिफाच्याच शेजारी असलेल्या द ऍड्रेस हॉटेलला खूप मोठी आग लागली आणि जो काही हलकल्लोळ माजला की ज्याचं नाव ते. आम्ही हॉटेलवर परत यायचा निर्णय घेतला पण सगळीच वाहतूक खोळंबली होती. बुर्ज खलिफाच्या व्यवस्थापनाने १२ वाजता रोषणाई केली पण नंतर आम्हाला जी जागा मिळाली तिकडून बुर्ज खलिफा अर्धाच दिसत होता. सगळ्याच कार्यक्रमाचा विरस झाला. असो, पुन्हा कधीतरी :)

टर्मीनेटर's picture

23 Oct 2021 - 12:19 pm | टर्मीनेटर

@ श्वेता व्यास & नचिकेत जवखेडकर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ नचिकेत जवखेडकर,
हो, अ‍ॅड्रेस डाउनटाउनला लगलेली भिषण आग ही त्यावेळी सगळ्या वर्तमानपत्रांची हेडलाईन होती.

असो, पुन्हा कधीतरी :)

येस! तसंही दुबई दर दोन वर्षांनी भेट देण्यासारखे डेस्टीनेशन म्हणुन पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेच 👍

एक_वात्रट's picture

23 Oct 2021 - 1:56 pm | एक_वात्रट

टर्मीनेटर, आपण जिथे फिरायला जातो तिथल्या प्रेक्षणीय स्थळांची वर्णने करणारी प्रवासवर्णने अनेक असतात, पण प्रवासात भेटलेल्या विविध व्यक्ती आणि वल्लींनाही शब्दचित्रांद्वारे प्रवासवर्णनाचा एक भाग बनवून टाकणारी वर्णने फारच विरळी! आपण प्रवासात भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांचे जे वर्णन करता ते खूपच चित्रदर्शी आणि तो मनुष्य अगदी डोळ्यासमोर उभे करणारे असते.

नेहमीप्रमाणेच सुंदर प्रवासवर्णन आणि चित्रे!

हा भाग खूपच उशीरा आला, आता पुढील भाग तरी लवकर येईल अशी आशा आहे.

रात्रीचे चांदणे's picture

23 Oct 2021 - 4:42 pm | रात्रीचे चांदणे

टर्मीनेटर, अतिशय सुरेख प्रवास वर्णन लिहलय तुम्ही. फोटो आणि लेखाची रचना जबरदस्त आहे. तुम्हचे सगळे लेखच चांगले असतात. इजिप्तचे प्रवासवर्णन ही वाचनीय आहे.

अभिजीत अवलिया's picture

24 Oct 2021 - 6:18 am | अभिजीत अवलिया

अतिशय उत्तम मांडणी …

@ एक_वात्रट, रात्रीचे चांदणे & अभिजीत अवलिया
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

अथांग आकाश's picture

25 Oct 2021 - 8:07 am | अथांग आकाश

नेहमीप्रमाणेच छान लेख व फोटो!
0

रंगीला रतन's picture

25 Oct 2021 - 11:03 am | रंगीला रतन

देर आये दुरुस्त आये :=)
मस्तच. पु. भा. प्र.

बहुप्रतिक्षीत तिसरा भाग पाहुन डोळ्यांचे पारणे फिटले

आता सवडीने एक एक फोटो बघत परत वाचणार आहे.

चौथा भाग लवकर लिहिण्याकरता जर कोणी टंचनिका मिळाली तर बघा. (तिच्या मानधना साठी इथे मिपावर दोन दोन रुपये वर्गणी काढूया)

ब्याकग्रौंड ला चित्र टाकणे ह्या विषयाची शिकवणी कधी सुरु करायची?

पैजारबुवा,

पैजारबुवा,

@ अथांग आकाश, रंगीला रतन & ज्ञानोबाचे पैजार
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

पैजारबुवा,

ब्याकग्रौंड ला चित्र टाकणे ह्या विषयाची शिकवणी कधी सुरु करायची?

तुमच्या पुण्यातली काटकीरची मिसळ आणि कुठलीशी ती मस्तानी खाऊ घातलीत की लगेच 😀 😀 😀

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Oct 2021 - 3:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या पुण्यातली काटकीरची मिसळ आणि कुठलीशी ती मस्तानी खाऊ घातलीत की लगेच

ज्ञान हे दिल्याने वाढते, तेव्हा गुरुजनांनी असे हिशोब ठेवू नयेत,

आपल्या चरणस्पर्षाने जेव्हा पुण्यभुमी पावन होईल तेव्हा आपणास मिसळ आणि मस्तानीचा नैवेद्य अर्पण करण्यात येईल अशी मी सूर्यचंद्राला (चंद्रसूर्याला नाही) साक्षी ठेवून शपथ घेतो.

पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

26 Oct 2021 - 6:46 pm | टर्मीनेटर

चालेल... काही हरकत नाही 😀

Nitin Palkar's picture

2 Nov 2021 - 3:00 pm | Nitin Palkar

वाचनीय अधिक की प्रेक्षणीय अधिक असा प्रश्न पडावा अशी लेखमाला. इजिप्त भटकंतीवरील लेखमाला देखील आवडली होती. तुमच्या वर्णनशैलीला, प्रकाशचित्रणाला आणि लेखाच्या सजावटीला सलाम.

जेम्स वांड's picture

5 Nov 2021 - 9:19 am | जेम्स वांड

डोंगरी नागपाड्यात दुबईला जाणे म्हणजे "भारगाव" जाणे म्हणतात, पण हे भारगाव तर लैच सुबक सुंदर आहे, वाळवंटातील नंदनवन खरोखर.

३ लॉंग आयलंड आईस टी, बाबाऊ कमाल आहे तुमची.

डोंगरी नागपाड्यात दुबईला जाणे म्हणजे "भारगाव" जाणे म्हणतात

😀 😀 😀
‘ब्लॅक फ्रयडे‘ मधला सीन आठवला एकदम!

३ लॉंग आयलंड आईस टी, बाबाऊ कमाल आहे तुमची.

अपना उसुल केहता है, ऐयाशी मे कोई कमी नही रेहनी चाहीये 😀
मौका भी था…. दस्तुर भी था…. चौका मारनेका मुड बना भी लिया था, पर हाय रे कम्बख्त निंद… उसने प्लॅन चौपट कर दिया!

लेखन आणि फोटो दोन्ही झकास ! मला मात्र हल्ली अशी चमकदार दुनिया आकर्षित करत नाही, दुबईत बरचं काही नवलाच असलं तरी भारतीय / आशियाई लोकांच्या क्रूर गुलामीतुन हे साकारलं गेलेल आहे. दुबई सध्या गर्तेत जात आहे असं ऐकुन आहे. बघुया यह चमक और कितनी देर रहती हय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Nov 2021 - 8:34 pm | ॲबसेंट माइंडेड ...
टर्मीनेटर's picture

1 Dec 2021 - 5:10 pm | टर्मीनेटर

@ Nitin Palkar, जेम्स वांड आणि मदनबाण
प्रतिसादासाठी आपले मन:पुर्वक आभार 🙏