मुल्यांकन (?) : (शतशब्दकथा)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
12 Jul 2015 - 2:30 pm

आमचा पेर्णास्त्रोतः ही प्रतिक्रिया हे गंमत म्हणुन लिहिलेलं आहे तस्मात हलकं घेणे हे.वे.सां.न.ल. आक्रमक प्रतिक्रियांसाठीचा ड्रॉपबॉक्स पौड फाट्यावर ठेवलेला आहे. तस्मात :)!!

विद्यापीठामधल्या परिक्षा विभागाचा पेपरतपासणीविभाग प्रचंड गडबडीमधे दिसत होता. परिक्षा होउन दोन महिने गेलेले होते. त्यामुळे "निकाल" लावायचं काम जोमानं चालु होतं. सकाळीचं नवा फ्रिज घेण्यावरुन बायकोशी भांडण झालेले प्राध्यापक सोनटक्के घुश्शातचं मेकॅनिक्सचे पेपर तपासत होते. प्राध्यापकांची लेखणी गुण लिहित असली तरी डोकं मात्र सकाळच्या भांडणामधेच अडकलेलं होतं. समोरच्या पेपरवर भोपळा काढताना आपला राग शांत होतोय हे त्यांच्या लक्षात आलं. पंधरा दिवस गेले आणि निकाल लागला. त्याच्या हातामधे गुणपत्रिका होती आणि डोळ्यामधे पाणी होतं. होस्टेलच्या खोलीवर परत येउन त्यानी एकदा गुणपत्रिकेकडे पाहिलं आणि त्यानी खुर्चीवर चढुन दोरीला गाठं मारायला सुरुवात केली. सोनटक्क्यांच्या घरी नव्या फ्रिजच्या खोक्याच्या दोरीची गाठ सोडली जात होती.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2015 - 2:32 pm | टवाळ कार्टा

आयला....भारीये

माम्लेदारचा पन्खा's picture

12 Jul 2015 - 2:41 pm | माम्लेदारचा पन्खा

सोनटक्क्यांचं चुकलंच जरा.... भोपळा नसता दिला तर एक निरपराध जीव वाचला असता !

सदोष मनुष्यवधाचे कलम लावायला हरकत नाही.... आत्महत्येस प्रवृत्त करणे हेही कलम चालेल !!

प्यारे१'s picture

12 Jul 2015 - 2:57 pm | प्यारे१

कथा पटली नाही.
mechanics उडाला म्हणून छताला दोरी???
सोनटक्केनी टक्के नाही दिले म्हणून डायरेक्ट गाठी? विन्जिनीरिंग ची पोरं घाबरत नसतेत असल्या के ट्या ला.
बाकी प्रा डॉ नेहमी बेशुद्धलेखन तपासून मार्क देत असतात. मग ते स्वतचं असलं तरी! (ह.घ्या. सर )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 3:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माप आणि प्यारे

फक्त दोरी बांधली. ती कशाला आणि का हे नै लिहिलेलं. ;) कदाचित कपडे वाळतं घालायसाठी असावी. ;) ;)!! पण अश्या घटना घडतात. युनिव्हर्सिटीचा स्वानुभव आहे.

प्रसंगाचं गांभीर्य कसं कळावं मग??? ;-)

कथा म्हणून खरंच मस्त आहे. अर्थात दोरी कपडे वाळत घालायला पण बांधली असेल, हा युक्तिवाद बरोबर आहे. आपण पण कधीतरी कंटाळतो ह्या सगळ्याला. पण म्हणून टोकाचे निर्णय घेणारे फार्र कमी. असो असं कुणाच्याच बाबतीत घडायला नको.

आदूबाळ's picture

12 Jul 2015 - 3:15 pm | आदूबाळ

मॉडरेशन असतं की हो...

- (मास्तराचा नापास पोर) आदूबाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 4:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ऑन सिरियस नोट.

मॉडरेशन हा पेपरतपासणीपेक्षा हास्यास्पद प्रकार आहे. जर मॉडरेशन गंभिरपणे केलं असतं आणि त्यानुसार कारवाई झाली असती तर इंजिनिअरिंगचा पासिंग रेट नक्की वाढला असता. कारण जेन्युइनली अभ्यास करणारा नापास कसा होईल?

