करोना व्हायरस - अंताची सुरवात?

नेत्रेश's picture
नेत्रेश in जनातलं, मनातलं
13 Jul 2020 - 7:07 am

२०व्या शतकाच्या उत्तरार्धात जग खुप जवळ आले. परदेश प्रवास नित्याची बाब झाली. वेगवेगळ्या देशातील लोक दुसर्‍या देशात सहजपणे स्थायीक होउ लागले. मेल्टिंग पॉट चा कॉन्सेप्ट काही शहरापुरता मर्यादीत न रहाता जगभर पसरला. अत्यंत जोमाने आर्थिक भरभराट होउ लागली. २१व्या शतकाच्या सुरवातीला नवनवीन गॅजेट्स स्वस्तात उपलब्ध झाली. व्हॉट्सअ‍ॅपने STD / ISD कॉल्स ईतिहासजमा केले. पण त्याचबरोबर नैसर्गीक साधनसंपत्ती प्रचंड महागली. अवघ्या काही वर्षांतच सोने, जमीन ईत्यादी १० तो १५ पट महागले. लोकांचे आयुष्यमान खुप वाढले. पुढारलेल्या देशात लोक सहजपणे ९० - १०० वर्षे जगु लागली.

पण जोमाने वाढणारी लोकसंख्या, जास्त हुशार, व जास्त महत्वाकांक्षा असणारी नवी पिढी, आणी माणसाची नैसर्गीक हाव, याचा ताण सर्वत्र दीसु लागला. हा सगळा Zero-sum game आहे हे समजल्यावर प्रस्थापित नव्यांना, व स्थानिक बाहेरच्यांना विरोध करु लागले. जर वाढ होत नसेल तर तुमचि अधोगती होत आहे हा दृष्टीकोन बळाउ लागला. आपले राखुन दुसर्‍याचे कसे मिळवावे, प्रसंगी दुसर्‍याला भल्या बुर्‍या मार्गाने नेस्तनाबुत कसे करावे याचे धडे कॉर्पोरेट स्कुल्स मधे मीळु लागले. मोठे मासे जास्त वेगाने लहानांना गीळू लागले. लोकांच्या जीवनातले स्थैर्य संपले. या सगळ्याचा परिपाक म्हणुन अती उजव्या विचारसरणीचा प्रसार जास्त जोमाने होउ लागला.

त्यातच करोनासारखा अत्यंत वेगाने पसरणारा व्हायरस आला. जरी हे कधीतरी होणार याची जाणीव सुप्तपणे बहुतांश देशांना होती, त्याला तोंड द्यायची तयारी कुणाकडेच नव्हती. जो तो आपापल्या समजुतीनुसार व आकलनानुसार प्रतिकार करायचा प्रयत्न करत होता. वरीष्ठवर्ग करोनाला सहज बळी पडु लागला. तुलनेने निरोगी आयुष्य जगणारा तरुण व मध्यमवयीन वर्ग सुद्धा यातुन सुटला नाही. आता प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे होते - अलिप्त राहुन, दुसर्‍याच्या जवळ न जाता व्यवहार करायचे होते. जगाची व्यवहार करण्याची रीत बदलु लागली. नेहमीच अटळ असणारे परीवर्तन जास्त वेगाने होउ लागले. बहुसंख्यांनी जुळउन घ्यायचा यशस्वि प्रयत्न केला, पण कित्येकांच्या कौशल्याची आणी सेवेची गरज उरली नाही. काही जॉब्सची गरज उरली नाही, तर काही नवीन तयार झाले. केवळ काही महीन्यांतच बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली. आता बहुतेक पुढारलेल्या देशांतसुद्धा तीथली सरकारे उजवीकडे झुकणारे निर्णय घेउ लागली. पद्धतशीरपणे बाहेरच्यांना घालउन लावणे, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे त्यांचासाठी गरजेचे बनले. मिल्टींगपॉट्स आता सॅग्रीगेशनपॉट्स(अलगतावादी) होउ लागली.

पुढे काय? करोना सारखे आणेखी नवे नवे व्हायरस नक्कीच येउ शकतात. ते मानव निर्मीत असतील कींवा नसतील ही. तेव्हा लोकांनी आपापल्या देशात / राज्यात / शहरात / घरात परतावे, व तिथेच रहावे? एकमेकांच्या संपर्कात येण्याचे टाळावे? कधी पर्यंत? आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या जगाचा अंत जवळ आला आहे?

