आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी

अमित खोजे's picture
अमित खोजे in जनातलं, मनातलं
5 Nov 2014 - 3:03 am

जॉन डी रॉकफेलर आता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. त्याची एकूण संपत्ती १५० मिलिअन डॉलर्स (२२५ बिलिअन डॉलर्स आज) होती. स्टँडर्ड ऑईल ९८% रॉकेल ची एकटी मालक होती. परंतु जगातील सर्व मोठ्या भांडवलदारांना स्पर्धक हे असतातच. आणि भविष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धकाला रॉकफेलरने स्वतःच जन्माला घातले होते.

अँड्र्यू कार्नेगी!

ज्याचा हात धरून अँड्र्यूने धंद्यातील धडे गिरवले त्या टॉम स्कॉटची वाताहत केल्याबद्दल अँड्र्यू जॉनला बिलकुल क्षमा करणार नव्हता.

पुढे चालू ..
=============================================================

अँड्र्यू कार्नेगीचा गुरु टॉम स्कॉटला फीलाडेल्फियाच्या जवळच एका स्मशानामध्ये पुरण्यात आले. पराभूत टॉम स्कॉटजवळ अंतिम समयी कपर्दीकही नव्हती. आणि त्याच्या ह्या परिस्थितीला जबाबदार होता जॉन डी रॉकफेलर.

Andrew Carnegie

(अँड्र्यू कार्नेगी)

सुरुवातीचे आयुष्य

अँड्र्यू कार्नेगीचा जन्म स्कॉटलंड मधील डनफर्मलाइन या गावी २५ नोव्हेंबर १८३५ रोजी झाला. त्याचे वडील दोघेही हातमाग विणकर होते. ते हातमागावर कापड विणीत असत आणि आणि आई गावातील चांभारांसाठी चप्पल बूट शिउन द्यायचे काम करी.

Birth_Place
(अँड्र्यू कार्नेगी जन्म ठिकाण - डनफर्मलाइन स्कॉटलंड)

आपल्या मुलांनीही हाच हातमागाचा धंदा चालू ठेवावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु लवकरच वाफेच्या इंजिनावर चालणारे कारखाने त्यांच्या गावात आले आणि त्याच्या वडिलांची हातमागावरील नोकरी गेली. दुसरे काही न करता येत असल्यामुळे त्यांनी सर्वांना घेऊन भविष्याच्या शोधात अमेरिकेला जायचे ठरवले.

१८४८ मध्ये कार्नेगी कुटुंब अमेरिकेत आलेघेनी सिटी (आता पिट्सबर्गचा एक मोठा भाग) मध्ये विस्थापित झाले. तेथे त्याच्या वडिलांना कापूस कारखान्यात नोकरी मिळाली. अँड्र्यू स्कॉटलंडमध्ये फारच कमी वर्ष शाळेत गेला होता. अमेरिकेत आल्यावर लहानगा अँड्र्यूहि शाळेला पूर्णविराम देऊन एका कापसाच्याच कारखान्यात काम करू लागला. १२ वर्षांच्या अँड्र्यूला तेव्हा आठवड्याला १.२ डॉलर मिळत. नवीनच विस्थापित झालेल्या त्याच्या गरीब कुटुंबासाठी हि फारच मोठी मदत होती.

Carnegie_Brothers
(अँड्र्यू कार्नेगी आपल्या लहान भावासोबत - अमेरिकेत आल्यानंतरचा लगेचचचा फोटो - १८४८)

लहानपणापासूनच हुशार असलेल्या अँड्र्यूने बर्याच नोकर्या बदलल्या. गावातील टेलिग्राफ कचेरीत त्याने निरोप्याचे, टेलिग्राम इकडून तिकडे नेउन द्यायचे काम स्वीकारले. मेहनती असल्याने लवकरच त्याने त्याच कचेरीमध्ये सचिवाच्या (secretary) पदावर बढतीही मिळविली.
[अमेरिकेतील यादवी युद्धच्या काळात अँड्र्यूला युद्धामध्ये भाग घेण्यासाठी बोलावणे आले होते. परंतु ८६० डॉलर देऊन त्याने दुसर्याच माणसाला त्याच्या जागी पाठवले. ]

पेन्सिल्वेनिया रेलरोड कंपनीचा अधीक्षक थॉमस (टॉम) स्कॉटने चुणचुणीत १८ वर्षांच्या अँड्र्यूला आपला खासगी मदतगार म्हणून ठेऊन घेतले आणि येथूनच अँड्र्यूच्या खर्या शिक्षणाची सुरुवात झाली. १८५५ मध्ये अँड्र्यू २० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा देहांत झाला आणि कुटुंबप्रमुखाची जबाबदारी त्याच्यावर येउन पडली. परंतु जिद्दीने काम करून त्याने त्याच्या नव्या नोकरीतही पगारवाढ मिळवली. अँड्र्यूने मॉर्स कोड शिकून घेतला आणि त्याच्या कचेरीतील सर्वात जलद निरोप पाठवणारा म्हणून त्याने नाव कमावले. टॉमही त्याला अधिकाधिक जबाबदारीची कामे देऊ लागला आणि अँड्र्यू तेवढ्याच मेहनतीने ती पूर्ण करू लागला. लवकरच एक घर घेण्या इतपत त्याने पैसेही जमवले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आता जरा सुधारू लागली होती. टॉम स्कॉटकडून अँड्र्यूला बरेच काही शिकायला मिळाले. सर्वात महत्वाचे म्हणजे पैसा कसा बनवायचा.
"एखादा धंदा जेवढा पैसा तुम्हाला मिळवून देईन त्याच्या काही अंशीसुद्धा पैसा तुम्हाला तुमचा नोकरीतला पगार देऊ शकणार नाही." हा आयुष्यातला सर्वात मोठा धडा अँड्र्यूने स्कॉटच्या हाताखालीच गिरवला होता.

Thomas_Scott
(थॉमस (टॉम) स्कॉट)

लवकरच अँड्र्यूने आपले पैसे विविध व्यवसायांमध्ये गुंतवायला सुरुवात केली. त्याची पहिली गुंतवणूक म्हणजे रेल्वेच्या 'स्लीपिंग कार्स'. फक्त दोनच वर्षात त्याला त्याच्या गुंतवणुकीचा परतावा मिळू लागला. वार्षिक ५००० डॉलर नफा हा त्याच्या रेल्वेतल्या नोकरीच्या पगाराच्या तिप्पट होता.

Sleeping_Cars
(स्लीपिंग कार्स)
हा पैसा नंतर त्याने ऑईलमध्ये गुंतवला आणि अशा रीतीने त्याची संपत्ती वाढीस लागू लागली. वेळोवेळी स्कॉट अँड्र्यूला मार्गदर्शन करीतच होता.

अँड्र्यूने मग कीस्टोन ब्रिज कंपनी स्थापन केली. पूल बनवण्याचे नवीन नवीन तंत्र ज्ञानाचे विशेषाधिकार (पेटंट) या कंपनीकडे होते. अशातच त्याच्यासमोर सेंट लुइस पूल बांधण्याची संधी आली.

सेंट लुइस इआड पूल (१८७३)

Bridge

मिसीसिपी नदीवर पूल बांधण्याचा विचार स्कॉटच्या मनात कितीतरी दिवसांपासून घोळत होता. त्याने हे काम त्याच्या शिष्याला देण्याचे ठरवले. हा पूल देशातील सर्वात मोठा रेल्वे पूल होता आणि याने पूर्व आणि पश्चिम अमेरिकेला जोडून एक प्रगतीमधील एक मोठा अडसर दूर होणार होता. बर्याच रेलरोड कंपन्या मिसिसिपी नदीच्या पलीकडे जाण्यासाठी धडपडत होत्या. पण हि नदी त्यांच्या मार्गात अगदी एखाद्या मोठ्या सर्पासारखी पहुडली होती. तिला कोणालाच ओलांडता येत नव्हते. १ मैल लांब त्या नदीचे पात्र होते. तेव्हा नदीवर पूल बांधण्याचे तंत्रज्ञान एवढे पुढे गेले नव्हते. ४ पैकी १ या प्रमाणात पूल कोसळत असत. शिवाय एवढा मोठा पूल अजून कोणीच बांधला नव्हता. अँड्र्यूने हे आव्हान स्वीकारले.

