शोध राजीव हत्येचा भाग-२

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in जनातलं, मनातलं
16 Jan 2016 - 5:25 pm

21 मे 1991 रात्री 10.30 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयातील फोन खणाणला. त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हात पाय गारठले, त्याच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. मजकूर होता 10 मिनिटांपूर्वी झालेली राजीव हत्या.
घटना वाऱ्यासारखी देशभर पसरली. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. अजुन कोणत्याही प्रसार माध्यमातून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तरीसुद्धा देशात शोकाकूल वातावरण तयार झाले होते. जो नाही तो एकमेकांशीच बोलुन खातरजमा करून घेत होता.
इकडे घटनास्थळाचे दृष्य इतके विदारक होते की, हे राजीव गांधीचे पार्थिव आहे, असे सांगूनही कोणाला विश्वास न वाटावा. एक महिला संपूर्ण जळालेल्या , विषण्ण अवस्थेत घटनास्थळी मृत्युमुखी पडलेली होती. तिचा या घटनेशी जवळचा संबंध असावा एवढाच अंदाज स्थानिक पोलिस घटनास्थळाच्या पाहणीनंतर लावू शकले. चाचणीसाठी आवश्यक असलेले नमुने गोळा करून प्रयोगशाळेत धाडले. हत्येच्या दोन दिवसानंतर वर्तमानपत्रामध्ये संशयितांची छायाचित्र छापून आली. त्यात पंजाबी ड्रेस (गजरा घातलेली ) आणि साडी घातलेल्या दोन स्त्रिया, पांढरा सदरा व पायजामा घातलेला पुरुष हे होते. छायाचित्रांचा स्त्रोत होता पेरुम्बदुरचे प्रसिद्ध छायाचित्रकार हरिबाबुंचा कँमेरा. यावरून हरिबाबू सुद्धा कटात शामिल असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 22 मे 1991 आई - बाबांना चांगलाच आठवतो कारण त्या दिवशी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या माहितीनुसार सर्व जनतेने आपल्या लाडक्या नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. वाहतुक सेवा, बाजारपेठा, शाळा, सर्व शासकीय कार्यालये ओसाड पडली होती. आजकाल लोक आपल्या मुलांचे वाढदिवसही जश्नात साजरे करतात, एवढे छोटेखानी लग्न आई - बाबांना उरकावे लागले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा चालू होती, राजीव हत्या का झाली ? आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल गांभीर्याने घेतली होती. या सर्व घटनेचा दबाव पोलिस खात्यावर वाढत होता. जनक्षोभ उसळू नये आणि हिंसाचार घडू नये यासाठी हे प्रकरण उच्च पातळीवर व तत्पर हाताळायचे ठरले. पोलिस मुख्यालयात बैठक बसली. बैठकीत विशेष दल स्थापण्यात आले. तपास प्रमुख म्हणून कार्तिकेयन एकमुखाने निवडले गेले. त्यांना सर्व अधिकार बहाल करण्यात आले.
विशेष तपास दलाने घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनाही विशेष धागेदोरे सापडले नाहीत. संशयित म्हणाव्या अशा फक्त कँमेरा, छर्रे, ओळख न पटणारी 2-3 मृतदेह. डॉ. सिसिलिया सिरील यांच्या शवविच्छेदन अहवालावरून राजीवजींची हत्या मानवी बॉम्बनेच झाली आहे असे सिद्ध झाले. पंजाबी ड्रेसवाल्या स्त्रीनेच तो आत्मघाती हल्ला घडवून आणला होता, आणि भारतीय इतिहासात पहिल्यांदा मानवी बॉम्बची नोंद झाली. त्यात RDX नावाच्या अतिशय स्फोटक रसायनाचा वापर केला होता. छर्रे वापरामुळे तो बॉम्ब अजूनच प्रभावी ठरला होता. त्याकाळी आशिया खंडात अशा प्रकारच्या हत्या करणारी एकच संघटना कार्तिकेयन यांच्या नजरेसमोर होती ती म्हणजे अर्थात LTTE. यापूर्वीही त्यांनी बरेच आत्मघाती हल्ले घडवून आणले होते, म्हणूनच संशयाची सुई आपसुकच त्यांच्याकडे वळली कार्तिकेयनने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवित तपास कार्य योग्य दिशेने सुरु ठेवले. वर्षभर गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारावर त्यांना 26 जण दोषी सापडले. कोर्टात 1044 साक्षीदारांची साक्ष झाली. 