माणसे मित्र बनून येतात...... ( प्रेरणा :: माणसे कविता बनून येतात...)
माणसे मित्र बनून येतात
सदैव गाती मैत्रीचे गोडवे
तोंडात जणू साखर ठेवतात,
काही महिन्यांमध्येच
एक जीवघेणी कळ देऊन
पाठीत वार करून जातात ...
माणसे मित्र बनून येतात
मनातलं बाहेर काढून
केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन
दिवसभर कानाशी बसतात
आपली लागताना खोलून
मैत्रीच्या अंधारात
पुन्हा गुडूप होतात......
माणसे मित्र बनून येतात...
विडंबन म्हणता सुडंबन झालं की
सुंदर
.
मस्त आहे
आवडली
आमचे थेट आभार स्वीकारा