नवीन पाककृती: वायफळ शब्दांचे लोणचे!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
24 Feb 2009 - 12:20 pm

बंधु-भगिनींन्नो, आज किनई, मी तुम्हाला एक नवीनच पाककृती सांगणार आहे. माझ्या आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळांवरच्या आजवरच्या अनुभवातून हा पदार्थ जन्माला आला आहे. मात्र करायला अगदीच सोप्प्पा आहे हं! अगदी सगळ्या स्त्रियांनासुद्धा जमेल......

सर्वप्रथम एक पसाभर मराठी शब्द विकत घ्यावेत. ते शब्द तुम्ही कुठून घेता याला नं, फार फार महत्त्व आहे........

आपल्या नंदनभावजींच्या दुकानात फारच अप्रतिम शब्द मिळतात पण त्यांचं दुकान मात्र खूपच कमी वेळा उघडं असतं त्यामूळे हे शब्द मिळायला जरा दुर्मिळच आहेत.....
अभ्यंकर तात्यांच्या दुकानात घेतलेत तर वापरण्यापूर्वी सगळे शब्द नीट निवडून त्यातले 'शिंच्या', 'फोकलीच्या' वगैरे दगड काढून टाकावे लागतात....
पिडांकाकांच्या दुकानात व्हरायटी मिळते पण सगळ्या शब्दांना एक शिवराळ रंग असतो. तेंव्हा इथे माल घेतलात तर तो वापरण्यापूर्वी स्वच्छ धूवून घेणं अतिशय आवश्यक आहे.....
रंगाबापूंच्या दुकानात त्यांची कारभारीण त्यांच्यावर सक्त नजर ठेवते. त्यामुळे माल वरवर दिसायला चांगला असला तरी डुप्लीकेट (विडंबनं!!! ) त्याच्यात आपल्या लोणच्याला आवश्यक तो अस्सल खमंगपणा नाही.....
अण्णांच्या "मुक्तसुनीत" भांडारात उत्तम क्वालिटी मिळते. दर ही अतिशय माफक असतो. पण ते लांबलचक शब्द आपल्या बरणीत कसे मावणार? म्हणून बरं का बंधू-भगिनींनो, त्या शब्दांची पुढली आणि पाठली टोकं उडवून टाकावीत. तरीही त्या शब्दांचा अर्थ काही बदलत नाही हे विशेष!!!!!

तिकडे होजेनदीच्या पल्याड एका सर्किटचाचाचं सुद्धा दुकान आहे. पण तुम्ही नवीनच सुगरण असाल तर तिकडे फिरकूही नका. त्याच्या शब्दांवर रक्ताचे डाग असतात. मराठी संकेतस्थळांचा कोथळा काढल्याचे! शब्दांची चव अफलातून असते पण सगळ्यांना सोसेलच याची खात्री नाही. एकूणच ती एक "ऍक्वायर्ड टेस्ट" आहे.....

तर आणलेले शब्द पाण्यात स्वच्छ धूवून घ्यावे आणि आपली प्राजुताई करते तस्से अगदी पुसून लख्ख कोरडे करावेत. नंतर त्यात एक टेबलस्पून शास्त्रीय संगीत, दोन टेबलस्पून अमेरिकेला शिव्या, अर्धा रत्तल निरर्थक कौल घालावेत.

मिश्रण चांगले मिसळून एकत्र करावे....
गॅसवर एक कढई मंद आचेवर ठेवावी. कढई गरम झाल्यावर त्यात अज्ञानाचे तेल घालावे. तेल चांगले कडकडीत तापल्यावर त्यात असंबद्ध प्रतिसादांची तडतड्णारी मोहरी आणि कडवट प्रतिक्रियेची मेथी घालावी....
फोडणी चांगली तयार झाल्यावर त्यात वर मॅरिनेट केलेले शब्द घालावेत....
अगदी वाटलंच तर वरतून बेताचं तारतम्य भुरभुरावं....
मिश्रण चांगले ढवळून थंड होऊ द्यावे आणि मग एखाद्या अरुंद गळ्याच्या (म्हणजे घाटावरल्या भटाच्या नव्हे, तर अरुंद तोंडाच्या!!!) बरणीत भरून ठेवावे.....

