बादलीयुद्ध १२

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
4 Sep 2016 - 12:19 am

पहिला डायलॉग.

"गयी रे, मेरी गयी रे. कितनी अच्छी थी रे वो.....
गयी रे... ह्या ह्या ह्या..."
हे शेवटचं 'ह्या ह्या ह्या' म्हणजे रडण्याचा टोन. तो हसण्याचा की रडण्याचा यावर बरेच तर्क वितर्क होते. कसलेले कलावंत श्मामराव पोर्चच्या मधोमध तंगड्या वगैरे पसरुन आपला अभिनय पणाला लावत होते.

"अबे या की आता" बराच वेळ खुदूखुदू रडून झाल्यावर त्यांनी रागाने फर्मान सोडले.

दुसरा डायलॉग.

"क्या हुआ गणपत ऐसा रो क्यू रहा है?"
शेवटी कुणीतरी ढकलून दिल्यावर सागर नावाचं कॅरॅक्टर श्यामरावची चौकशी करायला गेलं.

मग पुन्हा एकदा.
"गयी रे, मेरी गयी रे. कितनी अच्छी थी रे वो.....
गयी रे... ह्या ह्या ह्या..."

जिन्यावर बसलेलं साधारण आठ जणांचं पब्लिक 'क्या बात है यार, क्या अॅक्टींग करे ला है' म्हणून दाद देत होतं.

"आरे, आयसी कयसी गयी रे वो, ह्यss... ह्यsss... ह्यsss..." म्हणत सागऱ्यानंपण एक झणझणीत भोकाड पसरलं.

तिसरा डायलॉग.

एकतर रात्री साधारण दहाची वेळ. जेवण वगैरे करुन सगळे कॉलेजच्या पोर्चमध्ये जमलेले.

सागऱ्याच्या अॅक्टींगमध्ये काही दम नव्हता. कारण त्याने खरेच भोकाड पसरले होते. श्यामरावनं हात वर करुन 'अगली एंट्री भेज दो' टाईपचा इशारा केला.
रिंगमास्टर दिलीपनं मग गोरखकडे बघून म्हटलं "उठ रे आता तू जा "

गोरख म्हणजे अॅक्टींगचा बादशहा. त्याने काहीही करो ते मनोरंजकच वाटायचं. त्याच्या शेजारीच मी बसलो होतो. तो म्हणाला,
"अरे आज याला पाठवू, मग मी जातो"
"अच्छा, चलेगा, आज याला ट्राय करुन बघू, चल उठ रे, डरनेका नै, बिंधास बोलनेका. और बिंधास रोनेका.."

मी?

खरंतर असले धंदे मी कधी केलेच नव्हते. पण पब्लिक आठ जणांचं म्हटल्यावर म्हणलं लेट्स गो. तेवढंच म्हणलं घेतलं तर घेतलं.

मग जवळ जाऊन सागऱ्याचाच खिसापिटा डॉयलॉग मी मारला.

"अरे क्या हुआ रे गणपत? रो क्यू रहा है?"

श्याम्याचे डोळे रडून रडून सुजले की काय असं वाटायला लागलं. कारण मगाचपासून तो एकटाच जीव ओतून रडत होता.

"अरे क्या बताऊ रे भाई, ... गयी रे वो.... सचमे गयी... ही... हीsss ही..."

मी म्हणलं
"आरारारा.... ये तो बहोत बेक्कार हुआ... हेsss हे हेsss.."

मला काय रडायला जमना. मागचं पब्लिक हसून उताणं पडलं होतं.

दिलीप म्हणाला, आता तूच फायनल. गॅदरींगला शेम टू शेम आसंच बोलायचं.
नक्की कुठल्या बेसिसवर सिलेक्शन झालं मला कळलं नाही. पण झालं हे महत्वाचं.

खरंतर या गोंधळात नाटकानं थोडावेळ पॉज घेतला होता. आम्ही पुन्हा प्ले केलं.

