तु !

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
4 Apr 2009 - 9:41 am

एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र...

************************************

किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ? तु म्हणजे मी व मी म्हणजे तु असेच तु कधी तरी आनंदात गात असे, तुझ्या व माझ्यात काहीच फरक नाही, तु येथे नसून ही जगत आहेस व मी असून ही नसल्यासारखा आहे........रणरणत्या उन्हामध्ये, दुपारी घोंगावत असलेल्या गरम हवा मध्ये तर कधी भर मुसळधार पावसामध्ये मी आपले, जगणे मरणे विसरुन तुझ्या मागे धावत असे, कधी सावली मध्ये तर कधी भर दुपारी तुला पाहताना, तर कधी तुझ्या नकळत झालेल्या स्पर्शामुळे अंगावर रोम रोम उभे होता ना, तर कधी असेच भिजलेला तुझा समोर येताना..... तुला सकाळ सकाळी पाहताना, खरं तर ह्या शब्दांना, ह्या आठवणींना आता काहीच किंमत राहीली नाही आहे मला माहीत आहे, तरी ही कधी कधी तूझी आठवण येते, असेच जेव्हा मी नदीच्या काठी बसलेला असताना, तरी कधी मंदिरासमोर उभे असताना, कळत नकळत तुझा विचार करताना, काही क्षण थबकतात तुझ्या माझ्यासाठी, अचानक एक वादळ येते व सर्व काही हवेमध्ये भिरकाकून देते, आजकाल त्याची सवय झाली आहे, अशी अनेक वादळे... ऋतु मी पाहिली जिवनामध्ये, अथांग तुझ्या आठवणी मध्ये.. तु कोठे तरी हरवली आहेस हे माहीत असून देखील तुला शोधताना.......

तुझ्या अस्तित्वाशिवाय जगणे सध्या मी शिकलो आहे, काही असावे अथवा नसावे त्याशिवाय हरणे, जिंकणे मी शिकलो आहे, माहीत नाही का जगतो आहे पण उद्या सकाळ होणार आहे हे माहीत असून ही अंधकारात काहीतरी शोधतो आहे, काय हरवले हे माहीत नाही पण काही तरी मुल्यवान होते, तुझ्या व माझ्याबद्दल होते, जे हरवले आहे, जरुर ते काही क्षण असावेत, पण ते माझे व तुझे होते, ज्यांची किंमत जगातील कुठलीच गोष्ट करु शकत नाही, ते क्षण मातीमोल झाले होते, ह्याला तु जबाबदार नाहीस, ना तु कारण, हे तुला ही माहीत आहे व मला ही, तरी ही असेच कधी तर काही शब्द असेच कळत न कळत बाहेर पडतात... तु जे काही मागीतलेस ते दिले, काही शब्द, काही वचने तर कधी श्वास माझा , तुला हवे ह्या विचारानंतर तर माझ्याकडे काही प्रश्नच नव्हता नकार देण्याचा, तु मागितलेस तर जीव ही देण्याचा मी शपथा खाल्या. जेव्हा तुच माझ्या सोबत नव्हतीस... अशीच अधांतरी मला सोडुन गेली होतीस, तेव्हा देखील मी तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा म्हणजे मरणे काय वाईट हा विचार केला, पण तरी ही जगतो आहे, कधी कळत न कळत वचन दिले होते तुला, त्याची सजा अशी मिळेल, माझ्या हे कधी मनात देखील आले नव्हते...पण तु दिले ती सजा जगणे, व आपले सर्वस्व वाहते बघणे हेच माझा नशीबी आहे.... तिळ तिळ मरणे ह्याचा अर्थ आज ऊमजला आहे.... मला !

