नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

सागर's picture
सागर in जनातलं, मनातलं
24 Dec 2007 - 7:31 pm

(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.)

मित्रांनो,
मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्य वाचा.लोकशाही कशी सरणावर जाते आणि हिटलरसारखे हुकुमशहा सत्तेवर कसे येतात याचा हा थरारक इतिहास आहे.मी काही हिटलरची भलावण नाही करत.पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.शिवाय आपल्याला जो दुस-या महायुद्धाचा जो इतिहास उपलब्ध आहे तो बराचसा जेत्यांनी लिहीलेला आहे.ही इतिहासाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती पहील्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या अत्याचारांची.कानिटकरांनी दुस-या महायुद्धाचा हा थरारक इतिहास लिहिताना याचे भान ठेवल्याचे जाणवते.

दुस-या महायुद्धाचे बीज पहील्या महायुद्धातच पेरले गेले होते.अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते.फारसा मोठा लष्करी पराभव न पत्करता जर्मनी पहिले महायुद्ध हरले होते.हे युद्ध प्रत्यक्ष जर्मनीच्या भूमीवर थोडेसेच लढले गेले होते.कैसर राजाच्या पलायनाने जर्मनीला पराभव पत्करावा लागला.जर्मन जनतेच्या हे लक्षातच येत नव्हते की आपण युद्ध जिंकत असताना कसे हारलो.

जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले.जर्मनीला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली.
हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा त्याच्यापुढे किती प्रश्न होते ते पहा
- ६० लाख लोकांची बेकारी
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत अगदी हास्यास्पद झाली होती
(जर्मनीचे चलन एवढे पडले होते की एक भाजीची जुडी घेण्यासाठी पोतेभर पैसे घेउन जावे)१ डॉलर= ७,००,००० जर्मन मार्क्स
अवघ्या तीन वर्षात त्याने या प्रश्नांचा निकालदेखील लावला आणि जर्मनीला स्वयंपूर्ण देखील केले
- पहिल्या महायुद्धाची भरपाई म्हणून दोस्त राष्ट्रांना अब्जावधी रुपयांची खंडणी द्यायची होती
- जर्मनीला एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य उभारायची परवानगी नव्हती
असे शेकडो प्रश्न त्याच्यापुढे उभे होते
हे सर्व प्रश्न त्याने ज्या पद्धतीने सोडवले, ते पाहता माणूस आश्चर्यचकीतच होतो कधी नमते, तर कधी धमकी तर कधी शांततेची तान.या सर्वांच्या जोरावर हिटलरने जगातील महाशक्ती समजल्या जाणा-या बड्या नेत्यांना असे झुलवले की त्याच्या मुत्सद्देगिरीची दाद त्याचे शत्रूदेखील देतात. जगाच्या रंगमंचावरचा हा अक्षरश: एकपात्री प्रयोग होता.

हिटलर १९३३ साली सत्तेवर आला तेव्हा त्याला बहुमत नव्हतेच। तरी तो सत्तेवर आला.सत्तेवर येताच त्याने तीन वर्षात जर्मनीला एवढे बलशाली केले की जर्मनीत त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.फक्त ३८% मते असताना तीन वर्षानंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते, यावरुन हे लक्षात यावे
- बेरोजगारी नावालाही शिल्लक उरली नाही
- जर्मनीचे चलन आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरावले
- व्हर्सायच्या तहाच्या चिंध्या केल्या व जाहीरपणे सांगितले की जर्मनी ही नुकसानभरपाई देण्यास बांधील नाही
- जर्मनीच्या सैन्याची आरमार विभागासकट पुनर्रचना केली
- युवकांना बलशाली करण्यावर कठोर मेहनत घेतली
(जेव्हा १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा शत्रूसैन्यापुढे जर्मन सैनिक एवढे बलशाली आणि ताकदवान दिसायचे की दोस्त राष्ट्राचे सैन्य जर्मनीला प्रतिकार करण्याच्या योग्यतेचे नव्हते आणि हिटलरला सहज चिरडू या भ्रमात राहण्यापेक्षा दोस्त राष्ट्रांनी सैन्य बांधणीस प्राधान्य द्यावयास होते असे हे बरेच इतिहासकार मान्य करतात)

