गुरुजींचे भावं विश्व! भाग-२

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
5 Aug 2013 - 1:56 pm

भाग-१ http://misalpav.com/node/25298 >>> पुढे...
त्या-मला ना...आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी आहे? इथेच द्याल का? हा कर्यक्रम संपल्यावर... सुशी ओरडणार नै कै मला...(ही त्यांची- सुशी..म्हण्जे आमच्या यजमानांच्या सुविद्य पत्नी असतात..असं नंतरहून आंम्हाला..त्यांचा(ही) सह भाग मुलाखतीत झाल्यानंतर कळतं..
=================================
त्या-(मुलाखतकार मोड ऑन) नमस्कार...धर्मसमाज मासिकातर्फे तुमचं स्वागत!

आंम्ही-(सर्व मोड ऑफ करून!!!) धन्यवाद

त्या-तुमचं नाव काय?

आंम्ही-आत्माराम सदाशिव बापट.

त्या-अय्या,बापट मंजे वासिष्ठगोत्री ना!?

आंम्ही-आपणंही एकंदरीत-आमच्याच(गोत्राच्या!) का?>(हा खरा मनात आलेला प्रश्न टाळून) हे मासिकात छापणार काय?

त्या-खि..खि..खि! नै हो,आपलं सहज विचारलं!

आंम्ही-(कर्म आमचे!) मग आता मुलाखतीतले विचारा.

त्या-हो..हो..,तर गेली किती वर्ष हे काम तुंम्ही करताय?

आंम्ही-(वैतागून) १४ वर्ष झाली,म्हणजे तुंमच्या साहित्तिक भाषेत १ वनंवास पुरा झाला. नै का?

त्या- ह्ही ह्ही ह्ही.. काय विनोद करता हो भटजी! अहो,वन वास काय? जनंवास तरी म्हणा.

आंम्ही-हॅ..हॅ..हॅ..एकंदरीत खरं बोल्ताय तुंम्ही. शब्दांवर(च) प्रभुत्व आहे तुमचं!

त्या-हो ना.अता या क्षेत्रात लागतच ठेवायला!

आंम्ही-बरोबर आहे,या(च) क्षेत्रात लागतं!

त्या-या व्यवसायातले तुमचे काही चांगले/वाइट अनुभव सांगा ना?

आंम्ही-वाइट अनुभव आलाच नै आजपर्यंत,हाच चांगला अनुभव म्हणायला हवा!

त्या-ह्हू..ह्हू..ह्हू..! असं टाळू नका हो,खरच सांगा ना?

आंम्ही-(अता नाही काही सांगितलं,तर आपल्या टाळू वरचे शिलकितले केसंही जातील या भयाने..) हम्म..आहे खरा एक चांगला अनुभव. एकदा एका यजमानांनी माझी छत्री मोडली म्हणून त्यांची त्यांन्नी मला दिली.(आणी नंतर उत्तरपूजेत फक्त नारळ'च दिला)असे समाजहितैशी यजमान-लाभणं,हा कित्ती चांगला अनुभव आहे? नै !?

त्या-अहो..अहो..व्वा,व्वा..काय सांगताय काय? त्या यजमानांचा पत्ता द्या ना? त्यांचीही मुलाखत घेइन म्हणते!

आंम्ही-(त्या खौट यजमानाची या खौटीकेकडून वैचारिक हत्या होणार,या आनंदात पत्ता/फोन देऊन..) हा घ्या,आणी उद्याच जा!

त्या- का हो?

आंम्ही-पर्वा..मला त्यांच्याकडे जायचय! (उत्तर पूजा वसूल करायला)

त्या-(गांगरून..) बरं बरं,अता एक(च) वाइट अनुभव सांगा.

आंम्ही-एकच सांगू???

त्या-हो..नै..म्हणजे पेज कव्हर होणर नै ना,म्हणून! नंतर उगाच एडीट होण्यापेक्षा अधीच "कमी" नेलेलं बरं!

आंम्ही-फारच हिशेबी मुलाखतकार दिस्ता आपण,हल्ली पहायला नै मिळत इतका हिशोबीपणा!

त्या-(आमच्या वक्तव्यातला उपरोध न समजल्यामुळे..) धन्यवाद हो भटजी...अता 'तो' वाइट अनुभव सांगा ना?

आंम्ही-पर्वा एका संस्कृती संरक्षक अजोबांबरोबर आम्चा जानव्यावरून वाद झाला.

त्या-काय जानव्या वरून वाद?

आंम्ही-हो ना..जानव्याच्या-वरूनच वाद झाला.

त्या-मंजे...त्यांच्याकडे जान्वं नव्हतं का?

आंम्ही-(आधीच्या वाक्यातले "ध्वनित" न कळलेल्या,या मुलाखितेची दया येऊन..) हो..हो..नव्ह्तं..नव्हतं जानवं त्यांच्याकडे.मग मला मागितलं..आणी चक्क हुज्जत घालायला लागले,की जानवं गुरुजींच्या पिशवीत एक्ष्ट्रा असायला हवच..म्हणून!

त्या-अय्या..आणी मं......?