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jul 2015 - 3:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

बाकी कथेला माझ्याकडून पाचशे पैकी दीड गुण.

प्रा.डॉ. सोनटक्के उर्फ पैजारबुवा,

प्रतिसाद क्र २.

मेकॅनिक्सच्याच विद्यार्थ्यांवर आत्महत्या करायची जबाबदारी हे नाकर्ते सरकार घेणार आहे का? आर्ट्स आणि कोमर्स चे विद्यार्थी नेहमी सत्ताधीश होतात आणि ते जाणून बूजून इंजिनिअरिंगवर अन्याय करतात. हे शोशण आता थांबलेच पाहिजे या साठी इंजिनिअरिंग विद्यार्थी नेते वरद जोशी मागील पन्नास वर्षे लढा देत आहेत.

अभ्यास कसा करायचा , हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सांगायची गरजच नाही. फक्त मार्क मिळवणे त्याच्या हातात नाही म्हणून विद्यार्थी नापास होता आहेत . मार्कांची सुबत्ता येऊन इंजॆनिअर लोकांची फळी निर्माण करायची असेल तर सर्व हितचिंतकांनी विद्यार्थांना मार्क वाटण्याच्या प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी साठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शिक्षणामध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

पंगाधर कुटे उर्फ पैजारबुवा,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 3:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हसुन हसुन "लोल"वलत हाँ!!

मैकेनिक्सच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये असलेले अनुत्तीर्ण होण्यामुळे आत्महत्याप्रवण विचारांचे प्रमाण आणि सुद्धा गूगलमध्ये म वर अर्धचंद्र देण्यात येणाऱ्या अडचणी

*हा धागालेख चीकीप्रकल्पांसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
*अनुषंगिक नसलेले आवांतर टाळण्यासाठी आभार

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2015 - 5:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2015 - 3:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे देवा...!!! चालु द्या.

-दिलीप बिरुटे

सरांना माध्यमिक शाळेवर आणा रे कुणीतरी! आठवीपर्यंत कुणालाही नापास करायचं नाही सर. प्वार् ल्हान हाय जौंद्या ना सर.
पाठीवर हात ठेवून फ़क्त (जिल्बी) काढ़ म्हणा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2015 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादात मी जेव्हा दीड गुण लिहित होतो म्हणजे मनातल्या मनात अर्धा प्रतिसाद लिहून तो उतरवत होतो तेव्हाच मला
कॅप्टन जॅक स्पॅरोची शेपटी ओढायचा मोह झाला होता.

कॅप्टन जॅक स्पॅरो खूप छान लिहितात, त्यांचे प्रतिसादही छानच असतात, भांडन (वैचारिक) तेही दर्जेदार असतं. मिसळपावकरांची मेरीट लिष्ट काढू तेव्हा ते पहिल्या शंभरात नक्की असतील. ( हे माझं मत पुढे बदलुही शकतं)

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 4:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणी शेपटीला हात घातला हे पहायला जरा दोन पावलं मागे झालो तर चुकुन तुमच्या शेपटावर पाय पडला. आयला असा घोळ आहे होय. बाकी तुम्ही उत्तरपत्रिका तपासत असताना पहिल्या १०० मधे वगैरे काय मी येत नै ह्याची ग्यारंटी. त्यासाठी मला शेटिंगचं लावावी लागणार नैतर कॉपी करावी लागणार कोणाचीतरी. हलकच्चं घ्या. म्हणुनचं ढिस्केमर टाकलाय वरती.
( )

-कॅप्टन जॅक स्पॅरो-

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2015 - 4:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालु द्या....!!!

-दिलीप बिरुटे

एका बुवाने सांगितलंय आम्हाला "ललित लेखनाचे मुल्यांकन वगैरे करू नका ,तुम्हाला कायपण कळत नाही त्यातलं."

"हान् तेज्याल्या." हा वाक्प्रचार तुम्ही ठेवलेल्या पौडफाट्यावरच्या वडाफुनच्या ड्रापबाक्सात टाकून आलेलो आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

12 Jul 2015 - 4:32 pm | माम्लेदारचा पन्खा

आपापल्या शेपट्या सांभाळा बाबांनो.....

