मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
28 Oct 2014 - 11:45 am

"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता.

या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा. या आणि अशा अनेक गोष्टी अगदी ख-या आणि महत्वाच्या आहेत. पण मला त्या माणसाच्या बोलण्यातला एकच मुद्दा खटकला. अस्मितेचा.

मराठी अस्मिता ! मराठी अस्मिता !.... कधी बंगळुरू मधे कन्नडी अस्मिता ! असं कुणी बोंब मारताना ऐकलंय का? मी तरी नाही. चेन्नईत मल्ल्याली अस्मितेच्या नावाने कुणी ओरडत नाही की बंगाल मधे बंगाली अस्मितेच्या नावाने नाही. पण ही अस्मिता त्यांच्या रोजच्या, सततच्या वागण्यातून दिसते. बंगळुरू मधे रिक्षावाले ठासून नो इंग्लिश नो हिंदी म्हणतात. ओनली कन्नडा. मग तिथे रहायला गेलेली मराठी मंडळी घरी आल्यावर मी थोडं थोडं कन्नड शिकलोय म्हणतात, त्यांना घरचेही अरे वा ! मस्त म्हणून शाबासकी देतात. इथे अस्मिता कुणाची श्रेष्ठ ठरली?

लोकल ट्रेन मधे आपण प्रवास करतो. अगदी सहजपणे आपण हिंदीत संवाद साधत असतो. उदा. 'भाईसाब जरा बाजू होना', 'कौनसा स्टेशन गया?', 'आपको कहां उतरना है?'. किंवा अगदीच फस्ट क्लास किंवा एसी बस मधे असू किंवा जरा टापटीप माणूस/बाई दिसली की आपण थेट इंग्रजी सुरू करतो. उदा. 'एक्स्क्यूज मी, डज धिस बस गो टू चेंबूर'. का? आपल्याला कुणी प्रतिबंध करत नाही 'नो हिंदी नो इंग्लिश' म्हणायला. शिरजोर पणे 'हिंदी मे बोल यार' म्हणणारी अमराठी मंडळी अनेकांनी कार्यालयात बघितली असतील कदाचित. त्यांच्यासमोर आपली अस्मिता मूग गिळून का बसते?

इंग्रजी शाळांवरचं प्रेम, इंग्रजी सण, आपले मराठी सणही साजरे करायच्या इंग्रजी पद्धती, या आणि अशा बाबतीत 'आपलीच' मराठी अस्मिता दाखवण्यात आपल्याला वाटणारा कमीपणा किंवा कालबाह्यतेची भावना अशा अनेक गोष्टींद्वारे आपण आपली ही अस्मिता मारतच असतो की. 'जीते जी' म्हणतात तसं.

हे असं असताना निवडणुका आल्या की कुण्या पक्षाची आणि लगोलग आपलीही अस्मिता मात्र जागी होते. मग आपल्याला पुळका येतो; भाषेचा, आणि ती भाषा, तिचा अभिमान बाळगणा-या अशा पक्षांचा. आता वास्तविक हा असा प्रकार कालबाह्य झाला आहे. पक्षांसाठी भाषिक मुद्द्यावर निवडणुका लढवणं योग्य राहिलेलं नाही आणि लोकांनी कुण्या राजकीय पक्षावर 'आपल्या' भाषेची अस्मिता जपण्याकरिता अवलंबून रहाणं योग्य राहिलेलं नाही. पुढे गेलंय सगळं आता. दोन दशकांपूर्वी जेंव्हा एका पक्षाने मराठी माणसाचं सबलीकरण केलं, तेंव्हा त्यासाठी तो काळ योग्य होता. पण आता जेंव्हा इतर पक्ष विकासाची कास धरत आहेत, ती लोकांच्या बुद्धीला पटत आहे, तेंव्हाही हे योग्य ठरेल ही शक्यता कमीच.

मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. जिथे तिथे मराठीचा पुरस्कार व्हायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतून मराठीचा, मराठी असल्याचा अभिमान दिसायला हवा. बंगळुरूच्या रिक्षावाल्यापासून ते जरीकाठी लुंगी घालून फिरणा-या भारताच्या माजी अर्थमंत्र्यांच्या वागण्यातून दिसतो तसा. एक पक्ष येईल, मराठी अस्मिता जपेल असं म्हणणं म्हणजे कुणीतरी येईल, वाढून देईल म्हणण्यासारखं आहे. आपण आपल्या बाजूने अस्मिता वा-यावर सोडायची, आणि एखादा राजकीय पक्ष ती जपेल म्हणत त्याला मत द्यायचं म्हणजे खुळेपणा आहे. क्रांतिवीर चित्रपटातला 'आज मै तुम्हे बचाऊंगा, कल कौन आयेगा?' वाला संवाद इथे आठवतो. सुजाणांनी त्यातून बोध घ्यावा.

एक मराठी म्हणून प्रत्येक माणसाला अभिमान जरी असला, तरी तोच राजकारणाच्या अग्रस्थानी ठेवण्यावर संबंधित पक्षांनी, मतदारांनी विचार करायला हवा. कारण याच्यामुळेच कदाचित आपण जे खरोखर गरजेचे मुद्दे आहेत, जो आपल्या हक्काचा विकास आहे, त्याच्यापासून दूर राहिले असू. तेंव्हा आज खरं तर विकासासारख्या महत्वाच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं पाहिजे. लढाई विकासाची असली पाहिजे. मराठी आहेच; आणि राहील. आजच्या काळात गरज मराठीच्या तलवारीला धार लावण्याची नसून विकासाच्या तलवारीला मराठीची मूठ बसविण्याची आहे. आणि त्या मुठीला इथल्या मराठी माणसांची एकत्रित ताकद मिळाली पाहिजे. मग अटकेपार झेंडे रोवण्यापासून मराठीला मराठी माणसाला कुणीही अडवू शकणार नाही. एकत्रित ताकद मिळाली नाही तर मात्र भविष्यात अल्पसंख्यांकतेची ढाल करायची वेळ आपल्यावर येईल हे नक्की.

- अपूर्व ओक

भाषासमाजजीवनमानप्रकटनविचारलेखमत

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

28 Oct 2014 - 12:30 pm | प्रसाद१९७१

मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. >>>>>> का?

नाही जपली तर काय फरक पडतो?
नाही बोलले मराठीत , मग?

समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?

विजुभाऊ's picture

28 Oct 2014 - 7:51 pm | विजुभाऊ

नाही जपली तर काय फरक पडतो?
नाही बोलले मराठीत , मग?
समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?

तसा फरक कोणालाच पडणार नाही.उद्या वेगळा विदर्भ झाला किंवा वेगळा महाराष्ट्र झाला तरी काय फरक पडतो.
तुमचे नाव अगोदर गिरीजा काकू होते लोक थोडे फसायचे इतकेच.
उद्या तुम्ही काहीतरी बदलून गिरीजारशीद मुशर्रफ किंवा अब्दुलप्रसादवलीखान कयानी असे नाव लावले तरी कुणाला काय फरक पडणार आहे. बामियानच्या मूर्ती तोडून काय फरक पडला ? तसेही एखाद्या गावात नव्या सुधारणा/ विकास होण्यास तसाही तुमचा विरोध असतोच.

रमेश आठवले's picture

29 Oct 2014 - 12:53 am | रमेश आठवले

अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे प्रणेते कै. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव हमीद असे ठेवले आहे.
तसेच प्रसिद्ध लेखक आणि नट चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या चिरंजीवाचे नाव जहांगीर असे ठेवल्याचे स्वत: नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले. दाभोलकरांनी हमीद दलवाई यांची आठवण म्हणून मुलाचे नाव ठेवले आणि मांडलेकर म्हणतात त्यांना जहांगीर हे नाव आवडले.

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 9:46 am | प्रसाद१९७१

@विजूभाऊ - मी तो गिरिजा काका नव्हे. आरोप बिनशर्त मागे घ्या
गिरिजा काका म्हणजे प्रसाद गोडबोले. माझे मिपावर प्रसाद१९७१ हेच नाव पहील्यापासुन आहे.

काळा पहाड's picture

29 Oct 2014 - 12:39 pm | काळा पहाड

पर्सनली घ्यायची काहीच गरज नाहीये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2014 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे.

कोणत्याच गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. भाषा नसली काय आणि माणसं नसली काय. जगरहाटी तिच्या तिच्या वेगाने चाललेली असते. उत्तम पर्याय भविष्यात येतच असतात.

