गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २७ (यज्ञयाग विशेष!)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
31 Jan 2015 - 6:00 pm

मागिल भाग..
शिवाय.. दरवर्षी एका माजी विद्यार्थ्याला अनुष्ठानाचं यजमानपद लाभत असे. आणि तो नुकताच विवाहित झालेला असेल..तर गुरुजि अगदी हमखास त्यालाच बसवणार्,हे ही ठरलेलं असे.
पुढे चालू...
=======================

आमचा अनुष्ठानाचा महिना कोणता? तर पौष. दरवर्षीचा अगदी ठरलेला. मग आंम्ही रानातून सदाशिव दादा बरोबर जाऊन लाकडं/फाटी/गाठी आणि येता जाता जेव्हढ्या म्हणून गोळा होतील तेव्हढ्या शेण्या समिधा असं अगदी १ महिना आधिपासून आणून गोठ्यामागे रचायला लागायचो. बाहेर आंगण्यात ३ दिवस आधी सदाशिवदादा ,मी आणि तो ६फुटी (किंगकाँग ;) ) हेमंतादादा असे मिळून यज्ञमंडप-बांधायला घ्यायचो. सदाशिवदादा त्यात अगदी तयार असला,तरी गुरुजिंचं लक्ष असायचच. मग तिकुडन ओटिवरनच.."जरा त्या अंगानी मार..त्या अंगानी! " अश्या अज्ञावजा सूचना यायच्या. सर्वात प्रथम अंगण्याच्या साधारण मध्यभागा अलिकडे तिन बाय तिन चा दहाफूटी खो......................ल खड्डा करायला लागायचा. मग त्यात पहिल्या ६ फुटाखाली गेलं की माझी नियुक्ति हेमंता'च्या खांद्यावर व्हायची. मग तो खाली उभा वरती मी-माती काढायला बाहेर सदाशिव..अश्या शिश्टीमनि एकदाचा खड्डा-व्हायचा.. मग त्याला आतून साधारण मातिचा गिलावा करायला..सदाशिवदादा आणि हेमंतादादा मला दोन हातानी एकेक तंगडी धरून..मला ओळंबी सारखं उलटं खड्य्यात सोडायचे. मग चारी बाजूला आतल्याच ओल्या थरांवर हातानी मी..थबाक थबाक..करत बसायचो..हे दोघे वर खेचतील तसं वरती वरती थबाक..थबाकत..बाहेर यायचो,तेंव्हा काकू मला आंगण्याच्या पायर्‍यांवरून लाल्यामारुती म्हणून चिडवायला (उलट) उभी राहिलेली दिसायची...मग गुरुजि दरवाज्याला रेलून आमच्याकडे बघता बघता काकूला 'श्शी!!! .. पोरांच्यात कसली चिडवाचिडवी करत्ये मेली...हो आत तिकडे!" म्हणून काकूला दरडवायचे. मग मी तोंडाला माती लागलेल्या चेहेर्‍यातून पांढरे दात काढून हसायचो. इकडे ह्या दोघांनी खड्डया कडेनी विटांच्या साहाय्यानी कुंडाला तिनपदरी थर रचायला सुरवात केलेली असायची. आणि मग नंतर शेवटी सगळ्याला आधी माती आणि वाळत आल्यावर गौशेणानी लिंपुन मी कुंड पूर्ण करायचो..

