जालकवींच्या कविता: आवाहन

२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच. भारताबाहेर पहिल्यांदाच असे अधिकृत साहित्य संमेलन होणार आहे, आणि तेही बे एरिया, ह्या विश्वजालाच्या कर्मभूमीत ! हे साहित्य संमेलन नेहमीपेक्षा वेगळे असावे, ही माफक अपेक्षा रसिकांनी ठेवायला काहीच हरकत नाही. पण मुळात हे वेगळेपण तरी कसे असावे, ह्याबद्दल विचारमंथन करीत असताना, एका कार्यक्रमाची कल्पना सुचली, आणि ती संयोजकांना कळवली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, म्हणून हे आवाहन.

कार्यक्रमामागील भूमिका: विश्वजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. चलचित्रांच्या बाबतीत यू-ट्यूबने क्रांती घडवली. छायाचित्रांत फ्लिकरने. मुद्रित साहित्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमुलाग्र परिवर्तन जरी दिसत नाही, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. मराठीचे हेच भविष्य आहे, असे म्हणायला हरकत नाही. नव्हे, ह्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ह्या नवीन युगातले स्वत:चे अस्तित्वच नाहीसे करणे. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.

कार्यक्रमाची रूपरेखा: एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नाहीत. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील. कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील. हेच नाही तर, काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील "प्रोफेशनल" नसतील.

मदत हवी आहे: हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आम्ही सर्व "जालकवींना" आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला ईमेलने पाठवा ! (इमेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा, आणि कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी.) जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती. तसेच ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.

आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.


मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)
चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)

 ([dot] ऐवजी ".", आणि [AT] ऐवजी "@" वापरावे.)

धन्यवाद !

काव्यवाचनासाठी मदत

करायला तयार आहे..
-एक

विडंबने

व्यनितून विचारलेला एक प्रश्नः

विडंबने चालतील का ?

होय. फक्त दोन अटी:

मूळ कविता आणि विडंबन दोन्ही जालप्रकाशितच हवे.
मूळ कवितेची निवड झाली, तरच विडंबनाची निवड होणार.

- सर्किट

लक्षणीय उपक्रम

बदलत्या काळाची पावले ओळखून , नव्या माध्यमाद्वारे प्रकाशित होत असणार्‍या गुणी कवींना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न.

एरवी मला मराठी संस्थळांमधील राग-लोभ या गोष्टीत विशेष इन्टरेस्ट नाही . पण , हा जो प्रकल्प आहे त्याच्या यशस्वितेकरता मिसळपावबरोबरच मनोगत, मायबोली (आणि मला माहीत नसलेली इतर अनेक स्थळे ) यांना हे आवाहन पोचणे आवश्यक आहे असे वाटते. आपापल्या संपर्कातल्या विविध ब्लॉग लेखक/लेखिका (खरे सांगायचे तर कवी/कवयत्री) यांच्यापर्यंत पोचणे , त्याना इथे सामील व्हायला प्रोत्साहित करणे हे या उपक्रमाच्या यशस्वितेकरता अत्यावश्यक ठरेल. आपल्या या छोट्या मिपा परिवारापैकी काही गुणीजन असे असतील ज्यांचा संचार बर्‍याच संस्थळांवर होतो. त्यांनी या बाबतीत विशेष कामगिरी बजावावी.

केसु (ऊर्फ अ. अभ्यंकर ) , चतुरंग , बेसनलाडू, अविनाश ओगले या आणि अशा अनेक गुणी लोकांचे काम लोकांपुढे यावे, "आंतरजालीय कविता" हा प्रकार (त्यातील उत्तम नमुन्यांसकट) बृहन्महाराष्ट्रीय रसिकाना कळावा ही शुभेच्छा !

नक्कीच

पण , हा जो प्रकल्प आहे त्याच्या यशस्वितेकरता मिसळपावबरोबरच मनोगत, मायबोली (आणि मला माहीत नसलेली इतर अनेक स्थळे ) यांना हे आवाहन पोचणे आवश्यक आहे असे वाटते.

बेसनलाडू ह्यांनी मनोगतावर, तर केशवसुमारांनी मायबोलीवर हे आवाहन प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचबरोबर सर्वांनाच आवहन आहे, की आपापल्या अनुदिन्यांतून, तसेच इतर जालपत्रांतून ह्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी प्रयत्न करावेत.

http://www.manogat.com/node/14385

चक्रपाणि ह्यांनी मनोगतावर हे आवाहन प्रकाशित केले आहे. त्याचे स्वरूप मला जास्त आवडले. तेव्हा तेच आवाहन प्रकाशित करावे ही विनंती.

धन्यवाद.

- सर्किट

मनोगतावर प्रसिद्ध केले

हे आवाहन मनोगतावर येथे प्रसिद्ध झाले आहे. माझ्या अनुदिनीवर आणि परिचयातील जालकवींकडे ते या दिवसअखेरीपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल.
(आवाहक)बेसनलाडू

चांगली कल्पना +

कल्पना चांगली आहे. ती सर्व समित्यातून आणि "ऍप्रूव्हल प्रोसेस" मधून बाहेर पडून १००% राबवली जावी ही शुभेच्छा!

बाकी एकदा तसे होणार हे नक्की झाले की किमान मिपावर तरी खाजगीत आमच्यासारख्या नुसत्या वाचकांना येथील प्रत्येक कवीची कोणती कविता आवडली हे विचारून निरनिराळ्या कवींमध्ये स्पर्धात्मक नाही पण प्रत्येक कवीच्या कवितांमध्येच स्पर्धा लावून त्यातील विशेष आवडलेल्या कवितांना प्राध्यान्य देता येईल. उ.दा. म्हणून नावे घेतो (अजून बरेच आहेत) पण चतुरंग, केशवसुमार, धनंजय आदींच्या प्रत्येकाच्या कवितांमधील कुठल्या आवडल्या ह्याचा यात निनावी पण प्रामाणिेक पणे एकदाच, कविता सुचवायला सांगायची... अर्थात यातील प्रत्येकजण या कार्यक्रमासाठी नवीन कविता पण करू शकतो इतके ते समर्थ आहेत ह्याची कल्पना आहे!

किती

किती कविता पाठवाव्यात याला मर्यादा आहेत का?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नाही

नाही त्याला मर्यादा नाही.

कविता किती निवडाव्या, ह्याला मात्र कालमर्यादा आहेत.

- सर्किट

अरुण साधू

मागच्याच्या मागच्या वर्शी अरूण साधूंना नीवेदन देणार होते त्याचं काय झालं?

अपघात

विदागाराचा अपघात.

तुम्ही जाणकार दिसताय. तुम्हाला हे माहिती असायला हवे Wink

- सर्किट