हिटलरने रक्ताचा एक थेंबही न सांडता ३ भूभाग जर्मनीला जोडले.हे त्याच्या राजकीय ज्ञानाचे आणि आपल्या शत्रूंचे पाणी जोखण्याचे उत्तम उदाहरण आहे.दुसरे म्हणजे हिटलरची विलक्षण मानसिक शक्ती.त्याचे आडाखे इतके अचूक असत की त्याच्या पुढे त्याच्या सेनानींचा विरोध पूर्णपणे थंडावला.युरोपात जबरदस्त चढाई करुन १०-१५ दिवसांत एकेक देश जिंकून हिटलरने आपल्या शत्रूला जबरदस्त धडकी भरवली होती.हिटलरने रशियावर केलेली हिवाळ्यातील स्वारी त्याला खूप घातक ठरली.इतिहासकार हे खुल्या दिलाने मान्य करतात की हिटलरने रशियावर स्वारी केली नसती तर आज आपल्याला दुस-या महायुद्धाचा इतिहास वेगळाच दिसला असता.
तर मित्रांनो, दुसर्‍या महायुद्धाचा हा अत्भुत इतिहास तुम्ही सर्वांनी अवश्य वाचा...
तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल.

धन्यवाद
(दुसर्‍या महायुद्धाच्या नाट्यपूर्ण घटनांनी स्तिमित झालेला) सागर

इतिहासराजकारणलेखमतशिफारसमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

24 Dec 2007 - 7:49 pm | ऋषिकेश

हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि.
केवळ हिटलरच नाही पण अकबर, टिपू सुलतान अश्या अनेक करंट्या प्रमुखांची भलामण मलातरी अस्वस्थ करून जाते.

-ऋषिकेश

क्लिंटन's picture

25 Dec 2007 - 9:53 am | क्लिंटन

>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा >>एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि.

१००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्‍हाईनलँड वर ताबा मिळवला. र्‍हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्‍हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही.

हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले.

हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल.

माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे--

१) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली.
२) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा
३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग
४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का?

इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्‍या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो?

आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का?

भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार?

हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का?

कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे.

अवांतर-- वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्याकडे दुसर्‍या महायुध्दावरील चांगल्या माहितीपटांचा संग्रह आहे.मी अमेरिका सोडून लवकरच भारतात (बहुदा मुंबई/ ठाणे किंवा पुणे) स्थायिक होणार आहे.कोणाला जर ते माहितीपट कॉपी करून हवे असतील तर माझाशी व्य.नि वर संपर्क साधावा.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

क्लिंटन साहेब,

एवढ्या सविस्तर आणि विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.
की तुम्ही जे मुद्दे स्पष्ट केले आहेत, ते अगदी सर्वस्वी खरे आहेत.
हिटलरने छळ छावण्यांतून आणि यातनातळांतून जे प्रयोग केले ते अमानुष या शब्दाचा अपमान करतील इतके क्रूर होते.
जसे लोकांना सोलून काढणे. जिवंत धातूंच्या पेट्यांतून तापवणे, हजारोंना एकाच वेळी गॅस चेंबर्समधून विषारी गॅसने मारणे.
स्त्रियांवरच्या अत्याचारांविषयी तर माझी लेखणीच पुढे सरत नाही इतके अनन्वित अत्याचार झालेले होते.
दुसर्‍या महायुद्धावर मी बरेच वाचन केले आहे माहितीपट देखील पाहिले आहेत. हिटलरच्या अत्याचारांतून जगाची सुटका करण्याचे मोठे कार्य दोस्त राष्ट्रांनी केले यात काही संशय नाही. अन्यथा आज जगाचा नकाशा वेगळा असता आणि आपण इंग्रजी ऐवजी जर्मन भाषा शिकत असतो.

येथे मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की लेखाच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केले आहे की मला काही हिटलरची भलावण करायची नाहिये. कारण हिटलर हा क्रूरकर्मा आणि वि़कृत मनोवृत्तीचा हुकुमशहा होता हे माझेही मत आहे. या लेखात जे कानिटकरांनी पुस्तकात सांगितले तेच फक्त मी पुस्तक परिक्षण म्हणून लिहिले आहे. मी देखील लोकशाहीचा आणि जगातील सर्वांना जगण्याचा हक्क आहे या भूमिकेचा कट्टर समर्थक आहे.तेव्हा माझ्यावर कोणी रोष धरु नये ही नम्र विनंती.

