एका कॉम्पूटरची ईमेज दुसर्‍या कॉम्पूटरवर कशी घ्यावी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
18 Aug 2009 - 8:58 am

क्रूपया एक मदत हवी आहे.

मला एका कॉम्पूटर वर असलेल्या वापरात असलेल्या सॉफ्टवेअर ची प्रणालीसहीत (विंडोज व्हिस्टा) ईमेज दुसर्‍या कॉम्पूटरवर हवी आहे. पुर्वी घोस्ट ईमेज नावाचे सॉप्टवेअर होते तसले (GNU किंवा लायसन्स्ड) काही आजकाल उपलब्ध आहे का? ते कुठे मिळेल? व ते कसे वापरावे? काय काळजी घ्यावी जेणे करून डाटा लॉस होणार नाही. ज्या कॉम्पूटरवर ही कॉपी करायची आहे त्याची हार्डडिस्क नवीन कोरी आहे. दोन्ही कॉम्पूटर ऑनलाईन नाहीत.

माहीती देणार्‍यांचे आधीच धन्यवाद.

तंत्रमतशिफारससल्लाअनुभवमदतमाहिती

प्रतिक्रिया

टारझन's picture

18 Aug 2009 - 9:07 am | टारझन

तुला लोटाराम लाटणे चावलाय का बे ? तु त्यालाच जाऊन भेट !!
त्यानं अप्रकाशित ठेवलेला धागा तु चोरून प्रकाशित केला आहे , असे वाटते :)

अवांतर : इमेज कॉपी करण्याच्या कटकटीपेक्षा , सरळ बॅकप घेऊन नवं इंस्टॉलेशन मार ना भो ... कशाला स्वतःच्या आणि सगळ्यांच्या डोक्याची मंडई करतो ?

- स्रीपुरुषभेद

पाषाणभेद's picture

18 Aug 2009 - 9:26 am | पाषाणभेद

तातडीच्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद.

टारू दादा मी कोणत्याही धाग्याची चोरी केली नाही. मला खरेच अडचण आली आहे. मी पुर्वी घोस्ट वापरायचो पण आजकाल टच राहीलेला नाही त्यामूळे या फिल्ड मध्ये नवीन काय आहे ते माहीत नाही.

सरळ बॅकप घेऊन नवं इंस्टॉलेशन 'मारल्याने' ईतर इंस्टॉल केलेले सॉफ्टवेअर मार खातील ना भौ.

- नवनवीन 'हास्यास्पद' कायद्यांना हसणारा व स्रीपुरुषभेद मानणारा पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

दशानन's picture

18 Aug 2009 - 9:20 am | दशानन

http://www.symantec.com/norton/ghost

हे वापरा व्यवस्थित इमेज तयार करता येते... व जो पर्यंत तुम्ही दुसर-या सिस्टम वर कॉपी करत नाही तो पर्यंत पहिला सिस्टम साफ करु नका ;)

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

पाषाणभेद's picture

18 Aug 2009 - 9:34 am | पाषाणभेद

आव राजे, ह्ये तर लई झ्याक झाल बघा. म्या याची लय आधीची आवरत्ती वापरल्येली हाय. इंडोज विस्ठा ला पन ह्ये चालतय ह्ये वाचून तर आनंद झाला. म्या त्ये वापरायचा विचार करतो पन त्याला पैक लई पडत्याल हो. म्या पडलो गरीब दगडफोड्या मानूस. आजकाल ठेकेदार पन काई काम देईना, म्हनून रोजगार हमी वर कामं करतूया. काय कमी पैशात जमल का? न्हाय, आजकाल गनु (GNU) की काय त्ये बी उपलब्द हाय म्हने? त्ये फायदेशीर राहील नव्ह आम्हासारक्यास्नी?