पोर्चच्या मधोमध आम्ही साधारण तिघे जण मुळूमुळू रडत बसलो आहोत. हो, खाली बसून मांडी वगैरे घालून आम्ही बेसुमार रडत होतो. बराच विचार केला तरी सूर कसा लावावा हे काही उमगेना. श्याम्या तेवढा उच्च स्वरात रडत होता ही आनंदाची बाब. बाकी सागऱ्या आणि मी नुसतेच ओरडत होतो.
नाटक फेल गेलं तर त्याचं खापर माझ्या एकट्यावरंच नाही तर सागऱ्यावरही फुटणार असल्याने तसा मी बिंधास होतो.

चौथा डायलॉग.

अभिनयाचे बादशहा 'गोरखनाथ' आमच्याकडे वळते झाले.
उभ्या उभ्याच त्याने चौकशी केली.
"क्या हुआ भाई, इतना क्यू रो रहे हो?"

बसल्या बसल्या शामरावनं पुन्हा तेच रडगाणं सुरु केलं.

"गयी रे , मेरी गयी रे, मुझे छोडके चली गयी रे sss "

"ओ हो हो हो... आरे लूट गयारे, ह्यॅ ह्यॅ ह्यॅ... बर्बाद हुआ रे ह्या ह्या ह्या... मेरा दोस्त... ओ हो हो हो..."

गोरखनं खाली वाकत बसत रडत भेकत असा काय डायलॉग मारला बासंच. टाळ्यांचा कडकडाटच नुसता. कळसंच.

मग आम्ही चौघेजण रडत बसलो. आजून क्लायमॅक्स बाकी होता म्हणून. मग सगळ्यांनी "कौण गयी रे?", "कौण गयी रे?", "कौण गयी रे?" म्हणून आळीपाळीनं विचारालं.
मग श्याम्या "अरे वो गयी रे" म्हणून आजून आमच्या डोक्याला वात आणायचा.
मग आम्ही सगळ्यांनी उठून पाठीमागे जाऊन त्याला गदागदा हलवलं, तेव्हा कुठे तो म्हणाला,
"अरे मेरी चप्पल चोरी हो गयी यारों..."
म्हणलं बासंच. एवढ्या फालतू कन्सेप्टवर नाटक करायचं. शेवटी आम्ही सगळ्यांनी त्याला बडवलं.
नाटक फिनीश.

-----------------------

गॅदरींगला नक्की काय करायचं यावर आम्ही भरपूर विचार केला होता.
"धनगरवाड्यात घुसला गं देव..." गाण्यावर डान्स करायचा पण ठरला होता. पण डान्स शिकवणाऱ्या जे.डी. नावाच्या गावातल्या पोरानं अकराशे रुपयाची फी मागितली. मग तिथेच सगळं बोंबललं. शेवटी खुद्द श्यामरावनंच असली भंकस कन्सेप्ट दिलीपच्या गळ्यात उतरवली. आणि त्यावरंच नाटक करायचं ठरलं. पाच मिनटाच्या नाटकासाठी रोज रात्री दहा ते बारा तालीम चालायची. त्यात केवळ एकच शो व्हायचा.
आख्ख्या कॉलेजमध्ये फक्त आमचीच टीम तेवढी प्रॅक्टीस करायची. बाकी कोण कुठं काय करतंय कशाचा पत्त्या नव्हता.

दिलीप एकदा रुमवर आला आणि म्हणाला,
"आरारारा...."
म्हटलं याला नेमकं झालं तरी काय.
तो म्हणाला, "असंच बोलायचं, स्टेज फाडून टाकू आपण .."

म्हटलं बरंय. किमान आपल्या एकमेव डायलॉगची तरी दखल घेतली याने.

नंतर गोरखपण डोकावून गेला. म्हणाला, "आरारारा..."
मग मात्र टेन्शनंच आलं. म्हटलं एवढं भंकस नाव आपल्याला चिटकतंय की काय.

