मी पाहिलेले प्रायोगिक नाटक.

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
26 Aug 2009 - 5:45 pm

माझं नाव ‍र्‍होअन तोंड्वळकर... मी नरवीर कोंडाजी शिरुडे विद्यालयात पाचवीत शिकतो. आमच्या शाळेला काहीजण नकोशि शाळा असे म्हणतात. ते खरेही आहे.
मला नाटक पहायला फ़ार आवडते. भरत जाधव आणि प्रशांत दामले मला आवडतात. सही रे सही आणि एका लग्नाची गोष्ट मी ४ वेळा पाहिलं आहे.

मला अनुभव घ्यायला फ़ार आवडतं. आणि ते लिहून काढायला.... मी एक सामान्य छोटा लेखक आहे हे मला माहित आहे पण कधीतरी तर सुरुवात करायला हवीच ना?
माझे निबंध खूप छान होतात, असं सगळे म्हणतात. मी खूप वाचन करतो. सकाळ म.टा. लोकसत्ता पुढारी लोकमत संध्यानंद केसरी तरूण भारत इतके पेपर वाचतो. स्टार माझा , झी चोवीस तास , ई मराठी आणि विशेषत: आय्बीएन लोकमत असे चॅनल पाहतो. मी मोठा झाल्यावर निखिलजी वागळ्यांसारखा किंवा राजु परुळेकरांसारखा पत्रकार लेखक होणार आहे....
माझा बंक्या नावाचा मित्र आहे, तो आठवीला आहे, त्याचा एक चुलतभाऊ मुंबईला थिएट्र करतो.. मी त्याला विचारलेलं,"थिएटरमध्ये जाऊन बसायचं असतं, माहित्येय.. हे थिएट्र करायचं म्हणजे काय असतं रे?"

"येड्या, र्‍होन्या, प्रायोगिक नाटकात काम करणे याला थिएट्र करणे असं म्हणतात...तो प्रायोगिक नाटकात कामं करतो. प्रायोगिक नाटक फ़ार भारी असतं व नुसतं नाटकात काम करणं आणि प्रायोगिक नाटकात काम करणं यात फ़ार फ़रक आहे, " बंक्यानं माहिती दिली. त्याने मुंबईला सुद्धा प्रायोगिक नाटकं पाहिली आहेत..बंक्या भारी आहे.
शिवाय त्यात हसाहशी नसते भरत जाधवच्या नाटकासारखी, रडारडही नसते फ़ारशी, असंही मला कळालं... मग अस्तं तरी काय? गाणी, नाच वगैरे अस्तात काय? "डिपेन्ड्स" बंक्या म्हणाला... म्हणजे काय देव जाणे.प्रायोगिक नाटक पाहणं म्हणजे व्यामिश्र आणि विचक्षण अनुभूती घेणं असतं, असंही त्यानं एका लेखात वाचलं होतं... म्हणजे काहीतरी लै भारी असणार इतकंच मला कळलं..

सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि माझे आजोबा रत्नागिरीला मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत.( ते पक्के मास्तर आहेत असं काका हळूच म्हणतो.) ते सध्या घरी आले आहेत..तर एकदा बंक्या त्यांच्यासमोर प्रायोगिक नाटकाचं कौतुक करत होता तर ते म्हणाले ," असतं काय रे एवढं तुमचं प्रायोगिक नाटक म्हणजे ? हे म्हणजे उगीच तुम्हा पुण्या-मुंबईच्या माणसांनी कौतुकं करून ठेवली आहेत....आमच्या जिल्ह्यामध्येही इतके उत्कृष्ट नट आणि लेखक आहेत, त्यांचं तुम्ही नका छापू काही.. पण इकडे तुमच्यापैकी कोणी ह**मु*ले तरी त्याची बातमी पेपरात.. प्रायोगिक म्हणे.."
आजोबा म्हणजे एकदम संतापलेच; जसं काही आम्हीच लगेच थिएट्र करत होतो......आणि हो, ते संतापले की तुम्ही, तुमचं असं करायला लागतात..." एकदा सांग रे तुमचं ते प्रायोगिक म्हणजे काय ते..."आजोबा.
मी आजोबांना म्हणालो, "मोठ्या शाळेत जसं मुलं शास्त्राच्या प्रयोगशाळेत प्रयोग करतात, तसं काहीतरी असेल..." बंक्या मला हसला आणि म्हणाला, "र्‍होन्या लेका तू पुण्यात असून एकही प्रायोगिक नाटक पायलं नाहीस? ह्यॅट... तुम्ही एकदा बघा तर खरं , म्हणजे कळेल काय अस्तं ते.." आजोबाही तयार झाले. मग बंक्याने प्रायोगिक नाटक कसं अस्तं, काय अस्तं कुठे असतं ते समजावून सांगायचा प्रयत्न केला. मला खूप जांभई आली आणि मी झोपलो...

दुसर्‍या दिवशी मी आणि आजोबा अशा दोघांना बंक्या प्रायोगिक नाटक दाखवायला घेऊन गेला.एका बिल्डिंगीसमोर आम्ही थांबलो. त्याच्या पार्किंगमध्ये एक माणूस टेबल टाकून बसला होता आणि लांब रस्त्यापर्यंत रांग लागलेली होती. बंक्याने आमचे तिकीट आधीच काढलेले असल्याने आम्ही तिघे जिन्याने दुसर्‍या मजल्यावर गेलो. तिथे एका स्टॅंडवरती चपला काढून दरवाज्यातल्या एका माणसाकडून तिकीट फ़ाडून घेऊन आत शिरलो.... मी आणि आजोबांनी पटकन एक खुर्ची धरली... बंक्या मला काहीतरी सांगायला खेचत होता पण मी शिताफ़ीनं खुर्ची पटकावली... आजोबांना अंधारात लवकर काही दिसत नाही. ते निमूट बसून राहिले थोडा वेळ... मग त्यांना कंठ फ़ुटला.
" अरे रोहन, त्या जाजमावर बसायचं का रे? " आजोबा. बंक्या म्हणाला," नको आजोबा. तुम्हाला त्रास होईल. जनरली ज्येष्ठ नागरिक खुर्चीत बसतात", बंक्या..," र्‍होन्या, पुढे चल." पुढे कशाला? मल कळेना.
एक पायरी उंचीचं स्टेज, पुढे एक पलंग टाकलेला होता... "हा पलंग कशाला रे " मी बंक्याला विचारलं.. आजोबा म्हणाले, " पूर्वी व्ह्यायपी लोकांना सोफ़ा असायचा, तसंच काहीतरी असेल"...माझा प्रश्न, "इथंच कोणी बसलं तर मागच्यांना नाटक कसं दिसणार?" .. माझा प्रश्न ऐकून आजूबाजूच्या दोन कॉलेजच्या मुली हसल्या... त्यांचे फ़ारोळे दात बघून मलाही हसायला आलं... बंक्या एकदम वैतागला , हळूच म्हणाला," तो पलंग हा स्टेजचाच भाग आहे, त्यावर कोणी प्रेक्षकाने बसायचे नाहीये.. त्या पलंगावरच सगळं नाटक घडणार आहे" ... पलंगावरच नाटक? काय मजा !! कसला भारी प्रयोग !!!
त्यानं मला बरंच कायकाय सांगितलं त्यावरून इतकंच कळालं की या नाटकात दोनच माणसं आहेत आणि ते स्टेजवर असण्यापेक्षा पलंगावरच जास्त वेळ असणार आहेत; ते संवादही पलंगावरूनच म्हणणार आहेत. म्हणून जवळून नाटक पाहण्यासाठी पलंगाजवळ बसणं आवश्यक होतं... " असं होय?" मग पुढेच बसू.. असं म्हणत मी बंक्याबरोबर पुढे जाऊन बसलो...