परंतु धोका पत्करल्याशिवाय त्याला काहीच मिळणार नाही अँड्र्यूला कल्पना होती. त्याने आपल्याकडील सर्व संपत्ती पणास लावली. त्याचा सिव्हील डिझायनर त्याला सांगून सांगून थकला होता कि लोखंडाचा पूल जेवढा हवा तेवढा मजबूत नाही होऊ शकत. नदीचा प्रवाहाला जोर खूप आहे. रेल्वेचे वजन शिवाय त्यापुलावरील वाहतुकीचे वजन त्या पुलाला मानवणार नाही. परंतु अँड्र्यू हार मानायला तयार नव्हता.
"मग कशाने बनवले तर तो पूल अगदी मजबूत होईल?" अँड्र्यूने विचारले.
"कदाचित स्टीलने बनवता आला तर .." त्याचा डिझायनर उत्तरला.

EADS_Bridge
(इआड पूल)

स्टील हा सर्वात मजबूत परंतु तेवढाच महाग पदार्थ होता. तो बनवणे खूप जिकीरीचे काम होते. २००० डिग्री सेल्शिअसला लोखंड आणि कार्बन यांचा संयोग घडवून स्टील तयार होते. शिवाय तो मोठ्या प्रमाणावार तयार करावयास लागणारे तंत्रज्ञानहि उपलब्ध नव्हते. स्टीलपासून अगदी लहान वस्तू म्हणजे काटे चमचे, सुऱ्या आणि छोटे दागिने बनवत. आत्तापर्यंत कोणीच स्टीलपासून एवढ्या मोठ्या वस्तू बनवण्याचा प्रयत्नच काय पण विचारही केला नव्हता. अँड्र्यू मग वेगवेगळ्या स्टील बनवणाऱ्या लोकांना जाउन भेटू लागला. हे स्टील कसे बनवतात ते समजावून घेऊ लागला. अनेक रसायनशास्त्र पदवीधरांना भेटून स्टील बनवण्याची प्रक्रिया कशी वापरता येईल ते शिकू लागला.

Steel
(स्टील)

अशातच त्याची भेट एका इंग्लिश माणसाबरोबर झाली - हेन्री बेस्सेमर. त्याने रेल्वेचे रूळ लवकरात लवकर बनवण्यासाठी एक अफलातून पद्धत शोधून काढली होती. त्यामुळे एका रुळास लागणारा वेळ २ आठवड्यावरून १५ मिनिटांवर आला होता. अशा रीतीने अँड्र्यूला त्याला हवे असणारे स्टील मिळाले होते. आता त्याने पूल बनवण्याच्या कामाला जोरात सुरुवात केली.

Bridge
(इआडस पूल - काम चालू असताना - १८६५)

परंतु लवकरच स्टीलचा पूल बनवणे हे किती महागाचे काम आहे हे अँड्र्यूच्या लक्षात येऊ लागले होते. अगोदरच पुलाचे काम वेळापत्रकाच्या २ वर्षे मागे होते. घेणेकरी पत्रावर पत्र पाठवू लागले होते. त्याची सर्व जमापुंजी खर्च झाली होती. काहींनी कोर्टात जाण्याचीही धमकी दिली होती. या सर्वांचे काय करावे हे अँड्र्यूला समजेना. पैशाअभावी त्याने काम तात्पुरते बंद ठेवले. आणि तो गुंतवणूकदारांच्या शोधात निघाला. त्याने सर्वांना पत्रात लिहिले कि, "स्टीलचा पूल बनवणे हे माझे स्वप्न आहे. हा पूल तयार झाला तर तो जगातील आठवे आश्चर्य असेल. त्याने होणारे फायदे आपण जाणतातच. परंतु त्यासाठी मला तुमची मदत लागेल." त्याने त्याला लागणाऱ्या पैशाचा हिशोब त्या पत्रांमध्ये जोडला आणि हि पत्रे घेऊन तो अनेक गुंतवणूकदारांना भेटला. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले. ४ वर्षानंतर मोठ्या दिमाखात सेंट लुइस येथे मिसिसिपी नदीवर हा पूल उभा राहिला.

परंतु आता तर वेगळीच समस्या निर्माण झाली. लोकांनी एवढा मोठा पूल कधी पहिलाच नव्हता. त्यामुळे हा पूल कोसळणार नाही याची खात्री लोकांना कशी द्यावी याचा विचार अँड्र्यू करू लागला. आत्ता पर्यंत बरेच पूल कोसळून मोठमोठे अपघात झालेले होते त्यामुळे लोक या नवीनच बांधलेल्या पुलावरून जाण्याचा धोका पत्करण्यास तयार नव्हते. शेवटी त्याला एक कल्पना सुचली. त्याकाळी असा समज होता कि हत्ती हा कधीही मजबूत नसलेल्या जागी पाय ठेवणार नाही. त्यामुळे जर आपण पुलावरून हत्ती नेउन दाखवला तर लोकांना या पुलाची खात्री येईल असे अँड्र्यूला वाटले. पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशी त्याने एक मोठे संचालन आयोजित केले आणि त्याच्या अग्रभागी ठेवला एक मोठा हत्ती! हजारो लोक तो उद्घाटन सोहळा पाहण्यास आले होते. जेव्हा तो हत्ती आपल्या माहुतासह पुलाच्या एका टोकाशी आला आणि पुलावर पाय ठेवण्यास सज्ज झाला तेव्हा सर्वांनी त्यांचे श्वास रोखून धरले होते. मग जेव्हा त्या हत्तीने पुलावर पाय ठेऊन सावकाश झुलत झुलत तो पूर्ण पूल पार केला तेव्हा कुठे लोकांची पुलाच्या मजबुतीबद्दल खात्री पटली आणि सर्वांनी वाजत गाजत तो पूल पार केला.

अँड्र्यूने रेल कंपन्यांना रुळासाठी लागणाऱ्या स्टील कारखान्यांमध्ये उडी मारली. रेलरोड अगोदरच अमेरिकेचे आधारस्तंभ बनले होते आणि त्यांच्या विस्तारासाठी त्यांना अधिकाधिक लोखंडाची गरज होती. त्यासाठी व्हँडरबिल्ट सारखे उद्योजक लोखंडाच्या कंपन्यांवर अवलंबून होते. त्याने रसायनशास्त्रज्ञवेत्त्यांना आपल्या नोकरीस ठेऊन घेतले आणि त्यांच्याकडून पुलासाठी आणि रूळासाठी अधिकधीक मजबूत असे स्टील बनवून घेतले. रेल्वे कंपन्यांच्या मालकांना भेटून त्यांना स्टील हा रुळासाठी कसा अधिक संयुक्त पर्याय आहे हे पटवून दिले. जरीही स्टील वापरणे आत्ता खर्चात जाणार असले तरीही ते जास्त दिवस टिकत असल्याने त्यावर नजीकच्या भविष्यात खर्च करण्याची गरज नाही याची कंपन्यांना खात्री पटली. रेल्वे कंपन्या त्याचा सर्वात मोठा ग्राहकवर्ग बनला.