लोणचे चांगले मुरल्यावर खाण्यास काढावे......

पाहुणे जर मायबोलीकर असतील तर बरणीतून लोणचे काढून थेट पानावर वाढता येईल......

पाहुणे जर उपक्रमी असतील तर त्यांना सरळ जेवता येत नाही. जेवणाचे तांत्रिक फायदे काय हे समजावून द्यावं लागतं. तेंव्हा उपक्रमी पाहुण्यांना जेवायला न घालता तसेच बाहेरच्याबाहेर कटवावे.....

पाहुणे जर मनोगती असतील तर प्रथम हे लोणचे शुद्धिचिकित्सकाच्या मिक्सरमध्ये अर्धा तास रगडून घ्यावे आणि मग तयार झालेले खिमट पाहुण्यांना वाढावे. तुम्हाला किळस वाटेल पण पाहुणे मात्र अगदी आवडीने ते खिमट खातील.....

पाहुणे जर मिपाकर असतील तर प्रथम तो शुद्धिचिकित्सक फोडून टाकावा आणि त्याचे फुटलेले तुकडे पुरावा म्हणून सरपंचांना खात्री करून घेण्यासाठी डायनिंग टेबलावर मांडून ठेवावेत. तरच तुमचे हे वायफळाचे लोणचे मिपाकर पाहुण्यांच्या घशाखाली उतरेल.....

तर आमच्या "१०१ लोणच्यांच्या पाककृती" या आगामी पुस्तकाची ही फक्त झलक आहे. (इश्श्य!! जर तो वात्रट डॉन्या साबुदाण्याच्या थालिपीठांची पाककृती लिहू शकतो तर आम्हीच मेलं काय पाप केलंय?) आमचं संपूर्ण पुस्तक लिहून तयार आहे. बघूया कधी प्रकाशनाचा योग येतो ते.....

केवळ आपलीच,
स्वाती डांबिश

औषधोपचारसंस्कृतीपाकक्रियाविनोदविडंबनशिक्षणआस्वाद

प्रतिक्रिया

अवलिया's picture

24 Feb 2009 - 12:25 pm | अवलिया

ठार झालो!!!!

अवांतर - फटु कुठे ... ?

--अवलिया

टारझन's picture

24 Feb 2009 - 11:11 pm | टारझन

उकडलो ... शिजलो ... उतू गेलो ... तळलो ...वाफाळलो ... करपलो ... शिळा झालो ..

विजुभाऊ's picture

27 Feb 2009 - 7:41 pm | विजुभाऊ

पिडां काका हे बरे नाही हां
ते रक्त गाभुळलले शब्द इसरलात.
संस्कृतप्रचुर शीतल मलयगिरी वारा इसरलात
गर्जेश पिळंकी च्या पाकिटातली कचरारत्ने इसरलात
ह्याचा निषेद कुणी करायचा.

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

बेसनलाडू's picture

24 Feb 2009 - 12:28 pm | बेसनलाडू

लोणचे आवडले. रोज तोंडी लावणे म्हणून असतेच पानात ;)
(लोणचेप्रेमी)बेसनलाडू

अभिज्ञ's picture

24 Feb 2009 - 12:32 pm | अभिज्ञ

सिंपली ग्रेट.
:)

अभि़ज्ञ.

यशोधरा's picture

24 Feb 2009 - 12:32 pm | यशोधरा

=)) आज हसण्याचा दिवस आहे की काय! झकास!!

मिंटी's picture

24 Feb 2009 - 12:44 pm | मिंटी

यशोशी एकदम सहमत आहे. आधी डॉन्या आणि आता पिडां काका......

प्रकाश घाटपांडे's picture

24 Feb 2009 - 1:00 pm | प्रकाश घाटपांडे

आमी बी मरडवहीत (म्हजी मनातल्या खरडवहीत) हॅहॅहॅ करुन हासलो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंदयात्री's picture

24 Feb 2009 - 12:35 pm | आनंदयात्री

मृत झालो. माझ्या आत्म्यास शांती लाभो.
(अन ती चांगली धष्टपुष्ट असो)
:D

ज्याची त्याची आवड.
रेगे म्हणायचे तशी पुष्कळ पुष्कळ अंग तुझं अशी का ?