अगदी पहिल्या वर्षी पासून ते पाठशाळा सुटेपर्यंत ह्या कुंडबांधणी मोहिमेवर हे आंम्ही तिनच मेंबर असायचो. गुर्जिंनी यात कधिही बदल केला नाही. सदाशिवदादा ..हा अनुभवी आणि जबाबदार व्यक्ति म्हणून , हेमंतादादा ..हा उंचपुरा होता..शिवाय त्या कुंडबांधणी/करणीचा धर्मशास्त्र अनुसार जाणकार! ..मग मी कशाला??? हे मला काहि कळायचं नाही. एकदा काकूला विचारलं..तर मला तिनी, "तुझाच तो सखारामकाका बोलला असेल्,तुमच्या गुरुजिंना.., तुझ्या किल्ले करण्याविषयी!" असं उत्तर दिलन. पण मग गुरुजिंनाच एकदा कुणाशी तरी मी बोलताना ..चोरुन ऐकलं त्यात याचा उलगडा झाला, " अहो विश्वेवर गुरुजी..आंगच्या गुणास नाही कसें म्हणता तुम्ही? आमचा तो आत्मू बघा, चिखलमातीत नुसता हात घातलन तरी विटा पाडील असं-सहज वळण आहे त्याला. तो आल्यापासून आमचं अनुष्ठानाचं कुंड ज्जरा देखिल कधी चुकलेलं नाही. आणि तेच त्या शास्त्रशुद्ध कुंडबांधणी अधिकार्‍याला,मंजे आमच्या ..हेमूला मापं घेऊनंही जमायचं नाही. म्हणून त्याला नुसता खड्ड्याला-देखरेखिला सोडतो हो मी..बाकि कुंड बांधतात्,ते आत्मू आणि सदाशिव ..आरे..आधी माणसात 'जे आहे'.. ते वापरलं,तर त्याच्यात 'जे नाही'.. त्याचा अभ्यास संभवतो..क्का......य???" त्यामुळे नेहमी कुंड बांधायचो आंम्ही..हे कित्तीही जरी खरं असलं,तरी ..आमचं प्रत्येकाचं-"माप" गुरुजिंनाच माहित असायचं..हे त्याहुन शतपट खरं होतं.

मग अगदी अनुष्ठानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी .. उद्याची मुख्य (कोरडी) पूर्वतयारी - या कामावर सर्व पाठशाळा यज्ञमंडपात साहित्य/सामग्री सह हजर असायची. एका बाजूला यज्ञाच्या देवता मांडल्या जायच्या ..त्यात तांदुळाच्या निरनिराळ्या (शास्त्रीय) आकृत्या काढण्यासाठी मी आणि सुर्‍या असायचो. इकडे यज्ञकुंडाच्या भोवती आणि वरच्या तिन स्तरांवर शास्त्रीय पद्धतीच्या रांगोळ्या काढायला हेमंतादादा आणि आणखिन दोन त्याच्या गोटातले खेळाडू असायचे. दुसर्‍या बाजूस किश्या आणि तो संज्या (म'राठवाड्यातला! ) अजुन एका ज्येष्ठ विद्यार्थ्याच्या हताखाली पुण्याहवाचन-मांडत असायचे. आलेले इतर सेवकगण सदाशिवदादाच्या विनंती नुसार जे कमी पडेल ते कडेनी पुरवत असायचे. आणि मग एकदा सगळी तयारी पूर्ण झाली..की गुरुजि 'एक नजर' टाकून 'आजचे काम' पूर्णत्वास गेल्याची पावती द्यायचे. मग सगळ्यांची जेवणे वगैरे होऊन..लवकरात लवकर झोपाझोप व्हायची..ती दुसर्‍या दिवशी भल्या थोरल्या पहाटे उठायला! खरोखर अनुष्ठानाचा पहिला दिवस म्हणजे एखाद्या भल्यामोठ्ठ्या खेळांच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसासमान असायचा. नंतर दुसर्‍या दिवशी पासून रेग्युलर प्ले! ते शेवटच्या सांगते'च्या दिवसापर्यंत!

