तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
18 Nov 2008 - 1:13 am

पासपोर्ट, व्हिसा दाखवून आता अगदी विमानतळाच्या आतल्या कक्षात शिरणार तो मायभूत खाल्लेल्या शेवटच्या जाफरानी १२० पानाची पिचकारी विमानतळावरच्याच त्या छान छान नी सुंदर सुंदर फ्लोअरवर पऽऽचाककन मारावी की काय असं तात्याला वाटत होतं, पण दारावरच्या करड्या अधिकार्‍यामुळे ते शक्य झालं नाही..

तात्याला अपमान गिळावा तसा तो मुखरस गिळून टाकावा की काय, असंही क्षणभर वाटून गेलं!

छ्या! अमेरीकेला जायच्या आधीच अपमान सुरू?

'नाही! अद्याप मी माझ्या मायभूत आहे..इथे साली कुणाची टाप नाय आपला अपमान करण्याची!'

असं स्वगत म्हणत विमानतळाच्या बेसिनमध्ये का होईना, पण पऽऽचाककन थुंकण्याचा आनंद मिळवायचाच असं तात्याने ठरवलं होतं! हा अगदी शेवटचाच आनंद होता. त्याची अमेरीकेतली मिपाकर मैत्रिण भाग्यश्रीकडे गेल्यावर त्याला ते शक्य नव्हतं!

भाग्यश्री आणि तिच्या मिश्टरांनी मोठ्या आपुलकीने तात्याला चार दिस अमेरीका पाहायला बोलावलं होतं!

"गधडी ही अनुष्का कुठे मागे राहिली की काय? बघ गं जरा कात्रिना!"
मुखरस सांभाळत तात्या डाफरला.

"ती तुझा तंबोरा गाडीत राहिलाय तो आणायला गेल्ये!" कात्रिना म्हणाली.

मुक्तसुनीत, चतुरंग, प्राजू इत्यादी मिपाकरांनी "तात्या, अमेरीकेत आमच्याकडे येऊन तुझं गाणं झालंच पाहिजे!" असा लकडा लावल्यामुळे तात्याचं आयतच फावलं होतं! मुक्तसुनीतने तर "छानसा यमन गायलास तर इथल्या अमेरीकन शॉपमधलं पान खिलवीन आणि कुणाच्या नकळत केवळ एक पिचकारी स्वत:च्या घरातल्या खिडकीतून बाहेर मारण्याची मुभा देईन!" असं म्हटलं होतं त्यामुळेही तात्या मुंबैहून निघताना किंचित शेफारला होता आणि उगाचंच कात्रिनावर डाफरत होता!

कात्रिना कैफ आणि अनुष्का या दोन मैत्रिणींसह तात्या आता अमेरीकेचं विमान पकडायला सज्ज झाला होता..

देशांतरवाङ्मयसमाजजीवनमानराहणीमौजमजा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 1:49 am | मुक्तसुनीत

छानसा यमन ! क्या बात है !

मुक्तसुनीतने तर "छानसा यमन गायलास तर इथल्या अमेरीकन शॉपमधलं पान खिलवीन आणि कुणाच्या नकळत केवळ एक पिचकारी स्वत:च्या घरातल्या खिडकीतून बाहेर मारण्याची मुभा देईन!" असं म्हटलं होतं

ठ्ठो !!! :))

तात्या .... तुम्ही या हो एकवार ! "पिचकारी ना मारो" आणि "तुम्बिन मोरी" या मुखड्याच्या सगळ्या ठुमर्‍या गाऊन घेऊ ! ;-)

सर्किट's picture

18 Nov 2008 - 1:51 am | सर्किट (not verified)

तात्या आल्यावर तुमची मोरी तुम्बणार असे का वाटले बॉ तुम्हाला ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 2:00 am | मुक्तसुनीत

तुम्बिन मोरी म्हणजे "तुम-बिन-मोरी" हो !!

स्वगत : च्या मारी ! या सर्कीटला नको तिकडे "यतिचा" भंग करायाची खोड ! ;-)

सर्किट's picture

18 Nov 2008 - 1:50 am | सर्किट (not verified)

विमानाच्या खिडकीतून खुश्शाल बाहेर पिंक टाक ! कुणी काहीही म्हणणार नाही.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

टारझन's picture

18 Nov 2008 - 3:10 am | टारझन

विमानाच्या खिडकीतून खुश्शाल बाहेर पिंक टाक ! कुणी काहीही म्हणणार नाही.

=)) =)) =)) =)) =))
मेलो ... शब्दशः मेलो ...
ऍक्चुअली म्हाभारताचा 47 वा भाग बघत होतो, आणि त्यात तो येडझवा युधिष्ठीर आपल्या भावांना न बायको ला जुगारात हारला तेंव्हा तळपायाची आग मस्तकात गेलेली.. पण हा यॉर्कर .... फु ट लो ...

बाकी तात्यानं परदेशात जाउन देशी डंका वाजवायचं लैच मनावर (स्वभाव-मनातलं मन नाही बरंका) घेतलंय ..
तात्यांना परदेशात पच्च्च्चाआआअक्क्कन थुंकण्यासाठी लाख लाख शुभेच्छा !! अफ्रिकेवरून गेलात तर एक थंकी इकडंही पडून द्या मालक :) .. अंमळ अफ्रिका पावण होईल ..

