एच्च्. मंगेशकरांचा भ्रमनिरास

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
29 Oct 2009 - 10:03 am

नुकताच महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकामध्ये बाळासाहेबांनी लिहिलेला एक लेख वाचला.
लेखाचा विषय आहे , " सा रे ग म प ..रिअ‍ॅलिटी शो"...
मंगेशकरांचा हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे.....
खूप मजेदार आहे.

लेखातले काही मुद्दे असे,
१.स्टेज शो करणार्‍या निवडक गायकांमधून महागायक निवडायच्या या पर्वाची आयडिआ बाळासाहेबांची होती. .. (पर्वानंतर यातल्या सर्व कलाकारांच्या गाण्यांचा एक आल्बम चॅनल काढणार असे आश्वासन चॅनलने दिले होते , परंतु चॅनल आता त्याकडे लक्ष न देता पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले सुद्धा.... मात्र त्यात निवेदक आणि दिग्दर्शक यांचा दोष नाही, असेही ते आवर्जून नमूद करतात.)मात्र चॅनेलने आश्वासने पाळली नाहीत वगैरे गोड तक्रारी केल्या आहेत.
२. एखादे गाणे बेसूर झाले असे चॆनल म्हणू देत नाही म्हणे.... सूर कमी लागला असे म्हणावे असे सुचवले जाते.. ( :)) .. बेसूर शब्दाने मुले दु:खी होतात असे समजते. ;)
३.कवितेचा अर्थ कसा वेगळा होतो याबद्दल त्यांना अधिक बोलायचे असताना देखील एक दोन भागांनंतर त्यांचे बोलणे चॆनलने एडिट करायला सुरुवात केली.....
त्यामुळे व्यथित हो ऊन त्यांना " मामा-भांजे" ...भांज्याचे प्रेमप्रकरण वगैरे वगैरे फ़ाल्तु ( परंतु लोकप्रिय) बडबड करावी लागे....
४. लेखात लिहिले आहे की काही लोकांनी त्यांचे निरूपण ऐकून त्यांना ह.भ.प. अशी पदवी द्यावी असे म्हटले किंवा त्यांना इतिहासकार मंगेशकर म्हटले .... याची त्यांना गंमत आणि वैषम्य वाटले...किती हे अज्ञानी प्रेक्षक, वगैरे वगैरे.. ( आता कोणीतरी गमतीने म्हटलेले हे वाक्य त्यांनी जास्तीच सीरियसली घेतले आहे असे वाटले, ते असो..)
५. कोसंबी आणि अभिजित सावंतला त्यांनी आवर्जून एकही स्टेजशो न करण्याच्या पात्रतेचा असे काहीतरी म्हटले आहे, हेही मजेदार..

( मंगेशकर रिअ‍ॅलिटी शो , एसेमेस वोटिंगला आवर्जून शिव्याशाप देतात आणि बर्‍याचदा त्यात परीक्षक म्हणून आवर्जून उपस्थिती लावतात, ही एक मजेदार गोष्ट.)

सध्या आठवतील ते मुद्दे हेच.. यावर इतकेच म्हणावेसे वाटते की चॆनल आर्थिक गणित बसले तरच आश्वासन पाळते, आणि कोणालाही सोडत नाही .....
जसा सामान्य प्रेक्षक चॆनलच्या नावाने बोटे मोडतो तसेच हेही .... एकूण भ्रमनिरास जोरात झालाय...
या पर्वात परीक्षक म्हणून यायची शक्यता दिसत नाही.

कलासंगीतसंस्कृतीप्रकटनशुभेच्छाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2009 - 10:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुद्दे मजेशीर वाटत आहेत. मास्तर, लेखाची लिंक देता येईल का? मुळात मटाचा दिवाळी अंक ऑनलाईन आहे का?

