जे न देखे रवी...
विहीर खोदण्याचा विचार
विहीर खोदण्याचा विचार...
डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....
जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
बिज्जी लेखिकेची आळवणी
(ज्यांना ही कविता टोचायला, सॉरी, पोचायला हवी त्यांना नक्की पोचेल अशी खात्री आहे. इतरांनी मात्र ती विशुद्ध साहित्यिक दृष्टीने वाचावी ही नंब्र इनंती!)
बिज्जी लेखिकेला
असे घाई भारी
मिटिंगा लई
सुप्रभाती, दुपारी
बिज्जी लेखिका ती
भुसनळी पेटलेली
कुणी त्रास देता
ठासते आग 'खाली'
दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???
(बंद डब्याच्या झाकणाआडची कोशिंबीर)
(सगळ्यांनीच कीबोर्ड सरसावलेत... म्हटलं आपण कशाला मागे राहा... :-)
बाकी शिवकन्या तुमचे आभार!!)
सकाळी डब्यात भरलेली कोशिंबीर बघते आहे झाकणाआडून बाहेर...
किती बाहेर??
टेबलावरच्या डब्याच्या बाहेर शेजारच्या खुर्चीत बसलेल्या त्या माणसाकडे ....
ज्याने सकाळी उत्साहाच्या भरात
डाएटच्या नादात
भरली होती तिला डब्यात....
(दाराआडचा यजमान)
एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो
किती बाहेर?
दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार
जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा ....
असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ?
येत असेल का तो ही
आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे?
यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
(पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते)
माणसे मित्र बनून येतात...... ( प्रेरणा :: माणसे कविता बनून येतात...)
माणसे मित्र बनून येतात
सदैव गाती मैत्रीचे गोडवे
तोंडात जणू साखर ठेवतात,
काही महिन्यांमध्येच
एक जीवघेणी कळ देऊन
पाठीत वार करून जातात ...
माणसे मित्र बनून येतात
मनातलं बाहेर काढून
केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन
दिवसभर कानाशी बसतात
आपली लागताना खोलून
मैत्रीच्या अंधारात
पुन्हा गुडूप होतात......
माणसे मित्र बनून येतात...
माणसे कविता होऊन येतात.....
माणसे कविता होऊन येतात
एकएक हट्टी कडवे
लाडाकोडाने घालून ठेवतात,
दोन कडव्यांमध्ये
एक जीवघेणी कळ
विसावा म्हणून ठेवून जातात...
माणसे कविता होऊन येतात
अलंकार भिरकावून
केवळ अर्थ होऊन
रात्रभर उशाशी बसतात
उजाडताना परत
पुस्तकाच्या अंधारात
गुडूप होतात......
माणसे कविता होऊन येतात....
-शिवकन्या
घोळ झाला घोळ
घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुला आठवता कागदावरी उतरून आली ओळ
सखे गं घोळ झाला घोळ
घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
स्पर्शता तुला विसरून गेलो करायची अंघोळ
सखे गं घोळ झाला घोळ
घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ
तुझ्या सयीने हृदयाच्या छिद्राचे झाले बोळ
सखे गं घोळ झाला घोळ
# राजे छत्रपती
शिवनेरी दारी तोफा कडाकल्या
सह्याद्रीच्या कुशीत विजा चमकल्या....
जिजावुंच्या पोटी रत्न जन्मलं
स्वराज्याच्या स्वप्नात राजे बाळ रंगल....
हाती घेऊन तलवार करी अन्यायाचा प्रतीकार
प्रत्येकी जाहला देवाचा साक्षात्कार......
केली स्वराज्याची स्वारी घेऊनी आर्शिवाद भवानी मातेचा
शत्रूंवर बरसला मस्तकी लावूनी टीळा भगव्या रक्ताचा .....
Coffee आणि ति २
#Coffee2
आपली भेट ,Coffee आणि बरच काही
आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही...
कारण आज नव्हतीस तू समोर फक्त भास होता मनाचा
सोबत बसलोय तुझ्या हाच प्रयन्त होता स्वतःला समजवण्याचा...
