लोकल मधले लोकल्स भाग- २

रघुनाथ.केरकर's picture
रघुनाथ.केरकर in जनातलं, मनातलं
27 Jul 2017 - 3:43 pm

भाग एक

​आत मध्ये तीन जणांच्या सीट वर एक पुरूष, आणि दोन स्त्रिया बसलया होत्या. प्रथमदर्शनी ते एक कुटुंब वाटत होतं. कोपऱ्यावरच्या सीटवर बाबा प्रवासी मध्ये आई प्रवासी आणि खिडकी कडे बेटी प्रवासी. बेटी प्रवासी वयवर्षे असतील अंदाजे २५ ते २८ च्या आसपास. आणि हिशोबाने तिचे आई बाबा होते. समोरच्या मोठ्या सीटवर नेहमीचे कंटाळलेले चेहरे मोबायलात डोकी घालून बसलेले होते. त्यातल्या खिडकी दुसऱ्या क्रमांकाच्या प्रवाशाने त्याचं ओझं त्याच्याच मांडीवर घेतलं होतं. मी पहिल्या क्रमांकाला उभा असल्याने मला आई-प्रवासी आणि बॅग वाले प्रवासी ह्यांच्यामध्ये उभेच राहाता येईना. आई-प्रवासी सुद्धा घरी बसतात तश्या बसल्या होत्या. आता त्यांना नीट पाय मागे घेऊन बसायला सांगण्याइतकं धारिष्ट्य माझ्यात नव्हतं. मग नजरेनेच बॅग वाल्या काका ला जरा इशारा केला. त्याने सुद्धा लगेचच बॅग उचलून माझ्या हातात दिली. मी ती त्याच वेगात लॉफ्ट वर फिट केली. हे सगळं करेस्तोवर गाडी विक्रोळी स्थानकात दाखल झाली.

आता अजून नव्या दमाची फौज दरवाज्यातून आतमध्ये शिरायला लागली होती. दारातले त्यांच्या पुढच्यांना आत ढकलायला लागले. त्यांच्यापुढचे त्यांच्या पुढच्यांना, आणी त्यांच्यापुढचे अजून त्यांच्या पुढच्यांना. म्हणता म्हणता विक्रोळीच्या ताज्या दमाच्या फ़ौजेचे धक्के माझ्या पर्यंत येऊ लागले. एका हाताने लॉफ्ट धरत आणि दुसऱ्या हाताने डब्याच्या भिंतीचा सहारा घेत मी खिडकीकडे तोंड करून गर्दीला पाठीमागे थोपवून धरलं होतं. गर्दीच्या पुढे असलेल्या सगळयांना असचं वाटतं असतं कि त्यानेच गर्दी थोपवून धरली आहे. मी सुद्धा त्यातलाच एक होतो. इतक्यात दोन बॅगा दरवाज्याकडून आत आल्या. त्या बॅगांचे मालक दूर कुठेतरी दरवाज्यात लोंबकळत होते. भलत्यानेच त्या पुढे पाठवल्या होत्या. मी पण व्हेरिफिकेशन करत बसलो नाही. पण त्या बॅगा पाहून "एखाद्या मोठया स्टोअरच्या स्टोअर किपर असल्याचा आव आणत चेहरा थोडा त्रासिक करत लॉफ्ट वरच्या दोन - तीन बॅगांना मागेपुढे करत, ह्या नव्या दोन बॅगांना "अडजस्ट" केला. मग गर्दीतून "थँक्स " चा आवाज येईल आणि मी मोठ्या श्टाईलीत डोळे मिचकावून इट्स ओके म्हणेन. अशा विचारात असताना , खाली बसलेल्या आ-प्रवासी माझ्यावर गुरगुरल्या, " थोडा देख के पाव राखों, लेडीज बैठी हय" ते ऐकून मी थोडासा दचकलोच. पण शी वॉज ऍबसॉल्युटली बरोबर , आणि ह्याला जबाबदार होता मोटरमन. हो मोटरमनच. गाडी ने विक्रोळी सोडताना थोडासा पिक-उप घेतला होता आणि माझा चुकून पाय आई प्रवासी ला लागला होता. एव्हढ्यात दाराकडच्या नव्या दमाच्या फौजेच्या तुकडीत काहीतरी बेबनाव झाला होता.
पलीकडून : ए "गावडे"अंदर चल ना. इधर लोक लटकरेले है.
आतून : "ए भाय धक्का मत मार , अंदर जागा नाही है"
पलीकडून : ए "पांडू" उपराका हाथ छोड चे चल ना, पीछे सब लटक रेले है.
पलीकडून : तर मग काय मी बोललेलो का हीच गाडी पकड.
मधूनच : जाऊ दे रे, एक पाऊल पुढे हो थोडासा, तो पण बाहेर लटकलाय.
पलीकडून : त्या चित्त्याला सांग . बोलतोय बघ ना कसा.
अजून एक मधूनच : कोण तो रे शाणा.
गर्दी : जाने दो ना भाय. दो मिनिट के लिये कायको झगडणे का.

