विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 9:10 pm

डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे.

कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले. सगळी सांगोवांगी, फोन अ फ्रेंड, रामराम (आपले ते व्हाटस अप) वर सगळ्यांना पिंगवून सगळ्याजणी जमल्या. अस्मादिक मात्र गेल्या कट्ट्याला जागल्या प्रमाणे आणि रविवार असल्या कारणाने सुस्त येस टी च्या कृपेमुळे सगळ्याच्या नंतरच नियोजित ठिकाणी पोहचल्या.

ठाणे ओवळे नाका इथे उतरून पहिल्या एका टपरीवजा हॉटेल मालकास विष्णुजी कि रसोई कुठे आहे रे बाबा? असे विचारले. केवढा मोठा तरी प्रश्नचिन्ह त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर *unknw* . माझ्या मनात तर अरे तुझे विष्णु जी कि रसोई नाही माहित मग ठाण्यात राहतोस तरी कशाला असे काहीसे आलेले :-| शेवटी चारपाच रिक्क्षावाले, २ आजोबा यांना विचारून झाले. सगळ्याचे उत्तर माहित नाही. ऑ? आता असेच घरी जावे लागते आहे कि काय असा प्रश्न येउन गेला. मीच मधुराला फोन करून काही स्थळखुण आहे का विचारले. तर म्हणाली कि नवीन पेट्रोल पंपाचे काम चालू आहे त्याच्या बाजुला. तरी ७ मिनिटे चालून सुद्धा कुठे हि बांधकाम चालू असलेले दिसले नाही. शेवटी एक "सोलकढी" नामक हॉटेलात शिरून एकदम गरीब भाव चेहऱ्यावर आणत तिथल्या मेनेजरला ओशाळवाणे हसत पत्ता विचारला. मराठीदाक्षिण्य दाखवत त्याने मला सांगितले याच रस्त्यावर सरळ चालत जा ५ एक मिनिटावरच आहे. त्याचे आभार मानुन बाहेर आले. मनात म्हंटले हेमे, कसली आहेस ग तू, एका हॉटेलात शिरून सरळ दुसऱ्या हॉटेलचा पत्ता विचारतेस. नगच आहेस बाई … खिक्क. शेवटी त्याने सांगितल्या प्रमाणे बोर्ड दिसला. हुश्श …. म्हणजे कट्ट्याला हजेरी लागणार आपली. :yahoo:

दरवाज्यातुन आत जाताच चिमण्याचा किलबिलाट ऐकू आला. ( म्हणजे काय? आणखीन कोण असणार?). आत जाताच एक मस्त डायलॉग चिटकवला " कुठे फेडाल ग हि पाप, १ किलोमीटर चालवले मला, २ किलो वजन कमी झाले न?" असे म्हणत हसत हसत विराजमान झाले. माझ्या अगोदरच सौ. मुवी, कस्तुरी, अजया, सूर( २कन्या समवेत), सविता ००१, अद्वेय ( सुपुत्र समवेत ), मीच मधुरा( त्यांच्या कन्ये समवेत), दुर्गावी, इनिगोय( त्यांच्या सुपुत्र समवेत), मोक्षदा आणि सेंटर ऑफ कट्टा मृणालिनीने अगोदरच हजेरी लावली होती. उशीरा आल्यामुळे अजयाने बहरेन इथुन आणलेल्या अत्तर आणि चॉकलेटला मला मुकावे लागले :'-( अजयाच्या घरी असलेल्या झाडावरचे आवळे तेवढे पदरात पडले तेच पवित्र मानले आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही असे म्हणत वसई गावातले नुकतेच तोडुन आणलेले जाम स्टाटर म्हणून समोर टिपोय वर टाकताच दोन मिनिटात गुडूप पण झाले. मग बसल्या बसल्या सगळ्याची ओळख परेड झाली आणि गप्पांना वेग आला. १२. १५ चे १. १५ झाले हे पोटात कावळे काव काव करायला लागल्यावर समजले. मग भोजनस्थित झालो. हसत खेळत अस्सल महाराष्ट्रीयन आणि पंजाबी जेवणाचा फडशा पाडला. जेवण सांगता श्रीखंड व आइसक्रीमने करण्यात आली. अमंळ जेवण जास्त झाले म्हणून परत सोप्यावर ठाण मांडण्यात आले आणि पाहतो तर समोरच पानाचे काऊन्टर दिसले. मग काय दोन दोन पानाबरोबर परत गप्पाचा फड रंगला. प्रत्येकीला त्यांची बाकीचे हि कामे व बाहेर तात्काळले ड्रायवर असल्याने व मुले सुद्धा दंगामस्ती करून झाल्याने पेंगुळली होती. शेवटी जड अंतकरणाने आणि तुडुंब पोटाने विष्णुजीच्या रसोइतुन बाहेर पडलो. पण तरीही आजबाजूच्या अतिशय शोभिवंत व जून्या कालीन वस्तु समवेत फोटो काढण्याचे मोह आवरेना. शेवटचे फोटोशेशन करून पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी *BYE* करून पांगल्या. फोटो आणि बाकी काही तपशीलवार प्रतिसादातून पुरवले जातील.