- (तात्याभक्त) टारोबा खेचर

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Nov 2008 - 1:51 am | ब्रिटिश टिंग्या

=))

वाचतोय वाचतोय!
अजुन येउ देत!

-आपला,
(भारतात निघालेला) ब्रिटिश टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 1:57 am | मुक्तसुनीत

तात्यासाहेब आणि त्यांच्या मदनिका युरोपमधे विश्रांतीस्तव थांबलेल्या असताना पुढील प्रवासाआधी घडलेला एक संवाद.

शिकुरीटी गार्ड : तुम्ही तुमचे सर्व सामान स्वहस्ताने प्याक केले होते ना ? तुमच्या सामानाला विमानात चढवायच्या आधी कुणी त्याला हात लावला नव्हता ना ?
तात्या : (अनुष्का कडे एक कटाक्ष टाकत ) : नाही. बाकी कुणीही सामानाला हात लावलेला नाही.
शिकुरीटी गार्ड : तुमचे सगळे तंबोरे ? ते सगळे तुम्हीच नीट प्याक केलेत ना ?
तात्या : (कट्रिना कडे एक कटाक्ष टाकत ) : होय. सर्वच्या सर्व तंबोरे मीच प्याक केले.

चतुरंग's picture

18 Nov 2008 - 2:00 am | चतुरंग

मुक्तराव, भलत्याच 'तंबोर्‍यांच्या तारा' आणि 'भोपळ्यांकडे' लक्ष हो तुमचे! ;)
(प्रभुदेवांच्या समुपदेशनाचा इतक्या टोकाचा परिणाम होईल असे वाटले नव्हते हो!)

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 2:03 am | मुक्तसुनीत

"तारांवरी पडावा केव्हा चुकून हात
विस्तिर्ण पोकळीचा गंधार सापडावा"
- आरती प्रभू

सर्किट's picture

18 Nov 2008 - 4:23 am | सर्किट (not verified)

पोकळी विस्तीर्ण होईपर्यंत वाट बघीतलीत, ही सर्वात मोठी चूक.

-- (प्रभूमास्तरांचा आज्ञाधारक शिष्य) सर्किट

(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

धमाल मुलगा's picture

18 Nov 2008 - 7:35 pm | धमाल मुलगा

=))
=))
=))

आयला, इतके दिवस मला वाटत होतं, साला आम्हीच टवाळक्या करतो...
पण एक विसरलो.. ही मंडळीही कधीकाळी कालेजात जात होती, कट्ट्यावर बसत होती :)

सर्किट'काका', फु ट लो......


-- (प्रभूमास्तरांचा आज्ञाधारक शिष्य) सर्किट


च्यामारी, प्रभुमास्तरांनी अगदी सगळ्यांना पाऽऽऽर सुधारवलं बॉ :)

प्राजु's picture

18 Nov 2008 - 1:59 am | प्राजु

मुक्तसुनीत, चतुरंग, प्राजू इत्यादी मिपाकरांनी "तात्या, अमेरीकेत आमच्याकडे येऊन तुझं गाणं झालंच पाहिजे!" असा लकडा लावल्यामुळे तात्याचं आयतच फावलं होतं!

असं मी कधी म्हणाले होते?? उगाचच मान ना मान मै तेरा मेहमान का?? (ह. घ्या.)

येताच आहात तर त्या दोन बयांपैकी एकीला तिथेच ठेवा.. उगाच अमेरिकन पब्लिक चाळवायचं ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

18 Nov 2008 - 2:08 am | चतुरंग

तुम्हाला कायम आमंत्रण आहे! इथे अगदी भारतात असल्यासारखे राहू शकाल.
पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळी आपली मिपाकर मंडळी आहेतच.
(माझ्याकडे एकच गैरसोय होईल कारण माझ्याकडे सिंगल माल्ट वगैरे प्रकार चालत नाहीत :( पण बाकी पान-तंबाखू सर्व चालेल येताना एक पिकदाणी बाळगा जवळ म्हणजे अडचण नको!;))
बाय द वे इथेही तंबोरे, पेटी, तबला सगळं मिळतं तिकडून आणायची गरज नसावी.
(अर्थात 'तंबोरेवाली'साठी आणायचे असले तर भाग अलाहिदा! ;)

चतुरंग

केदार's picture

18 Nov 2008 - 2:15 am | केदार

अर्थात 'तंबोरेवाली'साठी आणायचे असले तर >> अरे काय हे. कसले अनाहुत सल्ले देताय तात्याला. :) तात्या हे अमेरिका आहे, इथे तंबोरा आणि तंबोरेवाली दोन्ही मिळतात. तूम्ही आपल पैश्याच काय ते बघा. ( आणि रस्तावर पिचकारी पण माराता येईल, फक्त कुठल्याही शहराच्या नियर वेस्ट भागात जावे लागेल, तिकडे गेल्यावर तुम्हाला मुंबैत आणि अमेरिकेत फारसा फरक जाणवनार नाही)