आंम्ही-मंग काय..मी ही त्यांना म्हटलं,''देत नै ज्जा...!" हवं तर नवं घेऊन या जानवं.

त्या-(पुन्हा आ वासून) बरं..मं...?

आंम्ही-मी सूनावलं त्यांना,तुम्च माझ्याचकडे जानवं मागणं,हे सिग्नलवर धरलेल्या चालकानी-ट्रॅफिक इन्सपेक्टरकडे लायसन मागण्यासारखं आहे!

त्या-व्वा..! मुद्देसूद हो भटजी..आणी मं...?

आंम्ही-मं..काय? सांगितलं पुन्हा..."जा..नवं जानवं घेऊन या!" नैतं मी जातो.

त्या-ह्हू..ह्हू..ह्हू.. भटजी,तुंम्ही खर्रच विनोदी आहात हं! मग...गेलात तुंम्ही???

आंम्ही-(वेगळाच संशय येऊन..) अहो,गेलो कुठे(?)..आहे ना! फक्त त्यांच्या घरातून गेलो!

त्या-हम्म..ते कळ्ळं मला,पण छानच सांगितलेत हो अनुभव! कधी दक्षिणा कमी मिळण्याचा अनुभव येतो का?

आंम्ही-(त्यांच्या मागे उभी आमची यजमानीण पहात,आणी त्या दिवसा'च्या पाकिटाचा विचार करत..) छे हो..असं कसं होइल? आंम्हाला जास्तित-जास्त चांगलेच यजमान भेटतात.

त्या-(दुष्ट्पणानी..)अत्यंत सूचक बोल्ता हं तुंम्ही! छानच दिलित पण मुलाखत.अता पुन्हा कधी भेटू?,पुढच्या भागा'ची मुलाखत घ्यायला?

आंम्ही-मनात-(कशाला आता पुन्हा!?) पुन्हा ना? या ना हवं तेंव्हा या! फक्त फोनकरून या.(म्हणजे मला दुसरीकडे टळता येइल..) हे माझं कार्ड.

त्या-धन्यवाद हो पुन्हा..!

असं म्हणून,त्या त्यांच्या-"सूशी"कडे वळतात.नंतर आमच्या यजमानीण बै,आंम्हाला-कशी झाली हो मुलाखत? नै छानच झाली असेल...आमची ही मावस बहीण हो. अत्ता नविनच पडलीये या क्षेत्रात...

आंम्ही-(अंदाज आला...! इथेच पड म्हणावं आता.-हे टाळून) हो का..व्वा व्वा,फार छान! अशीच माणसं हवी या क्षेत्रात...चला येतो आता. असे म्हणून मनात राम..राम..म्हणत 'घरला' मोर्चा वळवतो.
====================================================

तर...

अश्या बर्‍याच बर्‍या वाइट म्याच आमच्या भिक्षुकजीवनात अधून मधून होतच असतात.त्यातून आमचं क्षेत्र संस्कृतीशी जोडलेलं आणी आमच्या क्षेत्राला इथली संस्कृतीही जोडलेली!

त्यामुळे,आमच्या एका कोल्हापुरी कविमित्राचा ह्यो सवाल जबाब,मनी कायम चिंतावाच लागतो

संस्कृती-संरक्षकांपासुनी,सावध चित्ता करी जरा
संस्कृतीप्रेमी मनुजांसंगे,मन जोडोनी पुढे चला...रं रं रं रं..माझे रामा तू रं..हे हे हे हे हे हे हे ह्हे!!!

अहो,आले आले संस्कृतीरक्षी,मन त्या पक्षी जोडू नको..
संस्कृतीप्रेमी खरी-रक्षिता,कधिही त्यांसी तोडू नको...जी..जी..रं जी..माझे रामा

अरे धर्माचा हा भुल भुलैय्या,डोंबारी तू तिथे खरा ...
सभोवती हे सज्जन जमले,खेळ पहाण्या तुझा जरा..रं रं रं रं माझे रामा

खरा धर्म तो नस्तो केंव्हा,जगी असा'ही नाही तो..
धर्मामध्ये खरे'च सारे,धर्मची ग्वाही ही देतो...जी जी रं जी माझे रामा

अरे जात म्हणोनी पुरोहिताची,एकच जाती तुझी असे..
धर्म-नाम जर देशी त्याला,जगी होतसे तुझे हसे...रंरं रं रं माझे दादा

धर्म-सुधारून कर्म करावे,मानवता ती होई खरी
अप्रीती हे बक्षीस त्याचे,कडू लागले तुला जरी...रं रं रं माझे दादा
===================================================

क्रमशः

संस्कृतीसमाजमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

:)

मुलाखत आली का छापून? नक्की सु शी ने त्या मुलाखतीत काय लिहिलं असेल अशी एक उत्सुकता वाटली.

अनिरुद्ध प's picture

5 Aug 2013 - 2:46 pm | अनिरुद्ध प

छापलेल्या मुलाखतिची वाट पहात आहे (धीर धरुन)

हरहुन्नरी आहात बाबा तुम्ही. कविता, लेख, विडंबन, खाद्यवर्णन काय काय..
लिखाण आवडले.