खरं तर कोणत्याच गोष्टींनी ज्यांच्या जीवनावर कोणताच प्रभाव पडत नै अशी सर्व माणसे एकत्र करुन जगातल्या उंच कड्यावर नेली पाहिजेत. आणि तिथे त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. ;)

दिलीप बिरुटे

मुंबै-पुणेकरांसाठी आहे का लेख ? अंम्मळ गोंधळ होतोय माझा.

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2014 - 1:29 pm | बोका-ए-आझम

अस्मिता ही नेहमीच आर्थिक हलाखीशी निगडीत असते. त्यामुळे अस्मितेचं राजकारण करणारे पक्ष हे अस्मिता ही हत्यार म्हणून वापरतात. शिवसेनेने आणि आता मनसेने तेच केलं आणि विधानसभा निवडणुकीत दोघांनीही आपटी खाल्ली. जो खरा सर्वसमावेशक आहे तो असल्या असुरक्षित भावना जोपासत बसत नाही. राहिला मुद्दा मराठी भाषा नामशेष होण्याचा. इंटरनेट आल्यावर प्रादेशिक भाषा नष्ट होतील अशी ओरड होत होती. हे संस्थळ अशा आक्षेपांना सणसणीत उत्तर आहे. आणि समजा १०० वर्षांनी झाली मराठी भाषा नामशेष. तेव्हा आपल्यापैकी कोण जिवंत असणार आहे? जी गोष्ट आपल्यानंतर होणार आहे तिच्यावर मेंदू शिणवणं म्हणजे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी यापेक्षा काही नाही. आणि ७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?

विजुभाऊ's picture

28 Oct 2014 - 1:48 pm | विजुभाऊ


७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?


बोका काका. तुम्हाला कल्पना आहे? स्वातन्त्र्यानंतर भारतात काही "शे" बोली भाषा नामशेष झाल्या आहेत. भाषा मेली की संस्कृती नष्ट होते.
कोणतीही भाषा स्वतः दुबळी नसते. तीत रोज नवनव्या शब्दांची भर पडत जाते आणि समृद्ध होते. ती भाषा बोलणारा जनसमूह आर्थिक/ राजकीय दृष्ट्या जितका सक्षम तितकी ती भाषा जोपासली जाते.

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2014 - 2:31 pm | बोका-ए-आझम

तेच तर म्हणतोय मी विजुभौ! त्या अर्थाने मराठी दुबळी आहे का? नाही हेच उत्तर आहे. आणि ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?

विजुभाऊ's picture

28 Oct 2014 - 4:28 pm | विजुभाऊ

ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?

तसे नाही हो. राज्यघटनेत उल्लेखलेल्या भाषा ह्या मोठ्या समुदायाच्या भाषा आहेत. त्यामानाने छोट्या समुदायाच्या भाषा ह्या नष्ट झाल्या / होत आहेत. अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली. हा मुद्दा आहे. उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत.
अवांतर :- या वेळचा एक पद्म पुरस्कार अशाच एका अदिवासी भाषांच्या अभ्यासकाला मिळाला आहे.

प्रसाद१९७१'s picture

28 Oct 2014 - 5:44 pm | प्रसाद१९७१

उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत.

नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो. उपाशी तर रहायला लागणार नाही ना. आणि तुम्ही जीवंत असे पर्यंत खा ना हे पदार्थ करुन. तुम्ही नसल्यावर हे पदार्थ असले काय आणि नसले काय, तुम्हाला काय फरक पडतो?

सुहास..'s picture

28 Oct 2014 - 6:14 pm | सुहास..

खिक्क !!!

( अनेकतेत एकता असा एकसंध भारत हिंदुराष्ट्र होण्यास किती हातभार लावतात ना लोक ! )

गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे म्हंटले तर संध्येच्या आचमनात पोर्क चे किंवा बीफ चे सूप असले तरीही काहीच फरक पडणार नाही.

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2014 - 9:10 pm | बोका-ए-आझम

संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2014 - 9:10 pm | बोका-ए-आझम

संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 9:50 am | प्रसाद१९७१

@विजुभाऊ - मी गिरीजा काकु नाही. असले आरोप माफीसकट मागे घ्या :-) गिरीजा काकु म्हणजे प्रसाद गोडबोले.

संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे, मग पुढे काय बोलणार.

पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.

कपिलमुनी's picture

29 Oct 2014 - 2:40 pm | कपिलमुनी

पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.

पुल आणि म्युनिसिपालीटीमधल्या उंदीर मारायच्या विभागाचा उदाहरण आठवले

बॅटमॅन's picture

29 Oct 2014 - 4:09 pm | बॅटमॅन

उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच.

काबूलहून अब्दाली आला पानपतास. ते अंतर वट्ट ९३१ किमी आहे. २००० मैल काय? उगा उचल बोटे अन दाब कळफलक?
असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे?

https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=kabul+to+panipat+distance

तर पेशवे पुण्याहून पानपतास गेले. ते अंतर १५४२ किमी आहे.

https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+panipat+distance

उगा सांगोवांगी अन वडाला वांगी!

अन मराठे गेले ते पुण्याहून पार अटक व पेशावरास! ते अंतर १७०० किमीच्या आसपास आहे.

https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+attock+distance

मराठ्यांचे घोडदळ उत्तरेस अटक तर दक्षिणेस तंजावरापर्यंत गेले होते. ते अंतर आहे २६४५ किमी.

https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=attock+to+tanjavur+distance

तर पश्चिमेस बडोदा ते पूर्वेस मुर्शिदाबाद अंतर आहे १९०३ किमी.

https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=baroda+to+murshidabad+distance

तेव्हा कोण संध्या करत वेळ घालवत बसले होते त्याचे उत्तर कृपया द्यावे अशी प्रसाद यांना विनंती आहे.

विजुभाऊ's picture

29 Oct 2014 - 4:15 pm | विजुभाऊ

उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच.

बरोबर आहे. अर्थात त्यामुळे त्याम्च्या मते काहीच फर्क पडत नाही.
पेशव्यांच्या पराभव अब्दालीने केला की अब्दालीचा पराभव पेशव्यानी केला वलीप्रसाद शेख यांना त्यामुळे कसलाच फरक पडत नाही.

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2014 - 4:20 pm | टवाळ कार्टा

मी परत स्वैंपाक घरात जातो , हळूच फळीवर जाऊन बसतो
गस हि फळीवरच असतो ,
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो ....
मी डोकावून बघतो .... बैको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते
या घोडीचे त्या घोडीला पत्ता लागत नाही
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही ,,,,
जाधवांचा स्वैंपाक होई पर्यंत .........
मी फोटोतून बैको काढे बघत असतो !!!
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,

हे आठवले ;)

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 4:54 pm | प्रसाद१९७१

माझा मुद्दा संध्ये बद्दल होता. बाकीचा मालमसाला , तडका होता.

जर कोणी संध्या करणे म्हणजे फार काहीतरी भारी संस्कृती आहे असे सांगणार असेल तर असे काहीतरी लिहायलाच लागते.

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 4:57 pm | प्रसाद१९७१

असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे?

मी पेशव्यांच्याच जातीचा आहे ( पोटजाती सकट ) त्यामुळे ब्रिगेडी वृत्तीतुन नावे ठेवत नाहीये.

मृत्युन्जय's picture

31 Oct 2014 - 10:17 am | मृत्युन्जय

तुमच्या जातीचा इथे काहीच संबंध नाही. प्रश्न चुकीच्या प्रतिवादांचा आहे. उद्या एखाद्या निम्नवर्णीयाने फुले आंबेडकरांवर चुकीची टीका केली तर केवळ एकजातीय असल्याने त्याची चूक माफ ठरणार नाही.

प्रसाद१९७१'s picture

31 Oct 2014 - 2:59 pm | प्रसाद१९७१

प्रश्न स्पेसिफिक होता "कायम पेशव्यांना का झोडायचे?" असा. त्यात प्रश्न कर्त्यांना काय म्हणायचे आहे हे मला कळले आणि त्यानुसारच उत्तर दिले आहे.
इथे जातीचा संबंध आहेच कारण माझी टीका ही ब्रिगेडी सारखी बायस्ड नाहीये हे मला सांगायचे होते.