धन्यवाद,
सागर

अन्या दातार's picture

29 Jan 2008 - 1:56 pm | अन्या दातार

हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ >>उरत नाहि.

क्लिंटन्साहेब, या वाक्याशी मी असहमत आहे. त्याच्या अनेक कृतिंमध्ये राष्ट्रभक्ती अगदी ठासून भरलेली दिसते. उदा. ६०००० बेकार तरुणांच्या फौजेला काम मिळवून देणे, सैन्य बलशाली करणे इ.इ.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Dec 2007 - 12:19 am | बिपिन कार्यकर्ते

मला असे वाटते, भलामण वाईटच, पण कानिटकरांचे पुस्तक ही खरोखरच भलामण आहे का? मी हे पुस्तक प्रथम वाचले त्याला आता बहुतेक २२-२३ वर्षे झाली असावित. त्या नंन्तर काही वर्षे बरीच पारयणे झाली, मित्रांबरोबर चर्चा झाली. हिटलरची जी वाईट बाजू आहे ती सुद्धा दाखवली आहे. आणि हे विसरता कामा नये की इतिहास हा नेहमी 'जेते' लिहितात. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना काय घ्यायचे आणि काय विसरायचे ते आपण ठरवायचे.

"हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि."

हे मात्र खरेच.

बिपिन.

सुधीर कांदळकर's picture

25 Dec 2007 - 8:12 pm | सुधीर कांदळकर

हे पुस्तक मी दीड्दोन वर्षांपुर्वी पुन्हा वाचले. वि ग नी या पुस्तकांत कोठेहि कसलेहि भाष्य केलेले नाही. मते ही सर्व वाचकांचीच आहेत. हिटलर हा थोर मुत्सद्दी होता असे ते म्हणत नाहीत. नशिबाने त्याची साथ दिली हे दाखवतांना ते शुशनिग, पेताँ, चेंबर्लेन वगैरे त्याचे विरोधक नेते कसे बावळट होते ते ते दाखवतात. हिटलरच्या त्याला जगातील सर्वश्रेष्ठ शेतीतद्नापैकी एक मिळाला, सतत तीन वर्षे हवामान शेतीला अनुकूल राहिले व विक्रमी पिके येऊन अन्नटन्चाई दूर झाली हे लिहितात. स्टालीनने दूरदृष्टीने कारखाने पूर्वेस हलविले हे संगतात तसेच त्याने ५ टक्के लोकसंख्येचा विध्वंस केला हे सांगतात. फक्त चर्चिलने माइन काम्फ वाचून हिटलरचा अभ्यास केला होता हे सांगतात तसे त्यानेच पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा पाया रोवला हेहि सांगतात.

पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे.

सागर's picture

26 Dec 2007 - 1:07 pm | सागर

बिपीन आणि सुधीरराव ,

पुन्हा एकदा सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन पुन्हा जरूर हे पुस्तक वाचावे.

या मताशी मात्र पूर्ण सहमत. अतिशय वाचनीय पुस्तक आहे हे यात संशय नाही.
- सागर

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Dec 2007 - 10:06 am | डॉ.प्रसाद दाढे

हिटलर हा एक क्रूरकर्मा होता यात काही दुमत असण्याचे कारण नाही, तथापि, त्याने इन्ग्रजान्चे दुसरया महायुद्धात पेकाट मोडले नसते तर भारताचे स्वातन्त्र्य आणखी काही वर्षे दूर गेले असते हे निश्चीत! दुसरे महायुद्ध ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. भारत अगदी पहिल्या दिवसापासून त्यामध्ये गुन्तला होता, हजारो भारतीय तरूण युरोप,आफ्रीका आणि बर्मा येथील लढायान्मधे धारातीर्थी पडले आहेत. जगातील कुठलेही लष्कर युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बळकट होत नाही, सक्षम होत नाही. अनुभवी ब्रिटीश सेनापतीन्च्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्यदळे दुसर्‍या महायुद्धात लढली म्हणूनच स्वातन्त्र्य मिळाल्यावर देशरक्षणासाठी आवश्यक असे उत्तम सैन्य भारताला उपलब्ध झाले.
दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत. अर्थात हा एक वेगळाच विषय आहे.
नाझी भस्मासुराचा उदयास्त हे एक उत्तम पुस्तक आहे परन्तु दुसरी बाजू समजून घेण्यासाठी त्याच लेखकाचे 'विन्स्टन चर्चिल' हे पुस्तक सुद्धा हौशी अभ्यासकानी वाचावे.
सुदैवाने वि.ग.कानिटकर माझे वैयक्तीक स्नेही आहेत आणि त्रेशष्ट साली लिहीलेल्या त्यान्च्या पुस्तकाबद्दल अजुनही तेवढेच औत्सुक्य आणि प्रतिसाद आहे हे मी त्याना सान्गितल्यावर त्याना निश्चित आनन्द होईल.