सखाराम_गटणे™'s picture

24 Feb 2009 - 12:36 pm | सखाराम_गटणे™

ठो आहे.

>>स्वाती डांबिश
नवीन नाव छान आहे.

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

दशानन's picture

24 Feb 2009 - 12:36 pm | दशानन

=))

झकास !!!!

हात आखडता घेतला की काय असे वाटले :(

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

अनिल हटेला's picture

24 Feb 2009 - 12:39 pm | अनिल हटेला

सहीच !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Feb 2009 - 12:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटूशिवाय असणार्‍या पाकृ आम्ही वाचतच नाही.

अदिती अभयंकर
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अवांतरः पिडाकाका, मिपामालक वगळता बाकीच्या अनिवासी भारतीयांच्याच टोप्या उडवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! (हल्ली या शुभेच्छा अंमळ मागेच पडल्या आहेत.)
अतिअवांतरः लै भारी.
अवांतरेतर: पु.पा.शु.

जागु's picture

24 Feb 2009 - 12:44 pm | जागु

खुपच चविष्ट लोणच झाल हो स्वाती.

नंदन's picture

24 Feb 2009 - 12:44 pm | नंदन

आवडलो, काकानु :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्ता's picture

24 Feb 2009 - 12:55 pm | मुक्ता

नुसत्या वासानेच लाळ टपकली ..

../मुक्ता

भाग्यश्री's picture

24 Feb 2009 - 1:11 pm | भाग्यश्री

हाहा... बरं झालं आत्ताच चेक केलं! उद्या सकाळपर्यंत शिळे झाले असते!! :))
लै भारी!!!
येउंदेत अजुन पाकृ!!

http://bhagyashreee.blogspot.com/

सहज's picture

24 Feb 2009 - 1:29 pm | सहज

क्या बात है!

ब्लू चीज, सर्केश्वरी ठेचा व हे लोणचे.

आवड्यो. आवड्यो.

पु.पाकृ.शु.

:-)

विनायक प्रभू's picture

24 Feb 2009 - 1:48 pm | विनायक प्रभू

'डांबिस' पाकृ

परिकथेतील राजकुमार's picture

24 Feb 2009 - 2:29 pm | परिकथेतील राजकुमार

फोटु कुठ हाय ?
आणी "गॅसवर एक कढई मंद आचेवर ठेवावी.'' ह्याच्या ऐवजी "गॅसवर एक मंद कढई आचेवर ठेवावी.' असेच का वाचले जात आहे कायम कायम? =))
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

घाटावरचे भट's picture

24 Feb 2009 - 2:29 pm | घाटावरचे भट

मेलो, ठार झालो, वारलो, चचलो, खपलो, गचकलो, निजधामास गेलो, निवर्तलो, निधन पावलो, अनंतात विलीन झालो, वगैरे वगैरे वगैरे....

(अधिक माहिती तथा संबंधित शब्दसंग्रहासाठी मालकांशी संपर्क साधावा)

- अ. ग. भ. ;)

छोटा डॉन's picture

24 Feb 2009 - 2:49 pm | छोटा डॉन

=)) =))

वाईट्ट काढला आहे बॉ घाणा ह्या रेसिपीचा.
हसुन हसुन पडलो ...!!!

अवांतर : अशाच अजुन २-४ रेसिपी आल्या तर हा मिपाचा "पाककॄती आठवडा" म्हनुन जाहीर करावा काय ?

------
( वात्रट आणि तोतया ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विसोबा खेचर's picture

24 Feb 2009 - 2:46 pm | विसोबा खेचर

ग त प्रा ण झा लो...!

डांबिसा, फोकलिच्या मानला तुला...!

सिंपली ग्रेट पाकृ... :)

तात्या.