कपिलमुनी's picture

31 Oct 2014 - 7:35 pm | कपिलमुनी

पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले

याचा बादरायण संबंध आपण कसा लावला ते कळेल का?
आणि

संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे

मग शहाणपणाची व्याख्या मिपापामरांना समजावून सांगा. ही विनंती

सतिश गावडे's picture

31 Oct 2014 - 7:40 pm | सतिश गावडे

मुळात "संध्या करणे" म्हणजे काय हे आमच्यासारख्या "संध्या न करणार्‍यांना" कुणी समजावून सांगेल का?

पौराणिक मालिकांमध्ये ऋषि जलप्रवाहात उभे राहून ओंजळीत पाणी घेऊन सुर्याकडे तोंड करुन ते पाणी एका लहान धारेच्या स्वरुपात ओंजळ खाली करुन पुन्हा जलप्रवाहात सोडताना दाखवतात. हीच संध्या का? किंवा साहित्यात येणारा अर्घ्य (कि अर्ध्य) देणे हा शब्दप्रयोग "संध्या करणे" ला समानार्थी आहे का?

किंवा अजून काही वेगळं असतं "संध्या करणं" ?

कपिलमुनी's picture

31 Oct 2014 - 7:52 pm | कपिलमुनी

कोणत्याही समाजावर तत्काली समजुतींचा पगडा असतो. आणि धर्मांमध्ये कालानुरूप बदल घडत असतात.
पण म्हणून त्यांना मूर्ख ठरवून मोडीत काढणा चुकीचा आहे. संध्या असो की नमाज किंवा इतर काही.

कारण आज ज्या धर्मसमजुती घट्ट आहेत त्या १०० वर्षांनी बदलणार आहेतच तेव्हाचा द्रूष्टीकोन वेगळा असेल त्याचप्रमाणे पूर्वीचा दृष्टीकोन वेगळा .
पेशवे पानिपतामध्ये का हरले ? हा वेगळा आणि गहन चर्चा विषय होउ शकतो . त्याला संध्या करत बसल्याने हरले असे म्हणने आणि झटकणे चुकीचे आहे. पराभवाचे खापर त्यांच्या धार्मिकतेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे

hitesh's picture

1 Nov 2014 - 3:35 am | hitesh

पानिपतावर पेशव्यांबरोबर लढाऊ सैनिक सुमारे ऐंशी हजार ते एक लाख होते.

उरलेले लाखभर लोक हे उत्तरेकडील तीर्थक्षेत्रात स्नान संध्या केल्याने मोक्ष मिळतो या परमोच्च ( ! ) उद्देशाने गेले होते.

या बिन लढाऊ लाख लोकांमुळेच पेशव्यंची रसद लवकर संपली व ते हरले.

दोन अफगाण्यांनी भारताला कापुन टाकले.. १ शकुनीमामा २ अब्दाली.

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 9:48 am | प्रसाद१९७१

अनेकतेत एकता हा निव्वळ भोंगळ पणा आहे.
अनेकता आहे म्हणजेच एकता नाही.

भारत काय महाराष्ट्र सुद्धा एक नाही. भारतात कमीत कमी १००० तरी छॉटे भारत आहेत. ते वेगळे होऊ शकत नाहीत म्हणुन एकत्र रहातात. मजबूरी आहे.

सुहास..'s picture

29 Oct 2014 - 4:17 pm | सुहास..

होवुन जावु दे जे व्हायचंय ते एकदाच !!

प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत का ? राजकीय दृश्ट्या असेल तर एक भाजपा प्रेमी म्हणुन ठीक आहे, सामाजिक द्रश्ट्या असेल तर मग मात्र अतिशय खेदकारक आहे !!

मुद्द्याचं बोलतो...युतीच ...कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये, शिवाय भाजपा सारखं संधी-साधु दुसरं कोणीच असु शकत नाही , शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही ), असा संधीसाधु पणा अगांत असल्याबद्दल एक साधी भनक नाही पब्लीक ला ! असा संधीसाधु भोंगळ पणा नाही का ? असो....ज्या मराठी अस्मितेला तुम्ही आज नावे ठेवता आहात , आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार ! गोळवलगुर्जी असते ना तर , त्यांच्या ज्या विचारांने सुरु केलेल्या या संस्थेची हालत बघतली असती, तर चपलेने मारलं असत !! आणी ही आरएसएसने हे हिन्दु महासभा, बजरंग दल ही पिलावळ का पाळुन ठेवली आहे हो ! जाती-पातीतील तेढ वाढवातात च्यायला.. I am already living in the state of hell, don't make it more hell !! ) !

दुसरी गोष्ट , सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार ...२८८ जागांपैकी १२१ निवडुन आलेत , त्यात २२ आयात उमेदवार आहेत, भाजपा ने ही निवडुन आलेल्या उमेदवारांमध्ये मध्ये गुन्हेगार असलेली मंडळी आहे, जर २५ सभा घेवुन ( हे च्यामारी लिगल आहे का ? माझ्या टॅक्स चा पैसा असा एक प्रधान सेवक स्वता:च्या पक्षाच्या प्रचारासाठी कसा वापरु शकतो, वेग-वेगळ्या ठिकाणी ११ हेलीपॅड्स बनविली गेलीत एका रात्रीत, नाही ! येते ,गवतात ही थांबविता येते ..पण मग प्रधानसेवका ला सिक्युरिटी लागते ना , नायतर व्हायचा येडीयुरप्पा ! काय सांगता ? प्रचार फंडाचा वापरिला ? अरे मग १५ वर्षे सरकार नसताना कुठुन आला पैसा, अरे हो गुजरात वरुन आला असेल नाही का ? मग गुजरातचा विकास नक्कीच झाला म्हणायचा ) पार घसा बसे पर्यंत , फक्त विकासाच बोलुन बघायला गेले तर , लाट वगैर असुन , माझ्या लेखी तुम्ही हारलेलेच आहात ...

बाकी विकासाच एक सांगतो , तो जो कोणी विकास आहे ना, त्याला एकदा विचारु च दे, की बाबा ! तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !! बर ! तुझी नेमकी व्याख्या काय आहे, एका पंचतारांकित हॉस्पिटलच ( आधी हॉटेल लिहिले होते ) उद्घाटन केल्याने तु कसा येतोस ? चार ठिकाणी झाडु मारल्याने ( जे आधीच क्लिन आहे त्याला, काही नाही दोन चार झाडांची पाने पडलेली ) तु कसा काय येतोस ? दर रविवारी रेडिओवर भाषण केल्याने तु कसा काय येतोस ? कारण नसताना मोहनजींच भाषण दाखविल्याने तुझे येताना पाय दुखत नाहीत का ?

अस्मितेच्या गप्पा करणार्‍यांनी , मोदींनी गुजरात आणि गोध्रा प्रकरण , अस्मिते सारखंच वापरल नाही रे बाबा , लय काम करायचा म्हणे आधी , त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही. लय विकासबाज पहिल्यापासुन ..आत्तापुरत येव्हढ बास ...विकास ही बाहेर काढतो ...

! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 5:05 pm | प्रसाद१९७१

प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत

मालक तुमचाच ट्रॅक चुकला आहे. मला कोणाबद्दलच कौतुक नाही.
खरेतर मला राष्ट्रपती राजवट कायमची असणे जास्त आवडेल. सगळी कडेच.

खरेतर बसप नी इतकी मते घेतली पण सर्वांचेच त्याच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणुन मी लक्षात आणुन देत होतो. खरेतर बसप चे ७ टक्के मत मिळवणे कौतुकास्पद आहे आणि सेनेला धोक्याचा सिग्नल आहे.

बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील

बसपा विषयी द्वेश अजिबात नाही, बसप नी ब्राह्मणांचा दुस्वास केला नाही गेल्या काही वर्षात.

! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !

अजिबात नाही, तुम्ही घ्या मराठी अस्मिता वगैरे, मला सिल्क स्मिता राहुं दे.

सुहास..'s picture

29 Oct 2014 - 5:15 pm | सुहास..

:)

क्लिंटन's picture

29 Oct 2014 - 6:11 pm | क्लिंटन

.कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये,

अगदी जरूर वाटावे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असावे असे लोकांना वाटत नव्हते त्याचे काय?

शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही )

मजाच म्हणायची. एप्रिल-मे मध्ये त्याच मोदींच्या नावावर आपली १८ माणसे लोकसभेवर निवडून गेली की मोदी चांगले आणि आता त्याच मोदींचा फायदा आपल्याला न होता इतरांना व्हायला लागला की मोदी वाईट. किती मज्जा की नै?

आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार

या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल :)

सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार

बरोबर आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या जवळपास दुप्पट आणि मनसेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या १२० पेक्षा जास्त पट खळखळाट आहे. दिसतोच आहे तो प्रतिसादातून :)

तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !!

कोणी महाराष्ट्रात यायचा आणि महाराष्ट्र गुजरातपेक्षा (किंवा गुजरात महाराष्ट्रापेक्षा किंवा फॉर दॅट मॅटर कोणतेही राज्य इतर कोणत्याही राज्यापेक्षा) पुढे/मागे असायचा काय संबंध?

त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही.

आणि मग युती तुटायची वेळ आल्यावर सगळी दुनिया मोदींविरूध्द झालेली असताना बाळासाहेब मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले म्हणून त्यांचे गुजरातचे मुख्यमंत्रीपद वाचले आणि म्हणूनच ते आज पंतप्रधानपदी बसू शकले असे तुमचा सामनाच म्हणत होता. म्हणजे आता शिवसैनिक बाळासाहेबांच्या विरोधात लिहू लागला असे म्हणायचे का?

तूर्तास इतकेच.

काळा पहाड's picture

29 Oct 2014 - 8:49 pm | काळा पहाड

एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मनसे चे (किंवा शिवसेनेचे, जे असाल ते) आहात. आम्ही सामान्य मतदार आहोत. आम्ही तुमच्या एकूण वर्तनाकडे पाहून आमचे मत बनवतो. आणि आमची मतं ही एखादा पक्ष किती सुशिक्षित आहे, किती विनम्र आहे, किती "जाणता" आहे, किती चाणाक्ष आहे, त्याचं चरित्र, भाषा, वागणूक, ध्येय, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टीवर ठरतो. आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत. आणि तुम्ही तुमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व (अजाणतेपणे का होईना करत असल्याने) तुमचा पक्ष ही उतरलेला नाही. बाळासाहेब, उद्धव आणि राज यांच्याबद्दल लोकांना प्रचंड जवळीकता वाटते, पण लोक त्यांना मत देत नाहीत कारण लोकांना त्यांच्या एकूण राज्य हाकण्याच्या क्षमतेवर विश्वास नसावा. " दम लागतो" वगैरे भाषेचे दिवस आता गेलेले आहेत. ते पूर्वी ठीक होतं. आता एकतर सुधारा किंवा नोकरी शोधायला लागा.

मी ही सामान्य माणुस आहे ही आहे, आणी जे लिहिलय ते अ‍ॅज अ ऑब्झर्वेशन म्हणून लिहिलय !! तुम्ही मान्य करा वा नका करू ! बाळासांहेबाविषयी कोणी ही अनादारार्थी बोलु शकत नाही हे खरे आहे, म्हणून मोदींनी ते सेन्टेन्स टाकले होते, आदर, श्रंधाजली ई. सब झुट !! मलाही अगदी (राजसारखच) माणुस खुप क्लियर वाटत होता, पण जसे निर्णय ते घेत आहेत त्यानुसार मी ही बोलतोय..माझ राजकारणावर इतक बोलण ! माझ मला आश्चर्थ वाटतय ..मला उध्दव शी ही काही जवळीकता इ. नाही ! मला जे दिसतय ते मी लिहितो आहे, मी राजकीय उलथा-पालथ दाखवितोय आणणि काही शहाणे मला अ‍ॅन्टी मोदी समजाहेत, टारगेट करताहेत, मनसे विषयी ( ते ही आता ) थट्टेखोर किंवा इतर तत्सम गोष्टी बोलताहेत ! जेव्हा ते बोलताहेत , तेव्हा मी उत्तर देतोय इतकेच !! मला समाजाशी असते घेणे-देणे , पक्षाच कार्ड मला झक मारुन वापरावे लागते ( माझ्या सोशल संस्थेच कार्ड घेवुन एखाद्या अधिकार्‍याकडे गेलो ना, तो अधिकारी, एक तर बोलवायला उशीर करतो आणि माझ म्हणन ही ऐकुन घेत नाही, उलट मी जर एखाद्या पक्षाच कार्ड घेवुन गेलो की लगेच आत बोलावुन घेतात, चहा-बिहा ऑफर करतात ) , मग त्यातल्या त्यात ज्या पक्षाशी आपले मत जुळतात , त्यांच कार्ड मी वापरतो इतकेच ....आधी सेनेच वापरायचो, आता मनसे च वापरतो,(माझ्याकडुन काम होतात हे समजल्यावर मला भाजपाने ही दोन चार वेळा विचारणा केली आहे मी नाही म्हणालो होतो ! ) ..मी हेच प्रसाद समजावत होतो की हे आलेच कमळ घेवुन ..

क्लिंटन's picture

29 Oct 2014 - 9:36 pm | क्लिंटन

आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत.

आणि ते या परिक्षेत कधीच उतरणार नाहीत. कारण बघतच आहात. बाकी तरीही अशा शिव/मनसैनिकांना का उसकावायचे? कारण चर्चा करणे, मुद्दे मांडणे अशा गोष्टींना अशा लोकांकडे थारा नसतो. ते जरा खुट्ट वाजले की शिवीगाळ करायला उतरतातच. इथेही हे दिसतच आहे. आणि त्यातूनच अशांचा खरा चेहरा नक्की कसा आहे हे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर समजून यायला मदत होते.

वाजपेयींसारख्या नेत्याने शिवसेनेला मान दिला म्हणून शिवसेनेच्या कार्यपध्दतीविषयी आणि एकूणच आचारविचारांविषयी आक्षेप असूनही केवळ वाजपेयींच्या शब्दाला मान म्हणून अनेक वर्षे शिवसेनेचे समर्थन नक्कीच केले.त्यातूनही बाळासाहेब असताना त्यांच्यामुळे शिवसेना इतकी दुरावली नव्हती.पण उध्दव ठाकरे या मनुष्याने गेल्या महिन्याभरात जे प्रकार केले (विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे) त्यामुळे शिवसेना अगदी कायमची परकी झाली. असो.

काळा पहाड's picture

29 Oct 2014 - 9:49 pm | काळा पहाड

अफझलखान येईपर्यंत मी स्वतः दोलायामान मनस्थितीत होतो.

सुहास..'s picture

29 Oct 2014 - 10:27 pm | सुहास..

विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे >>> अरे रे , किती चुका !! कीव वाटली भक्तीची !! plz ,Don'T MisLead people like some electronic media !
याचा एकदाचा क्लियरन्स देतो ...मोदींना न्हवे, अमीत शहांना !!

अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) ही तिच सभा आहे जिथे आठवले, " मत करो मेरी नक्कल " का असे काहीसे म्हणाला होता , मी याचं थेट प्रक्षेपण माझ्या डोळ्याने बघीतल, एकल ..म्हटल बघुच मोदींनी अध्यक्ष पद दिलेला माणुस आहे तरी कसा ...पुरंदरेच्या पुस्तकात असंच अफजल खान ने " शिवरायांच्या " बाबतीत काढलेले उद्गार आहेत ...आणि तोच संदर्भ धरुन " अमीत शहा" म्हणजे मला संपवायला विडा घेतलेला " अफजल खान " आहे आणि फौज घेवुन आलाय , मला कळत नाही असा असंजस का जाणुन बुजुन पसरवितात आणि पब्लीक पण मिडीयाच ऐकुन काय बी बरळतय !! ..आणि निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर कोण - कोणा ला बोलत नाही !! सुषमा स्वराज बोलल्याच की बाळासाहेंबाविषयी ...

माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी ..

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2014 - 7:18 pm | श्रीगुरुजी

>>> अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची )

२५ सप्टेंबरला युती तुटल्यानंतर २७ सप्टेंबरला उद्धव ठाकर्‍यांनी सभा घेतली व त्या सभेपासून त्यांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केली. मोदींनी महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरला आले. ५ ऑक्टोबरच्या सभेत त्यांनी "बाळासाहेबांबद्दल असलेल्या आदरापोटी मी शिवसेनेवर टीका करणार नाही" अशी अत्यंत स्वागतार्ह भूमिका घेतली. तरीही सेना नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. २७ सप्टेंबरपासून सेना नेत्यांनी भाजप, मोदी व शहांबद्दल टीकेची झोड उठवली होती. पण भाजप नेते गप्प होते. ४ सप्टेंबरला शहा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर जाऊन उधोजीराजेंची भेट घ्यावी अशी शिवसेनेची अपेक्षा होती. परंतु शहांच्या कार्यक्रमात मातोश्री भेटीचा समावेश नाही हे समजल्यावर शिवसेनेचा तिळपापड झाला. लगेचच "शहाणा हो" अशी पोस्टर्स माध्यमातून फिरविली गेली. तरीही शहांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर मग नाईलाजाने शहांना मातोश्री भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले गेले व त्यानंतर शहांनी भेट दिली.

