हझल

झिंगूनी गुत्त्यात सार्‍या...

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
31 Dec 2013 - 9:43 am

गझलसम्राट सुरेश भटांची माफी मागून "थट्टीफस" निमित्त:

झिंगूनी गुत्त्यात सार्‍या मी हो नाही बेवडा
दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा

कोण जाणे कोठुनी हे नवे दोस्त आले पुढे
मी असा की जमे "असा" मित्रमेळा एव्हढा

असे ही खिशात माझ्या चपटी औषधापरी
हे कंट्रीचे प्रेम माझे देशभक्त मी हो केव्हढा

कोणत्या इयत्तेत कळेना मी प्यावयास लागलो
अन्‌ कुठे मित्र गेले पुढे मी विकत राहीलो वडा

सांगती गुण माझे सारखे बायको अन्‌ चार पोरे
नवरा माझा दारुडया अन्‌ बाप आमचा बेवडा

हझलविडंबन

हझल

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
21 Nov 2013 - 6:20 am

ते वार लाटण्याचे चुकवू कितीक आता
हा पोळपाट हाती तोही फुटेल आता

पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी
डोक्यावरी निशाणा धरणार हाय आता

तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी
लोटांगणाविना ना पर्याय काय आता

प्राविण्य नेमबाजी कौतूक फार झाले
का भोगणे तडाखे मज ह्या वयात आता

ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली
आज्ञा किती झुगारू उरले न त्राण आता . .
.

हझलकरुणकविताजीवनमानमौजमजा