या पुलाच्या सोहळ्यामुळे अँड्र्यू कार्नेगीच्या स्टीलची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली कि त्याला एकट्याला ती सांभाळताहि येईना. त्यासाठी त्याला अजून जास्त पैसे उभे करावे लागणार होते. तो परत त्याच्या गुरुकडे म्हणजेच स्कॉटकडे वळला. स्कॉटच्या मदतीने त्याने आजच्या काळातले २१ लाख डॉलर उभे केले आणि पहिला स्टील बनवणारा कारखाना उभारला. जे स्टील फक्त छोट्या वस्तू बनवण्यासाठी वापरले जात होते, ज्याचा कारखाना काढण्याचा कुणी विचारही केला नव्हता तो कारखाना अंद्र्यू कार्नेगीने पिट्सबर्गच्या बाहेर ब्रॅडॉक येथे १०० एकर जमिनीवर उभारला. हा अमेरिकेतील स्टीलचा सर्वात मोठा कारखाना होता. दिवसाला २२५ टन स्टील तयार करण्याची याची क्षमता होती. या कारखान्याद्वारे कार्नेगी आता पाहिजे तेवढे स्टील पैदास करू शकणार होता. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत बनण्याच्या ध्येयाकडे त्याची वाटचाल सुरु झाली होती.

Steel Mill
(कार्नेगीचा पहिला स्टील कारखाना - ब्रॅडॉक)

परंतु त्याच वेळेस बाकीच्या व्यवसायांमध्ये मंदीचे सावट दिसू लागले होते. अमेरीकेत रेलरोड जरा जास्त प्रमाणात बांधले गेले होते. त्यामुळे त्यांना आता अधिक विस्ताराची तेवढी गरज नव्हती. रेलरोड कंपन्या आता वाहून नेण्यासाठी मालाच्या शोधात होत्या. आणि सर्वात जास्त माल वाहतूक रॉकफेलरच्या रॉकेलची होत होती. पिट्सबर्गच्या पुढे रॉकफेलरची पाइपलाईन जात नसल्याने त्याला रेलरोडची मदत घ्यावी लागतच होती. त्यातच स्कॉट न कार्नेगी पिट्सबर्गच्या पुढे पाईपलाईन टाकायला लागले. कार्नेगी अगोदरपासूनच ऑईलच्या धंद्यात उतरला होताच.

=============================================================
"पेनसिल्व्हेनिया मध्ये मी तुम्हाला एवढा फायदा करून देत असताना माझ्या क्षेत्रात येण्याचे कारण?" जॉनने स्कॉटला विचारले.
"हे पाईप लाईन खोदायचे काम लगेच बंद नाही केले तर मी तुम्हाला देत असलेले सर्व तेल दुसर्या रेलरोड कंपनीला देईन." त्याने धमकी दिली.
"पिटस्बर्ग ते न्यूयॉर्क आमच्या शिवाय दुसरी कोणतीही रेलरोड चालते हे मला माहीतच नव्हते!" त्याला खिजवत स्कॉटने उत्तर दिले.

इथे टॉम स्कॉटने त्याला उघड उघड आव्हान दिले होते. स्कॉटच्या रेल्स वाहून नेत असलेल्या तेलापैकी २/३ तेल रॉकफेलरचे होते. पिट्सबर्ग मध्ये जे काही तेल शुद्धी करणाचे कारखाने होते त्यातील रॉकेल वाहून नेण्यासाठी जॉन ला स्कॉटच्या रेलरोडची मदत अपरिहार्य होती. तेथे अजून पाईपलाईन पोचली नव्हती. त्यामुळे पिट्सबर्गमधील रॉकेल न्यूयॉर्क पर्यंत वाहून नेण्यासाठी आपल्या मदतीशिवाय जॉनला पर्याय नाही अशी स्कॉटची खात्री होती आणि त्या जोरावरच त्याने रॉकफेलरला सामोरासमोर आव्हान दिले होते. परंतु जॉनने कुणाच्या डोक्यातही येणार नाही अशी खेळी करत त्याला उत्तर दिले.

रॉकफेलरने पिट्सबर्ग मधील आपले कारखानेच बंद करून टाकले.

याचा भरपूर तोटा स्टँडर्ड ऑईलला सहन करावा लागणार होता. परंतु जॉनसाठी जिंकणे महत्वाचे होते.

अर्ध्याहून अधिक मालवाहतुकीचा माल येणे बंद झाल्याने स्कॉट चिंतेत पडला. त्याला या खेळीची अपेक्षा नव्हती. रॉकफेलरच्या रॉकेलशिवाय त्याला त्याचा व्यवसाय चालवणे अवघड होऊन बसले. हजारो नोकरदार त्याला कामावरून काढून टाकावे लागले. पगार कपात करावी लागली. पिट्सबर्गमध्ये अंदाधुंद माजली. लोक रस्त्यावर उतरले. स्कॉटच्या रेल यार्डमधील ३९ इमारती आणि १२०० रेल कार्स एका रात्रीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. टॉम स्कॉटच्या कंपनीची वाताहात लागली.
=============================================================
टॉम स्कॉट यातून सावरू शकला नाही आणि निराशेच्या गर्तॆत याच वेळेस त्याचे निधन झाले. कार्नेगीसाठी टॉम स्कॉटच्या मृत्यूला जोन रॉकफेलरच जबाबदार होता आणि याचा बदला घेण्याचा निश्चय मनोमन घेऊन तो टॉम स्कॉटच्या कबरीजवळून निघाला.

त्या वेळेस रेलरोड, रॉकेल, स्टील आणि परिणामी इतर व्यवसायांची भरभराट होत होती. अमेरिका प्रगतीच्या दिशेने वेगाने प्रवास करीत होती. वेगाने धावणाऱ्या या प्रगतीच्या घोड्यांना मात्र अचानक मधेच खीळ बसली. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या रेलरोड कंपन्या अचानक मंदीत जाऊ लागल्या. याचा परिणाम बाकी सर्व व्यवसायांवर झाल्याशिवाय थोडाच राहिला असता? कार्नेगीच्या स्टीलला आता कोणी ग्राहकच उरले नव्हते. त्याचे सर्व साम्राज्य पणास लागले होते. आणि त्याच सुमारास त्याला त्याचा नवीन ग्राहकवर्ग दिसला.

बेरोजगार असलेले कामगार नोकरीच्या शोधात मोठमोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होऊ लागले होते. न्यूयॉर्क शिकागो सारखी शहरे या कामगारवर्गाने गजबजू लागली होती. त्यांना राहण्यासाठी मोठमोठ्या इमारती बांधण्याचे काम जोरात सुरु झाले होते. कार्नेगीला येथे त्याच्या स्टीलसाठी मोठी संधी सापडली. त्याला समजले कि आता स्टीलचे भविष्य हे रेलरोडमध्ये नसून या इमारतींमध्ये आहे. महत्वाच्या शहरांमध्ये विस्तारासाठी जागा नसल्याने उत्तुंग इमारती बांधायला सुरुवात झाली होती. गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी लागणारे मोठमोठे बीम, स्टील च्या तुळया, इत्यादी सामान कार्नेगी पुरवू शकणार होता. जगातील पहिली गगनचुंबी इमारत शिकागोमध्ये बांधली जात होती त्यासाठी कार्नेगीने स्टील चे बीम पुरवायला सुरुवात केली. पुढच्या काही वर्षातच एकट्या शिकागोमध्ये १ लाखाहूनही जास्त इमारती बांधल्या जाणार होत्या. अमेरिका आता जमिनीपासून वर वाढू लागली होती आणि यासाठी कार्नेगीच्या स्टीलची अत्यंत गरज होती. लवकरच कार्नेगी अतिशय श्रीमंत लोकांमधील गणला जाऊ लागला.

SkyScrapper
(जगातील पहिली गगनचुंबी इमारत - होम इन्शुरन्स बिल्डींग - शिकागो १८८४)

परंतु कार्नेगीला हे पुरेसे नव्हते. रॉकफेलरची संपत्ती कार्नेगीपेक्षा ७ पटीने अधिक होती. टॉम स्कॉटच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी जॉन रॉकफेलरला मागे टाकून अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस होणे कार्नेगीला आता जरुरी वाटू लागले होते. त्यासाठी त्याला आता एका भागीदाराची मदत हवी होती जो जॉनपेक्षा अधिक जास्त निर्दयी असेल आणि लवकरच त्याला तसा माणूस मिळाला.