स्वतःला तुझ्यात हरवून खूप काही आज बोलायचं होत
डोळे बंद करून तुझ्या गप्पांमध्ये स्वतःला गुंतवायच होत....
Coffee आणि ति
आपली भेट ,Coffee आणि बरच काही
आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही...
ओळख असुनही अनोळखीच वाटत होतो
एकमेकांची नजर चुकवून हळूच बघत होतो ...
चेहऱ्यावर शांतता पण मनातून भलतेच खुश होतो
पहिले कोण बोलेल ह्याचीच वाट बघत होतो....
तक्रारी तर एकमेकांच्या खूपच होत्या
पण मनातल्या भावना ओठांवरच थांबल्या होत्या ...
#आई
#आई
आई आज तुझ्या आठवणी मध्ये रमून रहावस वाटतं
तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावासा वाटतं .....
किती मस्त झाले असते जर गेलेला वेळ परत आला असता
तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण पुन्हा जगायला भेटला असता....
लहानपणापासून माझे अडखळणारे पाऊल सांभाळले
वाट चुकलो तेव्हा बोटाला पकडून सरळ चालायला शिकवले....
महागाईच्या गप्पा
ऑफिसमध्ये काल बायका मारत होत्या गप्पा |
महागाईचा विषय होता साधा आणि सोपा |
काल जेंव्हा बाई मी मार्केटला गेले |
भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले|
पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी|
एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी |
एकरुपयाचे लिंबु पाच रुपयाला झाले |
कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले |
(तू मतदार माझा)
प्रेर्ना - विळखा पाहू
तू मतदार माझा
भोट, भोंगळ अजीजी
तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा
मस्तवाल नेता मी ....
घेऊन जमेस तुला
निव्वळ उगी तुंबडी भरावी
बोभाटा करावा मी एव्हढा
की लाभावी मज(समोरची) वाटणी
सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.
वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला
तू ट्रोल माझा
वरिज्नल प्रेर्ना क्र. १ https://www.misalpav.com/node/44410
प्रेर्ना क्र. २ https://www.misalpav.com/node/44413
प्रेर्ना क्र. ३ https://www.misalpav.com/node/44417
पाणी
इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना
विचार करायचा देवा,
पाण्याला इतके झोके देताना
उसंत घ्यायची देवा....
उसळून पुन्हा आदळते पाणी
खडक द्यायचा देवा...
दोन डोळे पुरत नाहीत
पाण्याचा संसार पेलताना...
देवा, आता पाण्याचे तीर्थ करा
अन् पाण्यातून मुक्ती द्या....
शिवकन्या
सांज
सहज असे चालतांना
भेट ती फुलांची,तू मला दिलेली
ओंजळीत त्या प्राजक्ताचा
गंध राहुनी गेला...
हात नाही हातात माझ्या
पण तूझा स्पर्श राहुनी गेला....
ना किनारा फेसाळणारा
ना लाट एकसारखी झेपावणारी,
अस्पष्ट जाहले होते सारे
नव्हतीच जणू उरली क्षणे
पुन्हा एकदा स्मरणारी....
तू हमाल माझा
तू हमाल माझा
शांत , नेभळट , गरीब, बिचारा (?)
तुझी मारण्या , तुज मागे धावणारी
चंडिका , महामाया , तुझी कडक लक्ष्मी ....
येऊन कामावर तुझ्या
चोरून दुरून पाहावे
पकडावे रंगेहाथ तुजला
कि लाजावी मजसमोर बॉन्डपत्नी ...
===============================
तुझी आणि फक्त तुझीच
सातजन्म मारणारी चि सौ का ?
तू चांदणी माझी
प्रेर्ना - चंद्राची चांदणी - ओळखा पाहू
तू चांदणी माझी
शांत, सोज्वळ, साजिरी
तुज चुम्बण्या तुज मागे धावणारा
उठवळ अश्व मी ....
घेऊन कवेत तुला
निखळ उब अंगी भरावी
प्रणय करावा मी एव्हढा
की लाजावी मजसमोरची चांदणी ....
- ‹ previous
- 58 of 468
- next ›