एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - अंतिम

Primary tabs

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
2 Jul 2009 - 2:20 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/8127
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
भाग आठ - http://misalpav.com/node/8233
भाग नऊ - http://misalpav.com/node/8251
भाग दहा - http://misalpav.com/node/8282
भाग अकरा - http://www.misalpav.com/node/8295
भाग बारा - http://misalpav.com/node/8309
भाग तेरा - http://misalpav.com/node/8326
भाग चौदा - http://misalpav.com/node/8349
भाग पंधरा - http://www.misalpav.com/node/8367
भाग सोळा - http://www.misalpav.com/node/8383
भाग सतरा - http://www.misalpav.com/node/8400

१२ मार्च

आज कोर्टात आरक्षण घोटाळ्याबाबत आम्ही दाखल केलेल्या बदनामीच्या केसची तारीख होती. माझी आणि आगलावेंच्या साक्षी झाल्या. चीफ घेताना आम्हाला काय प्रश्न विचारणार हे फायदे वकिलाने आधीच सांगितले होते अन आमच्याकडून सगळी उत्तरे घोटुन घेतली होती. गेले दोन दिवस मी अन आगलावे आमची साक्ष घोकत बसलो होतो - अगदी प्राथमिक शाळेतली मुलं पाढे घोकतात तसे. या सगळ्या पाठांतरामुळे चीफ देताना फारसा त्रास नाही झाला. फायदे वकिलाने सांगितल्याप्रमाणे मी पार्टनरशीप रजिस्ट्रार, नगरसचिव कार्यालय, शहर अभियंता कार्यालय, रजिस्ट्रार ऑफिस असे सगळीकडुन मिळवलेल्या कागदपत्रांच्या प्रति काढुन नेल्या होत्या. साक्ष देताना पुरावा म्हणुन मी सगळी कागदपत्रे कोर्टाला दाखवली सुद्धा बिनचुक.

पालिकेच्या वकिलाने उलटतपासणी घेतली तेव्हा पण फारसा त्रास नाही झाला. पण त्या लोचे कॉर्पोरेटरच्या चिरफाडे वकिलाने मात्र उलटेपालटे केले आम्हाला. पार घाम काढला त्या चिवट अन खवट म्हातार्‍यानं. कॉलेजात असताना एकदा युआर च्या निवडणुकीत मारामारी केली म्हणुन माझ्यावर गुन्हा दाखल केला होता ते उकरुन काढले त्याने अन त्याशिवाय काय काय गुन्हे माझ्याविरुद्ध दाखल झालेत असे विचारले. मी सरळ सांगितले त्या मारामारीच्या प्रकरणात मला उगीचच लटकावले होते पडलेल्या उमेदवाराने अन त्याचे आरोप खोटे निघाले म्हणुन पोलिसांनी त्याच्यावर नंतर वेगळा गुन्हा पण दाखल केला होता. नंतर त्या चिरफाडेनं मला माझ्या किती मित्रांवर गुन्हे दाखल आहेत असे पण विचारले. शेवटी न्यायाधीशच आले माझ्या मदतीला. त्यांनी चिरफाडे वकीलांना सुनावले, "अहो काहीही प्रश्न विचारताय तुम्ही. या प्रश्नांचा केसशी काय संबंध? त्यांनी जी बातमी दिली होती ती सत्य आहे हे दाखवणारे पुरावे आधीच दिलेत. त्या बाबत विचारा हवे तर. एखादा गुन्हा झाला आहे हा आरोप जर खरा असेल तर तो करणार्‍याच्या पुर्वचारित्र्याचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही." हे ऐकुन एकदम छातीवरचे ओझे उतरल्यासारखे झाले. त्या जज्जचा मुका घ्यावासा वाटला एकदम!