अन्या दातार's picture

12 Jul 2015 - 4:49 pm | अन्या दातार

चालूद्यात :)

रातराणी's picture

12 Jul 2015 - 9:19 pm | रातराणी

कितवा अटेंप्ट होता ओ? पहिल्याला घरी आधीच सांगितलेल असतं, मेकेनिक्स आणि ग्राफिक्स राहणार. त्यामुळे लगेच दोरी नायत लावत कोण.
तरीपण कथा आवडली आणि पैजारबुवांचा प्रतिसाद पण _/\_

श्रीरंग_जोशी's picture

12 Jul 2015 - 9:25 pm | श्रीरंग_जोशी

कथा आवडली.

पैजारबुवांच्या प्रतिसादाने चार चंद्र लावले आहेत.

सिरुसेरि's picture

12 Jul 2015 - 10:05 pm | सिरुसेरि

हे कुठले विद्यापीठ जिथे रीव्हॅल / रीचेक ची सोय नाही .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 10:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुणे युनिव्हर्सिटीच्या अजब कारभाराचा तुम्ही अनुभव घेतला नसावा, रिकामे पेपरवाल्यांचे पेपर रीव्हॅल्युएशन मधे निघणं पेपर लिहिणार्‍यांचे पेपर रहाणं वगैरे प्रकारांचा अनुभव घेतलात तर समजेल.

आणि लेखाला गंभिरपणे घेउ नका. काडी टाकायची होती म्हणुन टाकलेला लेख आहे. उद्दिष्ट सफल झालय. दोन दिवसात संपादकांना सांगुन लेख काढुन टाकायला सांगेन.

श्रीरंग_जोशी's picture

12 Jul 2015 - 11:49 pm | श्रीरंग_जोशी

प्रत्येक सत्राच्या निकालानंतर ज्यात नापास झालो ते पेपर रिव्हॅलला टाकत असे. फक्त पहिल्या सेममध्ये एक क्लिअर झाला. ते देखील परिक्षेच्या एक आठवडा अगोदर निकालात कळले.

इतर अनेक पेपर ३६/८० मिळून अडकलेले असत. त्यातही रिव्हॅलमध्ये ४ मार्कांची कृपा कधी मिळाली नाही.

प्रत्येक सत्रात केवळ तीन पेपर्स रिव्हॅलला टाकता यायचे अन त्या काळात (२००२-०५) प्रति पेपर ₹३०० खूप महाग वाटायचे.

उगाचच प्रसाद म्हणून मिळालेले पेपर्स बॅकलॉगला टाकले जायचे. ऑल क्लिअर वाली मंडळी केवळ कमी मार्क मिळाले म्हणून पेपर्स रिव्हॅलला टाकत असत अन काही वेळा त्यांच्यावर विद्यापीठ कृपा करायचे. माझेही पास झालेले पेपर्स असत ज्यात अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले असत. परंतु ते रिव्हॅलला टाकण्याची संधी कधी मिळाली नाही.

वर्गात अनेकांनी रिव्हॅलला टाकले तरी रिव्हॅलद्वारे क्लिअर झालेली उदाहरणे म्हणजे त्या सहाध्यायालाही आशचर्याचा धक्का असायचा.

मधुरा देशपांडे's picture

12 Jul 2015 - 10:44 pm | मधुरा देशपांडे

कथा आवडली आणि पैजारबुवांचा प्रतिसादपण. अर्थात ते एकदम दोरी लावणं वगैरे उगाच्च दिसतंय, पण गुण मिळवायला तेवढा मसाला भरवलेला दिसतोय ;)
बाकी पुणे विद्यापिठातच एका विषयात १७ गुण वाढले होते रिव्हॅलला. रिव्हॅलचा निकाल येईपर्यंत त्या पेपरचा अभ्यास परत चालु केला होता. पण नशीबाने बरेच आधी रिव्हॅलचा निकाल लागला. नाहीतर उद्या पेपर आहे आणि आज रिव्हॅलला विषय सुटला असेही झालेले पाहिले आहे.

माझ्या बाबतीत दोनदा दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना अशा विषयांमध्ये मला विद्यापीठाने नापास केले ज्यात मी डोळे झाकून पेपर लिहिले तरी डिस्टिंक्शन मिळवले असते!