राही's picture

5 Aug 2013 - 2:50 pm | राही

आपले प्रांजळ अनुभवकथन आवडते आहे. वृत्ती पुरोहिताची पण स्वभाव सुधारकाचा असे काहीसे द्वंद्व आपल्या लिखाणातून जाणवत असते. अर्थात द्वंद्व म्हणजे लट्ठालठ्ठी नव्हे. दोनही पक्ष समान महत्त्वाचे असू शकतात आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात. आपल्याला नक्की काय हवे आहे किंवा करायचे आहे ह्याची एकदा जाण आली की सर्व अंतर्विरोध मावळतो आणि कृती पारदर्शी बनते.
आपल्या लेखनातून ही पारदर्शकताच प्रतीत होत असते. धन्यवाद.

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 2:55 pm | बॅटमॅन

हज्जारवेळा सहमत राही यांच्याशी.

प्रांजळ आणि मुख्य म्हंजे आजपर्यंत कधीही न वाचलेलं अशा पद्धतीचं हे लिखाण आहे. बुवांची वृत्ती एकदम सुधारकी आहे.

प्रचेतस's picture

5 Aug 2013 - 4:55 pm | प्रचेतस

+1

राही आणि ब्याम्याशी पूर्णपणे सहमत.
बाकी मुलाखतीतील संवादांनी बहार आणली.

त्रिवेणी's picture

5 Aug 2013 - 2:55 pm | त्रिवेणी

-(त्या खौट यजमानाची या खौटीकेकडून वैचारिक हत्या होणार,या आनंदात पत्ता/फोन देऊन..) हा घ्या,आणी उद्याच जा!>>>>>>>>>>>>> खौट आणि खौटीका----- एकटीच हसते आहे हे वाचुन

मालोजीराव's picture

5 Aug 2013 - 3:11 pm | मालोजीराव

ओ बुवा…लगोलग तुमच्या 'भाव'विश्वातल्या अणुभवांचे धागे पण येउद्यात - सत्यनारायण कसा घालावा, ग्रहशांती करताना नासाची मदत कशी घ्यावी,चांगला गुर्जी कसा वळखावा , वशीकरण करताना कोणती काळजी घ्यावी वगैरे…
वशिकरणाचा धागा लवकर येऊ द्या…लागणाऱ्या साहित्यासकट

वशीकरण करताना कोणती काळजी घ्यावी वगैरे…
वशिकरणाचा धागा लवकर येऊ द्या…लागणाऱ्या साहित्यासकट

हे वाचून नरसोबावाडीतल्या दुकानांत विक्रीला ठेवलेल्या "इंद्रजाल" इ. गूढ शीर्षकाच्या आणि तितक्याच रोचक मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची आठवण झाली. साला लै दिवस झाले, एकदा बघायलाच हवं तांत्रिक पुस्तकात नक्की काय अस्तं ते. लहानपणी विचारल्यावर तिकडे लक्ष देऊ नये अशी वरकरणी ताकीद परंतु गर्भित धमकी मिळाल्याने परत डेरिंग झालं नसलं तरी उत्सुकता आहेच.

व्यंकटेश माडगूळकरांच्या माणदेशी माणसं मध्ये अशा एका माणसाचं व्यक्तिचित्र आहे. तो गुप्तधन मिळवण्यासाठी इंद्रजाल टैप पुस्तकं वाचतो आणि त्यातले प्रयोग करतो.

पुण्यात अशी पुस्तकं आप्पा बळवंत चौकात सागरमित एंटरप्रायजेसच्या शेजारच्या दुकानात मिळतात. दुकानाचं नाव विसरलो, पण "श्री गुरूदेव" छाप आहे. त्यांचं हेड ऑफिस दादरला आहे.

धन्यवाद, कधी पाहीन जमल्यास. :)

बॅटमॅन साहेब पुस्तक मनात वाचा. त्याचे मंत्र उच्चारण मनातल्या मनात करा. मोठ्याने वाचल आणी फळल तर?
अर्थात हे सारं आमच्या भिंतीत एकदा असलं पुस्तक सापडलं तेंव्हा सांगीतल गेलं होतं. पुर्वजांत कुणाला तरी नाद होता वाटत असल्या गोष्टींचा.

फळ्ळं तर मग मज्जाच की हो मग, टेन्शन इल्ले :D

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2013 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा

@वशिकरणाचा धागा लवकर येऊ द्या…लागणाऱ्या साहित्यासकट >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

चौकटराजा's picture

5 Aug 2013 - 5:22 pm | चौकटराजा

बुवांच्या अंगी बहुविध कळा
अ आ च्या लेखनाचा लागला लळा
कधी होतो गांभीर्‍याशी चाळा
तर कधी हसता येती पोटी कळा !

राही's picture

5 Aug 2013 - 6:35 pm | राही

वशीकरणाचे 'साहित्य' मिपावर कसे काय हजर करावे बुवा?

मुक्त विहारि's picture

6 Aug 2013 - 12:16 pm | मुक्त विहारि

एकदम झक्कास....