पण चिरफाडे नाही शहाणा झाला. त्याने आगलावेंना पण चांगले सोलटले त्यांच्या उलटतपासणीत. सरळ विचारले तुमचा पेपर खोट्या अन सनसनाटी बातम्या छापतो हे खरे आहे का असे. आगलावे नाही म्हणाले तर सांगितले तुमच्या पेपरवर पंधरा वर्षांपुर्वी एका बिझिनेसमनने बदनामीचा दावा केला होता अन तुमचा पेपर ती केस हरला म्हणुन त्याला १० लाखाची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. आगलावेनी सांगितले त्या केसमधे आमच्या पेपरने केलेले अपील अजुन पेंडिंग आहे अन ती बातमी आली तेव्हा ते संपादक नव्हते म्हणुन. वाईट पेटले होते आगलावे, रागाने लालबुंद झाले होते. त्यांनी पण शहाणपणा केला अन चिरफाडेला सुनावले की तुमच्या अशीलाचा भ्रष्टाचार आमच्या पेपरने उघडकीला आणला म्हणुन चिडुन तुम्ही आमच्या पेपरची अन बातमीदाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणुन.

***

१७ मार्च

आज आठवड्याचे बाजारभाव घ्यायला गेलो तर अचानक चांगली बातमी मिळाली. त्या लढ्ढा कमिशन एजंटला सहज विचारले की गेले दोन आठवडे साखरेचे भाव का वाढत आहेत तर तो म्हणाला, "तेचा काय आहे परमोदशेट, आता उन्हाळा आला म्हनुन साखरेची डिमांड वधारली. तेनी भाव पन एकदम तेजीत गेला. आता तीन महिने असाच तेजी होत रहाणार साखरेत. पावस पडले ना, कि मंग येईल मंदी!"

च्यायला हे लफडे काही माझ्या लक्षात नाही आले. उन्हाळ्याचा अन साखरेच्या भावाचा काय संबंध? तसे विचारले तर लढ्ढा म्हणाला, "असा बघा परमोद्शेट, गरमीच्या दिवसात लोक लई आईसक्रीम, कुल्फी खाते. परत सरबत, लस्सी, कोल्ड्रींक पन पीते. त्यामुळे आईस्क्रीमवाले, सरबतवाले कंपनी एकदम बल्क मंदी साखर खरेदी करते. परत हा शादी मुंजीचा सीझन असते त्याने लोक गोडाचा जेवन पन जादा करते त्यासाठी हलवाई खरेदी करते. समदी खरेदी एकाच टायमाला झाली का बाजारात साखरेला मंदी येते. आमच्यात तर या सीझनमधी आमी साखर खरेदी करतच नाय. थंडीच्या दिवसात वद्धा स्टॉक घेऊन ठेवते आमच्या घरी."

एकदम लख्ख झाले डोक्यात आयला असा विचार किती लोक करत असतील. मुळात उन्हाळ्यात साखर हमखास महागते हेच लोकांच्या लक्षात येत नसेल तर आधीच स्टॉक कसा करतील? मग लढ्ढालान परत विचारले किती वाढू शकतील साखरेचे भाव तर तो म्हणाला, "असा हाय आत्ता साखर चालली २२०० ने म्हनजी रिटेलात भाव पडतो २५ रुपिये. मे महिन्यात तो कमित कमी ३० वर जाएल."

परत ऑफिसात आलो तर हेच विचार डोक्यात होते. मग काढली बातमी लिहुन, "आला उन्हाळा, साखर आधीच खरेदी करा म्हणुन" अन दिली सोडुन. अपेक्षेप्रमाणे ऑफिसात कुणाच्याच डोक्यात आजपर्यंत असा विचार आला नव्हता. सगळे चाट पडले बातमी वाचुन. माजिरेने तर आगलावे साहेबांना सरळ सांगितले ही बातमी पान एकवर घ्यायला हवी म्हणुन. आगलावे आधी कुरकुर करत होते कोण वाचणार असली थर्ड वल्ड कंट्री स्टोरी म्हणुन पण मग त्यांनी पण माजिरेचे म्हणणे मान्य केले.