करोना नंतर आपले जग बदलणार हे निश्चित. त्या स्थित्यंतराचे आपण केवळ साक्षिदार नसुन, त्या नविन जगाला आकार देण्याचे काम कळत नकळत आपल्या सर्वांकडुन होत आहे. काही वर्षांनी कसे असेल नवीन जग? पहील्या सारखेच? की संपुर्ण वेगळे? ईंटरनेटवरुन शिकणारी नवी पीढी, एकमेकांत फारसे प्रत्यक्ष न मिसळतासुद्धा नवीन एकसंध समाज निर्माण करु शकेल? कसा असेल आपला समाज २५ - ५० वर्षांनंतर?

................................................................................

१. मी फारसे कधी लिहीत नाही, तेव्हा लेखातील चुकांसाठी क्षमस्व.
२. करोनाचे समाजावरील दुरगामी परीणाम हळुहळु दीसायला लागले आहेत. आजकाल एकटे रहाणार्‍या लोकांची संख्या प्रचंड आहे. बरेच एकटे असराणारे या लांबलेल्या लोक सोशल आयसोलेशनमुळे मनाचे संतुलन सहजपणे घालउ लागले आहेत. त्याचा परीणाम त्यांच्या कामावर दीसु लागला आहे. आणी याचा साक्षिदार म्हणुन मनात आलेले विचार ईथे मांडले आहेत.

समाजजीवनमानराहणीप्रकटनविचारलेखमत

प्रतिक्रिया

आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या जगाचा अंत जवळ आला आहे?

एवढा टोकाचा विचार करण्याची गरज नाही. अनेक भयानक संसर्गजन्य रोगांच्या साथी ह्यापूर्वीही येऊन गेल्या आहेत. जगाचा अंत तेव्हाही झाला नव्हता आणि आताही होणार नाही.

जगाच्या अंताची काळजी करण्यापेक्षा, आत्ता आपल्या हातात काय आहे करण्यासारखे, वर्तमानात आणि वैयक्तिकरित्या, ह्यावर शक्ती खर्च सार्थ आहे!

- (जगाच्या अंताची काळजी न करणारा) सोकाजी

आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या
हे ठळक असले पाहिजे.. जगबुडी तर होत नाही, पण जगात काही मूलगामी बदल तर नक्कीच होऊ शकतात..

ही सुरुवात आहे, याचे पडसाद बरीच वर्षे उमटतील,जसे महायुद्धांचे उमटले होते अगदी तस्सेच!. कही नवी समीकरणे जुळतील, काही मर्यादित युद्धे देखील होतील. कदाचित एखादे जैविक युद्ध देखील..

तसे खरेतर करोना हे एक जागतिक युद्धच आहे, पण वेगळ्या स्तरावर जाणारे. अजुन खरी संहारक अस्त्रे बाहेर आलेली नाहीत.

नेत्रेश's picture

13 Jul 2020 - 12:58 pm | नेत्रेश

"जगात काही मूलगामी बदल तर नक्कीच होऊ शकतात" - अगदी बरोब्रर.

९/११ च्या हल्यानंतर विमानप्रवासात झालेला प्रचंड बदल आता सर्वांनीच स्विकारला आहे. करोना नंतरही काही बदल कायमसाठी होउ शकतात.

king_of_net's picture

13 Jul 2020 - 10:52 am | king_of_net

+१

नेत्रेश's picture

13 Jul 2020 - 12:54 pm | नेत्रेश

"आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या जगाचा अंत जवळ आला आहे?" हे विधान म्हणजे 'आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेले free world (एक प्रकारचा अनिर्बंधपणा) संपुन नवी, जास्त काटेकोर निर्बंध असलेली व्यवस्था कायमसाठी स्विकारण्याची वेळ आली आहे?' अशा अर्थाने केले आहे.

चौथा कोनाडा's picture

13 Jul 2020 - 1:44 pm | चौथा कोनाडा


करोना नंतर आपले जग बदलणार हे निश्चित.


करोना व्हायरस ही नक्कीच अंताची सुरवात नाही हे स्पष्टच होतेय !

करोना नंतर आपले जग बदलणार हे निश्चित. त्या स्थित्यंतराचे आपण केवळ साक्षिदार नसुन, त्या नविन जगाला आकार देण्याचे काम कळत नकळत आपल्या सर्वांकडुन होत आहे. काही वर्षांनी कसे असेल नवीन जग? पहील्या सारखेच? की संपुर्ण वेगळे? ईंटरनेटवरुन शिकणारी नवी पीढी, एकमेकांत फारसे प्रत्यक्ष न मिसळतासुद्धा नवीन एकसंध समाज निर्माण करु शकेल? कसा असेल आपला समाज २५ - ५० वर्षांनंतर?

प्रत्येक क्षणाला जग बदलत असते, आपण नुसते साक्षिदार न राहता, जगाला आकार देण्याचे काम आपापल्या वकुबानुसार करतच असतो !
लेखातले बरेच मुद्दे गंडलेले वाटताहेत !