धमाल मुलगा's picture

24 Feb 2009 - 3:19 pm | धमाल मुलगा

=))
काय काका..आपलं काकू..आपलं ते हे...च्यायला काय म्हणावं तेच कळेना, लेखकः पिवळा डांबिस, लेखाखाली सही: स्वाती डांबिश!

अहो तुम्ही एकदम झ्याक पा.कृ. करत असाल हो सगळे, पण ह्ये आस्सं कन्फुजन टाकून आमच्या डोक्याचं त्या डान्यानं केलेल्या खिचडीच्या थालपिठाचं का लोणचं घालता राव? :)

काका, आज एकदम चिमटे काढायच्या मूडमध्ये लेख उतरलेला दिसतोय ;)

मस्त!

अवांतरः हे लोणचे नुसतेच खावे की तोंडी लावणे म्हणुन घ्यावे? तसे असल्यास मुख्य पदार्थ कोणता असावा ह्याबद्द्ल थोडी माहिती दिलीत तर फार बरं होईल :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

विजुभाऊ's picture

27 Feb 2009 - 7:44 pm | विजुभाऊ

ठ्याँ ......फुटलो म्हणायचे ह्रायलास की

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

चाणक्य's picture

24 Feb 2009 - 4:38 pm | चाणक्य

लोणचं फारंच आवडलं....! झकास झालंय

लिखाळ's picture

24 Feb 2009 - 5:10 pm | लिखाळ

हा हा हा ... मस्तंच आहे लोणचं .. लै भारी :)
-- लिखाळ.

शितल's picture

24 Feb 2009 - 7:40 pm | शितल

पिडा काका,
लोणचं अगदी मुरलेलं दिसत आहे. ;)
आज तुम्ही आणी डॉन्याने खुप हसविले फक्त हसुन मरायची कमी आहे, गाल दुखु लागले आता हसुन हसुन.

सुनील's picture

24 Feb 2009 - 7:50 pm | सुनील

अप्रतिम....

=))

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रेवती's picture

24 Feb 2009 - 7:52 pm | रेवती

वा!! काका, पाकृ भन्नाट आहे.
मला वाटतं डॉनने केलेल्या थालीपिठांबरोबर हे लोणचे भारीच लागेल!

रेवती

चतुरंग's picture

24 Feb 2009 - 11:10 pm | चतुरंग

बाकी एवढ्या वर्षात तुम्ही काकूंच्या हाताखाली पाककलेत चांगलेच निपुण झालेले आहात ह्याची खात्री पटली पिडाकाका!! ;)
मस्त. मजा आली वाचायला. :)

चतुरंग

रामदास's picture

24 Feb 2009 - 11:32 pm | रामदास

घातलेली मोहोरी झणझणून नाकात गेली.
अगदी सगळ्या स्त्रियांनासुद्धा जमेल...... हे फार धाडसी विधान वाटलं बॉ.

प्राजु's picture

24 Feb 2009 - 11:53 pm | प्राजु

डांबिस लेखणीचा कहर आहे... :)
पाहुणे जर उपक्रमी असतील तर त्यांना सरळ जेवता येत नाही. जेवणाचे तांत्रिक फायदे काय हे समजावून द्यावं लागतं. तेंव्हा उपक्रमी पाहुण्यांना जेवायला न घालता तसेच बाहेरच्याबाहेर कटवावे.....

पाहुणे जर मनोगती असतील तर प्रथम हे लोणचे शुद्धिचिकित्सकाच्या मिक्सरमध्ये अर्धा तास रगडून घ्यावे आणि मग तयार झालेले खिमट पाहुण्यांना वाढावे. तुम्हाला किळस वाटेल पण पाहुणे मात्र अगदी आवडीने ते खिमट खातील.....

पाहुणे जर मिपाकर असतील तर प्रथम तो शुद्धिचिकित्सक फोडून टाकावा आणि त्याचे फुटलेले तुकडे पुरावा म्हणून सरपंचांना खात्री करून घेण्यासाठी डायनिंग टेबलावर मांडून ठेवावेत. तरच तुमचे हे वायफळाचे लोणचे मिपाकर पाहुण्यांच्या घशाखाली उतरेल.....