अदिती

भडकमकर मास्तर's picture

29 Oct 2009 - 2:16 pm | भडकमकर मास्तर

मटाचा ऑनलाईन दिवाळी अंक मी शोधला... पण त्यात आणि त्यांच्या छापील दिवाळी अंकात काही साम्य नाही...
मंगेशकरांचा लेख छापील दिवाळी अंकात आहे.
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

योगी९००'s picture

29 Oct 2009 - 2:55 pm | योगी९००

मटाच्या ऑनलाईन अंकाची लिंक पाठवाल काय?

खादाडमाऊ

भडकमकर मास्तर's picture

29 Oct 2009 - 3:21 pm | भडकमकर मास्तर

http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3624506.cms

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

देवदत्त's picture

29 Oct 2009 - 11:56 pm | देवदत्त

मास्तर, हा दुवा २००८ च्या दिवाळी अंकाचा आहे :)

बाकी, मटा चा छापील अंक माझ्याकडे आहे त्यात वाचला हा लेख. आणि वाहिन्यांवरील असा कुठलाही शो आता मला आवडत नाही.

[त्यातल्या त्यात आता बिंदास वाहिनीवर एक शो चालू झाला आहे. वृत्तपत्रात लिहून आल्याप्रमाणे , त्यात त्या १०-१२ जणांना गरीबांप्रमाणे रहायचे आहे. ह्याच्या मागचे प्रयोजन नाही कळले. (भिकेचे डोहाळे लागणे म्हणतात ते हेच का?)]

विंजिनेर's picture

29 Oct 2009 - 10:26 am | विंजिनेर

ह्मम्म... मजेदार चुणुक. संपुर्ण लेखाची लिंक मिळाली तर बरे होईल.

विसोबा खेचर's picture

29 Oct 2009 - 10:35 am | विसोबा खेचर

ते काहीही असो, एच्च मंगेशकर हे आमचे अत्यंत लाडके, आवडते कलाकार आहेत..

सारेगमप वगैरे सारखे शोज म्हणजे या चॅनलवाल्यांचा निव्वळ धंदा आहे, त्यांना कलेशी काही देणंघेणं नसतं, आणि कलेपेक्षा त्यात बकवासच अधिक असतो असं आम्ही नेहमीच म्हणत आलेलो आहोत..

मात्र एका सारेगमपच्या निमित्ताने काही दिवस हृदयनाथ मंगेशकरांसारख्या दिग्गजाचे विचार, अनुभव ऐकायला मिळाले हीच काय ती भाग्याची गोष्ट!

आपला,
(मंगेशकर कुटुंबाचा चाहता, दिदीचा कडवा-कट्टर भक्त) तात्या.

हुप्प्या's picture

29 Oct 2009 - 11:54 pm | हुप्प्या

हृदयनाथ मंगेशकर हे माझेही आवडते गायक, संगीतकार आहेत. त्यांच्या अवीट गोडीच्या रचना असंख्य वेळा ऐकल्या आणि पुढेही ऐकेन. पण सारेगमपच्या निमित्ताने ते एक सुसंस्कृत, विचारी आणि उत्तम वक्ता आहेत हेही कळले. खरोखर त्यांनी सांगितलेल्या आठवणी, क्लिष्ट वाटणार्‍या ज्ञानेश्वरांच्या रचनांचे अर्थ अगदी ऐकत राहावेसे आहेत. त्यांनी त्यांच्या अशा भाषणांची ध्वनिमुद्रिका काढावी असे राहून राहून वाटते. संगीतातील इतकी मोठी मिळकत असताना माणूस अगदी साधा रहातो. बोलण्यात अहंकाराचा लवलेश आढळत नाही.

सावरकर, शिवाजी, ज्ञानेश्वर ह्या मराठीतल्या दिग्गज लोकांना आपल्या संगीताने एक नवी संजीवनी देणार्‍या ह्या कलावंत भावंडाना मी मराठी संस्कृतीचे भूषण मानतो.

