नवीन पाककृती: वायफळ शब्दांचे लोणचे!!
लेखनप्रकार
बंधु-भगिनींन्नो, आज किनई, मी तुम्हाला एक नवीनच पाककृती सांगणार आहे. माझ्या आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळांवरच्या आजवरच्या अनुभवातून हा पदार्थ जन्माला आला आहे. मात्र करायला अगदीच सोप्प्पा आहे हं! अगदी सगळ्या स्त्रियांनासुद्धा जमेल......
सर्वप्रथम एक पसाभर मराठी शब्द विकत घ्यावेत. ते शब्द तुम्ही कुठून घेता याला नं, फार फार महत्त्व आहे........
आपल्या नंदनभावजींच्या दुकानात फारच अप्रतिम शब्द मिळतात पण त्यांचं दुकान मात्र खूपच कमी वेळा उघडं असतं त्यामूळे हे शब्द मिळायला जरा दुर्मिळच आहेत.....
अभ्यंकर तात्यांच्या दुकानात घेतलेत तर वापरण्यापूर्वी सगळे शब्द नीट निवडून त्यातले 'शिंच्या', 'फोकलीच्या' वगैरे दगड काढून टाकावे लागतात....
पिडांकाकांच्या दुकानात व्हरायटी मिळते पण सगळ्या शब्दांना एक शिवराळ रंग असतो. तेंव्हा इथे माल घेतलात तर तो वापरण्यापूर्वी स्वच्छ धूवून घेणं अतिशय आवश्यक आहे.....
रंगाबापूंच्या दुकानात त्यांची कारभारीण त्यांच्यावर सक्त नजर ठेवते. त्यामुळे माल वरवर दिसायला चांगला असला तरी डुप्लीकेट (विडंबनं!!! ) त्याच्यात आपल्या लोणच्याला आवश्यक तो अस्सल खमंगपणा नाही.....
अण्णांच्या "मुक्तसुनीत" भांडारात उत्तम क्वालिटी मिळते. दर ही अतिशय माफक असतो. पण ते लांबलचक शब्द आपल्या बरणीत कसे मावणार? म्हणून बरं का बंधू-भगिनींनो, त्या शब्दांची पुढली आणि पाठली टोकं उडवून टाकावीत. तरीही त्या शब्दांचा अर्थ काही बदलत नाही हे विशेष!!!!!
तिकडे होजेनदीच्या पल्याड एका सर्किटचाचाचं सुद्धा दुकान आहे. पण तुम्ही नवीनच सुगरण असाल तर तिकडे फिरकूही नका. त्याच्या शब्दांवर रक्ताचे डाग असतात. मराठी संकेतस्थळांचा कोथळा काढल्याचे! शब्दांची चव अफलातून असते पण सगळ्यांना सोसेलच याची खात्री नाही. एकूणच ती एक "ऍक्वायर्ड टेस्ट" आहे.....
तर आणलेले शब्द पाण्यात स्वच्छ धूवून घ्यावे आणि आपली प्राजुताई करते तस्से अगदी पुसून लख्ख कोरडे करावेत. नंतर त्यात एक टेबलस्पून शास्त्रीय संगीत, दोन टेबलस्पून अमेरिकेला शिव्या, अर्धा रत्तल निरर्थक कौल घालावेत.
मिश्रण चांगले मिसळून एकत्र करावे....
गॅसवर एक कढई मंद आचेवर ठेवावी. कढई गरम झाल्यावर त्यात अज्ञानाचे तेल घालावे. तेल चांगले कडकडीत तापल्यावर त्यात असंबद्ध प्रतिसादांची तडतड्णारी मोहरी आणि कडवट प्रतिक्रियेची मेथी घालावी....
फोडणी चांगली तयार झाल्यावर त्यात वर मॅरिनेट केलेले शब्द घालावेत....
अगदी वाटलंच तर वरतून बेताचं तारतम्य भुरभुरावं....
मिश्रण चांगले ढवळून थंड होऊ द्यावे आणि मग एखाद्या अरुंद गळ्याच्या (म्हणजे घाटावरल्या भटाच्या नव्हे, तर अरुंद तोंडाच्या!!!) बरणीत भरून ठेवावे.....
लोणचे चांगले मुरल्यावर खाण्यास काढावे......
पाहुणे जर मायबोलीकर असतील तर बरणीतून लोणचे काढून थेट पानावर वाढता येईल......
पाहुणे जर उपक्रमी असतील तर त्यांना सरळ जेवता येत नाही. जेवणाचे तांत्रिक फायदे काय हे समजावून द्यावं लागतं. तेंव्हा उपक्रमी पाहुण्यांना जेवायला न घालता तसेच बाहेरच्याबाहेर कटवावे.....
पाहुणे जर मनोगती असतील तर प्रथम हे लोणचे शुद्धिचिकित्सकाच्या मिक्सरमध्ये अर्धा तास रगडून घ्यावे आणि मग तयार झालेले खिमट पाहुण्यांना वाढावे. तुम्हाला किळस वाटेल पण पाहुणे मात्र अगदी आवडीने ते खिमट खातील.....
पाहुणे जर मिपाकर असतील तर प्रथम तो शुद्धिचिकित्सक फोडून टाकावा आणि त्याचे फुटलेले तुकडे पुरावा म्हणून सरपंचांना खात्री करून घेण्यासाठी डायनिंग टेबलावर मांडून ठेवावेत. तरच तुमचे हे वायफळाचे लोणचे मिपाकर पाहुण्यांच्या घशाखाली उतरेल.....
तर आमच्या "१०१ लोणच्यांच्या पाककृती" या आगामी पुस्तकाची ही फक्त झलक आहे. (इश्श्य!! जर तो वात्रट डॉन्या साबुदाण्याच्या थालिपीठांची पाककृती लिहू शकतो तर आम्हीच मेलं काय पाप केलंय?) आमचं संपूर्ण पुस्तक लिहून तयार आहे. बघूया कधी प्रकाशनाचा योग येतो ते.....
केवळ आपलीच,
स्वाती डांबिश
वाचने
20929
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
ठार
In reply to ठार by अवलिया
उकडलो ...
In reply to ठार by अवलिया
पिडां काका
खल्लास
सिंपली
आज
In reply to आज by यशोधरा
+१
In reply to आज by यशोधरा
सहमत
मृत झालो.
In reply to मृत झालो. by आनंदयात्री
अन ती चांगली धष्टपुष्ट असो
ठो
झकास !!!! हात
+१
फोटूशिवाय
चविष्ट
वायफळाचो मळो
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त
हाहा... बरं
चविष्ट
लै
फोटु ?
मेलो, ठार
In reply to मेलो, ठार by घाटावरचे भट
+१,
ग त प्रा ण
ज ह ब ह र्या!
In reply to ज ह ब ह र्या! by धमाल मुलगा
ठ्याँ
आवडलं..
हा हा हा ...
अफलातुन..
झक्कास
वा!! काका,
माताय! जबर्या पाकृ!!
लोणच्याला फेटून
कहर आहे..
भन्नाट
In reply to भन्नाट by बिपिन कार्यकर्ते
असेच
अगाया . . .
डांबिसकाक
In reply to डांबिसकाक by llपुण्याचे पेशवेll
नको रे बाबा!
In reply to नको रे बाबा! by पिवळा डांबिस
मग
ब्राहो.
झकास
लै भारी
मस्त!!!! टाकण
लै भारी
लै भारी..
खूप
पिडाकाका लोणचेवाले
जबरदस्त
छान मुरलंय
हा माझ्या
_/\_
झकास