साधारण पहाटे तिन वाजता सगळी शाळा उठायची..वळचणीच्या मागे भल्यामोठ्या पेट्ल्या चुल्ह्यांवर स्नानाचं पाणि ,गरम होत असायचं..त्याच्या प्रकाशात पलिकडच्या खराताच्या वाडितली निम्मी झाडं दिसायची. आमच्या स्नान संध्या वगैरे आवरल्या जायच्या. आजुबाजुच्या घरांमधून येणारी ,आणि बाहेर गावाहून आलेली मदतनीस माणसं देखिल ५ पर्यंत आवरून हजर व्हायची..आणि मग काकूनी मोठ्या पातेल्यात केलेला पहिला कडक (गवती)चहा घेऊन... सोवळी नेसलेली आमची सगळी फौज ओटीवरून संचलन केल्यासारखी गुरुजिंमागून यज्ञमंडपात जायची. सर्वं जण आसनस्थ व्हायचे.. यजमानपदी वर्णी मिळालेला सपत्निक पुण्याहवाचना-समोर बसायचा.. आणि पहाटेच्या त्या उजाडत्यावेळी,तो धूप दरवळ आणि समयांच्या मंद प्रकाशात गुरुजि शांतिपाठाला पाहाटेच्या (खर्जातल्या..) आवाजानी सुरवात करायचे..त्यांच्या त्या धीरगंभीर स्वरात पहिलं हरि:ओम उच्चारायचा अवकाश..की मागून आंम्ही सर्व जणं, एका क्षणामधे त्या प्रवाहात-एकत्र येऊन.. हरि:ओम..आनोभद्रा: क्रतवोयंतु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्बिध:....देवानोयथा सदमिद्वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे ..असे चालू लागायचो. मग पहिली पाच मिनिटं शांतिपाठ झाला..की यजमानास कुंकू लाऊन ..त्यांचं आचम्य-प्राणानायम्य...पवित्र-पाणि:.. व्हायचं. आणि मग नंतर जो आवाज खर्जातून मध्यमेला-उठायचा, तो पुण्याहवाचन होइपर्यंत! अगदी पहिले इष्ट्/कुल/आराध्य देवतांचे-विडे ठेवण्याच्या मंत्रांपासून ही सुरवात व्हायची.. ओम गणानांत्वा गणपतिं हवामहे..कविंकवीना मुपमश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रम्हणां ब्रम्हणस्पत आनः शृण्वन् उतिभि:सी दसादनम् .. असे ४/५ मंत्र होऊन..मग पुढे विड्यांवर पाणि घालताना... इष्ट/कुलं/आराध्य/उपास्य देवताभ्यो नमः ..एतत्ते पूगीफलतांबूलम् सुवर्ण निष्क्रय दक्षिणां समर्पयामि। वृद्धान् ब्राम्हणानां गुर्वादिंश्च नमस्कृत्य। साक्षत पाणि: .. इथपर्यंत..! अगदी अंगावर रोमांच उभे रहायचे..

"पाहटेला .. खर्जा'चा कित्तीही नियम असला..तरी पहिली काहि मिनिटं गेल्यावर, जेंव्हा मध्यमस्वरात गाडी येते.. तेंव्हा त्याची खरी मजा येते. खर्जानी अंतर्मन स्तब्ध किंवा शांत होत/रहात असलं..तरीहि..त्याच अंतर्मनाची..कर्मामधे-- (खरी)सुरवात व्हायला-हवी असेल..तर मध्यम स्वरात सुरु-झाल्याशिवाय पर्याय नाही..! "

हा आमच्या गुरुजिंचा स्वानुभवसिद्ध निष्कर्ष! नाहितर इतर पारंपारिक-शास्त्री/गुरुजि.. किमान स्वतःच्या घरच्या अनुष्ठानादी इतर कर्मात, आजही परंपरा -ओलांडायला भितात. हे आंम्ही पहात आलेलो. पण आमचे गुरुजि म्हणजे कायम प्रयोग करणार.. मग त्याच्या आड ह्या शास्त्र/परंपरा कित्तीही आल्या,तरी बिनदिक्कत त्या बाजूला सारणार! आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, त्या बाजूला काढलेल्याच्या जागी....जे प्रयोगांती-लागू झालय..ते नविन-आणणारंही! गुरुजिंच्या या प्रायोगिकप्रवृत्ति मुळे , ते बरेचसे परंपराद्रोही आणि स्व'परंपरेचे आचारक होऊन बसलेले होते. स्वाभाविकच या प्रकारामुळे त्यांना मान कितिही असला(त्यांच्या विद्वत्ततेमुळे..) तरिही त्यांच्या बरोबरची इतर वैदिक मंडळी,आमच्या गुरुजिंना-"त्यांच्या-त्या सन्मानात" मोजत नसत.. (अर्थात..अशिही गुरुजिंना त्याची यत्किंचितही अभिलाषा नव्हती!) पण आंम्हाला मात्र हे प्रतिवार्षिक अनुष्ठान म्हणजे असं बरच काहि शिकायला मिळायची एक महापर्वणीच होऊन बसली होती.