अमोल केळकर's picture

29 Oct 2009 - 10:43 am | अमोल केळकर

याच मंगेशकरांनी टि.व्ही माध्यमातूनच आपल्या कन्येचे ( काय बरे तिचे नाव ? :) ) अल्बम लाँचीग पध्दतशीर पार पाडले.
बघूया मंगेशकर घराण्याची ही पुढची पिढी कितपत प्रभाव पाडते ते?

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

योगी९००'s picture

29 Oct 2009 - 1:59 pm | योगी९००

तिचे नाव राधा मंगेशकर ...

खादाडमाऊ

प्रमोद्_पुणे's picture

29 Oct 2009 - 2:30 pm | प्रमोद्_पुणे

राधा मंगेशकर ही एक अत्यंत टुकार गायिका (??) आहे.. केवळ नाम महात्म्य.. तिच्या वडीलांच्या कार्यक्रमात नेहमी रडते.. पण त्याना ऐकायचे असते त्यामुळे हिला सहन करावे लागते.

बाकी पंडीतजींचे गाणे आणि संगीत मात्र वादातीत....

JAGOMOHANPYARE's picture

29 Oct 2009 - 11:25 am | JAGOMOHANPYARE

या लेखाची लिंक मिळेल का?

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

प्रमोद देव's picture

29 Oct 2009 - 11:28 am | प्रमोद देव

ह्याच बाळासाहेबांनी......सागरा प्राण तळमळला ह्या गीतातल्या......
ती आम्रवृक्षवत्सलता, रे
नवकुसुमयुता त्या सुलता, रे
तो बाल गुलाबहि आता, रे
फुलबाग मला, हाय, पारखा झाला

ह्या ओळींचा अर्थ सांगतांना असं सांगितल्याचं आठवतंय की.....बाबाराव सावरकर-स्वातंत्र्यवीरांचे ज्येष्ठ बंधू....हे अविवाहित होते. मग स्वातंत्र्यवीरांच्या चरित्रात ज्या येसूवहिनी येतात त्या कोण?
खरे तर येसूवहिनींचे(बाबारावांची पत्नी) सांत्वन करण्यासाठी ह्या ओळी आहेत....येसूवहिनींचे नवजात अर्भक मृत पावले होते....अशी काहीशी गंभीर परिस्थिती होती.

इतका ढळढळीत विनोदी इति'हास' ह्या आधी कधी ऐकला नव्हता आणि तोही स्वतःला सावरकर भक्त म्हणवणार्‍या व्यक्तीकडून. ;)

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

विसोबा खेचर's picture

29 Oct 2009 - 12:06 pm | विसोबा खेचर

एक सूचना -

हे संकेतस्थळ पूर्णत: एक खाजगी मालमत्ता असून येथे भारतरत्न लता मंगेशकरांविषयी एकही गैरशब्द/विरोधी सूर/काही निंदा-नालस्ती विषयक कोणतेही लेखन सहन केले जाणार नाही! त्यांच्या सामाजिक/वैयक्तिक आयुष्याविषयी कुणाची काही विरोधी मते असतीलही आणि त्या मतांचा आदरही आहे. परंतु त्या व्यक्त करण्यास मिसळपाव ह्या व्यासपिठावर पूर्णत: बंदी आहे हे सर्व सभासदांनी कृपया लक्षात घ्यावे ही विनंती!

तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2009 - 12:23 pm | llपुण्याचे पेशवेll

+१. सहमत आहे.

=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =)) =)) =))

बादवे, मालक तर तात्या अभ्यंकर होते. त्यांचे 'तात्य अभ्यंकर' कधी झाले?

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

Nile's picture

30 Oct 2009 - 11:48 am | Nile

पेशव्यांच्या प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे.

-The more things are forbidden, the more popular they become. -Mark Twain.