10 हजार पानांचे आरोप पत्र दाखल झाले. वरील सर्व हस्तगत पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर हत्येचे गूढ हळूहळू उलगडत गेले ते असे की ---
श्रीलंकेत 2 भाषिक लोक राहतात, एक सिंहली तर भारतीय सीमेजवळील तमीळ. तमीळ मुळ निवासी की सिंहली यात मतभेद होते , पण तमीळ लोक संख्येने कमी होते एवढे मात्र निश्चित. इंग्रजांनी आपल्या राजवटीत दोन्ही प्रदेश एकछत्री अंमलाखाली आणले. सिंहली प्रदेश सुपिक होता. त्यात इंग्रजांनी चहाची लागवड सुरु केली. त्यांना मजूर मिळत नव्हते. त्यांची दृष्टी भारतीय तमीळ राज्यांवर पडली, त्यातून त्यांनी मजूर आयात केले.
त्याचप्रमाणे तमीळ प्रदेश सुपिक नसल्यामुळे तेथील लोक ब्रिटीशांच्या सहाय्याने शिक्षणाकडे वळले. शिकून कुणी डॉक्टर, वकील, अधिकारी, अभियंते, व्यावसायिक झाले. ते हळूहळू सिंहली प्रांतांमध्ये पसरले. आता लंकेत तमीळींची संख्या निर्णायक झाली होती. सिंहलींना भविष्यातील धोका आता स्पष्ट दिसू लागला. दरम्यानच्या काळात आलेल्या सरकारने 2 तमीळ विरोधी कायदे मंजूर केले.
1:- तमिळींचे श्रीलंकन नागरिकत्व रद्द केले.
2:- त्यांना मतदानाला मज्जाव करण्यात आला.
त्यावेळच्या पंतप्रधानांनी( जे की सिंहली होते ) तमीळ भागात लक्षणीय विकास केला, म्हणून सिंहली लोक तमीळ प्रदेशात स्थलांतरित झाले. तमीळवासीयांचा समतोल बिघडला. त्यांमध्ये आता चकमकी घडू लागल्या, तमीळ आपल्याच प्रदेशात अन्यायाला बळी पडू लागले. नंतर पंतप्रधानांनी हे कमी म्हणून की काय, बौद्ध धर्म हाच प्रमुख धर्म व सिंहली हीच लंकेची प्रमुख भाषा म्हणून घोषीत केली.त्यामुळे हिंसाचार बळावला. त्यादरम्यान विविध दहशतवादी गट तमीळ राज्यांमध्ये जन्मास आले.
त्यात 18 वर्षाच्या वेलुपिल्लई प्रभाकरन या तमीळ तरुणाने 1972 ला आपली संघटना स्थापन केली. लगेच त्याने एका मोठ्या राजकीय नेत्याची हत्या घडवून आणली. या घटनेमुळे त्याला अचानक महत्व प्राप्त झाले. त्याचे जाळे एवढे मजबूत होते की, सरकार त्याला जेरबंद करू शकली नाही. आता दाऊद जसा मोकाट आहे अगदी तसाच. या घटनेनंतर 1976 ला त्याने आपल्या संघटनेचे नामकरण LTTE (Liberation Tigers of Tamil Elem) अस केलं. संघटनेच ब्रीदवाक्य होतं, "तमीळ मातृभुमीसाठी तहानलेले वाघ." या तमीळ दहशतवादी संघटनांमुळे बहुसंख्य सिंहली लोक अल्पसंख्यांक तमीळांवर अत्याचार करू लागले. त्यांनी तमीळींना निर्वासित केले. हेच निर्वासित लोक भारतात स्थलांतर करू लागले. भारतीय तमीळ पण त्यांचे आदरपूर्वक स्वागत करू लागले.
या दहशतवादी संघटना मुख्य: जगभर विखुरलेल्या तमीळ बांधवांवर आधारित होत्या. त्यांच्या कडून यांना पैसा, प्रसिद्धी आणि प्रचार मिळत होता. त्यांची साधनसामुग्री व सहानुभुती इतर दहशतवादी संघटनांमध्ये विभागली जाऊ नये अशी प्रभाकरनची इच्छा होती. म्हणून त्याने इतर तमीळ दहशतवादी संघटनांवर आक्रमण चालू केले. 1976 च्या अखेरपर्यंत LTTE हीच फक्त एक प्रमुख तमीळ दहशतवादी संघटना उरली.