तर स्टेजवर एक पांढरा पडदा लावला होता. यावर सिनेमा दाखवणार का? असतील बहुतेक. बंक्या चिडेल म्हणून त्याला काही विचारलं नाही.मग अंधार झाला आणि म्यूझिक सुरू झालं... मंदमंद लाईट्स आले. नाटक सुरू झालं का ते काही कळेना. .. पलंगावर पांघरूण ओढून दोन माणसं झोपली होती. वाढत जाणार्‍या म्यूझिकवर पांघरूणाखाली त्यांनी थोडा वेळ डान्स केला असावा. म्हणजे असं मला वाटलं... तर त्यांचा हा पलंगावरचा डान्स समोरच्या पडद्यावरती दिसत होता.... अशी मजा होती होय? पलंगाची दृश्यं नीट समजावीत म्हणून पलंगावरती क्यामेरा लावला होता... मग डान्स संपल्यावर ते पांघरूणातून बाहेर आले. प्रकाश थोडा वाढला. त्यांनी घट्ट मिठी मारली आणि ते थोडा वेळ भांडले... मग पंख्याचा आवाज, गाडीची किल्ली विसरणं , टीव्ही चालू ठेवणं किंवा बंद ठेवणं याकारणावरून पुन्हा पुन्हा भांडत राहिले... म्हणजे ते नक्कीच नवरा बायको असावेत हे मी ओळखलं... हे सारे रुसवेफ़ुगवे काढायला त्यांनी मिठ्या मारल्या कधी एकामेकाच्या पाप्या घेतल्या. तो माणूस लेखक होता बहुतेक..काही मिठ्या मी पडद्यावर पाहिल्या, काही प्रत्यक्ष... हे सारं मोठं विचक्षण, मनोज्ञ आणि व्यामिश्र होतं. .

मला त्या मुलाचा अभिनय खूप आवडला... शारीरिक जवळीकीचा अभिनय त्याने फ़ार छान केला.... त्याच्या वाक्यावाक्याला पलंगाशेजारची प्रेक्षक मुलं खूप खूप हसत होती...टाळ्या वाजवत होती. अभिनय इतका आनंद लोकांना देऊ शकतो? किती छान... एकदा तर त्याने आपल्या टीशर्टात कापड खुपसून एका जाड्या बाईचा अभिनय केला तो खूप छान जमून आला होता. शिवाय आपल्या स्त्रीला हातावर उचलून घेणं, स्त्रीने टुणकन उडी मारून त्या पुरुषाच्या पाठीवर बसणं, तिच्या पाठीला त्याने मसाज करणं सारंच अगदी नैसर्गिक आणि निरागस... याकडे जे लोक वाईट नजरेने पाहतील तेच पापी; असा विचार मनात आल्यावाचून राहिला नाही... नाटकभर बंक्या एकाग्रतेने पलंगाजवळ बसून नाटक पाहत होता. त्याच्या एकाग्रतेचे कौतुक वाटले.. नाटक संपताना त्या स्त्री पुरुषांनी पुन्हा पांघरूणात शिरून आधीपेक्षा भारी नृत्य केले... यावेळी हुंकार , चित्कार असे पार्श्वसंगीतसुद्धा होते...

हे नृत्य म्हणजे स्त्री पुरुष मीलनाचे द्योतक असावे असे मला वाटले.स्त्री पुरुषाचं मीलन नैसर्गिक आहे, प्रत्येक जीव हा पुरुष-स्त्री बीजफ़लनातून असाच तयार होतो , हे मला ठाऊक आहे..
वनस्पतीमधलं पुंकेसर स्त्रीकेसर आणि ते बीजांड मग फ़लन आणि युग्मनज तयार होणं हे मला चांगलं कळतं. बंक्याच्या शाळेच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात छान माहिती आहे.. मी कधीच वाचलेलं आहे..
ते असो.. शेवटच्या मीलन-डान्सनंतर नाटक संपले, लाईट्स आले. एका कुरळे केस प्रचंड वाढवून पाठीवर सोडलेले व डोक्यावर आडवी पट्टी बांधून आलेल्या मुलाने लेखक दिग्दर्शकाची ओळख करून दिली. बंक्या अजून पलंगाकडेच पाहत होता... मी त्याला कोपराने ढोसले... तो भावसमाधीतून जागा झाला... माझ्याकडे पाहून हसला. मी त्याला नाटक फ़ार आवडले असे दर्शवले. आता नाटकाच्या कलाकारांभोवती चाहत्यांचा गराडा पडला होता. केस विचित्र वाढवल्ली पुष्कळ थिएट्र करणारी जनता तिथं होती.. गंमत वाटली. बंक्या म्हणाला, जाऊयात आता"

मला मागे खुर्चीवरती आजोबा दिसेनात... बंक्या म्हणाला, ते मध्येच उठून निघून गेले... मागून तुला हाका मारत होते, खाणाखुणा करत होते पण तुझं लक्ष नव्हतं..लोक डिस्टर्ब होऊन त्यांना बाहेर व्हा म्हणाले, तेव्हा गेले.... मी पटकन बाहेर आलो, माझी चप्पल शोधली आणि जिन्यावरून खाली आलो तर आजोबा खाली उभे..." जीव गुदमरला " म्हणाले... मी म्हणालो, दम्याचा ऍटॅक आला की काय?.चिडले होते बहुतेक.... त्यांनी मला आणि बंक्याला कोपरापासून नमस्कार केला... आत रंगमंचाच्या ऑफ़िसच्या दिशेनं नजर टाकली आणि त्या काकांना जोरात ओरडून म्हणाले, " कसली नाटकं हो ही? चांगले संस्कार करताय हो आमच्या पोरांवर.." आतले काका फ़क्त हसले.
आजोबा घरी येताना वाटेत सतत शिव्या देत होते. "बीभत्स, अश्लील, निरर्थक आणि अत्यंत निर्बुद्ध ... हे तुमचं प्रयोगिक नाटक? का? का? का? कशासाठी करता हे?" असं खूप तळमळून विचारत होते... त्यांची तळमळही मला विचक्षण आणि व्यामिश्र वाटली.