अवलिया's picture

29 Oct 2009 - 12:28 pm | अवलिया

अतिशय योग्य निर्णय.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

29 Oct 2009 - 1:07 pm | टारझन

हे संकेतस्थळ पूर्णत: एक खाजगी मालमत्ता असून

एक्स्ट्रिमली सॉरी तात्या ... मिसळपाव हे "माझं" आहे असं समजुन वावरत होतो :) शिवाय आपणही म्हणायचात "मिसळपाव आपलं आहे .." ह्यापुढे लक्षात ठेऊ !!


भारतरत्न लता मंगेशकरांविषयी एकही गैरशब्द/विरोधी सूर/काही निंदा-नालस्ती विषयक कोणतेही लेखन सहन केले जाणार नाही!

:) :) :) नक्कीच ह्याचे पालन करू .... पण जेंव्हा एखादा थोर संगितकार मरतो तेंव्हा त्याच्या स्मृतीला वंदून त्याचे चहाते लिहीतात तेंव्हा तिथे जर कोणी त्याचा त्याचं संगित सोडून वैयक्तिक (मी केला त्यापेक्षा कैक पटीनं अधीक) अवमान केला तर ते आम्हाला सहन करण्यापलिकडे काहीही करता येत नाही हो !!


त्यांच्या सामाजिक/वैयक्तिक आयुष्याविषयी कुणाची काही विरोधी मते असतीलही आणि त्या मतांचा आदरही आहे.

मतांचा आदर केल्याबद्दल आभार तात्या !! आपल्याविषयीचा आदर दुणावला !!


परंतु त्या व्यक्त करण्यास मिसळपाव ह्या व्यासपिठावर पूर्णत: बंदी आहे हे सर्व सभासदांनी कृपया लक्षात घ्यावे ही विनंती!

मिसळपावच्या सर्व नियमांचा आदर करू :)

अवांतर : आज हापिसात जरा बॉस नव्हता ... निवांत होतो .. थोडी पिंक टाकून मज्जा पाहू एवढाच काय तो हेतू =)) =)) पळा आता .. नाय तं येतोय तात्या बांबू घेऊन !!

-- टारझन
साधासुधा सदस्य, मौजे मिसळपाव.कॉम

अवलिया's picture

29 Oct 2009 - 1:14 pm | अवलिया

जियो ! टारुशेट जियो *!!

* जियो हा शब्द खुप जुना असला तरी श्री तात्या अभ्यंकर उर्फ विसोबा खेचर यांनी आंतरजालावर पहिल्यांदा वापरला असे त्यांचे म्हणणे आहे. आमचे सदस्यत्व रद्द होवु नये म्हणुन आम्ही "जियो" या शब्दाला त्यांचा प्रताधिकार असल्याचे मान्य करुन त्यांना श्रेय देत आहोत. नोंद घ्यावी !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मदनबाण's picture

29 Oct 2009 - 1:18 pm | मदनबाण

हे संकेतस्थळ पूर्णत: एक खाजगी मालमत्ता असून

एक्स्ट्रिमली सॉरी तात्या ... मिसळपाव हे "माझं" आहे असं समजुन वावरत होतो शिवाय आपणही म्हणायचात "मिसळपाव आपलं आहे .." ह्यापुढे लक्षात ठेऊ !!

टारुशी सहमत...

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

श्री's picture

29 Oct 2009 - 3:38 pm | श्री

का रे टारुबाळा,
तात्यांचे विम्याचे पैसे फुकट घालवतोस ?
तमसो मा ज्योर्तिगमय

श्रावण मोडक's picture

29 Oct 2009 - 1:21 pm | श्रावण मोडक

याला जीवन ऐसे नाव!!!

विसोबा खेचर's picture

29 Oct 2009 - 2:39 pm | विसोबा खेचर

एक्स्ट्रिमली सॉरी तात्या ... मिसळपाव हे "माझं" आहे असं समजुन वावरत होतो Smile शिवाय आपणही म्हणायचात "मिसळपाव आपलं आहे .."