***

२५ एप्रिल

आज आरक्षण घोटाळ्याबाबत आम्ही दाखल केलेल्या बदनामीच्या केसचा निकाल लागला. आम्ही जिंकलो. कोर्टाने प्रतिवादींनी पेपरला नुकसान भरपाईपोटी २५ लाख द्यावेत, माझी अन पेपरची लेखी माफी द्यावी असे आदेश दिले. लोचे अन कंपनीचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. हायकोर्टात अपिल करु म्हणत होता. पण फायदे वकिल मात्र खुष झाले. म्हणाले त्यांचे अपिल काही टिकणार नाही. शिवाय ते म्हणाले आता हायकोर्टात पण आम्हीच जिंकणार हे स्पष्ट झालेय. ऑफिसात तर मी एकदम हीरो झालोय. आगलावेंनी पण शाब्बासकी दिलि. निकालाची बातमी पान एक वर मोठ्ठी छापणार आहेत. शिवाय अग्रलेख पण लिहिलाय, "देर हैं! अंधेर नही!!" हेडिंग देवुन.

***

४ मे

हायकोर्टातल्या आमच्या दोन्ही रिटची आज एकत्रित सुनावणी झाली. हायकोर्टाने पण आमच्याच बाजुने निकाल दिलाय. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घातला म्हणुन हायकोर्टाने पालिकेला समज दिलीय अन असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यायला सांगितलेय. "आधी गुन्हा करायवा अन तो कुणी उघडकीला आणला तर त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करायचा यातुन आरोपींचा निर्ढावलेपणाच सिद्ध होतो," असे म्हणलंय आदेशात. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करुन कोर्टापुढे अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिलाय. जी बेकायदा बांधकामे झालीत त्यांच्यावर जबर दंड ठोठावण्याचे अन जिथे बांधकामे अजुन सुरु झालेली नाहीत त्या जागा परत ताब्यात घेण्याचे अन तिथे बागा अन क्रिडांगणे करण्याचे आदेश पण दिलेत. जिंकलो शेवटी. बराच मनस्ताप झाला पण चलता है! एक चांगले काम तर झाले ना?

***

३१ मे

आज ट्रेनिंगचा काळ संपला. सकाळी ऑफिसात गेलो तर आधीच आगलावे अन बाराथे साहेब येवुन बसले होते अन ऑफिसबॉय दत्तुला सांगुन ठेवले होते की मी आलो की लगेच मला केबिनमधे पाठव म्हणुन. गेलो तर आगलावे साहेबांनी हातात डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट ठेवले. रिपोर्टर म्हणुन महिना दहा हजार पगारावर घेतले आहे. खरेतर ट्रेनिंग संपल्यावर सहा महिने प्रोबेशन देण्याचे ठरले होते पण आगलावे म्हणाले की मी एव्ह्डे चांगले काम वर्षभर केले आहे की मला प्रोबेशनवर ठेवण्याची गरज नाही हे मालकांना पटले अन डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करण्याला त्यांनी संमती दिली. तसा मी हळवा वगैरे नाही पण एकदम भरुन आल्यासारखे झाले. ही सगळी बाराथे साहेबांची कृपा. त्यांनी संधी दिली म्हणुन लाईफ लाईनला लागले. नाहीतर बसलो असतो मी अजुन पण कट्ट्यावर टगेगिरी करत. पटकन खाली वाकलो अन त्यांचे पाय धरले. त्यांना एकदम कसेनुसे झाले. त्यांनी खांद्याला धरुन उठवले तेव्हा त्यांचे पण डोळे भरुन आलेले वाटले.