मग ते पुण्याहवाचन वगैरे झाल्यावर, आंम्हाला अनुष्ठानात काम करण्याच्या वर्ण्या-दिल्या जायच्या. आचार्य/उपाचार्य/ब्रम्हा/होता/ऋत्विज्/वाचक/सेवक/सदस्य इत्यादी अनेक पदं(वरंणं) असायची. अर्थात..जसं पद..तशी कामगिरीही असायचीच! नाहितर गुरुजि वरनं ओरडायचेच.. "अरे सदाशिव..ह्याची ऋत्विजाची वर्णी काढून घे..आणि सेवक म्हणून दे बरं! जमत नाही ते काम..आणि मग खुर्चीवर बसायला कशाला हवा तो?...असाच-नुसता!?? ..बदल त्याला..चल!!!" आणि मग एकदा वर्णी मिळाली ..कि कुणी आचार्य कर्म्,कुणी देवतास्थापना,कुणी अग्निमुखाकडे असे सर्वत्र पांगायचे. आणि गुरुजि जाणिवपूर्वक ब्रम्ह्या'ची वर्णी ,स्वतः घेऊन बसलेले असायचे..कोण कुठे चुकतोय? ते ही पहाणार..आणि कोण कसा बरोबर येतोय? ते ही!!! मी आणि सुर्‍या मात्र ,सदस्य--ह्या वरपांगि अत्यंत सामन्य वाटणार्‍या..पण प्रत्यक्षात सर्वत्र अधिकार चालणार्‍या ( ;) ) वर्णीवर असायचो! अर्थात..हे ही आमच्या मतानी नव्हे,तर गुरुजिंच्याच मनानी ठरवलेलं पद होतं... आपल्या सर्कशीतल्या विदुषका सारखं... सगळीकडे-धडपडायचं,आणि वेळ आली तर-उभंही राहायचं!

अश्या एकदा सगळ्यांना जबाबदार्‍या दिल्या गेल्या की मग पहिला ब्रेक-व्हायचा..तो काकूनी भरपूर केलेले उपवासाचे-दडपेपोहे! आणि किश्यानी.. पाठशाळेत आलेल्या सेवेकर्‍यांपैकी कुणाला तरी भारंवाही-बनवून ( ;) ) भल्यापहाटे आणलेल्या काप्या-फणसांचा! मग सगळी मंडळी ओटीवर (काकूच्या भाषेत..) "येका लैनैत.." केळीची पानं-धरून बसायचो. आणि मग एकदा का जोरदार नाश्टा झाला,की पुढे नॉनश्टॉप पाच तास उरलेली म्याच! त्यात सगळ्यात आधी जो कार्यक्रम असे, तो पहिल्या दिवशीचा खरच धुर-काढणारा कार्यक्रम! अग्नि-आणण्याचा! अगदी - "भलेभले पडले धारातिर्थी तरिही आज हा का रुसलेला,अन् मंत्र-बळेही! ( ;) ) बो-लावुन तो, कुण्या कोपर्‍यासी बसलेला!" असा आला तर एका झटक्यात,नायतर दोन दोन तास न गावणारा तो "अग्नि!" शंकू आणि अरणीतून मंथन करूनच तो-त्या प्राचीsssssन (घासाघिस) पद्धतिनी-काढायचा असल्यामुळे...पहिल्या दिवशी शाळेत-दाखल न होणार्‍या पोर्‍या इतकाच तो रुसवा आणि फसवाही! मग सुरु व्हायची ती त्याची म्याच! आधी खाली ते पोतं,त्याच्यावर तो ठराविक झाडाच्या गाठीपासून केलेला ओंडका(अरणी!) त्या ओंड्क्यालाच्या वर तो इंग्रजी T आकाराचा मंथा,त्याच्या खालच्या टोकाला ,तोफेत तोंडाकडनं ठासावा..तसा ठासून बसविलेला तो लाकडाचा-भोवर्‍याच्या आकाराचा शंकू..मग ओंडक्याच्या दोन्ही बाजूनी प्रथम यजमान आणि त्याच्या पत्नीला बसवून ,तो शंकू अरणीच्या खड्यावर रोवून त्या T आकाराच्या मंथ्यावर दोन जण वरन त्याचं आडवं दांडू धरणार.. खाली त्या मंथ्याच्या मध्यभागाला ,दोन्ही कडनं 'रवि घुसळायला' लावतात तशी दोरी लावली जाणार..आणि मग बसलेल्या दोघांनी दोन्ही बाजूनी..दोरिनी तो मधला दांडू घुसळायला सुरवात केली जायची..मग त्या खालच्या ओंडक्यात्,तो शंकू ...डांबरी रस्ता खणतात,त्या ड्रिलर-प्रमाणे जोरजोरात फिरुन धुर काढायला लागायचा...मग कडेनी आमच्या सगळ्यांची अग्निची सूक्त चालू व्हायची! ओम..अग्निमीळे पुरिहितं यज्ञस्य देनमृत्विजम्..होतारं रत्न धातमम्