नंतर तालीम वगैरे. गॅदरींगच्या निवड समितीसमोर आम्ही नाटक करुन दाखवलं. त्यांनी सिलेक्ट केलं. मला वाटलं त्याच्याकडे फक्त गायन आणि डान्सच्याच एंट्री येत होत्या. नाटक असं नव्हतंच. म्हणूनंच आमचं सिलेक्ट केलं.
त्याच निवड समितीनं,
"ह्याज्या आयचं पातेलं, तेज्यायचं भगुणं, बापाचं उलतानं, माझी पळी, तुझा चमचा..." असले खतरनाक डायलॉग असलेलं महादेव आणि बबनचं द्विपात्री नाटक रिजेक्ट केलं. त्या नाटकाचा एंड काय होता समजलं नाही. पण फारंच भयानक होतं ते.
बबन्याला म्हणलं, पुढं काय होतं?
तो म्हणला, आजून ठरलं नव्हतं. आमी आपलं मनाला यील ते बोलत हुतो.

-----------------------

दिवसा क्रिडा सामने वगैरे भरवले गेले. त्यातला घोषणा वगैरे न सांगितलेल्याच बऱ्या. तरी एक सौम्य सांगायची झालीच तर,
"मेकॅनिकलचा कोंबडा, सिव्हीलची कोंबडी..."
मग बाकीची वरडायची.
"कचाssकच... कचाssकच...!!"
हे उदाहणार्थ फारंच झाले. भांडणे वगैरे तर त्याहून भयंकर. खेळाडूंच्या मदतीला आख्खी ब्रँच धावून जायची. त्यात मेकॅनिकलचं पारडं कायमंच जड. कॉलेजमध्ये दहा दगड फेकून मारल्यास त्यातले नऊ मेकॅनिकलच्या पोरांना लागतील. पोरांनाच. पोरी नावाचा प्रकार मेकॅनिकला नव्हता. मेकॅनिकलची चारही वर्षाची ब्रँच चाळली तेव्हा कुठे दोन सापडल्या. त्या ही माझ्याच वर्गात. अरेच्चा..! या आहेत काय?
त्या पँट शर्टच घालायच्या. केस बारीक कापलेले. चुकून त्यांना कोणी 'पोरं' म्हणेल. पण त्या 'पोरी'च आहेत.
एकदा धायगुडे त्यांच्या शेजारी कट्ट्यावर बसला होता. नुसताच बसला होता. बोलणं वगैरे काहीच नाही. आम्ही सगळे बाजूला बसून सबमिशन वगैरे तपासत होतो.
तेवढ्यात खाशा पाटील नावाचं एक कारटं म्हणालं,
"अरे धायगुडे, आता बोट बदल.."

सगळीकडे खसखस पिकली. विनोदाचा हा प्रकारपण भयंकर. त्या पोरींनाही बहुतेक काहीच कळलं नव्हतं. कारण धायगुडे तिकडून म्हणाला,
"कधीच बदललंय.."

-----------------------

कॉलेजच्या समोरंच एक मैदान आहे. तिथेच आहे एक दगडी स्टेज. आणि तिथेच उभारला आहे एक भव्य मंडप.
एखादा लग्नसोहळा असावा असं सुंदर वातावरण.
सकाळी उठलो. कडक कपडे घातले. जीन्स आणि नवीनंच घेतलेला टी शर्ट. शूज वगैरे टकाटक. एखादा गॉगल वगैरे असता तर. पण तो नव्हताच. बरं झालं. नाहीतर जरा जास्तंच झालं असतं.
शेवटी गॅदरींगच्या दिवशी आपण टकाटक असलेले बरे.
बाहेर जायला निघालो तेव्हा अमोल भेटला. म्हणाला, "काय स्टील बॉडी आहे. बायसेप्स तरी बघ.."
आता दोन महीने मी जीम करतोय मान्य. पण लगेचंच बॉडी वगैरे म्हणणे काहीतरीच. मुळात मला टी शर्ट सूट झालाय हेच फार झाले.

खाली आलो. इकडे तिकडे बघितलं. आमची गँग घोळका करुन एका कोपऱ्यात उभी होती. दिलीप आणि गोरख शेरवाणी घालून उभे होते. जसे काय आज यांचच लग्न आहे. गावात भाड्याने कपडे मिळतात हे मला तेव्हा समजलं.