1987 ला राजीवजी पंतप्रधान असताना, श्रीलंकेत LTTE तमीळ नागरिकांसाठी स्वतंत्र प्रदेश मागत होती. त्यासाठी त्यांनी लढा चालू केला. ते फारच शिरजोर झाल्यामुळे लंकेने भारताला मदतीचा हात मागितला. राजीवजी आणि लंकेचे पंतप्रधान श्री. जयवर्धने यांमध्ये द्विपक्षीय करार झाला. त्यानुसार शांतीसेनेची स्थापना करण्यात आली. सेनेने बंडखोरांना बऱ्यापैकी जखडून ठेवले. त्यामुळे प्रभाकरनचा रोष सहाजिकच राजीव गांधीवर आला. राजीवजींना भीती होती की, लंकेने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर भारतीय तमीळ पण स्वतंत्र प्रदेशाची मागणी करतील आणि देशात अस्थिरता माजवतील. हाच शांतीसेना पाठवण्यामागचा नितळ उद्देश होता. पुढे राजीव गांधी निवडणूक हरल्यावर तत्कालीन सरकारने शांतीसेना परत बोलावली. पण ते सरकार 1991 ला पडले आणि मुदतपूर्व निवडणूकांचे वेध लागले. प्रचार करताना राजीव गांधी लंका भारत करारालाच समर्थन करत होते. प्रभाकरनला परत भीती वाटू लागली की, शांतीसेना पुन्हा लंकेत येऊन आपल्यावर अत्याचार करणार, म्हणून त्याने राजीव गांधी यांचाच काटा काढायचं ठरवलं. " न रहेगा बास न बजेगी बासुरी."
इंदिरा गांधींनी संसदेत भारताला एकसंघ लंका हवी आहे असे स्पष्टपणे सांगितले होते. यावरून भारताला लंकेची फाळणी नको होती हे स्पष्ट होते आणि फाळणी हेच तर LTTE चे उद्दिष्ट होते. भारताला तमीळ नागरिकांवर लंकेत होणारे अत्याचार मंजूर होते अशातला भाग नव्हता पण फाळणी हा त्यावरील उपाय नाही हे भारताचे मत होते. तर, फाळणीशिवाय हे अत्याचार थांबणार नाहीत हे LTTE चे. या फाळणीचा दुष्परिणाम भारतीय तमीळ जनतेवर पडला असता म्हणून भारताचा फाळणीला विरोध होता.
श्रीलंका-भारत कराराआधी राजीव गांधी आणि प्रभाकरन मध्ये चर्चा झाली. तमीळ जनतेला न्याय देण्याचे आश्वासन राजीव गांधींनी प्रभाकरनला दिले. त्यानंतर द्विपक्षीय करार झाल्यामुळे राजीव गांधींनी आपला विश्वासघात केला असा आरोप LTTE नं केला. LTTE नं मग टोकाची भूमिका घेत हत्या घडवून आणली. धानू नावाच्या महिलेला मानवी बॉम्ब म्हणून निवडले गेले, हीच ती पंजाबी ड्रेस वाली स्त्री होय. श्रीलंकेतील निर्वासित वा त्यांचे नातेवाईक यांची साथ मिळाल्याशिवाय ही हत्या होणे शक्य नव्हते. म्हणून या हत्येसाठी भारतीय तमीळ जे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सामील होते, तेही तेवढेच जबाबदार आहेत.
भारतीय नागरिक जेव्हा देश व धर्म यांमध्ये एकाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा धर्माची निवड करतो ,म्हणूनच आपल्यावर आजपर्यंत परकीय आक्रमण यशस्वीरीत्या झालेली आहेत. आता आयसीस हे नवं वादळ घोंघावतायं ,ते भारतीय मुस्लिम तरुणांना आकर्षित करताना दिसतयं, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती काय म्हणावी. देश असहिष्णू झालाय असे काही जबाबदार व्यक्तींचे मत आहे. ती देश सोडून जाण्याची भाषा करताहेत. खरं तर अशा लोकांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळेच देश असहिष्णू होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.
आमिर जर तुला देश सोडण्याची इच्छा असेल तर खुशाल जा बाबा, कुणीही तुझ्या आड येणार नाही. पूर्ण खानदान घेऊन जा, अजून 2-4 ओळखीचे नेता आले तर बघ, भारतमातेचा भार हलका होईल. फक्त परदेशात उतरल्यावर, नाव सांगताच 2 तास कसून चौकशी झाल्यावर, " my name is khan & i am not a terrorist." अशी म्हणण्याची तुझ्यावर वेळ येवू नये म्हणजे झालं...

इतिहासकथाkathaaलेखमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

16 Jan 2016 - 5:50 pm | कविता१९७८

छान लेख

पीके's picture

19 Jan 2016 - 10:35 pm | पीके

एका माजी पंत्प्रधानाच्या हत्येचे वर्णन छान वाटलं?
थ्थू तुम्च्याआय्ला...

तुषार काळभोर's picture

16 Jan 2016 - 6:02 pm | तुषार काळभोर

राजीव गांधी, आयसिस व आमिर खान यातला संबंध कळला नाही.

बोका-ए-आझम's picture

16 Jan 2016 - 9:07 pm | बोका-ए-आझम

मध्येच राजीव गांधींची हत्या, मध्येच आई-बाबांचं लग्न, मध्येच आमीर खान, असहिष्णुता आणि आयसिस - नक्की कशावर आहे लेख तेच कळत नाहीये. पहिला भाग कथा म्हणून सुरु झाला होता. या भागात पुढे काय झालं ते कळतच नाहीये. नीट सुसंगत लिहा की. विषय एवढा इंटरेस्टिंग आहे - नीट मांडला तर अजून छान आणि वाचनीय होईल.

ब़जरबट्टू's picture

18 Jan 2016 - 4:43 pm | ब़जरबट्टू

लेख आवडला.. आमिर खानचा उल्लेख टाळता आला असता.. बाकी भाग - 1 व भाग - २ ची लिंक लागली नाही..
पुलेशु ...

भाग १ मधली पात्रं कुठे हरवली ?

DEADPOOL's picture

20 Jan 2016 - 9:14 am | DEADPOOL

भाग २ उत्सुकतेने वाचायला आलो होतो!
अपेक्षाभंग!
असो पुलेशु!

स्पा's picture

20 Jan 2016 - 9:29 am | स्पा

रोफ्ल लेख

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Jan 2016 - 12:45 pm | निनाद मुक्काम प...

राजीव गांधी ह्यांनी सुरवातीला लिट्टे ला का सहाय्य केले ह्याचा ओझरता सुद्धा उल्लेख लेखात नाही
आंजा वर असे झाल्याचे अनेक पुरावे विखुरले आहेत.
प्रभाकरन खास दिल्लीत एका वि आय पी सारखा पंचतारांकित हॉटेलात सरकारी अतिथी म्हणून आमंत्रित झाला , राजीव चे सरकार त्यांच्याशी बोलणी करत होते, हे सर्व लेखात येणे आवश्यक होते
पंजाबात संजय तर लंकेत राजीव ह्यांनी भस्मासुर पोसले
ते त्यांच्या परिवारावर उलटले
राजीव ह्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले त्यातून देशाला इतिहासाला दुर्दैवी कलाटणी मिळाली
लेख एकांगी आहे
एखाद्याशी हत्या झाली म्हणून सत्य लपवून घटनेची एकाच बाजू वाचकाच्या समोर आणणे चुकीचे आहे
असो

ईश्वरसर्वसाक्षी's picture

20 Jan 2016 - 1:31 pm | ईश्वरसर्वसाक्षी

त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली

थरारक्..छानच