हे ठिकाणजीवनमानमौजमजाप्रकटनसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2014 - 11:13 am | पिलीयन रायडर

पुण्यनगरीस्थित अनाहितांनो..

खुप झालं इनो घेणं.. ह्या मुंबैकरांच्या नाकावर टिच्चुन कट्टा व्हायलाच हवा..!!

(ह्याउप्पर मी अजुन काहीहि बोलणार नाहीये ह्या कट्ट्या बद्दल.. मुझे दुश्मनोने चेपु, अनाहिता और मिपा.. सब तरफसे घेर लिया है..)

चला आपण पण विश्नुजी की रसोईला.

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2014 - 11:52 am | पिलीयन रायडर

पुण्यात पण आहे का ते? मग नक्की जाउ..

त्रिवेणी's picture

8 Apr 2014 - 11:57 am | त्रिवेणी

हो आहे. मी जाऊन आले एकदा तिथे.
चला आता ठरवा बर पटापट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2014 - 2:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुण्यातल्या विष्णूजी की रसोईचा पत्ता आणि फोन नंबर मिळू शकेल काय?

सिध्दी गार्ड्न जवळ, म्हात्रे ब्रीज,डी.पी. रोड, एरंडवणा, पुणे.
फोन नं.-7304418961

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 2:45 pm | प्रभाकर पेठकर

घ्या... त्रिवेनी ह्यांनी तातडीने माहिती पुरविली आहे. कधी करताय पुण्याचा कट्टा?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2014 - 7:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही इथेच असलात तर... बोला कोणता दिवस मोकळा आहे? मी पुढाकार घेतो.

नाहीतर पुढची फेरी होईल तेव्हा कळवा. तेव्हा तर नक्की करूच. (तेव्हा अगोदर एक ट्रायल रन ही झालेली असेल ;) )

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2014 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

=))
मुंबैकरणी पुण्यनगरीला पण येउन कट्टा करुन जातील बरं का,तुम्ही जमेपर्यंत ;)

अगदी सहमत एकदा ठरवले कि मागे हटत नाही आम्ही ....;-)

अनाहितांमध्ये मुंबैकर पुणेकर अशी फूट पडतेय काय? ;)

-निरागस प्रश्नकर्ता!

सानिकास्वप्निल's picture

8 Apr 2014 - 2:01 pm | सानिकास्वप्निल

-निरागस प्रश्नकर्ता!

काही ही
=))

अजिबात नाही हा ....आणि तसा कुणी प्रयत्न हि करू नये उगाच ...आम्ही फक्त आपली थोडी गम्मत करत आहोत एकमेकींची ....+)

त्यापेक्षा मध्यवर्ती ठिकाणी एक अनाहिता सम्मेलन करूया की जंगी. आधे उधरसे आव, आधे इधर आव, बाकीके स्काईपपे चेहरा दिखाव..

काय म्हणताय?