तेव्हापासून (खरंतर शाळेपासूनच) माझा असा दृष्टिकोन झाला की आय अ‍ॅम द बेस्ट क्रिटिक ऑफ मायसेल्फ. दुसर्‍या कोणी मला नालायक म्हटल्याने मी खरेच नालायक होत नाही आणि तोंड फाटेपर्यंत स्तुती केल्याने फार भारी मनुष्यही होत नाही.

स्वतःकडे तटस्थपणे बघता येण्याची देणगी ही ज्ञानलालसेनेच प्राप्त होऊ शकते. तेव्हापासून मार्क्सिस्ट होणे सोडून दिले. :-)

बहुगुणी's picture

13 Jul 2015 - 7:12 am | बहुगुणी

मार्क्सिस्ट लईच उच्च! कोटी आवडली!

ज्योति अळवणी's picture

13 Jul 2015 - 1:15 am | ज्योति अळवणी

आवडली

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2015 - 10:43 am | टवाळ कार्टा

बर्याच दिवसांनी आलात...तुम्च्या लिखाणाच्ये इथे भर्पूर फ्यान्स हैत :)

नाखु's picture

13 Jul 2015 - 8:47 am | नाखु

केमीकल लोच्या हुता म्हून मेकॅनिकल साईड घावली नाही आणि बेकाम झालु. सोनटक्क्याचं काम वाचलं!!!!

कप्तान इस लेखनीमें दम है!
जे.के.सुपर सिमेंट

श्रीरंग_जोशी's picture

13 Jul 2015 - 8:52 am | श्रीरंग_जोशी

लेखनीमें जान है असे म्हणायचे असावे तुम्हाला :-) .

नाखु's picture

13 Jul 2015 - 9:02 am | नाखु

आम्चं चुक्याच!
धन्यवाद

श्रीरंग_जोशी's picture

13 Jul 2015 - 9:09 am | श्रीरंग_जोशी

भावना पोचल्या होत्याच...

तसंही बाडीमे क्या रख्खा है ;-) .

आदूबाळ's picture

13 Jul 2015 - 10:46 am | आदूबाळ

बाडीमे क्या रख्खा है ;-)

रूपा?

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2015 - 11:09 am | टवाळ कार्टा

भौतेक सुनील पाल

श्रीरंग_जोशी's picture

13 Jul 2015 - 7:49 pm | श्रीरंग_जोशी

भौतेक नाही, तोच - सुनील पाल.

हमारे सामने कोई खडा नही हो सकता...

(दारु की बहुत बास आती है) ;-)

- अवांतरासाठी क्षमस्व.

पैसा's picture

13 Jul 2015 - 11:01 am | पैसा

कथा वास्तववादी आहे. अकरावीला नापास झालेल्या आणि आठवीत नापास झालेल्या दोन मुलांच्या आत्महत्या आता २ महिन्यात ऐकल्या आहेत.

मूल्यांकन खरेच इनोदाचा विषय आहे. माझ्या मुलाला इंजिनिअरिंग ड्रॉईंगच्या पेपरात निकालात १० आणि फेरमूल्यांकनात ३४ मार्क्स दिले गेले होते. हे २४ मार्क्स कुठून वाढले माहीत नाही. पुन्हा परीक्षा दिल्यावर ६० मिळाले. जै हो त्या परीक्षा आणि पेपर तपासणार्‍या मास्तरांची! तो पहिल्या दुसर्‍या वर्षालाच असल्याने एवढे गंभीरपणे घेतले नाही. पण फायनल इयरच्या मुलाची अशी वाट लावली तर तो जीव द्यायलाच जाणार.

पैजारबुवांचा, स्वॅप्सचा आणि अनेक प्रतिसाद आवडले.

अविनाश पांढरकर's picture

14 Jul 2015 - 3:20 am | अविनाश पांढरकर

पूर्ण इंजिनीरिंगमध्ये एकंच पेपर रीव्हॅलला दिला ज्यात ११ मार्क वाढले. ४४ चे ५५ झाले. झाले एवढे उपकार बास म्हणत एकही पेपर रीव्हॅलला दिला नाही.

पैजारबुवांचा, स्वॅप्सचा आणि अनेक प्रतिसाद आवडले.