डॉक्टरसाहेब,

वि.ग. कानिटकर हे तुमचे स्नेही आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांना कृपया सांगाल का ?
इतके सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मी आत्त्तापर्यंत या पुस्तकाची किमान ८-१० पारायणे केली असतील तरी प्रत्येक वाचनाच्या वेळी हा इतिहास तितकाच चित्तथरारक वाटतो यात संशय नाही. माझी खात्री आहे की कित्येक शतके नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले, अभ्यासले जाईल.

तुमचा प्रतिसाद पाहून खूप खूप आनंद झाला. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल हे पुस्तक अजून मी अभ्यासले नाही. पुढच्या वेळी पुण्याला जाईन तेव्हा नक्की हे पुस्तक घेईन.

दुसर्‍या महायुद्धाच्या जगाला सुद्धा पुष्कळ देणग्या आहेत. रॉकेट्, रडार, पेनिसिलीन असे कैक बहोपयोगी शोध त्या दरम्यान लागले आहेत.

हे मात्र १०० % खरे, कारण दुसर्‍या महायुद्धानंतरच अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांना आपण जगातील महासत्ता होऊ शकू याचा अंदाज आला होता, त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांच्या प्रगतीच्या स्पर्धेतून कित्येक नवीन शोध बाहेर आले. आणि विशेषतः १९६० नंतरचा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग गेल्या शेकडो शतकांच्या तुलनेत आश्चर्यचकीत करणारा असाच आहे.

मनःपूर्वक धन्यवाद
- सागर

विसोबा खेचर's picture

28 Dec 2007 - 12:18 pm | विसोबा खेचर

सागरशेठ, परिक्षणाकरता धन्यवाद! मी ते पुस्तक जरूर वाचेन..

तात्या.

तात्या,
मला सागरच म्हणा...शेठ म्हणजे फार मोठं वगैरे वाटतं
मी तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे फक्त ३१ वर्षाचा.
तेव्हा मला सागरच राहू द्या... कसे?

तात्या, तुम्ही व्यासंगी आहात, तेव्हा हे पुस्तक नक्की आवडेन तुम्हाला.

(तात्यांचा प्रतिसाद पाहून सुखावलेला) सागर

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Dec 2007 - 2:31 pm | डॉ.प्रसाद दाढे

जरूर सा॑गेन..मीही ते पुस्तक खूप वेळा वाचले आहे..आणि त्या पुस्तकाची सुधारीत आवृत्ती काढण्याचा प्रयत्न मी व कानिटकर साहेब करीत आहोत. तुम्हाला दुसर्‍या महायुद्धाची खरीच रूची असेल तर खालील पुस्तके जरूर वाचा
-Rise & Fall Of Third Reich-William Shirer
-Trail of Fox: Biography of Rommel
-Panzer Leader: Autobiography of Guderian
-Defeat into victory: Autobiography of Slim
-Encyclopedia of Third Reich

डॉक्टरसाहेब,

तुम्ही सुचविलेल्या पुस्तकांबद्दल आभारी आहे

तुमचा आणि कानिटकरसाहेबांचा स्नेह पाहता मला एक विनंती कराविशी वाटते...
पहा शक्य झाले तर

Rise & Fall Of Third Reich-हे शिरर ने लिहिलेले पुस्तक दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचे आहे.
शिरर हा हिटलरच्या उदयास्ताचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. तेव्हा त्याचे पुस्तक हे दुसर्‍या महायुद्धाच्या बाबतीत इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त विश्वसनीय ठरते. हा १००० पानांचा अद्वितीय ग्रंथ मराठीत उपलब्ध असावा असे खूप खूप वाटते.
ही केवळ माझीच नाही तर माझ्या अनेक मित्रांनी देखील बोलून दाखवलेली इच्छा (खरे तर खंत) आहे.
एवढे सुंदर पुस्तक मराठीतून उपलब्ध नाही हे कायम मनाला खटकत राहते.
जर तुम्हाला आणि कानिटकर साहेबांना शक्य असेल तर या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. तर माझी खात्री आहे की लाखो वाचकांच्या या पुस्तकावर उड्या पडतील... मला तर आत्ताच या पुस्तकाचे मराठी नाव दिसत आहे....तिसर्‍या राईशचा उदयास्त किंवा हिटलरच्या साम्राज्याचा उदयास्त