कधी तू विचार केलास माझा ? तु गेल्यावर मी जगेन, मरेन ह्याचा विचार तरी आला तुझ्या मनात ? ह्या प्रश्नाने आजकाल जगणे अवघड केले आहे, हे जगणे पण एक कर्ज आहे, तुझ्या शिवाय जगणे म्हणजे सध्या तुझ्याकडे रोज एक अर्ज आहे... कधी तरी तुला पाहीन व मग जाईन ही इच्छा मनात होती.. तसे पाहता नेहमी मी काहीच मागत नाही. त्याच्याकडे जो नेहमी म्हणतो मी आहे ना... जेव्हा मी तुझ्यापाठीशी तेव्हा तुला कसली काळजी ! खरंच सध्या काळजी नाही, खरंच काळजी नाही, तिळ तिळ मरताना मी कधी संपून गेलो हे कळालेच नाही, का तुला त्रास द्यावा ह्या विचाराने कधी तुझ्याजवळ आलोच नाही... जेव्हा आलो तेव्हा माझे विचार माझे राहिलेच नाही, तु माझ्यापासून दुर जाताना तुला काय वाटले हे माहीत नाही पण तु दुर गेलीस..... तो क्षण...कधी माझ्यातील मलाच मारुन गेला हे कळालेच नाही.....असे का केले नशीबाने माझ्या बरोबर हा प्रश्न कधी विचारलाच नाही, तरी ही मी तुझ्यासाठी... हरणे सोडलेच नाही, कधी बाईकवरुन तर कधी गाडीवरुन जिवनाची पैज लावणे सोडलेच नाही, तुझ्या बरोबर तो मत्यु ही सध्या माझ्या पासून दुर राहतो, जेव्हा जेव्हा आपलसं केले त्याला तेव्हा तेव्हा तो माझा पासून दुर गेला..... संपवावे स्वत:ला... हा मार्ग मिळालाच नाही...असं नाही, पण आत्महत्या म्हणजे आत्मा गहाण ठेवण्यासारखं...... पुन्हा येथेच यावे लागेल, ज्या दुख: पासून, ज्या आठवणी पासून पळतो आहे... या दुख:ला, त्या आठवणींना पुन्हा आपलंस करण्यासारखं ! राहिलेल्या श्वासांचा हिशोब येथेच द्यावा लागेल, काही क्षणांना येथेच संपावे लागेल, मुक्ती मिळेल का नाही... हे माहीत नाही त्यामुळे स्वत: मरणे सध्या टाळत आहे..... ह्यामुळे अजून संपलो नाही। कधी तरी मृत्यु आपलाच समजून घेईल व आपल्या मिठीत घेईल....त्या क्षणाची वाट पाहत उभा आहे मी ..... असाच निशब्द.... जसा आपल्या पहिल्या भेटीत होतो......!

**************

कथानाट्यमुक्तकसाहित्यिकप्रकटनविचारसद्भावनाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

4 Apr 2009 - 10:25 am | अवलिया

मुडकर मत देखो राज!

--अवलिया

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे
उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

पर्नल नेने मराठे's picture

4 Apr 2009 - 10:49 am | पर्नल नेने मराठे

हे प्रेमप्रकरण की प्रेमभन्ग आहे?
चुचु

दशानन's picture

4 Apr 2009 - 11:11 am | दशानन

प्रेमभंगानंतर होणारी मानसिक आवस्था आहे ही !

विजुभाऊ's picture

4 Apr 2009 - 4:03 pm | विजुभाऊ

राज लगे रहो.....

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं.......विजुभाऊ सातारवी

जागु's picture

4 Apr 2009 - 11:31 am | जागु

शेवटच्या ओळी खुप आवडल्या. लगे रहो.

निखिल देशपांडे's picture

4 Apr 2009 - 1:29 pm | निखिल देशपांडे

..... असाच निशब्द.... जसा आपल्या पहिल्या भेटीत होतो......!
राजे मस्त्च लिहिले आहे हो.... प्रेमभंग सदरातिल सगळे बक्षीस तुम्हालाच मिळणार...