हेन्री फ्रीक हा तिशीतला एक श्रीमंत पण अतिशय निर्दयी माणूस होता. मध्य पश्चिम अमेरिकेमध्ये कोळशाचा त्याचा व्यवसाय होता. त्याला हवे ते प्राप्त करण्यासाठी तो कोणत्याही थराला जात असे. कार्नेगीला अशाच एका माणसाची गरज होती कारण कार्नेगी स्वतः असा स्वभावाने निर्दयी नव्हता.
फ्रीकच्या बरोबर भागीदारी करून कार्नेगीला स्वतःच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असा माणूस मिळाला होता.

Henry_Frick
(हेन्री फ्रीक)
हेन्री फ्रीकवर पहिले काम त्याने सोपवले ते म्हणजे कार्नेगीच्या स्टील कंपन्यांना फायद्यामध्ये आणणे. कारखान्यातील अपव्यय कमी करून पैसे वाचवणे हे त्याचे मुख्य काम होते. यासाठी त्याने फ्रीकला स्टील कंपनीचा संपूर्ण ताबा दिला. आजचे बरेच व्यावसायिक कार्नेगीच्या या निर्णयाला एक मोठा धोकादायक निर्णय मानतात. परंतु तेव्हा कार्नेगीला हा निर्णय घेणे जास्त जरुरीचे वाटले. पण शेवटी हेन्री कार्नेगीच्या डोक्यावर बसत गेला आणि तो निर्णय चुकीचाच ठरला हे होमस्टेडच्या घटनेने दाखवून दिले.

होमस्टेड संप:

होमस्टेड संप हा एक कार्नेगीच्या कारकिर्दीतील एक कलंक म्हणता येईल. तसे कार्नेगीने कामगारांची पिळवणूक हा त्या काळातील अनियंत्रित औद्योगिक कायद्यांमधील पळवाट होती. त्या काळात औद्योगिक कायदे म्हणावे तसे प्रस्थापित झाले नव्हते. त्यामुळे सर्व कारखानदार सर्रास कामगारांची पिळवणूक करत. त्याचाच फायदा उठवत कार्नेगीने आपला फायदा वाढवण्याच्या दृष्टीने कामगारांचे कामाचे तास वाढवले. परंतु त्यांना त्याचा अधिक मोबदला तर दिला नाहीच उलट अजून पगार कपातच केली. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत बनण्याच्या रॉकफेलरबरोबरच्या स्पर्धेत अँड्र्यू कार्नेगीने आपले साम्राज्य पणाला लावायचे ठरवले.

Homested_Steel_Mill
(होमस्टेड स्टील कारखाना)

पिट्सबर्गच्याच बाहेर असलेल्या होमस्टेडमधील स्टीलच्या कारखान्याला त्याने आपले लक्ष्य बनवले. हा कारखाना तसा रडतखडतच चालला होता. त्याला त्याच्या स्टीलच्या साम्राज्यातील सर्वात मोठा कारखाना बनवण्याचे कार्नेगीने ठरवले. अँड्र्यूने होमस्टेडच्या कारखान्यात प्रचंड पैसा ओतला. नवीन नवीन यंत्रे आणून बसवली. थोड्याच दिवसात होमस्टेड मधून उच्च प्रतीचे स्टील बाहेर पडू लागले. कारखान्याचा फायद्याचा आलेख हळू हळू चढू लागला. मनुष्यबळ हे स्टीलच्या जगतातील सर्वात मोठे खर्चीक काम. कोणत्याही हिशोबनिसास हे सांगायची गरज नाही कि नफा वाढवायचा असेल तर एक तर विक्री वाढवा नाही तर खर्च कमी करा. तेव्हाची परिस्थिती पाहता कार्नेगी स्टील कंपनी अगोदरच आपल्या सर्व कारखान्यांसह पूर्ण क्षमतेने कार्यरत होती. फ्रीक जेथे जमेल तेथे तो पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे नफा वाढवायचा असेल तर त्याला त्याचे खर्च कमी करणे भाग होते आणि यासाठी त्याने कामगारांना वेठीस धरायचे ठरवले. त्याने कामगारांचे कामाचे तास तर वाढवलेच परंतु त्यांचा पगारही कमी केला. याच वेळेस लोकांसमोरील प्रतिमा ढासळू नये म्हणून कार्नेगी सर्व हक्क हेन्री फ्रीकच्या हाती सोपवून साळसूदपणे स्कॉटलंडला डनफर्मलाइन या आपल्या जन्मगावी "सुटीसाठी" निघून गेला.

हेन्री फ्रीकला लोक त्याच्याविषयी काय बोलतात याबद्दल काडीचेही पडले नव्हते. त्याला फक्त एकच ध्येय समोर दिसत होते. नफा वाढवणे. त्याने हळूहळू आपले पाश आवळायला सुरुवात केली. त्याने कारखाना आठवड्याचे ६ दिवस १२ तास चालू ठेवण्यास सुरुवात केली. १२ तास काम ते सुद्धा पाळीमध्ये नाही. प्रत्येकाने १२ तास रोज काम केले पाहिजे. शिवाय कामाच्या ठिकाणाचे वातावरण काही काम करण्यास पोषक असे नव्हते. अत्यंत गर्मी, धूर, वाफ, धूळ अशा अवस्थेत कारखान्यात काम करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच होती. कामगारांमध्ये असंतोष माजू लागला. कामगारांची संघटना तयार झाली. त्यांनी मग कामगारांचा संप करायचा निर्णय घेतला. कामगार संघटनेला फ़्रिकने धमकावून पहिले कि जर तुम्ही संप केलात तर एकाही कामगाराला परत कामावर घेतले जाणार नाही. परंतु कामगारांनी यास दाद दिली नाही. अखेरीस संपावर जाण्याचा दिवस उगवला. चालू असलेले काम बंद करून सर्वच्या सर्व २००० कामगार कारखान्याच्या पुढील पटांगणात जमले. तेथे त्यांनी कुणालाही आत जाण्यास मज्जाव केला व दारातच धरणे धरले. फ्रीकने जर बदली कामगार आणले तर त्यांनाही आत जायला या २००० कामगारांशी लढा देऊनच आत जावे लागले असते. परंतु फ्रीकसुद्धा त्यांच्या पुढे सहजा सहजी हत्यार टाकणार्यातला नव्हता. त्याला या सर्वाची कल्पना होतीच.

Pinkerton_Detectives
(पिंकरटन डिटेक्टीव्ह)

पिंकरटन डिटेक्टीव्ह हि संघटना रेल्वे लुटारूंचा माग काढून लुट परत आणणारी एक खाजगी सशस्त्र पोलिसांची टोळी होती. त्यांनी अब्राहम लिंकनचा खुनाचा एक प्रयत्नही हाणून पाडला होता आणि त्याचे खासगी संरक्षक म्हणून कामही बजावले होते. आता त्यांच्याकडे तेव्हाच्या अमेरिकेच्या संरक्षक दलापेक्षा जास्त माणसे आणि शस्त्र होती.

Pinkerton_Lincoln
(पिंकरटन आणि अब्राहम लिंकन)

पैसे फेकले तर तुमच्यासाठी लढायला तयार असणारी अशी हि टोळी होती. त्यांना फ्रीकने भाडोत्री घेतले.
हि माणसे नदीमार्गाने पिट्सबर्गमध्ये आली आणि सरळ होमस्टेडवर चालून गेली. कामगार मागे हटणारे नव्हते तेव्हा तेथे असलेल्या कामगारांवर सरळ गोळीबार करण्यास सुरुवात केली. पहिली गोळी चालताच एकच गोंधळ माजला. जो तो सैरावैरा इकडे तिकडे धावू लागला. कोणत्याही कामगाराकडे शस्त्र नव्हते आणि अशा निशस्त्र लोकांवर पिंकरटन टोळीने सशस्त्र हल्ला चढवला होता. जेव्हा गोळीबार थांबला तेव्हा ९ कामगार मृत्युमुखी पडले होते आणी बरेचशे घायाळ झाले होते. परंतु कामगारांनी शर्थीने प्रयत्न करून कुणालाही कारखान्यात प्रवेश करून दिला नाही. शेवटी पिट्सबर्ग शहराच्या राज्यपालाने पोलिसांची कुमक पाठवली आणि होमस्टेड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित केली. कारखान्याचा ताबा पुन्हा प्रशासकांकडे आला.