तेव्हा समस्त मराठी वाचकांतर्फे माझी तुम्हाला आणि कानिटकरसाहेबांना विनंती आहे की या अद्वितीय ग्रंथाचे मराठीत भाषांतर तुम्ही करु शकला तर मराठी भाषेची खूप मोठी सेवा होईल. किंवा दुसर्‍या कोणाही व्यक्तीस तुम्ही हे काम सोपवले तरी चालेल. पण कानिटकरांच्या समृद्ध लेखणीचा अनुभव असल्याने हे काम तुम्ही दोघांनी करावे असे मनापासून वाटते...

तुम्ही हवे तर तुमच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना विचारुन पहा. आणि पहा कसा प्रतिसाद मिळतो ते...

माझ्याकडे हे पुस्तक डिजिटल स्वरुपात आहे. ते तुम्ही येथून डाऊनलोड करु शकाल http://www.esnips.com/web/EnglishPDF
(हे पुस्तक उतरवून घेण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि नोंदणी ही मोफत असल्याने चिंता नको.)

धन्यवाद
सागर

सुधीर कांदळकर's picture

30 Dec 2007 - 9:09 pm | सुधीर कांदळकर

आता राईझ & फॉल वाचावेच लागणार. मजा येईल. धन्यवाद.

सुधीरकाका ,

राईझ & फॉल वाचताना नक्कीच मजा येईल.
कारण शिरर ने त्यात तपशीलवार त्या काळचे वर्णन केले आहे. आणि तो स्वतः चिकित्सक आणि अभ्यासू असल्याने परिस्थिती हिटलरला कशी अनुकूल होत गेली आणि त्याने युद्धाचे नियंत्रण कसे स्वतःकडे ठेवले याचे सुंदर वर्णन आहे. मी ही सध्या हे पुस्तक वाचत आहे. तेव्हा एक वेगळा आनंद मिळेल हे नक्की... पण मराठीत हे पुस्तक जसे च्या तसे आले तर मोठी बहार होईल.

धन्यवाद
सागर

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Dec 2007 - 9:42 pm | डॉ.प्रसाद दाढे

तुमची सूचना चा॑गली आहे. दुसरे महायुद्ध ह्या विषयावर इ॑ग्रजीमधे खूप साहित्य उपलब्ध आहे ज्याचे अजुन मराठी भाषा॑तर झाले नाही. वानगी दाखल पाहावयाचे झाले तर चर्चिलने लिहीलेले सात ख॑ड! ते अभ्यासल्याशिवाय पुढेच जाता येत नाही.
मी ते पुस्तक वाचल्यावर माझ्या मनात काही प्रश्न उभे राहीले. जसे की हिटलरच्या अनेक सेनापती॑पैकी आज मितीला किती जिव॑त आहेत कि॑वा युद्धान॑तर त्या॑चे काय झाले. ह्या स॑दर्भात मी पुष्कळ धा॑डोळा घेतला व याच विषयी एक परिशिष्ट 'नाझी' ला जोडावे असा आमचा प्रयत्न आहे. तसेच माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाविषयी पुष्कळ दुर्मिळ फोटो आहेत तेही जोडण्याचा विचार आहे. कदाचित जो मला सेनापती॑बद्दल प्रश्न पडला तोच इतरही जिज्ञासू वाचका॑ना पडला असू शकतो, त्या॑चेही श॑कासमाधान होईल. न्यूरे॑बर्ग खटल्यावर एक स्वत॑त्र व विस्तृत प्रकरण लिहीण्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आणि रसिका॑चे आशिर्वाद असतील तर हे काम होईल.
आणखी एकच विन॑ती तुम्हाला करतो..आपल्या दोघा॑च्या वयात फारसा फरक नाही, मी केवळ २८ (अठ्ठाविस) वर्षा॑चाच आहे व व्यवसायाने जबड्याचा सर्जन आहे (स्पेशालीस्ट डे॑टीस्ट्).तेव्हा मला 'अरे प्रसाद' असे एकेरीत स॑बोधले तर मला आवडेल.