या सगळ्या रणधुमाळीचा परिणाम असा व्हायचा, कि त्या मंथ्या भोवती "दोहनाला" नवे बसोत्,अगर जुने...जाणते बसोत अगर नेणते... खालचं/वरचं लाकुड जेव्हढं चांगलं,म्हणजे अग्नि यायला जेव्हढं-अनुकुल...आणि त्यावेळीचं हवामान जेव्हढं उत्तम तेव्हढा तो चटकन यायचा... पण तेच सगळं जेव्हढं प्रतिकूल तेव्हढाच त्याला-यायला वेळंही लागायचा. गुरुजिंना तर हे सगळं मनातून माहितंही असावं..(कारण ते मधेमधे हसायचे हळ्ळुच! :-/ ) पण हे सगळं साधं सरळ समजून घेइल्,तर ते मन मग "धार्मिक" कसं म्हणावं? मग आजुबाजुच्या बायकांपैकी काहिजणी...त्या बिचार्‍या लाकडात सुप्तावस्थेत असलेल्या अग्निला:- पहिली:- " आय्या..येत कसा नै मेला लवकर? आज भारीच वेळ लावलन!" ...दुसरी:- " छे गो..ही अलिकडची मुले,अग्निची स्तोत्रं मन लाऊन म्हणत नैत..म्हणूनंही असेल!" ...तिसरी:- "नविनच लग्न झालेला आहे ना तो यजमान? (घोळक्यातून आवाजः- आणि (त्याची)बायकोहि!)....तरी!?????" अश्या निरनिराळ्या धार्मिक शंका-काढून घ्यायच्या! एव्हढ होतय नाही तर.., गुरुजिंच्या इथे कामाला असलेला ,मंडपाबाहेरून हा "खेळ"-पाहणारा-नोकर..:- " छ्या....! म्येला लाक्डात गर्मी नसेल्,तर 'जाल' यिल कशाला लवकर??? फुक्कट घामाघुमि साली! येव्हढ्यात धा किलो लोनी आला असता!" असा दगड मारून जायचा.

आणि मग होता होता..(सगळ्यांचा..) भरपूर-धूर काढून झाल्यावर ,त्या ओंडक्याच्या एका बाजूला पान्हा-फुटून एक जाड लालसर ठिणगी धरलेली कुणाला तरी दिसायची! आणि मग मोठ्यांदी :- "आला रे आला... थांबा थांबा आता घुसळायचे!" असा आवाज यायचा.. आणि मग कडेला ठेवलेल्या एका नारळ शेंड्या-भरलेल्या घमेल्यात तो ओंडका उलटा ठोकून्,ती "ठिणगी" त्यात पाडली जायची..मग नारळशेंड्या पेटायला लागल्या की मात्र..सगळे आनंदानी ओरडायचे:- "अग्नि नारायण भगवान की...........................जय!"
============================
क्रमशः...
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

31 Jan 2015 - 6:05 pm | प्रचेतस

क्या बात है आत्मूस,....!!!!!!!
कसलं भन्नाट लिहिता राव तुम्ही.

अजया's picture

31 Jan 2015 - 7:05 pm | अजया

फार छान लिहिताय बुवा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 7:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो अग्नी प्रज्वलित करायचा एकदा पाहिलेला कार्यक्रम डोळ्यांसमोर जस्साच्या तस्सा उभा राहिला.

रेवती's picture

31 Jan 2015 - 7:14 pm | रेवती

:)

सतिश गावडे's picture

31 Jan 2015 - 7:16 pm | सतिश गावडे

मस्त लिहिलंय हो गुरुजी !!!

यशोधरा's picture

31 Jan 2015 - 7:33 pm | यशोधरा

मजा येतेय वाचायला. सुरेख चाललं आहे..