२७ सप्टेंबरनंतर शहांची तुलना आदिलशहा, कुतुबशहा इ. शी केली जाउ लागली. मोदींची तुलना अफझलखानशी केली गेली. तरीही भाजप नेते गप्प होते. शेवटी सातत्याने होणारी जहरी टीका असह्य झाल्याने शहांनी ८ ऑक्टोबरला शिवसेनेचे नाव न घेता शिवसेनेची तुलना उंदराशी केली. भाजपवर २७ सप्टेंबरपासून (किंबहुना त्याही आधीपासून) शिवसेना जहरी टीका करत होती. भाजपने १०-११ दिवस टीका सहन केल्यानंतर शिवसेनेला जोडा मारला (एकही मारा, लेकीन सॉलीड मारा). सुरूवात शिवसेनेने केली होती. भाजपने अनेक दिवस संयम बाळगल्यानंतर योग्य ते उत्तर दिलं.

>>> माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी ..

असेलही. शिवसेना २५ वर्षे भाजपला कमी लेखत होती. आता भाजपकडे हुकुमाची पाने आल्यावर ते सेनेला धडा शिकविणारच.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2014 - 7:06 pm | श्रीगुरुजी

>>> तेच तर म्हणतोय , दम लागतो त्यांच्या विषयी विरोधात बोलायला ! उगा " भावनिक वाक्य " " बालासाहेब के बारेंमे मैं कुछ नही कहुंगा " अस म्हणाव लागलं पब्लीक समोर ...सेनेत दम होता , ते तो बोलला ही ...आणि जेव्हढा होता त्यात तुम्हाला परिस्थिती असुन ही बहुमत मिळाले नाही ( पुन्हा , हेलीकॉप्टर प्रचार, सभांना होणारी गर्दी, मोदी लाट, विकासाच्या गप्पा आहेच )

चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला.

>>> आज ही बहुमतावर शिक्का पडेपर्यंत तुम्हाला सेनेला बरोबर घेवुन चालणे आहेच, आज उध्दव सॉफ्ट वागतोय , शिकतो आहे ! एखादा पाच-सहा पावलं माग सरकतोय, ठीक आहे , मी ऐकले माफी मागावी असे काहीतरी आलेय पेपरात , छान !! मागेल ही , पण त्यात ही तुमचीच हार आहे, तुमच्याच एका मित्रपक्षावर तुम्ही ही वेळ आणली आहे आणि त्या वर तुमचा उन्माद दिसतोय, ...आज महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी महाराष्ट्राचा ' बिग बॉस' केला असे म्हणेन मी !! अरे हो, मोदींनी प्रधानसेवक हे म्हणणारे देखील महाराष्ट्राचेच नेते होते. असे उपकार विसरणारे, संधी-साधु आहेतच !!

भाजपने नाही, शिवसेनेने स्वतःच्या माजाने आणि आडमुठेपणाने ही वेळ स्वतःवर आणलेली आहे. यात भाजपची हार नसून फक्त शिवसेनेचीच हार आहे. स्वतःच्या आडमुठेपणाने युती तुटल्यावर स्वतःच्या पक्षाबद्दल सकारात्मक प्रचार करण्याऐवजी शिवसेनेने मोदी, शहा व भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व नकारात्मक प्रचार केल्यानेच ही वेळ त्यांच्यावर आली.

>>> तो गप्प बसलाय कारण त्याला मुंबई महापालिकेतील युती तोडायची नाहीये , ते बळ आहे सेनेच !!

पार महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत सेनेला भाजपच्या कुबड्या लागतात. पण माज केवढा अंगात!

सुहास..'s picture

30 Oct 2014 - 7:24 pm | सुहास..

चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>>
तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!!

भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ?

हेच डिस्कशन आता त्या निवडणुका झाल्यावर... धागा बुकमार्क करुन ठेवतोय

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2014 - 7:40 pm | श्रीगुरुजी

>>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते,

तुम्हाला काय पटतंय आणि काय नाही यावर काहीच अवलंबून नाही.

>>> उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! )

सगळेच पक्ष आकडे फुगवून सांगतात. अगदी मतदान झाल्यावर सुद्धा मतमोजणीच्या आदल्या दिवशी संजय राऊत "शिवसेनेला १७५-२०० जागा मिळतील" असा अवास्तव अंदाज सांगत होता. संधीसाधु, दुटप्पी आणि फेकू सगळेच पक्ष व नेते असतात.

>>> ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !!

भाजपाने बरेच दिवस संयम बाळगून नंतरच शिवसेनेला प्रत्त्युत्तर दिले. सुरूवात शिवसेनेने केली आणि मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावरसुद्धा शिवसेनेला शहाणपण सुचले नाही.

>>> येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !!

कधी? भाजप शिवसेनेपेक्षा अनेकपटींनी मोठा असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपपुढे शिवसेना म्हणजे किस झाड की पत्ती!

>>> तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात

दुर्या-तिर्या आणि त्यासुद्धा हुकुमाच्या नसलेल्या, असे पत्ते हातात ठेवून काय उपयोग?

>>> ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!!

कसली इकडे आड आणि तिकडे विहीर? भाजपची काहीही कोंडी होत नाहीय्ये. आता शिवसेनेचीच सर्वत्र कोंडी होणार आहे.

>>> भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ?

मौनीबाबांवरील टीका जनतेनेच उचलून धरली कारण त्यात तथ्य होते. भाजपवरील शिवसेनेच्या टीकेला जनतेनेच नाकारले कारण त्यात सत्यांश नव्हता, नुसताच आक्रस्ताळेपणा होता.

सुहास..'s picture

30 Oct 2014 - 8:07 pm | सुहास..

भाजप जरा जास्तच माज करत आहे.
श्रीगुरुजी - Wed, 29/10/2014 - 21:09

भाजप जरा जास्तच माज करत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा नक्षा बर्‍यापैकी उतरलेला दिसत आहे. अशावेळी मोठेपणाचा आव आणून शिवसेनेला बरोबर घेणे हेच योग्य ठरेल.

बाकी चालु द्यात ...

श्रीगुरुजी's picture

31 Oct 2014 - 11:28 am | श्रीगुरुजी

दुसर्‍या एका धाग्यावरील माझा प्रतिसाद इथे टाकण्याचा उद्देश समजला नाही. त्या धाग्यावर मी लिहिले ते योग्यच होते आणि इथेही मी योग्य तेच लिहीत आहे.

तिथला प्रतिसाद इथे टाकण्यापेक्षा माझ्या या धाग्यावरील प्रतिसादाला उत्तर दिलेत (उत्तर असलेच तर) तर बरे होईल.

अर्धवटराव's picture

29 Oct 2014 - 8:49 pm | अर्धवटराव

आद्य नमोरुग्ण श्री राजसाहेब (असं ते स्वतः म्हणतात... दोन वर्षापुर्वी त्यांनीच म्हणे मोदिंनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती) जर यदाकदाचीत भाजपशी युती करते (लोकसभा निवडणुकीपुर्वी हि एक शक्यता होती) किंवा/आणि भाजप+शि.से. युती कायम राहुन सेनेला १००+ जागा मिळाल्या असत्या तर आज समस्त मराठी (सो कॉल्ड) अस्मितावाले वानखेडे स्टेडीयमवर मेजवानी झोडायची तयारी करत असते. बाळवाघाने आपल्या तिर्थरुपांचे दात त्यांच्याच घशात घातले, आणि इंजीन तर यार्डाच्या बाहेर पडलच नाहि म्हणुन खास केजरी मफलर मागवुन फुकाचा जळजळ खोकला सुरु आहे बाकि काहि नाहि.

पुढे तर यापेक्षा भयानक आहे ..जो खेळ राष्ट्रवादी आणी काँग्रेस ने केला , एकमेकांवर अंतर्गत कुरघोड्या करायचा , आरोप-प्रत्यारोप करायचा ! तिच वेळ आज भाजपा-सेने वर आली ....काल परवा अर्णव च्या शो मध्ये काळ्या यादी वरुन जो पेट पाहिला , त्यावर जी हालत उत्तर देताना काँग्रेसवाल्यांची व्हायची तिच भाजपा ची होत होती ..