सागर's picture

3 Jan 2008 - 4:05 pm | सागर

'अरे प्रसाद'
मलाही आनंद वाटला की तुझ्यासारखा तरुण डॉक्टर इतिहासात रस घेत आहे.
कानिटकरसाहेबांचा तुझे स्नेही म्हणून तू उल्लेख केला होतास त्यामुळे मला वाटले की तू त्यांच्याइतकाच ज्येष्ठ असशील.

हरकत नाही. तुझ्यासारख्या तरुण इतिहाससंशोधकाशी मैत्री झाल्याचा मला तरी खूप आनंद आहे.

दुसरे असे की न्युरेंबर्ग वर एका प्रकरणाने भागेल असे वाटत नाही. कारण खूप लोकांच्या साक्षी झाल्या.
त्या सर्वांचा उहापोह होणे गरजेचे आहे. एखादे छोटेसे पुस्तक त्यावर होऊ शकेल असे मला वाटते...

बाकी प्रसाद दाढे हे तुझ्या व्यवसायास अनुरुप असलेल्या नावाचा योगायोग पाहून मन दिलखुश झाले.
तुझे पेशंट आनंदाने म्हणत असतील दाढेंकडे दाढ काढायला चाललो आहे. :)
विलक्षण योगायोग दुसरे काय? (की आडनावावरुन आधीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते? )

धन्यवाद
- सागर

प्रमोद देव's picture

29 Dec 2007 - 10:06 pm | प्रमोद देव

प्रसाद दाढे! वा! म्हणजे तुझ्या नावातच तुझा व्यवसाय लपलाय! :-)
झकास!
हे म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरचे नाव "प्रकाश डोळे" असावे तसे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Dec 2007 - 9:11 am | डॉ.प्रसाद दाढे

माझ्या नावावरील हा श्लेष मी खूप वेळा ऐकला आहे..पण खरोखरच नाव आणि व्यवसाय एकच असण॑ हा विलक्षण योगायोग आहे. मला एक 'कान्-नाक्-घसा' तज्ञ माहित आहेत त्या॑चे नाव आहे डॉ. वाचासु॑दर!!

केशवराव's picture

28 Jan 2008 - 5:34 pm | केशवराव

मला एक अस्थी रोग तज्ञ माहित आहेत , त्यांचे नाव डॉ . मोडखरकर आहे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Jan 2008 - 10:49 am | डॉ.प्रसाद दाढे

मी परवाच वि.ग.कानिटकरा॑शी चर्चा केली. 'नाझी भस्मासुराचा उदयास्तची' विसावी आवृत्ती येत आहे. आणखीनही येत राहतील. मात्र थोडा-बहुत फरक सोडला तर ही सर्व पुनर्मुद्रणे आहेत. खुद्द लेखका॑चीसुद्धा इच्छा आहे की काही नवा मजकूर समाविष्ट करावा. तरी माझी सर्व वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी यास॑दर्भात आपल्या सूचना मला सा॑गाव्यात. हे पुस्तक पुष्कळ लोका॑नी वाचले आहे, अनेका॑नी पारायणे केली आहेत .तेव्हा तुम्हाला जाणवलेल्या त्रुटी, उणीवा कि॑वा एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण अथवा विशिष्ट छायाचित्र उदाहरणार्थ माझ्या मते दुसर्‍या महायुद्धाशी स॑बधित सर्व ठळक व्यक्ती॑ची स्पष्ट छायाचित्रे देणे आवश्यक आहे. स्कोर्झेनी, ह्यॉस (होएस), बोरमन, काउ॑ट कियानो (सियानो), हायड्रिच, रोझेनबर्ग, पाऊलुस (पोलस), स्टाउफेनबर्ग (स्टुफेनबर्ग), काउ॑ट बर्नाडोट इ. म॑डळी॑ची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे दिली पाहिजेत.
तरी वाचका॑नी आपले मत,सूचना मा॑डाव्या. मी त्या जरूर लेखका॑कडे व प्रकाशका॑कडे पोहोचवीन. (योगायोगाने माझा माजगा॑वकरसाहेबा॑शीसुद्धा चा॑गला परिचय आहे, ते माझे पेश॑ट आहेत) आणि आपल्या सर्वा॑च्या आवडत्या पुस्तकाची अधिक चा॑गली आवृत्ती उपलब्ध होईल.