विशाल कुलकर्णी's picture

31 Jan 2015 - 7:36 pm | विशाल कुलकर्णी

देवा मस्तच लिवताय. पुस्तक करा या सगळ्यांचं एक.
अवांतर : एक शंका आहे. प्रत्येक भागाच्या नावात 'गुरुजिंचे' मधली पहिली वेलांटी आणि 'भावं विश्व' मधला 'व'वरचा अनुस्वार रसभंग करतोय. त्याला काही विशेष कारण आहे की जस्ट टायपो आहे ती?

त्याला बुवा शैली असे म्हणतात.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2015 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा

@अवांतर : एक शंका आहे. प्रत्येक भागाच्या नावात 'गुरुजिंचे' मधली पहिली वेलांटी >> ती वेलांटि जाणिव पूर्वक पहिली ठेवली आहे. गुरूजी लोकांचे- याचा संक्षेप त्यात(अपेक्षित) आहे. ती दीर्घ ठेवली,तर तिचा अर्थ कोण्या तरी एकाच गुरुजिंचे असा घडेल. म्हणजे तो दीर्घोच्चार, आदरार्थी एकवचनि जाइल. ते नको आहे. :)

@आणि 'भावं विश्व' मधला 'व'वरचा अनुस्वार रसभंग करतोय. त्याला काही विशेष कारण आहे की जस्ट टायपो आहे ती? >> "व" - पूर्ण होण्या साठि तसं केलय. 'भाव'असं लिहिलं तर ते (वडा)पाव मधल्या- "पाव" सारखं वाचलं जातं. म्हणून! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

धमाल जोरात चाललीय लेखमाला ! पुभाप्र.

नवीन लेखन उघडल्यावर सर्वात पहिले गुरुजिंचं --चा भाग कितवा ते पाहतो इतका झपाटलेला झालो आहे.
"गुरुजि ब्रम्हाची (ब्रम्+हाची) वर्णी घेऊन बसलेले. ब्रह्माची (ब्रहु+माची)?

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2015 - 9:45 pm | अत्रुप्त आत्मा

@नवीन लेखन उघडल्यावर सर्वात पहिले गुरुजिंचं --चा भाग कितवा ते पाहतो इतका झपाटलेला झालो आहे.>> मन:पूर्वक धन्यवाद.

@"गुरुजि ब्रम्हाची (ब्रम्+हाची) वर्णी घेऊन बसलेले. ब्रह्माची (ब्रहु+माची)? >> हवी ती शब्दफ़ोड घ्या. त्याचा अर्थ लागण्याशि काहीच संबंध येत नाही. ते चिकटवलं/चिटकवलं सारखं आहे. :)

अतिउत्तम! साधु साधु!

यज्ञाच्या देवता म्हणजे इंद्र, वरुणादी वैदिक देवता का?

बाकी हल्ली भटजी लोक विटांचे कुंड बांधण्याऐवजी पत्र्याचे रेडीमेड कुंड घेउन फिरताना दिसतात.

बाकी तुमचा लेख आणि अग्नीमिळे.... वाचून पाटेश्वरच्या अग्नीमूर्तीची आठवण झाली.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2015 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा

@यज्ञाच्या देवता म्हणजे इंद्र, वरुणादी वैदिक देवता का?>>> होय.. या आणि अश्यासारख्या अनेक!

@बाकी हल्ली भटजी लोक विटांचे कुंड बांधण्याऐवजी पत्र्याचे रेडीमेड कुंड घेउन फिरताना दिसतात.>>> ते त्या वेळेसचा खेळ--- जसा/जिथे/आणि जेव्हढा..., लहान/मोठा..., (धर्मशास्त्राप्रमाणे-तथाकथित)-पवित्र/अपवित्र..., - असेल..त्यावर ठरतं असतं. एकच एक..,अस कुठेच/काहिच/कधिच.. निश्चित नाही/नसतं/नसेल.

@बाकी तुमचा लेख आणि अग्नीमिळे.... वाचून पाटेश्वरच्या अग्नीमूर्तीची आठवण झाली.>> हम्म्म..अनुषंगिक आहे.
=================================
समांतरः-
१) अग्नि काढण्याचा---अरणी व मंथा
https://lh6.googleusercontent.com/-NLTXMymPk9o/VM0Xx79dhGI/AAAAAAAAG4A/0GvRREzDEW0/s320/1402546668418.jpg
२)दोहन करून अग्नि-काढताना!
https://lh5.googleusercontent.com/-nj4ok1snX5U/VM0diDKTEFI/AAAAAAAAG4Q/zdykJGWT7-g/s320/1402546656383.jpg
==========================================
आमच्या(च) एका मोठ्या अनुष्ठानात घेतलेले फोटो.