त्रिवेणी's picture

8 Apr 2014 - 11:17 am | त्रिवेणी

मुलींनो पाकातली बोर खातांना माझी आठ्वन आली का ग?
आणि वाग्यांची भाजी नाही दिसत ती?

त्रिवेनी, पाकातली बोरं तुझी बोरं म्हणून आठवण काढुन खाल्ली!

भाते's picture

8 Apr 2014 - 11:21 am | भाते

अनाहिता कट्टा वृत्तांत आणि फोटो, दोन्हीही!

--ची नाही तर किमान --ची तरी लाज बाळगा! काय छळवाद मांडलाय हे खादाडीचे फोटो टाकुन!
असले जीवघेणे (कातिल!) फोटो टाकुन आम्हाला त्रास देण्यात काय समाधान मिळते हो तुम्हाला?

सूड's picture

8 Apr 2014 - 11:26 am | सूड

मस्त!!

अनुप ढेरे's picture

8 Apr 2014 - 11:27 am | अनुप ढेरे

छान वृत्तांत.
रच्याकने, अनाहिता या शब्दाचा अर्थ काय आहे नक्की. जालावर पाहिले असतां unwounded असा अर्थ दिसला. त्याचा आणि स्त्रीयांच्या वेगळ्या दालनाचा संबंध नाय समजला.

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 11:48 am | समीरसूर

जबरदस्त कट्टा आणि मस्त वर्णन! जेवणाचे फोटो बघून जीभेला लिकेज झाले. बाकी मुंबईत असा कट्टा आयोजित करून मुंबईमधल्या सगळ्या दिशांकडून मेंबरांनी हजेरी लावणे म्हणजे कौतुकास्पदच आहे. :-)

अनाहिता या ग्रुपचा हा कट्टा झकास झालेला दिसतोय. उत्तम. असेच कट्टे होवोत आणि सदस्य एकत्र येऊन मजा करोत या शुभेच्छा.

अनेकांना विष्णुजी की रसोईच्या मेन्यूचे आकर्षण वाटलेले दिसले आणि तिथे एकदा गेलेच पाहिजे असा प्लॅनही होत असताना दिसला. म्हणून एक वर्ड ऑफ कॉशनः

तिथले महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून ठेवलेले जे काही जिन्नस असतात ते मूळ फॉर्म्युल्यापासून बरेच फटकून बनवलेले असतात. त्याउपर जे काही रिमिक्स बनवले आहे ते अफलातून चवीचे मुळीच नसते. त्यात अनेक पदार्थ कच्चे (झुणका = कच्च्या बेसनाची चव सदैव तोंडात येणे, पाटवड्यांची आमटी या पदार्थातल्या पाटवड्या कच्च्या पिठूळ.. अळूचे फदफदे भलतेच जास्त आंबट) असे बहुतांश महाराष्ट्रीयन पदार्थांत चवीचे किंवा प्रोसेसचे न्यून जाणवले.

तिथे तव्यावर गरमागरम करुन दिले जाणारे फुलके/ भाकर्‍या वगैरे या मात्र गरमागरम घेतल्याने छान लागतात.

थालीपीठांचे प्रॉडक्शन एका झोपडीत सदैव चालू असते ते शुभ्र लोण्यासोबत उत्तम लागते, तेही गरमागरम घेतल्यावरच.

अन्यथा चव किंवा ओरिजनॅलिटी या अर्थाने हे काही संस्मरणीय ठिकाण नव्हे. कट्ट्याची एकत्र येण्यातली मजा गृहीत धरता ठिकाण म्हणून चालून जाईल इतपत आहे.

अर्थात चवढव हा प्रकार खूपच व्यक्तिगत असतो.. त्यामुळे फक्त चवीबाबत माझे मत अर्थातच ग्राह्य ठरेलच असे नव्हे.. हेच जेवण अफलातून आवडलेलेही लोक असू शकतातच.. मात्र पदार्थ कच्चे असणे, मसाला योग्य प्रमाणात नसणे हे बर्‍यापैकी व्यक्तिनिरपेक्ष असावे.