हेन्री फ्रीकविषयी लोकांच्या मनात अढी तयार तर झालीच होती परंतु आता ते त्याला उघड उघड दोषी ठरवू लागले होते. त्यातूनच मग हेन्री फ्रीकच्या हत्येचा एक अयशस्वी प्रयत्नहि झाला. कार्नेगी अजूनही स्कॉटलंडमध्येच होता. आपण जर येथे दूर राहिलो तर वातावरण निवळेल या वेड्या आशेवर तो तगून होता. परंतु तसे झाले नाही. पत्रकारांनी त्याचा स्कॉटलंडमध्ये येउन पिच्छा पुरवला आणि होमस्टेड घटनेचा जाब विचारला.

इकडे फ्रीक आणि कार्नेगी यांचे संबंध बिघडत चालले होते. फ्रीक स्वतःला कारखान्याचा सर्वे सर्वा समजू लागला होता. मनाला वाटेल तसे निर्णय कार्नेगीला न विचारता घेऊ लागला होता. कार्नेगीला मग वाटू लागले कि हेन्री फ्रीकला एवढी सूट देऊन आपण चूक तर केली नाही ना? हेन्री फ्रीकची मनमानी हाताबाहेर गेल्यावर त्याला जाणवले कि आता आपल्या हस्तक्षेपाची गरज आहे आणि आपल्याच कार्यपद्धतीत थोडे बदल करणे जरूरी आहे. कार्नेगीने हेन्री फ्रीकला पदावरून हटवायचा निर्णय घेतला. कार्नेगीने वार्ताहरांना हळूच सांगितले कि 'मी जर पिट्सबर्ग मध्ये असलो असतो तर परिस्थिती वेगळी असती. मी कामगारांच्या समस्यांबद्दल जागरूक आहे आणि मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभे राहीन'. जेव्हा फ्रीकला याबद्दल समजले तेव्हा त्याला कळून चुकले कि कार्नेगीने आपल्याला वार्यावर सोडले आहे. फ्रीकने मग कार्नेगीला डावलून स्वतःच पूर्ण कारखाना घशात घालण्याचा कटहि शिजवायला सुरुवात केली. आणि जेव्हा कार्नेगीला याचा वास लागला तेव्हा त्याने सरळ हेन्री फ्रीकला पदच्युत करून सर्व कारभार परत आपल्या हातात घेतला.

कार्नेगी स्टील अशा रीतीने आतून पोखरली गेली होती. आणि कार्नेगीला तिला परत पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार होते. लोकांच्या मनातील आपली प्रतिमा त्याला परत चांगली बनवायची होती. या सर्व समस्या डोक्यावर असतानाच कार्नेगीला मात्र आता नवीनच भीती सतावू लागली होती आणि तिचे नाव होते ..

जे पी मॉर्गन!

आणि याच जे पी मॉर्गनला अँड्र्यू कार्नेगी आपले सर्व साम्राज्य विकून अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस बनतो. त्याची कहाणी पुढील भागात.

=============================================================

संदर्भसूची:

१) The men who built America - History Channel
२) कार्नेगी कोर्र्पोरेशन न्यूयॉर्क (http://carnegie.org/about-us/foundation-history/about-andrew-carnegie/)
३) अँड्र्यू कार्नेगी चरित्र (http://www.biography.com/people/andrew-carnegie-9238756)
४) सर्व चित्रे जालावरून साभार
५) American Experience (http://www.pbs.org/wgbh/amex/carnegie/peopleevents/pande01.html)

इतिहासकथासमाजलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

5 Nov 2014 - 3:51 am | श्रीरंग_जोशी

या भागातली नाट्यमयता जोरदार वाटली.

सेंट लुईसच्या त्या प्रसिद्ध पुलाचे मी काढलेले काही फोटोज.
Saint Louis Bridge

STL bridge

अमित खोजे's picture

5 Nov 2014 - 10:14 pm | अमित खोजे

आपल्यापैकी कोणीतरी काढलेले पुलाचे फोटो पाहून छान वाटले.
तसे पाहता एवढा १५० वर्षांपूर्वीचा पूल अजूनही दिमाखात उभा असलेला पाहून आपल्या काम चालू असतानाच कोसळणाऱ्या पुलांची लाज वाटते.
असो तो वेगळा विषय. पण फोटो झकास आलेत!

अनुप ढेरे's picture

5 Nov 2014 - 10:28 am | अनुप ढेरे

मस्त झालाय हाही भाग!

रामदास's picture

5 Nov 2014 - 11:24 am | रामदास

हा भागही उत्तम जमला आहे.

मुक्त विहारि's picture

5 Nov 2014 - 11:47 am | मुक्त विहारि

आवडला...

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

मदनबाण's picture

5 Nov 2014 - 1:07 pm | मदनबाण

झकास... पुढच्या भागाची वाट पाहतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India
ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF}
Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years

समीरसूर's picture

5 Nov 2014 - 1:53 pm | समीरसूर

हा भाग खूपच रोमहर्षक! आवडला.

'तरक्की की भूख' - अग्निपथ आठवला.

जेपी's picture

5 Nov 2014 - 6:23 pm | जेपी

मस्तच

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2014 - 7:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त झालाय हा भाग ! खर्‍या जीवनातले नाट्य !!

पुभाप्र.

अमित खोजे's picture

5 Nov 2014 - 10:27 pm | अमित खोजे

तसे हे लेखन करण्याची पहिलीच वेळ असल्याने तुम्हाला जर माझे लेखन सुधारण्यासाठी काही सूचना असतील तर मला नक्कीच व्यनि करा. माझ्या परीने मी प्रयत्न करतच आहे परंतु तुमचीही मदत नक्कीच कामी येईल.

वॉल्टर व्हाईट's picture

5 Nov 2014 - 10:33 pm | वॉल्टर व्हाईट

हा आणि आजवरचे तीनही भाग आवडले. मागील भागांच्या लिंक्स दर भागात जोडल्या तर अजुन सुसुत्रता येईल असे वाटते.

इतरांनी म्हटले आहे तसे प्रुफ रीडींग करणे गरजेचे आहे. लेखन झाल्यावर एक दिवस बासनात गुंडाळुन ठेउन द्या अन मग पुन्हा वाचा. बर्‍याच सुधारणा सापडतील. उदाहरणार्थ

अशातच त्याची भेट एका इंग्लिश माणसाबरोबर झाली - हेन्री बेस्सेमर. त्याने रेल्वेचे रूळ लवकरात लवकर बनवण्यासाठी एक अफलातून पद्धत शोधून काढली होती. त्यामुळे एका रुळास लागणारा वेळ २ आठवड्यावरून १५ मिनिटांवर आला होता. अशा रीतीने अँड्र्यूला त्याला हवे असणारे स्टील मिळाले होते. आता त्याने पूल बनवण्याच्या कामाला जोरात सुरुवात केली.

आता यात हेन्रीने नेमकी काय मदत केली हेच राहुन गेलेय, अश्या छोट्या चुकांनी रसभंग होतो, त्या नक्की टाळता येतील.

अमित खोजे's picture

6 Nov 2014 - 11:05 pm | अमित खोजे

आयला हो कि! राहूनच गेले ते लिहायचे.

बासनात गुंडाळून ठेवण्याचा सल्ला आवडला कारण मी नेमके हेच नाही करत. लेख लिहून झाला कि प्रकाशित करायची घाई. तसा अगोदरच या लेखाला उशीर झाला होता आणि मग प्रकाशित करायच्या वेळेस अजून चुका. आता हेच लिंक्स द्यायच्या राहून गेल्या. संदर्भ सुचीसुद्धा 'प्रकाशित करा' बटण दाबता दाबता आठवली म्हणून लगेच टाकणे झाले.

