एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ७

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
17 Jun 2009 - 2:42 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचे भाग येथे वाचा :

भाग एक - http://misalpav.com/node/८१२७

भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/८१४९
भाग चार - http://misalpav.com/node/८१७२
भाग पाच - http://www.misalpav.com/node/८१८९
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
११ जुलै
तसे आपण सूर्यवंशी - म्हणजे उन्हें माथ्यावर आल्यावर उठणारे. पण आज सकाळी आठ वाजताच उठलो, पोलिस स्टेशनला जावून खत्रीसाहेबाना भेटायचे होते ना? खरेतर मजिर्‍याने केलेला माझा अणि बाराथे साहेबांचा पब्लीक अपमान एव्हढा जिव्हारी लागला होता की गेले दोन दिवस धड झोप येत नव्हती.
पटापट आवरले आणि सकाळी बरोबर दहा वाजता पोलिस स्टेशनला पोचलो. थोड्यावेळात खत्रीसाहेब ही आलेच. मला बघून हसले आणि मागे येण्याची खूण करत केबिनमधे शिरले, पाठोपाठ मी होतोच.
खत्रीसाहेबानी टोपी काढली आणि टकलावरचा घाम पुसत खुर्चीत बसत म्हणाले, "हम्म्म बोल काय प्रॉब्लेम आहे तुझा?" मी म्हणालो, मला जबरा क्राईम रिपोर्टिंग करायचे आहे. कायतरी टीपा दया. खत्रीसाहेब खळखळून हसले आणि म्हणाले, "अरे बाप क्राईम रिपोर्टर होणे खूप कष्टाचे काम असते. त्यापेक्षा एखाद्या पोराचा बाप बनणे सोपे!" मी म्हणालो कितीही कष्ट करायची आपली तयारी आहे. त्यावर खत्रीसाहेबानी एकदा मला निरखून बघीतले आणि म्हणाले माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा तसा क्राईम रिपोर्टिंगशी काहीच सम्बन्ध नाही पण मला वाटते तुला क्राईम रिपोर्टिंग म्हणजे पोलिसांशी, कायद्याशी संबंधीत सगळ्या बातम्या असे म्हणायचे असावे. मी हो म्हणालो तर ते पुढे बोलले, "साधे गणित आहे, या बातम्या तुला मिळणार कुठे आणि कोणाकडून ते समजावून घ्यावे लागेल. त्यासाठी तुला डिपार्टमेंटची सगळी कार्यपद्धती जाणून घ्यावी लागेल. असे बघ....."
पुढचे दोन-तीन तास खत्रीसाहेब मला पोलिस खात्याची रचना, त्यातील वेगवेगल्या हुदयांवर काम करणार्‍या माणसांची कामे आणि अधिकार, गुन्हे दाखल करण्याची आणि तपास करण्याची पद्धत वगैरे समजावत बसले. सगळे ऐकून मी शंका विचारली, "पण मला हे सगळे लोक माहिती का देतील? मी तर नवा भिडू.... एकदम बच्चू...." त्यावर खत्रीसाहेब म्हणाले, "त्यासाठी तुला जास्तीत जास्त लोकांशी ओळखी करून घ्याव्या लागतील, असलेल्या ओळखी वाढवायला लागतील. लोकांचा विश्वास जिंकावा लागेल." पण उद्या जर मी तुमच्या विरोधात बातमी दिली तर त्यानंतर तुम्ही मला परत बातमी देणार नाही. आणि काही बातम्यांमुळे तर जिवाला धोका सुद्धा असेल. त्यावर खत्रीसाहेब हसले आणि म्हणाले, "असे बघ, एकतर हे तू स्वीकारलेल्या व्यवसायातले अंगभूत धोके आहेत. हे धोके घ्यायचे नसतील तर पत्रकार तरी कशाला होतोस? आणि दुसरे एक, तू जर स्वच्छ उद्देश ठेवून, सर्व बाजू लोकांपुढे मांडलिस तर कुणाला राग कश्याला येईल?" पटले आपल्याला..... लगेच ठरवले, आजपासून शक्य तेव्हढ्या पोलिसाना, वकीलांना रोज भेटायचे. कुठे काय चालले आहे ते सगळ्यात आधी आपल्याला कळले पाहिजे.
पोलिस स्टेशन मधून बाहेर पडताना मलाच माझ्या चालित नवा आत्मविश्वास जाणवत होता. पोलिस स्टेशन मधे जावून आत्मविश्वास मिळवणारा मी बहुधा पहिलाच माणूस असेन.

