बादलीयुद्ध ११

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
23 Aug 2016 - 11:54 pm

सुमडीत कुमडी म्हणून त्यादिवशी नुसताच बसून राहिलो. परीक्षेचे दिवस फार वैतागवाणे. म्हणजे रात्रीसुध्दा डोके वगैरे ओले करुन अभ्यासाला बसणे ही माझी पद्धत होती. पुस्तकात जरा कुठं डोकं घातलं की मन कुठल्यातरी डोंगरावर वगैरे जाऊन भटकायचं. हे फार वाईट.
मागं एकदा कुणी सांगितलं होतं की पेटत्या मेनबत्तीकडे एकटक बघत राहावे. मी लाईट वगैरे बंद करुन तसा बघत ही बसलो होतो. बराच वेळ. मग भीतीच वाटायला लागली. बरीच भुतंबितं आजूबाजूला वावरत असल्यासारखी वाटायला लागली. म्हटलं नकोच हे. नंतर पुस्तक उघडल्यावर अक्षरं दिसायची पंचाईत झाली. ते वेगळंच.

नंतर भिंतीवर एक कोरा कागद लावला. त्याच्या मधोमध ठिपका वगैरे. जोरदार श्वाशोच्धवास करायचा आणि त्या ठिपक्याकडे बघत राहायचे. ठिपक्याचं माहित नाही पण जोरात श्वास घेतल्याने डोकं गांगरुन जायचं. मला ते फारंच आवडायला लागलं. कारण त्या धुंदीत अभ्यास लैच कडक व्हायचा. तंद्री लागायची. एक वेगळं बळ. चिकाटी. अशी तंद्री लागली की मी कुण्याच्या बाला सोडत नाही. मेसमध्ये जेवण करताना, आंघोळीला जाताना, टपरीवर नाष्टा करताना माझी नुसती गडबड चालू राहते. डोक्यातल्या डोक्यात फॉर्म्युले घोळवत राहणे अशा वेळी फार भारी वाटतं. जगापासून अलिप्त. आपण आपल्या पुस्तकी जगात. अशा वेळी आपण कुणाला हुंगत नाही. जास्त कुणाशी बोलत नाही. रक्त सळसळतं. बाकीची गाबडी टाईमपास करतात. फुकट मरणार साले.

टेकडीवरुन मी एक कोऱ्या पानांची वही आणली. दिवसभर त्याच्यात महत्वाच्या डेफिनेशन्स, चार्ट्स, उतारे, आकृत्या, परिक्षेला हमखास पडणारे प्रश्न, आणि बरेच काही लिहून काढले. रात्री मग सगळे भिंतीवर चिटकवून टाकले. खोलीभर माझ्या सगळी पानेच पाने. रोज सकाळी मी उठायचो. कुठल्याही एका पानासमोर उभा राहायचो. डोळे बंद करुन मग त्यावर जे लिहीलयं ते बडबडायचो. जरा काही चुकलं की तेवढ्यापुरता डोळा उघडायचा. हवी ती ओळ वाचायची. मग पुन्हा बडबड सुरु.
हे सगळं करायला जाम मजा आली. वाटलं ही परिक्षा संपूच नये.

नंतर मला भल्या पहाटे जाग यायला लागली. आपोआपंच. ताजीतवानी अगदी. मग मी उठून पुस्तक घेऊन लायब्ररीच्या मागे गवतावर जायचो. तिथेपण जोरजोरात श्वास. काहिवेळा तर अगदी तासंतास. नायट्रोजन, हायड्रोजन, न जाणो कुठलेकुठले बॉम्ब माझ्या रक्तात विरघळून गेले होते. फारंच अद्भुत वाटायचं. स्फूर्तीचा जिवंत झरा.