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 2:29 am | मुक्तसुनीत

अमेरिकेत उतरतेवेळी कष्टम आणि इमिग्रेशन हपिसरापाशी तात्यामहाराजांनी भरलेल्या यादीतील काही नोंदी :

तुमच्या प्रवासाचा हेतू : "सांस्कृति"क दे-वहाण घे-वहाण .....सॉरी . मर्‍हाटी लोकांबरोबर थोडी मौजमज्जा.
ब्यागेतली धोकटीसदृष वस्तू कशाकरता ? : एकेकाची बिनपाण्याने करायला. ... सॉरी . तो माझा ल्यापटाप आहे.
इथे न्यूयॉर्कमधे काय काम ? : जाता जाता ब्रिटनी स्पियर्स नावाच्या एका क्लायंटला भेटायचे आहे. विल्मिंगटनजवळ तिला एक फार्म हाऊस बांधायचे आहे. त्याच्याकरता पटापट वॉलस्ट्रीटवर डॉलर कमवायचे आहेत तिला.
तुमच्या सांगाती या दोन कोण ? : त्या ब्रह्मवादिनी आणि सुपरब्रह्मवादिनी आहेत.
म्हंजे काय ? : नाही , म्हणजे त्या "मिसळपाव डॉट कॉम"या मिलीयन डॉलर ऑनलाईन एंपायरच्या मालकिणी आहेत.
आणि त्यांच्या ब्यागा धरणारे दोन बाप्ये कोण ?: सलमान आणि चिरंजीवी.

यूरोपातल्या मधल्या थांब्यावर ऍड झाली वाटतं?
(बाकी तात्यांचं प्लॅनिंग भारी हो, कोणाकोणाला गोळा करत येतील सांगता यायचा नाय हा! ;) )

चतुरंग

सर्किट's picture

18 Nov 2008 - 4:26 am | सर्किट (not verified)

जाता जाता ब्रिटनी स्पियर्स नावाच्या एका क्लायंटला भेटायचे आहे. विल्मिंगटनजवळ तिला एक फार्म हाऊस बांधायचे आहे.

विल्मिंग्टनजवळ फार्म हाऊस ? वा !

दुरितांचे तिमिर जावो...
ब्रिटनी कृषिगृहे पाहो..

(फार्म हाऊसला कृषिगृह हा प्रतिशब्द कसा वाटला ?)

-- (संस्कृतोद्भव) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

भास्कर केन्डे's picture

18 Nov 2008 - 3:09 am | भास्कर केन्डे

मस्त लेखन तात्या... पुढचा भाग येऊ द्या.

'नाही! अद्याप मी माझ्या मायभूत आहे..इथे साली कुणाची टाप नाय आपला अपमान करण्याची!'
--तसे तुमचा अमेरिकेत सुद्धा कोणी अपमान करु शकत नाही. कोणी केलाच तर त्याला तुम्ही कायद्याचा चांगला इंगा दाखवू शकता.
त्याही पुढे जाऊन - तुम्ही इथे पाहूने असता तेव्हा या देशाने तुमच्या सकट तुमच्या सन्मानाच्या संरक्षणाची हमी घेतलेली असते. तसा आंतरराष्ट्रीय नियम आहे. जर तुमची काही तक्रार असेल तर भारत एक देश म्हणून अमेरिकेला याचा जाब विचारु शकतो. जसे अशात काही देश भारताला मागत आहेत त्यांच्या नागरिकांवर अत्याचार झाल्यावर.

आपला,
(गाववाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

भाग्यश्री's picture

18 Nov 2008 - 3:05 am | भाग्यश्री

हेहे.. चांगलं चाल्लयं.. चालूद्या!

http://bhagyashreee.blogspot.com/

सुवर्णमयी's picture

18 Nov 2008 - 3:33 am | सुवर्णमयी

तात्या, तुम्ही सगळी सोय करूनच याव. अमेरिकेत लोक आमच्याकडे या या असे म्हणतात. पण शेवटी जेवण झाल असलेच .. असे शेरे ऐकावे लागतील. आणि ते नसेल तर अमेरिकनाळले जाऊन - ब्रिंग युवर ओन लंच आणि बियर ....चा पण शिरकाव होतो हळूहळू इथे राहून. तेव्हा अमेरिकावारीचे काही खरे नाही:)

२४ तास काय काय लागते त्याच्या बॅगा भरून आणा. भरायला अनुष्कावहिनी आहेतच. आणायला विमान आहे :)
पैसे द्यायला तुम्ही आहातच!
बाकी मग केव्हा येता आहात?

हे तात्यांनी आणि तमाम मिपाकरांनी सचित्र बघितले आहे त्यामुळे पाहुणचार व्यवस्थित होईल ह्याबद्दल यत्किंचितही संदेह नसावा तात्यांच्या मनात आणि ज्यांना संदेह आहे त्यांच्याविषयी आम्हाला काही म्हणायचे नाही!
आदरातिथ्य सोडून देण्याइतके आम्ही 'पुढारलेले' नाही! ;)

चतुरंग

लवंगी's picture

18 Nov 2008 - 7:35 am | लवंगी

मिशिगनला येणार असाल तर नक्कि या...