दिलीप खांद्यावर दुपट्टा टाकत माझ्याकडे चालत आला. म्हणाला,
"हे जॉन, हाय. हाऊज यू?"
मी म्हटलं, "खरंच एवढं डॅशिंग वाटतय काय रे हे?"

मग दिलीप पोरांकडे बघत म्हणाला,
"अरे देखो जॉन आया है, जॉन आया है. साईड प्लीज. ये गोऱ्या हूट बाजूला.."
मग गोऱ्या म्हणाला, "अरे जॉन्या, ही हा..."

तिथं बऱ्याच जणांनी माझी उडवली. माझं एक नवीन बारसंच घातलं. जॉन्या?
म्हटलं चालतंय. तसंही एखादं इंग्लिश नाव मला पाहिजेच होतं.

मग आम्ही मंडपात गेलो. तिथे बरेच स्टॉल वगैरे. एकदम फालतू. एकानं वडापावचा घाणाच टाकला होता. कुणीतरी रिंग टाका साबण जिंका असली फडतूस स्कीम. त्यातल्या त्यात आम्ही बऱ्यापैकी काला खट्टा विकत घेतला आणि बसलो खात.
एका पोरीनं चावून चोथा झालेली कल्पना चितारली होती. पाच रुपयाला म्हणे गाजर हलवा.
त्या स्टॉलच्या मधोमध एक गाजर टांगूण ठेवलेलं. त्याला हालवायचे म्हणे पाच रुपये. तिच्या धाडसाचं कौतुकंच आहे.

भेळ वगैरे असले प्रकार पण तिथे होते ज्यात आम्हाला इंटरेस नव्हता.

नवनाथ नावाच्या एका महाठकाने कॉलेमध्ये बैलगाडी घेऊन एंट्री केली. हासूड वगैरे वाजवून फुल धिंगाणा. जेव्हा कॉलेजच्या समोरंच बैलानं पाटीभर शेण टाकलं. तेव्हा वीरप्पननं ती बैलगाडी कॉलेजच्या बाहेर हाकलून लावली.

पुर्ण नारिंगी रंगाची फडकी डोक्याला बांधून, पुर्ण नारिंगी झगा अंगावर घालून, खांद्यावर टेपरेकॉर्डर ठेऊन, "हरे रामा, हरे कृष्णा.." वर डान्स करत एका ग्रुपनं पुर्ण कॉलेजमध्ये धुडगुस घातला. म्हणजे आमचं कॉलेज साधं नव्हतं तर. इथे बरीच रसिकता अगदी भरभरुन वाहू लागलीय.

संध्याकाळी सौदी अरेबियन शेख लोक जशी वेशभुषा करतात अगदी डीट्टो तशी करुन जब्बार अवतीर्ण झाला. मला वाटलं आता हा एखादी गन वगैरे काढून बेछूट गोळीबार करणार. पण त्याचेही कपडे भाड्याचेच.

तर दिवसभरच्या उत्सवी वातावरणात शेवटी सहा वाजता गॅदरींगला सुरुवात झाली.

-----------------------
क्रमशः

बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा , सात , आठ , नऊ , दहा , अकरा
------------------------

कथा

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 12:24 am | पगला गजोधर

1

बाबा योगिराज's picture

4 Sep 2016 - 12:58 am | बाबा योगिराज

2

क्षमस्व's picture

4 Sep 2016 - 2:44 am | क्षमस्व

3

तुषार काळभोर's picture

4 Sep 2016 - 6:52 am | तुषार काळभोर

रुलायेगा क्या..

महादेव अन बबन्याचं नाटक
मेक्यानिकलचा कोंबडा...

इधर सबको ऐसाइच लगरैला या सिर्प मेरेकू, कि ये हत्ती जव्हेर मेरे कालेजमें पढ़नेकू था?

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 10:08 am | पगला गजोधर

रह गया क्या ?

प्रियाभि..'s picture

16 Sep 2016 - 12:10 am | प्रियाभि..

वहीच तो....मेरेकुभी ऐसाइच लगा..