स्मिता.'s picture

14 Jul 2015 - 10:09 am | स्मिता.

इंजिनिअरिंग ड्रॉईंगच्या पेपराच्या बाबतीत माझाही अनुभव बरा नाही. मला कॉलेजात 'ड्रॉईंग चॅम्पिअन' म्हणत, वर्षभरात प्रत्येक ड्रॉईंग-शीटवर उत्तम असा शेरा मिळत असे. परिक्षेतही ८४ मार्कांचे ड्रॉईंग अगदी बरोबर काढले होते (हे खात्रीने सांगू शकते कारण ड्रॉईंग जर बरोबर नसले तर ते पूर्णपणे काढताच येत नाही), १६ मार्कांचे एक ड्रॉईंग काढायला वेळ पुरला नव्हता. माझ्या आजूबाजूच्या ५-६ परिक्षार्थींनी माझे बघून-बघून ड्रॉईंगस् काढले होते. निकाल लागला तेव्हा मात्र मला ४७ गुण आणि इतरांना ६० च्या आसपास!

स्वानुभव वगळता इतरांचेही अनेक अनुभव पाहिले आहेत. एका मुलाने स्वतः सांगितले होते की त्याने फारफार तर १५-२० मार्कांचा पेपर लिहिला होता. तो मात्र ५०+ मिळवून पास झाला!! एका वेळी माझ्याच वर्गात पेपर लिहायला असलेल्या मुलाला निकालात चक्क गैरहजर दाखवले होते.

तसंच रिव्हॅलचं... शेवटच्या वर्षाला असतांना एका मुलीचा दुसर्‍या वर्षाचा विषय राहिलेला होता. तो क्रिटिकलला असलेला विषय तिने रिव्हॅलला टाकून शेवटच्या वर्षाला अ‍ॅडमिशन घेतली. त्या सेमची प्रात्यक्षिक परिक्षा सुरू असतांना रिव्हॅलचा निकाल लागला आणि तिचा तो विषय पुन्हा राहिला. परिक्षा द्यायला आलेली त्या मुलीला निराश होवून घरी जाताना पाहिलीये.

या आणि अश्या अनेक अनुभवांवरून विद्यापीठांमधल्या कारभाराची प्रचिती आलेली आहेच.

विजुभाऊ's picture

13 Jul 2015 - 11:06 am | विजुभाऊ

आमच्या एका मित्राचे मार्क रीवॅल्युएशन मधे कमी झाले होते. ३२ चे २८ झाले........

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2015 - 11:09 am | टवाळ कार्टा

माझेसुध्धा डिप्लोमाला अस्ताना ८२ चे ८० झालेले...चायला आख्ख्या वर्गात अर्ध्याजणांना ९०+ होते त्या विषयात

रातराणी's picture

13 Jul 2015 - 11:16 pm | रातराणी

_/\_ खाली विशालभौंना दिलाय प्रतिसाद तोच आपल्याला पण!

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा

त्या पेपरला मला स्वतःला ९०+ ची खात्री होती...निकालानंतर अर्ध्या वर्गाला ९०+ होते (ज्यात अगदी तळागाळातले सुध्धा होते) म्हणून रिव्हॅलला टाकलेला...BC त्या कमी झालेल्या २ मार्कांमुळे इंजीनीअरिंगची अ‍ॅडमिशन PVPP ला न मिळता सांगली संस्थानात मिळाली :( भंगार कॉलेज तिच्या**

कपिलमुनी's picture

14 Jul 2015 - 2:56 pm | कपिलमुनी

सर्व सब्जेक्टमध्ये मिळून ८२ होते का ?

माझ्या मुलाला इंजिनिअरिंग ड्रॉईंगच्या पेपरात निकालात १० आणि फेरमूल्यांकनात ३४ मार्क्स दिले गेले होते. हे २४ मार्क्स कुठून वाढले माहीत नाही. पुन्हा परीक्षा दिल्यावर ६० मिळाले. जै हो त्या परीक्षा आणि पेपर तपासणार्‍या मास्तरांची!

असं होत असेल तर फार वाइट आहे. एखादा मुलगा/मुलगी मानसिक द्रिष्ट्या कोलमडून जाईल या प्रकाराने. इतक्या बेशिस्तपणे विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणार्‍या मास्तरचा त्रिवार धिककार.