क्रान्ति's picture

4 Apr 2009 - 5:26 pm | क्रान्ति

तेरी खुदाई के कानुनों का कभी पता ना चला किसी को
अजीब इन्साफ है ये तेरा, खता किसीकी, सजा किसी को
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

दशानन's picture

16 Apr 2009 - 8:31 pm | दशानन

खुप दिवसानंतर उत्तर देत आहे समक्ष्व.

प्रत्येक गोष्टीला खुदा / भगवान/ देव जोडणे मला नाही आवडत, जराशी हिंमत त्यांने अथवा तीने जरी केली असती तरी वरील लेख नक्कीच वेळा असता ;)

काय होते, जेव्हा जेव्हा प्रेम असफल होते तेव्हा तेव्हा मंडळी देवावर दोष देऊन मोकळे होतात पण आपल्यामध्ये काय कमी आहे काय आपण चुकलो ह्याचा जरा ही विचार करत नाहीत, प्रेम असफल होण्यामागे इतर तिसरा कोणी नसून दोघांपैकी एक ती किंवा तोच असतो, हा स्वअनुभव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2009 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन मस्तच !

अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाभंग होणारच ! लेखन नेहमीप्रमाणेच 'तिच्या' भोवती फिरणारे !

अवांतर : आम्हालाही काही आठवणींनी छळले की आम्ही
'तेरी याद दिलसे भूलाने चला हू' ऐकत असतो. :)

-दिलीप बिरुटे

दशानन's picture

5 Apr 2009 - 12:22 pm | दशानन

>>लेखन नेहमीप्रमाणेच 'तिच्या' भोवती फिरणारे !

काही चकवे असतात जिवनामध्ये, आम्ही तिकडे जायचे नाही हा विचार जरी केला तरी पाऊले आपोआप तिकडेच जातात काय करु स्वभावदोष.

टारझन's picture

5 Apr 2009 - 7:08 pm | टारझन

वाह .. क्या बात है .. क्या बात है ... हे तर आपले राखिव कुरण झाले आहे राजे ? :ड

पाऊले आपोआप तिकडेच जातात काय करु स्वभावदोष.

हे चुकून काहीतरी वेगळंच वाचलं =)) =)) =))

विनायक प्रभू's picture

4 Apr 2009 - 5:33 pm | विनायक प्रभू

तीच्या

अप्रतिम,

सुंदरच.... स्वानुभवाशिवाय असे काळजाला हात घालणारे शब्द उमटत नाहीत राजे ;)
फार सुंदर !!! येऊ द्यात अजून
माझ्या संग्रहात असलेल्या १५० च्या वर असलेल्या दर्दभर्‍या गाण्यांची आठवण झाली....
आत्ताच ती यादी बघत आहे
आज रात्र तीच गाणी ऐकत जाईनसे वाटत आहे

- सागर

दशानन's picture

5 Apr 2009 - 12:21 pm | दशानन

ओ सागर सेठ,

त्या गाण्यांची लिस्ट लिहा एकदा, माझ्या कडे असलेल्या सेट मध्ये कुठलं गाणे तुमच्या कडे नाही व तुमच्याकडे असलेल्या सेट मध्ये माझ्याकडे नसलेले गाणे ह्यांची देवाणघेवाण करु आपण ;)

पाषाणभेद's picture

5 Apr 2009 - 5:35 pm | पाषाणभेद

बेवफा सनम हे गाणे/ अल्बम पण मस्त आहे. मी जेव्हा माझ्या पी.सी. वर लावे तेव्हा मित्र मला वेडा समजत.
- पाषाणभेद

दशानन's picture

6 Apr 2009 - 10:41 am | दशानन

आम्ही पण वेड्यांच्याच जमातीतील ;)

ओय राजू !

मदनबाण's picture

5 Apr 2009 - 7:28 pm | मदनबाण

शिशा हो या दिल हो आखिर .. .. . |

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.