पैसा's picture

4 Sep 2016 - 8:29 am | पैसा

मस्त!

मुक्त's picture

4 Sep 2016 - 8:45 am | मुक्त

रिंग-साबण , गोळा, गाजर हे टोपो मारल्यागत सगळीकडे सर्वकालीन दिसते.

अभ्या..'s picture

4 Sep 2016 - 8:58 am | अभ्या..

हा ना, सोबत पितळी, भगुनं, उलथनं, टेप, भगवे पंचे, अरब, कोंबड्या न कचाकच हे पण..

इंजिनिअरिंग नसताना पण हे बघितलय.

कोंबडा-कोंबडी, अमकातमका टोकरी मे बंद वगैरे घोषणाबाजी सर्रास चालायची आणि तीही ग्राऊंडच्या जवळ दोन व्हाईस प्रिन्सिपॉल्सचे बंगले असताना. पण जव्हेरभौंनी त्यावर लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यांच्या लेखणीतून या cliche गोष्टीपण भन्नाट वाटतात!

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Sep 2016 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार

मजा येतेय वाचायला,
आता गॅदरींग मधे काय होणार याची उत्सुकता आहे.
पैजारबुवा,

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 10:14 am | पगला गजोधर

पोरी नावाचा प्रकार मेकॅनिकला नव्हता. मेकॅनिकलची चारही वर्षाची ब्रँच चाळली तेव्हा कुठे दोन सापडल्या.

हा नं बॉस,

साला सगळी कॉलेज मधली वर्षं, अश्या दुष्काळी ब्रँच मध्ये गेली,

कळावे
एक कुपोषित, कोंडमारा झालेला, दुष्काळग्रस्त मेक इंजि

तुषार काळभोर's picture

4 Sep 2016 - 4:59 pm | तुषार काळभोर

मेकॅनिकल शाखा दुष्काळी असली तरी गॅदरिंग सारखे इव्हेंट्स तीच पोरं ओढून न्यायची.

मेक ब्रँच दुष्काळी असेल तर इलेक्ट्रॉनिक्स कोरडवाहू अन कॉम्प म्हणजे फॉरचुनर मधून फिरणारा ऊस बागायतदार!
मेकॅनिकलच्या पोरांनी संपन्न केलेला कार्यक्रम कॉम्प ची पोरं पोरींना बरोबर घेऊन पहायची.
आमच्या कॉलेजमध्ये ६० च्या वर्गात लिंग गुणोत्तर असे असायचे:
मेक 59-1
ट्रॉनिक्स 55-5
इन्स्ट्रु 60-0
कॉम्प 45-15

-( कोरडवाहू) पैलवान

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 7:47 pm | पगला गजोधर

गॅदरिंग सारखे इव्हेंट्स तीच पोरं ओढून न्यायची./blockquote>

अर्थातच

पिस्टन पावर खाली वर खाली वर .... मेकॅनिकलच्या नावानं चांगभलं

रातराणी's picture

4 Sep 2016 - 1:20 pm | रातराणी

:) पुभाप्र!

विजय नरवडे's picture

5 Sep 2016 - 2:00 pm | विजय नरवडे

पुभाप्र

नाखु's picture

5 Sep 2016 - 2:20 pm | नाखु

भागाची वाट पहात आहे..

फलाटावरचा नाखु

तनिश's picture

15 Sep 2016 - 8:17 pm | तनिश

तुमची कथा वाचून गावाची आठवण आली..खट्ट आगदी
धन्यवाद !!!!!

अजया's picture

16 Sep 2016 - 8:27 am | अजया

:)
मजा आली वाचताना!

टर्मीनेटर's picture

17 Sep 2016 - 11:05 am | टर्मीनेटर

"आरारारा...."
मस्त....
लगे रहो जव्हेर भाई...

स्मिता चौगुले's picture

21 Sep 2016 - 4:05 pm | स्मिता चौगुले

पुढील भाग कधी?

नावातकायआहे's picture

5 Oct 2016 - 9:22 am | नावातकायआहे

पुभाप्र