मुक्त विहारि's picture

1 Feb 2015 - 4:07 am | मुक्त विहारि

गुरुजी फॉर्मात अन मिपाकर पण जोशात...

पुभाप्र

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Feb 2015 - 11:06 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच रंगतदार होत चालली आहे ही लेखमाला.
पुढे काय वाचायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

पैजारबुवा,

प्रमोद देर्देकर's picture

2 Feb 2015 - 4:41 pm | प्रमोद देर्देकर

+१ तेच म्हणतो.

प्रचेतस's picture

2 Feb 2015 - 4:46 pm | प्रचेतस

+२

सिरुसेरि's picture

1 Feb 2015 - 6:33 pm | सिरुसेरि

छान लेख व माहिती . भारत एक खोज ची आठवण झाली .

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2015 - 10:36 am | अत्रुप्त आत्मा

@भारत एक खोज ची आठवण झाली .>>> अतिशय धन्यवाद! पण, मला काहि नीट आकलन होत नाहिये..म्हणजे,कशामुळे??? ग्रामिण जीवन लेखनात उतरलय म्हणून? की धर्मसंस्कृतीचा धागा त्यात आहे! म्हणून? :)

तेव्हढें कळ्ळें तं बंरें होंइल!

मलाही त्या सीर्यलीचीच आठवण झाली. त्यात वैदिक काळासंबंधित एपिसोडमध्ये अशा विधींचे वर्णन आहे मस्त एकदम.

तदुपरि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी.

https://www.youtube.com/watch?v=UnbqnMhbB44

१९७५ साली केरळात अग्निचयन नामक यज्ञ अगदी साग्रसंगीतपणे कुठेही काटछाट न करता केला गेला त्याचे चित्रण एका गोर्‍या प्रोफेसरने केलेय. मला तो व्हिडिओ आठवला एकदम.

ह्या निमित्ताने नाणेघाटातील नागनिकेच्या प्रतिमालेखात उल्लेखलेल्या यज्ञांची आठवण झाली.

यद्नांची यादीच बघा.

दोनदा अश्वमेध
एकदा राजसूय
अग्नाधेय
अन्वारंभणीय
अंगारिक
सप्तदशातिरात्र
भगलदशरात्र
गर्गत्रिरात्र
गवामयन
अंगिरसामयन
शतातिरात्र
अंगिरसातिरात्र
छंंदोपवमानत्रिरात्र
त्रय्प्दशत्रितात्र

बॅटमॅन's picture

4 Feb 2015 - 5:53 pm | बॅटमॅन

मस्तच.

सातवाहन राजे हिंदू धर्मप्रेमी होते, पण इतके यज्ञबाज असतील असं वाटलं नव्हतं!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2015 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा

येस .. सरव काहि मूळचेच आहे. पण ह्यात प्रामुख्यानी शुक्ल यजुर्वेदाच्या अगदी अल्प उरलेल्या..म्हणजे काण्व शाखेचे सर्व पठण आलेले आहे. सुरवातीलाच.. एका लहान मुलाला..नविन नविन संथा देऊन..मुख्यत्वे करून..त्याला स्वर-म्हणायला शिकविले जात आहेत. अगदी हातानी मान/डोके धरून.. (मेरकू पाठशाळा क्ये पहिले दिनों की यांद आ गई =)) ) नंतर पुढे एका विद्यार्थ्यांच्या समुहाला..संथा देतानाहि दाखविले आहे.. लैच मस्त!

धन्यवाद रे ब्याटुचार्या! ;)

बॅटमॅन's picture

4 Feb 2015 - 5:59 pm | बॅटमॅन

हाहा, वेल्कम वेल्कम!