अर्धवटराव's picture

29 Oct 2014 - 9:17 pm | अर्धवटराव

अनेक पक्षांत विभागलेली राजकारणी जमात एका वरच्या पातळीवर एकसंघ असते व तिथे सर्वांचे प्रॉब्लेम सारखेच असतात.

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2014 - 10:15 am | बोका-ए-आझम

निव्वळ भाजपा नाही, प्रत्येक पक्ष संधीसाधू असतोच. नाहीतर त्याला राजकारण करताच येणार नाही. शिवाय यशस्वी माणसाला आणि संघटनांना नावे ठेवणे हे तर सगळेचजण करतात. उद्धवजींना भाजपला १३७ जागा द्यायच्या नव्हत्या कारण या वेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काही खरं नाही आणि आपल्याला संधी आहे हे जाणवल्यामुळेच ना? भाजपा संधीसाधू आहे असं जे कुणी म्हणतात ते एक प्रकारे आपल्याला ते करता येत नाही याचीच कबुली देत असतात.

सौंदाळा's picture

30 Oct 2014 - 6:22 pm | सौंदाळा

नरेंद्र मोदी / भाजपा आता संधीसाधुपणा म्हणा, माज म्हणा, आत्मविश्वास म्हणा दाखवतायत. पण ५ वर्षात एक्स्ट्रा-ऑर्डीनरी काम केले नाही तर २०१९ ला परत याच पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि तेव्हा संधीसाधुपणा, माज वगैरे करायची या पक्षांची वेळ असेल.
काळच ठरवेल पुढे काय होतय

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2014 - 10:28 am | बोका-ए-आझम

अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा दर्जा चांगलाच आहे अजूनही. आणि तुम्ही जेव्हा अाय.अाय.एम. म्हणता तेव्हा नक्की कुठली अाय.आय.एम.? कारण १३ आय.आय.एम. सध्या आपल्या देशात आहेत.

सुहास..'s picture

30 Oct 2014 - 5:58 pm | सुहास..

आझमशेठ !!

बाकी राहिली संधी साधु म्हणण्याची, भाजपा आहेच संधी-साधु आणि दुटप्पी चेहर्‍याचा पक्ष हे तुम्ही ही मान्य करताय , सो फॉर दॅट मॅटर " Party with difference " ची जाहीरात बंद करा !!

(संपादित)

प्रसाद१९७१'s picture

30 Oct 2014 - 6:17 pm | प्रसाद१९७१

सायबा - दुसर्‍या पार्टीने काय करावे ते सोडुन द्या. त्यांनी काय करावे हा विचार तुम्ही करत बसलात तर तुमच्या मनसेला काही फायदा होणार नाही. उलट चुका करत असतील तर करु द्यात. लोक मूर्ख नाहीत, चुका केल्या तर पुढच्या निवड्णुकीत लाथ बसेल.

तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल.

तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल >>

:)

प्रसाद१९७१'s picture

30 Oct 2014 - 6:50 pm | प्रसाद१९७१

भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी वाईट आहे हे बोलण्यात वाया घालवली. त्या ऐवजी आम्ही कॉग्रेस ला समर्थ पर्याय आहोत हे दाखवून दिले असते तर फार आधीच भाजपची सत्ता आली असती.

प्रदीप's picture

30 Oct 2014 - 6:55 pm | प्रदीप

भाजपचे अस्तित्व एव्हढे आहे?

प्रसाद१९७१'s picture

30 Oct 2014 - 7:00 pm | प्रसाद१९७१

भाजप म्हणजे जनसंघ्+भाजप. जनसंघ पन्नासच्या दशका पासुन आहे.

प्रदीप's picture

30 Oct 2014 - 7:34 pm | प्रदीप

जनसंघाला तत्कालिन राजकारणात हिंदूत्वाच्या अ‍ॅजेंडावर फारसा लोकाश्रय नव्हता. जनता दलाच्या कडबोळ्यात कुणाचाच पायपोस कुणाच्याही पायात नसल्याने, त्याचे लवकरच व्हायचे ते झाले.

अटल बिहारी बाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपने ९० च्या दशकाच्या शेवटाला केंद्रात सरकार चालवले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या नावाने शंख करण्यात वेळ दवडला, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठराव?

प्रसाद१९७१'s picture

30 Oct 2014 - 8:18 pm | प्रसाद१९७१

बाजपाईंचे कसले ते भाजपचे सरकार? ते कॉग्रेस्चे सरकारच होते. त्याचे मुखीया प्र.महाजन म्हणजे भाजप मधले शरद पवार.
ते चालवले ते सुद्धा कॉग्रेस सारखे. टेलिकॉम आणि कोळसा घॉटाळ्याची मुळे ह्याच सरकार कडे होती. बाजपायींची मानलेली कन्या आणी जावई आणि एक IAS ऑफिसर धुमाकुळ घालत होते.
नरसिंह रावांकडुन सोनिया कडे कॉग्रेस जाई पर्यंत कॉग्रेसला निवडणुक जिंकता येइल असे वातावरण निर्माण करायचे एकमेव काम बाजपाईंनी केले.

आणि तेंव्हा भाजपला २०० जागा मिळाल्या होत्या त्यासुद्धा बर्‍याच ठीकाणी युती करुन.
तेंव्हाच जर मोदीसारखा माणुस असता तर पूर्ण बहुमत मिळाले असते.

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2014 - 8:49 pm | बोका-ए-आझम

सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण?तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? तुम्ही बोलता किती? तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? कितीचं तोडपाणी केलं? राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही.

सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण? >>>

साहेब नाही, फक्त सुहास ( आडनाव लावत नाही आणि विचारत नाही )

तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? >>>


तुम्ही बोलता किती? >>

बोलत नाही लिहितो आहे !

तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी >>

मराठी भाषा माझ्या पक्षस्थापनेपेक्षा खुप जुनी आहे.

अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? >>

कायदा आडवा आला, दोन दिवस शिक्षा झाली. ठेकेदारांनी आणि केद्रं सरकारच्या करारासमोर हात टेकवावे लागले, मनसे,कोल्हापुर टोल विरोधी समीती, सेना आणि राज्य सरकार हे चौघे असुन ही टोलप्रश्नी ठेकेदारांपुढे सुप्रीम कोर्टात केस हारलो. ( या विषया वर डिट्टेलवारी लिहितो आहे, तुम्ही बसुन रहा, आरोप करत रहा, केसेस आम्ही घेत राहु, पोलीसांचे दांडके खात राहु, कामाला लागायच्या वेळेला, बॅक-ग्राउंड व्हेरिफिकेशन साठी कमिश्नर ऑफीसात पैसै खर्च करत जावु )

http://timesofindia.indiatimes.com/india/Maharashtra-CM-agrees-to-shut-2...
( यादी आरटीआय खाली मागवुन घेणे )
किमान इतके तरी करु शकलो याचा आनंद आहेच .....बाकीच्यांनी शष्प काही केले असल्यास जरूर सांगावे !! वागळेंच्या कार्यक्रमात बडबडीशिवाय

कितीचं तोडपाणी केलं?>>

एक रुपयाच ही नाही ! ( राज ठाकरेंच्या भाषेत सांगायच तर, राज ला खरेदी करणारा अजुन जन्माला यायचाय )

राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे.>>>

जेनेटिक प्रॉब्लेम ? हे कधी म्हणाले, रक्तात नाही आणि प्रॉब्लेम याला संमातर शब्द नाही, पुर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ आहे म्हणाले.

हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. >>

भंपकपणाला काय वाटते आणि त्याने कशामुळे ओशाळावे याच्याशी आमचा काही ही संबध नाही, ३ अब्ज कर्जात बुडालेल्या महाराष्ट्रात वानखेडे वर सोहळा आम्ही केलेला नाही किंवा पंचतारांकित व्यक्तींचा सहभाग असलेला, पंचतारांकित इस्पितळाच, पंच तारांकित उद्घाटन तर अजिबात केलेले नाही.

आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. >>

मी ही आहे ,पाच वर्षातुन एकदा, पण इलेक्ट्रॉनिक मिडीया च एकुन, सत्यता पडताळल्या शिवाय, मी माझी मत बदलत नाही.

कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. >>>

तेव्हढाच हक्क आम्हालाही आहे.

आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही. >>>

हेच वाक्य तुम्हालाही लागु आहे.