वीरप्पन 'सकाळ'मध्ये पेठेत पडलेल्या कुठल्यातरी दरोड्याविषयी वाचत बसला होता. मी म्हटल, ह्याट. आसलं कायपण मी वाचणार नाही. माझं कॉन्सेट्रेशन भंग करणं एवढं सोपं वाटलं काय!
त्यादिवशी एकाच बैठकीत कादंबरी वाचल्यासारखं आख्खं 'एफ.एम.' मी ए टू झेड वाचून काढलं. पेपर पण भयानक सुंदर गेला. पन्नासपैकी गेलाबाजार 45 ला कमी नाही.
पेपर देऊन प्रसन्न मनाने बाहेर आलो. दोन दिवसांनी माझा आवडता गणित होता. म्हणजे एक कादंबरी संपवून त्याच्यापेक्षा सकस दर्जेदार दुसरी कादंबरी हातात. वाहवा!
रुमवर आलो. पोरं अजून आली नव्हती. त्यांचा त्या पुचाट गप्पा. हे सोडवलं का? ते सोडवलं का? नेमकं हेच राहीलं होतं. आणि तेच आलं. आता वाटी वस्तरा.
गोरखं पेपर घेऊन त्याच्या रुममध्ये जायचा. प्रत्येक प्रश्नापुढे त्याला जेवढे मिळतील ते मार्क्स लिहायचा. कसबसं पासिंगचं बजेट काढून मग निवांत झोपायचा. मी आल्या आल्या प्रश्नपत्रिका सुरळी करुन कपाटाच्या खाली. विषय बंद.

मुळात 'एफ.एम.' एवढा सुंदर गेल्यावर गणिताचा अभ्यास लगेच सुरु करणं प्रशस्त नाही वाटलं. म्हटलं झोप घ्यावी. उगाचच पडून राहिलो. छानछोक्या कादंबरीचं पहिलं पान उघडण्याअगोदर मुहूर्तच शोधावाच लागणार. बाकीची पुस्तकं मी दोन दोन महिने अगोदरंच लायब्ररीत आणली होती. पण गणिताचं मात्रं विकत घेतलं होतं. खुद्द माझं.

संध्याकाळी लायब्ररीत गेलो. पुस्तकं बदलली. पुढच्या पेपरची पुस्तकं अर्थातंच मिळाली नाहीत. म्हटलं ऐनवेळी कायतरी लोचा करुच.

मग तिथंच गणिताचा अभ्यास करत बसलो. सुमडीत कुमडी गणिताचा अभ्यास एवढ्या लवकर सुरु करणारा बहुदा पहिला मीच असावा. कारण तिथंली बहुतेक टाळकी गणित सोडून भलत्याच विषयात रंगलेली होती. शुद्ध गावरान गप्पा. एकजणतर टेबलावर आडवा पडून खुर्चीवर बसलेल्या जोडप्याशी गप्पा हाणत खो खो हसून वात आणत होता. गणिताचा काय मूड लागेना. एकतर याच्याआधी भरपूर पारायणे झाली होती. सारखी सारखी वाचलेली कादंबरी पुन्हा नव्याने ठाव घेत नाही असं काहीसं झालं. त्यात आमचे पिंगळेमहाराज मला चुकवून शेवटच्या कोपऱ्यात जावून बसले. मग आम्ही उठून त्यांच्याशेजारी बसून भरपूर गप्पा वगैरे झोडल्या. मग बाहेर जाऊन पानटपरीवर त्याच्यासोबत बिड्या वगैरे फुंकणं हे आलंच. अर्थात आम्हाला कसलेच व्यसन नाही.
मग मेसमध्ये जाऊन जेवण कसबसं घश्याखाली ढकललं. हेच जेवण आम्ही रोज जेवतो. नसतं केलं तरी ती स्फुर्ती वगैरे अगदी जिवंत राहिली असती. पण आज कुठेतरी काहीतरी बोंबललंय हे आम्हालाही कळून चुकलं.