नाझी भस्मासुराच्या बाबतीत मला खटकलेली एक गोष्ट सांगतो...

पुस्तकाच्या शेवटी कानिटकर साहेबांनी हिटलरच्या माईन काम्फ चा थोडासा अनुवाद अतिशय सुंदर शब्दांत केला आहे.
खरे तर थोड्याशा प्रकरणांपेक्षा, माईन काम्फचा संक्षिप्त अनुवाद देता आला तर खूप छान होईल. कारण हिटलरची माईन काम्फच्या वेळची मनःस्थिती काय होती , त्याचे त्यावेळचे आडाखे काय होते आणि ते पुढे त्याने कसे प्रत्यक्षात आणले याच्या चिंतनासाठी या संक्षिप्त अनुवादाचा उपयोग वाचकांस होऊ शकेल असे मला वाटते...
खरे तर माईन काम्फ चा संपूर्ण अनुवाद मराठीत उपलब्ध व्हावा असे मला वाटते. पण हिटलरविषयी असल्याने त्याच्या प्रकाशनास अडचणी येऊ शकतील.. कोण कशावरुन वादळ उठवेल हे काही सांगता यायचे नाही.
असो...

सागर

पुष्कर's picture

16 Jan 2008 - 8:26 am | पुष्कर

भेटून आनंद झाला. अहो मी दादांचा शेजारी (आम्ही वि.गं ना दादा म्हणतो). औदुंबर अपार्ट्मेंट- दुसरा मजला! अहो तुम्ही तिथे कधी येऊन गेलात? पुन्हा आलात तर समोरच्या घरीही चक्कर मारा. तुमचा प्रतिसाद वाचून मीही दादांशी ह्या विषयावर बोललो. त्यांनी मला तुमच्याविषयी सांगितलं.

पुन्हा याल तेव्हा अवश्य भेटू.

-
पुष्कर

भडकमकर मास्तर's picture

16 Jan 2008 - 2:16 am | भडकमकर मास्तर

अत्यंत सुंदर चर्चा....डा`क्टर दाढे यांनी येऊन अजून मजा आणली...
आणि सागर, राईज आणि फोल लिन्क बद्दल धन्यवाद...

अरविन्दनरहरजोशी's picture

17 Jan 2008 - 4:58 pm | अरविन्दनरहरजोशी

अरविन्द
हिटलर अतिउत्तम सेनानी व मुत्सद्दी होता हे नक्कीच. आजचा इतिहास जेत्या लोकानी लिहिला आहे.
हिट्लर पेक्षा जास्त माणसे अमेरिकेने अणु-बॉम्बने मारले आहेत .पराभूता बद्दल कोणीहि चान्गले बोलत नाही.
जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते. असो चर्चा अतिशय मार्मिक झाली आहे.

ऋषिकेश's picture

17 Jan 2008 - 8:35 pm | ऋषिकेश

>> जगातील अतिहुशार व मोजक्या मुत्सद्द्यामधे त्याची गणना होते
कबुल पण चांगल्या व्यक्तींमधे नाहि!! हुशारी आणि मुत्सदीपणा काय हो ओसामाकडे पण आहे!

डॉ.प्रसाद दाढे's picture

17 Jan 2008 - 7:49 pm | डॉ.प्रसाद दाढे

पुढच्या वेळी मी दादा॑कडे येईन ते॑व्हा नक्की तुम्हाला भेटीन.
तूर्तास माझ्याकडील छायाचित्रे मी माजगा॑वकरा॑कडे देणार आहे. माझ्याकडे दुसर्‍या महायुद्धाशी स॑दर्भ असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती॑ची छायाचित्रे व व्यक्तीचित्रे आहेत. माझी रसिक वाचका॑ना विन॑ती आहे की त्या॑नी मला अशा व्यक्ति सुचवाव्यात ज्या॑ची छायाचित्रे आजवरच्या आवृत्तीमध्ये अस्पष्ट आहेत कि॑वा अजिबात नाहीत. मी ते फोटो जरूर पुरवेन.
जास्तीची माहिती समविष्ट करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीत आहे पर॑तु त्यास थोडा वेळ लागेल कारण माझा व्यवसाय व नोकरी.

भडकमकर मास्तर's picture

18 Jan 2008 - 10:31 am | भडकमकर मास्तर

आगे बढो..डाक्टर्साहेब.... :)