धन्यवाद ! फुकटात येव्ह्ढेच ज्ञान मिळेल !!

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2014 - 12:00 am | बोका-ए-आझम

फुकटात न मागता ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद!तसंही तुमच्यासारख्या लोकांवर खर्च करायला आमच्याकडे थोडाच कोहिनूर मिल मधून मिळालेला पैसा आहे? आमचा आमच्या कष्टानेा मिळवलेला पैसा आहे. बरं, ती सुप्रीम कोर्टातली कुठली केस? नाही, कारण राज साहेबांवर इतक्या केसेस आहेत, नक्की कुठली केस हरलात? आणि ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात बरी फाइल केलीत? का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला केस म्हणल्यावर कोणीही विश्वास ठेवेल असं वाटलं? त्या भरलेल्या केसबद्दल मीडियात छापून आलं असेलच. ती लिंक बघायला मिळेल काय जरा? आणि एक - मी इलेक्ट्रॉनिक मीडियावरुन मत बनवत नाही कारण मी स्वतः एकेकाळी तिथे कार्यरत होतो. त्यामुळे तिथे बातम्या कशा बनवतात आणि फिरवतात ते मला माहीत आहे. पण आम्ही पक्षीय झापडं लावूनही हिंडत नाही. म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.

काळा पहाड's picture

31 Oct 2014 - 12:27 am | काळा पहाड

म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.

सुहासभाऊ, घ्या.. घालवलात आणखी एक मतदार.

सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ?

आम्ही तुमच्याइतके उत्तम पक्षाचे कार्यकर्ते नसू पण पेप्र बिप्र आम्ही वाचतो आणि महाराष्ट्रात कशाला किती खर्च लागतोय
कुठे भ्रष्टाचार होतोय, कोण किती बाता मारत होतं, निवड्णुकीनंतर त्यांचे काय हाल झाले ते आम्हाला समजतंय, तुम्हाला मनसेनं जे स्वत:चे बेक्कार हाल केले त्याबद्दल काही बोलता येईल का ? इतकंच सांगा. तुमचा त्रास मला पाहवल्या जात नै ये.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

31 Oct 2014 - 11:25 am | श्रीगुरुजी

सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ?

मनसेच्या पानिपताची कारणे अगदी उघड आहेत. नुसतीच बडबड आणि कृती शून्य असे फार काळ चालत नाही. सेना-भाजप युती तुटल्यावर राज ठाकरे प्रचारात सांगत होते की भाजपने सेनेचा विश्वासघात केला. लगेच लोकांच्या मनात विचार आला की तू तेच केलंस ना शिवसेनेतून फुटुन निघताना. तू करतोस तो स्वाभिमान आणि भाजपने युती तोडली तर तो विश्वासघात! शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आतून मिळालेले आहेत असेही राज बोलत होता. तू तरी वेगळं काय केलंस? नाशिकमध्ये आधी भाजपचा आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलास. नंतर भुजबळ, राणे पिता-पुत्रांविरूद्ध मनसेने उमेदवार दिले नव्हते. तुझंच काँग्रेस्-राष्ट्रवादी साटंलोटं होतं. हे जनतेच्या लक्षात आलं म्हणूनच जनतेने मनसेला जोरदार लाथ घातली.

मनसे आता कोमात आहे आणि लवकरच मनसेचा कारभार आटोपेल.

क्लिंटन's picture

31 Oct 2014 - 2:03 pm | क्लिंटन

माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून...

इतर ४९ सदस्यांच्या मतांविषयी कल्पना नाही पण मनसे या गुंड आणि राडेबाज पक्षाचा धुव्वा उडाला याचा मला तरी आनंदच झाला.२००८-०९ मध्येही माझ्या ओळखीत अनेक लोक 'राजसाहेब' म्हणून वाहवून चालले होते त्यावेळेपासून किंबहुना त्याही पूर्वीपासून माझा मनसे या प्रकाराला अगदी कडाडून विरोधच होता. आता त्यातले बरेचसे मित्र आता त्या प्रकारापासून दूर गेले आहेत याचे समाधान आहे. आणि हो. मी मनसेचा धुव्वा उडाला असे म्हणत आहे. पानिपत हा शब्द मुद्दामून वापरत नाही.कारण आपल्या कोणाचा जोरदार पराभव झाला तर ते पानिपत. हे मनसेवाले राडेबाज लोक मला स्वतःला तरी कोणत्याही अ‍ॅन्गलने आपले वाटत नाहीत. त्यामुळे मनसेचे पानिपत झाले असे मी तरी नक्कीच म्हणणार नाही. असो.

म्हणे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट प्रसिध्द केली यांनी. अमक्याचे तंगड तोडू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ याशिवाय कोणतीही भाषा बोलू न शकणारे आणि कधीच कसलीच विधायक भूमिका न मांडणारे मनसेवाले अभ्यासपूर्ण ब्लू-प्रिंट प्रसिध्द कशी करू शकतात हा प्रश्न फारसा कोणालाच कसा पडला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. म्हणे महाराष्ट्राला स्वायत्तता देणार. आपल्या राज्यघटनेप्रमाणे अशी राज्यांना परस्पर स्वायत्तता जाहिर करता येत नाही याचा पत्ता यांना आहे की नाही?

मनसे म्हणजे भारतीय राजकारणात जे काही वाईट आहे त्या सगळ्याचा अर्क आहे. अशा पक्षांचा कायमचा नायनाट व्हायला हवा. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सुजाण मतदारांनी पाऊल उचलले आहे त्याचा नक्कीच आनंद आहे.

अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?

अगदी अगदी..कशाचा कशाला संबंध नाही, नुस्तं आपलं श्वानं युवानं मघवानमाह चाललंय.

hitesh's picture

31 Oct 2014 - 6:34 pm | hitesh

संबंध नाही कसा ?

श्वान युवा मधवान ( इंद्र) तिघेही कामातुर असतात.

तसे अस्मितेच्या नावाने ओरडणारे सेना मनसे सत्तातुर असतात

बॅटमॅन's picture

31 Oct 2014 - 7:30 pm | बॅटमॅन

हा हा हा. तसे तर मग जगातला प्रत्येक पुरुष अन प्रत्येक स्त्री (दोहोंपैकी काही तुरळक अपवाद वगळता) कधी ना कधी कामातुर असतेच. त्या हिशेबाने कसाही संबंध लावता येईल.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2014 - 6:46 pm | श्रीगुरुजी

>>> अरे रे ! अतिशय बायस्ड , मुद्दे राहिलेत बाजुला , २५ सभा , ब्रॅन्ड मोदी, खर्च, विकासाच्या गप्पा करणारे विकासचे पप्पा !! ...येव्हढ काही ही नसताना जर उध्दव इतके सीट्स आणु शकला हेच त्याचे यश आहे ...मनसे च तर सोडुनच दे !!

उद्धवकडे काही नव्हतं तर कशाला १५१ जागांच्या गमजा मारत होता? आणि १५१ जागा हव्या त्या भाजपच्या जीवावर? स्वतःला फक्त ६३ जागा निवडून आणत्या आल्या? आधीच्या निवडणुकात तर भाजपची मदत घेऊन भाजपपेक्षा जास्त जागा दांडगाई करून लढवून भाजपपेक्षा कमी जागा मिळत होत्या, तरी आम्हीच मोठे भाऊ हा तोरा कायम!

जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये.

>>> बाळासाहेबांच्या गोष्टी तुम्ही भाजपाप्रेमी करुच शकत नाही , आणि आम्ही करु देणार ही नाही , मी च काय कुठलाही मराठी करु देणार नव्हताच , म्हणुन तर बाळासाहेंबाविषयी चकार काढता आला नाही मोदींना ...उपकार केलेत बाळासांहेबानी येव्हढे !! आणि सोळा जागांसाठी भाजपाने आपला संधी-साधु पणा दाखविला असेच होते ना ....