ऑफिसात तोवर सगळ्यांनाच बातमी कळली होती. सगळे केबिनबाहेर जमा झाले अन एकच गिल्ला केला, "पार्टी! पार्टी!!" बाराथे साहेबच मग म्हणाले, "अरे तो तर आत्तापर्यंत ट्रेनी होता, सगळ्यात कमी पगारावर. पण पार्टी करु आपण. आज दुपारचे जेवण माझ्याकडून सगळ्यांना." पण माझे तिकडे फारसे लक्षच नव्हते. डोळ्यासमोर येत होते फक्त आई-बाबा..... किती बरे वाटेल त्यांना! अन निमा.... तिला पण किती अभिमान वाटेल माझा!

कथाविनोदविडंबनसमाजनोकरीमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

2 Jul 2009 - 2:31 pm | संजय अभ्यंकर

आमचेही डोळे भरून आले.
तुमच्या डायरीमुळे अनेकांना प्रेरणा मिळो, हि सदिच्छा!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

2 Jul 2009 - 3:14 pm | श्रावण मोडक

आला रांगेत पम्या एकदाचा. हुश्श केलं मी तर इथं. म्हटलं आणखी कुठल्या संकटात सापडतो की काय. पण नाही.
बरं झालं, एकदाचा कॉण्ट्रॅक्टवर आला ते.
आता त्या निमाचं काय? तो एक भाग चालला असता रे... पण ठीके, इतक्या खासगी मामल्यात नको डोकवायला. ;)

अनंत छंदी's picture

2 Jul 2009 - 4:59 pm | अनंत छंदी

खरं तर एका चांगल्या मालिकेचा शेवट गोड होतोय हे पाहून आनंद झाला. पण वास्तवात नेहमीच असं घडत नाही. ध्येय्यवादी पत्रकारितेला भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा कित्येकदा मात देतो. हल्ली तर हे प्रमाण फारच वाढलेलं दिसतं, नाही का?

ऍडीजोशी's picture

2 Jul 2009 - 5:07 pm | ऍडीजोशी (not verified)

१ नंबर भारी लेखमाला. झक्कासच.

मैत्र's picture

2 Jul 2009 - 5:31 pm | मैत्र

झकास लेखमाला... धन्यवाद... संकल्पना, मांडणी, नावं, वेग, किस्से सगळंच मस्त सांभाळलं.
सवय झाली होती खरं तर ... एकदम गोड शेवट होऊन संपून गेली डायरी...
एकेक घटना घेऊन स्वतंत्र लेख जरुर लिहा...

काल्पनिक कथेतून थोडीशी कल्पना तरी आली की वृत्तपत्राचं काम कसं चालतं.
"अवांतरः आता पुनेरी चं पुणेरी व्हायला हरकत नाही.
"

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jul 2009 - 5:35 pm | प्रकाश घाटपांडे

यकदम तावुन सुलाखुन निगाला ब्वॉ पम्या.
अवांतर- सद्या कार्पोरेशनची वेबसाईट लईच पघतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

योगी९००'s picture

2 Jul 2009 - 5:37 pm | योगी९००

झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय.

पम्या मार्गी लागला हे बरे झाले पण त्याचा पुढे तोडकर तर नाही ना होणार..?

ही पम्याची डायरी येथेच संपवू नये ही विनंती.

खादाडमाऊ

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jul 2009 - 7:00 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह पम्याभाऊ. झक्कास..अभिनंदन.. तुमच्या लेखनात पत्रकारीचा एक चांगला पैलू दिसला तो म्हणजे एखादी गोष्ट जशीच्या तशी लोकांसमोर मांडणे, उगाच आपण स्वतःच न्यायाधीश असल्याच्या थाटात न वावरणे..

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अवलिया's picture

2 Jul 2009 - 7:10 pm | अवलिया

मस्त लेखमाला !