धनंजय's picture

18 Nov 2008 - 3:43 am | धनंजय

तुमच्या मैफिलीला हजेरी लावायला, जमेल तितकी मेहमाननवाजी करायला मीसुद्धा हाजिर आहे.
- - -
(सध्या कामाच्या व्यापामुळे मिपावर तितका येत नाही - मला भलतेच विथड्रॉवल सिम्प्टम चालू आहेत :-(
- - -

चतुरंग's picture

18 Nov 2008 - 3:48 am | चतुरंग

वैधानिक इशारा : कामावर परिणाम होईल इथपर्यंत 'मिपा'पासून लांब रहाणेही धोक्याचे ठरु शकते! ;)

चतुरंग

सर्किट's picture

18 Nov 2008 - 9:12 am | सर्किट (not verified)

कामावर -> "कामावर" ??

-- (कोटेश्वर) सर्किट

(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 4:20 am | पिवळा डांबिस

तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)
अरे हा तर (शिंचा) अलभ्य लाभ!!!

पासपोर्ट, व्हिसा दाखवून आता अगदी विमानतळाच्या आतल्या कक्षात शिरणार....
आँ!!!!
तुमालाबी पासपोर्ट आणि वीसा दाखवायला लागला? आमाला वाटलं की तिथं नुस्तं जाऊन "मी तात्या!" असं सांगितल्यावर तुमाला डायरेक उचलून "गंपतीबाप्पा मोर्या!" करत विमानात आणून बसवतील म्हणून!!!:)

भाग्यश्री आणि तिच्या मिश्टरांनी मोठ्या आपुलकीने तात्याला चार दिस अमेरीका पाहायला बोलावलं होतं!
वा भाग्यश्री, तू खरंच की गं भाग्य श्री!!!!
(स्वगतः मेले, भाग्यश्री आणि निनाद ठार मेले!!! आता काय नाय तरी "ह्येंच्या घरातून रात्री-बेरात्री विव्हळण्याचा (सॉरी सॉरी, गाण्याचा!!!) आवाज येतो म्हणून पोलिसात कंप्लेंट जाणार!!!!):)

मुक्तसुनीत, चतुरंग, प्राजू इत्यादी मिपाकरांनी "तात्या, अमेरीकेत आमच्याकडे येऊन तुझं गाणं झालंच पाहिजे!" असा लकडा लावल्यामुळे तात्याचं आयतच फावलं होतं!
ह्ये लई ब्येस!! त्यांच्याकडं अस्तांना काय मनसोक्त गायचं ते गाऊन घे!! थिते इष्ट कोष्टावरची हवा गायला लई बेष्ट!! आमच्याकडची हवा "प्यायला"!! [आणि मिडवेष्टातली (हवा हो!!!), भयाकारी किंकाळ्या मारायला (असं सर्किटभौ सांगत होते बॉ!)]
आमच्याकडे आल्यावर फकस्त प्यायचं आणि खायचं!!!! त्या घाटावरच्या भटाला विचार! तिच्यायला, आम्ही त्याला चकाट्या पिटण्यात इतका गुंगवला की तो आपल्याला गाता येतं हेच विसरला!!!
:)

विमानाच्या खिडकीतून खुश्शाल बाहेर पिंक टाक ! कुणी काहीही म्हणणार नाही.---- सर्किट
हां, सर्किटभौचं ऐक!! त्यांना ट्रॅव्हलिंगचा सॉलिड अणुभव आहे!!
बाकी एअर विंडियाके हवाई जहाजसे पतन पावलास (म्हंजे "आलास"! हे एअर विंडियाचं पेशल हिंदी है!!!) तर तू पिंक कुठे टाकलीयेस ते पण कळनार नाही कुणाला!!!:)

हॅपी जर्नी!!

वेदनयन's picture

18 Nov 2008 - 5:40 am | वेदनयन

परतीची तिकिटे किती काढायची? तीन का पाच? थोडी आधिच तयारी केलेली बरी.

विसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 7:36 am | विसोबा खेचर

धत तेरीकी! हा माझा लेख प्रकाशित झालेला माहितीच नाही मला! आत्ता सकाळी उठून पाहतो आहे तेव्हा समजलं! :)

जळ्ळी ती "अप्रकाशित ठेवा" ची कळ काम करत नव्हती, परंतु कालपरवाच सुरू झाली होती. म्हणून काल रात्री झोपेने आमचा कब्जा घ्यायची सुरवात केल्यावर घाईघाईने "अप्रकाशित ठेवा" ची कळ दाबून लेख सुपूर्द केला आणि झोपी गेलो..!:)

च्यामारी आत्ता येऊन पाहतो तर पब्लिकने इथे सगळी धमालच केलेली दिसते त्यामुळे आता पुन्हा अप्रकाशितही करता येणार नाही! :)

साला, लेख कंप्लिट केला पाहिजे आज-उद्याकडे! तरीही काल रात्रीची आमची प्रतिभा आता काम करेल अशी खात्री नाही.. रात्री आंतरजालावर उगाचंच सिंडी क्रॉफर्ड पासून अनुष्का, झिंटा, कात्रिनासारख्या नाही नाही त्या बायकांची चित्र पाहायचा छंद (!)असल्यामुळे रात्री जरा आमच्या प्रतिभेला अंमळ जास्तच घुमारे फुटलेले असतात! ;) ते असो..!
सगळेच पुरुष पहातात तिच्यायला, आपण साला बिन्धास्त कबूल करतो इतकंच! ;)

सबब, वरील पब्लिकपैकी कुणी ही ष्टोरी पूर्ण केली तरी चालेल! मुक्तरावाने त्याची छानशी झलक दाखवलेलीच आहे! :)

असो..