१२ जुलै
आयला त्या तोड़करच्या! लय घाण करून ठेवलेली दिसते सगळीकडे त्यांने. आज त्या लचके इन्स्पेक्टरकडे गेलो होतो त्याच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीची माहिती घ्यायला. सगळी माहिती घेऊन निघालो तर त्याने अचानक एक पाचशे रुपयाची नोट काढली अन माझ्या खिशात कोम्बली. मलातर दरदरून घाम फुटला. डोळ्यासमोर एकदम तोडकर आला, बेड्या घातलेला. हे काय असे विचारले तर हसत हसत लचके म्हणाला, "राहू दे खर्चापाण्याला.... ही तर जगरीतच आहे. आम्ही तुम्हाला सांभाळायचे अन तुम्ही आम्हाला. नाहीतर तुम्ही बातमी द्याल लचके इंस्पेक्टरच्या हद्दीत दरवडेखोरांना अभय अशी अन लावाल आम्हाला कामाला. तसेही हे माझ्या पगारातले पैसे कुठे आहेत. एक प्रॉपर्टी मॅटर होता. एका बिल्डरला इथल्या एका म्हातार्‍याचा बंगला हवा होता पण जागामालक ताबा देत नव्हता. तशी सीव्हील केस, आम्हाला काही करता येत नाही. पण ज़रा आऊट ऑफ वे गेलो अन काल दिले त्या म्हातार्‍याला हुसकावून जागेतून. आज सकाळीच तो बिल्डर आला अन दोन पेट्या देवून गेला. अशी कमाई एकट्याला पचत नाही. वाटून घ्यावी, दान धर्मं करावा मग त्रास होत नाही कसला. तोडकरपण घ्यायचा. त्याचा तर दहा पैसे वाटाच असायचा प्रत्येक तोडीत. तुम्ही नवीन आहात म्हणून माहिती नाही." आपली तर कवटी सरकली हे ऐकून. खिशातून नोट काढून सरळ त्याच्या टेबलवर टाकली अन म्हणालो, "ठेवा हे तुमच्याकडेच. मला नको असला पैसा." अन आलो निघून तिरिमीरीत. साला असल्या लुच्च्या- लुटारूंपेक्षा आमच्यासारखे टपोरी बरे. ऑफिसमधे पोचल्यावर सगळा प्रकार बाराथे साहेबाना सांगितला. ते काहीच बोलले नाहीत. फक्त हसले. पण त्यांच्या नजरेत माझे कौतुक दिसत होते. मलापण माझा अभिमान वाटला. मजिर्‍याने केलेल्या अपमानाची थोड़ी तरी भरपाई.