बंक्या नंतर म्हणाला , " वयस्कर लोकांचे विचार थोडे बुरसटलेले असण्याची शक्यता असते... त्यातून अशी चिडचिड होते".. मला पटले.... "तुला ते नाटक पाहू देणार नाहीत असे मला वाटले म्हणूनच आपण लांब बसलो होतो.".. बंक्या भारी आहे असं उगेच नाही म्हणत मी.

त्या मुलाला झी टीव्हीचा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला... त्याबद्दल झी टीव्ही, परीक्षक आणि त्या मुलाचे अभिनंदन करावेसे वाटले... बंक्याची आणि त्याची ओळख आहे म्हणे... प्रत्यक्ष भेटीत त्याचे अभिनंदन करणार आहे... शिवाय शाळेच्या नियतकालिकासाठी त्याची एक मुलाखत घ्यायचेही डोक्यात आहे.... ती मुलाखत आवडली असे कोणी म्हणाले तर वर्तमानपत्रांनासुद्धा पाठवेन म्हणतो... आतापासूनच प्रयत्न केले तर पत्रकार होता येईल.
हा अनुभव मला घेता आला, यात बंक्याचा मोठा वाटा आहे..... अल्टिमेट उई असे काहीतरी या मूळ नाटकाचे नाव आहे...रूपांतराचे नाव रात्रीवरून काहीतरी आहे.या नाटकाने पुणेकर युवकाला वेड लावले आहे असे म्हणता येईल. अशी रूपांतरे होणार असली तर प्रायोगिक नाट्यसृष्टीचे भवितव्य उज्ज्वल आहे यात काहीच शंका नाही. आणि हो, एक आनंदाची गोष्ट; हेच नाटक आता ( इंग्रजीत) बंगलोरचाही दौरा करत आहे म्हणे. माझ्या त्यांना शुभेच्छा.

कलानाट्यप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनअनुभवसमीक्षा

प्रतिक्रिया

मास्तर, एकदम नादखुळा लेख. ;) लै लै लै भारी... मित्रा, तोडलंस. काय काय बोलू ते कमी आहे.

=)) =)) =)) =)) =))

आणि हो, मागे आपला झालेला एक संवाद आठवला, या लेखाच्या प्रेरणेबद्दल.

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

26 Aug 2009 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार

लेखाबद्दल आभार.

या नाटकाची थीम जाणकारांना आवडणार नाही अशी शंका होतीच, ती काही प्रमाणात खरी ठरली.
पण ,एक मात्र राहुन राहुन वाटते की आजपर्यंत आपल्याला सर्व भावुक किंवा सीरीयस प्रायोगीक नाटके ही शांत आणि संयत चालीवर बांधलेली होती,असतात,(यात काही अपवाद असु शकतात.).मात्र ही प्रथा मोडण्यासाठी जर दिग्दर्शकाने या प्रायोगीक नाटकाला अशी पलंगाची थीम दिली असेल तर मग मात्र तो यशस्वी ठरला आहे, कारण त्याने त्याला जो मेसेज पोहोचवायचा आहे तो व्यवस्थीतपणे पोहोचवला आहे.
राहिता राहिला प्रश्न, एका छोट्या पलंगावर येव्हडी फ़लन आणि युग्मनज दाखवावी का ?
याचे कारण असे असु शकते की जरी झी वर बर्‍याच जणानी हा कर्यक्रम पहिल्यांदा पाहिला असला तरी प्रेक्षागृहातील बर्‍याच लोकानी तो पुर्वी पाहिलेला होता,त्यामुळे त्याना काही नवे देणे भाग होते ,(कदाचित तीच त्यांची खासीयत असावी)
थोडक्यात काय,
पलंगावर 'डान्स' करणारे दोघेही हे आजच्या पीढीचे प्रतिनिधी आहेत,ते आजच्या पीढीवर प्रायोगीक नाटक करतात आणि त्याना ती आवडतात,मॅटर खतम.
पण महत्व म्हणजे ते जुन्याशी धरुन आहेत,त्यांना योग्य मान देतात,आणि नवीन पीढीचा म्हणून उगाचच नेटवर मिळणारे चार व्हिडीओ एकत्र करुन प्रायोगीक नाटक करत नाहीत.

आणी हो एक शंका, परिक्षण वाचुन त्या बाईला सासु सासरे नसावेत असे वाटते. असे असावे काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

26 Aug 2009 - 6:42 pm | भडकमकर मास्तर

काही महत्त्वाचे प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत...
नेटवर मिळणारे चार व्हिडिओ एकत्र करत नाहीत... हे खूप पटले.

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

रामदास's picture

26 Aug 2009 - 10:03 pm | रामदास

त्या बाईला सासु सासरे नसावेत असे वाटते
पण एकाच पलंगावर सगळे कसे मावणार.

वेताळ's picture

27 Aug 2009 - 10:26 am | वेताळ

त्या बाईला सासु सासरे नसावेत असे वाटते
ते पण र्‍होन्याच्या आजोबांप्रमाणे पलंगावरचा नाच बघुन उठुन बाहेर गेले असावेत.
बाकी परिक्षण एकदम निरागस आहे.

वेताळ

प्रमोद देव's picture

27 Aug 2009 - 12:50 pm | प्रमोद देव

ते पण र्‍होन्याच्या आजोबांप्रमाणे पलंगावरचा नाच बघुन उठुन बाहेर गेले असावेत.

ते दुसर्‍या खोलीतल्या पलंगावर नाच करत असतील. ;)

माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे

सूहास's picture

27 Aug 2009 - 8:36 pm | सूहास (not verified)

मास्तर ,,,सही

सू हा स...