आपलंच आहे आणि आपलंच राहील..

आम्ही फक्त वरील वटहुकूम काढण्यापुरताच आमचा मालकी हक्क दाखवला. काही गोष्टी मालकी हक्कानेच लिहिलेल्या असल्या म्हणजे मग त्यात वाद किंवा दुमत होत नाही.

नक्कीच ह्याचे पालन करू ....

धन्यवाद..

पण जेंव्हा एखादा थोर संगितकार मरतो तेंव्हा त्याच्या स्मृतीला वंदून त्याचे चहाते लिहीतात तेंव्हा तिथे जर कोणी त्याचा त्याचं संगित सोडून वैयक्तिक (मी केला त्यापेक्षा कैक पटीनं अधीक) अवमान केला तर ते आम्हाला सहन करण्यापलिकडे काहीही करता येत नाही हो !!

का बरं? त्या सोकॉल्ड थोर संगीतकाराच्या चाहत्यांनी अवश्य स्वत:ची संकेतस्थळं काढावीत आणि तिथं आम्ही लतादिदींच्या बाबतीत जसा वटहुकूम जारी केला तसा त्या संगीतकाराच्या बाबतीत करावा! आमचं काहीच म्हणणं नाही! आमचं अधिकारक्षेत्र फक्त मिपापुरतं मर्यादित आहे आणि मिपावर काय चालावं आणि काय चालू नये इतकंच आम्ही सांगितलं आहे..

मिसळपावच्या सर्व नियमांचा आदर करू

धन्यवाद..

आपला,
(लतादिदीवर डोळस/आंधळी सर्व प्रकारची श्रद्धा असणारा) तात्या.

टारझन's picture

29 Oct 2009 - 3:44 pm | टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद ! :)

आपलाच ,
टार्‍या

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 7:41 pm | निमीत्त मात्र

पटत नसणार्‍यांसाठी चित्रात दिलेला स्पष्ट पर्याय असताना लोक वाद का घालतात कळत नाही.

रामपुरी's picture

29 Oct 2009 - 9:15 pm | रामपुरी

सहमत आहे. इथे काथ्याकूट केल्याने मंगेशकरांनी जे काही बरंवाईट केलं आहे ते आता बदलणार नाही तेंव्हा गप्प रहाणे श्रेयस्कर.
(अर्थात गप्प राहिल्याने किंवा सांगोवांगीने आमची मते बदलणार नाहीत ही गोष्ट वेगळी)

राधा तिचं नाव. मागच्या महिन्यात पार्ल्याला श्री खळेंच्या सत्कार समारंभात पहिल्यांदाच तिचं गाण आईकल. ह्या फंदात तिने पडु नये.

चिंतामणराव .....आमचा हरी आहे...

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2009 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार

राधा तिचं नाव. मागच्या महिन्यात पार्ल्याला श्री खळेंच्या सत्कार समारंभात पहिल्यांदाच तिचं गाण आईकल. ह्या फंदात तिने पडु नये.

वा असे कसे ?? आम्ही तर तीचे आणी हिमेश रेशमीयाचे किंवा तीचे आणी अवधुत गुप्ते (मराठीतला हिमेश) ड्युएट कधी कानावर पडतय ह्याची चातका सारखी वाट पाहात आहोत.

आणि हो सा रे ग म प ह्या कार्यक्रमाविषयी आणी त्याच्याशी संबंधीत लोकांविषयी काही टिपणी करण्यात वेळ घालवणे आम्ही व्यर्थ समजतो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रमोद देव's picture

29 Oct 2009 - 2:44 pm | प्रमोद देव

असं कुठेसं वाचल्याचं आठवतंय. पण मारून मुटकून अट्टाहासाने तिला गायिका बनवलं जातंय...मंगेशकर घराण्याची परंपरा राखण्यासाठी. ;)

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2009 - 2:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. देव, आपण या विधानाचा संदर्भ देऊ शकाल काय? नाहीतर उगाचच तुम्ही निमित्त व्हाल आणि तोफांचा रोख मात्र संपादकांकडे वळेल.