होस्टेलवर आलो. बरेच नग कानटोप्या घालून झोपायच्या तयारीत. अरे गणित आहे राजाहो, झोपा कसल्या काढताय!
रुममध्ये आलो. म्हटलं आज फुल नाईट मारायची. डोकं वगैरे तथास्तु चिंब वगैरे भिजवून खाटंवर मांडी घालून बसलो. टेबल पुढे ओढला. वही हातात. मग झालो सुरु.
राहून राहून ती 'एफ.एम.'चीच इक्वेशन आठवायला लागली. गणित गेलं बोंबलत 'एफ.एम'चाच हँगओव्हर अजून उतरला नव्हता. म्हटलं उगाच एवढा अभ्यास केला. आता दुसरा पेपर डोक्यात घुसवायचा तरी कसा?
मग पुस्तक हातात घेऊन तसाच लवंडलो. आता झोपूनच अभ्यास करायचा. पण सगळं जग झोपलं असताना आपण कसला घंट्याचा अभ्यास करणार. मग विचार केला. गणिताचं आपलं सगळं आधीच करुन झालंय. आपल्याला अभ्यासाची गरजंच काय? पुस्तक बाजूला ठेवलं. मग झोपलो. साली ती झोप पण लवकर आली नाही.

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर वगैरे अजिबात जाग आली नाही. निवांत सकाळी उठलो.
टपरीवर नाष्टा वगैरे केला. मग गोरखकडे गेलो. तो तर त्याचे जुनेच विषय सोडवण्यात दंग होता. मग दिलीपच्या रुमवर उगाचच चक्कर टाकून आलो. बघावं तेव्हा तो रुमवर अजिबात नसतो.
शेवटी पुस्तक हातात घेतलं. मग खाली आलो. वीरप्पनकडे जाऊन कालचा पेपर इत्यंभूत वाचला. साले भुरटे चोर. दोन लाख पळवले. ते पण बँकेतून.

सगळी सकाळ ह्यातंच गेली. मग हालत डुलत थेट कॉलेजच्या गच्चीवर गेलो. कॉलेजच्या गच्चीवर दोन मोठमोठाल्या पाण्याच्या टाक्या. काळ्या कुळकुळीत. बरोबर त्यांच्या मध्येच बसलो. बारक्या पाईपातून पाणी लीक होत होतं. सुमडीत बसून अभ्यास केला. शेवटी पायाला रग लागली. मग उठून जरावेळ फिरलो. कठड्याला रेलून उंचावरुन दिसणारा आमच्या कॉलेजच्या परिसर डोळ्याखालून घातला. ती टेकडी, ते होस्टेल, तो रस्ता, आहाहा!. शाबूद्दिनचा गाडा मात्र दिसत नव्हता. झाडाआडची टपरी तेवढी दिसली.

दुपारी मेसमध्ये जेवण केलं. मग लायब्ररीच्या पाठीमागच्या पायऱ्यांवर अभ्यास करत बसलो. तिथंही कंटाळा आला. उठून कँटींगकडे चाललो तर कँटींगच्या मागच्या भिंतीला टेकून आमचे टॉमचे मास्तर आणि ईलेक्ट्रॉनिक्सच्या नवीन बाई पायात पाय घालून गप्पा हाणत बसले होते. मला बघून बावचळूनच गेले. म्हटलं परिक्षा सुरु आहेत लेकाहो, जरा सांभाळून. कुठून कशी पोरं घुसतील सांगता यायचं नाही.

हीच मॅडम पुन्हा टिल्लूच्या कारमध्येही दिसली होती. एकतर त्या मॅडमचं लग्नही झालं होतं. याच कॉलेजात शिकून इथंच नोकरीला लागली होती. 'लाडो' म्हणून तिनं तिचा काळ गाजवला होता. कुण्या एकेकाळी होस्टेलमध्ये तिचा टॉपीक हिट होता. आणि हा टिल्लू म्हणजे आमचा फिजिक्सचा मास्तर. पोरं त्याला टिल्लू म्हणायचे. कारण त्याच्या नावाचा शॉर्टफॉर्म T.L.L. असा होता.

शेवटी मी लायब्ररीतच जाऊन अभ्यास करायचं ठरवलं. सगळंच माहिती असलेलं पुस्तक पुन्हा एकदा वाचून काढलं. कठीण प्रॉब्लेम बाजूला काढून मग सोडवत बसलो. रात्री जेवण वगैरे करुन मी अकरा वाजेपर्यंत लायब्ररीतंच होतो.
शेवटी पिंगळेमहाराज वगैरे आले. मग त्यांच्याशी गप्पाटप्पा. मग होस्टेलवर येऊन झोपलो.

