यंदा कर्तव्य आहे? भाग १

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
20 Feb 2009 - 5:42 pm

यंदा कर्तव्य आहे ? पुस्तकाचे या पुर्वीचे
मनोगत

मॅरेज इज नेसेसरी ईव्हल अशी एक म्हण आहे
.
त्यावर विश्वास बसावा अशीच परिस्थिती अवती भवती आहे. कुटुंब बनण्याची सुरवात विवाहापासून होते. विवाहसंस्था हा समाजरचनेचा एक अपरिहार्य भाग आहे. विवाह हा स्त्री-पुरुष मीलनाचा एक समाजमान्य मार्ग आहे. परस्पर सहजीवन,प्रजनन, कुटुंब,धर्माचरण,लैंगिक उपभोग यासाठी आवश्यक असलेली ती समाजरचनेची गरज आहे. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास बघितला तर तो अतिशय मनोरंजक आहे. ज्या पद्धतीची लग्नं आज निषिद्ध मानली जातात ती सुद्धा वैदिक काळात कोणत्या ना कोणत्या प्रचलित विवाह पद्धतीनुसारच होती असे आढळते. वैदिक काळात विवाहाचे आठ प्रकार सांगितले आहेत.
१) ब्राम्ह विवाह:- हे वैदिक मान्यता असलेले म्हणजे शास्त्रसंमत असलेले सालंकृत कन्यादान होय. आजचा वैदिक विवाह हाच आहे. हा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला गेला.
२) दैव विवाह:- यज्ञासाठी बोलविलेल्या ऋत्विजाला आपली कन्या देणे याला दैव विवाह म्हटले आहे.
३) आर्ष विवाह :- धर्मकारणासाठी गाय व बैल हे वधूपित्यास देउन ती कन्या आपली करुन घेणे. हा कन्याविक्रय ठरला तरी तो धर्मकारणासाठी असल्याने तो मान्य आहे.
४) प्राजापत्य विवाह :- प्रजापती या देवतेस उद्देशुन केलेला धर्म अर्थ व काम या त्रिकाणात राहून केलेला विवाह. तरी ब्राम्ह व दैव पेक्षा कमी प्रतीचा व आर्षपेक्षा जास्त प्रतीचा हा प्रकार मानला आहे.
वरील सर्व प्रकार ब्राम्हण वर्णापुरते मर्यादित होते.
५) आसूर विवाह:- हा सर्व वर्णासाठी असलेला प्रकार यात वधूच्या नातलगांना यथाशक्ती द्रव्य देउन स्वच्छंद पणे केलेला विवाह प्रकार. धर्माचरण हे येथे गौण आहे.
६) गांधर्व विवाह : - सर्व वर्णांना हा प्रकार खुला आहे. इथे स्त्री पुरुषांची मने जुळली की बास आहे बाकी सबकुछ चलता है। सर्व गोष्टींना इथे कार्योत्तर मंजूरी घेण्याची सोय आहे.
७) राक्षस विवाह :- मनगट शाहीच्या जोरावर एखादी कन्या पळवून आणून जबरदस्तीने विवाह करणे म्हणजे राक्षसविवाह. हा फक्त क्षत्रिय वर्णास करता येतो.
८) पैशाच विवाह :- हा प्रकार म्हणजे बलात्काराला विवाह म्हणून दिलेली मान्यता असे म्हटले तर वावगे ठरु नये. हा अर्थातच वर्ज्य मानला आहे.
आजही या सर्व गोष्टी समाजात दिसून येतात. परंतु समाज जसा जसा विकसित होत गेला तस तशा त्यातील छटा बदलत गेल्या. पूर्वी नाडीपरीक्षा, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा अशा परीक्षा जशा होत तशा वधूवर परीक्षा सुद्धा धर्मशास्त्राचा भाग होता. त्यात आरोग्य, स्वभाव, कुलाचार, अंगलक्षण,वय इ.गोष्टी विचारात घेतल्या जात. विवाहात ज्योतिषशास्त्राचा विचार हा स्वतंत्रपणे न करता ज्योतिष हे धर्माचे अंग असल्याने त्या भूमिकेतून केला जात असे. भारतीय ज्योतिष हे नक्षत्राधिष्ठित आहे. प्रचलित ज्योतिषशास्त्र हे वराहमिहिर पासून म्हणजे इ.सन ५०० च्या आसपास अस्तित्वात आले. प्रचलित पत्रिका मेलन पद्धती ही त्या नंतरच्या काळातील आहे. थोडक्यात ती पंधराशे वर्षांपेक्षा जास्त जुनी नाही.
सद्यस्थितीतील विवाह पद्धती
मुलगा किंवा मुलगी शिक्षण संपल्यानंतर थोडेसे स्थिरस्थावर झालेवर विवाह योग्य झाले असे समजण्यात येते. साधारण पणे आपल्या समाजात मुली २० ते ३० या वयोगटात व मुले २३ ते ३५ वयापर्यंत विवाहयोग्य ठरतात. मुलामुलींचे पालक हे आपल्या पाल्याचा विवाह जुळविण्यासाठी नातेवाईक, परिचित यांना सांगून वधूवर सूचक मंडळात नांव नोंदवतात. त्यानुसार प्रथम व्यावहारिक बायोडाटासह तयार असलेली पत्रिका व फोटो हे प्राथमिक स्तरावर पाठविल्या जातात. अजून ही पुरुषप्रधान संस्कृती असल्याने बऱ्याच वेळा मुलीची बाजूच जास्त करुन ही माहिती पाठविते. मग पत्रिकेला किती महत्व द्यायचे हा प्रश्न उपस्थित होतो. आम्हाला पत्रिका पहायची नाही असा ठाम आग्रह धरणारे दोन टक्केच असतात असा अनुभव मंडळांचा असतो. म्हणजे अठठयाण्णव टक्के लोकांना पत्रिका हवी असते. स्थळ व्यावहारिक दृष्टया नाकारायचे असेल तर पत्रिका जुळत नाही हे सांगणे उभयपक्षी सोयीस्कर असते. इथपासून विवाहात पत्रिका पुराण चालू होते.

यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

दशानन's picture

20 Feb 2009 - 5:44 pm | दशानन

>>गांधर्व विवाह : - सर्व वर्णांना हा प्रकार खुला आहे. इथे स्त्री पुरुषांची मने जुळली की बास आहे बाकी सबकुछ चलता है। सर्व गोष्टींना इथे कार्योत्तर मंजूरी घेण्याची सोय आहे.

तरीच. महाभारतात जवळ जवळी सगळी लग्ने ह्याच प्रकारातील आहे.. !

नॉट बॅड आयडीया सर जी >:)

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2009 - 5:49 pm | प्रकाश घाटपांडे

सर्व गोष्टींना इथे कार्योत्तर मंजूरी घेण्याची सोय आहे.

शासकीय कामात कार्योत्तर मंजुरी ही अशा अपवादात्मक गोष्टी साठी घेतली जाते. म्ह्जी अदुगर करुनसवरु बसायच आन नंतर मंग रेग्युरलाईज करुन घ्यायचं
प्रकाश घाटपांडे

नरेश_'s picture

21 Feb 2009 - 2:42 pm | नरेश_

म्हणजे दंड भरून अनधि़कृत ' बांधकाम ' नियमित करण्यासारखे !

विनायक प्रभू's picture

21 Feb 2009 - 3:04 pm | विनायक प्रभू

अनिधिकृत बांधकाम पाडुन टाकायची सोय नव्हती का तेंव्हा?

लिखाळ's picture

21 Feb 2009 - 3:14 pm | लिखाळ

त्या काळी अश्या बिल्डींगी टोपलीत घालून नदीत सोडून देत...
आताश्या नद्यांना पाणी कुठे उरलंय ... त्यामुळे आता संस्कृती नदीततरी बुडणार नाही खास :)
-- लिखाळ.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Feb 2009 - 3:23 pm | प्रकाश घाटपांडे

आताश्या नद्यांना पाणी कुठे उरलंय ... त्यामुळे आता संस्कृती नदीततरी बुडणार नाही खा

नीट बांधकाम केल की पानी शोदायची येळ येनार नाई.
प्रकाश घाटपांडे

अवलिया's picture

20 Feb 2009 - 5:57 pm | अवलिया

उत्तम.

येवु द्या अजुन असेच विधायक आणि गंभीर.