तदुपरि घनपाठादि प्रकार नक्की कसे असतात हे वर्णन करून सांगणारा हा अजूनेक छोटास्सा व्हिडो. तुम्हांला नवीन असे यात काही नाही, पण एक रोचक रिप्रेझेंटेषण म्हणून चांगलं आहे- विशेषतः नवीन लोकांना आयड्या चांगली येते.

https://www.youtube.com/watch?v=qPcasmn0cRU

फारच वेगळी अन रोचक लेखमाला. =)
बाकी यज्ञकुंड दहा फूट खोल हे वाचून डोळे अंमळ खोsल गेले !
उपवासाचे दडपे पोहे खायला उत्सुक आहे. =D

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2015 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा

@बाकी यज्ञकुंड दहा फूट खोल हे वाचून डोळे अंमळ खोsल गेले !>>>

हे पाहा...
https://lh3.googleusercontent.com/-jPVztI-lHT8/VNCFjiwg0aI/AAAAAAAAG4k/xOkxt4ShCjQ/s320/1402546655640.jpg
(ता. करमाळा,जि.अहमदनगर..येथिल) प्राचीन कुंड
https://lh4.googleusercontent.com/-aderwMIqSi0/VNCFduo9WII/AAAAAAAAG4g/e282xCI7vqk/s320/1402546653426.jpg
हे एव्हढे मोठ्ठे लागते..कारण कार्यक्रमापरत्वे- १ अठवडा ते महिनाभर दररोज, लाकुडगाठी,बंबफोड्,गोवर्‍या,तूप,समिधा..आणि इतर आहुतींचे नाना पदार्थ..असे सर्व मिळून ..रोज ३० ते ५० किलोचे जिन्नस आहुती म्हणून पडत असतात..म्हणून ते अश्या मोठ्या आकारांचे असावे लागते.

===========================================
@उपवासाचे दडपे पोहे खायला उत्सुक आहे. >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing009.gif बरं..! घ्या मग.. पोहे..शेंगदाणे ,उपाशीमिठ, हिरव्या मिर्च्या, तेल..शहाळ्याचं कवळं खोबरं.. हे सर्व जिन्नस..परातीमधे एकामागून एक टाकत एकत्र चुरडा..भरडा..थोडक्यात..सुरि अगर विळीने..मिर्च्या/नारळ हे बारिक करू नका...हतानीच चुरडून करा.. म्हणजे त्यावर,(काहि धार्मिक उप'वास वाद्यांच्या मताप्रमाणे..) कोणताही संस्कार होणार नाही.. ते नैसर्गिक रहातील.. सगळे चु'रडले / भ'रडले गेले.. कि झाले उपासाचे दडपे पोहे तयार!
घ्या आपल्या उपास्य -द्येवाचं नाव..आनी हाना मंग! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif

एकदम झकास....
लगे राहो बुवा

जेपी's picture

2 Feb 2015 - 5:57 pm | जेपी

आवडल...

एक प्रश्न -
गणेश याग हे काय प्रकरण आहे.
फारस ऐकुन नाही.
(प्रश्न वैयक्तीक आहे)

पैसा's picture

3 Feb 2015 - 11:07 pm | पैसा

यज्ञकुंड १० फूट खोल लागतं हे माहीत नव्हतं. आता कारण कळलं.

अरणी-मंथाच्या मदतीने कमीत कमी (साधारण) किती वेळ लागतो अग्नि मिळवायला?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2015 - 11:52 pm | अत्रुप्त आत्मा

@किती वेळ लागतो अग्नि मिळवायला?>> अर्धा तास ते एक तास कमित कमी...
त्याहुन पुढे २/२ ...३/३ तासंही घालविल्याची उदाहरणे आहेत..

पैसा's picture

4 Feb 2015 - 5:19 pm | पैसा

अश्मयुगीन मानवाबद्दलची एक कादंबरीमालिका वाचत होते. त्यात अगदी असेच लाकडावर लाकूड घासून अग्नी तयार करण्याचे वर्णन आहे. आता आपल्याला कळणारही नाही, किती त्रास होता ते!

सिरुसेरि's picture

11 Mar 2015 - 1:07 pm | सिरुसेरि

उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व . या मालिकेची आठवण होण्याचे आणि एक कारण म्हणजे त्याच्या टायटल ट्रॅकमध्ये यज्ञांत केली जाणारी , वेदांतील देवतांची स्तुती हिंदी भाषेत सुंदरपणे ऐकवली आहे. काही ओळी अशा - "स्रुष्टीसे पहले सत नही था , असतभी नही . अंतरीक्षभी नही , आकाशभी नही था ." आणि " ओ स्रुष्टी निर्माता , स्वर्ग रचेता सुरज रक्षा कर " .