गविकाका या कच्च्या बेसनाचे बिल किती घेतात ?(इथले दर काय आहेत आणि समर्थनीय आहेत का ?)का फक्त वि०म०च्या नावाचे पैसे घेतात ?या धाग्याच्या आनंदावर विरजण घालण्याचा हेतू नाही .दुसरीकडे लिहिलेत तरी चालेल .

आयुर्हित's picture

9 Apr 2014 - 11:22 pm | आयुर्हित

ग्राहकांचा नियोजनाचा अभाव हेच एकमेव कारण आहे अशा सर्व गोंधळाचे. आणि ज्या ठिकाणी कधी अगदी कमी व एखादे दिवशी अगदी जास्त वर्दळ असते त्या पूर्ण थाळी मिळणाऱ्या उपहारगृहात नेहमीच गोंधळ होत असतो, असा माझा अनुभव आहे. परंतु मी आधी कळवून न येणाऱ्या(जास्त संख्येने गटात येणाऱ्या) ग्राहकांनाच याचा दोष देईल.

इरसाल's picture

8 Apr 2014 - 1:38 pm | इरसाल

"आम्ही सगळ्याजणी जेव्हा एकत्र भेटलो ना तेव्हा पहिलीच चर्चा बसण्याच्या सोफ्यांवर लावलेल्या कव्हरांवरुन झाली. मेल्यांनी सोफेपण अशे लावुन ठेवले होते की काहीजणींचे तोंडे दुसरीकडेच होती.
जिथे बसलो होतो तिथे सागवानी दरवाजे खिडक्या आणी भिंतींना सारवुन मस्तपैकी गावाकडचा लुक आणला होता. कित्ती भारी वाटलेय माहित्येय ! (तरी दोनजणी कुजबुजल्याच कोपर्‍यातला तो भाग तेव्ह्ढाच का विटांचा दाखवण्यासाठी सोडला देव जाणे. ....बाई बाई बाई काय ती काकदृष्टी)
परत एक गृप फोटो त्या तोरण लावलेल्या लाकडी दरवाजा समोरच काढायचा हे नक्की केले.
जुन्या घराचा फिल यावा म्हणुन कोपर्‍यात चुलपण मांडलेली होती, सोबत लोणच्यासाठी असलेली चिनीमातीची(इथे कोणीतरी "चिनीमातेची" अशी कोटीसुध्धा केली, कोण गं ती कोण गं ती) बरणी सुध्धा ठेवलेली होती बरोबर तांब्या-पितळेची भांडीपण.पण मला किनई त्यांनी जेवणाच्या बाजुलाच जे ड्स्ट्बीन लावुन ठेवलेले ना ते ना अज्जिबातच नाही आवडले. मी त्या मॅनेजरला बोलायला पण गेलेली पण कोणीतरी मागुन मला खस्स्कन ओढले.असोच.
जेवणतर छानच होते आणी व्हरायटी पण छान होती.चटण्या तर इतक्या की मला बाई शंकाच आली काही जणींनी नुसत्या चटणीने तर पोट नाही ना भरले.पण खरी मज्जातर जेवणानंतर आली कारण तिथे पानाचे सामानही ठेवलेले होते. अय्या कित्ती छान ना ग ! अशा काही तुटुन पडल्या अनाहिता काय सांगु, एकदोघी सांडल्यासुध्हा.
आणी हो इथे मोठी धमालच झाली. पानाचे तबक आणी ते लहान लहान घंगाळे इतके चकचकीत इतके चकचकीत होते की की मी विचारले की काय वापरता? तर मेला म्हणतो कसा "बायको गेली माहेरी" म्हटलं हो तेव्हाच काम करी पितांबरी.

बाकी ते तळलेल्या लसुणाचे भांडे इतके गोडुल होते की सर्वजणींचा विचार चालला होता की एखादे उचलुनच न्यावे.
फोटो मी सुध्धा काढलेले पण विषाणुमुळे ते कार्ड खराब झालेसे आहे म्हणुन फोटो टाकु शकत नाही.
तिथुन निघाल्यावर सगळ्या व्यवस्थित घरी पोहचल्या होतात ना गं. माझा किनई फोनच डिस्चार्ज झाला म्हणुन नाही फोनवु शकले. म्हणुन इथे विचारतेय.