हे तीन परिच्छेद तर.... बापरे! हसून हसून पुरेवाट झाली.
वा! आज मस्त गेला सकाळचा वेळ. डॉन भाऊ आणि पिडा काका... मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Feb 2009 - 11:59 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

25 Feb 2009 - 12:11 am | मेघना भुस्कुटे

=))
=))
असेच म्हणते! लई झ्याक.

सुक्या's picture

25 Feb 2009 - 1:26 am | सुक्या

कहर झाला आता. हासुन हासुन मुरकुंडी वळाली. काल डान्या, आज पिडा लै हासवलं राव तुमी. आज परत लोकं माना वर करुन मी का हसतोय म्हणुन पहात होती. एका आचराटाने तर 'डॉक्टर ची अपॉईंट्मेंट घेतली का?' म्हणुन डायरेक्ट विचारलं राव. मेलो आता.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2009 - 7:16 am | llपुण्याचे पेशवेll

डांबिसकाकानू आमच्याकडे शिष्ठपणा पण मुबलक आहे. तो कधी टाकायचा लोणच्यात? तसा बरेच दिवसाचा असल्याने अगदी मुरला आहे. :)
लोणचे आवडले हे. वे. सां. न. ल.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

पिवळा डांबिस's picture

25 Feb 2009 - 10:08 am | पिवळा डांबिस

डांबिसकाकानू आमच्याकडे शिष्ठपणा पण मुबलक आहे. तो कधी टाकायचा लोणच्यात?
या आमच्या लोणच्याच्या रेसेपीत तुमच्याकडचा शिष्टपणा नको. तो तुम्हालाच लखलाभ असू देत!!!
:)

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2009 - 10:21 am | llपुण्याचे पेशवेll

मग शिष्ठपणा वापरायचा कुठे? काहीतरी पाकृ काढा की राव त्यासाठी पण.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अमृतांजन's picture

25 Feb 2009 - 7:29 am | अमृतांजन

ब्राहो. झण्झणीत झालय लोणचं

समिधा's picture

28 Feb 2009 - 5:47 am | समिधा

काका, मस्तच जमलय लोणचं ...
खुप हसले. :)

वेताळ's picture

26 Jul 2009 - 9:55 am | वेताळ

=)) =)) =)) =)) =)) =))
मस्तच हसुन हसुन बेजार झालो.

=)) वेताळ

अमृतांजन's picture

26 Jul 2009 - 10:20 am | अमृतांजन

मस्त!!!!

टाकणखार + गरमागरम पोळी असा झक्क बेत आहे. आंब्याच्या फोडी चाटून खायची लज्जत आहे.

स्वाती२'s picture

26 Jul 2009 - 7:20 pm | स्वाती२

लै भारी लोणचं.

वाटाड्या...'s picture

26 Jul 2009 - 8:08 pm | वाटाड्या...

आपटलो बसल्या बसल्या..

आता हे लोणचं बरेच दिवस मुरणार ....

- वा

शुचि's picture

17 Apr 2010 - 1:17 am | शुचि

खूप सुंदर!!!! ह. ह. पु. वा. =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

पिंगू's picture

17 Apr 2010 - 4:46 am | पिंगू

पिडाकाका हे लोणचे लगेच मुरले अगदी काही मिनिटांमध्ये...........

नंदू's picture

17 Apr 2010 - 6:11 am | नंदू

मजा आली.

भारद्वाज's picture

17 Apr 2010 - 3:30 pm | भारद्वाज

छान मुरलंय लोणचं.

इंटरनेटस्नेही's picture

7 May 2010 - 5:30 pm | इंटरनेटस्नेही

हा माझ्या सर्वात आवडत्या विनोदी लेखांपैकी एक! जबरदस्त निरीक्षण शक्ती आणि अफाट विनोदबुद्धी म्हणजे काय, ह्याचे प्रत्यय देणारा.

शुभकामना.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

मी-सौरभ's picture

30 Mar 2012 - 10:15 am | मी-सौरभ

:)

सहज काकांचे आभार....

(पिडा काकांचा पण पंखा)

निनाद's picture

31 Mar 2012 - 2:14 pm | निनाद

झकास पण कवितांचे काय हो?