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2015 - 11:10 am | टवाळ कार्टा

आख्ख्या महाराष्ट्रातल्या इंजिनीरिंग विद्यापिठांची हिच अवस्था आहे

विशाल कुलकर्णी's picture

13 Jul 2015 - 11:15 am | विशाल कुलकर्णी

मी तर रिव्हॅलचा धसकाच घेतलाच होता. डिप्लोमाला असताना डिजीटल टेक्नीक्सच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाले म्हणून पेपर रिव्हॅलला टाकला. ६७ चे ६४ झाले. त्यानंतर कानाला खडा.

कधीकधी तर वाटायचे काही प्रोफेसर्स पेपरच्या वजनावरून गुण देतात की काय? डिप्लोमाच्या तिसर्‍या वर्षाला आय.ओ.एम. च्या पेपरमध्ये सहा पुरवण्या जोडून अक्षरशः काहीही लिहीले होते. जेमतेम चाळीस-पंचेचाळीसची अपेक्षा होती आणि चक्क ८६ गुण मिळाले. त्या पेपरने मला डिप्लोमाला फर्स्ट क्लास मिळवून दिला असावा बहुतेक ;)

रातराणी's picture

13 Jul 2015 - 11:15 pm | रातराणी

67 मिळाले म्हणून रीचेक? भारी आहे!

मृत्युन्जय's picture

14 Jul 2015 - 10:31 am | मृत्युन्जय

मलाही लॉ मध्ये ६९ मिळाल्यावर रिव्हॅल ला टाकला होता. ६९ चे ८४ झाले. मला पेपर हाती आल्यापासुन खात्री होती की त्या वर्षीचा युनि टॉपर मीच असणार. या भोंगळ कारभारामुळे ते स्वप्न हुकले. मला कणभरही शंका नाही की माझ्याहुन चांगली उत्तरप्रत्रिका कुणाचीही नसेल. टॉपर ८७ चा होता. मला स्वतःला किमान ९२ ची अपेक्षा होती. मुळात ६९ चे ८४ होतात तेव्हा पहिल्यांदा पेपर तपासणार्‍या त्या दगडाच्या डोक्यात युनिव्हर्सिटी दगड घालते की नाही कुणास ठाउक? अश्या लोकांन तहहयात डिबार केले पाहिजे पेपर तपासण्यापासून.

तुडतुडी's picture

13 Jul 2015 - 1:11 pm | तुडतुडी

कधीकधी तर वाटायचे काही प्रोफेसर्स पेपरच्या वजनावरून गुण देतात की काय? >>>

होय होय होय … काहीतरी लांबलचक खरडायच . प्रोफेसर कुठं एवढं वाचत बसतात ? त्यांना तरी माहित असतात का उत्तरं … माझाही हाच अनुभव आहे

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2015 - 1:24 pm | टवाळ कार्टा

प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे (पण आधीच्या पानावर "पुढे पहा + मोठ्ठा बाण" काढण्यास विसरू नये...त्यातल्या त्यात अक्षर चांगले असावे...महत्वाच्या मुद्द्यांखाली रेघा ओढाव्यात....मार्जीन जास्त सोडावी...जास्तीत जास्त आकृत्या काढाव्या...एका ओळीत मोजून ६-७ शब्दच लिहावे...आणि मग आपापल्या ट्यालेंटनुसार उत्तरात पाणी घालावे...२-३ पुरवण्यातर नक्कीच होतात यामुळे...हा.का.ना.का. ;)

पगला गजोधर's picture

13 Jul 2015 - 3:09 pm | पगला गजोधर

शेवटी जगामध्ये जयकर-रूल वैगरे काही असतं की नाही….