आपला,
(अमेरीकेला निघालेला) तात्या.

बाय द वे, आमची शिंडी क्रॉफर्ड नावाची दंतकथा शोभावी इतकी सुरेख बया कुठे राहते हो अमेरीकेत? त्या बाईवरदेखील साला आपला लै दिल आहे! :)

येणारच आहे तर कात्रिनाला आणि अनुश्काला मुक्तसुनीतच्या घरी ठेऊन शिंडीकडेही घटकाभर जाऊन येईन म्हणतो..! अर्थात, लगेचंच परतेन. नायतर मी एकटाच बाहेर गेल्याची संधी साधून मुक्तसुनीत, "ये अनुष्का, तुला बागेश्री शिकवतो!" असं म्हणायचा! ;)

आपला,
(शिंडीप्रेमी) तात्या क्रॉफर्ड! :)

सर्किट's picture

18 Nov 2008 - 9:11 am | सर्किट (not verified)

नायतर मी एकटाच बाहेर गेल्याची संधी साधून मुक्तसुनीत, "ये अनुष्का, तुला बागेश्री शिकवतो!" असं म्हणायचा!

मुक्तसुनीतांची एकंदरीत वागणूक बघता, एकांतातही तो अनुश्केला "बागेश्री" शिकवणार, हे नक्की.

सज्जनतेची लिमीट हो, आमचा मुक्तसुनीत म्हणजे !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आता ही नविन कोण ?
मी तात्या सहस्त्रनाम कंपाईल करतोच आहे पण पुरवणी म्हणून बायांची यादी पण टाकावी असा विचार आहे.

कळ काम करत नव्हती, परंतु कालपरवाच सुरू झाली होती.
ताबडतोब प्रभू मास्तराकडे जा. अशा बंद पडलेल्या कळ्या सॉरी कळा ते चालू करायचे विसाव्या वर्षी म्हणे.(त्यांच्या खिशात ष्टोची पिन घेउन फिरत असतात.अमेरीकेतल्या एका नविन मित्रानी दिली म्हणे.मित्राला भारतात यायला वेळ नसल्यामुळे )

सर्किट's picture

18 Nov 2008 - 9:08 am | सर्किट (not verified)

त्यांच्या खिशात ष्टोची पिन घेउन फिरत असतात.

धन्य !!!

ष्टोची पिन ही ट्रोजन भगकारक असल्याने अत्यंत उपयुक्त ! ट्रोजनभगांमुळे प्रभुमास्तरांना अधिकाधिक बिजनेस मिळतो हेही खरेच.

पण रामदासबुवा, आमचा ग्यासुद्दिन आज धन्य झाला...

-- (क्रिप्टिक, प्रभुमास्तरांचा अमेरिकेतील नवीन मित्र) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 9:20 am | पिवळा डांबिस

बंद पडलेल्या कळ्या
विप्रं च एक ठीक आहे (त्यांचा तो धंदाच पडला!!!)
पण रामदासजी, अमेरिकेत ष्टो ची पिन मिळते हे वाचुनच आम्हाला इतका आनंद झालाय की पुछो मत!!!
आम्हीही एक मिळवून त्या अमेरिकेतल्या गर्वाने फुगलेल्या लोकांच्या ट्रोजनला एक छानसं गोल सिमेट्रिकल भोक पाडू म्हणतो....
तिच्यायला, पोट फुडं आलं ना (होपफुल्ली स्वतःच्या बायकोचंच!!) की कळेल त्यांना!!!!

सर्किट's picture

18 Nov 2008 - 9:24 am | सर्किट (not verified)

काका, कळ्या नाही !! कळा म्हटलंय त्यांनी !!!

डिस्क्लेमर : खाली पांढर्‍या शाईत खास सर्किट शैलीतला एक भीषण विनोदी प्रकार आहे. सोवळ्या आणि संवेदनशील मनांनी वाचू नये.
सर्किट उवाच :
(अवांतरः "हाईट ऑफ रिव्हेंज: अ बास्टर्ड पोकिंग होल्स इन काँडोम्स इन ट्रोजन फॅक्टरी.")
इति सर्किट उवाच !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 9:04 am | पिवळा डांबिस

