माणसे कविता होऊन येतात.....
माणसे कविता होऊन येतात
एकएक हट्टी कडवे
लाडाकोडाने घालून ठेवतात,
दोन कडव्यांमध्ये
एक जीवघेणी कळ
विसावा म्हणून ठेवून जातात...
माणसे कविता होऊन येतात
अलंकार भिरकावून
केवळ अर्थ होऊन
रात्रभर उशाशी बसतात
उजाडताना परत
पुस्तकाच्या अंधारात
गुडूप होतात......
माणसे कविता होऊन येतात....
-शिवकन्या
मस्त...
सुरेख. शिरीष पै ह्यांची '
हो, ना! खूपच सुन्दर!
मस्त कविता
छान आहे , सुंदर आहे , इडंबन करण्यासाठीच आलेली आहे असे पुन्हा पुन
छान
छान कविता!
सुरेख!
सर्व रसिक वाचकांचे आभार.
छान..
छान लिहिलंय
काही माणसं, खरंच, कविता बनून