सौंदाळा's picture

13 Jul 2015 - 5:52 pm | सौंदाळा

SSC चा पेपर एक ओळखीच्या काकु (मित्राची आई) तपासतानाचा स्वतः पाहिलेला किस्सा, २० वर्षापुर्वीचा:
इंग्लिशमधे मुलाला ८०+ (८२ का ८३) गुण मिळाले. सगळे पेपर तपासुन झाले. तो एकच पेपर ८०+ वाला निघाला. आता त्या एका पेपरसाठी मॉडरेशनची प्रोसेस चालु करायला लागेल म्हणत त्यांनी त्याचे ३/४ गुण कमी केले आणि त्याला ७८ वर आणले.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jul 2015 - 7:48 pm | श्रीरंग_जोशी

आजकाल याच्या उलट घडत असावे. यंदाच्या १०वीच्या टॉपर्सचे विषयवार गुण बातम्यांमध्ये वाचले तर अक्षरशः मराठीतही ९९/१०० गुण होते. एकुण गुण ९९% च्या आसपास होते.

जडभरत's picture

14 Jul 2015 - 10:43 am | जडभरत

काकु

चुकून डाकू असा वाचला गेला. बाद्वे केलेले काम डाकवाचेच आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jul 2015 - 6:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला इंजिनिअरिंगमधे एकुलती एक केटी लागली ती म्हणजे एम-३ ची आणि ते पण माझं गणित भयानक भक्कम असुनही. पेपर थेट सातव्या अटेंप्ट ला निघाला म्हणजे दुसर्‍यांदा क्रिटिकल ला असताना निघाला. माझे मार्क्स असे होते.

०,२७,२७,२७,२७,२७,७३.
पहिल्या अटेंप्ट ला मी पेपर कोरा देउन आलेलो. माझी चुक. निर्णय चुकला.
मधल्या ५ अटेंप्ट्स ना चुकुनही २६ किंवा २८ नाही. थ्रुआउट डिस्टिंक्शन आणि एक इयर डाउन :(
युनिव्हर्सिटी ऑफ पुणे की "जय हो"·····

नाखु's picture

14 Jul 2015 - 8:27 am | नाखु

तू "नक्षत्र" आहेस खरा !!! (पंचनक्षत्री)

कप्तान गँग्चा मेंबर.
चिर्कूट

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 9:32 am | पगला गजोधर

अरे m३ साठी बाफना किंवा मिरजकर किंवा काटे यांची ट्युशन घ्यायची नं …. किंवा
फोरियर, लाप्लास , गॉस डायव्हरजंट ऑपशनला ठेवायचे फक्त मेट्रिक्स डिफ इक्वे वैगरे सोपं सोपं करायचं होतरे बाबा
---------------------------
m३ ऐक्स्पर्ट पगला …
इजा नाही -बिजा नाही - तिजा अटेंप्टला बुल्स आय परफेक्ट स्कोर => ४०

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jul 2015 - 12:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तेचं सांगतोय प.ग. माझं स्वतःचं मॅथ्स हा अगदी टोकाचा अभिमान असावा एवढं चांगलं आहे. बर अगदी गटार मॅथ्स आहे असं गृहित धरु तरी प्रत्येक अटेम्प्ट ला बरोब्बर २७चं मार्क्स कसे पडतील? कधीतरी २६ किंवा २८ पाहिजेत का नको. इंजिनिअरिंग मधे वायडी झाल्यानी करिअरची सगळी दिशा बदलली ना. एका नामांकित जर्मन ऑटोमोबाईल कंपनीमधे स्कोअर वगैरे धरुन एलिजिबल होतो पण वाय्डी नी घाण केली सगळी. आज कुठल्याकुठे पोचलो असतो सारख्या काळामधे :(!! असो चालायचचं. सेट बॅक्स असतात आणि त्यावर मातही करता येते.

तुषार काळभोर's picture

14 Jul 2015 - 11:46 am | तुषार काळभोर

माझा दुसर्‍यांदा क्रिटीकलला असताना निघाला होता. तिसरं वर्ष ऑल क्लियर, पण एम३ मुळे डाऊन.
(शेवटच्या अटेम्प्टला लाप्लास, फुरियर, झेड ट्रान्सफॉर्म या तीन युनिट्सचे जिगरचे रिडक्शन घेऊन पेपरला बसलो. मोजून चाळीस मिळाले होते.)

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 12:32 pm | पगला गजोधर

भेंडी भारीये … जिगरचे रिडक्शन घेऊन, पेपरला तुमच्या परीक्षाकेंद्रावर बसू देत होते ?????