आमची शिंडी क्रॉफर्ड नावाची दंतकथा शोभावी इतकी सुरेख बया कुठे राहते हो अमेरीकेत? त्या बाईवरदेखील साला आपला लै दिल आहे!
सिंडीमावशी (आम्ही आमच्या मुलाला सगळ्या मॉडेल्स मावशी म्हणून ओळख करून दिल्या आहेत!! असं व्हायला नको की कुणाचं चित्र बेसावधपणे कंप्यूटरवर असायचं आणि तो त्याच्या आईकडे जायचा विचारायला की ही बया कोण?)
तर त्या सिंडीमावशीच्या सगळ्यात जवळ रहाणारे म्हणजे मी आणि भाग्यश्री!! बोला, कोणत्या घोड्यावर पैशे लावताय?:)
नाय म्हणजे भाग्यश्री तुमची आणि सिंडीची भेट घडवून आणेलही, पण ती दिवाणखान्यात!!!!!
तुम्हाला जर तिला स्विमिंगपूलवर भेटायचं असेल तर मला नाही वाटत भाग्यश्री ते जमवू शकेल!!!!
त्यासाठी तुमचा विश्वासातला (आणि तुमच्या गरजा जाणणारा!!) पिवळा डांबिसच हवा!!!!:)
बघा बुवा, चॉईस तुमचा आहे.....
:)

अर्थात, लगेचंच परतेन. नायतर मी एकटाच बाहेर गेल्याची संधी साधून मुक्तसुनीत, "ये अनुष्का, तुला बागेश्री शिकवतो!" असं म्हणायचा!
हां, तां बाकी अगदी खरां हां!!!! त्या मुक्तसुनिताचो, मेल्याचो काय भरवंसो नाय!!!! तो तुकां इतक्या आग्रहान त्याच्याकडे बोलावतांसां तेंव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.....
रात्र मुसुची आंसा, तात्या (मेल्या आतातरी) जागो रंव!!!:)

सिंडी शिळा राघवपुत्रे मुक्त केली
** लागता दिव्य होवोनी गेली |
तिची भेट आणली घडवोनी कोणी
नुपेक्षी कदा पिडां मिपाभिमानी ||
:)

विसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 9:29 am | विसोबा खेचर

तुम्हाला जर तिला स्विमिंगपूलवर भेटायचं असेल तर मला नाही वाटत भाग्यश्री ते जमवू शकेल!!!!
त्यासाठी तुमचा विश्वासातला (आणि तुमच्या गरजा जाणणारा!!) पिवळा डांबिसच हवा!!!!
बघा बुवा, चॉईस तुमचा आहे.....

ओक्के सर! आपण सिंडी क्रॉफर्डला स्विमिंग पुलापाशीच भेटू..

नायतरी मला पोहता येत नाहीच, तेव्हा या अमेरीकन ट्रिपमध्ये शिंडीकडूनच पोहायला शिकेन म्हणतो! काय साली जाम मजा येईल ना..? :)

आणि पोहायला शिकताना साला बुडलो तरी बेहत्तर, सिंडीच्या गळ्याला मिठी मारूनच बुडेन..! काय साली ती पण एक सुरेख मौत असेल! ओहोहो... :)

बाकी, आज चाळीशीतही बया काय छान दिसते! आपला तर साला दिल जाम फिदा आहे या बयेवर. या अनुष्का, कात्रिना वगैरे कालच्या पोरी! शिंडी तर आपलं खूप जुनं प्रेम आहे! :)

या अमेरीका ट्रिपमध्ये तिला नक्की भेटणार आणि पोहायलाही शिकणार! अजून काय काय करायला शिकवलंन तरी आपली तैय्यारी आहे बॉस! :)

रात्र मुसुची आंसा, तात्या (मेल्या आतातरी) जागो रंव!!!

सिंडी शिळा राघवपुत्रे मुक्त केली
** लागता दिव्य होवोनी गेली |
तिची भेट आणली घडवोनी कोणी
नुपेक्षी कदा पिडां मिपाभिमानी ||

क्लास रे डांबिसा! :)

आपला,
तात्या क्रॉफर्ड.

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 9:16 am | मुक्तसुनीत

हां, तां बाकी अगदी खरां हां!!!! त्या मुक्तसुनिताचो, मेल्याचो काय भरवंसो नाय!!!! तो तुकां इतक्या आग्रहान त्याच्याकडे बोलावतांसां तेंव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.....

कलियुग कलियुग म्हणतात ते हेच ! काम करणार तिलक "कामो"द आणि नाव मुक्तसुनितचे ! कुण्णाकुण्णाची मदत कराच्ची म्हंजे काही सोय नाही हो राहिली ! तात्या , तुम्ही खुशाल जा सोडून त्यांना आमच्याबरोबर. तुमच्या मातोश्री आमच्या मातोश्रींप्रमाणे. तुमच्या बहिणी आमच्या बहीणींप्रमाणे. अनु आणि केटी या तुमच्या गर्लफ्रेंड्स ...आमच्या मालकिणींप्रमाणे.

विजुभाऊ's picture

18 Nov 2008 - 9:23 am | विजुभाऊ

अनुष्का च्या जोडीला आता कॅट्रीना सुद्धा...तात्या तात आहात यात.
तिक्डे ती सिन्डी क्राफर्ड आहे हे विसराल.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 9:27 am | पिवळा डांबिस

अनु आणि केटी या तुमच्या गर्लफ्रेंड्स ...आमच्या मालकिणींप्रमाणे.
तीच तर भीती आहे तात्याला!!
काय काय सेवा प्रोव्हाईड कराल कुणास ठाऊक!!!!
(सिर्फ मुसु के साथ बातां: ते सपाट बुडाचं भांडं तुमच्याकडे ठेवा, आणि गोल बुडाचं भांडं इथे पाठवा, कसं!! कॉप्रोमाईज, हॅपी!!!)