--अवलिया

अभिज्ञ's picture

20 Feb 2009 - 6:08 pm | अभिज्ञ

"स्थळ व्यावहारिक दृष्टया नाकारायचे असेल तर पत्रिका जुळत नाही हे सांगणे उभयपक्षी सोयीस्कर असते. इथपासून विवाहात पत्रिका पुराण चालू होते."

१००% सहमत.

अभिज्ञ.

शिवापा's picture

20 Feb 2009 - 6:52 pm | शिवापा

लिव्ह इन हा प्रकार विवाहाच्या कोणत्या प्रकारात घालता येईल? काहितरी फर्मास सांगा.

लिव्ह इन म्हणजे मुळात विवाहच नसतो तर कोणत्या प्रकारात घालणार....

अगदीच तोडून मोडून घुसवायचेच म्हणाल तर 'गांधर्व विवाह' या प्रकारात येईन
कारण या प्रकारात विवाह विधींपेक्षा पुरुष आणि स्त्री यांच्या मनोमीलनाला जास्त महत्त्व आहे

(जुन्या काळाचा चाहता) सागर

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2009 - 7:03 pm | प्रकाश घाटपांडे

लिव्ह इन म्हणजे मुळात विवाहच नसतो तर कोणत्या प्रकारात घालणार....

याला समांतर म्हणजे विवाहित कि अविवाहित ही गोष्ट कुंडलीवरुन सांगता येत नाही. अविवाहित कि ब्रह्मचारी हा पुन्हा वेगळा विषय आहे. पुर्वी विवाहाला सरळ 'शरीरसंबंध योजिला' आहे असे म्हणत. या वाक्यप्रयोगाला समाजमान्यता होती.

प्रकाश घाटपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Feb 2009 - 8:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

यावरून असा प्रश्न पडला आहे, हल्ली सरकारदरबारी एक कागद सही केल्याशिवाय विवाह विधीवत होत नाही, तसं पूर्वी काय असायचं? स्त्री-पुरुष यांनी एकदा जाहीर केलं की आमचं लग्नं झालं आहे की पुरेसं होतं का, का आणखीही काही?

लग्नं ही आणखी एक औपचारीकता आहे यावर माझा अजूनतरी ठाम विश्वास आहे.

अदिती

लिखाळ's picture

20 Feb 2009 - 8:58 pm | लिखाळ

पंचायत साक्षीला असेल आणी त्यामुळे मान्यता मिळत असेल असा अंदाज.
-- लिखाळ.

लिखाळ's picture

20 Feb 2009 - 9:02 pm | लिखाळ

>लग्नं ही आणखी एक औपचारीकता आहे यावर माझा अजूनतरी ठाम विश्वास आहे.<
देवासमोर किंवा गीतेवर हात ठेऊन शपथ देणे/घेणे, लग्न सोहळा या सारख्या गोष्टी माणसाच्या मनावर त्या कृतीचे/संकल्पाचे गांभीर्य ठसवण्यासाठी असतात असे मला वाटते. मनातल्या मनात शपथ घेणे आणि देवासमोर बोट कापून शपथ घेणे या दोहोंत मनावर होणारा संस्कार/ठसा कमी-अधीक असावा. त्यामुळे औपचारिकता असली तरी आपण ते करणे मान्य करत असतो. असे मला वाटते.

-- लिखाळ.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Feb 2009 - 3:02 pm | प्रकाश घाटपांडे

स्त्री-पुरुष यांनी एकदा जाहीर केलं की आमचं लग्नं झालं आहे की पुरेसं होतं का, का आणखीही काही?

विवाह विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी एका संस्थेने परिसंवाद घेतला होता. त्यात एका वकिलाने सांगितलेला किस्सा.
गावातील लग्नासाठी कागदपत्रांचा पुरावा म्हणुन जर वकीला कडे गेले कि काही महाभाग त्या जोडप्याला कोर्टाच्या गेटपाशी नेउन मधे स्वतः काळ्या कोट मधे उभ राहुन नवरा बायकोला डावी-उजवीकडे उभे करुन फोटो काढतात. त्यात कोर्टाची इमारत, काळा कोट घातलेला वकील आन नवरा बायको. बास झाला पुरावा. काढा पैशे
आमाल अदुगर वाटायच कि रजिस्टर म्यारेज म्हंजे रजिस्टर पोस्टाने लग्नपत्रिका पाठवायची.
पळुन जाउन लग्न करणारे काही आळंदी पेशालिस्ट बी असत्यात.
(अधिकृत नोंदणीकृत विवाह केलेला)
प्रकाश घाटपांडे