दुसऱ्या दिवशी उठल्यावर मी भयानक श्वासोच्छवास वगैरे करुन फुल तयारीत पेपरला. उडपीत जाऊन एक उत्ताप्पा आणि कडक चहा मारला. तिथे सिगारेट ओढत चॅको वगैरे भेटला. तो चालत चालत पण पुस्तक वाचत होता.
बऱ्याच गडबड गोंधळात मग परिक्षा हॉलमध्ये आलो. सुरुवातीच्या पाच मिनिटात डोळे मिटून छान पार्थना वगैरे केली. मग पेपर वाटले.

कधी वाचत नाही. पण त्या दिवशी मी गणिताचा पेपर मी आख्खा च्या आख्खा वाचून काढला. जवळजवळ सगळेच प्रश्न मला येत होते. अगदी ऑप्शनल प्रश्नांसकट. जाम उतावळा झालो.
मग मी लिहायला सुरुवात केली. पहिला प्रश्न सोडवताना मला हमखास तिसरा चौथा प्रश्न बोलवत राहायचा. ये बाबा ये, माझ्याकडं लवकर ये. मग भरभर भरभर लिहीत झेपावंतच तिकडे जायचो. तो सोडवताना पाठीमागचे बोलवत राहिले. मग भरभर भरभर लिहून पुन्हा त्यांच्याकडे जाणे. हे असं शेवटपर्यंत चाललं.
पेपर जेव्हा सगळा सोडवला तेव्हा मला जाणवलं की मी एकही प्रश्न व्यवस्थित माझ्या मनासारखा लिहीलेला नाही. जागोजागी गोंधळाची परिस्थिती. अर्थात मी आरामात पास होऊ शकलो असतो. पण मुळात स्कोरींग सब्जेक्ट असा काठावर वगैरे पास होण्यात सोडला तर कसं व्हायचं. मग विचार केला. नेक्स्ट टाईम व्यवस्थित पेपर वगैरे लिहून आपण आऊट ऑफ नाही किमान 90 च्या वर तरी जाऊ शकतो.

मग दणादण सगळ्या पानांवर मी उभ्या आडव्या रेघा मारत गेलो. एवढं करुन पण साल्यानं पेपर चेक केला तर काय घ्या. म्हणून मी दोन तीन ठिकाणी ठळक अक्षरात नोट लिहीली. हा पेपर चेक करु नका वगैरे. नाहीतर बघतोच तुला.

फर्स्ट टाईम आमच्या आयुष्यात गुणपत्रिकेवर 'नापास' असा शेरा येणार होता.

दहा मिनिटं अगोदरंच पेपर देऊन मी होस्टेलवर आलो. बऱ्याच जणांनी मला विचारलं की तू एवढ्या लवकर कसा काय आलास?
मी म्हटलं, मी पेपर स्क्रॅच केलाय.
पेपर स्क्रॅच करणे हे इथले भयानक फॅड होते.

त्यांनी तिथल्या तिथे माझा जाहीर सत्कार करुन टाकला. म्हणाले, वेलकम टू क्लब!

-------------------------------------------------------------------------------
क्रमशः

बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा , सात , आठ , नऊ , दहा
------------------------

कथा

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

24 Aug 2016 - 12:24 am | बाबा योगिराज

फ्याशन ग्येली का काय???

उडन खटोला's picture

24 Aug 2016 - 12:58 am | उडन खटोला

अरे नको बाबा त्या केट्या. एटीकेटी नको नको करते. असले माज आम्ही पण केले
नंतर 'खुल्ता कळी खुलेना' झालं

निओ's picture

24 Aug 2016 - 1:50 am | निओ

पेपर स्क्रॅच करणारे, ऑपशनला टाकून हॉस्टेलमध्ये झोप काढणारे ...सर्व आठवले.