(संदर्भासहित) अदिती

हे देखिल मी कधीकाळी वृत्तपत्रातच वाचलंय आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे. पण सगळ्याच गोष्टींचा संदर्भ प्रत्येकवेळी देता येतोच असे नाही. तद्वत माझ्याजवळ तसा काही दर्शनीय संदर्भ नाही.
बाकी संपादकांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र वैयक्तिक रित्या मला असं वाटतंय की माझ्या विधानात काहीही वावगे वाटावे असे नाहीये. तेव्हा ज्यांना हे विधान ग्राह्य धरावेसे वाटत असेल त्यांनी ते धरावे आणि बाकीच्यांनी त्याकडे दूर्लक्ष करावे.

==========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 7:38 pm | निमीत्त मात्र

अदितीजी, संदर्भ द्या संदर्भ द्या असे म्हणून कंठशोष करणार्‍यांकडेच आम्ही संदर्भाची मागणी करतो. प्रमोद देवांनी तसे कधी केल्याचे आमच्या स्मरणात नाही. त्यांच्याकडे आम्ही कधीही संदर्भ मागणार नाही.

बाकी इतर वेळेला संदर्भ नसताना कुणाच्याही तोंडात वाक्ये भरू नयेत म्हणणारे मधू दंडवतेंच्या तोंडात वाक्ये भरतात ही गंमतच आहे की नाही. 'कुणाच्याही' च्या व्याख्येमधे फक्त 'हिंदुत्ववादी' नेतेच येतात वाटतं. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Oct 2009 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी इतर वेळेला संदर्भ नसताना कुणाच्याही तोंडात वाक्ये भरू नयेत म्हणणारे मधू दंडवतेंच्या तोंडात वाक्ये भरतात ही गंमतच आहे की नाही. 'कुणाच्याही' च्या व्याख्येमधे फक्त 'हिंदुत्ववादी' नेतेच येतात वाटतं.

याचा संदर्भ मिळाला नाही आहे अजून! ;-)

अदिती

बाप्पांचे म्हणणे खोटे आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही पण (माझ्या) वाचनात आले नाही एवढेच सांगू इच्छितो. उलट तिला तर बर्‍याच वेळा 'भावसरगम' मधे वडिलांबरोबर बघितले आहे - आणि हा 'दुवा' पहा, त्यात ती म्हणते की लहानपणापासूनच आवड आहे.

नंदा's picture

31 Oct 2009 - 10:12 pm | नंदा

हृदयनाथांचे भावसंगीतातले कार्य आणि पांडित्य वादातीत आणि त्याबाबत त्यांचा पूर्ण आदरच आहे!

पण काही गोष्टी मात्र खटकतात! मंगेशकरकन्या यापलिकडे राधाला हृदयनाथांच्या कार्यक्रमांतून आणि त्यांनी बांधलेली नवी-जुनी गाणी गाण्याची फारशी पात्रता यावेळेस तरी नाही. कदाचित मेहेनतीमुळे आणि घरीच उपलब्ध असलेल्या मार्गदर्शनामुळे पुढे येइल. पण सध्या ती सुरात गात असली तरी आवाजात फारशी फिरत आणि विशेष म्ह्णजे याप्रकारच्या संगीतासाठी अत्यावश्यक असलेला भाव अजिबात नाही. तिच्या बाळासाहेबांनी नुकत्याच केलेल्या "नाव माझं शामी" या अल्बममधे तिच्या स्वरलगावातल्या भावाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. विशेषतः महानोरांनी लिहिलेले शेवटचे "थकून बसली माय गं" हे गाणे ऐका. केवळ महानोरांच्या शब्दांनी आणि बाळासाहेबांनी बांधलेल्या करूण (भैरवी?) चालीनी आणि संगीत-तुकड्यांनी हे गाणे किती प्रभावी वाटते? राधाच्या आवाजात मात्र भावनेचा लवलेश नाही! दीदींनी आणि विशेषतः बाळासाहेबांनी घरच्या या रत्नाऐवजी इतर कोणा अधिक गुणी गायिकेला असे प्रोमोट केले असते तर एकूण भावसंगीतक्षेत्राचा जास्त फायदाच झाला असता.