प्रत्येक तासाला पर्यवेक्षकाला ५-१० मिनिटे ब्रेक घेण्यासाठी ऑफिसमधून एखादा कर्मचारी यायचा. ३ तासात ३० मिनिटाच्या ब्रेकमध्ये काम झालं.

शोधण्यात वेळ जात नाही का ओ तुमचा ?

यशोधरा's picture

14 Jul 2015 - 8:34 am | यशोधरा

नेमकी कथा.

पुणे विद्यापीठाला काहीतरी पर्याय शोधायला हवा. सुचवा.

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 2:40 pm | पगला गजोधर

सावित्रीबाई फुले विद्यापीठ

एस's picture

14 Jul 2015 - 2:43 pm | एस

धन्यवाद हितेश.

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 3:04 pm | पगला गजोधर

हा हा हा गुड वन :)

ओह अच्छा, नैतर म्हणणार होतो मुंबै युनिव्हर्सिटी.

कपिलमुनी's picture

14 Jul 2015 - 3:02 pm | कपिलमुनी

माझा गणित बर्‍यापैकी चांगला होता म्हणजे १०वीला १४० वगैरे .
आणि डिप्लोमा प्रथम वर्षाचा पेपर चांगला लिहिला होता . ८६-९० च्या आसपास अटेम्प्ट होता. (सिनियर च्या सूचनेनुसार) एक पुरवणीसुद्धा जोडली होती. आणि निकालामध्ये शून्य मार्क आले.
रीव्हॅलला टाकला तरीपण शून्य दुर्दैवाने तेव्हा उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मागवायची सोय नव्हती.
सर्वच्या सर्व गणिते कशी चुकतील ? फॉर्मुला, स्टेप कशाचे तरी १-२ मार्क पडतील ना ?
आजकालच्या वाढलेल्या मार्कांमागे स्वतःची उत्तरपत्रिका मागवता येते हे एक महत्वाचे कारण आहे.

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 3:09 pm | पगला गजोधर

पेपर गहाळ झाले असतील हो, परीक्षकाकडून …

श्रीरंग_जोशी's picture

14 Jul 2015 - 8:09 pm | श्रीरंग_जोशी

वर सर्वांचे रिव्हॅलचे अनुभव वाचल्यावर आणखी एक जुनी आठवण वर आली.

आमच्या वर्गात काही विषयांत तीस पैकी १७-१८ जण नापास होत. यापैकी ज्यांना २२/८० असे गुण आहेत त्यांचेही रिव्हॅलमध्ये ४० होत अन आम्ही ३६/८० वाल्यांचे गुण बदलत नसत. त्या २२ वाल्यांना पुढे जाऊन ऑल क्लिअर व्हायला १ किंवा दीड वर्ष अधिक लागायचं.

यावरून मी एक काल्पनिक पद्धत मांडली होती की विद्यापीठात रिव्हॅल प्रत्यक्षात कसे होत असेल.

एखाद्या विषयात नापास झालेल्या जेवढ्यांनी रिव्हॅल साठी अर्ज केला आहे त्यांच्या रोल नंबर्सच्या चिठ्ठ्या टाकायच्या. त्यातल्या ७-८ टक्के चिठ्ठ्या बाहेर काढायच्या ज्या नशिबवानांच्या चिठ्ठ्या निघतील त्यांचे मार्क पासिंगपुरते करून टाकायचे.

या पद्धतीद्वारे कुणी ना कुणी दर वेळी रिव्हॅलमध्ये पास होत असल्याने रिव्हॅल हे एक आशास्थान म्हणून कायम राहते. प्रतिपेपर ₹३०० उत्पन्नही सुरु राहते.

श्रीरंग_जोशी's picture

14 Jul 2015 - 10:01 pm | श्रीरंग_जोशी

हा मजकूर चेपूवरून साभार.
-------------------------------------------------------------------------------
एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या च्या Exam Hall मध्ये येऊन बसते.
तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे...
.
.
.
.
.
एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते
आणि
हात पुढे करून म्हणते;'' मम्मी पेन.....''..
.
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, '' Ahhhh....मम्मी ''....
संतूर बिंतूर चा काही कमाल नाही....... ATKT होती मागच्या 8 वर्षांपासून
-------------------------------------------------------------------------------