गामा पैलवान's picture

24 Aug 2016 - 2:28 am | गामा पैलवान

जव्हेरगंज, एफेम म्हणजे फ्ल्युईड मेक्यानिक्स आणि टॉम म्हणजे थियरी ऑफ मशीन्स वाट्टे? गडी मेक्यानिकलचा दिसतोय? अहाहा. कॉलेजाचे दिवस आठवले. काय एकेक विषय आणि तासंतास चाललेल्या डोकेफोडी !
आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

24 Aug 2016 - 10:39 pm | पगला गजोधर

एफेम बाय आर एस खुर्मि.....

जय खूर्मी बाबा....

खटपट्या's picture

24 Aug 2016 - 4:21 am | खटपट्या

पेपर स्क्रॅच = नसती अवदसा

पु.भा.प्र.

नावातकायआहे's picture

24 Aug 2016 - 5:45 am | नावातकायआहे

माज. बाकी काहि नाही...

लालगरूड's picture

24 Aug 2016 - 7:18 am | लालगरूड

ल्लू ल्लू !!!! M3 निघत नाही लवकर

माझा अनुभवः

माझा दुसर्‍यांदा क्रिटीकलला असताना निघाला होता. तिसरं वर्ष ऑल क्लियर, पण एम३ मुळे डाऊन.
(शेवटच्या अटेम्प्टला लाप्लास, फुरियर, झेड ट्रान्सफॉर्म या तीन युनिट्सचे जिगरचे रिडक्शन घेऊन पेपरला बसलो. मोजून चाळीस मिळाले होते.)

ज्योति अळवणी's picture

24 Aug 2016 - 8:03 am | ज्योति अळवणी

बादलियुद्ध वाचून एकदा तरी हॉस्टेलची मजा अनुभवायची इच्छा झाली आहे. जबरदस्त लिहिता तुम्ही जव्हेरगंज

पैसा's picture

24 Aug 2016 - 10:32 am | पैसा

मस्त!

यमगर्निकर's picture

24 Aug 2016 - 12:45 pm | यमगर्निकर

तुमच्या लिखानाची पध्दत लै भारि आहे राव. कथा रंगवुन सांगण्याचि लकब येत असेल तर कथाकथनचा मस्त कार्यक्रम होइल तुमच्या बादलियुध्दवर अगदि पुलंच्या सारखा.

जव्हेरशेठ पुन्हा लिखाण बदललं राव तुम्ही।
पण असो जव्हेरशेठ लिहितायेत आणि आवडणार नाही असं कसं होईल।
एक नंबर

नेहमीप्रमाणे तुफान जव्हेरभाऊ...

साती's picture

24 Aug 2016 - 11:06 pm | साती

जव्हेरगंज ,
तुमच्या लिखाणाने अगदी 'याड लागलं' अवस्था झालीय.

मस्तं वगैरे लिहिताय.

शित्रेउमेश's picture

25 Aug 2016 - 9:47 am | शित्रेउमेश

जबरदस्त....

नाखु's picture

25 Aug 2016 - 10:20 am | नाखु

हे सगळं कसं अफाट विलक्षण वगैरे वगैरे आहे...

नाखुक मिपागावकर

हे नवंच ऐकलं पेपर स्क्रॅच!
पुभाप्र पुभाप्र

रातराणी's picture

28 Aug 2016 - 10:47 am | रातराणी

=))
जाने कहाँ गये वो दिन!

पगला गजोधर's picture

28 Aug 2016 - 6:02 pm | पगला गजोधर

:)

अभ्या..'s picture

28 Aug 2016 - 6:44 pm | अभ्या..

और ये मौसम, नदीका किनारा, चंचल हवा.

पगला गजोधर's picture

28 Aug 2016 - 7:24 pm | पगला गजोधर

हवा ऐ हवा, खुशबू लुटा दे।
कहा खुली हा खुली, झुल्फ बता दे....

घ्या द अक्षर...

अभ्या..'s picture

28 Aug 2016 - 7:27 pm | अभ्या..

जव्हेरभाऊ हाणतील द अक्शर बादलीत घेऊन.
आता बास.

.

जव्हेरभाऊ, लवकर लवकर भाग यायची सवय लावलीत आता आणा पटकन नवी बादली.

टर्मीनेटर's picture

16 Sep 2016 - 10:48 pm | टर्मीनेटर

एक नंबर...