आता पुढच्या भागाला जरा काळजी घेईन. मागच्या भागाची लिंक टाकण्यासाठी संपादक मंडळाला विनंती केलीच आहे. त्याची मदत होईलच लवकरच. प्रुफ रीडिंगसुद्धा करून घेतो.

सुधीर's picture

6 Nov 2014 - 10:50 am | सुधीर

लेख आवडला. येवढ्या डिटेलात अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीबद्दल कधी वाचलं नव्हतं. डेल कार्नेगीच्या "हाऊ टू विन फ्रेण्ड्स...." पुस्तकातल्या छोट्या छोट्या (कदाचित रचलेल्या) किश्यातून अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीची जी प्रतिमा निर्माण झाली होती त्याला मात्र तुमचा लेख वाचून तडा गेला.

सुधीर जी
डेल कार्नेगीच्या "हाऊ टू विन फ्रेण्ड्स...." पुस्तकातल्या छोट्या छोट्या (कदाचित रचलेल्या) किश्यातून अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीची जी प्रतिमा निर्माण झाली होती त्याला मात्र तुमचा लेख वाचून तडा गेला.

हाउ टु विन मध्ये अ‍ॅन्ड्र्यु कार्नेगी संदर्भात काय आलेल आहे नेमक ?
आणि या लेखाने त्या प्रतिमेला तडा कसा गेला
हे थोड खोलात जाणुन घ्यायला आवडेल
प्लिज थोडा उलगडा करा ना !

डेल कार्नेगीच्या पुस्तकात तोकडेच संदर्भ येतात, पुस्तकाचा मूळ गाभा मानवी नातेसंबंधावर आहे (त्यामुळे कार्नेगी वा इतर प्रतिथयश लोकांचे किस्से रंगवून सांगितले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही). पण यशस्वी माणसाच्या काही उण्या बाजूही असू शकतात हे मीच विसरलो होतो. हा लेख वाचल्यावर ते लक्षात आले. त्या पुस्तकातल्या तोकड्या संदर्भावरून माझी अशी समजूत झाली होती की, अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीला माणसांची उत्तम पारख होती आणि तो इतरांकडून कामं करवून घेण्यात हुषार होता.

"Here lies one who knew how to get around him men who were cleverer than himself" हे वाक्य बहुदा अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीच्या थडग्यावर कोरलेले असावे. ३८ वर्षाच्या चार्ल्स श्वाब नावाच्या माणसाला स्टील कारखान्याचा प्रमुख बनवून त्याला लाखो डॉलर्सचा पगार देऊ केला होता. हा चार्ल्स श्वाब ना इंजिनिअर होता ना त्याला स्टील मॅन्युफॅक्चरींगची इत्यंभूत माहिती होती (किंबहूना त्यापेक्षा सरस माहिती असलेल्या व्यक्ती होत्या) पण इतरांकडून कामं करवून घेण्यात तो हुषार होता. तसा स्वतः अ‍ॅन्ड्र्यूसुद्धा स्टील मॅन्युफॅक्चरींग मधला तज्ञ नव्हता.

असा एक किस्सा त्या पुस्तकात आहे की लहान असताना त्याच्या मादी सशाला खायला घालायला त्याच्याकडे काही नव्हतं तेव्हा कॉलनीतल्या मुलांना त्याने सांगितलं की जी मुलं खायला घालतील त्यांच्या नावाने सशाची पिल्ले ओळखली जातील. अशाच प्रकारच्या युक्त्या तो व्यवसायातही करत राहिला. त्याला आपलं स्टील जेव्हा पेन्सिलव्हेनिया रेल रोडच्या एजर थॉमस यांना विकायचं होतं तेव्हा तिथल्या कारखान्याचे नाव "एजर थॉमस स्टील वर्क्स" असं ठेवलं. स्लिपींग कार्सच्या बिझनेस मध्ये प्राईस वॉर चालू असताना त्याने प्रतिस्पर्ध्याशीच जॉइंट व्हेन्चर करून नवीन फर्मच नाव प्रतिस्पर्धी कंपनीचच ठेवले (पुलमन पॅलेस कार कं).

हा लेख वाचल्यावर अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीची हेन्री फ्रीकची निवड चुकली असेच म्हणावे लागेल. (प्रतिमेला तडा जरा भावनेच्या भरात म्हटलं :) पण मोठ्या मोठ्या माणसांचेही निर्णय चूकू शकतात एवढच अधोरेखीत करायचे होते)

अमित खोजे's picture

6 Nov 2014 - 11:49 pm | अमित खोजे

कार्नेगीची हेन्री फ्रीकची निवड चुकली असे मी म्हणणार नाही कारण (जेवढी माहिती मला आहे त्यावरून) फ्रीकला बर्यापैकी सूट देण्यात कार्नेगीची संमती होती. शिवाय होमस्टेड कामगारांची पिळवणूक करायलाही त्याची मूक संमती होती. त्यामुळेच हेन्री फ्रीक एवढा पुढे जावू धजला. फ्रीक निर्दयी होता हे खरे आहे आणि त्यामुळेच त्याची निवड झाली होती कारण अ‍ॅन्ड्र्यू स्वतः तसा नव्हता. परंतु पैशाची भूक चांगल्या माणसालाही सैतान बनवते हेच खरे.

पण या सर्व हिरोंमध्ये मला अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीच आवडला याचे कारण म्हणजे नेपोलिअन हिल आणि त्याचे पुस्तक - "THINK AND GROW RICH". या पुस्तकामध्ये श्रीमंत बनण्यासाठी कोणत्या स्वभावांची आणि सवयींची गरज आहे ते खूप सारी उदाहरणे देऊन खूप छान पटवले आहे.

त्याबद्दलची गोष्ट अशी-

अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीला विश्वास होता कि
"यशस्वी बनण्यासाठीची प्रक्रिया साध्य सोप्या सूत्रांमध्ये मांडता येते आणि कोणीही - अगदी कोणीही - ती प्रक्रिया समजावून घेऊन त्याप्रमाणे वागून आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. "

नेपोलिअन हिल हा न्यूयॉर्क मध्ये एका वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करत होता. त्याला अ‍ॅन्ड्र्यू कार्नेगीची मुलाखत घेण्याचे काम मिळाले.
त्याच्याशी बोलताना अ‍ॅन्ड्र्यूला जाणवले कि या माणसामध्ये नक्कीच काहीतरी आहे. मुलाखत सुरु झाल्यापासून पहिल्या दोन तीनच मिनिटात अ‍ॅन्ड्र्यूने नेपोलिअनला विचारले की, "तू अमेरिकेतील यशस्वी माणसांची मुलाखत घेऊन त्यांचा जवळून अभ्यास करून 'यशस्वी होण्याचे सूत्र' शोधून ते संपादित करशील का? यासाठी साधारण २० वर्षे लागतील. याबद्दल तुला मानधन काहीही मिळणार नाही परंतु सर्व प्रवासखर्च आणि या माणसांना भेटण्यासाठी लागणारे शिफारस पत्र मी देईन. बोल आहे का तयारी? "
नेपोलिअनने २५ सेकंद विचार केला आणि उत्तर दिले "हो!"

आणि यानंतर १९३० मध्ये प्रकाशित झालेले "THINK AND GROW RICH" हे पुस्तक आजही तेवढेच प्रसिद्ध आणि परिणामकारक आहे.

नंतर अ‍ॅन्ड्र्यू हसत हसत त्याला म्हणाला कि जर तू ५० सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतला असता तर मी हा प्रस्ताव मागे घेतला असता. "जो माणूस सर्व माहिती आणि तथ्य समोर असताना निर्णय घेण्यास वेळ लावतो तो कधीही यशस्वी निर्णय घेणारा होऊ शकत नाही."