त्या " कायको झगडणे का" नंतर सगळं शांत. ज्याने हे "कायको झगडणे का." बोललं होता तो त्याच्या शेजाऱ्याला भांडण किती वाईट असतं त्याचा आपल्या मनावर किती वाईट परिणाम होतो. इत्यादी विषयावर व्याख्यान द्यायला लागला.श्रीयुत : गावडे श्रीयुत : पाण्डु सोबत श्रीयुत :चित्ते पण शांत झाले.
इकडे त्या पांडू गावडेच्या आरोळ्यात मी आई -प्रवासीला " सॉरी " म्हणून घेतलं. एवढ्यात विंडो कडची सीट खाली झाली, मी पुढे होऊन बसणार इतक्यात शेजारच्या सीटवरचा बॅगवाला खिडकीकडे सरकला. माझा क्लेम होता त्या सीटवर, पण ५ मिनिटापूर्वीच त्याने दाखवलेलं सौजन्य लक्षात घेऊन मी तो क्लेम सोडला. आणि खिडकींगून दुसऱ्या सीट वर बसता झालो. प्रवासाचा एक अध्याय संपला होता. समोर बसलेल्या बेटी-प्रवासीकडे एक चोरटा कटाक्ष टाकत मी सेटल्ड झालो.

समोरची पोर मोबायलातच गुंग होती. मी सुद्धा खिशातून मोबाईल काढला आणि हेडफोन कानात खुपसले. दुपारीच एका ऑफिस च्या हाऊस-किपींग वाल्या पोराकडून "भावबली" घेतला होता. मेट्रोमधून येताना थोडीशी सुरुवात पाहिली होती. जिथे पॉज केला होता तिथूनच पुढे पाहायला सुरुवात केली. जसा सिनेमा आणि स्टेशन पुढे पुढे जात होती तसा आजू बाजूचा, गर्दीचा , ट्रेन च्या रुळांच्या कपलिंग चा, गाडी सुटतानाच्या अनाऊन्समेन्टचा , असा सगळ्यांचा आवाज कमी होत गेला. मी एकाग्र होऊन पिक्चर बघायला लागलो होतो. मुलुंड जाऊन ठाणे येणार होता. गाडी कोपरीच्या फुला खाली सिग्नलसाठी स्लो झाली होती. उभ्या असलेल्या एकाने एक चोरटी आरोळी ठोकली " चालो शीएसष्टी, थाना आया." बसलेल्या एका दोघानाही हळूच डोळे उघडून कन्फर्म केलं कि ठाणा आला कि नाही. आणि दुसऱ्याच क्षणाला पापण्या मिटल्या. ती मिटलेली कमलदल पाहून घाटकोपर पासून उभ्या असलेल्या काही भृंगानी बसण्याचा नाद सोडून दिला. कारण आता ती कमलदल डोंबिवली स्टेशन पाहायलाच उघडणार होती.आणि तसाच झालं जे उभे होते ते शेवटपर्यंत उभेच राहिले.

क्रमश:

हे ठिकाणसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

रघुनाथ.केरकर's picture

27 Jul 2017 - 3:45 pm | रघुनाथ.केरकर

सं.मं. ते "भाग एक" च्या पुढे मागच्या भागाची लिंक डकवाल का?

रघुनाथ.केरकर's picture

27 Jul 2017 - 5:21 pm | रघुनाथ.केरकर

एक्दम पटकन केलत...

संग्राम's picture

27 Jul 2017 - 4:09 pm | संग्राम

हाही भाग मस्त !!!

पाटीलभाऊ's picture

27 Jul 2017 - 4:19 pm | पाटीलभाऊ

हा भाग पण मस्त...!

"गावडे, पांडू, चित्त्याला." वा काय शब्द शोधून काढलेत. एक नंबर.

विशुमित's picture

27 Jul 2017 - 4:47 pm | विशुमित

"चित्ता " आवडला

पद्मावति's picture

27 Jul 2017 - 4:48 pm | पद्मावति

क्या बात है! हाही भाग मस्तच.

ज्योति अळवणी's picture

28 Jul 2017 - 7:35 am | ज्योति अळवणी

झक्कास. येऊ दे पुढचा भाग लवकर

पैसा's picture

6 Aug 2017 - 10:29 pm | पैसा

मस्त आहे! लोकलचा घरबसल्या अनुभव आम्हाला!

चांदणे संदीप's picture

9 Aug 2017 - 3:00 pm | चांदणे संदीप

+१
और आन्दो!

Sandy

अभिदेश's picture

9 Aug 2017 - 12:56 am | अभिदेश

मुलुंड ते SEEPZ via अंधेरी असा लोकल प्रवास केला त्याची आठवण झाली. त्याकाळी (१९९९ )दादरला लोकल बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. संध्याकाळी दादर लोकलला , तेही फास्ट , चढण्याचा थरार आठवला. पण आता हे करू शकेल असा आत्मविश्वास राहिलेला नाही.