निखिल देशपांडे's picture

26 Aug 2009 - 6:18 pm | निखिल देशपांडे

आपला निबंद आवडला...

मला अनुभव घ्यायला फ़ार आवडतं. आणि ते लिहून काढायला.... मी एक सामान्य छोटा लेखक आहे हे मला माहित आहे पण कधीतरी तर सुरुवात करायला हवीच ना?

=)) =))
हे वाक्य छाणच...
आणि हो, एक आनंदाची गोष्ट; हेच नाटक आता ( इंग्रजीत) बंगलोरचाही दौरा करत आहे म्हणे. माझ्या त्यांना शुभेच्छा.

मुंबईत कधि आहे हो हे नाटक ;)
निखिल
================================

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2009 - 10:03 am | भडकमकर मास्तर

मुंबईत कधि आहे हो हे नाटक

हे नाटक इंग्रजी भाषेत पृथ्वी थिएट्रला अनेक वेळा झाले आहे

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विनायक पाचलग's picture

27 Aug 2009 - 4:31 pm | विनायक पाचलग

आम्हासी हे नाटक बघायचे नाही,
पण गेला बाजार या लेखातील काही वाक्याबाबत जाहीर आभारकिंवा मग विशेष सहाय्य वगैरे वगैरे मानले असते तर अंमळ बरे वाटले असते.
मास्तर तुमचं मन तेवढे मोठे करा हो.
कारण म्हणता
कारण असं की सध्या मला कॉपीराईट च्या ऑफीसात जावुन कॉपीराईट घ्यायला वेळ नाही आहे
असो चालु दे
आपलाच
(जी टॉक वापरणारा नाट्यप्रेमी)विनायक

श्रावण मोडक's picture

26 Aug 2009 - 6:30 pm | श्रावण मोडक

अगागागागा... पार माप काढलं राव... !!!
र्‍होअन तोंड्वळकर
नकोशि शाळा
थिएट्र
प्रायोगिक नाटक पाहणं म्हणजे व्यामिश्र आणि विचक्षण अनुभूती घेणं असतं
पार्किंगमध्ये एक माणूस टेबल टाकून बसला होता आणि लांब रस्त्यापर्यंत रांग लागलेली होती
वाढत जाणार्‍या म्यूझिकवर पांघरूणाखाली त्यांनी थोडा वेळ डान्स केला असावा.
आपल्या स्त्रीला हातावर उचलून घेणं, स्त्रीने टुणकन उडी मारून त्या पुरुषाच्या पाठीवर बसणं, तिच्या पाठीला त्याने मसाज करणं सारंच अगदी नैसर्गिक आणि निरागस... याकडे जे लोक वाईट नजरेने पाहतील तेच पापी
बंक्या अजून पलंगाकडेच पाहत होता... मी त्याला कोपराने ढोसले... तो भावसमाधीतून जागा झाला...

हे सगळं अल्टिमेटच. आणि हो... नको, ते अवांतर ठरेल.

दशानन's picture

26 Aug 2009 - 6:25 pm | दशानन

=))

हे राम !

कोल्हापुरात कुणाला तरी प्रचंड राग आला आहे व त्याने आताच आई अंबाईच्या चरणी लोटांगण घातले आहे असे कळाले ;)

पै. रा. जै. पाठीलाग

आंबोळी's picture

26 Aug 2009 - 9:44 pm | आंबोळी

एखाद्याला खरडी / व्यनी / चॅट वर गोंजारायचे आणि चारचौघात फटकवायचे हे बरोबर नाही.
तुमच्या या हि&हि लेखाचा जाहीर णिषेध.

खाजगी: लै हुच्च लिखाण.... जिओ मास्तर!!!
तुमचे असेच लेख पटापटा येओत हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना...
(धारी)आंबोळी

स्वाती२'s picture

26 Aug 2009 - 6:31 pm | स्वाती२

अल्टी!

सहज's picture

26 Aug 2009 - 6:35 pm | सहज

र्‍होन्या लेका तोडलस की रे!

बंक्या म्हणतो ती प्रायोगिक नाटके शाळकरी मुलांना आवडणारीच आहेत. ते आजच्या पीढीवर थेयट्र करतात आणि त्याना ती आवडतात,मॅटर खतम.

असेच लिहत रहा!

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Aug 2009 - 6:35 pm | ब्रिटिश टिंग्या

__/\___

मास्तुरे, तुम्ही हा निबंद युनिकोदात परिवर्तित करुन घेतला आहे का?

भडकमकर मास्तर's picture

26 Aug 2009 - 6:53 pm | भडकमकर मास्तर

मूळ नाटक लेजिटिमेट हूई .. लेखक अमेरिकन नाटककार ब्रॅडली हेवर्ड
काही दुवे
http://haywardplays.tripod.com/legitimate.htm
http://www.bigdogplays.com/playdisplay.asp?playid=65

याचे रूपांतर केले आहे सागर देशमुख यांनी.
नाव मात्र रात्र

अभिनेते आहेत
सागर देशमुख
राधिका आपटे
--------------------
या नाटकाविषयी दोन प्रचंड टोकाची मते ऐकली आहेत.
आणि नाटकाविषयी उत्सुकता खूप वाढवणारी ही मते आहेत..
काय एवढं वाईट / चांगलं आहे ते बघूया तरी.. अशा स्वरूपाची...
...
ही दोन्ही मते दर्शवणारं हे परीक्षण आहे इतकंच...

नीधप's picture

26 Aug 2009 - 7:23 pm | नीधप

ही दोन्ही मते दर्शवणारं हे परीक्षण आहे इतकंच...<<
दोन्ही बाजूची मते काही दिसली नाहीत.
असो. नाटक मी पाह्यलंय.
तुमच्याइतकं काही नाटकातलं मला कळत नसावंच पण नाटक तुम्ही जेवढी चेष्टा केलीये तेवढं वाईट आणि तेवढं उथळ नक्कीच नाहीये.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रकाश घाटपांडे's picture

26 Aug 2009 - 6:43 pm | प्रकाश घाटपांडे

ढवळा पडदा हा निमित्त आहे. मात्र रात्र झाली की त्याचा उपयोग समजतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ज्ञानेश...'s picture

26 Aug 2009 - 6:54 pm | ज्ञानेश...

आपले लिखाण मोठे विचक्षण, मनोज्ञ आणि व्यामिश्र आहे बरंका. . =))

"Great Power Comes With Great Responsibilities"

'अल्टिमेट उई'चं परीक्षण वाचून डोळे भरुन आले!
किती हे बारकावे? काय ही शब्दसंपत्ती? काय ते वर्णनातले साधेपण? काय तो ऐतिहासिक निबंधांचा व्यामिश्र अभ्यास? छे छे केवळ अप्रतीम! इतके दिवस आपण मिपावरुन जी दडी मारलेली होतीत त्या दरम्यान आपला हा व्यासंग सुरु होता हे मला आज समजले!
गुरु जालिंदर ह्यांचा वरदहस्त आपल्या मस्तकी आहे ह्याची हे लेखन साक्ष आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. एकाच परीक्षणात अनेक पक्षी घायाळ करण्याचं हे अचाट सामर्थ्य पाहून मी दिग्मूढ झालो आहे.
आणी हो, एक तारखेचे विसरु नका बरं का, आम्ही वाट बघतो आहोत!