Think and Grow Rich

श्रीरंग_जोशी's picture

7 Nov 2014 - 12:09 am | श्रीरंग_जोशी

क्या बात हैं!!

हा किस्सा इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.

सुधीर's picture

7 Nov 2014 - 9:53 am | सुधीर

"परंतु पैशाची भूक चांगल्या माणसालाही सैतान बनवते हेच खरे" हम्म! कमगारांच्या पिळवणूकीला संमत्ती असणं मला पटलं नाही. एनीवे, थींक ॲण्ड ग्रो रिच पुस्तकामागचा किस्सा माहित नव्हाता.... त्यासाठी धन्यावाद!

खटपट्या's picture

7 Nov 2014 - 10:09 am | खटपट्या

कोणाला पीडीएफ स्वरुपात हे पुस्तक हवे असल्यास खालील लिन्क वर उपलब्ध आहे.

http://www.soilandhealth.org/03sov/0304spiritpsych/030413.hill.think.and...

सुधीर's picture

7 Nov 2014 - 10:43 am | सुधीर

सेकंदाचा उल्लेख नसला तरी प्रास्तावनेतच वरच्या किस्स्याचा दाखला आहे.... पुस्तक हवच होतं, फुकटात मिळालं :) धन्यवाद!

बबन ताम्बे's picture

6 Nov 2014 - 12:15 pm | बबन ताम्बे

आत्तापर्यंतचे सर्व भाग वाचले. खूप आवडले.

रॉकफेलरबद्दल "हा तेल नावाचा इतिहास आहे" मधे बरीच माहिती आहे.

"ह्यांनी घडवला भारत" नावाची पण एक सिरीज होऊन जाऊ द्या. :-)
जमशेटजी टाटा, जे. आर.डी. टाटा, रतन टाटा, शेठ वालचंद, बिर्ला, बजाज, धिरूभाई अंबानी अश्या ब-याच दिग्गजांनी भारताच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे.

अमित खोजे's picture

6 Nov 2014 - 10:57 pm | अमित खोजे

छान कल्पना सुचवली आहे आपण. पुढचा प्रयत्न नक्की तसाच असेल.
येथे अमेरिकेत हिस्टरी वर लागलेल्या 'The men who built America' मालिकेमुळे मला हि मालिका लिहायची कल्पना सुचली.
या मालिकेत त्यांनी घेतलेली पात्रे, एडिटिंग वगैरे मुळे ती मालिका अगदी खिळवून ठेवते. मी लिहित असलेली मालिका त्या व्हिडीओची जवळ जवळ कॉपी आहे असंच म्हणाना. बाकी पहिल्या भागात श्रीरंग जोशी यांनी सुचवल्या प्रमाणे जालावर बाकीही शोधून माहितीची भर घालत आहे.

"हा तेल नावाचा इतिहास आहे" वाचावायाचे राहून गेले आहे. गिरीश कुबेरांचे 'एका तेलियाने' वाचले आहे. परंतु "हा तेल नावाचा इतिहास आहे" आता वाचायलाच लागणार!

हि मालिका संपताच 'ह्यांनी घडवला भारत' सुरु करायला नक्कीच आवडेल.

अमित खोजे's picture

6 Nov 2014 - 10:57 pm | अमित खोजे

छान कल्पना सुचवली आहे आपण. पुढचा प्रयत्न नक्की तसाच असेल.
येथे अमेरिकेत हिस्टरी वर लागलेल्या 'The men who built America' मालिकेमुळे मला हि मालिका लिहायची कल्पना सुचली.
या मालिकेत त्यांनी घेतलेली पात्रे, एडिटिंग वगैरे मुळे ती मालिका अगदी खिळवून ठेवते. मी लिहित असलेली मालिका त्या व्हिडीओची जवळ जवळ कॉपी आहे असंच म्हणाना. बाकी पहिल्या भागात श्रीरंग जोशी यांनी सुचवल्या प्रमाणे जालावर बाकीही शोधून माहितीची भर घालत आहे.

"हा तेल नावाचा इतिहास आहे" वाचावायाचे राहून गेले आहे. गिरीश कुबेरांचे 'एका तेलियाने' वाचले आहे. परंतु "हा तेल नावाचा इतिहास आहे" आता वाचायलाच लागणार!

हि मालिका संपताच 'ह्यांनी घडवला भारत' सुरु करायला नक्कीच आवडेल.

लेख अतिशय आवडला.
लेखामागचे परीश्रम प्रचंड आहेत
अतिशय सुंदर माहीती व ती देखील ओघवत्या शैलीत कुठे ही जड न होउ देता लिहीणं फारच अवघड काम.
ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटोग्राफ्स तर प्रचंड आवडले.
पुढील भागा साठी डेस्परेट...

अत्रन्गि पाउस's picture

6 Nov 2014 - 6:44 pm | अत्रन्गि पाउस

अप्रतिम..
पुढील भाग लौकर टाका हो ...

बोका-ए-आझम's picture

6 Nov 2014 - 5:45 pm | बोका-ए-आझम

मस्त माहिती आणि एकदम अनोखी शैली! पण एकच तक्रार आहे - दोन भागांमध्ये ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट एवढं अंतर काऊन ठेवलंय भाऊ?

अमित खोजे's picture

6 Nov 2014 - 10:49 pm | अमित खोजे

*lol* हसून हसून पुरेवाट झाली. खरंय तुमचे म्हणणे.

माणसाच्या प्रसिद्ध शत्रूला सध्या मित्र केल्यामुळे हे ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट एवढे अंतर तयार झालंय.
आपला आळस हो. पण बरं झालं तुम्ही तक्रार केली. त्यामुळे पुढचा भाग लिहायला जरा जोर येईल.
बाकी एक एक भाग लिहिला कि तो प्रकाशित करतो आणि मग पुढचा लिहायला घेतो. त्यामुळे थोडा वेळ तसा पण लागतोच. पण या भागाला आमच्या नको असलेल्या मित्रामुळे उशीर झालाय हे मात्र खरं.

एस's picture

6 Nov 2014 - 7:23 pm | एस

माहितीपूर्ण आणि जिवंत रसरशीत लेखन.

दणदणीत लेखन आहे. त्यावेळच्या कारभाराची माहिती समजली.

नवीच माहिती मिळतीये.छान लिहिताय.पुभाप्र.

कलंत्री's picture

7 Nov 2014 - 10:33 am | कलंत्री

माहिती खुपच छान आणि रोचक आहे. अमेरिकेबद्दल माझ्या मनात काहिशी अढी होती. ब्रिटिशांनी १५० वर्ष राज्य करुनही आपल्या भारतीय भाषा या नष्ट होतील अशी भिती नव्हती, परंतु अमेरिकेच्या नौकरीच्या प्रभावामूळे, अमेरिकेत नोकरी करण्यासाठी इंग्रजी शिकणे गरजेचे आहे असा समज झाल्यामूळे मागच्या २० वर्षात भारतीय भाषांची, त्यातही मराठीची वाताहत होण्यास सुरवात झाली आहे असे मला नेहमीच वाटायचे.

काळाच्या ओघात लक्षात आले की असे आव्हाने स्विकारायालाच हवी. अमेरिकेच्या मिळणार्‍या नोकर्‍यांमूळे अथवा इंग्रजीशिवाय पर्याय नाही अश्या भ्रमामूळे मराठी ची वाताहत थांबवू शकतो असे आता मला वाट्ते. ( कसे याचा आराखडा मात्र माह्याकडे नाही.)

या मतबदलाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका आवडत असे नमुद करावेसे वाटते. कठोर परिश्रम, ध्यास आणि दिर्घकाळ कामकरण्याची क्षमताच व्यक्ति, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करत असते हेच खरे.