--अवलिया

शिकावे .सगळे भाग कसे वेळच्यावेळी.
सलग आणि सुंदर लिखाणासाठी मनापासून अभिनंदन.
आता सुरुवात करा दुसर्‍या मालीकेची.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jul 2009 - 10:19 pm | बिपिन कार्यकर्ते

हे तुम्ही बोलताय... काय जमाना आहे!!! ;)

पुनेरीभाऊ, छान लेखमाला. अगदी नावीन्यपूर्ण विषय आणि छान मांडणी. आणि योग्य शेवट. अजून बरंच काही येऊ शकतं तुमच्याकडून. :)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jul 2009 - 9:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुनेरीशेट, झक्कास. तुमच्याकडून याहीपुढे रंजक, कल्पक आणि उत्तम लिखाण येत राहील अशी आशा आहे.

सहज's picture

3 Jul 2009 - 7:08 am | सहज

रामदाससर यांच्या मताशी पूर्ण सहमत.

लेखमाला आवडली.

विनायक पाचलग's picture

2 Jul 2009 - 10:41 pm | विनायक पाचलग

हा पम्या आम्हाला असाच सतत भेटत राहो याच सदिच्छा.
बाकी जवळ जवळ ६०% सत्य आणि बाकी कल्पना असे आपले लिखाण मला प्रचंड आवडले
इतके चांङले लिखाण वाचण्यास दिल्याबद्दल मनापासुन आभार.

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

निखिल देशपांडे's picture

2 Jul 2009 - 10:47 pm | निखिल देशपांडे

पुनेरी भाउ तुमची पुर्ण लेखमाला वाचत होतो.
मस्त झाली आहे आणि वेळच्या वेळेस सगळे भाग टाकल्यामुळे मजा आली. पम्या ची डायरी अशिच चालु राहुद्या

==निखिल

अंतु बर्वा's picture

2 Jul 2009 - 11:04 pm | अंतु बर्वा

खुपच छान लेखमाला...
सर्व भाग वाचायला मजा आली... असेच लेखन येउ द्या...
पु.ले.शु.....

घाटावरचे भट's picture

3 Jul 2009 - 12:47 am | घाटावरचे भट

झकास!!!

नि३'s picture

3 Jul 2009 - 3:15 am | नि३

झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. असेच लेख लिहीत रहा आणी आम्हा वाचकांना लुटु द्या त्याचा मनमुराद आनंद
---नि३.

मदनबाण's picture

3 Jul 2009 - 5:15 am | मदनबाण

पुनेरी भाउ एकदम झकास लेखमाला लिवली हाय तुम्ही. :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

नंदन's picture

3 Jul 2009 - 6:32 am | नंदन

सगळे भाग आता सलग वाचून काढले. सुरेख झालीय लेखमाला. तोडकर, पक्यापासून ते थेट साखरेच्या दरांतील चढ-उतारापर्यंतचे बारकावे मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

क्रान्ति's picture

3 Jul 2009 - 7:33 am | क्रान्ति

पहिल्यापासून सगळे भाग पुन्हा वाचले. अतिशय ओघवती भाषा आणि खिळवून ठेवणा-या शैलीने डायरी खासच झालीय. पुस्तकरुपात प्रसिद्ध झाली, तर वाचताना मध्येच हातून सोडवणारच नाही अगदी! अजून नविन वाचायला आवडेल आपल्याकडून.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

प्रमोद देव's picture

3 Jul 2009 - 7:53 am | प्रमोद देव

रोजच्या बोलण्यातील साधी भाषा आणि सोपी मांडणी ह्यामुळे ही लेखमालिका
अतिशय उत्तम झालेय.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

अनंता's picture

3 Jul 2009 - 11:11 am | अनंता

छान लेखमाला.
पत्रकारितेतील अनुभवाचे अगदी बारीकसारिक तपशील लोकांसमोर आणलेत.पुढील वाटचालीस शुभेच्छा!!


एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

शक्तिमान's picture

12 Jul 2009 - 11:02 pm | शक्तिमान

अतिसुरेख मालिका मित्रा!
फारच छान!

दशानन's picture

12 Jul 2009 - 11:12 pm | दशानन

क्या बात है भाई.. एकदम जबरा,,,
आवडले तुमचे लेखन... लिहीत राहा.

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है