- रोजंदारी करनारा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2009 - 9:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक क्रॉस केबल आणा. दोन्ही कंप्यूटरचा आय.पी. एकच नसेल याची खात्री करा, पण दोन्ही आय.पी.ज १९२.१६८.०.म असतील याची खात्री करा. (म नॅचरल नंबर आहे.)

तुमच्याकडे लिनक्स असेलच! ;-) नसेल तर उबुंटू सगळ्यात सोपं आहे, चढवायला, वापरायला! आणि मग rsync वापरा. कमांड लाईनवर man rsync लिहून एकदा एंटर मारलंत की बरीच मदत मिळेल.

अदिती

मदनबाण's picture

18 Aug 2009 - 10:01 am | मदनबाण

दफोराव इथुन काय मदत गावते का ते पहा:---
http://www.acronis.com/
http://www.acronis.com/homecomputing/products/trueimage/
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

पाषाणभेद's picture

18 Aug 2009 - 10:17 am | पाषाणभेद

राजेंनी एक युगत सांगितली हाय. कोनाला युगत पायजेल आसल तर निरोप धाडा.

टारझन, II राजे II , अदिती, मदनबाण यांचे आभार.

अनुभवाचा फायदा होतोच. पुढच्याचा अनुभव, मागच्याचा फायदा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

हर्षद आनंदी's picture

18 Aug 2009 - 11:57 am | हर्षद आनंदी

आपण मायक्रोसॉफ्ट बद्दल बोलत असाल, तर घोस्टिंगच्या नादाला लागु नका,
दोन्ही संगणकाचे सर्व अंतर्गत भाग बोर्ड \ प्रोसेसर समान असतील तर घोस्ट करा.

विस्टा ही अत्यंत मायावी गोष्ट आहे. नादी न लागणे बरे.

टारझन रावांचा सल्ला ऐकावा..

अन्यथा नविन हार्डडीस्क जुन्या पीसीला सेकंडरी म्हणुन लावुन इमेज कॉपी करा, नविन पीसीला ती हार्डडीस्क जोडुन विस्टाची सीडी तयार ठेवा. :)

मदनबाण's picture

18 Aug 2009 - 11:59 am | मदनबाण

दोन्ही संगणकाचे सर्व अंतर्गत भाग बोर्ड \ प्रोसेसर समान असतील तर घोस्ट करा.
सहमत...

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

मिसळभोक्ता's picture

18 Aug 2009 - 12:01 pm | मिसळभोक्ता

घोस्ट करीन नाही तर दोन्ही हार्ड डिस्काकचर्‍यात टाकून चालता होईन तिच्यायला...

-- मिसळभोक्ता

दशानन's picture

19 Aug 2009 - 8:44 am | दशानन

भ या न क !

=))

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

टारझन's picture

18 Aug 2009 - 12:53 pm | टारझन

बाकी काही म्हणा आं ... बर्‍याच जणांना "हार्ड डिस्क" चं प्रोनाऊंसेशन प्रॉपर जमत नाही !!
नको ते अर्थ निघतात .. आणि पब्लिक मी का हसतो त्याचा विचार करत डोकं खाजवत बसतं !!

त्यामुळे "हार्ड डीस्क" हा शब्द काळजाला भिडतो !

-आंबेचोख्ता
अधिक माहिती साठी व्यनि करा

मिसळभोक्ता's picture

18 Aug 2009 - 12:56 pm | मिसळभोक्ता

एस सायलेंट काय रे ?

-- मिसळभोक्ता

टारझन's picture

18 Aug 2009 - 1:14 pm | टारझन

एस सायलेंट नसतो ... त्याची जागा पुढुन मागे येते ! आणि नको त्या गोष्टींच अनेक वचन होतं .. चार चौघात ! ;)

पाषाणभेद's picture

19 Aug 2009 - 1:42 am | पाषाणभेद

अनेक जण कँम्पूटर असे पण म्हणतात.
कंट्रक्शन हा पण तसलाच शब्द. या लाईनीतले अनेक प्रोफेशनल सुद्धा असला उच्चार करतात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या