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2014 - 1:49 pm | पिलीयन रायडर

बरं जमलय.. पण तरीही कुच तो कम हय..

काय कम हय? नै म्ह. साधी शङ्का आपली. सांगावेच असा आघ्र्यो नै.

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2014 - 2:11 pm | पिलीयन रायडर

म्हणुन तर "कुच तो" असं लिहीलय ना दादा..

तरीही उत्तर द्याय्चं झाल्च तर..
बायका सतत "अय्या गडे..इस्श गडे" करत फिरत नसतात.. पण फॉर द सेक ऑफ ह्युमर आपण तेही ओके म्हणु..
बायका अ‍ॅक्चुअली जे काहि बोलतात्..वागतात त्यातलं फार कमी ह्यात आलयं.. अजुन बरंच फुलवता आलं असतं..

पैसा's picture

8 Apr 2014 - 2:08 pm | पैसा

चाची चारसोबीसची आठवण आली! =))

इरसाल's picture

8 Apr 2014 - 2:12 pm | इरसाल

चारशे एकवीस तरी करायचे, छ्या !

कवितानागेश's picture

8 Apr 2014 - 2:27 pm | कवितानागेश

हेहेहे. :D
पुढचा कट्टा झाला की तुम्हालाच कळवू, " अमक्या अमक्या ठिकाणी झाला कट्टा". की तुम्हीच टाका व्रूत्तांत. फोटो आम्ही टाकू. ;)

स्पंदना's picture

9 Apr 2014 - 5:22 am | स्पंदना

आयडीचं नावं सार्थ झालं.
छ्या! खरच कोणालाच कसं सोफ्याच्या कव्हरची चर्चा करायच आठवल नाही म्हणते मी?

प्रीत-मोहर's picture

8 Apr 2014 - 1:47 pm | प्रीत-मोहर

स्लर्प्प्प्प्प्प्प्प्प्प

प्रिमो ,माझी प्रतिक्रिया तुझ्यासाठी नाहीये ग ..कळले नाही तुझ्या प्रतिक्रिये खाली कशी आली ते ...+)

हुर्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह ह्या ह्या हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2014 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनाहिताचा कट्टा भारीच झाला म्हणायचा.. फोटो वृत्तांत भारीच..आनंद वाटला. मिपाकरांचे असे कट्टे जगभर व्हावेत. तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे..तुझी गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे, असेच म्हणावे लागेल. :)

बाकी, अनाहिताने मुख्य बोर्डावरही दमदार पावले टाकावीत.( हल्ली दमदार पावलं दिसतातच) अनाहितात लिहिणा-यांनी मुख्य बोर्डावरही सर्वच विषय घेऊन यावेत असेही वाटते.

पुढील कट्ट्यासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

पुणे तिथे काय उणे's picture

8 Apr 2014 - 5:17 pm | पुणे तिथे काय उणे

बाप्रे तुम्हि एवध सगळ खाल्लत? काय हे?

हल्के घ्या. :))

छान व्रूत्तांत. फोटो पण मस्तच. फोटोखाली नावं टाकली तर अजून मजा येईल.

जुइ's picture

8 Apr 2014 - 10:18 pm | जुइ

झाला :)

श्रीरंग_जोशी's picture

9 Apr 2014 - 6:29 am | श्रीरंग_जोशी

कट्टा एकदम जोरदार झालेला दिसतोय.

दोन वर्षांपूर्वी विष्णुजी की रसोईच्या नागपूर येथील मूळ शाखेमध्ये जेवण्याचा योग आला होता. आकर्षक मांडणी व बहुतांश पदार्थ चवदार होते. एखाददुसर्‍या पदार्थांची चव यथा तथा वाटली. पदार्थांची संख्या खूपच असल्याने बरेच पदार्थ केवळ बघूनच समाधान वाटावे लागले.

वृत्तांत अन फोटु छान आहेत.

पिशी अबोली's picture

9 Apr 2014 - 11:09 am | पिशी अबोली

मस्तच!