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 9:30 am | मुक्तसुनीत

मी खीर खाईन तर "बूड" घागरी !
- मुक्त बोका !

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 9:38 am | पिवळा डांबिस

मी खीर खाईन तर बुड गे घागरी!!!!
पिवळा डाबिस (बोका!!!)
:)

सर्किट's picture

18 Nov 2008 - 9:40 am | सर्किट (not verified)

काका, प्रॉप ८ पास झालं, आता गे घागरी इकडे इल्लीगल, काय ?

-- (अँटी प्रॉप ८) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 9:55 am | पिवळा डांबिस

मला काय तुमच्यापेक्षा जास्त म्हायती हाय आसं म्हनत नाय म्यां!!
पन प्रोप ८ पास झालं की नाय कालिफोर्नियात? आता कोनाला लीगल रेकग्निशन घ्यायची आसंल तर येकदम मॅसेच्यूसेटसलाच जावं लागेल, काय?
बरं झालं तिच्यायला!!
आपला रिपब्लिकन,
पिवळा डांबिस

सर्किट's picture

18 Nov 2008 - 10:03 am | सर्किट (not verified)

काका,

कनेटिकटात पन चालतंय की वो !! ट्राय स्टेट मिपांचा भाव लय वाडनार बगा आता !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

एकलव्य's picture

18 Nov 2008 - 10:06 am | एकलव्य

तस पाहायला जाल तर आळिमिळी गुपचिळी या टोकापासून त्या टोकापर्यंत (अक्षरशः) सगळीकडे अगदी कायद्यानेच मान्य आहे!

(उगाचच) एकलव्य

विसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 9:33 am | विसोबा खेचर

(सिर्फ मुसु के साथ बातां: ते सपाट बुडाचं भांडं तुमच्याकडे ठेवा, आणि गोल बुडाचं भांडं इथे पाठवा, कसं!! कॉप्रोमाईज, हॅपी!!!)

साले चोर...!

निघाले लगेच भांड्यांना कल्हई लावायला! ;)

आपला,
तात्या कल्हईवाला! :)

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 9:48 am | पिवळा डांबिस

साले चोर...! निघाले लगेच भांड्यांना कल्हई लावायला!
आवो नाय तसं नाय, हीच तुमच्या मित्रांची किंमत केलीत काय!!! पण तुमी जोवर सिंडीबरूबर जमवताय तोवर तुमच्या ह्या इतर(अंग)वस्त्रांना कुठेतरी गुंतवून ठेवायला पाह्यजेय की नाय? आवो शॉपिग आणि इतर हो!!! रोडिओ ड्राईव्ह मध्ये तुमच्या खर्चाने शॉपिग हो!!! तुमी काळजी करू नगासां!!
(फक्त पाच प॑रतीची तिकीटं काढून ठिवा म्हंजे झाल!!!!!!:))

आणि रोडिओ ड्राईव्हवर शॉपिग केल्यावर उरलेली आख्खी जिंदगी कर्ज फेडण्यात घालवण्याची तयारी केल्याबद्दल अभिनंदन!!! डांबिसकाकू आत्ताच खोखो हासतिया......

घाटावरचे भट's picture

18 Nov 2008 - 9:53 am | घाटावरचे भट

तात्या....अवं चर्चा अंमळ भरकटली की......या धाग्याचाही खफ झाला!!!!!!

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 9:57 am | पिवळा डांबिस

तात्या....अवं चर्चा अंमळ भरकटली की......या धाग्याचाही खफ झाला!!!!!!
तुला अजून श्रीखंड हवंय का!!
देतो!!
पण अशी चर्चा नको थांबवून लावू रे माझ्या पोरा.....

घाटावरचे भट's picture

18 Nov 2008 - 10:02 am | घाटावरचे भट

श्रीखंड ना, चालेल की....श्रीखंड खाने के लिये हम कहीं भी जा सकते हैं (संदर्भः दिल चाहता है)
मी तात्यांना अंमळ http://www.misalpav.com/node/4662#comment-67272 याची आठवण करुन देत होतो....

टारझन's picture

18 Nov 2008 - 10:29 am | टारझन

काय रे मोठ्या मुलांनो ? काय गोंधळ चालू आहे ? जरा सुखाने जगु द्या रे २ दिवस

एकदा मेलो की सुटाल सगळीचे ... मग काय घालायचा तो राडा घाला ...

मिपाच्या मोकळेपणाचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. (ता.क. गैरफायदा हा शब्द खटकल्यास मंडळ जबाबदार नाही, प्रेमाने म्हणून सांगतो, नाही तर राहिलं)

-(राडाप्रेमी) टारोबा खेचर

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 10:32 am | पिवळा डांबिस

एकदा मेलो की सुटाल सगळीचे ... मग काय घालायचा तो राडा घाला ...
कधी मरतोयेस? नाय म्हणजे आमी कधी मोकळे होऊ तो दिवस शोधतोय.....
:)

सर्किट's picture

18 Nov 2008 - 10:01 am | सर्किट (not verified)

भटांनो,

अहो ज्या लेखाचाच प्रारंभ एका सपाट बुडाचा आणि एका गोल बुडाच्या बालसुलभ उल्लेखाने झाला त्या चर्चेचे आ॑णखी काय होणार ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 10:17 am | पिवळा डांबिस

एका सपाट बुडाचा आणि एका गोल बुडाच्या बालसुलभ उल्लेखाने
सपाट आणि गोल बुडाचा "बालसुलभ" उल्लेख?
अहो, "सपाट" आणि "गोल" बुडातच साम्राज्यं की हो बुडाली......