बाळासाहेब म्हणजे काय सगळ्या टीकेच्या पलिकडे होते काय? मोदींचे ५ ऑक्टोबरचे भाषण नीट ऐका. ते बाळासाहेबांबद्दल अजिबात बोलणार नाही असे म्हणाले नव्हते (या निवडणुकीत बाळासाहेब हा मुद्दाच नव्हता). बाळासाहेबांच्या आदरासाठी शिवसेनेवर टीका करणार नाही असे म्हणाले होते. आणि बाळासाहेबांनी काय उपकार केलेत भाजपवर? उलट भाजपनेच कमी जागा लढवून इतके दिवस शिवसेनेवर उपकार केलेत. मुंबई-ठाण्याच्या पलिकडे अस्तित्व नसलेला पक्ष भाजपमुळेच महाराष्ट्रात पोहोचला. हे भाजपचे शिवसेनेवर उपकार आहेत. १९८० मध्ये सेनेचे शून्य आमदार होते व १९८५ मध्ये फक्त १. तीच संख्या १९९० मध्ये ५२ वर पोचली ती भाजपच्या उपकारांमुळे. १९६६ मध्ये स्थापना होऊन सेनेला आपला पहिला खासदार निवडून आणायला २३ वर्षे लागली आणि ते सुद्धा भाजपच्या मदतीने. १९७९ मध्ये इंदिरा काँग्रेसबरोबर युती असून व इंदिरा गांधींची प्रचंड लाट असूनसुद्धा सेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. भाजपबरोबर युती केली नसती तर शिवसेना २-४ आमदारांच्या पलिकडे गेली नसती.

आपली ताकद किती आणि फुसका आव आणायचा किती?

प्रसाद१९७१'s picture

30 Oct 2014 - 7:01 pm | प्रसाद१९७१

जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये.>>>>>>>>>> गुरुजी ते कौतुक नापास होईल असे वाटलेला मुलगा काठावर पास झाला तरी त्याचे जसे होते तश्या प्रकारचे कौतुक आहे.

विजुभाऊ's picture

30 Oct 2014 - 10:43 am | विजुभाऊ

या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल Smile

मी येतो. तुम्हाला ते समजावून साम्गण्याचा प्रगत्न करतो. तुम्हाला समजले नाही तर? ( .... अर्धा पिझ्झा आणि अर्धी पेप्सी हे तरी अ‍ॅशुअर करा क्लिन्टन शेठ उगाच सगळं ऐकून नंतर समजलं नाही म्हंटला तर गेले किनई आमचा अर्धा दिवस + लोकलचे .रीक्षाचे भाडे वाया ;) )

क्लिंटन's picture

30 Oct 2014 - 10:55 am | क्लिंटन

जरूर. त्या निमित्ताने तरी विजूभाऊ माझ्याकडे आले तर चांगलेच आहे म्हणा :)

आजानुकर्ण's picture

28 Oct 2014 - 6:38 pm | आजानुकर्ण

सहमत!

उत्क्रांतीच्या काळात माणूस कंदमुळं खायचा. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्यामुळं कंदमुळांची खाद्यसंस्कृती नष्टच झाली की! तेच थालीपीठ, मांडे, पुरणपोळ्यांचं होईल.

सतिश गावडे's picture

28 Oct 2014 - 9:12 pm | सतिश गावडे

अगदी हेच लिहिणार होतो.

अन्नाचा उद्देश शरीराला त्याची कामे करण्यासाठी ऊर्जा पुरवणे हा आहे. त्याला संस्कृती वगैरे बनवणे ही माणसाच्या सुपिक मेंदूची करामत आहे.

तेच भाषेचं. संवाद महत्वाचा. भाषा नव्हे.

टवाळ कार्टा's picture

28 Oct 2014 - 7:10 pm | टवाळ कार्टा

तसा तुम्ही जिल्बी टाकुनपण काही शष्प फरक पडत नाहीच की

विजुभाऊ's picture

28 Oct 2014 - 7:38 pm | विजुभाऊ

नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो.

तुम्ही फक्त खाण्याचेच पदार्थ पाहिले. सण, रीती नाही पाहिल्या.
असो. अर्थात मी नसल्यावर भाषा किंवा संस्कृती किंवा हा देश किंवा पृथ्वी सुद्धा असली काय नसला काय राहिली की कसलाच फरक पडत नाही.
तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे हे देखील तितकेच खरे व्यर्थ टंकणश्रम. त्यामुळे भाषेला कसलाच फरक पडणार नाहिय्ये.

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 9:56 am | प्रसाद१९७१

आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान भारतीय संस्क्रुतीतील अस्पृष्यता, सती जाणे, हूंडा, बालविवाह ह्या सर्व रीतींना सॉलीड मिस करत असाल ना?

यसवायजी's picture

28 Oct 2014 - 6:16 pm | यसवायजी

अवांतर-
बाकीचे पदार्थ खाल्लेत. हे "म्हाद्या" काय आहे?

विजुभाऊ's picture

28 Oct 2014 - 7:41 pm | विजुभाऊ

"म्हाद्या " ही भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेम्गदाणे घालून केलेली कांद्याची भाजी असते.
खासकरून सातारा भागात ही गावरान भाजी एकदम फेमस आहे. उसाची वारी केलेल्या अन नावालाच सातारचे सांगणाराना हे माहीतच नसेल. अर्थात त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.

काळा पहाड's picture

29 Oct 2014 - 12:46 pm | काळा पहाड

रेसीपी टाका हो.

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2014 - 7:23 am | बोका-ए-आझम

अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी ' नावाचं पुस्तक आहे. त्यात स्वयंपाकाविषयी जे प्रकरण आहे त्यात त्यांनी महाद्याची कृती दिलेली आहे.

आनंदी गोपाळ's picture

28 Oct 2014 - 8:48 pm | आनंदी गोपाळ

अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली.

बठ्ठा खानदेश आहिरानामा बात करंस, पावरी आठे सातपुडामां पावरा लोके बोलतंस. वड्डर लोकेस्नी भासा बी तितलीच जित्ती शे. आन तुम्ही आठे सोंस्कृतीना बाता करी र्‍हायनात?

१. उदाहरणे नीट द्या.
२. आधी संस्कृती नष्ट होते. नंतर भाषा.

आनंदी गोपाळ's picture

28 Oct 2014 - 8:50 pm | आनंदी गोपाळ

उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील.

पोवाडा नावाचा सांस्कृतीक सण?? डब्लू टी एफ?

बॅटमॅन's picture

29 Oct 2014 - 11:03 am | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी =))

पिंपातला उंदीर's picture

28 Oct 2014 - 1:39 pm | पिंपातला उंदीर

भाषेची निर्मिती का झाली ? तर संवाद साधण्यासाठी . मग तो संवाद कसा होतो हे महत्वाचे . तो कुठल्या भाषेतून होतो ते फारसे महत्वाचे नाही . मराठी वर प्रेम असणे वेगळे आणि तिची अस्मिता वैगेरे ठोकळेबाज कल्पनांच्या आहारी जाण वेगळ . शेवटी भाषा (फ़क़्त संवादाच माध्यम म्हणून ) महत्वाची कि ती वापरणारा माणूस जास्त महत्वाचा हा preference नक्की झाला तर भाषेमुळे नसलेले प्रश्न उकरून काढून स्वतहाच्या पोळ्या भाजणार्या लोकांची दुकान बंद होतील

प्रसाद१९७१'s picture

28 Oct 2014 - 1:44 pm | प्रसाद१९७१

मला वाटले होते की माझ्या प्रतिसादामुळे एकदम अस्मिताखोरांचा हल्ला होइल माझ्यावर, पण पिंउ आणी बोएआ ह्यांच्या प्रतिक्रीया वाचुन बरे वाटले.

वेल्लाभट's picture

28 Oct 2014 - 3:27 pm | वेल्लाभट

अरेरे.... तसं सुचवायचं होतंत :D

विजुभाऊ's picture

28 Oct 2014 - 1:40 pm | विजुभाऊ

मराठी अस्मिता हे एक भोंगळ प्रतीक आहे.
बीहारी / युपी च्या लोकांची दादागिरी हसत खेळत सहन करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का?
उगाचच हिन्दी भाषेला राष्ट्रभाषा म्हणवत हिन्दी पखवडा साजरा करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का?
कर्नाटक सरकारने / तामिळनाडू सरकारने भाषेची सक्ती केली तर त्या विरुद्ध कोणीच काही बोलायचे नाही मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो राष्ट्रदोह मानायचा म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का?
मराठीला इंग्रजी पेक्षाही हिन्दी भाषेकडून गिळंकृत होण्याचा धोका आहे हे स्पष्ट दिसत असूनही ते मान्य करायचे नाही म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का?
"गर्व " हा शब्द हिन्दी भाषेतील अर्थाप्रमाणे मात्र मराठीत चुकीच्या अर्थाने वापरायचे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? ( उदा: "गर्वाचे घर खाली" )