संदीप चित्रे's picture

20 Feb 2009 - 7:02 pm | संदीप चित्रे

मिळतीय प्रकाशकाका...
पुढील लेखांची वाट बघतोय.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्राजु's picture

20 Feb 2009 - 7:21 pm | प्राजु

येऊद्या अजून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बहुगुणी's picture

20 Feb 2009 - 10:10 pm | बहुगुणी

धार्मिक आणि वैदिक पद्धती यांत (विधींना लागणारा वेळ सोडून) मुख्य फरक काय? कोणती आधिक धर्ममान्य, आणि का? (कोणती पद्धत सोयीची हा प्रश्न नाही.)

सुक्या's picture

20 Feb 2009 - 10:52 pm | सुक्या

प्रकाशसाहेब, अगदी सुंदर माहीती. विवाहाचे इतके प्रकार आहेत (होते) हे मला माहीतच नव्हतं. धन्यवाद.

एक प्रश्न : पुर्वीच्या ब्राम्हण वर्णापुरते मर्यादित असलेल्या विवाहाच्या व्यतिरीक्त एखाद्या ब्राम्हणाने आसूर, गांधर्व किंवा राक्षस विवाह केला तर पुर्वीच्या वर्णप्रथेनुसार त्याला मान्यता देण्यासाठी काही विधी प्रचलीत होते का? तसेच गांधर्व विवाहाला जरी मान्यता असली तरी या विवाहातुन जन्माला आलेल्या संततीला इतर विवाहातुन जन्मलेल्या संततीइतकेच अधिकार होते का? पुर्वी बहुभार्या पध्द्त मान्य असली तरी केवळ एकाच संततीला सारे अधिकार मिळाल्याचे ऐकुन आहे.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

अनिल हटेला's picture

21 Feb 2009 - 11:59 am | अनिल हटेला

अगदी मनातला प्रश्न विचारलात !!!

रावणाचे पिता ब्राम्हण असुन त्यानी एका राक्षसी शी (बहुधा) गंधर्व विवाह केलेला.

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

केदार's picture

21 Feb 2009 - 5:51 am | केदार

मस्त विषय आणि सहज मांडनी. येउद्या अजून :)

सहज's picture

21 Feb 2009 - 7:15 am | सहज

आणि ते कुत्रा का झाडा बरोबर लग्न लावून देणे, देवाबरोबर विवाह लावुन देणे, पाळीव प्राणी व बाहुली इ. यांच्या विवाहाला शास्त्राची मान्यता घेता येते का? कार्योत्तर मंजुरी ?? :-)

विवाह झाल्यावर हक्क न मिळाल्यास शास्रात काय उपाय सांगीतले आहेत, म्हणजे घटस्फोट, पोटगी इ इ बद्दल?

काही म्हणा काही लोकांची करीयर जबरी म्हणजे जबरीच असतात पोलीस, ज्योतिष, लेखक सगळीकडे पैसाच पैसा ;-)

विशाल कुलकर्णी's picture

21 Feb 2009 - 8:57 am | विशाल कुलकर्णी

च्यामारी, हे समदे परकार म्हायीत व्हते पर नावं न्हवती ब्वॉ म्हायीत. ठांकु बरका दादानु.
आन फुडचा भाग जरा बेगीनं युंद्याकी, लै वाट पगतुया आमी.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

विसोबा खेचर's picture

21 Feb 2009 - 11:09 am | विसोबा खेचर

६) गांधर्व विवाह : - सर्व वर्णांना हा प्रकार खुला आहे. इथे स्त्री पुरुषांची मने जुळली की बास आहे बाकी सबकुछ चलता है। सर्व गोष्टींना इथे कार्योत्तर मंजूरी घेण्याची सोय आहे.

साला हा प्रकार सर्वात मस्त! निजायला मोकळे तिच्यायला! :)

आपला,
(सोयीस्कर!) तात्या.

विनायक प्रभू's picture

21 Feb 2009 - 3:06 pm | विनायक प्रभू

पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.

वेताळ's picture

21 Feb 2009 - 4:11 pm | वेताळ

=))
तात्यांना निदान एकप्रकार आवडला तरी . बगु आता कधी बार उडवतात.
वेताळ