पण म्हणतात ना की "रक्त नेहेमीच घट्ट असते"! कदाचित पोरीवरल्या मायेपोटी बाळासाहेबांनादेखील तडजोड करावी लागली असेल. नव्हे, आहेच! साधारणपणे दहा-बारा वर्षांपूर्वी कोजागिरीला सॅन फ्रान्सिस्को बे एरियातल्या महाराष्ट्र मंडळाने योग जमून आला म्हणून जरा घाईघाईतच बाळासाहेबांचा 'भावसरगम' चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात बाळासाहेबांनी अतिउत्साही नवशिक्या गायिकांविषयी एक टिप्पणी केली होती. ते म्ह्णाले, "मी या गायकांना नेहेमी सांगतो की तुम्ही माझ्यासमोर कोणतेही गाणे म्हणा, पण दिदीचे 'मोगरा फुलला' अजिबात म्हणू नका. हे गाणे रेकॉर्ड करताना दिदीचा स्वर एवढा अप्रतिम लागला होता आणि तो माझ्या डोक्यात एवढा पक्का बसला आहे की हे गाणे दुसर्‍या कुण्याच्याही आवाजात ऐकतांना अतिशय त्रास होतो". मग या वर्षी विश्वसाहित्यसंमेलनाच्या निमीत्त्याने केलेल्या अमेरिका दौर्‍यात पुन्हा बे एरियातल्याच भावसरगमच्या कार्यक्रमात राधाने वडिलांसमक्षच तिच्या थंड आवाजात 'मोगरा फुलला' म्हटले तेंव्हा बाळासाहेबांना केवढातरी त्रास झाला असेल! पण पोटच्या पोरीसाठी तेही सहन करावे लागले असेल. चालायचेच!

लबाड लांडगा's picture

31 Oct 2009 - 11:09 pm | लबाड लांडगा

ही राधा श्रेया घोशाल्,अल्का याज्ञिक,सुनिधी चव्हाण ह्यांच्या तुलनेत कशी गाते?लता,आशा बरोबर सगळ्यांची तुलना करु नये असे मी म्हणतो. तो सोनु निगम बघा.महमंद रफींची नक्कल मारतो म्हणायचे.तिकडे लक्ष न देता केले प्रयत्न त्याने आणि आता चांगलाच वर आला.बर्‍यापैकी गातो तो आता.
लबाड लांडगा

सगळ्या बहिणी त्यांना "बाळ" म्हणतात हे माहीत असूनही हृदयनाथांना "बाळासाहेब" म्हणतात हे नवीन कळलं. धन्यवाद!
कळेपर्यंत डोक्यात "हे बाळासाहेब कोण" असा गोंधळ चालला होता.
पण तात्यासाहेबांनी सज्जड दम कुणाला भरला ते कळलं नाहीं कारण दिदीबद्दल कुणी वेडंवाकडं लिहिलेलं या धाग्यात दिसलं नाहीं. कां मी ते मिस केलं?
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

लबाड लांडगा's picture

30 Oct 2009 - 2:16 pm | लबाड लांडगा

आपण ते मिस केलत.
तार्जन

स्वाती२'s picture

30 Oct 2009 - 3:58 pm | स्वाती२

मायानगरीत सगळे आयुष्य घालवल्यावरही भ्रमनिरास होणे काही पटले नाही. त्या दुनियेची ही रीतच आहे मग तक्रार कशाला?