आपला नम्र,
(अल्टिमेट घायाळ)चतुरंग

टारझन's picture

26 Aug 2009 - 10:29 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
निशब्द !! चला आता आमच्या नशिबी सोलो डान्स आहे .. तो ही आपल्या चटई वर .. जातो बापडा ... काल आमची कामवाली म्हणत होती .. ती चटई बदला आता .. अंमळ चटई कमी आणि भोकं जास्ती झालीत ! =))

बाकी लेखणकौषल्याबद्दल काय बोलावं ? कमाल आहे हो ... असा निबंध लिहीणारे तुम्ही केवळ दुसरेच !!

-(चटईप्रेमी) टारोबा मॅटर (खतम)

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2009 - 10:05 am | भडकमकर मास्तर

याकडे जे लोक वाईट नजरेने पाहतील तेच पापी, असे र्‍होअनने म्हणून ठेवलेच आहे... ;)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अवलिया's picture

26 Aug 2009 - 10:32 pm | अवलिया

वा ! सुरेख ... अप्रतिम... जबरदस्त.. !
:)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

धनंजय's picture

26 Aug 2009 - 10:39 pm | धनंजय

पण थोडेसे क्रूर!

भासदार भोंगळ सदर्‍याची नेटकी शिवण मात्र खूप डोळ्यात येते आहे, त्यामुळे भास थोडा डळमळीत होतो. "नेटके-नसलेल्या लेखनाचे" सोंग वठवून तरी लेखन वाचनीय ठेवणे म्हणजे तारेवरची कसरत. पण मास्तर कायम प्रयोगशील!

लिखाळ's picture

27 Aug 2009 - 2:23 am | लिखाळ

फार जोरात व्यामिश्र अनुभुती. मजा आली.

"नेटके-नसलेल्या लेखनाचे" सोंग वठवून तरी लेखन वाचनीय ठेवणे म्हणजे तारेवरची कसरत. पण मास्तर कायम प्रयोगशील!

या धनंजयाच्या मताशी सहमत. मस्त लेखन :)

-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)

विजुभाऊ's picture

27 Aug 2009 - 9:20 am | विजुभाऊ

"६० मिनिट पनिश्मेन्ट"
या नावाचे एक असेच हिन्दी इंग्लीश नाटक पृथ्वी ला पाहिले होते.
ती प्रेक्षकांसाठी पनिश्मेंटच होती.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

विसुनाना's picture

27 Aug 2009 - 11:06 am | विसुनाना

मा.श्री. र्‍होअन तोंड्वळकर यांनी 'रात्रीवरून काहीतरी' या मंचकी नाटकाचे केलेले परीक्षण प्रायोगिक आणि व्याविज्ञ आहे.
अशा 'दोनहजार एकदशकानंतर...' समीक्षकांचे आणि त्यांनी चटईक्षेत्रावरून (म्हणजे मंचकासमोरच्या चटईवर बसून, बरंका)केलेल्या परीक्षणांचे स्वागत.

झकासराव's picture

27 Aug 2009 - 11:07 am | झकासराव

=))
परा यांची प्रतिक्रिया त्याच विचक्षण आणि व्यासंगी व्यक्तीमत्वाचा (वा! तीन वेळा व आणलाच. आता पुढचा व साठी व्यत्यय लिहु काय??)आरसा आहे. :D
मास्तर भारी लिहिलय पण हे तुम्ही लिहिलेल खरखुर परिक्षण नव्हे.
हे तर मुळ परिक्षण कमी आणि मसाला (कोल्हापुरी मसाला घातलाय अस वाटतय खर :D ) जास्त झाला.
तुमच्या जुन्या ष्टायलीत खर्खुर परिक्षण येवुदे.

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2009 - 11:21 am | स्वाती दिनेश

मास्तर , लय भारी..
स्वाती

अभिज्ञ's picture

27 Aug 2009 - 12:45 pm | अभिज्ञ

मात्र रात्र च्या परिक्षणात चुकीचा मसाला घातल्याने ह्या पाकृची चव प्रचंड बिघडली आहे.
त्यामुळेच कदाचित आताशा "असल्या" लेखांचा कंटाळा यायला लागलाय.
एकाच व्यक्तीला "टारगेट" करून लेख पाडायचा टारगटपणा आता बास झाला. काहि "संपादकांनी" देखील असल्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलेले पाहून आश्चर्य वाटले.
मास्तरांनी आपली प्रतिभा जरा सकस व चांगल्या साहित्यनिर्मितीवर वापरली तर अतिशय आनंद होईल.

अभिज्ञ.

अवांतर : धनंजय ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

श्रावण मोडक's picture

27 Aug 2009 - 2:05 pm | श्रावण मोडक

मास्तरांनी आपली प्रतिभा जरा सकस व चांगल्या साहित्यनिर्मितीवर वापरली तर अतिशय आनंद होईल.
या वाक्यातील जरा हा शब्द वगळून पूर्ण अनुमोदन.

नंदन's picture

27 Aug 2009 - 12:57 pm | नंदन

धमाल लेख! वाचून व्यामिश्र अनुभूतीचा अनुभव आला :)

हे म्हणजे उगीच तुम्हा पुण्या-मुंबईच्या माणसांनी कौतुकं करून ठेवली आहेत....आमच्या जिल्ह्यामध्येही ...

- हे वाक्य वाचून अंमळ हळवा झालो. यापूर्वीही कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय हे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

27 Aug 2009 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार

मास्तरांनी आपली प्रतिभा जरा सकसचांगल्या साहित्यनिर्मितीवर वापरली तर अतिशय आनंद होईल.