१३ जूलै
च्यायला! खत्रीसाहेब खरच आपला गॉड्फादर झालाय. आज सकाळी सकाळी फोन केला अन एकदम अभिनन्दन केले आपले. आपली दांडी गुल. म्हातार्‍याला झाले काय. परवा तर चांगला बोलत होता. काही कारण नसताना अभिनन्दन कश्याचे करतोय? मग विचारले तर म्हणाला, "पोलिस खात्यात पहिला शत्रु निर्माण करून घेतल्याबद्दल. काल रात्रीपासून सगळ्या डिपार्टमेंटमधे तू लचके इंस्पेक्टरच्याबरोबर केलेल्या चकामकीचीच चर्चा सुरु आहे. बर्‍याच जणांना तुझ्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटते आहे पण जरा सावध रहा. लचक्याला दुखावलास तू. त्याचे पण वरपर्यंत कॉन्टॅक्ट आहेत. सगळ्या वरिष्ठांच्या तोंडात हफ्त्याचे तोबरे भरलेत त्याने. वर बर्तन गँग मधला आहे. सगळ्या अधिकार्याना घरी भाजी, फळे वगैरे पुरवतो. किचन कॅबिनेटचा सपोर्ट पण स्ट्राँग आहे, वरिष्ठ अधिकार्यांच्या घरी कामवाल्या वगैरे पुरवतो म्हणून. शिवाय हौशी साहेबाना त्यांचे सगळे नाद पुरवून देतो. तसे तुला घाबरायचे काही कारण नाही पण कधी पट्ट्यात आला तर सोडू नको. फुल्ल पुरावे जवळ ठेवून अशी बातमी ठोकून दे की लचक्या सस्पेंड झालाच पाहिजे. नाहीतर कायम डूख धरून बसेल.....
साला या डिपार्टमेंटमधली माणसे काही स्वत:चे काम करतात का फक्त हफ्ते घेणे अन एकमेकांचे काटे काढ़णे एव्हडेच करतात???? जावू दे. आपल्याला काय? आपण आपले काम करायचे.

कथाविनोदविडंबनसमाजनोकरीमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jun 2009 - 2:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा एकदा मस्तच. लचके इन्स्पेक्टरचं नावही भारीच शोधलं आहेत ...

उद्या दुपारपर्यंतच पुढच्या भागाची वाट पहायची तयारी आहे, तेव्हा लवकर टाका पुढचा भागही.

Nile's picture

17 Jun 2009 - 3:13 pm | Nile

ह्येच म्हणतो! येउद्या.

हर्षद आनंदी's picture

17 Jun 2009 - 3:09 pm | हर्षद आनंदी

छान च

हर्षद आनंदी's picture

17 Jun 2009 - 3:02 pm | हर्षद आनंदी

"पोलिस स्टेशन मधे जावून आत्मविश्वास मिळवणारा मी बहुधा पहिलाच माणूस असेन. "

हे मात्र खरेच !! पण तांदळात खडे तसे काही चांगले लोक असतात...

बाकी डायरी अप्रतिम, पहिल्या भागापासुन वाचतोय, एकदम ओघवते लिखाण, कुठेही संदर्भ सुटत नाही

पुढील भाग लवकर टाका

अनंत छंदी's picture

17 Jun 2009 - 5:18 pm | अनंत छंदी

काय महाशय? कोणत्या पेप्राचा क्राईम बीट सांभाळता? नाही म्हटलं सहाव्या भागात रायटचे सेक्शन अगदी बरोबर लिहिलेत? =D>

ऍडीजोशी's picture

17 Jun 2009 - 5:42 pm | ऍडीजोशी (not verified)

पुणेरी भाउ, इतका वेळ नका हो घेउ

पटापट टाका की पुढचे भाग

घाटावरचे भट's picture

17 Jun 2009 - 6:02 pm | घाटावरचे भट

आता गोष्टी अजूनच विंटरेष्टिंग होयला लागल्यात.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jun 2009 - 7:35 pm | llपुण्याचे पेशवेll

झक्कास पुणेरीभाऊ.... नवीन पत्रकारांमधे नैतिकता शिल्लक आहे हे पाहून फार बरे वाटले.. नाहीतर टीव्हीवरील सवंग बातम्यानी कंटाळा आला होता.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

श्रावण मोडक's picture

17 Jun 2009 - 8:56 pm | श्रावण मोडक

झक्कास. येऊ देत अजून. या आकाराचे भाग खूप होतील पण, त्यामुळे मोठे लिहा की राव अजून थोडे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Jun 2009 - 11:15 am | घाशीराम कोतवाल १.२

पम्या खरच मानल यार तुला
लगे रहो पुणेरीशेट लगे रहो मस्त अजुन येउ द्या !!!

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)