हल्लीच्या काळात घडलेल्या घडामोडी :-
Warren Buffett’s US$26.5-billion investment in this major railroad has turned into a cash machine
मध्यंतरी रशियाने त्यांच्याकडच्या २० % U.S. Treasuries डंप केल्या आणि त्यानंतर चीन ने $800 million च्या Treasuries ट्रीम केल्या.
संदर्भ :- Russian Holdings of U.S. Treasuries Dropped 20% in March
China trims US debt holdings by $800 million
सध्या जालावर येणार्‍या नविन वर्षात अमेरिका ग्रेट डिप्रेशन मधे जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे,डॉलर डाईंग करन्सी असल्याच्या सुद्धा चर्चा जोरात आहेत. क्रूड ऑइल गेल्या ५ वर्षातल्या सगळ्यात खालच्या स्तरावर पोहचले आहे याचे खरे कारण अमेरिकेचा सौदीवर दबाव ? की सौदीचा चीन बरोबर टायअप ?
संदर्भ :- The REAL Reason for Saudi Arabia’s Shift Away from U.S.

जाता जाता :- येणारा काळ अमेरिकेसाठी आणि अमेरिकन जनतेसाठी कठीण असेल ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why The U.S. Won’t Give Germany Their Gold Back

तेलाच्या किमती पडण्याचे कारण मला वाटते की अमेरिकेची स्वयंपूर्णता हेच असले पाहिजे. ५-६ वर्षांपूर्वी ओबामाने हे टारगेट ठेवले होते, आणि मला वाटते यावेळेस अमेरिकेची आयात घटण्याचे कारण देखील हेच होते. सर्वसामान्यपणे तेलाची मागणी घटणे आणि तेलाच्या किमती पडणे हे इकॉनॉमी गाळात गेल्याचे लक्षण आहे, पण या वेळेस मागणी घटणे हे तेलाच्या किमती पडण्याचे कारण दिसत नाही.
बाकी तुम्ही वर दिलेल्या बातम्यांचे मुख्य कारण मला तरी वाटते की अमेरिकी अर्थव्यवस्था सुधारत जाणे हेच आहे, ज्यामुळे इतर देशांना त्यांच्या ट्रेझरी काढून त्यांच्या चलनाचे मूल्य टिकवून ठेवावे लागत आहे.

तेलाच्या किमती पडण्याचे कारण मला वाटते की अमेरिकेची स्वयंपूर्णता हेच असले पाहिजे. ५-६ वर्षांपूर्वी ओबामाने हे टारगेट ठेवले होते, आणि मला वाटते यावेळेस अमेरिकेची आयात घटण्याचे कारण देखील हेच होते. सर्वसामान्यपणे तेलाची मागणी घटणे आणि तेलाच्या किमती पडणे हे इकॉनॉमी गाळात गेल्याचे लक्षण आहे, पण या वेळेस मागणी घटणे हे तेलाच्या किमती पडण्याचे कारण दिसत नाही.
बाकी तुम्ही वर दिलेल्या बातम्यांचे मुख्य कारण मला तरी वाटते की अमेरिकी अर्थव्यवस्था सुधारत जाणे हेच आहे, ज्यामुळे इतर देशांना त्यांच्या ट्रेझरी काढून त्यांच्या चलनाचे मूल्य टिकवून ठेवावे लागत आहे..
अमेरिकेची शेल ऑइलच्या माध्यमातुन परिपुर्णता, हे एक कारण समजले जाते { याचा संबंध आपल्या देशात पिकणार्‍या गवार भाजीशी देखील आहे. संदर्भ :- गवारगाथा } ज्या वेळेस क्रूड ऑइल चे दर घसरतात, त्या त्या वेळी वेगवेगळ्या थेअरीज पसरतात. पण सध्य स्थिती पाहता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा हा कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे म्हणे... अमेरिकेचे इराणशी संबंध आणि सौदीवाल्यांचे चीनशी निर्माण होणारे संबंध,चीन चे इराणशी संबंध, अनेक देशांचा डॉलरचा वापर टाळुन अन्य चलन /सोने यांच्या माध्यंमातुन वाढवला जाणारा विनिमय आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अमेरिकेचे { $18,019,679,327,000.} १८ ट्रिलीयनचे Debt हे देखील या ऑइल किंमती खाली घसरण्यामागे असणार्‍या काही पैलुं पैकी आहे.
संदर्भ :-
Sydney Yuan Hub Seen Saving Importers 7% in Trading: Currencies
Moscow’s ‘Mr. Yuan’ Builds China Link as Putin Tilts East
India to settle oil trade dues with Iran in rupees
वरील गोष्टीतुन एक लक्षात येते की डॉलर ही वर्ल्ड ट्रेडिंग करंन्सी आता त्यांची ही मक्तेदारी मोडीत निघाल्याचे पाहत आहे. तसेच डॉलर / पेट्रो डॉलर सौदी सार्माज्य आणि अमेरिका यांना Nixon पासुनचा इतिहास आहे, ज्यात अमेरिकेने सौदीला तुम्ही आम्हाला तेल त्या आम्ही तुम्हाला सुरक्षा देतो अशी मांडवली झाली होती...
संदर्भ :- Why Saudi Arabia Matters in Helping to Keep the U.S. Dollar as the World’s Reserve Currency
पण आता ती परिस्थीती राहिली नसुन अरब वर्ल्ड मधे कमालिची अस्वस्थता आहे,कारण अर्थातच सद्दामचे झालेले उच्चटन { सद्दामने त्याचे तेल डॉलर ऐवजी युरो मधे विकायला सुरुवात केली आणि अमेरिकेच्या डोळ्यात तो खुपायला लागला.} तर गद्दाफी ने डॉलरच्या जागी Gold Dinar वापरण्याचा मनसुबा उघड केला होता, त्यामुळेच तो सद्दामच्या मागो माग अल्लाला प्यारा झाला.} अरब स्प्रिंग च्या नावावर अमेरिकेचे चालले उध्योग पाहुन सौदी राजवट अस्वस्थ न-होणार तर काय ? त्यात डॉलरचे भविष्य अंधकारमय होण्याची लक्षणे आहेतच... मग रशिया चीन आणि सौदी यांचे त्रिकुट तयार झाले ज्यातुन डॉलरचा दबदबा कमी करण्याचा चंग बांधला गेला आहे. शिवाय जगातल्या सर्वात मोठ्या तेल उत्पादकाला शेल ऑइल मधे स्वयंपूर्णता आलेली कशी परवडेल ? त्यातुनही जर अमेरिका त्यांचा सर्वात मोठा { आता चीन आहे.} ग्राहक असताना ? मग शेल ऑइल मधली इन्व्हेस्टमेंट रोडवाइची असेल तर कॄड ऑइलचे दर खाली आणणे { ते सुद्धा आहे ती उत्पादन क्षमता कायम ठेवुन आणि त्यात कोणतीही घट न करता } हा डाव खेळला गेला असल्याचे म्हंटले जात आहे.
वरती जे Warren Buffett’s जेव्हा US$26.5-billion गुंतवणुक करतात त्याचा असाही अर्थ निघतो की ते डॉलर डंप करुन फिजीकल असेट्स मधे गुंतवणुक करत आहे ज्यातुन परतावा मिळावा.

यात भरीस भर म्हणजे :- Project Prophecy नुसार डॉलर हा कोसळण्याच्या मार्गावर आहे,आणि त्याच बरोबर अमेरिकेची अर्थ व्यवस्था देखील. पोपट मेला आहे पण तसे कोणी जाहिर करत नाही कारण याच पोपटावर इतरांची मदार देखील अवलंबुन आहे.
अधिक इकडे :-
Why the U.S. Dollar Value Will Collapse
Many in the U.S. Intelligence Community fear a 25-year Great Depression is unavoidable
‘Project Prophecy’ 25 Year Depression
जाता जाता :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

एक दुवा द्यायचा राहिला होता :-
The next big crisis? Jim Rickards on financial panics

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

पैसा's picture

9 Dec 2014 - 11:21 am | पैसा

मालिका मस्त होते आहे!