अतिशय भयंकर सहमत आहे.

तरी मी मास्तरांना सांगत होतो की तुम्ही सकस व चांगली साहित्यनिर्मिती कशी करावी याबद्दल पुर्णपणे अभिज्ञ आहात. तेंव्हा मिपावरच्या 'श्रेष्ठ व थोर' साहित्यीकांकडुन (हे थोर असल्याने फक्त उपदेशात्मक सुचना वजा प्रतिक्रीया फक्त देतात, त्यांचे 'मौलीक' साहित्य ते असकस व वाईट वाचकांना वाचायला देत नाहीत) आधी थोडे ज्ञान घ्या. पण ऐकतील तर मास्तर कसले ?

मास्तर तुम्हीही अंमळ टारगटच आहात बघा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

अभिज्ञ's picture

27 Aug 2009 - 3:44 pm | अभिज्ञ

ताम्हनकर साहेब,
तुम्ही काय लिहिताय ह्याचा एकदा नीट विचार करा.
मला स्वतःला व्यक्तिश चांगले लिहिता येत नाहि वा इतर व्यापांमुळे लिहायला जमत नसेल परंतु मी जे वाचतोय साहित्य चांगले आहे कि नाहि हे मला निश्चितच कळते. त्याबद्दल आपल्याला आक्षेप नसावा.
भडकमकर मास्तरांना मी व्यक्तिशः ओळखतो व त्यांचा दर्जा कितीतरी वरचा आहे हे देखील चांगलेच ओळखतो.
भडकमकर मास्तरांकडून असल्या प्रकारच्या लेखाची अपेक्षा नव्हती व यापुढेहि नसेल. त्याच भावनेने हि प्रतिक्रिया दिलेली आहे.

बाकि चालु देत.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Aug 2009 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

अभिज्ञ साहेब
तुम्ही फारच सिरीयस झालात की हो. तुमच्या मनाला वगैरे लागले असेल तर आम्ही तुमची जाहीर माफी मागतो __/\__

फक्त जाता जाता येव्हडेच सांगतो की आम्ही "कळप" वगैरे तयार करुन हल्ला करणारे लांडगे नाही. आम्हीही सुसंस्कृत आणी शालीन घरातुनच आलेलो आहोत पण जेंव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेंव्हा चांगल्या चांगल्यांचा संयम सुटतो.

काही अनुभव इतके वाईट आले असतील / अजुनही येत असतील की जे हे करण्यास भाग पाडते. कधी असे 'टार्गेट करणार्‍या' लोकांच्या बाजुनीही ५ मिनिटे विचार केलात तर खुप बरे वाटेल.

४ गोष्टींचे ज्ञान व्हावे, जेष्ठ आणी श्रेष्ठांचा सहवास मिळावा, मित्रांबरोबर टवाळक्या करता यावात म्हणुन आम्ही इथे येतो पण कुणी उगाच खाजवुन खरुन काढत असेल तर पाव पळवणार्‍या कुत्र्यामागे तुप घेउन धावणारे नामदेवराव आम्ही नाही. आम्ही तिथेच दणका देणार आणी प्रत्येकवेळी त्रास झाला की दणका देणार.

नाठाळाच्या माथी काठी हाणणारा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

कवटी's picture

27 Aug 2009 - 6:24 pm | कवटी

परा,अभिज्ञ,
तुम्ही दोघे एकाच बाजुन एकमेकांशी भांडताय असे वाटत नाही का तुम्हाला?
निदान मला तरी तसेच वाटतय...

कवटी

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Aug 2009 - 4:22 pm | डॉ.प्रसाद दाढे

मेलो मेलो..!!! अश्लील नाटक? अश्लील नाटक? हम्म्मम..मग ते आम्हांला पाह्यलंच पायजे

नीधप's picture

27 Aug 2009 - 6:39 pm | नीधप

एखाद्या कुणाची चेष्टा करताना एका चांगल्या नाटकावर, नवीन प्रयोगावर अकारण आणि अप्रस्तुत टिका होतेय.
कदाचित तुमची त्या नाटकाबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही सांगत असाल पण बाकी बहुतांश लोक तुमच्या प्रतिक्रियेमुळेच केवळ त्या नाटकाला न बघता नावे ठेवत आहेत.
तुमच्या नाटकाबद्दलच्या ज्ञानाला आणि अधिकाराला गृहित धरूनही हे सांगावेसे वाटते की 'मात्र रात्र' हे नाटक निश्चितच तुम्ही म्हणता तसे थिल्लर आणि उथळ नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

धनंजय's picture

27 Aug 2009 - 9:11 pm | धनंजय

अशा प्रकारचा परिणाम वाचकांवर झाला, तर बरोबर नाही - सहमत. (आंशिक असहमती पुढे)

"अंथरुणातली होणारी हालचाल" हा प्रसंग नाट्यवस्तू, कथानक समर्थपणे उभे करण्यासाठी योग्य आहे की नाही? हा नाट्यलेखन आणि दिग्दर्शनाच्या बाबतीतला तांत्रिक मुद्दा आहे. आणि आस्वादचर्चेचा मुद्दा आहे.

माझ्या मते काही कथानकांत "त्यांनी संग केला" असा तोंडी उल्लेख पुरतो. पण काही कथानकांत पुरत नाही. (या कथानकात पुरला नसता असे नाटक बसवणार्‍यांचे मत होते.) भडकमकर मास्तरांच्या दृष्टीने पुरणे-न-पुरण्याचा जो निकष आहे, तो बहुधा माझा निकष नाही (तुमचाही निकष नसावा, म्हणजे मी तुमच्याशी या बाबतीत बहुधा मी सहमत आहे.)

परंतु वरील लेख हा खुद्द एक वाङ्मयकृती आहे. एक बाळबोध लेखकाचे सोंग लेखकाने वठवायचा प्रयत्न केला आहे. तो खुद्द प्रशंसा आणि टीका करण्यालायक आहे. उदाहरणार्थ "बालकांवर दुष्परिणाम होतात" हे बालकाच्या लेखणीतून वदवून लेखकाला कदाचित प्रभाव साधायचा होता. पण बालक हास्यास्पद/अविश्वासार्ह केल्यामुळे त्या हेतूवर आपणहूनच कुरघोडी होते - ही लेखनविषयक टीका. पण त्या बाळबोध लेखनाच्या सोंगातही लेख अघवता वाचनीय आहे, ही प्रशंसा. वगैरे.