एका गोल बुडात संपूर्णपणे बुडालेला,
पिवळा डांबिस

घाटावरचे भट's picture

18 Nov 2008 - 10:22 am | घाटावरचे भट

हम्म्म्म....एकंदर चर्चा वाचून मजा वाटली. चर्चेत बिब्बा घातल्याबद्दल क्षमस्व, पण नको तिथे काड्या करायची जुनी सवय आहे.
त्याला इलाज नाही :( आणि थँक गॉड मी आता 'ट्रोजन' नाही ;)

विनायक प्रभू's picture

18 Nov 2008 - 10:36 am | विनायक प्रभू

धन्य धन्य हो प्रदक्षिणा
विसोबा रायाची

आयला तात्या, सिंडी क्रॉफर्डची आठवण करून तुम्ही काळजाला घरं पाडलीत. कालेजात असताना नाशकातल्या सर्कल या इंग्रजीच पिक्चर लागणार्‍या टॉकीजचे आम्ही नित्य वारकरी होतो. या टाकीजात एकदा 'माय फेअर गेम' हा सिंडीचा पिक्चर लागला होता. त्यावेळी तिच्या गालावरच्या (खरं तर ओठांजवळच्या) तिळाने स्वारी घायाळ झाली होती. त्यात एका शॉटमध्ये सिंडी कचाकचा भांडणार्‍या जोडप्यातील एकाला मागे फिरून काडकन मुस्काटात मारते तो सीनतर अजून डोळ्यासमोर आहे. सालं, तिची मुस्काटात खायलाही आपण कधीही तर तयार राहू भाऊ.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

सखाराम_गटणे™'s picture

18 Nov 2008 - 2:53 pm | सखाराम_गटणे™

एवढे प्रतिसाद पाहुन तात्यांवरील प्रेम मिपाकरांचे प्रेम दिसौन येत.
बाकी, तात्या विष्णु सारखे पाताळात गेले तरी मिपाकर तेथे स्वागत करतील.

विनायक प्रभू's picture

18 Nov 2008 - 7:25 pm | विनायक प्रभू

पाताळात पण मिपाकर आहेत का? नविन माहीती. नावे सांग रे सखारामा.

सर्किट's picture

19 Nov 2008 - 9:41 am | सर्किट (not verified)

तुमच्याकडे आरसा नाही का प्रभु मास्तर ?

पाताळातला एक मेंबर मिळेल की !!

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

सुनील's picture

18 Nov 2008 - 7:58 pm | सुनील

छान आहे प्रवासवर्णनाची सुरुवात. पब्लीकचे प्रतिसादही मस्तच!

आता पुढचा भाग लौकर टाकून पूर्ण करावा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जयवी's picture

18 Nov 2008 - 8:09 pm | जयवी

वा धम्माल चाललीये इथे तर :)
आता खरंच तात्या तिकडे निघाले तर काय होईल याचा विचार करत होते :) मधे आमचं कुवेत ही लागतं हो..... पण इथे सगळ्या बुरखाधारी.... पेंग्विन ;)

वाटाड्या...'s picture

18 Nov 2008 - 9:42 pm | वाटाड्या...

तात्या...

एकदा मिशीगन मधे बी यायाचं. ते सगळ कल्हई आन काय काय ते सगळ इथे जोर्दार आहे. आमच्या डेट्रॉइटचा "८ माइल" नावाचा शिणुमा ज्याने पाइला आहे त्यालाच कळेल...आणि ते यमन न काय ते बी इथे जोरदार आहे बरं का? तेव्हा हाग्राआचं आवतणं काय....

व्यंकु's picture

19 Nov 2008 - 9:27 am | व्यंकु

तात्यानु इमान कवाचा हाय ता सांगा भवतेक मास्तर म्हून आमची डुटी हायशी वाट्टा त्या इमानात.
बाकि पान मदीच संपला तर सांगा शिँगल बेल मारुन एकाद्या टपरीजवळ थांबवतो मग मारा 120-300 नायतर फुलचंद

यन्ना _रास्कला's picture

14 Mar 2009 - 10:17 am | यन्ना _रास्कला

जुने लेख पाहत होतो तर हा दिसला. पिचकारीचा उल्लेख पाहुन मजा वाटली. टायटनिक
मधे लिओनार्डो पण नायिकेला लांब कसं थुकायचं ते शिकवत असतो तो प्रसंग आठवला. एकुण
काय तर युरोपियन / अमेरिकन लोक पण पचापच थुकतात तर भारतीयांनी का लाजायचं?

चित्रगुप्त's picture

23 Nov 2013 - 8:29 pm | चित्रगुप्त

फिर क्या हुवा?
पुढला भाग कुठाय? दुवा द्यावा तात्येश्वरा.