- - -

मला एक वेगळे उदाहरण आठवते. ते आहे पु. ल. देशपांडे यांच्या "खुर्च्या - एक न-नाट्य" या लेखनाविषयी. ती एक भन्नाट आणि उत्तम कलाकृती आहे. दुर्दैवाने ते लेखन माझ्या लहानपणी, कुठलेही अँटिप्ले नाटक बघण्यापूर्वी, आयोनेस्कोचे कुठलेही लेखन अनुभवण्यापूर्वी मी वाचले. माझ्या अपरिपक्व वयामुळे आणि एकांगी वाचनामुळे अ‍ॅब्सर्डवादी अँटिप्ले हेटाळणीच्या पात्र असतात, असा माझा गैरसमज झाला. खुद्द "चेअर्स" (खुर्च्या) हे नाटक बघितल्यानंतर माझे मत पूर्णपणे बदलले.

पु. ल. देशपांड्यांच्या "खुर्च्या एक न-नाट्य"ने माझ्यामध्ये गैरसमज निर्माण केला, ही बाब माझ्यासाठी वाईट होती. (ही तुमच्या वरील प्रतिसादाशी आंशिक सहमती आहे.) तरीसुद्धा ती एक उत्कृष्ट विनोदी कलाकृती आहे, असे मला अजूनही वाटते. (ही तुमच्या प्रतिसादाशी आंशिक असहमती आहे.)

आंबोळी's picture

27 Aug 2009 - 11:13 pm | आंबोळी

धनंजयनी माझ्या मनातली भावना अगदी योग्य शब्दात व्यक्त केली आहे.
मुळात पलंगावरच्या डँस मधे नाट्य काय आहे ? हा मला सुरवाती पासून पडलेला प्रश्न आहे. त्यात तो डँस चादरी खाली करणार म्हणजे अभिनयाचाही काही संबंध नाही.
धनंजय म्हणतात त्याप्रमाणे जर नाट्यवस्तू, कथानक समर्थपणे उभे करण्यासाठी तो सीन वापरत असतील तर "अंथरुणातील होणार्‍या हालचाली" पेक्षा त्या नंतरच्या हालचाली किंवा संवाद या मधून झालेली कृती जास्त परिणामकारकरित्या उभी करता आली असती असे वाटते.
असो.
जाता जाता उगचच आम्ही लहान असताना पुजा बेदी करत असलेल्या एका नाटकाची आठवण झाली. पेपरात छापून येणार्‍या त्या नाटकाच्या जाहिरातीत पूजाचे उत्तान फोटो लावलेले असत. त्यावेळी सिनिअर असणार्‍या पोरानी सांगितलेल्या त्या नाटकाच्या स्टोर्‍यानी आमचे वासलेले आ बराच काळ मिटत नसत.
बाकी चालू दे.

आंबोळी

नीधप's picture

27 Aug 2009 - 11:39 pm | नीधप

मुळात पलंगावरच्या डँस मधे नाट्य काय आहे ? हा मला सुरवाती पासून पडलेला प्रश्न आहे. त्यात तो डँस चादरी खाली करणार म्हणजे अभिनयाचाही काही संबंध नाही.
"अंथरुणातील होणार्‍या हालचाली" पेक्षा त्या नंतरच्या हालचाली किंवा संवाद या मधून झालेली कृती जास्त परिणामकारकरित्या उभी करता आली असती असे वाटते.
<<
हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमचा.
नाटक केवळ पलंगावरचा डान्स आणि चादरीखालील हालचाली एवढंच नाही. नक्कीच नाही. पण मुळातलं नाटक न बघता कुणी एकाने जे लिहिलं ते तुम्ही मान्य करून चालणार. आणि वर अश्या टिप्पण्या करणार सगळंच माहीत असल्यासारख्या.

म्हणूनच अश्या लेखाला आक्षेप.
मी काही भडकमकरांच्या इतकी नाटकातली ज्येष्ठ श्रेष्ठ इत्यादी नाही आणि मिपावरच्या प्रतिष्ठित लोकांच्यातही नाही पण तरी हे माझं प्रामाणिक मत आहे ते आहे की हा लेख त्या नाटकाला जेवढं थिल्लर आणि उथळ दर्शवतो तसं ते मुळीच नाही.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आंबोळी's picture

28 Aug 2009 - 3:31 pm | आंबोळी

हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमचा.
ठिक आहे मग आता तुमचा प्रॉब्लेम सांगा...
नाटक केवळ पलंगावरचा डान्स आणि चादरीखालील हालचाली एवढंच नाही. नक्कीच नाही.
तेव्हढच नाटक आहे असे आमचे ही म्हणणे नाही. पण या प्रसंगाची नाटकातील गरज काय? आणि इतकी गरज आहे तर मग डोक्यावरुन चादर कशाला घ्यायची? मग सरळ दाखवुच नका.
पण मुळातलं नाटक न बघता कुणी एकाने जे लिहिलं ते तुम्ही मान्य करून चालणार. आणि वर अश्या टिप्पण्या करणार सगळंच माहीत असल्यासारख्या.
तुम्ही नाटक बघितलय आणि तुम्हाला सगळे माहिती आहे तर तुम्ही दुसर्‍या बाजुने परिक्षण लिहा.... एखाद्याने लिहिलेले चुक आहे चुक आहे असे नुसते ओरडत बसण्यापेक्षा जे बरोबर आहे असे तुम्हाला वाटते ते लिहा.
लोकं जे पटेल ते घेतिलच

आंबोळी

नीधप's picture

27 Aug 2009 - 11:26 pm | नीधप

तरीसुद्धा ती एक उत्कृष्ट विनोदी कलाकृती आहे, असे मला अजूनही वाटते. <<
हे सापेक्ष आहे तरी इथे ते काही अंशी मला मान्यही असले तरी त्यातून
>>पु. ल. देशपांड्यांच्या "खुर्च्या एक न-नाट्य"ने माझ्यामध्ये गैरसमज निर्माण केला. <<
हे उदभवते (द चा पाय कसा मोडायचा?) हा खूप गंभीर परिणाम आहे. तुम्ही गैरसमजातून सुदैवाने बाहेर आलात परंतु आजही ५०% जनता त्याच गैरसमजात आहे हे विसरून चालणार नाही. प्रायोगिक नाटकातल्या कुठल्याही प्रयोगाची अश्या पद्धतीने खिल्ली उडवून प्रायोगिकता, साचेबद्धपणापेक्षा वेगळं म्हणजे मूर्खपणा असा समज करून देणार्‍या कुठल्याही लेखनाला माझा असा आक्षेप असेलच.
आणि हे लेखन जर परिणामकारक आणि उत्तम विनोदी असेल तर अधिकच असेल कारण चुकीचे सिद्धांत लोकांच्या मनात परिणामकारकरित्या ठसवण्याचे काम हे लेखन करते.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

रामपुरी's picture

28 Aug 2009 - 5:05 am | रामपुरी

आणि अशी फालतू नाटके जो "गंभीर परीणाम" करत आहेत त्याचे काय? त्यामुळे हे नाटक काय किंवा यदाकदाचित सारखी नाटके काय, आमचं स्पष्ट मत एकच "भिकार, दर्जाहीन"...
(हे मत कुठलाही लेख वाचून बनवलेलं नाही.. स्वानुभव सांगतो, त्या नाटकांपेक्षा रस्त्यावरची मजा चांगली होती)

टिउ's picture

27 Aug 2009 - 8:49 pm | टिउ

असली अजुन नाटकं माहीत असतील तर येउ द्या परिक्षण. प्रायोगिक (विशेषतः असल्या विषयावरच्या) नाटकांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो.

भडकमकर मास्तर's picture

28 Aug 2009 - 2:36 am | भडकमकर मास्तर

हे नाटक म्हणजे छोट्याछोट्या संवादांची दृश्यमालिका आहे. काही दृश्ये खूप छोटी आहेत. .. गोष्ट सांगण्यासारखी काही नाहीच, मंचावरती खूप काही घडत नाही पण संवाद मस्त.. प्रत्येकातून प्रेम म्हणजे काय याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.... या नाटकात दोघांचाही अभिनय उत्तम झाला आहे, विशेषत: अभिनेता सागर अप्रतिम काम करतो ... त्याचं टायमिंग आणि स्क्रिप्टच्या पलीकडे जाऊन अभिनय जबरदस्तच आहे, यात शंका नाही....त्याचा अभिनय परिणामकारक आणि आनंददायकच आहे .... नाटकाच्या तांत्रिक बाबीही उत्तम आहेत.. ( थोडक्यात मात्र रात्र आवडले का रे ? तर आवडले. प्रश्नच नाही.) आसक्त संस्थेचे प्रयोग (कळोत न कळोत ), तांत्रिकदृष्ट्या सफ़ाईदार असतातच...

... फ़क्त इतकी शारीरिक जवळीक निकटमंचावर दाखवायची आवश्यकता आहे किंवा नाही यावर मतभेद असू शकतात....
लेखक दिग्दर्शकाला ते अत्यावश्यक वाटले असावेत असा माझा समज झाला. .. ते त्यांचं स्वातंत्र्य आहेच पण मला ते आवडावं की नाही, हे प्रेक्षक म्हणून मी ठरवणार.... ( शिवाय इतकं मराठीत दाखवताहेत मग अमेरिकन लेखकाने काय काय लिहून ठेवले असेल देव जाणे; अशी आमच्या बुरसटलेल्या मनात प्रतिक्रिया आलीच....)
त्यामुळे वरच्या लिन्कमध्ये शोधाशोध केल्यावर मूळ लेजिटिमेट हूई या नाटकाची बहुतेक अपूर्ण पीडीएफ़च सापडली....लगेच वाचून काढली... संवाद एकदम मजेदार, चुरचुरीत... हास्याचे फ़वारे वगैरे उडवणारे आहेत...मात्र वाचल्यावर असे लक्षात आले की असे पांघरूणाखालचे सूचन करणारे लेखकाने काहीच लिहिलेले नाहीये .... ( किंवा लिहिले असले तरी मला कळाले नसावे.. किंवा लेखकाने लाजून स्पष्ट लिहिले नसेल... किंवा ते नेमके अपूर्ण असावे)

नाटकाच्या सुरुवातीला आणि शेवटाला शरीरसंबंधांचे सूचन नसते तर अर्थाच्या दृष्टीने हे मराठी नाटक अधिक उत्तम झाले असते असे आपले माझे वैयक्तिक मत....
(मूळ लेखकालाही कदाचित असेच वाटत असावे हे इंग्रजीत नाटक वाचल्यावर कळाले.. )

मग प्रेम म्हणजे नक्की काय हे समजावताना मूळ नाटकातला संदेश पोचवण्यासाठी , इकडच्या देशी प्रेक्षकांसाठी नाटक रूपांतरित करताना हे शरीरसंबंधांचे सूचन रूपांतरकाराला आणि / किंवा दिग्दर्शकाला आवश्यक वाटले असावे; असे समजायला वाव आहे.
किंवा
आपण प्रायोगिक करतो आहोत म्हणजे आपल्याला लोकांना न समजणारे किंवा लोकांच्या शेंडीला झिणझिण्या आणणारे काहीतरी दाखवणे भाग आहे , असा अट्टाहास आहे की काय असेही समजायला वाव आहे.....

फ़क्त एक स्पष्ट करतो की प्रायोगिक नाटकांना नावे ठेवण्यासाठी , टर उडवण्यासाठी आणि लोकांच्या मनात या नाटकाबद्दलची प्रतिमा मलीन व्हावी या दुष्ट हेतूने हे लेखन केलेले नव्हते , असे कोणाला वाटले असल्यास माफ़ी मागतो.... ( असाच हेतू असता तर मिसळपावावर जास्तीतजास्त प्रायोगिक नाटकांबद्दल लिहायचा प्रयत्न केला नसता)

( आता सर्वांना सांगतो की नाटक पहा, मूळ नाटक वाचा आणि स्वतः ठरवा ... उगीच माझ्या लेखामुळे प्रायोगिक नाटकाबद्दल गैरसमज व्हायला नको)

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भडकमकर मास्तर's picture

25 Aug 2010 - 3:07 pm | भडकमकर मास्तर

याच नाटकाचा आज दिनांक २५ ऑगस्ट २०१० रोजी रात्री ७ ३० वाजता सुदर्शन रंगमंचावरती शेवटचा प्रयोग आहे असे समजले.... तरी इच्छुकांनी सदर माहितेचा लाभ घ्यावा आणि नाटक पहावे...

आंबोळी's picture

25 Aug 2010 - 3:51 pm | आंबोळी

तरी इच्छुकांनी सदर माहितेचा लाभ घ्यावा आणि नाटक पहावे...

"शक्यतो पलंगाजवळची जागा पकडावी" असे लिहायचे राहिले का मास्तर?